प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
             
हेल्महेल्टझ, हर्मन (१८२१-१८९४)- एक जर्मन तत्त्ववेत्ता आणि शास्त्रज्ञ. अल्पवयांतच त्यानें आपली बुद्धि गणितांत प्रावीण्य संपादण्याकडे लावली. पण गरीबीमुळें त्याला शास्त्रीय शिक्षणक्रम घेतां आला नाहीं. तेव्हां तो प्रशियन सैन्यांत शास्त्रवैद्य झाला. १८४२ सालीं त्यानें एक शास्त्रीय निबंध लिहिला. या निबंधांत त्यानें असें सिद्ध केलें कीं, एका जातीच्या मज्जातंतूच्या पेशी असतात. हा त्याचा पहिला शोध होय. या वर्षापासून तों १८९४ सालापर्यंत त्याचें असें एकहि वर्ष गेलें नाहीं कीं, ज्या सालांत त्यानें कसला तरी एखादा शोध लावला नाहीं, या शोधांपैकीं कित्येक शोधांनीं शास्त्रज्ञमंडळांत मोठी विचारक्रांति घडवून आणली आहे. इसवी सन १८४२ ते १८४९ पर्यंत तो बर्लिन येथें राहिला. नंतर त्याला कोर्निग्जबर्ग येथील इंद्रियविज्ञानशास्त्राच्या प्रोफेसराची जागा मिळाल्यामुळें तो तिकडे गेला; तेथें तो सुमारें ६ वर्षे राहिला नंतर त्यानें बान येथील अध्यापकाची जागा स्वीकारली. यानंतर तो एकदोन ठिकाणीं प्रोफेसरांचें काम करीत होता. सन १८७१ मध्यें त्याला बर्लिन येथील पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रोफेसरांची जागा मिळाली. पुढें १८८७ सालीं वरील जागेखेरीज चार्लोटनबर्ग येथील पदार्थविज्ञानाविषयक कलाभुवनाच्या डायरेक्टरची जागा त्याला दिली. ता. ८ सप्टेंबर १८९४ रोजीं त्याचा मृत्यू होईपर्यंत तो या दोन्ही जागांवर काम करीत होता. इंद्रियविज्ञानशास्त्र, इंद्रियविज्ञानविषयक दर्शनशास्त्र इंद्रियविज्ञानविषयक श्रवणशास्त्र, रसायनास्त्र, गणितशास्त्र, विद्युच्छास्त्र, चुंबकशास्त्र, पवनशास्त्र आणि सिद्धन्तविषयक यंत्रशास्त्र इतक्या शास्त्रांत हेल्पहोल्ट्झ यानें शोध लावले आहेत. पदार्थाची विकृति होणें आणि पदार्थ सडणें यांविषयी व त्यांच्या कारणांचीहि माहिती त्यानें अगदीं अल्पवयांत उपलब्ध केली. त्यानें प्राणिज उष्णतेचें परिमाणविषयक मापन केलें. प्राणिज विद्युल्लतेची माहिती मिळविण्याच्या कामांत तो प्रथमत: पडला. तसेंच स्नायूच्या संकोचाविषयीं माहिती त्यानें उपलब्ध केली. त्यानें बर्लिन येथील पदार्थविज्ञानाच्या संस्थेंत शक्तिनित्यत्वाचा एक निबंध १८४७ सालीं वाचून दाखविला; या निबंधानें फार मोठी विचारक्रान्ति घडून आली; व शक्तिनित्यत्वाचा नियम प्रस्थापित होण्यास या निबंधाची अत्यंत मदत झाली. १८५१ सालीं आप्थाल्मोस्कोप नांवाचें यंत्र यानें शोधून काढलें; या यंत्राचा उपयोग चिकित्साशास्त्रांत उत्तम प्रकारें होतो. इंद्रियविषयक नेत्रशास्त्रांत हेल्महोल्ट्झ यानें अनेक शोध प्रसिद्ध केले. डोळयांतील लेन्सांचें वक्रत्व त्यानें मोजलें; व लेन्सांचें वक्रत्व कमजास्त कसें होतें हें त्यानें दाखवून दिलें; रंग कां दिसतात. याचे कारण त्यानें स्पष्ट करून सांगितलें; विशेषत: थामस यंग या शास्त्रज्ञाच्या त्रिरंगात्मक सिद्धांताचा त्याने पुरस्कार केला; व वर्णान्धतेविषयी खुलासा केला. ''फिजिऑलॉजिकल ऑप्टिक्स'' नांवाचें एक फार महत्त्वाचें पुस्तक त्यानें (१८५६-६६) प्रसिद्ध केलें आहे. इंद्रियविमान विषयक श्रवणशास्त्रांत त्यानें याप्रमाणेंच पुष्कळ शोध लावले आहेत. त्यानें कर्णान्तर्गत निरनिराळ्या भागांची विशिष्ट कार्ये दाखवून दिली. मनुष्यास स्वरविशिष्टत्व कसें समजतें हें त्यानें समजावून सांगितलें; हा त्याचा एक फार महत्त्वाचा शोध आहे. सुरासंबंधानें त्यानें पुष्कळ माहिती उपलब्ध केली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यानें पुढील गोष्टींविषयीं माहिती उपलब्ध केली आहे. (१) शक्तिनित्यत्व, (२) जलगतिशास्त्र, (३) विद्युव्द्तिशास्त्र, (४) पवनशास्त्रविषयक पदार्थविज्ञानशास्त्र, (५) दर्शनशास्त्र, व (६) गतिशास्त्रविषयक तात्त्वि विचार. या सर्व विषयांत त्यानें महत्त्वाचें शोध लावले. शेवटीं शेवटीं या शोधकानें यंत्रशास्त्राकडे मोर्चा वळविला. भौतिक शास्त्राखेरीज हेल्महोल्टाझ यानें तत्त्वज्ञान  आणि सौंदर्यशास्त्र या विषयावर लेख लिहिले आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .