प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
                
क्षत्रिय, व र्ण.- चातुर्वर्ण्य केवळ भारतीय नसून इंडोयूरोपियन, निदान पर्शुभारतीय असावें याविषयीं माहिती पूर्वी दिलीच आहे (वेदविद्या-व बुद्धपूर्व-जग). अनेक वैदिक जाती, इराणी जाती व ग्रीक जाती यांच्यामध्यें चातुर्वर्ण्य होतें, म्हणजे प्रत्येक जातींत उच्च वर्ग, मध्यम वर्ग, व कनिष्ठ वर्ग असे जे निरनिराळे वर्ग असतात त्या प्रकारचेच हे चातुर्वर्ण्याचे वर्ग होते. त्यावेळेस उच्च, मध्यम हीं नांवें न देतां. क्रियासूचक नांवें वापरण्यांत आलीं. कांहीं क्रियांचें महत्त्व इतर क्रियांपेक्षां अधिक धरलें गेलें असल्यामुळें ते वर्ग कर्मावरून संबोधण्यांत येऊं लागले. अर्थात क्षत्रिय ही जात नव्हतीच. प्रत्येक जातींत कांहीं घराणीं क्षत्रियवर्गांत मोडलीं जात असत. आणि पूर्वी लग्नव्यवहार बरोबरच्या वर्गांशीं करावयाचे ही पद्धत असल्यामुळें क्षत्रियवर्गांत आपल्या वर्गाची भावना जागृत झाली होती. एकाच जातीमध्यें कांहीं कुलें क्षत्रिय म्हणविली जात असतील तर उरलेलें सामान्य लोक ''विश्'' म्हणविले जात असत. कधीं कधीं असें होई कीं, एखादी जातच्या जात आपल्या संबंध जातीचा वरचष्मा दुस-या जातीवर लादूं शके. असला वरचष्मा स्थापना करणाऱ्या जाती स्वत:स क्षत्रिय म्हणवूं लागत. लढणारे ते क्षत्रिय असा नियम धरला तर जगांतल्या सगळ्या जाती क्षत्रिय होतील. कां कीं, ज्यावेळेस लोक भटक्या स्थितींत होते व जमीन मिळविण्याची पद्धति म्हणजे वसलेल्या लोकांचे उच्चाटण करून नवीन आलेल्या लोकांनीं ती काबीज करणें अशी क्रिया, जेव्हं चालू होती तेव्हां प्रत्येक मनुष्य लढणाराच होणार. दुसऱ्याची जमीन मिळविणें किंवा आहे ती राखणें या क्रियांमध्यें प्रत्येकाला भाग घ्यावा लागणार. मोठ्या युद्धांत सर्व लोकांनीं भाग घेतला पाहिजे. या तत्त्वाची आठवण कुरुयुद्धापर्यंत देखील राहिलेली दिसते. कुरुयुद्धामध्यें सर्व वर्णांचें लोक सामील झाले होते असें भीष्मपर्व प्रथमाध्यायांत सांगितले  आहे.

जेव्हां कांहीं जातीच्या जातीच न लढणाऱ्या बनणार तेव्हां त्या जातींनांच क्षत्रियांच्या खालची पदवी उत्पन्न व्हावयाची. ही सामाजिक स्थिति जेव्हां लढणाऱ्या जातीचा हेतु देशांतील विशिष्ट प्रदेशांतील लोकांचें निर्मूलन करून जमीन आपल्या ताब्यांत घ्यावयाची हा नसून केवळ राज्यकारभार तेवढा हातीं घ्यावयाचा हा असणार, तेव्हां राज्यकारभार करणारी जात क्षत्रिय व इतर जाती वैश्य-शूद्र अशी स्थिति उत्पन्न होणार. प्राचीन इतिहासांत या दोन्हीं प्रकारच्या क्रिया वारंवार झाल्या आहेत. आणि विशिष्ट जातींच्या जातीच क्षत्रिय म्हणवून घेऊं लागल्या होत्या. क्षत्रिय व शूद्र हा भेद प्रसंगी पदवीमूलक राहील तर प्रसंगी केवळ संस्कारमूलकच राहील. जसजसें क्षत्रिय संस्कारांकडे दुर्लक्ष होऊं लागलें. तसतशा क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या जाती शूद्र म्हणविल्या जाऊं लागल्या. क्षत्रिय म्हणजे ''आर्यन्'' जातीचा असला पाहिजे असें कांहीं नाहीं. कां कीं, पांड्या वगैरे राजांनांहि क्षत्रिय म्हणत असत. जेव्हां संबंध जातीनांच  क्षत्रिय म्हणत तेव्हां त्यांमध्यें आर्यन् किंवा द्रविड हा भेद नसें. तथापि दोन सदृश कमी जातींतहि क्षत्रिय व शूद्र असे भेद कालांतरानें उत्पन्न झाले. क्षत्रियत्व किंवा शूद्रत्व यांचें कारण धंदा नसून संस्कारसहितता किंवा संस्कारहीनता यांसच प्राधान्य उत्पन्न झालें. या सर्व गोष्टीं स्पष्टपणें सिद्ध करणारे मनुस्मृतींतील (अध्याय १०, ४३-४४) श्र्लोक येणेंप्रमाणें:-''शनकैस्तु क्रियालोपादिमा: क्षत्रियजातय: । वृषलत्वं गता लोके ब्राह्मणादर्शनेन च॥ पौण्ड्रकाश्चौड्रदविडा: काम्बोजा यवना: शका:। पारदापल्हवाश्चीना: किराता दरदा: खशा:॥ '' मनस्मृतीमध्यें शूद्र राजांचा अनेक वेळां उल्लेख येतो व शूद्रांच्या मुलुखांत ब्राह्मणांनीं राहूं नये वगैरे निषेधवचनें सांगितलेलीं आहेत. अशा प्रसंगी तर क्षत्रिय व शूद्र यामध्यें फरक केवळ संस्कारांचा होता, कर्माचा नव्हता असें म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. क्षत्रियवर्गास राजन्यवर्गहि म्हणत असावेत. कां कीं, पुरुषसूक्तांत राजन्य असा शब्द वापरला आहे. तथापि त्या वेळेस देखील क्षत्र हा शब्द अस्तित्वांत होताच . क्षत्र व क्षत्रिय या दोन्हीं शब्दांचा अत्यंत प्राचीन अर्थ गूढ आहे. 'क्षतात् किल त्रायते' असें कालिदासी स्पष्टीकरण केवळ काव्य आहे असें म्हणतां येत नाहीं. क्ष त्रि य व र्ग ब्रा ह्म ण व र्ग.-या दोन वर्गांत स्पर्धा अनेक ठिकाणीं दिसून येते. उपनिषदांत केव्हां जनकादि राजर्षी ब्रह्मविद्येंतच आपलें उच्चत्व ब्राह्मणांवर स्थापन करते झाले, तेव्हां त्यास वर्गस्पर्धेचें नांव बिलकुल देतां येत नाहीं. ते उल्लेख हौशी जवानांचा धंदेवाईक जवानावर विजय झाल्यामुळें जें कौतुक उत्पन्न होतें त्या कौतुकाचें निदर्शक होत. गौतमबुद्धाच्या वेळेस गौतम जें वातावरण उत्पन्न करूं पहात होता तें ब्राह्मणद्वेष्टें होतें यांत शंका नाहीं. तो क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र अशी वर्णपरंपरा मांडीत असे. तो ब्राह्मणांनां हीन कुलांतील असें उल्लेखी. आणि त्याच्या अंगी ब्राह्मणद्वेष इतका भरलेला दिसत होता कीं, त्यासाठीं त्यानें विद्याविकासावर देखील आघात केला आहे. इतर ब्राह्मण गणित करतात, ग्रहणें वर्तविण्यात, मी गौतम भिक्षु या कृत्यापासून अलिप्त आहें असें तो ऐटींनें म्हणे आणि पुन्हां ब्राह्मणांच्या विद्येपासून अलिप्त रहा असा लोकांस उपदेश करी. आणि याचें कारण ब्राह्मणांची विद्या अनुभवमूलक आहे; अनुभव म्हणजे पदार्थ आणि इंद्रिय यांचा सन्निकर्ष; या सन्निकर्षामुळें वासना उत्पन्न होते, आणि वासना ही तर सर्व दु:खांचें व पुनर्जन्माचें कारण; तर ब्राह्मणांची विद्या तुम्हांस दुर्गतीस नेईल अशी मांडणी गौतमबुद्धांनें केली होती. बुद्धास किंवा जैनांस ब्राह्मण्याचें वर्चस्व कां झुगारून देतां आलें नाहीं याचें मुख्य कारण असें कीं, कायद्याला म्हणजे धर्मशास्त्राला आधारभूत ग्रंथ म्हणजे वेद अशी अगोदरच समजूत स्थापित झाली होती, आणि त्यामुळें वेदेतर साहित्यावर धर्मशास्त्र स्थापन करण्याचा प्रयत्न व्हावयास पाहिजे होता, किंवा वेदांपासून निराळा कायदा काढणारा संप्रदाय स्थापन व्हावयास पाहिजे होता. पण बौद्ध व जैन यांच्याकडून या दोहोंपैकीं एकहि कृति नीटशी झाली नाहीं. हिंदुस्थानांत क्षत्रियवैश्यांचें अस्तित्वच नाहींसें झालें असून ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण उरले आहेत असें जें सामाजिक तत्त्व लोकांकडून विश्वासलें गेलें आणि त्या तत्त्वावर ब्राह्मण वर्ग अवलंबून राहून इतर लोकांची वैरें संपादिता झाला त्याचें कारण काव याविषयीं विचार केला पाहिजे. याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे क्षत्रिय, वैश्य याविषयीं प्रश्न  एखाद्याच वेळेस उपस्थित होई. या प्रश्नांचें राज्यव्यवस्थेंत महत्त्वच नसल्यामुळें या प्रश्नाच्या निर्णयांत राजे लोक पडलेच नाहींत. या प्रश्नाचा निकाल लावून त्याप्रमाणें कांहीं तरी कार्य करण्याची जबाबदारी ब्राह्मणांवरच पडे. ब्राह्मण जे कार्य करीत तें एवढेंच कीं, व्यक्तीस जेव्हां संस्कार करावयाचा प्रश्न  उपस्थित होई तेव्हां ते, व्यक्ति क्षत्रिय असली तर वैदिक संस्कार करीत, आणि क्षत्रिय नसली तर पौराणिक संस्कार करीत. जेव्हां क्षत्रियत्व सिद्ध नसेल तेव्हां व्यक्ति किंवा तिची ज्ञाति शूद्र धरून संस्कार करणें सुरू झालें. राजे लोकांनां या प्रश्नाचा निर्णय करावा लागे, पण प्रत्येक राजा बहुधा आपापल्यापुरता निर्णय करी. कोणाहि राजानें केलेला नियम सर्व हिदुस्थानभर चालू होणें शक्य नव्हतें एक राजा दुसरें राजघराणें आपल्या बरोबरीचें आहे हें कसें ठरविणार? राजाला आपली जातच क्षत्रिय ठरविणें कठिण जाई. कां कीं, जात बहुतेक असंस्कृत व्यक्तींनीं भरलेली असावयाची व याप्रकारच्या अडचणींमुळें राजे लोक आपापल्यापुरताच निकाल करून घेत आणि आपलें घराणें तेवढें क्षत्रिय ठरवून घेत. त्याबरोबर आपल्या संबंध ज्ञातीला क्षत्रियत्व मिळालें किंवा नाही, याची फिकीर करीत नसत. त्यामुळें पुष्कळदां असें होई कीं, स्थानिक भिक्षुक भोंवतालच्या विचारानें बद्ध असल्यामुळें आणि आपल्या धंद्यांतील इतर संस्कारकर्त्यांस जबाबदार असल्यामुळें वैदिक मंत्रांनीं संस्कार करून घेण्याची आकांक्षा करणाऱ्यांस वैदिक मंत्रांसह संस्कार करण्याचें नाकारीत, आणि त्यामुळें राजे लोकांनां स्थानिक विचारानें किंवा जबाबदारीनें बद्ध नसलेले दुसरे कोणते तरी भिक्षुक आणून आपली क्षत्रिय संस्कारांची इच्छा तृप्त करून घेणे भाग पडलें. अशा खटपटींत राजे लोक पडले म्हणजे कोणत्या तरी ब्राह्मणास राजाचें क्षत्रियत्व कबूल करून त्यास वैदिक संस्कार करून राजपौरोहित्य मिळविण्याची संधि सांपडे. याचमुळें अनेक रजपूत संस्थानांमध्यें स्थानिक जातीचें भिक्षुक दुर्लक्षिलें जाऊन तैलंगे भिक्षुक आले आहेत. शिवाजीला देखील उदेपूरच्या घराण्याशीं संबंध जुळवून संस्कार करण्यासाठी काशीहून ब्राह्मण आणावा लागला. गायकवाडांनीं गुजराथी भिक्षुक पत्करले. कांहीं ठिकाणीं स्थानिक ब्राह्मण आपल्या जुन्या समजुतीशीं नवीन अपेक्षेची तडजोड करीत. मलबारकडें राजाचें तेवढें क्षत्रियत्व कबूल करण्याची पद्धत निघाली. कांहीं प्रसंगी सोन्याची मोठी गाय किंवा सोन्याचें अंडे करून त्यांत राजाला बसवून त्यांतून बाहेर काढीत म्हणजे राजाचा हिरण्यगर्थांतून पुनर्जन्म होऊन राजा क्षत्रिय झाला असें सिद्ध होई. राजाचा जन्म झाल्यानंतर तें सोनें ब्राह्मणांनां वाटण्यांत येई. क्षत्रिय म्हणविणाऱ्या वर्गास त्यांच्या पदवीस ब्राह्मणांनीं मान्यता न देण्याचीं कारणें काय याचा विचार करतां मुख्य कारण ब्राह्मणांची दुष्टबुद्धि हें मुख्य कारण नसून असहायता हें मुख्य कारण दिसून येतें. देशांत क्षत्रिय नाहींत, असा समज असतां जो ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य म्हणविणारांस वैदिक संस्कार करूं लागेल तो ब्राह्मण इतर ब्राह्मणांच्या दृष्टीनें बंडखोर ठरतो. ही बंडखोरी करून शेवटीं सुधारणा करण्याची शक्ति रोज भिक्षुकीचा धंदा करून चार पैसे मिळवूं इच्छिणाऱ्या ब्राह्मणांत कोठून असणार. त्यानें जर कोणाहि मोठ्या मनुष्याचें क्षत्रियत्व कबूल करून त्याचे वैदिक संस्कार केले तर तो द्रव्यलोभी आणि धर्मशास्त्राच्या नियमांस गुंडाळून लबाडी करणारा आहे, असाच त्याचा लौकिक होणारा आणि ज्या व्यक्तीच्या घरीं तो वैदिक संस्कार करणार ती व्यक्ति देखील त्याला कमीच लेखीत जाणार. यावरून क्षत्रियवैश्यांचें अस्तित्व कबूल करून त्यांस संस्कार क्षत्रियवैश्यांचें व्हावेत ही जरी बुद्धि भिक्षुकांमध्यें उत्पन्न झाली तरी ही चळवळ बाहेरून झाली पाहिजे. निराळ्या शक्तीनें त्यांनां क्षत्रिय ठरविलें आणि आम्ही ते ठरविल्यावर वैदिक संस्कार तेवढे केले, केवळ भिक्षुकी वाढविण्यासाठी आम्ही दुसऱ्यास वैदिक संस्कार करावयास तयार झालों नाहीं, असें संस्कारकर्त्यांस दाखवितां आलें पाहिजे.या प्रकारच्या खटपटींनां क्षेत्र नाहीं असें नाहीं पण ती दांडगाई करण्यास मनुष्य जरासा प्रबल असावा लागतो. चातुर्वर्ण्यामध्यें दांडगाई करण्याची परंपरा फार जुनी आहे. नवीन ब्राह्मणांच्याच शाखा उत्पन्न करण्याची क्रिया याज्ञवक्यानें केली आहे. ब्राह्मण मंडळी हिंडत राहून जागोजागच्या राजांनां क्षत्रिय करण्याची क्रिया करीत होती. ब्रह्मदेश, सयामसारख्या बौद्ध म्हणविणाऱ्या देशांत संस्कारासाठीं ब्राह्मण गेले आहेत. तेव्हां नवीन राजे क्षत्रियत्व पावते झाले आहेत. जेव्हां संस्कारांच्या बाबतींत ढवळाढवळ करण्याचा प्रसंग आला तेव्हां दयानंदाला निराळा समाज काढून त्यांतच तेवढी सुधारणा करतां आली. परंतु सर्वजण व्यापक चळवळ करण्यासाठीं निश्चयी व्यक्तीची परंपरा उत्पन्न झाली पाहिजे. ती उत्पन्न झाली तरच तो प्रश्न  सुटेल.

अ र्वा ची न का ळ:- क्षत्रिय ही पदवी धारण करणाऱ्या अनेक जाती आहेत. उत्तरेस रजपूत हे क्षत्रिय म्हणवितात; त्या प्रमाणेंच अरोरा, जाट वगैरे पंजाबी जाती देखील क्षत्रिय म्हणवितात. त्या प्रमाणेंच अरोरा, जाट वगैरे पंजाबी जाती देखील क्षत्रिय म्हणवितात, तसेंच खत्री व कायस्थ हे क्षत्रिय म्हणवितात. महाराष्ट्रांत मराठे, पांचकळशी, जिनगर-तांबट, (सोमवंशी आर्यक्षत्रिय) इत्यादि जाती क्षत्रिय म्हणवितात. महार देखील आपणांत सोमवंशी क्षत्रिय म्हणवितात. महाराष्ट्रांत आज तर अशी स्थिति आहे कीं, ब्राह्मण आणि वाणी या दोन जाती वगळून बाकींच्या सर्व जाती आपणांस क्षत्रिय म्हणवितात असें म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाहीं. क्षत्रिय म्हणविणाऱ्या जातींमध्यें उच्चनीचत्वभावना नाहीं असें म्हणणें चुकीचें होईल. मांगांसारख्या अत्यंत निकृष्ट स्थितीतील जाती आणि प्रभूंसारख्या सुशिक्षित जाती या दोहोंनीं जरी क्षत्रिय म्हणवून घेतलें तरी त्यांस समाजांत सारखेपणा थोडाच उत्पन्न होणार आहे? याशिवाय कांहीं जाती ब्रह्मक्षत्रिय अशीहि पदवी लावणाऱ्या आहेत. जा ती, क र्ना ट का ती ल क्ष त्रि य. -कर्नाटकांत या जातीचे सुमारें ४०००० लोक आहेत. यांचा मूळचा लष्करी पेशा होता पण आतां व्यापारधंदे, व सरकारी नोकरीवर हे लोक आपला उदनिर्वाह करतात. 'अरसु' म्हणून क्षत्रियांपैकीं एक जात असून या जातीचें म्हैसूरचें व कूर्गचें राजघराणें आहे. त्याचप्रमाणें रजपूत राजघराणीहि यापैकींच आहेत. आ सा मां ती ल क्ष त्रि य.-आसामांतहि एक जात आपणांस क्षत्रिय म्हणविते. त्यांची संख्या सुमारें २॥ लाख आहे. यांची गणना क्वचित् खत्री लोकांत करण्यांत येते ब्र ह्म क्ष त्रि य.-यांची वस्ती पंजाब, सिंध, गुजराथ, मारवाड या भागांत विशेष आहे. याचें कांहीं संस्कार ब्राह्मणांसारखे तर कांहीं क्षत्रियांसारखे आहेत. यांचें उपाध्यक्ष (दधिच) सारस्वत ब्राह्मण आहेत. हे बहुधा देवीचे उपासक आहेत. यांच्या भाटांनां ब्रह्मभाट असें नांव आहे. या ज्ञातीचे मुख्य तीन भेद आहेत; पैकीं दोन सूर्यवंशी व एक चंद्रवंशी आहे. टंडन, मेदेर, गंगावाल वगैरे साडेबारा कुळें ब्रह्मक्षत्रियांत आहेत. सालंकृत, पाराशर, कौशल्य, कुष्मांड, गौतम यांसारखी गोत्रें आहेत. ज्ञातीचा सामान्य धंदा व्यापार व कलाकसुरीचा होय. ज्ञातीतील गरीब लोकांना  मदत करण्यासाठीं तीन-चार मोठे फंड उभारलेले आहेत. (हरिकृष्णशर्मा कृत ब्राह्मणोत्पत्तिमार्तंड; टंडन-क्षत्रियप्रकाश; सोरठिया ब्रह्मक्षत्रिय समाजाचे रिपोर्ट; रा. का. गो. ब्रह्मक्षत्रिय, असोटें यांनीं पुरविलेलीं माहिती.) सू र्य वं शी क्ष त्रि य.-यांची मुख्य वस्ती ठाणें जिल्ह्यांत आहे. तेथील लोकसंख्या सुमारें २५००० आहे. या ज्ञातींत पंचायतपद्धति चालू आहे. या ज्ञातीला थोडीशी सदृश जात म्हणजे सोमवंशी क्षत्रिय पाठारे यांची होय सूर्यवंशी क्षत्रियांचें धार्मिक संस्कार बहुधा यजुर्वेदी पळशीकर) ब्राह्मण करतात. बिंबराजाबरोबर यांचे पूर्वज इकडे आले असें म्हणतात. हें देवीचे उपासक असून भारद्वाज, वशिष्ट, काश्यम वगैरे यांची गोत्रें आहेत. या जातीची मंडळी निरनिराळ्या उद्योगधंद्यांत आहेत यांच्यात पुनर्विवाह रूढ आहे. (रा. ह. म. चुरी, चिटणीस, सू. क्ष. मंडळी , दादर) र घु वं शी क्ष त्रि य.--यांची वस्ती माळवा, भोपाळ, या बाजूस फार आहे. गावांच्या नांवावरून पडलेली बरीच गोत्रें किंवा कुळें यांच्यात आहेत. उत्तर हिंदुस्थानी (तिवारीसारखे) ब्राह्मण यांचे धार्मिक संस्कार करतात. काहीं उच्च घराणी सोडून यांच्यांत पुनर्विवाह रूढ आहे. (रा. उमेसिंग नारायणसिंग ठाकूर, अकोट) आ र्य क्ष त्रि य सो म वं शी.-ही जात वऱ्हाड, मध्यप्रांत, महाराष्ट्र मोंगलाई या भागांत आढळत असून लोकसंख्या सुमारें १५००० आहे. यांच्यांत पंचायती आहेत व त्यांच्या ताब्यांत देवळें, धर्मशाळा, शेतें, वगैरे मिळकत आहे. यांचे विवाहादि संस्कार ग्रामजोशी करतात. ही ज्ञान क्षत्रिय असल्याबद्दल शंकराचार्य व इतर अधिकारी मंडळींनीं सनदा दिल्या आहेत. जातींत कोठें कोठें पुनर्विवाह रूढ आहे. (सेक्रेटरी, आर्यक्षत्रिय सोमवंश मंडळ, पुणें.)

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .