प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

कुरुपुरुवंशकाल उर्फ भारतीय काल (ख्रि. पू. २०००-१०००)

मागें सांगितल्याप्रमाणें ९३ पिढ्या मोजून इक्ष्वाकु ते भारतीययुध्द यांत साधारण १८६० वर्षें झालीं. या कालांत यादव, हैहय, पौरव, कान्यकुब्ज, काशी, सूर्य, विदेह, दिष्ट, अनु, उत्तरपंचाल, दक्षिणपंचाल, द्विमीढ, मगध हे प्रख्यात राजवंश भरतखंडांत ठिकठिकाणीं राज्य करीत होते. यांचीं परस्परांत युध्दें होत आणि त्यांच्यामधील कोणी तरी शूर राजा चक्रवर्तीपद मिळवी. हें पद कांहीं कालानें दुसर्‍या एखाद्या पराक्रमी राजाकडे जाई. या कालांत जे चक्रवर्ती राजे झाल्याचें आढळतें त्यांचीं नांवें कालानुक्रमानें पुढील प्रमाणें आहेत: ययाति (पौरव ऊर्फ यादववंशी), शशबिन्दु (यादव), मान्धाता (सुर्यवंशी), शिबि (अनुवंशी), कार्तवीर्यअर्जुन (हैहय), मरुत्त (दिष्टवंशी), सगर (सूर्य), श्रीराम दाशरथी (सूर्य), शंतनु (पौरव), युधिष्ठिरधर्मराज भरत (पौरव), भगीरथ (सूर्य), अंबरीष (सूर्य), दिलीप (सूर्य) (पौरव). सारांश मनुपासून (मनूचा पुत्र इक्ष्वाकु) (युधिष्ठिरकालीनच) यांत २९ पिढ्या झाल्या असाव्यात. वर पुराणांतील राजावली घेऊन जे इतिहासाचे धागे जोडण्याचा प्रयत्न पार्गिटरनें केला आहे त्याचें फल दिलें आहे. तें देतांना हेंहि सांगितलें पाहिजे कीं, पार्गिटरचें हें सर्व विवेचन एक इतिहासकल्पना या पलीकडे गेलेलें नाहीं. दाशराज्ञयुध्द ही एक महत्त्वाची कालमर्यादा धरून तिच्या पूर्वीच्या व नंतरच्या इतिहासाचें पार्गिटरनें चांगले पृथक्करण केलें नाहीं. तें जेव्हां होईल तेव्हां प्राचीन इतिहासाची मांडणी करण्यांत एक पाऊल पुढें पडलें असें होईल.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .