प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
             
हिलटिप्पेरा, सं स्था न.- बंगाल, एक देशी संस्थान. टिप्पेरा जिल्ह्याच्या पूर्वे हें संस्थान आहे. क्षेत्रफळ ४११६ चौरस मैल. या संस्थानच्या उत्तरेस व दक्षिणेस एकापेक्षां एक जास्त उंचीच्या पर्वतांच्या सहा रांगा आहेत व त्यांवर बांबूची बेटें असून पायथ्याशीं सागाचीं झाडें आहेत. या पर्वतश्रेणीतूनच खोदाई, दोलाई, मनु जुरी, वगैरे नद्यांचा उगम आहे व या नद्यांच्या योगानें जलपर्यटन करणें सोयीचें झालें आहे. ह्या संस्थानांतील गोमती नदीच्या मुखाजवळ एक डुंबुरा नांवचा धबधबा आहे. हवा आरोग्यकारक असून उष्णतेचें मान बेताचें आहे. येथें पाऊस ७५ इंच पडतो. इतिहास.--या संस्थानचें नांव टिप्पेरा (त्रिपुर) असें कां पडलें हें सांगणें कठिण आहे. 'राजमाला' नांवाच्या बंगाली काव्यांत या संस्थानाबद्दल पौराणिक कथा आहे. तींत असें म्हटलें आहे कीं, चंद्रवंशी ययाति राजापासून हें टिप्पेरा राजघराणें सुरू झालें. हें राजघराणें शिवोपास होतें. या संस्थानावर मुसुलमानांची स्वारी प्रथम १२७९ सालीं झाली. सोळाव्या शतकामध्यें या संस्थानच्या राजांनीं मोठे पराक्रम केले. १७६४ सालीं ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताची दिवाणी मिळाली तेव्हां कंपनीसरकारनें  टिप्पेरा संस्थानच्या गादीवर एक राजा बसविला. १८०८ सालापासून प्रत्येक राजा गादीवर बसण्यापूर्वी इंग्रज सरकाराकडून परवानगी काढावी लागते. ह्या संस्थानचा हल्लींचा राजा वीरविक्रमकिशोरदेव हा आहे. हा अल्पवयी सऊन १९२३ सालीं गादीवर आला. वर्मनमणिक्य बहाद्दर ही पदवी या संस्थानच्या राजांना १२७९ सालीं गौरच्या राजानें प्रथम दिली. येथील संस्थानिक रोशेनबादचा जमीनदारहि आहे. या जमीनदारीचें क्षेत्रफळ ५७० चौरस मैल असून उत्पन्न संबंध टिप्पेरा संस्थानच्या उत्पन्नापेक्षां जास्त आहे. हें संस्थान व ही जहागीर यांची बिलकुल फारकत होऊं नये असेंहि ठरलें आहे. संस्थानच्या वारसा हक्काबद्दल आजपर्यंत वारंवार तंटे झालेले आहेत. म्हणून १९०४ सालीं सरकारनें कांहीं नियम ठरवून दिले. लो क व स्ती.-संस्थानची लोकसंख्या १९२१ सालीं ३०४४३७ होती. संस्थानांत अगरतला नांवाचें एक शहर व १४६३ खेडीं आहेत. येथें शेंकडा ४४ लोक टिप्पेरा किंवा मृंग भाषा बोलतात व शेंकडा ४० लोक बंगाली भाषा बोलतात. येथें हिंदु लोक शेंकडा ६९ व मुसुलमान २६ व बौद्ध लोक शेंकडा तीन आहेत. टिप्पेराचे लोक मूळचे मोंगोलियन वंशाचे आहेत. या लोकांचा धर्म निकृष्ट हिंदुधर्म आहे. पूर्वी येथें नरमेधाची चाल होती. यांच्या लग्नाच्या चालीहि विचित्रच आहेत. एखाद्या युवकाला जर कुमारिकेशीं लग्न लावावयाचें असेल तर त्यानें आपल्या भावी सासऱ्याच्या घरीं तीन वर्षे राहून तेथें नोकरी करून उमेदवारी केली पाहिजे. बालविवाह थोडे होतात. शे त की, व व्या पा र.-येथें तांदूळ, ताग, तंबाखू, ऊंस, मिरच्या, कांदे वगैरे पिकें होतात. येथें हलक्या प्रतीचें कापड तयार होते. येथील निर्गत माल कापूस, लांकूड, तीळ, बांबू व आयात माल मीठ, राकेल, तंबाखू व विलायती माल हा होय. रा ज्य का र भार.- या संस्थानचा कारभार अगरतल्याचा प्रधान पाहतो व त्याच्या मदतीस दिवाण व इतर कामगार असतात. हल्लीं महाराज अल्पवयी असल्याकारणानें एक मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवितें. या संस्थानचे सात विभाग असून प्रत्येक विभागावर मॅजिस्टेट कल्टेक्टर असतो व तो न्यायखात्याच्या बाबीखेरीज इतर सर्व व्यवस्थेबद्दल प्रधानाला जबाबदार असतो. मुख्य कोर्ट म्हणजे 'खास अपिलेट कोर्ट' हें आहे. व त्यांत तीन न्यायाधीश बसतात. या कोर्टाच्या खालोखाल इतर सामान्य कोर्टें असतात व त्यांवर एकेक न्यायाधीश असतो. या संस्थानचें उत्पन्न सुमारें १४ लाख रू. आहे. येथें शिक्षण फारसें नाहीं. शेंकडा २.३ लोक साक्षर आहेत. संस्थानांत कॉलेज, एक हायस्कूल, बऱ्याच प्राथमिक शाळा, एक धंदे शिक्षणाची शाळा अशा संस्था आहेत. येथें शिक्षण मोफत आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .