प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
                 
ज्ञानकोश- एन्सायफ्लोपीडिया या ग्रीक नांवाबद्दल हा प्रतिशब्द योजिला आहे. एन्सायक्लोपीडिया याचा ज्ञानचक्र किंवा सर्वांगीण शिक्षणपद्धति असा अर्थ ग्रीक विद्वान करीत; व आजहि त्याचा अर्थ सर्व विविध ज्ञानांगांचें शिक्षण देणारा ग्रंथ असा होतो. कायदा, इतिहास, धंदें यासारख्या एखाद्या विषयासंबंधी एकूणएक माहिती कोशपद्धतीनें देणाऱ्या ग्रंथासहि त्या विषयाचा ज्ञानकोश असें म्हणण्यांत येतें; उदाहरणार्थ-'एन्सायक्लो. बिब्लिका' (संपादक चेनी व सदर्लंड ब्लॅक, ४ विभाग, १८९९-१९०३); फ्रान्स आणि अमेरिका यांमधील व्यापाराचा ज्ञानकोश (१९०४) इत्यादि. 'फ्लि नी चा को श.-सर्वांत जुना व उपलब्ध असलेला कोश फ्लिनीचा 'नॅचरल हिस्टरी' (सृष्ट-इतिहास) हा ग्रंथ होय. फ्लिनी इ. स. ७९ मध्यें वारला. तो सृष्टिशास्त्रज्ञ, पदार्थविज्ञानी किंवा कारागीरहि नव्हता; पण त्यानें फावल्या वेळीं हा ३७ विभागांचा व २४९३ प्रकरणांचा प्रचंड कोश रचिला. याचे स्थूल स्वरूप असें:-विभाग १- प्रस्तावना; वि. २ –विश्वरचना, ज्योतिष व हवामानशास्त्र; वि. ३ ते ६-भूगोल; वि. ७ ते ११-प्राणिशास्त्र (मानव व कलेतिहास धरून); वि. १२ ते १९ वनस्पतिशास्त्र; वि. २० ते ३२-औषधें, वनस्पती व प्राणिजन्य उपाय, वैद्यकग्रंथकार व जादू; वि. ३३ ते ३७ -धातू, ललितकला, खनिजशास्त्र व खनिज औषधें. सुमारें शंभर ग्रंथकारांच्या दोनशें ग्रंथांवरून हा कोश फ्लिनीनें लिहिला असून त्यांत उल्लेखिलेल्या ४६४ ग्रंथकारांची यादी हार्डोइननें दिली आहे. मध्ययुगांत हा फ्लिनीचा कोश मोठा प्रमाणग्रंथ म्हणून मानला जात असून इ. स. १५३६ पूर्वी याच्या ४३ आवृत्त्या निघाल्या होत्या. या नं त र चे को श.-यानंतर पांचव्या शतकांत मार्टिआनस कॅपेला नावाच्या एका आफ्रिकननें ज्ञानकोशस्वरूपाचा एक गद्यपद्यात्मक ग्रंथ लिहिला. मध्ययुगांत याला चांगला मान असून बहुधां शाळांतून तो उपयोजिला जाई. १४९९ ते १५९९ या शतकांत तो आठदां छापून निघाला होता. एसेनहार्टनें याची १८६६ त लिपसाई येथें उत्तम आवृत्ति काढली आहे. मध्ययुगांतील सर्वांत प्रख्यात ज्ञानकोशाचा कर्ता व्युव्हाईचा व्हिन्सेंट (सु. ११९०-१२६४) हा होता. त्याच्या 'बिब्लिओथेका मुंडी' या ज्ञानकोशांत तत्कालीन ज्ञानसंग्रह चांगला संरक्षिला असून त्यामुळें अभिजात (क्लासिकल) वाङ्मयाची गोडी लोकांना लागली. फ्लॉरेन्सच्या ब्रुनेटो लॅटिनी (१२३०-१२९४) याचा 'टेसेरो' कोशहि सुप्रसिद्ध होता. याखेरीज १६ व्या शतकापर्यंत बरेच ज्ञानकोशवजा ग्रंथ उदयास आले; पण ते विशेष स्मरणीय नाहींत. चें ब र्स ज्ञा न को श.-जोहान हेनरिच अल्स्टेड (१५८८-१६३८) यानें. 'एन्सायक्लोपीडिया सेप्टेम टोमिस डिस्टिक्टा' हा आपला कोश ३५ विभागांत प्रसिद्ध केला. याला शेवटीं ११९ पानांची सूचि जोडलेली होती. या कोशाच्या योग्यतेप्रमाणें त्याला महत्त्वहि मिळालें होतें. यापुढें फ्रेंच कोश सुरू झाले; यापैकीं प्रसिद्ध म्हणजे फ्रेंच अकेडमीनें १६९४ त प्रसिद्ध केलेला थॉमस कॉर्नेलीचा कला व शास्त्र या विषयावरचा कोश होय. इंग्रजीमधील पहिला अकारविल्ह्यानें रचलेला ज्ञानकोश जॉन हॅरिसचा (१७०४) होय. याला 'ॲन युनिव्हर्सल इंग्लिश डिक्शनरी ऑफ आर्ट्स अँड सायन्स' असें नांव होतें. पुढील बहुतेक इंग्रजी ज्ञानकोशाप्रमाणेंच यावर पानांचे आकडे नव्हते. पण यापेक्षा एफ्रासम चेंबर्सचा ज्ञानकोश जास्त परिपूर्ण व काळजीनें लिहिलेला होता. तो लंडनमध्यें प्रथम १७२८ त दोन विभागांत प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. याच्या बऱ्याच आवृत्त्या व इतर भाषांतून भाषांतरेंहि निघाली. चेंबर्सला चांगला राजाश्रयहि होता. ज र्म न ज्ञा न को श.-पण सर्वांत मोठ्या व अतिशय व्यापक अशा ज्ञानकोशांपैकीं एक म्हणजे झेडलरचा जर्मन ज्ञानकोश होय. हा १७३२ त प्रसिद्ध होऊं लागला. याचे ६४ विभाग असून पृष्टें ६४३०९ होतीं. याला पुरवण्याहि निघाल्या होत्या. प्रत्येक विभाग कोणा तरी मोठ्या माणसाला अर्पण केलेला असे. याला प्रस्तावना हाल विश्वविद्यालयाच्या चान्सलर (जोहान लुडविग) नें लिहिली होती. यांत थोर मृत माणसांबरोबर जिवंत माणसांचीहि चरित्रें दिलीं होती. ज्या ठिकाणीं अन्य लेखांचें हवालें दिलें असत त्यांत त्या लेखांचा गोषवारा, विभाग अनुक्रम व कॉलम नंबरहि दिलले सापडत. संदर्भग्रंथहि जागजागीं असत  आज देखील हा कोश फार उपयुक्त वाटतो. फ्रें च ज्ञा न को श.-यानंतरचा चिरस्मरणीय व तत्कालीन जगांत खळबळ उडवून देणारा ज्ञानकोश फ्रेंच एन्सायक्लोपीडी' हा होय. चेंबर्सच्या आंग्ल ज्ञानकोशाच्या भाषांतरापासून याला सुरुवात झाली. पण पुढें डिडेरी जेव्हां याचा संपादक झाला तेव्हां त्यानें याचें स्वरूप बदलून नवीनच मोठ्या प्रमाणावर डी अलेंबर्ट, रूसो, व्होलटेअर वगैरे प्रख्यात लेखकांची मदत घेऊन हें कार्य हातीं घेतले. या पूर्वी वैद्यककोश काढून डिडेरोनें चांगली प्रसिद्धि मिळविली होती. हा ज्ञानकोश बाहेर निघण्याच्या कामांत अनेक सरकारी व खाजगी संकटें उत्पन्न झालीं. डिडेरोला मध्यंतरी कैद झाली होती. तथापि त्यानें अविश्रांत श्रमानें एकट्याच्याच हिंमतीवर १७५१ च्या जुलै महिन्यांत पहिला विभाग प्रसिद्ध केला. दुसरा विभाग १७५२ च्या जानेवारींत प्रसिद्ध झाला. पण राजसत्ता व धर्म यांनां हानिकारक म्हणून हे दोन्ही विभाग सरकारनें जप्त केले. हा कोश पुढें चालविण्याचें सामर्थ्य दुसऱ्या कोणांत नसल्यानें व असा कोश तर राष्ट्राच्या वैभवार्थ जरूर असल्यानें पुन्हां हें काम मूळ संपादकांकडें दिलें. तेव्हां तिसरा विभाग (वेळ लागल्यानें जास्त चांगला होऊन) १७५३ च्या आक्टोबरांत बाहेर पडला. ७ वा विभाग ('जी' अक्षरापर्यंतचा) नोव्हेंबर १७५७ त पुढें आला. पण पुन्हां याविरुद्ध कांहीं वर्गांची ओरड सुरू होऊन सरकारनें हें काम थांबविलें (१७५९) व हा कोश तपासून पहाण्यासाठीं नऊ माणसांचें एक कमिशन नेमलें. पण कांहीं सरकारी अधिकाऱ्यांची व प्रख्यांत विदुषी मॅडम पाँपेंडूर या १५ व्या लुईच्या प्रेमपात्राची डिडेरोला आंतून मदत होती. तेव्हां त्याला खाजगी रीतीनें पुढें छापण्याचें काम चालू ठेवण्याला परवानगी मिळाली. पण संबंध कोरा पुरा होईपावेतों त्याने पुढील एकहि विभाग प्रसिद्ध करावयाचा नव्हता. १७६५ त विभाग ८-१७ एकदम बाहेर पडले. शिवाय ४ विभाग चित्रांचे हाते. लागलीच या कोशाचा प्रसार सर्वत्र होण्यास सुरुवात झाली. त्याला १७६५ त ४२५० ग्राहक मिळाले होते. पण उपाध्यायवर्गाकडून ओरड झाल्यामुळें सरकारनें प्रत्येक ग्राहकाला पोलीसांत आपल्या प्रती देण्याविषयी हुकूम सोडला व प्रकाशकाला तुरुंगांत घातलें. एकदां राजाच्या खाजगी बैठकींत मॅडम पाँपेंडूरनें आपली पॉलिश पावडर (रूझ) किंवा रेशमी पायमोजा कसा करतात.  हें आपल्याला ठाऊक नसल्याबद्दल खेद प्रदर्शित केला. तेव्हां त्या बैठकींतील दुसऱ्या एका गृहस्थानें तिला असें सांगितलें कीं आपल्या राजानें जप्त केलल्या ज्ञानकोशांत या प्रकारची सर्व माहिती आहे. एवढेंच नव्हें तर सर्व ज्ञानभांडार सांठविलेलें आहे. त्यावरून राजानें हा ज्ञानकोश स्वत: पहाण्यास मागितला व त्यावरची जप्ती ताबडतोब उठविली. यानंतर पुन्हां पुढील विभाग छापण्याचें काम सुरू झालें. पण लेब्रेटन या प्रकाशकानें, डिडेरोनें शेवटचीं प्रुफें पाहून दिल्यावर रोज मोठ्या गुप्तरीतीनें व रात्रीच्या वेळीं आक्षेपार्ह वाटत असलेल्या मजकूर विसंगतीकडे लक्ष न देतां कसा तरी काढून टाकावा व डिडेरोचें हस्तलिखित जाळून टाकावें असा शेवटपर्यत कोणाला न कळत सपाटा चालविला होता. उद्देश हा कीं, पुन्हां कोशाच्या प्रसिद्धीवर कांहीं संकट येऊं नये. या ज्ञानकोशाच्या छपाईचें बहुतेक काम संपत आलें होतें. तेव्हां एकदां डिडेरोला 'एस्' या अक्षरांतील आपल्या तत्त्वज्ञानासंबंधी लेखांतील मजकूर पाहाण्याची इच्छा होऊन त्यानें छापलेली पानें चाळलीं; तेव्हा काय! त्याला सर्व लिखाण मधून मधून अस्ताव्यस्त कापलेलें आढळून येऊन, लगेच प्रकाशकाचें कारस्थान त्याच्या उघडकीस आलें व तो रागानें आणि दु:खानें जवळ जवळ वेडा बनला. पण त्याचें प्रकाशकाला काय होय! तो तर मोठा गबर झाला होता व इकडे डिडेरो व त्याचे प्रत्यक्ष सहकारी कफल्लक बनले होते! धंद्यावरचें लेख लिहितांना डिहेरो स्वत: तो धंदा समजावून घेई एवढेंच नव्हे तर त्यांत हातानें काम करी व मग तो त्यावरचा लेख काळजीपूर्वक लिहीत असे. नव्या अर्थशास्त्रज्ञांचा पुढारी टर्गो याचेहि लेख प्रथमच या ज्ञानकोशात आढळतात. सर्वसत्ताधीश धर्मखातें व जुलमी सरकार यांच्यावर या ज्ञानकोशांतून मारा झाल्यामुळें याचा इतिहास फ्लेशपूर्ण व अद्वितीय असा झाला आहे. एरवीं झेडलरच्या 'युनिव्हर्सल लेक्झिकॉन' या ज्ञानकोशापेक्षां सत्य व यथायोग्य माहितीच्या दृष्टीनें हा श्रेष्ठ ठरणार नाहीं. कारण संकटमय परिस्थितींत व घाईनें हा काढला गेला व पैशांच्या अभावीं जास्त चांगले लेखन याला मिळूं शकलें नाहींत. तथापि एकंदरीनें याची योग्यता काहीं कमी नाही. ए न्सा य क्लो पी डी या ब्रि टा नि का.-याची पहिली आवृत्ति सन १७७१ त तीन विभागांत (पृष्ठे २६७०, क्लार्टो आकार) एडिंबरो येथें प्रसिद्ध झाली. याचा कल्पक व संपादक कोण हें नक्की सांगता येत नाहीं. कोणी कॉलिन मँकफर्कुहरला हें श्रेय देतात. विविध शास्त्र व कला यांतील प्रमुख विषय अकारविल्ह्यानें यांत विवेचिलें होते. सर्वांत मोठे लेख म्हणजे 'शरीरव्यवच्छेदन' (पृष्ठें  १६६) व 'शस्त्रक्रिया' (पृष्ठें २३८) हे होत . याची रचना आतापर्यंत झालेल्या इंग्रजी ज्ञानकोशांपेीशं अगदी निराळी होती. याची दुसरी आवृत्ति १० विभागांत १७८४ त निघाली. यांत ८५९५ पृष्ठें व ३४० चित्रपृष्ठे होती; पृष्ठांचा अनुक्रम ओळीनेंच होता. याला एक २०० पृष्ठांचे  परिशिष्ट जोडण्यांत आलें होतें. तिसरी आवृत्ति १७८८ त सुरू होऊन १७९७ त संपली. हिच्यांत १८ विभाग (१४५७९ पृष्ठें) होते. याला पुरवणी १८०२ मध्यें दोन विभागांत निघाली. प्रो. प्लेपेअर डॉ. थॉमसन, प्रो. रॉबिन्सन यांनीं याच्या लेखनाला मदत केलेली होती. चवथी आवृत्ति १८१० मध्यें २० विभागांत निघाली. यापुढें या ज्ञानकोशांत जास्त जास्त भर पडत जाऊन लवकर लवकर नवीन आवृत्त्याहि निघूं लागल्या. नववी आवृत्ति १८७५ त सुरू होऊन १८८९ त छापून पुरी झाली . याचे १४ विभाग व एक सूचि आहे. पांडित्यदृष्टी वापरल्यास ही आवृत्ति तत्कालीन सर्व कोशांपेक्षा सरस म्हणतां येईल. याचे लेखक अतिशय प्रसिद्ध पंडित व शास्त्रज्ञ होते. १९०२ सालीं याला ११ विभागांची पुरवणी जोडून एकंदर ३५ विभागांची दहावी आवृत्ति काढली. पुढें या ज्ञानकोशाची मालकी व कॉपीराईट केंब्रिज युनिव्हर्सिटीकडे जाऊन त्या विश्वविद्यालयानें एकदम एका वेळी ११ व्या आवृत्तीचे २८ विभाग प्रसिद्ध केले (१९१०-११). या ११व्या आवृत्तिला पुढें १९२१ सालीं ३ विभागांची पुरवणी जोडण्यांत आली. कॉ न्व्ह सेंशन्स ले क्सि कॉ न.-या ज्ञानकोशाप्रमाणे दुसरा कोणताहि संदर्भग्रंथ जास्त यशस्वी उपयुक्त किंवा भाषांतरलेला नाहीं. थोडक्या व सोप्या भाषेंत सर्व संशोधनांचे  फल देऊन सामान्य मानसिक वाढीला मदत करणें हा या कोशाचा उद्देश आहे व तो चांगला सफलहि झाला आहे. याची पहिली आवृत्ति लाइपझिग येथे १८०८ त निघाली व १४ वी आवृति १९०१-३ मध्यें १६ विभागांत निघाली. यांतील लेख विशेषत: जर्मन विषयांवरचे फार थोडक्यांत पण खात्रीच्या माहितीचे असून, त्याच्या शेवटीं उत्कृष्ट संदर्भग्रंथहि दिलेले आढळतात. ह्यांत थोर पुरूषांची चरित्रें पण वगळलेली नसतात. सर्वांत विस्तृत ज्ञानकोश म्हणजे एर्श व ग्रुवर यांचा 'अल्जेगिनी एन्सायक्लोपीडी डर विसेनचेंफन उंड कन्स्टे' हा होय हा १८१३ त प्रथम सुरू झाला याचे (१) ए-जी ९९ विभाग; (२) एच्-एन् ४३ विभाग व (३) ओ-झेड् २५ विभाग आहेत. यांखेरीज नवीन चेंबर्स एन्सायक्लोपीडिया; हार्मसवर्थ एन् सायक्लोपीडिया; नेल्सन्स एन् सायक्लो; अमेरिकन एन् सायक्लो; न्यू यूनिव्हर्सल सायक्लो; एन्सायक्लो. अमेरिकन (१९०३I४, १६ विभाग; इंटरनॅशनल सायक्लो. (१९०६ १७ विभाग), वगैरे अनेक लहान-मोठे ज्ञानकोश इंग्लंड -अमेरिकेंत निघालें आहेत. तसेंच रशिया, इटली, स्पेन, स्कँडिनेव्हिया या व इतर यूरोपियन राष्ट्रांतून ज्ञानकोश स्वरूपाचें बरेच ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पौरस्त्य देशांतहि चीन व हिंदुस्थान यासारख्या प्राचीन संस्कृतीच्या क्षेत्रांत ज्ञानकोशस्वरुपीं ग्रंथ आढळावयास पाहिजे अशी जी आपली अपेक्षा असते त्याप्रमाणें ते आढळतातहि. चीनचें प्राचीन लिखाण सोडून दिलें तरी ज्ञानकोशासारखा विशिष्ट ग्रंथ चीनमध्यें 'लीशू' या नांवानें होता. पहिला लीश् ''ताइ पिंग यू लान'' हा होय. याचा काळ इ.स . ९८७ आहे. यानंतर विशेष महत्त्वाचा व मोठा ज्ञानकोश 'कु चिनु तु शुचि चेंग' होय. याचे १०००० विभाग आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती ज्ञानकोशाच्या पाचव्या विभागांत (विज्ञानेतिहास पृ. ४५० ते ४५५) आलीच आहे. हा भाग चिनी सरकारनें सन १७२६ मध्यें प्रसिद्ध करविला. हिं दु स्था नां ती ल ज्ञा न को श स्व रू पी का र्य, प्रा ची न.-वेदसंहिता यांनां अतिशय प्राचीन ज्ञानकोश म्हणण्यास हरकत नाहीं. कारण निरनिराळ्या प्राचीन ज्ञानांगांचा त्यांत संग्रह केलेला आहे. त्यानंतर महाभारत हांहि एक मोठा ज्ञानकोश म्हणतां येईल. त्यांत  तत्कालीन बौद्धिक, सामाजिक, राजकीय,. धार्मिक, सांस्कृतिक या सर्व विषयांचें सोपपत्तिक व सोदाहरण ज्ञान साठविलेलें दिसून येतें. अठरा पुराणें हांहि एकैकश: ज्ञानकोशस्वरुपी आहेत. विशेषत: अग्निपुराण (पहा) हा अनेक पारमार्थिक व लौकिक विषयांवरील त्यावेळचा मोठा प्रमाण-ग्रंथ म्हणतां येईल. त्यांत विवेचिला गेला नाहीं असा एकहि विषय नाहीं. याखेरीज नुसते कोशरुपी ग्रंथ पुष्कळ झाले ('कोश' पहा) पण त्यांनां ज्ञानकोशाची दृष्टि नाहीं. म ध्य यु गी न.-यापुढें ज्ञानसंग्रहाचा मोठा व्यापक प्रयत्न सायणमाधवाचा्र्यांनीं केला. त्यांनीं संहिता, ब्राह्मणें, वगैरेपासून तों सर्व उपलब्ध संस्कृत ग्रंथांवर भाष्यें लिहिली. 'सर्वदर्शनसंग्रह' हा एक तत्त्वज्ञनाचा ज्ञानकोशच म्हणण्यास हरकत नाहीं. त्यांचा वैद्यक ज्ञानकोशाचा प्रयत्न माधवनिदानासारख्या ग्रंथावरून दिसून येतो. अ र्वा ची न.-इंग्रजी अमदानींत प्रथम ज्ञानकोशवजा ग्रंथ काढणारे महाराष्ट्रीय विद्वान् रा. रघुनाथ भास्कर गोडबोले होते. त्यांनीं एक प्राचीन व एक अर्वाचीन असे दोन ऐतिहासिक कोश रचिले. ते कांहीं चुकीची ऐतिहासिक विधानें सोडल्यास बरेच उपयुक्त वाटतील. व. आठल्ये यांचा 'विद्यामाला' कोश व रा. सांबारे याचां 'विद्या कल्पतरु' हेहि ज्ञानकोशार्थच प्रयत्न होत. पण इंग्रजी ज्ञानकोशाच्या धर्तीवर व त्याचेंच जवळजवळ भाषांतर करून झालेले या काळांतील कांहीं देशी कोश आंहेत त्यांत प्रमुख स्थान बंगाली 'विश्वकोशाला' दिलें पाहिजे. वि श्व को श.-प्रथम बंगाली विश्वकोश तयार झाला. याचे २२ विभाग आहेत. याला २७ वर्षे लागली असून एकंदर खर्च सुमारें सात लाख रुपये आला. याचें मुख्य संपादक बाबू नगेंद्रनाथ बसू व त्यांचे सहकारी हे अगदीं समान्य दर्जाचें पंडित व लेखक आहेत. तेव्हां हा कोश इतका काळ व पैसा खर्च होऊनहि मोठा आदर्शभूत किंवा पांडित्यदर्शक असा झाला आहे असें मुळीच म्हणतां येणार नाहीं. देशी भाषेंत ज्ञानकोश कां असावा याची थोडीबहुत जाणीव हा करून देतो. याचेंच २६ विभागांत हिंदी विश्वकोश' या नांवानें हिंदी रुपांतर होत आहे. आतांपर्यंत याचें १२ विभाग बाहेर पडले आहेत. प्रत्येक पुस्तकांत सुमारें ८००  पृष्ठें (आकार डेमी कार्टो) असून किंमत १३ रुपये असते (पत्ता-विश्वकोश ऑफिस, ९ विश्वकोश लेन, बागबझार, कलकत्ता). आं ध्र वि ज्ञा न  स र्व स्व म्.-हा तेलगू ज्ञानकोश प्रथम कै. के. व्ही. लक्ष्मणराव यांच्या संपादकत्वाखालीं निघत असे. याचा दर्जा अगदीं सामान्य दिसतो. याचें काम अद्याप चालू आहे. ज्ञा न च क्र. हा गुजराथी ज्ञानकोश जुना आहे. याची लोकप्रियता याच्या पहिल्या विभागाची दुसरी आवृत्ति (१८९९) काढण्याचा सुयोग आल्यावरून दिसून येतें. उ र्दू ज्ञा न को श.--हैदराबादच्या उस्मानिया विश्वविद्यालयांतील कांहीं मंडळींनीं हा कोश संपादण्याचें काम हातीं घेतलेलें आहे. गु ज रा थी ज्ञा न को श. गुजराथीत ज्ञानकोश तयार करण्याचें आता पर्यंत बरेच प्रयत्न झाले पण ते पूर्णपणें सफल झाले नाहींत. सध्यां 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'चेंच रूपांतर करून 'गुजराती ज्ञानकोश' काढण्याकरितां एक लिमिटेड कंपनी निघाली आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विद्यमान महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे मुख्य संपादक व चालक डॉ. श्री. व्यं केतकर हे असून संपादक वर्गांत प्रमुख गुजराथी लेखक आहेत. हा ज्ञानकोश दोन वर्षांतच बाहेर पडेल असा अंदात आहे. म हा रा ष्ट्री य ज्ञा न को श.-हिंदुस्थानांतील देशीं भाषेंत उच्च दर्जाचा पाश्चात्य ज्ञानकोशासारखी ज्ञानकोश आतांपर्यंत जर झाला असेल तर तो मराठींतच होय. कार्यक्षम व्यवहारपद्धतीला अनुसरून एक लिमिटेड कंपनी या ज्ञानकोशप्रकाशनार्थ १९१६ सालीं स्थापिली गेली, व तिनें १९२७ पर्यंत २१ विभागांत प्रस्तृत ज्ञानकोश पुरा केला. यासंबंधी अधिक माहिती या खंडाच्या प्रस्तावनेंत आढळेल.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .