प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जानेफळ :- व-हाड-मध्यप्रांत. तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणें. मेहकरच्या उत्तरेस सुमारें १० मैलांवर हे खेडेंगांव आहे. लोकसंख्या सुमारें दोन हजार. गांवास गढी आहे. पूर्वी हा गांव देऊळगांव ( राजाच्या) जाधव घराण्याकडे होता. गांवाच्या मध्यभागीं एक दिपमाळ आहे. येथें मुकुंदराज नांवाच्या एका साधूची जुनी समाधी आहे.  हा मुकुंदराज प्राख्यात विवेकसिंधुकार मुकुंदराज प्रख्यात विवेकसिंधुकार मुकुंदराज नसून दुसराच असावा. येथील  पाटिलकी शिंदखेडकर जाधवराव घराण्यांत पूर्वापार होती. येथें या जाधवांनीं एक गढी बांधलीं आहे. बुलढाणा जिल्हा होण्यापूर्वी या गांवींच (अव्वल इंग्रजींत  ) जिल्हयाचें मुख्य ठिकाण होतें.  (काळे-व-हाडचा इतिहास)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .