प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
             
होंडुरस- हें मध्य अमेरिकेंतील एक प्रजासत्ताक राज्य आहे. याच्या उत्तरेस कॅरिबीयन समुद्र; पूर्वेस व दक्षिणेस निकाराग्वा; दक्षिणेस शिवाय पॅसिफिक महासागर व साल्व्हाडोर, आणि पश्र्चिमेस ग्वाटेमाला. लोकसंख्या (१९२३) ७७३४०८ असून क्षेत्रफळ सुमारें ४४२७५ चौरस मैल आहे. हा देश डोंगराळ आहे. दक्षिणेकडील अर्ध्या भागांत 'निकाराग्वा कॉर्डीलेरा' पर्वताची रांग पसरली आहे. येथील पर्वतावर ज्वालामुखीची शिखरें आहेत. अटलांटिक महासागराकडील बाजूस बऱ्याच नद्या आहेत. त्यांत उलुआ ही मुख्य नदी आहे. सॅगोव्हिआ ही मध्य अमेरिकेंतील सर्वांत मोठी नदी आहे. मध्य अमेरिकेंतील इतर संस्थानांप्रमाणें येथें फक्त दोन ॠतू असतात. मे ते नोव्हेंबरपर्यंत पावसाळा व नोव्हेंबर ते मे पर्यंत उन्हाळा. भूस्तर वनस्पती, प्राणी व हवा या बाबतींत याचें मध्यअमेरिकेंतील इतर देशांशीं साम्य आहे. लो क.--येथील मूळचे लोक इंडियन असून यूरोपियन लोक फार थोडे आहेत. पूर्व भागांत क्झिकाक्स व पोयास या नावांखाली मोडणाऱ्या इंडियन जाती आहेत. बऱ्याच जिल्ह्यांत लेवकास या सर्वसाधारण नांवाखालीं मोडणाऱ्या इंडियन जाती आहेत. बऱ्याच लोकांनी रोमन कॅथोलिक धर्म स्वीकारला आहे. सुमारें ९०००० लोक डोंगरांत रहात असून ते अगदी रानटी स्थितींत आहेत. उत्तर किनाऱ्यावर कॅरिब लोकांची वस्ती आहे. मु ख्य श ह रें.-राजधानी टेगुसिगाल्या (लोकसंख्या ४००००), इतर शहरें जुटीगल्पा कोमयाग्वा; अमापला, टूजीली व प्यूएटों कोटेस ही बंदरें आहेत. द ळ ण व ळ ण, व्या पा र व उ द्यो ग धं दे.-येथें ६६ मैल रेल्वे आहे. राजधानीपासून मुख्य शहरापर्यंत रस्ते आहेत. होंडुरसनें १८७९ त पोस्टल युनियन मान्य केलें. राजकीय घडामोडी जबर कर वगैरेमुळें होंडुरसची आर्थिक सुधारणा झाली नाहीं. या देशांत वनस्पतींची बरीच समृद्धि आहे. येथील महोगनी व देवदार प्रसिद्ध आहेत. येथें रबर, केळी, नारळ, कॉफी, तंबाखू, साखर, संत्रीं, लिंबें, मका, तांदूळ, नीळ, गहूं, वगैरे पदार्थ उत्पन्न होतात. येथें बरीच गुरेंढोरें आहेत. खनिज संपत्तींत होंडुरसचा पहिला नंबर लागेल. सोनें, चांदी, प्लॅटिनम, तांबें वगैरे धातू सांपडतात. होंडुरसचा आयात व निर्गत व्यापार संयुक्त संस्थानांशी चालतो. आयात ७ ते ७। लाख पौंड असून संयुक्त निर्गत ६॥ लाख पौंडांची असते. गवताच्या टोप्या, सिगार, विटा व दारू यांचें कारखाने आहेत. रा ज्य प द्ध ति.-१८२१ त हें संस्थान स्पेनपासून स्वतंत्र झालें. इ. स. १८३९ सालीं येथील राज्यपद्धति ठरविण्यांत आली. त्यानंतर तींत बऱ्याच सुधारणा झाल्या लोकांनीं निवडलेल्या काँग्रेसच्या हातीं कायदे करण्याची सत्ता आहे. तींत ४३ प्रतिनिधी असतात. ही काँग्रेस सभा चार वर्षे असते. अध्यक्ष लोकमतानें ४ वर्षांनी निवडतात. त्याच्या हाती कार्यकारी सत्ता असून तो प्रत्येक खात्याच्या मंत्र्याच्या साहाय्यानें कारभार चालवितो. सुप्रीम कोर्ट असून त्यांतील ५ न्यायाधिशांची निवडणूक होते. २० ते ३० या वयाच्या प्रत्येक सदृढ मनुष्यास लष्करी शिक्षण घ्यावें लागतें. ध र्म व शि क्ष ण.-बरेच लोक रोमनकॅथोलिक पंथाचे आहेत. तरी धर्माच्या बाबतींत स्वातंत्र्य आहे. ७ ते १५ वर्षांच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचें आहे. प्राथमिक शाळा बऱ्याच आहेत. अशिक्षितांचा वर्ग इंडियनांमध्यें बराच सांपडतो. टेगुसिगल्पा येथें विश्वविद्यालय असून शिवाय कॉलेज आहे. इ ति हा स .-कोलंबसानें प्रथम १५०२ साली केप होंडुरस येथें स्पेनचें निशाण रोविलें. १५२४ त कोर्टेसनें पहिली वसाहत स्थापन केली व आलिडनें स्वतंत्र वसाहन केलीं. कोर्टेसनें स्पेनचा ताबा बसविण्यासाठीं स्वारी करून प्युएर्टो कोर्टेस शहर स्थापिलें. व वसाहतीचा कारभार पाहण्यास एका गव्हर्नराची नेमणूक केली. १५३९ सालीं होंडुरस हें ग्वाटेमालाच्या अधिकाराखालीं आलें. नंतर १८२१ पर्यंत हें मध्य अमेरिकेच्या युद्धांत सामील झालें होतें. युद्ध व क्रांति यामुळें होंडुरसमध्यें सुधारणा झाली नाहीं. १८७१ मध्यें ग्वाटेमालाशीं युद्ध सुरू झाले. तीन वर्षांनीं राज्यक्राति होऊन सोटो हा अध्यक्ष झाला. याच्या कारकिर्दीत होंडुरसची चांगली भरभराट झाली. १९०३ पर्यंत एकदोन वेळां बंडें झाली. १९०३ साली बोनिला हा अध्यक्ष झाला. त्याच्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळीं विरुद्ध पक्षानें निकराग्वाची मदत मागितली. या संस्थानाचा अध्यक्ष झेलया हा महत्त्वाकांक्षी असल्यानें १९०७ पासून होंडुरस व निकाराग्वा यांत युद्ध झालें. त्यांत झेलयाची सरशी होऊन बोनिला पळून गेला. संयुक्त संस्थानानें मध्यें पडून निकाराग्वाला जास्त फायदा घेऊं दिला नाहीं. १९०८ व १९०९ मध्यें डेव्हिला याला अध्यक्ष निवडलें. मिग्यूएलडेव्हिला हा जरी अध्यक्ष होता  तरी त्याची सत्ता निकाराग्वाचा अध्यक्ष झेलया याच्यावर अवलंबून होती. झेलयाचीच सत्ता ज्यावेळी संपुष्टात आली त्यावेळीं होंडुरसचा पूर्वीचा अध्यक्ष बोनिला यानें होंडुरसावर १९१० सालीं स्वारी करून बराचसा प्रदेश जिंकला. अमेरिकेच्या मध्यस्थीनें तह होऊन डॉ. बर्ट्रंड यास होंडुरसचा तात्पुरता अध्यक्ष निवडण्यात आला. पण थोडक्याच दिवसांत जी अध्यक्षाच्या जागेची निवडणूक झाली तीत बोनिला हा प्रचंड  बहुमतानें निवडून आला. १९१३ सालीं बोनिलाच्या मृत्यूनंतर पुन्हां बर्ट्रड हा १९१५ सालीं अध्यक्ष झाला. १९१९ सालीं उपाध्यक्ष मोंब्रेनो व सेनापति गूटिएरेझ यांनी बंड केल्यामुळें बर्ट्रंड हा पळून गेला, व त्यानंतर बोग्रन हा जरी अध्यक्ष म्हणून नेमण्यांत आला तरी सर्व सत्ता गूटिएरेझच्या हाती होती. महायुद्धाच्या अमदानींत, १९१८ सालीं होंडुरसनें जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलें. त्यामुळें शांततापरिषदेनंतर जर्मनीच्या मालमत्तेपैकीं बरीच सत्ता होंडुरसला मिळाली. १९२१ सालीं सेंट्रल अमेरिकन यूनियन होंडुरसाला मिळाले. १९१९ सालीं ग्वाटेमाला व होंडुरस यांच्यामधील सरहद्दी उभयतांच्या सलोख्यानें निश्र्चित झाल्या. ब्रि टि श  हों डु र स.--मध्य अमेरिकेंतील ब्रिटिशांची एक बादशाही वसाहत. ह्याच्या उत्तरेस व वायव्येस, मेक्सिकोंतील युकॅटन प्रांत; ईशान्येस व पूर्वेस होंडुरसचें उपसागर; आणि दक्षिणेस व पश्र्चिमेस ग्वाटेमाला. लोकसंख्या (१९२१) ४५३१७. क्षेत्रफळ ८५९८ चौरस मैल. युकेंटन द्वीपकल्पाच्या इतर भागांहून होंडुरसमध्यें विशेष असा कांहींच फरक नाहीं. मध्य अमेरिकेंतील शेजारच्या प्रदेशाहून भूगर्भ, प्राणी व वनस्पती या बाबतींत या बेटांत विशेष फरक नाहीं. उष्ण कटिबंधांत असून सुद्धां येथील हवा उष्ण नाहीं. दर वर्षी पाऊस सुमारें ८१ १/२  इंच पडतो. लो क.-येथील लोकसंख्येंत निग्रो, गोरे व मूळ रहिवाशी यांच्या मिश्रणापासून झालेल्या लोकांची जास्त संख्या आहे. होंडुरसमध्यें प्राचीन शहरांचे व इंडियन संस्कृतीचे अवशेष दृष्टीस पडतात. उत्पन्न.-सुमारें दोन शतकेंपर्यंत इमारती लांकडाचा व्यापार येथें फार होत असे. काळ्या लोकांच्या शेतकीचा फार कंटाळा असल्यामुळें साऱ्या ९० चौरस मैल जमीनींत लागवड होते. ऊंस, केळीं, नारळ व इतर फळें उत्पन्न होतात. द ळ ण व ळ णा चे मा र्ग.-बेलिझ मुख्य शहर व बंदर आहे. दळवळणाच्या बाबतींत आगबोटींचा उपयोग होतो. व्या पा र व ज मा बंदी.--१९२३-२४ सालीं ६५७७९४ पौंड निर्गत व ८३०५९४ पौंड आयात झाली. निर्गतींत इमारतीलांकूड, फळें, भाजीपाला, रम, दारू, हरणांची कातडीं, कासवांची पाठ याचा मुख्यत्वें समावेश होतो. आयातीमध्यें सुती कापड, लोखंडी सामान, दारू, किराणा माल येतो. एकंदर वसूल त्यासालीं २२४८२८ पौंड झाला. खर्चांत पोलीस व शिक्षण या मुख्य बाबी आहेत. रा ज्य व्य व स्था.--१६३८ त १७८६ पर्यंत ही वसाहत स्वतंत्र होती. १७८६ मध्यें साम्राज्य सरकारनें आपल्या हातीं येथील सत्ता घेण्यास सुरवात केली. सध्यां या ठिकाणीं गव्हर्नर असून तोच मुख्य सेनापति असतो. इंग्लिश कायदा सर्वत्र चालतो. धर्म व शिक्षण.--वेगवेगळ्या पंथांची धर्ममंदिरें आहेत. येथील शाळा सांप्रदायिक आहेत. त्यांनां सरकारी मदत मिळते. इ ति हा स .-या बेटांत प्रथम १६३८ त चाच्यांचीं लांकडें तोडण्यासाठीं म्हणून वसाहत केली. पुढें त्यांच्या व स्पॅनिश लोकांच्या नेहमी झटापटी होत स्पॅनिश लोक ब्रिटिशांनां हांकून देण्याची संधि पहात होते. १७९८ सालीं केलेल्या हल्ल्यांत स्पॅनिश लोकांनां अपयश आलें. त्यावेळेपासून ब्रिटिश सत्ता कायमची सुरू झाली. मध्यअमेरिका स्वतंत्र झा्ल्यावर मेक्सिको, न्यू ग्रॅनडा व मध्यअमेरिकेंतील संयुक्त संस्थानें यांच्याशीं तह करून ब्रिटिशांनी आपली सत्ता दृढ केली.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .