प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

लॉर्ड रेडिंग- (१९२१- २६) राष्ट्रीय सभेनें सुधारणांवर बहिष्कार घालून असहकारितेची चळवळ सुरू केली, पण त्यामुळें एकंदरींत राष्ट्राचें नफ्याऐवजीं नुकसान होऊ लागलें. तथापि राजकीय चळवळ जोरांत वाढली. त्यामुळें सरकारनें युवराजास इकडे आणविलें, पण त्याच्या समारंभावर ठिकठिकाणीं बहिष्कार घालण्यांत आले. या सुधारणांत जातीवार निवडणुकीचें तत्त्व पुढें आल्यानें व अन्यकारणांनीं हिंदुमुसलमान ऐक्य भंग पावलें. ब्राह्मणब्राह्मणेतरवाद जोरांत वाढला व राजकीय चळवळींचें बळ नाहीसें झालें. निजामानें वर्‍हाड परत मिळविण्यासाठीं केलेली खटपट फुकट गेली व रेडिंगनें हिंदी संस्थानें हीं इंग्रजसरकारचे मित्र नसून मांडलिक होत असें जातां जातां प्रसिध्द केलें (१९२६). वायव्य सरहद्दीवर अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत रेलवे तयार केली. राजकीय चळवळीच्या दडपशाहीसाठीं कांहीं कायदे तयार केले. रेडिंगच्या नंतर लॉर्ड अयर्विन यांची नेमणूक गव्हर्नरजनरलच्या जागेवर झाली असून सध्यां (१९२७) त्यांची कारकीर्द सुरू आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .