प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
             
हैदराबाद (सिंध) जि ल्हा.- मुंबई, सिंधप्रांत. क्षेत्रफळ ८२९१ चौरस मैल. ह्या जिल्ह्यांत उंच प्रदेशांपासून प्रवाहाबरोबर वाहाणाऱ्या खळमळीनें तयार झालेलीं जमीन फार आहे. या जिल्ह्याचा सिंधु नदीच्या तीराजवळचा मुलूख फार सुपीक आहे. या जिल्ह्याच्या कांठावरून सिंधुनदी १५० मैलपर्यंत जाते. या जिल्ह्यांत हवा एकसारखी नाहीं. एकंदरीत या जिल्ह्याची हवा आरोग्यावह आहे. दरवर्षी पाऊस ५-७ इंच पडतो. इ ति हा स.-सिंध देशाचा इतिहास म्हणजेच या जिल्ह्याचा इतिहास होय. हैद्राबाद हें शहर ११ शें वर्षांपासून प्रसिद्ध आहे. कारण महंमद कासीमनें ह्याच शहरांवर ८ व्या शतकांत स्वारी केली होती. १८ व्या शतकांत पुन्हां गुलामशहानें हें शहर जिंकून येथें आपली गादी स्थापन केली. त्यावेळेपासून सिंध प्रांतांत या शहराचे महत्त्व कायम टिकलें आहे. लो क व स्ती.-या प्रांताची लोकसंख्या १९२१ सालीं ५७३४५० इतकी होती. हिंदू शेंकडा २४ तर मुसलमान शें. ७४  आहेत. हिंदु लोकांमध्यें कारकून व व्यापारी वगैरे लोहाण जातीचें, धेड व कोळी या जातीचे लोक आहेत. मुसुलमान लोकांमध्यें तीन चतुर्थांश सिंधी लोक (हे मुळचें हिंदू होते पण पुढें त्यांनीं धर्मांतर केलें.) आहेत. मुसलमानांचा दुसरा वर्ग म्हटला म्हणजे बलुची लोकांचा होय. तिसरा वर्ग पठाण लोकांचा आहे; या जिल्ह्यांतील लोकांचें वर्गीकरण केलें तर शेंकडा ६४ लोक शेतकीवर उपजीविका करणारें आहेत; ६ लोक मजुरी करून पोट भरणारे आहेत; उद्योगधंदे करून राहणारे शें १५ लोक आहेत व व्यापार करून राहणारें शें. १ आहेत. शे त की.-या जिल्ह्यांतील जमीनी चार प्रकारच्या आहेत. पहिला प्रकार म्हटला म्हणजे बालुकामय जमीनीचा पण या जमिनींत उत्पादक धर्म बरेच आहेत. दुसरा प्रकार टणक जमिनींचा; तिसरा प्रकार वालुकामय जमिनीचा व चवथा प्रकार क्षारयुक्त जमीनीचा. या जिल्ह्याचा अगदी उत्तरेचा भाग चांगला सुपीक आहे. या जिल्ह्यातलीं मुख्य पिकें म्हटलीं म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहूं , कापूस व तीळ. जिल्ह्यांतील बहुतेक जमीन लागवडीस आलेली आहे व बागाईत बहुधा मुख्य शहराभोंवती केलेली असते. ह्या जिल्ह्यांतील शेतकी सर्वस्वी कृत्रिम कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे कालवे २८१ आहेत व ते सरकारच्या ताब्यांत आहेत. ह्यापैकीं मुख्य कालवे म्हणजे फुलेली कालवा. जामराव कालवा, नसरत कालीवा, थारो मुहमदु कालवा वगैरे होत. जिल्ह्यांत जंगलेंहि बरीत आहेत व त्याचें क्षेत्रफळ २२८ मैल आहे व हीं सिंधु नदीच्या तीरानें आहेत. व्या पा र व द ळ ण व ळ ण--ह्या जिल्ह्यांतील कारागिरी पूर्वी जरी प्रसिद्ध होती तरी हल्लीं तिची विपन्नावस्था आहे. तरी पण ह्या जिल्ह्यांतील लाखेच्या कामाची अजून प्रसिद्धि आहे. पूर्वी अमीरांच्या वेळीं जोरांत चालत असलेला हत्यारांचा धंदा कालमाहात्म्यामुळें हल्लीं मंदावला आहे. हाल तालुक्यांत जें सुशीं व खेस नांवाचें कापड तयार होतें तें फारच उत्कृष्ट असतें व त्याचप्रमाणें मुलामा दिलेलीं भांडी उत्कृष्ट तयार होतात व इतर जिल्ह्यांत ब्लँकेटें, जाडेंभरडें कापसाचें कापड, रग व धातूंचीं भांडीं वगैरे जिन्नस तयार होतात. ह्या जिल्ह्यांत कापसाची सरकी काढण्याच्या बऱ्याच गिरण्या आहेत. ह्या जिल्ह्यांतून मालाची ने आण फार होते. आयात माल म्हणजे कापूस, साखर मसाला व विलायती जिन्नसा; व निर्गत माल म्हणजे कापूस गहूं, तीळ व नाचणीसारखें धान्य. ह्या जिल्ह्यांत सिंधु नदी जलमार्गानें प्रवास करण्यास वर्षभर योग्य असतें. हैद्राबाद शहर हें कराचीशीं व रोहरीशीं नॉर्थ वेस्ट रेल्वेनें जोडले आहे. व जोधपूर बिकानेरच्या मार्गानें नॅरोगेज रेल्वेनें हैद्राबादपासून मुंबईलाहि जातां येतें. ह्या जिल्ह्यांत शिक्षण फारच मागासलें आहे. शेंकडा ३.१३ लोक (पुरुष व स्त्रिया मिळून) साक्षर आहेत. श ह र .-हैद्राबाद जिल्ह्याची राजधानी. लोकसंख्या सुमारें पाऊण लाख. हें शहर १७६८ सालीं गुलामशहा काल्होरा यानें वसविलें. १८४३ सालापर्यंत तें सिंध प्रातांत मुख्य शहर होतें पण ब्रिटिश राज्य प्रस्थापित झाल्यापासून कराची हें राजधानीचें शहर बनलें. ह्या शहराला एक किल्ला आहे व त्यात एक शस्त्रागार आहे. ह्या शहरांत ५० वर शिक्षणसंस्था आहेत. त्यापैकीं ४ हायस्कुलें आहेत. ह्या शहरांत पाणी मुबलक खेळतें व त्याचा पुरवठा सिंधु नदीपासून होतो. हें शहर इतिहासदृष्टया सिंध प्रांतांत मुख्य असल्यामुळें रस्ते, तारायंत्र व पोष्ट ह्या दळणवळणाचें केंद्र आहे. ह्यांत कारागिरी बहुत आहे व लाखेच्या प्रेक्षणीय कामाबद्दल यूरोपमधल्या प्रदर्शनांत बक्षिसेंहि कारागिरास मिळालीं आहेत. हें शहर लष्करी ठिकाण आहे. ह्या शहराला म्युनिसिपालिटी आहे.

हैदराबाद,. संस्थान.- हिंदुस्थानातीलें पहिलें संस्थान हें निजामसरकारच्या अमलांखालीं आहे. याचें क्षेत्रफळ ८२६९८ चौरस मैल व लो. सं. (१९२१) १२४७१७७० आहे. हें संस्थान बहुकोणाकृति असून तें दख्खनच्या पठाराचें केंद्र आहे. सी मा.-उत्तरेस वऱ्हाड व मध्यप्रांत; दक्षिणेस कृष्णा व तुंगभद्रा नद्या; पश्र्चिमेस मुंबई इलाख्यांतील नगर, सोलापूर , विजापूर व धारवाड हे जिल्हें व पूर्वेस वर्धा व गोदावरी ह्या नद्या व मद्रास इलाख्यांतील कृष्णा जिल्हा. स्वा भा वि क र च ना.-हें संस्थान विस्तृत पठार आहे. व सरासरीनें हें समुद्रसपाटीपासून १२५० फूट उंच आहे. ह्याचे भूगर्भशास्त्रदृष्टया  व मानवजातिशास्त्र दृष्ट्या दोन भाग होतात. पश्र्चिमोत्तर भागामध्यें कापूस पैदा करण्यास योग्य अशी काळी जमीन व मराठी आणि कानडी भाषा बोलणारे लोक आढळतात. दुसरा भाग पूर्वदक्षिणाभिमुख आहे. या भागांत जमीन तांदुळास विशेष योग्य अशीं आहे. येथील लोक मुख्यत्वेंकरून तेलगू भाषा बोलणारे आहेत. ह्या संस्थानांत मुख्य पर्वत म्हटले म्हणजे बालाघाट (२०० मैल लांब व ४ १/२  मैल रुंद); उत्तरेस सह्याद्री पर्वत (१२० मैल लांब);   व कांडिकलगट्या (५० मैल लांब) हे होत. या संस्थानांतून वाहणाऱ्या मुख्य नद्या गोदावरी व कृष्णा या होत, व यांनां मिळणाऱ्या नद्या तुंगभद्रा, पूर्णा, पेण गंगा, मांजरा, भीमा वगैरे नद्या होत. या विस्तृत संस्थातांत अनेक तऱ्हेचे भूपृष्ठभाग दिसून येतात. सर्व संस्थानांत औरंगाबाद जिल्हा फारच सुंदर आहे. कारण त्यांत अजंठा व वेरुळ लेण्यासारखी लेणीं व वनश्री विपुल आहे. येथें सृष्टिनिर्मित तळीं बहुत आहेत. या संस्थानांतील खनिज संपत्ति मुख्यत्वेकरून सोनें, कोळसा व हिरे ही होय. यापैकीं सोनें धारवाडी पद्धतीनें लिंगसुगुर येथें सांपडते. हिरे कर्बूल येथें मिळतात व कोळसा शिंगरेणी येथें विपुल निघतो. येथील डोंगराळ प्रदेशांत जंगल फार आहे परंतु त्यांत इमारती लांकूड फारसें मिळत नाहीं; सर्व संस्थानभर बाभळीचीं झाडेंच फार आहेत. शिवाय ताडीची झाडेहि लोक वाढवितात. कारण त्यापासून ताडी तयार होते व तेलंगणांत ताडी पिण्याचा प्रचार फार आहे. शिवाय चिंच व नारळी ह्यांची बरीच समृद्धि आहे. ह वा.-ह्या संस्थानांतील हवा जरी सर्वोत्कृष्ट नसली तरी एकंदरीत प्रकृतीस मानवणारी आहे. ह्यां प्रांतांत उष्णतेचें मान सरासरीनें ८१ अंशांपर्यंत जातें. दरवर्षी पाऊस ३० ते ३२ इंच पडतो व तो मुख्यत्वेकरून जून ते आक्टोबर या महिन्यांत पडतो. ईशान्येकडील जे पावसाळी वारे वाहतात त्यांपासून ४ ते ७ इंच पाऊस मिळतो. इ ति हा स.-प्रागैतिहासकालामध्यें या संस्थानाच्या पूर्व-दक्षिणभागामध्यें द्राविडी लोक रहात असत या लोकांपैकींच तेलगू भाषा बोलणारे लोक या प्रांतामध्यें हल्लींच्या काळीं सुद्धां पुष्कळच सांपडतात. परंतु राजा अशोकानें सर्व वऱ्हाडप्रांत व हल्लींच्या संस्थानाच्या वायव्य व पूर्व या दोन दिशांकडील भाग पादाक्रांत केला होता असें त्याच्या शिलालेखांवरून समजतें. अशोकानंतर आंध्र राजे आले व त्यानींत १०० वर्षे राज्य केले. त्यांच्या मागून चालुक्य राजे आले. यांचा उदय सुमारें इसवीसन ५५० वर्षापासून झाला व अस्तकाल सुमारें ११९० साली झाला. या ६५० वर्षांमध्यें त्यांनां पल्लव राजे, राष्ट्रकुल राजे, व चोल आणि होयसाळ राजे यांच्याशीं झगडावें लागलें व त्यांनंतर यादव राजे राज्य करूं लागले. १३ व्या शतकाच्या अखेरीस मुसुलमान लोकांच्या दक्षिणेंत स्वाऱ्या सुरू झाल्या. अल्लाउद्दिनाची पहिली स्वारी १२९४ सालीं झाली व तीत देवगिरीच्या यादव राजाचा पराभव झाला. परंतु दक्षिणेंत पूर्ण सत्ता प्रस्थापित करणारा मुसुलमानी राजा महंमद बिनतचलख हा होय. पुढें बहामनी राज्य स्थापन झालें. बहामनी राजांनंतर मोंगल लोकांनीं दक्षिणेंत स्वाऱ्या सुरू केल्या व हल्ली जे निजाम हैद्राबादेस राज्य करीत आहेत त्यांचा मूळपुरुष असफझा हो होय. हा मोठा पराक्रमी व कावेबाज होता. यानेंच निझामुलमुल्क ही पदवी धारण करून व दिल्लीच्या बादशहाविरुद्ध बंड करून व खानदेशचा सुभेदार मुबारिझखान याचा बाकरखेर्डा (वऱ्हाड प्रांतांत बुलढाणा तालुक्यांत हें गांव आहे) या ठिकाणी पूर्ण पराजय करून हैद्राबाद येथें गादी स्थापन केली ('निझामउल्मुल्क' पहा). त्याचा वंश आजतागाईत चालू आहे. हल्लींचे निजाम सर उस्मान बहादूर फत्तेजंग, जी. सी. एस्. आय. हे आहेत. लो क व स्ती.--१९२१ सालीं हैद्राबाद संस्थानची लोकसंख्या  १२४७१७७० होती. बंदर, मेदक, गुलबर्गा, नालगोंडा, नांदेड, एलगंडल व रायचूर हीं दाट वस्तीची शहरें आहेत. ह्या संस्थानांत ८५ शहरें व २०१५१ खेडीं आहेत. मुख्य शहर हैद्राबाद. लोकसंख्या (१९२१) ४०४१८७ संस्थानांत तेलगू भाषा बोलणारे लोक शेंकडा ४६ मराठी भाषा बोलणारे शेंकडा २६, कानडी बोलणारे शेंकडा १४ व उर्दू बोलणारें शेंकडा १० आहेत. ह्या संस्थानांत मारवाडी, तामिळी, गोंड, लंबाडी किंवा वंजारी व इंग्लिश ह्या भाषाहि बोलणारे लोक आहेत. पण यांचे प्रमाण थोडें आहे. जा ती.-संस्थानांत एकंदर लोकांच्या जाती २१ आहेत व त्यांतहि अनेक पोटजाती आहेत. मुख्य शेतकरी वर्ग कुणबी लोकांचा आहे व त्याचें प्रमाण शेंकडा २६ ह्याप्रमाणें आहे. ह्या वर्गाच्या खालोखाल महार व मांग व तेलगु लोकांमध्यें ज्यांना माळ किंवा मादिग म्हणतात ह्यांचा वर्ग आहे व जरी ते अस्पृश्य गणले जातात तरी खेडेगांवांत त्याचें महत्त्व फार आहे. इतर जातीचे लोक म्हणजे ब्राह्मण, वैश्य, साळी, धनगर, कोरवा, वंजारी, वगैरे होत. ह्या संस्थानांत अनेक धर्माचे लोक आहेत. पण हिंदु व मुसुलमान लोकांचाच विशेष भरणा आहे. शेंकडा ८८.६ हिंदु धर्माचे लोक व १०.४ मुसुलमानी धर्मानुयायी लोक आहेत; हिंदु लोक व हिंदु धर्म ह्यांचा दिवसानुदिवस ऱ्हास होत चालला आहे. पण मुसुलमान व ख्रिस्ती लोक व त्यांचा धर्म ह्यांची सारखी वाढ होत चालली आहे एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ४६ लोक शेतकरीवर उपजीविका करतात. हयांपैकी शेंकडा ३२ लोक जमीनदार किंवा कुळें आहेत, ९ लोक शेतकरी-मजूरवर्गापैकी आहेत व शें. ५ लोक विशिष्ट पदार्थ उत्पन्न करणारे आहेत. शेंकडा ६ लोक खाजगी नोकरी किंवा घरकाम वगैरेवर गुजराव करणारे आहेत. व्यापार करून उदरनिर्वाह करणारे लोक शेंकडा ३.८ प्रमाणांत आहेत व निव्वळ स्वतंत्रपणानें  उद्योग करून राहाणारे लोक शेंकडा ३.७ किंवा सुमारें चार लक्ष आहेत. शे त की.-हैद्राबाद संस्थानांतली जमीन मुख्यत: दोन प्रकारची आहे; तेलंगण प्रांतांतील जमीन ही एक प्रकारची व मराठी मुलुखांतली जमीन दुसऱ्या प्रकारची. दोन्ही जमीनींत काळी माती, तांबडी माती, व वाळू किंवा काळ्या व तांबड्या मातीचें मिश्रण सांपडतें. ह्या दोन मुख्य प्रकारांखेरीज इतर जमीनीचे अनेक प्रकार आहेत. ह्या संस्थानातील मुख्य पिकें म्हटलीं म्हणजे ज्वारी, बाजरी, तीळ, कापूस, तूर व इतर कडधान्यें, ही सर्व खरीपाची पिकें होत व हरभरा, सातू, कापूस व लिंबुणी ही रब्बीची पिकें आहेत. मराठी मुलुखांत रब्बी व खरीप हीं दोनच पिकें तयार होतात पण तेलंगणांत आबी, ताबी (तांदुळाचीं पिकें). खराप, रब्बी, व माघी अशीं पांच पिकें होतात. संस्थानांतील जमीन अलीकडे बरीच लागवडीस आणली गेली आहे; परंतु तेलंगणांत अजून बरीच पडीत जमीन आहे. मराठी जिल्ह्यांतील सर्व पेरण्यालायक जमीन शेतीच्या कामाला लावली गेली आहे. मराठी मुलुखांत काळी भोर जमीन फार असल्यामुळें पाटबंधाऱ्यांची फारशी आवश्यकता नाहीं. पण तेलंगणांत तशी स्थिति नाहीं, त्यामुळें ह्या मुलुखांत पाटबंधारे काढून कालव्याच्या योगानें शेतास पाणी पुरविलें जातें. काहीं ठिकाणीं विहिरी तर कांहीं ठिकाणीं तळीं खोदलीं आहेत. व त्यामुळें शेतीस पाणी चांगलें मिळतें. ह्या संस्थानांत रयतवारी पद्धत आहे. जीं खेडीं ओसाड आहेत व जी निजाम सरकारनें लोकांस खंडानें दिली आहेत अशा खेडेगांवांत त्या जमीनीच्या मालकाला आपल्या कुळांकडून वाटेल तो सारा घेण्याचा अधिकार आहे. फक्त येवढीच अट आहे कीं, तो सारा पूर्वीच्या सरकारसाऱ्याहून जास्त नसावा. जं ग ल.-ह्या संस्थानांतील १८००० चौरस मैल जमीन जंगलानें व्यापिली आहे. जंगल तीन प्रकारचें आहे; राखून ठेवलेलें (५१८४ चौरस मैल). संरक्षित (४४०८ चौरस मैल) व खुलें (८३८७ चौरस मैल). क ला व उ द्यो ग धं दे.--ह्या संस्थानांत प्रत्येक तालुक्यांत लुगडीं, धोतरें, खादीचें कापड वगैरे कापड तयार करण्याचे कारखाने आहेत. व हें कापड हातमागावर तयार होत असल्यामुळें तें गिरणींतल्या कापडापेक्षां जास्त टिकाऊं असतें. रेशमी लुगडीं व इतर रेशमी कापड हीं नालगोंडा, रायचूर, महबूवनगर, औरंगाबाद, इंदूर, एलगंडल वगैरे जिल्ह्यांत तयार होतात. हें फार टिकाऊ व उच्च दर्जाचें कापड असतें. औरंगाबाद व पैठण हीं दोन शहरें पुरातन कालापासून नकशीचें काम व सोनेरी व रुपेरी कलाबूतीचें काम ह्याबद्दल प्रसिद्ध आहेत. पण त्यांतल्यात्यांत हीं दोन्ही कामें औरंगाबाद येथें विशेष होतात. अलीकडे हिन्नू नांवाचें कापड बरेंच व चांगल्या तऱ्हेनें निघतें व हें गर्भरेशमी असतें. ह्याचा हा विशेष आहे कीं, हें धुतलें तरी खराब होत नाहीं. जरतारी कापड हें औरंगाबाद व वैजापूर येथें तयार होतें. टसर नांवाचें रेशीम हें लुगडी, उपरणीं तयार करण्यांत वापरलें जातें व हें रेशीम एलगंडल जिल्ह्यांत नारायणपेठ व महादेवपूर येथें तयार होतें. वरंगळ हें पूर्वी लोंकरी व रेशमी गालिजे तयार करण्याबद्दल प्रसिद्ध होतें. परंतु निळीच्या रंगाचा शोध लागल्यापासून ह्या गालिच्यांच्या धंद्याला बराच धक्का बसला आहे. गुलबर्गा व वरंगळ ह्या ठिकाणच्या तुरुंगांत उत्तम सतरंज्या होतात. औरंगाबाद येथें रुप्याची भांडीं व रुप्याचें दागिनें उत्तम तयार होतात. एवढेंच नाही तर सोनेरी तारेचीं कामेहिं चांगली होतात. बेदरलाहि पलंगाचें खांब, भांडीं, पानाचें डबे तरवारीच्या मुठी वगैरे सुरेख जिनसा तयार होतात. ह्याच संस्थानांत पूर्वी तरवारीचीं पाती व रतर हत्यारें तयार होत असत, पण हल्लीं हा धंदा बसत चालला आहे. पोलीस लोकांच्या उपयोगी अशा लहान लहान बंदुकाहि तयार होत असत. संस्थानच्या बऱ्याच भागांत सरकी काढण्याच्या व कापसाचें गठ्ठे बांधण्याच्या गिरण्या आहेत. ह्या संस्थानांतून बाहेर जाणारा माल म्हणजे धान्यें , कापूस, जवस तीळ, भुईमूग, एरंडी, नीळ, तेलें, इमारतीचें लांकूड , कापड, कातडीं, गुरें व कोळसा हें होत. आयात माल म्हटला म्हणजे गिरणीचें कापड, लोंकरीचें सूत, कच्चे रेशीम, मीठ, शुद्ध केलेली साखर, सुपारी,घोडें गुरें, सोनें, रुपें, तांबें व पितळ व पितळेचीं भांडीं, लोखंड, इमारतीचें लांकूड, राकेल, अफू इत्यादि. या संस्थानांत आयात व निर्गत मालावर जकात बसविण्याकरतां कांहीं नाकीं आहेत. परदेशच्या व्यापारापेक्षां देशांतला व्यापार आधिक चालतो. माल बाहेर पाठविण्यापूर्वी ठिकठिकाणीं उत्पन्न झालेला माल कांहीं ठराविक ठिकाणीं गोळा केला जातो व आंत आलेला मालहि ह्या ठिकाणांहून संस्थानच्या निरनिराळ्या भागांत वाटला जातो. ब्रिटिश मुलुखांतून येणारा माल हा बहुतेक रेल्वेनें संस्थानांतल्या मुख्य स्टेशनांवर किंवा रेल्वे नसेल तर बैलगाडयांच्या योगानें किंवा बैल, घोडे वगैरे जनावरांच्या पाठीवरून आणला जातो. मुंबईहून येणारा माल हा जी आय. पी. रेल्वेनें व मद्रासकडून येणारा माल सर्दन मराठा रेल्वेनें येतो. द ळ ण व ळ णा चें मा र्ग.-ह्या संस्थानच्या नैॠत्येकडल्या भागांतून मुंबईपासून मद्रासला जाणारी लाईन जाते व हा कोपरा १३७ मैल आहे. ह्या मैलांपैकीं १२० मैलांतून ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वे जाते व बाकींच्या मैलांतून मद्रास रेल्वे जाते. ह्या रेल्वे लाईनची लांबी ३३० मैल आहे. हैद्राबाद-गोदावरील व्हॅली रेल्वेची एक शाखा मनमाड पासून हैद्राबादपर्यंत जाते व ह्या दोन स्थलांतर अंतर ३९१ मैल आहे. एकंदरीत संस्थानांत ४७१ मैल ब्रॉड गेज आहे. बार्शी लाईट रेल्वे लातूरपर्यंत जाते. सडका फारशा चांगल्या नाहींत. रा ज्य शा स न प द्ध ति.-संस्थानांत निझाम हा सर्व सत्ताधारी असून प्रजाजनांचें सर्व जीवित त्याच्याच हातीं असतें. १९१९ सालीं जी नवीन राज्यपद्धति अंमलांत आली त्याअन्वयें एक कार्यकारी मंडळ स्थापण्यांत आलें आहे. त्यांत आठ सभासद असतात. अध्यक्ष निझामानें नेमलेला असतो. संस्थानांत १५ जिल्हाबोर्डे व १०३ तालुका बोर्डे आहेत. २३ सभासदांचें एक कायदेमंडळ असतें. सभासदांपैकीं १५ सरकरी व ८ बिनसरकारी असतात. सरकारचें स्वत:चें चलन आहेत तसेंच स्वत:चें पोष्ट आहे सैन्यांत सुमारें २०००० शिपाई आहेत. याखेरीज इंपीरियल सर्व्हिस ट्रप्स आहेत. १९२०-२१ सालीं संस्थानचें उत्पन्न ५ कोटी ४ लाख व खर्च ४ कोटी ३८ लाख होता. का व दा व न्या य.-१८७० सालीं पहिला सर सालरजंग यानें ब्रिटिश हिंदुस्थानांत पास केलेल्या कायद्यांच्या धर्तीवर संस्थानाकरितां कायदे करण्याकरितां मुसुलमान कायदेपंडितांचें एक मंडळ नेमिलें. पुढें एक कौन्सिल ऑफ स्टेट ज्याचें सभासद संस्थानांतले मुख्य सरदार होते व अध्यक्ष खुद्द निजाम साहेब होते-हेंच एक कायदे करणारें मंडळ बनलें  व त्याला मदत करण्याकरितां म्हणून व कायद्यांचा कच्चा खर्डा करण्याकरितां म्हणून एक खास कमिटी निवडली गेली. सन १८९० साली एक लॉ कमिशनची नेमणूक झाली व त्याचा मुख्य हेतु संस्थानांतल्या जुन्या कायद्यांची दुरुस्ती करणें व नवीन कायदे तयार करणें हा होता. सन १८९३ मध्यें कायदे करण्याकरितां एक लेजिस्लेटिव्ह कौन्सिल स्थापन झालें व १८९४ सालीं त्याच कौन्सिलांत लोकांनां आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना अप्रत्यक्ष रितीनें कायदे करण्याच्या हक्क मिळाला. प्रत्येक कायद्याच्या मसद्यावर लोकमत काय आहे हें समजून घेण्याकरितां तो मसुदा प्रथम स्टेट गॅझेटमध्यें प्रसिद्ध होतो. व प्रत्येक मसुदा तयार करण्याच्या वेळीं मुसुलमानी कायदा, हिंदु शास्त्रें व ब्रिटिश हिंदुस्थानांतील कायदा ह्यांची मदत घेतली जाते. ह्या संस्थानांत हायकोर्ट धरून १२३ सिव्हिल कोर्टे व २७१ फौजदारी कोर्टे आहेत. शि. क्ष ण.-संस्थानांत गांवठी शाळा पुष्कळ आहेत. व ह्या शाळांत लिहिणें, वाचणें व थोडेसें गणित हे विषय शिकवितात पहिली इंग्रजी शाळा एका मिशनऱ्यानें व पहिल्या अरबी व फारसी शाळा अमीर –इ-का वीर ह्यानें स्थापन केल्या. १८५४ सालापासून सरकारनें शिक्षणाचें काम हाती घेतलें. हल्लीं शाळाखातें हें डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन यांच्या ताब्यांत आहे. हैद्राबादेस उस्मानिया युनिव्हर्सिटी असून उर्दू भाषेंतून सर्व विषयांचे उच्च शिक्षण दिलें जातें. हैद्राबादचें निजाम कॉलेज, औरंगाबाद कॉलेज (दुय्यम प्रतीचें) व दार-उल-उलम (पौरस्त्य विद्येचें कॉलेज) अशीं तीन कॉलेजें आहेत. त्यापैकीं पहिलें मद्रास युनिव्हर्सिटीला जोडलें आहे. १९२१-२२ सालीं संस्थानांत ४३६५ प्राथमिक शाळा होत्या. ह्याशिवाय हैद्राबादला एक इंजिनिअरिंग स्कूळ १८९६ मध्यें स्थापन झालें; १८९९ सालीं एक लॉस्कूल निघालें व नंतर एक मेडिकल स्कूल स्थापन झालें. ह्याशिवाय ट्रेनिंग कॉलेजे औद्योगिक शाळा व संस्कृत पाठशाळा अशा इतर शिक्षणसंस्था आहेत. रा ज धा नी.-हैद्राबाद शहर कृष्णेस मिळणाऱ्या मुसा नदीच्या उजव्या तीरावर आहे. हें मुंबईपासून ४९२ मैल, समुद्रापासून ५३३ मैल व कलकत्त्यापासून ९८७ मैल आहे. ह्या शहरची लोकवस्ती १९२१ सालीं ४०४१८७ होती. हें शहर १५८९ सालीं महमद कुली नांवाच्या पाचव्या कुतुबशाही राजानें स्थापन केलें. ह्याचे पहिलें नाव भागानगर असें होतें. पण मागाहून त्याचें नांव हैद्राबाद असें ठेविलें. १६८७ सालीं हें शहर मोंगल लोकांनीं प्रथम काबीज केलें व नंतर निजामउलमुल्कानें तें राजधानीचें शहर केलें. ह्या शहराभोंवतीं एक मोठी दगडी भिंत आहे व तिला बुरूज व खिडक्या असून तर समांतभुजचौकोनाकृति आहे. ह्या शहरांत उत्तम इमारती बऱ्याच आहे व त्या सर्वांत चारमिनार नांवाची इमारत अत्यंत प्रेक्षणीय आहे. त्याचप्रमाणें इतर इमारती म्हटल्या म्हणजे चार कमान, चारसूका हौज, दार-उस्-शिफा, अशुरखाना, गोषा महाल, जान मशीद, मक्का मशीद, वगैरे आहे. यापैकीं बहुतेक इमारत सुलतान महमद कुली कुतुबशहा यानें बांधिलेल्या आहेत. त्यानें इमारतीवर ३० लाख रुपये खर्च केले. अलीकडे ज्या नवीन इमारती बांधल्या आहेत त्यांत निजान सरकारचे राजवाडे प्रेक्षणीय आहेत. शहराच्या आसपासची जीं खेडीं आहेत त्यांपैकी कांही मुसा नदीच्या पलीकडे आहेत. ब्रिटिश रेसिडेन्सी मुसा नदीच्या डाव्या तीरावर वसली आहे व ही इमारत दिसण्यात मोठी भव्य असून विस्तृत अशा पटांगणांवर उद्यानवेष्टित अशी आहे. ह्या रेसिडेन्सीभोंवतीं पुष्कळ बाजार आहेत. व तेथेंच एक मोठें पोस्ट ऑफीस आहे. ह्या शहरांत दोन मोठीं तळीं आहेत; हुसेनसागर व मीरअलम् ह्या दोन तळयांच्या योगानें सर्व शहर व आसपासचीं खेडी यांनां मुबलक पाणी मिळतें. ह्या शहरांत एक विश्वविद्यालय, तीन कॉलेजें, अनेक इंग्रजी व देशी शाळा, रोमन कॅथोलकि चर्च, सार्वजनिक उद्यानें, हायकोर्ट, स्मॉल काजेस कोर्ट, मॅजिस्ट्रेट कोर्ट, कोठी वगैरे संस्था आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .