प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
              
हौरा, जि ल्हा.- बंगाल, बरद्वान भागांत हा--लहान जिल्हा आहे. क्षेत्रफळ ५१० चौरस मैल. या जिल्ह्यांतून दामोदर नदी दक्षिणोत्तर जाते व ती हुगळी नदीला मिळते. या जिल्ह्यांत मोठमोठ्या नद्यांच्या दरम्यान असलेले खोलगट  भाग आहेत. या भागांतील जमीन पुळणीची आहे. या जिल्ह्यांत पाऊस ५७ इंच पडतो. येथली हवा, कलकत्त्याजवळ हा जिल्हा असल्यामुळें तेथल्यासारखीच आहे. या जिल्ह्यांत वारंवार महापूर येतात. इ ति हा स-हा जिल्हा बंगाली हिंदु राजांच्या राज्यापैकीं होता. पण त्याविषयीं फारसा विश्वसनीय इतिहास उपलब्ध नाहीं. हौरा शहरच्या आसपासचा भाग बऱ्याच दिवसांपासून विलायती व्यापारी वर्गाचें महत्त्वाचें ठिकाण होतें. पण १६ व्या शतकाच्या अखेरीस या शहराचें महत्त्व कमी होऊन हल्लीच्या कलकत्त्याचें मूळ ठिकाण सुतानुती याचें महत्व वाढलें. १८१९ सालापासून हुगळी हौरा ही वरद्वारपासून वेगळी केली गेलीं व १८४३ साली हौरा जिल्ह्याला निराळा मॅजिस्ट्रेट मिळाला. लो क व स्ती.-येथील लोकवस्ती १९२१ सालीं ९९७४०३ होती. हौरा येथें आसपासच्या जिल्ह्यांतून व संयुक्तप्रांत व विहार या प्रांतांतून लोक येत असल्यामुळें येथील लोकसंख्या वाढतेशी दिसते. येथें बाहेरून लाके येण्याचें कारण येथें गिरण्या लोखंडाचें कारखाने व इतर उद्योधंदे फार आहेत. शे ती.-नद्यांनीं वाहून आणलेला गाळ या जिल्ह्यातल्या जमीनींत येत असल्यामुळें येथील जमीन सुपीक आहे. येथील मुख्य पीक म्हणजे तांदूळ होय. याशिवाय इतर पिकें म्हणजे गहूं, जवस, मका, मोहरी, ताग व अंबाडी हीं होत. येथील लोकांस दुष्काळ फारसा परिचित नाहीं. व्या पा र व द ळ ण व ळ णा चें मा र्ग.-या जिल्ह्यांत हातमागावरचें व घरगुती धंदे फारसे चालत नाहींत. पण यांत्रिक धंदे फारच भरभराटींत आहेत व हे सर्व विलायती भांडवलावर चालले आहेत. हे विलायती धंदे म्हणजे गिरण्या, लोखंडाचे कारखाने वगैरे होत. येथें विटाहि चांगल्या तयार होतात. व्यापाराच्या सोयीकरतां हा जिल्हा कलकत्त्याचा भाग आहे. हौरा शहर हे ईस्टइंडिया रेल्वे व बंगाल-नागपूर रेल्वे याचें शेवटचें स्टेशन आहे; त्यामुळें कलकत्त्याचा मुंबई, मद्रास व नागपूर या शहरांशीं संबंध जोडला गेला आहे. येथून निर्गत माल म्हणजे तांदूळ, हुक्का, कच्ची कातडीं, सुती कापड, कापूस, रेशीम, विटा व दोर या जिनसा होत. व आयात माल म्हणजे तांदूळ, गहूं, कडधान्यें, तीळ, विलायती, कापड, राकेल, तागाचें कापड, अंबाडी, तूप, साखर, मसाला, विलायती दारू, तंबाखू, मीठ, इमारतीचें लांकूड, बटाटें, जोडे व काच वगैरे जिनता होत. वर सांगितलेल्या रेल्वेशिवाय हौरा-शिखाला व हौरा आमता रेल्वे या दोन रेल्वेंनीं उत्तरेकडील व वायव्येकडील मुलुख दळणवळणास सुलभ झाला आहे. या जिल्ह्यांतील साक्षरांचें प्रमाण शेंकडा ११.५ आहे. मुख्य शिक्षणसंस्था म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग कालेज शिवपुर ही होय. पो ट वि भा ग.--हौरा जिल्ह्याचा पोटविभाग. याचें क्षेत्रफळ १७३ चौरस मैल. लोकसंख्या १९०१ सालीं ४३१२५७ होती. हा पोटविभाग म्हणजे एक सपाट मैदान होय व याच्या पूर्वेस हुगळी नदी आहे व आंतल्या भागांत अनेक दलदलीचे खोलगट भाग आहेत. या भागांत हौरा व वल्ली हीं शहरें व ३६५ खेडीं आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .