प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
            
हिस्सार, जि ल्हा.- पंजाब, अंबाला विभागांतील एक जिल्हा हा जिल्हा बिकानेरच्या अरण्यालगत असल्यामुळे पंजाबपेक्षां राजपुतान्याशींच या जिल्ह्यांचे बरेंच साम्य आहे या जिल्ह्यांत माळरान बरेंच आहे. ठिकठिकाणीं अरवली पर्वताचे तुटलेले भाग आहेत. जिल्ह्यांतील बहुतेक जमीन पुळणीचीच बनलेली आहे. या जिल्ह्यांतील ईशान्येकडील भागाचें वरच्या गंगथंडीशीं वनस्पतीच्या  बाबतींत बरेंच साम्य आहे. दक्षिणेकडील भाग राजपुतान्याशा व शिरसा पोटविभाग पश्र्चिम पंजाबशीं बराच जुळतो. या जिल्ह्यांत हवा अतिशय कोरडी असल्यामुळें निरोगी आहे. या जिल्ह्यांत उन्हाळा व हिवाळा दोन्ही कडक असतात. पाऊस १४ इंच पडतो. इ ति हा स.-जिल्ह्याच्या बऱ्याच मोठ्या भागास पूर्वी हरिआना हें नांव होतें. हा भाग पूर्वी सुपीक होता. व या भागाची राजधानी हंसी (पहा) हें शहर होतें. या जिल्ह्यांत ८ व्या शतकांत प्रथम तोमार रजपूत आले व नंतर चव्हाणवंशी लोक आले. १०३६ सालीं गझनीचा महंमद याचा मुलगा मसाऊद यानें हें शहर घेतलें व जरी कांहीं काळ तें रजपुतांच्या ताब्यांत होतें तरी पृथ्वीराजाचा पराभव झाल्यावर तें दिल्लीच्या राज्याचा एक भाग होऊन बसलें. १८ व्या शतकापर्यंत हा भाग मुसुलमानी अमदानींत भरभराटीस आला होता व याच भागांतून तैमूरलंगाची स्वारी दिल्लीकडे वळली होती. १८ व्या शतकांत या भागावर मूळचे रजपूत पण मुसुलमानी धर्माची दीक्षा घेतलेल्या जोहिय व भट्टी या लोकांचा अंमल बसला. १७०७ सालीं औरंगझेब बादशहा मृत्यू पावल्यावर हा भाग नबाबशहा दाऊदखान याच्यां अंमलाखाली गेला व त्यावेळीं या भागाची अत्यंत भरभराट झाली, पण १७३९ सालीं नादीरशहानें या भागाची धूळधाण केली. दिल्लीच्या बादशाहीचे तुकडे झाल्यावर हा भाग म्हणजे शीख लोक, लुटारू भट्टी लोक व दिल्लीच्या बादशहानें सैन्य यांचें रणक्षेत्र होऊन बसला. व कांहीं काल या भागाची वाटणी या तीन पक्षांमध्यें झाली. पण १८०२ सालीं हा मुलुख शिंदे सरकारच्या ताब्यांत गेला. परंतु १८०३ साली शिंद्यानें  कंपनीसरकारबरोबर तह केल्यामुळें हिस्सार व सिरसा हे मुलूख इंग्रजांकडे गेले व एक दोन लढाया झाल्यावर १८१८ साली भट्टी सरदार पूर्णपणे शरण आले. व इंग्रजांची सत्ता पूर्णपणे प्रस्थापित झाली. पुढें जरी कांही वर्षे यावर शीख लोकांची सत्ता होती तरी १८४३ च्या सुमारास हा भाग इंग्रज सरकारच्या पूर्णपणें ताब्यांत गेला व या भागाला भट्टीयाना जिल्हा हें नांव दिलें गेलें. व १८४४, १८४७ व १८५५ सालीं नवीन मुलूख या जिल्ह्यांत समाविष्ट केले. पुढें १८५७ च्या बंडानंतर या जिल्ह्यांत बरेच फेरफान झालें. लो क सं ख्या.-हिस्सार जिल्ह्यांत चार शहरें व ९६१ खेडीं आहेत. १९२१ सालीं येथील लोकसंख्या ८१६८१० होती. या जिल्ह्याचे हिस्सार, हंसी, भिवानी, फताहाबाद व सिरसा असे पांच तालुके आहेत. या जिल्ह्यांत हिंदु लोक शेंकडा ७०; त्यांच्या खालोखाल मुसुलमान व त्यानंतर शीख लोक आहेत. येथें हरियानी, बांग्रु किंवा देसवाली, पंजाबी व वाग्री या भाषा प्रचारांत आहेत. जिल्ह्यांतील जमीदार लोक जाट असून एकंदर लोकसंख्येपैकीं १/४ लोक ते आहेत. पाटबंधाऱ्यानें भिजणारी जमीन सोडून दिली तर बाकीच्या बहुतेक भागांत पावसाळी पिकांशिवाय इतर फारशीं पिकें होत नाहींत. म्हणून ह्या जिल्ह्यांत जर पाऊस पडला नाहीं तर दुष्काळ ठरलेलाच आहे. येथील मुख्य पिकें म्हणजे कापूस, गहूं, हरभरा, जवस ऊंस, मका व कांहीं भागांत तांदूळ हीं होत. गुराच्या उत्तम निपजेबद्दल या जिल्ह्याची ख्याति आहे. येथें पश्र्चिमयमुना कालवा, घग्गर कालवे व सरहिंद कालवा असे कालवे आहेत. व्या पा र व द ळ ण व ळ ण.-जिल्ह्यांत उद्योगधंदे महत्त्वाचे नाहींत. जाडे भरडें कापड चोहोंकडे तयार होतें. येथें कापसाची सरकी काढण्याच्या व कापूस दाबण्याच्या गिरण्या आहेत. भिवानी येथें, तांबे, पितळ व कांसें ह्यांची मांडी व कोरलेले दरवाजे उत्तम तयार होतात. ह्या जिल्ह्यांत व्यापाराचीं मुख्य ठिकाण म्हणजे भिवानी, हंसी, हिस्सार, बुधलाड व सिरसा हीं शहरें  होत. ह्या जिल्ह्यांतून राजपुताना-माळवा रेल्वेची रेवारी-भटिंडा शाखा जाते व सदर्न पंजाब रेल्वे बुधलाड, जाखल, तोहना ह्या भागांतून जाते व जोधपूर-बिकानेर रेल्वे ही शिरसा तहशिलींतून जाते. व त ह शी ल.-हिस्सार जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ८१०३ चौरस मैल आणि लोकसंख्या (१९२१) १३६२७२. ह्या तहशिलीत मुख्य ठिकाण हिस्सार शहर व १३५ खेडीं आहेत. तहशिलीच्या उत्तर भागांत खुलें मैदान असून तें हरियानाचा भाग आहे. श ह र.-हिस्सार जिल्हाचें मुख्य ठिकाण. हे राजपुतानामाळवा रेल्वेच्या रेवारी भटिंडा शाखेवर आहे. लोकवस्ती (१९०१) १७६४७. हें शहर फिरोजशाहा तुबळक यानें १३५६ सालीं स्थापिलें व हल्लीं पश्र्चिम यमुना कालवा ह्या नांवानें प्रसिद्ध असलेल्या कालव्याच्या योगानें ह्या शाहरास पाण्याचें सुख आहे. १४०८ सालीं हे महंमद तुघलखानें पुन्हां जिंकून परत घेतलें. हें शहर बाबरच्या स्वारीच्या वेळीं शिबंदीचें ठाणें होतें. व पुढें मोंगल अमदानींत सरकारचें मुख्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतें. ह्या शहरांस शीख लोकांनी  वारंवार त्रास दिला. पुढें १८०३ सालीं हे शहर इंग्रजांच्या ताब्यांत गेलें. तेव्हांपासून ह्या शहराची भरभराट होऊं लागली. येथें ऐतिहासिक दृष्टया फिरोजशाहानें बांधलेला किल्ला महत्त्वाचा आहे. ह्याशिवाय गुजरातच्या लढाईंत हुमायूमचे जे सरदार पडले त्यांची थडगीं येथें आहेत. येथें म्युनसिपालिटी आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .