प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
               
हिमालयपर्वत- हिंदुस्थानाच्या उत्तरेस असलेल्या प्रचंड पर्वतश्रेणीस हें नांव आहे. सर्व पृथ्वीभर ह्या पर्वतांची जितकीं उंच शिखरें आहेत तितकी कोठल्याहि पर्वतांची नाहींत. पूर्वीचे भूगोलवेत्ते ह्या पर्वतास हमाँस, हिमॉस किंवा हिमोदास ह्या नांवानें संबोधित असत. शिकंदर हुबादशहाबरोबर जो ग्रीक लोक येथें आले ते ह्या पर्वतास हिंदुस्थानचा काकेशस पर्वत ही संज्ञा देत असत. ह्या पर्वताची वायव्यं मर्यादा सिंधू नदी समजली जाते. काश्मीरमधल्या, गंगापर्वताच्या शिखरापासून हिमालयपर्वत पूर्वेकडे वीस रेखांशपर्यंत पसरलेला आहे. व कविकुलमुकुटमणि कालिदासानें पृथ्वीचा मानदंड असें जें नांव ह्या पर्वतास दिलें आहे ते सर्वस्वी यथार्थ आहे. हा पर्वत इतका प्रचंड आहे कीं, ह्याच्या एकतृतीयांश भागाचाच शोध आजपर्यंत लागला आहे. अगदीं वायव्येकडील बाजूस काश्मीर व जम्मू ह्या दोन देशांचा अर्धा अधिक भाग हिमालयपर्वतांत आहे. दुसरा भाग म्हणजे पंजाबांतील होय व ह्या भागांत कांग्रा जिल्हा व सिमला पर्वतांतील संस्थानें समाविष्ट झाली आहेत. ह्या भागाच्या पूर्वेस संयुक्त प्रांतांतील कुमाऊन भाग व तेऱ्ही संस्थान हीं आहेत. ह्या भागाबद्दल आतां नवीन माहिती बरीच उपलब्ध झालेली आहे. ५०० मैलपर्यंत ह्या हिमालय पर्वतांत नेपाळ संस्थान गडप झालें आहे. हल्ली जी माहिती मिळाली आहे तीवरून असें दिसतें की, हिमालयाच्या पश्र्चिम भागाचे तीन भाग होतात व मधल्या भागांत अत्यंत उत्तुंग शिखरें आहेत, तरी ह्या पर्वतश्रेणीपासून नद्या उगम पावत नाहींत व ही श्रेणी जलविभाजक क्षेत्र नाहीं. ह्या श्रेणीच्या उत्तरेस दुसरी श्रेणी आहे. ती श्रेणी हिंदुस्थान व तिबेट ह्या दोन देशांची मर्यादा गणली जाते व हीच जलविभाजक आहे. मुख्य मध्यावर असलेल्या श्रेणीनंतर कांहीं पर्वतशृंगे आग्नेय दिशेकडे पसरलेली आहेत व ह्यांनां बर्हिमुख हिमालय असें नांव देतां येईल. ही शृंगें दक्षिण दिशेस एकदम अदृश्य होतात. तरी सरासरीनें ह्यांची उंची ८००० किंवा ९००० फूट आहे. या बहिर्मूख हिमालयापासून अलग झालेली आणि थोड्या थोड्या कमी उंचीची श्रेणी म्हणजे शिवालिक पर्वतश्रेणी होय व ती नेपाळांत सुद्धां दिसते. ह्या पर्वतावरील चिरकाल हिमरेषा १५००० पासून १६००० फूट असते. हिवाळयांत पश्र्चिमेकडील बाजूला ५००० फूट उंचीवर बर्फ पडतें. हिमनद्या या मर्यादेच्या खालीं १२००० फुटांवरून वाहूं लागतात. व ह्या हिमनद्यांवरच उत्तर हिंदुस्थानचें जीवित अवलंबून आहे. ह्या भागाच्या भरभराटीसहि हेच नद्यांचे प्रवाह कारण आहेत. उत्तरहिंदुस्थानांतील सर्व नद्यांची जन्मभूमिक म्हणजे हिमालयपर्वत होय. ह्या पर्वताची मुख्य शृंगे म्हणजे नंगापर्वत (२६१८२ फूट उंच), नंदादेवी (२५६६१ फूट), त्रिशूल (२३३८२ फूट), पंचचुल्ही (२२६७३ फूट), नंदाकोट (२२५३८ फूट), गौरीशंकर  (२९००२ फूट), धवलगिरी (२६८२६ फूट), गोसइस्थान (२६३०५ फूट), कांचनगंगा (२८१४६ फूट), वगैरे होत.

लो क.- ह्या भागांमध्यें बाहेरचे लोक येऊन राहणें शक्य नसल्यामुळें व प्रवास करणेंहि जवळ जवळ अशक्य असल्यामुळें ह्या ठिकाणीं जी माणसें दिसून येतात तीं विचित्रच असतात. सामान्यत: दोन प्रकारची मनुष्यें आपणांस ह्या ठिकाणीं आढळतात. काश्मीरमधल्या लडाखपासून भूतान पर्यंत दिसून येणारी माणसें इंन्डो-चायनी वंशांचीं आहेत. त्यांची भाषा जवळ जवळ तिबेटी व धर्म बौद्ध आहे. हिमालयाच्या पश्र्चिमेकडील भागांस व सिक्कीम, दार्जिलिंग व भूतान ह्या देशांत बौद्ध धर्माची छाप उत्तम आहे. तरी पण येथील लोकांच्या, आकाश नदी, पर्वत, वगैरेबद्दलच्या ज्या अजाण कल्पना आहेत. त्या कल्पनांनीं हा धर्म दूषित झाला आहे. मुसुलमान लोकांनीं ह्या भागांत येऊन लोकांनां जिंकून आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण ह्या भागांतल्या नैसर्गिक अडथळ्यापुढे व लोकांच्या शौर्यापुढें त्यांनां हात टेकांवे लागले. पुढें तिबेटाच्या एका धाडशी शिपायानें मुसुलमानी धर्म स्वीकारून आपली सत्ता प्रस्थापित केली. १४ व्या शतकांत सुलतान शिकंदर नांवाच्या बादशहानें आपला धर्म लोकांवर बळजबरीनें लादल्यामुळें आज काश्मीरचे हल्लींचे लोक शेंकडा ९४ मुसुलमान आहेत पण काश्मीर सुटल्यावर जुम्मा वगैरे ठिकाणीं हिंदु धर्मच जोरांत आहे व नेपाळ, पंजाब, संयुक्तप्रांत या ठिकाणीं तर बोलावयासच नको. ज्या ज्या ठिकाणीं हिंदु धर्माचे लोक आहेत त्या त्या ठिकाणी लोकांची भाषा पहाडी आहे. व हीच भाषा थोड्याबहुत फरकानें राजपुतान्यांत आढळतें. यावरून एक गोष्ट सिद्ध होते कीं, या दोन ठिकाणचें लोक एकाच वंशाचे असावेत. नेपाळ संस्थानांतील भाषा एकाच प्रकारच्या नाहीत व संस्थानची प्राचीन नेवारी भाषा तिबेटी भाषेशीं सदृश आहे. हिमालयाच्या पूर्वेस मंगोली लोक जास्त आहेत पण आपण जसजसें पश्र्चिमेकडे यावे तसतसें हे लोक कमी आढळून येतात. कुमाऊन भागांतल्या ज्या जाती आहेत त्या एकलकोंड्या आहेत व त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाहीं.  शे त की.-व्यापारी दृष्टया हिमालयांत जे शेतकीचे पदार्थ उत्पन्न होतात ते फारसे महत्त्वाचे नाहीत. येथील मुख्य धान्यें म्हणजे तांदूळ, गहूं, जवस, मरुआ व अगरंथ हीं होत. ज्या दरींत हवा उष्ण असून दमट आहे त्या ठिकाणीं मिरच्या, हळद, आलें वगैरे पदार्थ होतात. कांहीं उंच ठिकाणीं बटाटे विपुल होतात. व कांही भागांत विलायती फळें चांगली पैदा होतात. पण एकंदरीत हा भाग शेतकीला फारसा उपयोगी नाहीं. या भागांत प्रथम दगड वेंचून जमीन साफ व सपाट करावी व तींत डोंगराच्या बाजूबाजूनें कालवे काढून पाणी आणून सोडावें, तेव्हां पीक होतें. जं ग ल.-या भागांत जंगलें अत्यंत महत्त्वाचीं आहेत व ती हिमालयाची शेवटली श्रेणी आहे त्या श्रेणींत सांपडतात. या जंगलांत इमारतीच्या लांकडाची झाडें फार आहेत. पूर्वहिमालयांत रबर पुष्कळ मिळतो. द ळ ण व ळ ण.-या भागांत दळणवळण. फारसें शक्य नाहीं. रेल्वे कांही ठिकाणीं आहेत; उदाहरणार्थ काश्मीर संस्थानांत जम्मू पंजाबांत सिमला येथें व बंगालमध्यें दाजिंर्लिंग येथे; पण या रेल्वे डोंगरांतून जावयाच्या असल्यामुळें यांनां खर्च मनस्वी आलेला आहे. रावळपिंडीसारखे रेल्वेशिवाय इतर पायरस्तेहि आहेत व ते बैलांनां जाण्यासहि सोईचे आहेत. गंगेसारख्या कांहीं ठिकाणीं खोल दऱ्यांत वाहाणाऱ्या नद्या ओलांडून जाण्याकरिता झोले केलेले आहेत. या झोल्याची कल्पना व तेथून प्रवास करणें हें किती धोक्याचे आहे त्याची कल्पना ते तरते पूल पाहिल्याशिवाय करणें हें शक्य नाहीं. हिमालयाच्या अत्युच्च अशा गौरीशंगर शिखरावर चढून जाण्याच्या ज्या नुकत्या मोहिमा झाल्या त्यांची माहिती 'गौरीशंकर' या लेखांत आढळेल.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .