प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
                  
क्षयरोग- शरीरांतील एखाद्या अगर अनेक इंद्रियांमध्यें क्षयजंतूंचा शिरकाव होऊन त्यांच्या वृद्धीमुळें तेथें बारीक गांठी किंवा गंड बनणें हें या रोगाचें लक्षण आहे. हा जंतु कॉक या जंतुशास्त्रज्ञानें शोधून काढला. या जंतूचा शिरकाव फुफ्फुसांत झाला  असतां कफक्षय (राजयक्ष्मा) हा भयंकर रोग होतो. मस्तिष्कावरण, आंत्रावरण, मूत्रपिंड, अस्थी इत्यादि अनेक ठिकाणीं या जंतूचा प्रवेश होऊन रोग उत्पन्न होतो. जं तूं चे व र्ण न.-हे अतिसूक्ष्म किंचिंत वक्र किंवा कांहीं जंतू तर सरळ काडीसारखे असतात आणि त्यांची दोन्ही टोकें अंमळ गोल असतात. यावर रंगाचें पूट चढवून मग ते सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें पहातां येतात. रोग कारणें:-हा रोग सर्व देशांत व सर्व जातींत कायम ठाणें असलेल्या रोगांपैकीं एक आहे. पुष्कळ माणसांनां रोग लक्षणें न झालीं  तरी त्याच्या शरीरांत या रोगाचा प्रवेश व वाढ थोडीबहुत पण निद्रितावस्थेंत असते. ही वाढ पक्वदशेस येण्याचीं अगर न येण्याचीं कारणें पुढें दिल्याप्रमाणें आहेत. (१) हे जंतू स्वभावत:च कांहीं माणसांत तीव्रतेनें तर कांहीं माणसांत सौम्यतेनें वृद्धि पावून जास्त अगर कमी प्रमाणांत रोगोद्भव करतात असें नजरेस येतें. (२) रोग्याच्या वैयक्तिक स्थितीचाहि रोगाद्भवावर परिणाम घडतो. उदाहरणार्थ ज्या रोग्याचे आईबाप या रोगानें पीडित असतील त्याच्या मुलांनां क्षयजंतुजन्म विकार इतर माणसांपेक्षां विशेष होतात. पण हा वादग्रस्त मुद्दा आहे. आनुवंशिक संस्कारामुळें गर्भास प्रत्यक्ष क्षयरोग प्राप्त होतो ही समजूत पूर्वी वाटत होती तितकी आतां (कफक्षयाची बाब अंशत: वगळून) खरी मानीत नाहींत. क्षयरोग घेऊन कोणीहि मूल जन्मास येत नाहीं, तर तो होण्याची प्रवृत्ति मात्र आनुवंशिक संस्कारानें त्या मुलांत असते. या कारणांशिवाय आहार, वाईट हवा, जबर दुखणी या व अशा अनेक कारणांनी शरीरप्रकृति खालावली असतां, त्यामुळें कोणाहि माणसामध्यें क्षयजंतुजन्य रोग होण्याची प्रवृत्ति नवीनहि उत्पन्न होते. अशास कारणे येणेंप्रमाणें:- (१) गर्दी करून राहिल्यामुळें किंवा गिरणी वगैरे धूर किंवा ग्यासमिश्रित वातावरणामुळें मुबलक व ताज्या स्वच्छ हवेची कमतरता; (२) वरील व पुढील कारणांसह किंवा त्याशिवाय खाण्याचे हाल व कमतरता असणें; (३) शरीर अत्यंत थकून जाईल इतके श्रम होणे; (४) वरचेवर प्रसृति होऊन मुलें अंगावर पाजण्यामुळें येणारा अशक्तपणा; (५) मोऱ्यांचा नीट निकाल नसून ज्या ठिकाणीं ओल व गारठा आहे अशा ठिकाणी राहणें; (६) विषमज्वरानंतर येणारा अशक्तपणा; (७) दारूबाजांची खंगलेली शरीरप्रकृति; (८) मधुमेह; व (९) उपदंशानें ग्रस्त व अशक्त झालेले रोगी वगैरे.फुफ्फुसें हीं तरी निदान अशा प्रकारचीं इंद्रियें आहेत कीं, ज्यामध्यें सूज व सर्दी वरचेवर उत्पन्न होत गेल्यानें त्यांत क्षयजंतुवृद्धि सहज होईल अशी अनुकूल भूमि तयार होते. म्हणून वरचेवर पडसें येणें, खोकला येणें, किंवा पडसें खोकला सदा येऊन त्याची हयगय केल्यामुळेंहि कफक्षय होण्याचें भय असतें. कफक्षयांत मुख्य व प्रथमचें लक्षण खोकला असल्यामुलें हा नेहमींचाच पडशाचा खोकला आहे. असें समजून त्याकडे दुर्लक्ष होणें साहजिक असतें श्वासनलिकेची अगोदर येणेंप्रमाणें दाहस्थिति उत्पन्न करणारी अन्य कारणें:-गोंवर, डांग्या खोकला, फुफ्फुसावरणदाह, कोळशाच्या खाणींतील लोक व तांब्यापितळेच्या भांडयांना चरकी देण्याच्या कारखान्यांतील लोकांनां जो चुनाट खोकला जडतो तो, हीं मुख्य कारणें आहेत. रोग्याचें वय तरुण वय हें एक क्षयजंतुजन्य रोग होण्याचें प्रधान अंग आहे. अगदीं लहान व मध्यम लहान मुलांमध्यें मस्तिष्कावरण आंत्रावरण. अन्नरसदाहग्रंथी, अस्थि आणि सांधे या ठिकाणीं क्षयबीज रोग उत्पन्न करतें. उमेदींतील तरुणांमध्यें फुफ्फुसांत क्षयबीज शिरून कफक्षय होणें विशेष सामान्य असतें. चाळीस वर्षांवरील वयाच्या माणसास नवीन क्षयरोग फार कमी प्रमाणांत होतो. मात्र पूर्वीची प्रवृत्ति असली तर तिला अशक्तपणामुळें चालन मिळून रोगोद्भवाचें भय ५० ते ७० वयापर्यंतहि असतें. त्वचेमध्यें खरचटणें किंवा जखम झाली असतां व त्यांतून क्षयजंतू शिरले तर क्षयरोग होणें संभवनीय असतें. पण हा प्रकार क्वचित असतो. नाकातोंडातून श्वसनमार्गानेंहि जंतुप्रवेश होत असला पाहिजे. अ न्न मा र्गा वाटे क्ष य जं तूं चा प्र वे श.-हा वरील रीतीनें होतोच होतो. इतकेंच नव्हें तर मांस, दूध हे जे पदार्थ खाण्यांत येतात ते जर क्षयी जनावरांपासून प्राप्त झाले असतील तर ते रोगास कारण होतात. दुभत्या गुरांतील व माणसांतील क्षयजंतू दिसण्यांत अगदीं सारखे दिसतात. तरी त्या दोहोंमध्यें कांहीं अन्य बाबतींत फरक असतात. हे पशुक्षयजंतू मनुष्यप्राण्यांनां विकार उत्पन्न करतात. असें अनुभवानें सिद्ध झालें आहे. मनुष्यांत जितके क्षयजंतू असतात. त्यातींल शेंकडा १०-२० पशुक्षयजंतू असतात असें आढळतें लहान मुलांनां पोटात डबारोग (क्षयजंतुजन्य आंत्रावरणदाह) होतो त्याचें कारण त्याच्या पोटांत जनावरांपासून मिळणारें दूधच बरेचसें जात असल्यामुळे त्यांना हा रोग अन्नमार्गांत (आतडयांत) होतो. क्षयजंतू शरीरांत शिरले म्हणजे बऱ्याच रोग्यांमध्ये ते एकाच जागी रोगाचा टापू बनवीत असतात. मग अशा ठिकाणीं त्यांचा प्रसार चोहोंबाजूंनीं वाढून अथवा अन्नरसवाहिन्यांच्या मार्गानें नजीक असणाऱ्या अन्नरसग्रंथीत प्रवेश होतो. यांच्या गंडमाळा बनतात. कधीं असें होतें कीं, फुफ्फुसें, हाडें, अन्नरसग्रंथी,  गुह्येंद्रियें इत्यादि ठिकाणी क्षयरोगास आरंभ असतो. व पुढें एकदम आग भडकावी त्याप्रमाणें शरीरांतील नाना इंद्रियांत एकसमयवाच्छेदेंकरून क्षयबीज पसरतें व त्यास निमित्तहि कांहीं झालेलें नसतें. पण अशा रोग्यांच्या प्रेतव्यवच्छेदपरीक्षणसमयीं श्वासनलिकांर्तगतग्रंथि अगर अन्य जागा क्षयजंतुवृद्धि होऊन पुवाळलेल्या व बिलबिलीत झालेल्या आढळतात. अशा ठिकाणांपासून अन्नरसवाहिन्या किंवा शिरांच्या मार्गानें शरीरांत सर्व ठिकाणीं रोगवृद्धि होत असावी.  क फ क्ष य.-किंवा राजयक्ष्मा. यांत क्षयजंतुप्रवेश फुफ्फुसांत निरनिराळ्या स्थानी होणें, व म्हणून श्वासनलिकादाह व फुफ्फुसदाहासारखी लक्षणें; नंतर क्षयपीडित फुफ्फुस रचना पुवाळून बिलबिलीत व पोकळ होऊन कफाबरोबर पडणें. मुख्य लक्षणें:-संध्याकाळीं ताप भरून येणें व रात्री अति घाम येणें; शक्ति कमी होऊन एकदम रोगी कृश होणें; पांडुरता; पिंवळा कफ व रोगाच्या आरंभीं अगर पुढें कफांत लालभडक रक्त पडणें, खोकला, अजीर्ण, अतिसार, इत्यादि. रोग्यास बरें होण्याची आशा मात्र फार असते. हा अतिपरिचित रोग असल्यामुळें याविषयीं लिहावें तितकें थोडेंच. गंडमाळा. गळा,कांख, जांघाड या ठिकाणीं अन्नरसग्रंथी निरोगी स्थितींत बोटास लागतील न लागतील एवढ्या असतात. गळयांतील तर बोटास लागतहि नाहींत. पण या क्षयजंतूंनीं त्या मोठ्या होऊन त्यांच गंडमाळा म्हणतात. त्यांचीं गळवें क्वचित आपोआप पण अत्यंत सावकाश फुटतात पण वेडेवांकडे व मोठाले व्रण मागें राहतात. कधी कधीं ग्रंथी न फुटतां त्या क्षयरोग सर्व शरीरांतहि पसरवतात. म्हणनू या गांठीं शस्त्रक्रियेनें लवकर काढून टाकणें चांगलें. आं त्र जा ला व र ण; त्व चें त-मुलांनां डबारोग होऊन पोट मोठें होऊन व उदर रोग होतो. अ स्थी व सां धे.-या जागीं क्षयजंतुप्रवेशामुळें चेंगट गळवें होऊन ती फुटून त्यांचे हाडीव्रण बनतात. त्यास वेळेवर शस्त्रक्रियेनें उपाचार करावे हें उत्तम. इ त र ठि का णीं आ ढ ळ णा रें क्ष य जं तू ज न्य रो ग.-(१) श्वासनलिकांतर्गत ग्रंथींचा क्षयरोग, (२) मूत्रपिंडावरील ग्रंथींचा क्षयरोग. यासच ॲडिसन रोग असें त्याच्या शोधकामुळें नांव आहे. (३) मूत्रपिंडांत क्षयजंतुवृद्धि व (४) हृदय, कंठ, मस्तिष्कावरण, आतडी, यकृत, स्नायू, हृदयावरण, त्वचा मुख्य श्वासनलिका या ठिकाणींहि क्षयजंतूंचें बिऱ्हाड येऊन तेथें जंतुवृद्धीमुळें रोगोद्भव व रोगप्रसार होतो. प्र ति बं ध क इ ला ज.--अशा घातक रोगास, तो झाल्यावर इलाज करणें योग्यच आहे. पण त्यापेक्षां ज्या उपायांनीं हा रोग गांवांत शहरांत किंवा देशांतहि न बळावेल अशी परिस्थिति उत्पन्न करणें हें पहिलें कर्तव्य होय. जे उपाय इतर देशांत यशस्वी ठरल्यामुळें येथेंहि अवश्य आहेत. ते असें:-गरीब लोकांस बिऱ्हाडाचें भाडें व अन्नवस्त्र यांची आबाळ होऊं नये म्हणून पुरेशी मजुरी मिळालीच पाहिजे. धान्य, दूध, तूप व इतर खाण्याच्या जिन्नसांची महागाई न होऊं देणें; त्यांच्यासाठीं हवा व उजेड असून स्वल्प भाड्याच्या जागा बांधणें, कोंदट हवेंत त्यांनीं किती वेळ काम करावें याची त्यांच्या हिताच्या दृष्टीनें मर्यादा ठरविणें, हवा खाण्यासाठीं सार्वजनिक उद्यानें किंवा मैदानें मोकळी  राखणें, शहरांत आणि भोंवताली ट्रामवे व आगगाडयांचे फांटे  काढून शहरांतील लोकांस शहराबाहेरील पातळ वस्तीत रहाण्यास उत्तेजन देणें, जमिनीतील सर्दपणाचा निकाल लावण्यासाठीं सार्वजनिक मोऱ्या व गटारें बांधून पाणी मुरणें बंद करणें. शहरांतील हवा घाणेरडे धंदे व गिरण्यांतील धूर यांनीं दूषित न होईल अशी तजवीज राखणें हीं अशा उपायांची कांहीं उदाहरणें झालीं. याशिवाय क्षयरोगी ठेवण्याचीं वेगळीं रुग्णालयें स्थापिल्यानें रोग्यांचीं काहीं संख्या वेगळी काढतां येऊन तितकाच रोगप्रसार कमी होतो. याच प्रकारची दुसरी व्यवस्था म्हणजे उघड्या हवेंत रोग्यास दिवसारात्री ठेवून व त्यास सूर्यप्रकाशाची रेलचेल करून रोगप्रतिबंध व रोगमुक्तता करतां येईल अशी आरोग्यगृहें अनेक हवाशीर ठिकाणीं बांधावयाची, स्वस्त किंवा फुकट औषधें घरी असलेल्या क्षयरोग्यास मिळावीत म्हणून मोफत किंवा सवलतीचे दवाखानें स्थापणें; कफाचे खांकरे वाटेल तेथें थुंकण्याची सक्त बंदी करणें; ज्या घरीं क्षयरोगी असतील त्यांची नोंद करून त्यांजवर लक्ष ठेवणें, असले रोगी वैद्य, डॉक्टरांनीं आपणांकडे असतील त्यांची नांवे व पत्ते कळविणें, मांसासाठी कापलेली जनावरें किंवा दुभती जनावरें यांवरा देखरेख व तपासणी ठेवणें. क्षयरोगासंबंधी कारणें, प्रसार धोका इत्यादि सर्व माहिती सोप्या भाषेंत लिहून तिचा जनतेंत पुष्कळ प्रसार करणें; हे सर्व उपाय प्रतिबंधाच्या कामीं फारच अवश्य आहेत हें सांगावयास नकोच. क्ष य रो ग चि कि त्सा.-हा रोग एखाद्यास झाला असतां त्याजवर जितक्या लवकर इलाज करतां येतील तितकें उत्तम, व या रोगाचें लवकर निदान करणें हें त्यासाठीं फार जरूर असतें. छाती तपासून रोग निजरेस येण्याच्यावेळीं रोगाची वाढत पुष्कळ झालेली असते. म्हणून त्याच्या अगोदरच्या स्थितींत निदान झालें पाहिजे. हें निदान खालील तीन चमत्कारिक प्रकारांनीं करतां येतें:-(१) कॉक ह्या जर्मन जंतुशास्त्रज्ञानें शोधून काढलेली क्षयजंतूपासून जुन्या तऱ्हेची लस घेऊन ती तापस नसतांना रोग्यास योग्य प्रमाणांत माहितगार डॉक्टानें टोंचली तर क्षय नसल्यास ताप येत नाहीं व असल्यास येतो. (२) वरील लशींत थोडें मीठ मिश्र करून क्षयरोग असल्यास संशय असलेल्या माणसाची त्वचा एकद्या जागी खरवडून त्यावर त्या लशीच्या मिश्रणाचा थेंब ठेवावा, जर क्षयरोग असेल तर त्या जागीं एक तांबडी लाल पुटकुळी उत्पन्न होते. या रीतीनें हाडें अथवा क्षयजंतुजन्य रोग झाला असतां त्याचें निदान लवकर करतां येतें. (३) यांत टायबरक्यूलीनच्या लशींत बरेंच पाणी मिश्र करून तिचा एक थेंब डोळयांत घातला कीं त्या डोळ्यास अक्षिपुटदाह म्हणजे लालीरोग होतो. ही लाली येण्यास ३-१२ व कधी ४८ तासहि लागतात. फार रोग वाढला असल्यास किंवा मस्तिष्कावरणदाहक्षयरोगांत वरील तिन्ही प्रकारांनींहि अगोदर रोगनिदान करतां येत नाहीं. उ प चा र.--रोग आहे असें ठरल्यानंतर उपचारांविषयी माहिती त्रोटकपणें पुढें दिली आहे. निसर्गानें रोग बरा होतो हे आपण पुष्कळदां ऐकतो व त्या नियमानुसार बरें होण्यास लायक असे जे रोग आहेत त्यापैंकी हा रोग खास आहे. मोकळी व स्वच्छ हवा व उत्तम उजेड हे फायदेशीर आहेत असें पुष्कळ दिवस पुष्कळांनां ठाऊक आहे. त्यांत नवीन कांहीं नाहीं. हा उपाय या कामीं भिषग्वर्यांच्या पूर्ण कसोटीस उतरला असून क्षयरोग असाध्य आहे ही कल्पना त्यांच्या डोक्यांतून नाहीशी झाली आहे. जुन्या काळीं म्हणजे इ. स. १८३० च्या पूर्वी सुद्धां कांही. डॉक्टरांनीं हा मार्ग सुचविला होता. जर्मनींत यासाठीं उत्तम संस्था नमुनेदार नियम घालून पुष्कळ ठिकाणीं उघडल्या आहेत. त्यांत सूर्यप्रकाश व हवेचा फायदा घेववेल तितका घेऊन रोग हटवितां येतो. त्या नमुन्यावर इतर देशांतहि संस्था उघडल्या आहेत सूर्याचें ऊन उंच पर्वतासारख्या ठिकाणी अधिक कार्य करतें व स्वित्झर्लंडमध्ये डोंगराळ प्रदेशांत काहीं जागी जमीनीवर बर्फ पडलें असूनहि वरील कारणामुळें तेथील हवेंत क्षयजंतुघ्नशक्ति पुष्कळ आहे. सूर्याचें ऊन, कफक्षयरोगच नव्हे तर तज्जन्य हाडी-संधिव्रण विकोपास गेला असला तरी बरा करतें  हें ऊन कपडे काढून उघड्या अंगावर घेण्याची त्या संस्थांतून वहिवाय आहे. अशा संस्थांतून रोग्यांना पैसा फार लागतो ही एक अडचण आहे. तथापि हवा, सूर्याचें ऊन ही उंच ठिकाणीं वरील आरामसंस्थांतच गुण दाखवितात असें नव्हे. तर अन्यत्र घरीं सुध्दां या तत्त्वावर मुख्य पोरण ठेवून पुष्कळ रोग हटवितां येतो. पण घरीं मुख्य अडचण म्हटली म्हणजे रात्रीं उघड्या हवेंत रोग्यास कसें निजवावें हीं शंका व चिंता रोग्याच्या आप्तेष्टांस चैन पडूं देत नाहीं. पूर्वग्रह फार बळकट असतात ते काढून टाकणें अशक्य होतें. व काहीं काळपर्यंत सतत हे इलाज चालू रहावेत तसे ते रहात नाहींत. म्हणून या कामीं रोग्यास तिऱ्हाईत परिचारक डॉक्टर यांच्या हवालीं केल्यानें आरामसंस्थांतून अधिक गुण येतो. अशा नियमबद्ध तऱ्हेनें रोग्याची घरींहि जोपासना ठेवण्याची बळकटी व तयारी असेल तर घरीं सुद्धां रोगी ठेवावे. रात्रीं खिडक्या दारें बंद करून ती तापलेलीं दूषित हवा फुफ्फुसांत घेऊन क्षयरोग व इतर फुफ्फुसांचे रोग अगोदर नसतील तर ते नवे होण्यास उलट मदत होते. आरामसंस्थांतून रोगी ठेवावयाचे ते मात्र रोग नवीनच झाला आहे. अशा स्थितींत असावेत. क्षयरोग्यासाठीं मुद्दाम काढलेले दवाखानें व रुग्णालयें ही फार उपयुक्त आहेत व या कामीं इंग्लंडचा नंबर पहिला आहे. या संस्थांतील मंडळी रोग्याच्या घरीं जाऊन आरामसंस्थांतून पाठविण्यालायक रोगी कोणते आहेत. यांची निवड करतात; निकरावर गेलेल्या रोग्यांनां रुग्णालयांत ठेवून घेतात. कफपरीक्षा जंतुशास्त्ररित्या करतात. रोग्यांनां रोगासबंधी हरएक माहिती देतात. या अशा संस्था आहेत. यापेक्षाहिं अधिक पाहिजेत असें इंग्लंडांतील लोकांचे मागणें आहे. आपल्या देशांत तिकडच्याप्रमाणें धनिकांचीं कार्ले, महाबळेश्वर, इंदूर या व अन्य थोड्या ठिकाणीं आरामगृहें क्षयरोग्यासाठीं मुद्दाम काढली आहेत. पण त्यांविषयीं त्यांच्या चालकांनीं जितकी प्रसिद्धि डॉक्टरांत व जनतेंत करावयास पाहिजे तितकी केलेली ठाऊक नाहीं. यामुळें अशीं आरामगृहें किती आहेत हें समजण्यास मार्ग नाहीं. आपलें हवामान सूर्यप्रकाश व हवेचा फायदा घेण्यास अनुकूल असल्यामुळें आपल्या लोकांचीं रहाणी बहुधा युरोपांतील त्याच समान दर्जाच्या लोकांपेक्षां पुष्कळच अधिक निर्दोष असते. तेथें चांगल्या दर्जाच्याहि कुटुंबांतील लोकांनां घरांत, खोलींत, भुईवरहि खांकरें कफाचे टाकणें किंवा तो खांकणा हातरुमालांत घेऊन रुमालाची घडी खिशांत बाळगणें अशा किळसवाण्या संवयी असतात. त्यामुळें आपल्या देशांत क्षयप्रतिबंध कार्य अधिक सुकर आहे. शाळांतील मुलांची तपासी करून त्यांत क्षयी मुलं दिसतील ती वेगळीं काढून त्यांचे शिक्षण भोंवताली वनश्री असेल अशा जागी करावयाचें अशीं पद्धति जर्मनींत सुरू आहे. त्यानें मुलांची प्रकृति सुधारते व दुसऱ्यांस संसर्ग जडण्याचेंह टळतें. क्षयरोग आहे असें निदान रोगाच्या अगदी आरंभीं झालें असतां वर सांगितलेल्या क्षयाच्या लशीनें रोग बरा करतात, त्यांचें तत्त्व असें आहे: ज्या रोग्याच्या शरीरांत क्षयबीज नाहीं त्यास ही लस थोड्या प्रमाणांत टोचण्यानें कांहीं होत नाहीं. पण क्षयरोग असतांनां टोंचल्यास त्यापासून विष उत्पन्न होऊन ज्वर येतो. परंतु थोड्या प्रमाणांत ज्वर उतरल्यावर पुन्हां व वरचेवर असें टोंचीत गेल्यानें वरचेवर विषोपत्ति होऊन कांहीं कालानें तें विष त्या माणसाच्या पचीन पडतें. पिचकारीनें टोंचलल्या क्षयरोगलशीस आतां त्याचें शरीर ज्वर येऊन दाद देत नाहीं इतकेंच नव्हे तर प्रथम शरीरांत जेथें क्षयरोग असेल त्या रोगाचीहि प्रगति खुंटते. अशा तऱ्हेनें अगदी आरंभावस्थेंत असलेले अनेक रोगी बरे झाल्याचे दाखले आरामसंस्थांतून व खाजगी डॉक्टरांकडे विपुल सांपडतात. तथापि हेंहि सांगणें येथें अवश्य आहे कीं, कांहीं सुप्रसिद्ध व अत्यंत विद्वान व शोधक डॉक्टर यांच्याविरूद्धहि आहेत. व दुसरी गोष्ट ही कीं, कांही उत्तम रुग्णालयांत व आरामसंस्थांतून ना टोंचण्याच्या उपायांचा पुष्कळ अनुभव घेऊन अलीकडे ही चिकित्सापद्धति त्यांनीं अगदींच टाकून दिली आहे. हे सर्व उपाय आरंभावस्थेंतील रोग्यासंबंधी झाले. क्षयरोग ज्यांमध्ये बराच विकोपास गेला आहे. त्यांची रोगचिकित्सा अशा रोग्यांनां वरील टोंचण्याचे उपाय अगदी उंच डोंगरावरील उघडी व कोरडी हवा उपयोगी नाहीं.याशिवाय ज्या रोग्यांनां कफ, मल इत्यादि मार्गांनीं रक्त पडण्याची प्रवृत्ति आहे, ज्यांचीं फुफ्फुसें, हृदय हीं बिघडलीं आहेत किंवा रुधिराभिसरण चालावें त्यापेक्षां फार मंद चालतें.व ज्यांनां वात, सर्दी लवकर बाधते अशा रोग्यांनां वरील प्रकारचे उपाय निरुपयोगी असून उलय त्यांनां अंमळ दमट हवेपासून बरें वाटतें. पण त्यांनांहि खुली, मोकळी व विपुल हवा मिळवण्यासाठीं खिडक्या, दारें उघडीं ठेवीत जावीं. रोग नवीन असो वा जुना असो, सर्व प्रकारच्या क्षयी रोग्यांनां, साधे, विपुल व पुष्टिदायक पदार्थ व अन्न खाण्यास द्यावें. त्यासाठीं मद्य सहसा देऊं गये. ताप नसेल तर शरीरपुष्टीसाठीं कोंड माशाचें तैलयुक्त औषध रोज २ वेळां जेवणानंतर द्यावें व अन्नपचन ठीक असेल तर थोड्या प्रमाणांत लोह व क्विनाईन द्यावे; व तें बिघडलें असेल तर अन्नपाचक औषधें या रोग्यांनां दिली तर त्यांचें शरीर पुष्ट होईल. ग्वायाकोल व क्रियोसोट हीं औषधें कोंडच्या तेलांत मिश्र करून दिल्यानें कफशुद्धि होते. इतर चिकित्सा केवळ निदान कफक्षयांत तरी लक्षणानुसार करावयाची असते. ती थोडक्यांत येणेंप्रमाणें (१) खोकल्याची ढांस:-खोकल्याचें शमन होईल अशीं सूक्ष्म प्रमाणांत अफू अगर मार्फियायुक्त औषधें. छातीवर रोगाच्या जागीं आयोडीन घालणें, (२) कफाबरोबर वररक्त पडणें:-बिछान्यांत रोग्यास निजविणें; जी बाजू रोगट असेल त्यावर बर्फाची पिशवी ठेवणें. फक्त पातळ अन्न थोडें व वरचेवर देणें. औषधें अफूयुक्त किंवा क्यालशियम क्लोराईड, पोटांत देणें, आमिल नैट्रेट हुंगविणें (३) अतिसार:-बिस्मथयुक्त स्तंभक औषधें व पचेल असें अन्न बदलून देणें. (४) कंठामध्यें क्षत  पडल्यास:-मेंथाल कोकेनयुक्त वड्या देणें. बोलणें बंद करणें. (५) फुफ्फुसावरणदाहानें छातींत कळ येणें:-त्यावर आयोडीन अर्क लावावा. (६) फुफ्फुसवायु स्फोय:-मार्फिया टोंचावा. तब्येंत फार बिघडल्यास फार ढवळाढवळ व उपचार करूं नयेत. (७) कफास फार घाण येणें:-जंतुघ्न औषधें असलेली डबी नाकास दर वेळेला २-३ तास अडकवून ठेवून तीं औषधे  हुंगावीत (यूकालिप्टस, थायमॉल, क्रियोसीट इ.) हीं वरील लक्षणें कफक्षयांत आढळतात. क्षयी माणसांनीं लग्न करावें अगर न करावें; केल्यास क्षयप्रकृति मुलीशीं करावें किंवा निरोगी मुलीशी करावें यांविषयी अप्रिय असा अभिप्राय देणें वैद्यास जरूर पडतें. पुढें संतति होईल ती क्षयी व अल्पायुषीं होण्याचा संभव अधिक; नवरा बायकोंतच नव्हे तर घरांतील इतर माणसांनांहि असणारी ससर्गाची भीति या सर्वांचा विचार करून ज्याचें त्यानें योग्य दिसेल तें करावें. क्षयजंतुजन्य विकारांपैकीं अस्थिदाह व हाडी किंवा संधिव्रण, त्वचेंतील क्षयकुष्ठरोग, अन्नरसग्रंथी  (गंडमाळा) रोग यांसाठीं शस्त्रवैद्याचा उपयोग फार उत्तम प्रकारें होऊन रोग पूर्ण बरा होण्याची आशा जितका लवकर तो उपाय करावा तितकी अधिक असते. आ यु र्वे दी य.-क्षयरोगास आर्य वैद्यकांत राजयक्ष्या असेंहि नांव आहे हा रोग पुष्कळ रोगांच्या मागून म्हणजे ताप, मूळव्याध, वगैरे रोगांनीं क्षीण झाल्यावर होतो, व तो झाल्यावर पुष्कळसें रोग उत्पन्न होतात. साहसाचीं कामें करणें, मलमूत्रादिकांचे वेग आवरून धरणें, वीर्य, ओज व शरीरांतील स्निग्धता यांचा क्षय होणें, आणि शास्त्रीय विधी सोडून मनास वाटेल तसं अन्नपान सेवन करणें, हीं क्षयाचीं मुख्य चार कारणें आहेत. या कारणांनीं वाढलेला वायु पित्तास स्वस्थानांतून व कफास सर्व शरीरांतून चाळवून शरीराच्या सर्व सांध्यांत शिरून सांधे व शिरा यांत दुखावा उत्पनन करून; स्त्रोतसांचीं (शरीरांतील पोकळ जागांचीं) तोंडें बंद करून किंवा अतिशय मोठीं करून वर, खालीं व तिरपा (कोठ्याच्या वरच्या बाजूस) अशा रीतीनें सर्व शरीरभर संचार करून त्या त्या भागांत त्यात्यासंबंधीं विकार उत्पन्न करतो. पू र्व चि न्हें.-क्षयरोग होण्यापूर्वी पडसें, अतिशय शिंका येणें, लाळ गळणें, तोंड गुळमट होणें, अग्नि मंद होणें, शरीर अशक्त होणें, तपेलें, घागर, वगैरे भांडीं व खाण्यापिण्याच्या पदार्थांत बहुतकरून माशा, गवत, केंस, वगैरे पडल्यासारखें वाटणें, मळमळ, वांती, अरुचि, अन्न चांगले खात असूनहि अंगांत शक्ति कमी असणें, आपल्या हाताकडे वरचेवर पहात बसणें, पाय व तोंड सुजणें, डोळें पांढणे  फटफटीत होणें, आपले दंड किती मोठे आहेत हें वारंवार जाणण्याची इच्छा होणें. स्वत:चें शरीर चांगलें असतांहि तें वाईट, अमंगळ दिसणें, बायका, दारू, व मांस, यांवर फार प्रीति बसणें, अंगी दयाळूपणा वाढणें, डोक्यास नेहमीं काहीं तरी वस्त्र गुंडाळणें, नखें व केंस  अतिशय वाढणें इत्यादि. क्षयरोगांत वाताचें आधिक्य असेल तर डोकें व बरगड्या दुखणें, खांदे व अंग मोडल्यासारखें होणें, घसा दुखणें व आवाज बसणें, हे विकार उत्पन्न होतात. पित्ताधिक्यापासून पाय, खांदे, व हात यांचा दाह, अतिसार, रक्ताची वांती, तोंडास दुर्गंध येणें, ताप व गुंगी हे विकार उत्पन्न होतात. कफाधिक्यापासून अरुचि, वांती, खोकला, मूर्च्छा, अंग जड होणें, लाळ सुटणें, पीनस, दमा, आवाज बसणें, व अग्निमांद्य हे विकार उत्पन्न होतात. क्षीण झालेला आणि रोग व औषध यांचें बल सोसण्याची जास्त शक्ति नाहीं असा जो क्षयरोगी असेल त्यास थोडीं लक्षणें झालीं असलीं तरी असाध्य समजून वैद्यानें सोडून द्यावे, आणि सर्व लक्षणें झालीं असूनहि जर रोगी पुष्ट व रोग आणि औषधें यांचें बल सहन करण्याजोगा असेल तर त्याची चिकित्सा करावी. क्षय हा रोग त्रिदोषांच्या कोपानें होतो. म्हणून जो दोष बलवान असेल त्याची चिकित्सा करावी. मात्र इतर दोष न वाढतील अशी खबरदारी घ्यावी. या रोगांत बहुतकरून कफदोषानें स्त्रोतसांचा (रसवह, रक्तवह इत्यादि) मार्ग बंद होतो. म्हणून स्त्रोतसांतील दोष पातळ होऊन निघून जातील अशी चिज्ञित्सा करणें इष्ट आहे. म्हणून स्वेदन, स्नेहन, वमन, विरेचन, धूम्रपान, नस्य, अभ्यंग, बस्तिकर्म, कमोक्ष, प्रदेह (लेप) अवगाहन (औषधांचा काढा करून त्यांत बसणें) इत्यादि उपचार करावे. क्षयरोग व त्याची लक्षणें यावर पिप्पल्यरिष्ट, चतुर्मखरस, रत्नगर्भपोटली रस, लक्ष्मीविलास, वसंत कुसुमाकर, सवर्णपर्पटी, अभ्रकभस्म, शिलाजतुलोह, हीं योगरत्नाकारांतील औषधें फार गुणकारी आहेत. चांगला लावण्याकरितां ''चंदनबला लाक्षादि तैल'' चांगलें आहे. क्षयी मनुष्यानें आहाराकरितां साठेसाळी किंवा चांगल्या जातीचे तांदूळ, गहूं, सातू, मूग, या धान्यांचा उपयोग करावा, परंतु हीं धान्यें एक वर्षाचीं जुनीं असावी. रुक्ष अरण्यांतील पशूंचें मांस, किंवा पक्ष्यांचें मांस, प्रशस्त आहे. मुळा किंवा हुलगे याचीं मांसरस घातलेली कढणें उपयोगांत आणावीं. शेळीचें दूध, तूप, खावें. शेळयांच्या गोठयांत नेहमीं रहण्यानें क्षयरोग जातो. वांगें, कारलें, तेल, मोहरी, व मैथुन, दिवसां झोंप, रागावणें  ही क्षयी माणसानें वर्ज करावीं.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .