प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद      
          
हिब्रू वाङमय- वास्तविक पाहिलें असतां हिब्रू वाङमय म्हणजे हिब्रू भाषेंत लिहिलेलें वाङ्मय होय. परंतु अलीकडे हा शब्द सर्व यहुदी वाङ्मयासच लावतात मग तें अरेमाईक अथवा अरबी भाषेंत असलें तरी चालतें. मात्र लिपि हिंब्रू पाहिजे. अभ्याससाहित्याच्या मर्यादा निश्र्चित करण्यास ही रीत जरी चुकीची असली तरी सोयीची आहे. आरंभी तोंडी गाणी परंपरेनें चालत येत असत, नंतर कांही बखरी व कायद्याची पुस्तकें झाली परंतू या सर्वांचा अंतर्भाव पुढें बायबलमध्यें झाला. बायबलमध्यें पूर्वीच्या अशा प्रकारच्या पुस्तकांचा उल्लेख आढळतो. इतर वाङ्मयाप्रमाणें या वाङ्मयाचाहि आरंभ काव्यें व गोष्टी यांपासूनच झाला. पेंटॅटयूक बायबलमधील जुन्या कराराचीं पहिलीं ५ प्रकरणें ही मोझेसनें लिहिलीं अशी दंतकथा आहे. पण वास्तविक ती प्रकरणें म्हणजे निरनिराळ्या बाडांचें एकीकरण आहे असे शोधाअंतीं समजतें. या प्रकरणांची छाननी केली असतां त्यांतील निरनिराळे भाग निरनिराळ्या परिस्थितींत व निरनिराळ्या काळी कसे निर्माण होत गेले तें दिसतें. जुन्या करारांतील सर्वांत प्राचीन भाग ख्रिस्तपूर्व ८०० वर्षांचा असावा व सर्वांत अलीकडचा भाग ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकांतला व कांहींच्या मते ख्रिस्तपूर्व १६८ च्या सुमारास असावा. जुन्या करारातील भक्तिगीतें ही निरनिराळ्या काळीं (यांत) समाविष्ट झाली. सर्व जुना करार कांहीं प्रथम धर्मशास्त्र म्हणनू मानला जात नसे. ख्रि. पू. ४ व्या शतकांत 'तोरा' मोझेस याला सांगितलेला कायदा अथवा धर्मशास्त्र हा हल्लीप्रमाणें त्या काळच्या यहुद्यांतहि बंधक असे. बाकीचा भाग धर्मशास्त्रांत पुष्कळ पाठीमागून व बऱ्याच वादविवादानंतर समाविष्ट करण्यांत आला. यहुदां लोक हे वाङ्मयभक्त होते व हल्लीं धर्मशास्त्रांत दिसून येणारा भाग ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांतील प्रचलित वाङमयापैकीं निवडक तेवढाच घेतला गेला व बाकीचा भाग दुर्लक्षामुळें अजिबात गहाळ झाला, अथवा ॲपोक्रिफाप्रमाणें भाषांतररूपानें शिल्लक राहिलेला आढळतो. या काळच्या वाङ्मयापैकीं सध्यां उपलब्ध असें वाड्मय म्हटलें म्हणजे बेनसिरा यांचें ''एक्लिझिॲटिकस'' व बारा आद्यपुरुषाच्या टेस्टॅमेंटची अरेमाईकमध्यें लिहिलेली प्रत ही होत, ही निदान जेरोमच्या कालापर्यंत हिब्रू भाषेंत होती. यावेळी दुसरें वाङमयहि पुष्कळ होतें व त्यापैकीं पुष्कळचें तोंडी परंपरेनें पुढें चालत असे. व तें पुष्कळ काळानंतर लेखी हाऊन वाङ्मय पदवीस पोंचलें. पुढें लोकांनां हिब्रू समजत नाहींसें झालें त्यावेळी धर्मशास्त्राचे अरेमाईकमध्यें शब्दश: भाषांतर झालें. प्रथम या भाषांतरांत पाठभेद फार असत पण पुढें ते नक्की करण्यांत आलें. व लिहून काढण्यांत आलें. तरजुम्यास 'तार्जुम' म्हणत. हें नांव अरेमाईक भाषेंतील भाषांतर करणें (तार्जुम) या शब्दावरून पडलें. पहिलें भाषांतर आंकेलासचें तार्गुम म्हणून धर्मशास्त्राचें भाषांतर झालें. तें बायिलोनियांमध्यें इ. स. ३ ऱ्या शतकांत प्रसिद्ध झालें. याच वेळेला सॅमरिटन तार्जुन निघालें. जोनॅथनचे तार्जुम पॅलेस्टाईनमध्यें इ. स. ७ व्या शतकांत निघालें. प्राफेटांचे तार्जुम जोनॅथन बेन उझ्मिएल (इ. स. ४ थें शतक ?) याचें आहे. हें पॅलेस्टाईनमध्यें प्रथम तयार झालें, पण बाबिलोनियामध्यें प्रसिद्ध झालें. प्रार्थनेकरितां फक्त धर्मशास्त्र व प्राफेट एवढाच भाग लागत असल्यामुळें बाकीच्या भागाचें भाषांतर नक्की झालेलें नाहीं. तरी पण गाणी वगैरें भागांचें तार्जुम झालेलें आहे. यहुदी लोकांत अशी दंतकथा आहे कीं, ईश्वरापासून मोझेसला सिन्नई पर्वतावर लेखी धर्मशास्त्राबरोबर तोंडीही धर्मशास्त्राचें ज्ञान मिळाले. यात बहुतेक दैनिक आचार सांगितला आहे. याचेंहि महत्त्व व लेखी धर्मशास्त्राइतकेंच आहे. यास 'इलाखा' म्हणत. तें परंपरेनें चालत येत असें. अखेरीस या आचारशास्त्राची महत्त्वाची तत्त्वे 'शूडाहानासी' (रब्बी) यानें छाटाछाट करून एकत्र केलीं. त्यास मिश्र्ना म्हणतात. हीं टीकाकारांच्या हिब्रू भाषेंत लिहिली आहेत व ही भाषा जुन्या करारापेक्षां भिन्न आहे. उपदेशक लोक हलखाशिवाय इतरहि गोष्टी उपदेशप्रसंगी  सांगत असत. व त्यांचे मुख्य काम हें असें कीं, तोंडी धर्मनियम हे लेखी धर्मशास्त्राशीं विरुद्ध नसून एकच आहेत. यामुळें 'मिद्रश' = दर्शनें (दरश = दाखविणें) ही तयार झालीं. अशा प्रकारची दर्शनें 'एक्झोस', लेव्हिलिकस' आणि 'डुटेरावामि' यांवर आहेत. याशिवाय बहुतेक सर्व बायबलच्या भागांवर दर्शनें आहेत. त्यांस रेब्बाक म्हणत. यानंतर, ज्याप्रमाणें 'हलखा'वर टीका होऊन 'मिश्र्ना' तयार झाला. त्याप्रमाणेंच पुढें 'मिश्र्ना'वर टीका होऊन 'गेमरा' तयार झालें व ही दोन्ही मिळून 'टालमड' (पहा) तयार झालें. येथपर्यंतचें सर्व वाङ्मय अज्ञात कर्त्यांकडून तयार झालें. या पुढचें हिब्रू वाङ्मय कांहीं विवक्षित ग्रंथकारांकडून बाहेर पडलें. यापूर्वीचे वाङ्मय सामान्यत: सांप्रदायिक असे. हे ग्रंथकाराहि आपल्या ग्रंथांत आपल्या संप्रदायाचींच मतें प्रतिपादन करीत असत. याप्रमाणें अर्धवट सांप्रदायिक व अर्धवट ग्रंथकाराचें स्वत:चें असें दोन प्रकारचें वाङ्मय आहे. एक 'मसोरा' व दुसरें 'लिटर्जी'. 'मसोरा' या दंतकथा असत असें म्हणतात. परंतु कांहींच्या मतें यांचा उदय बायबलचा अर्थ नक्की करण्याकरतां झाला.  व यांचा उपयोग बायबलचे पाठ नक्की करण्याच्या कानीं फार झाला यांत बृहत् व लघु असे दोन प्रकार असत.  आरंभी प्रार्थनेमध्ये फक्त 'शेमा' आणि 'शेमोने एसरे' हा आशीर्वाद व गीतें एवढेंच असे. यांत वाढ होऊन पहिलें प्रार्थनेचें पुस्तक सूर येथील अमराम गेअन यानें इ. स. ८७० मध्यें सिंदूर या नांवाचें प्रसिद्ध केलें. नंतर यामध्यें निरनिराळ्या संप्रदायांत व प्रसंगानुरूस निरनिराळें फरक होत गेले. अमेरिअम याच्या संप्रदायाचा ढालमकबरोबर अस्त होऊन त्यानंतर “सबोराईन” हा संप्रदाय निघाला. यांनी पूर्वीच्या ग्रंथावर टीका लिहिण्याचा क्रम चालू ठेवला. यानंतर 'गेओनीम' हा संप्रदाय अस्तित्वांत आला. गेओनेचें पीठ सुमारें ४०० वर्षे चाललें यांनीं वाङ्मयांत टाकलेली भर म्हणजे, यांनां निरनिराळ्या वेळीं विचारलेल्या वादग्रस्त प्रश्र्नांवर यांनीं दिलेले निकाल होत. त्याचप्रमाणें यांच्या सांप्रदायिक वादविवादांमधून निष्पन्न झालेलें मुद्दे व त्यांचीं टिपणें ही सुद्धां यांनीं मागें ठेविली आहेत. यांतील सर्वांत प्रमुख म्हटला म्हणजे 'गेओनिम सिआडिआ' हा होय. याच कालामध्यें आठव्या शतकांत आनन यानें एक निराळा पंथ काढला. हा पंथ फक्त बायबलास मानतो व बाकींच्या टीका वगैरे मानीत नाही. या पंथाचें नांव करॅइट असें असून हा निरनिराळ्या परिस्थितीमधून पार पडून अद्याप अस्तित्वांत आहे. हा पंथ म्हणजे यहुदी लोकांतील प्रॉटेस्टंट पंथच होय. हल्लीं हा पंथ क्रिमिया व लिथुआनियामध्यें आहे. यांची ग्रंथरचना पुढें अरबी व नंतर तातार भाषेची एक पोटभाषा यांमध्येंच आढळते. यात काळी स्पेनमध्यें मूर लोकांच्या अमलाखाली यहुदी संस्कृतीचा प्रसार होत होता, पुढें बाबिलोनियामधील संप्रदाय मोडल्यावर कांही उपदेशक पळून स्पेनमध्यें गेले व तेथें यहुदी धर्माचा प्रसार करूं लागले. उत्तरआफ्रिका व इटली या देशांतहि यहुदी वाङ्मय व संस्कृतीचा प्रसार होत होता. यावेळीं विशेषत: व्याकरण व भाषाशास्त्र यांचा अभ्यास चालत होता. याचाच परिणाम म्हणजे स्पेनमध्यें प्रसिद्ध झालेले एक्झेजेसिसु टीकात्मक ग्रंथ होत. यावेळीं टालमड वगैरे ग्रंथांवर टीकाहि झाल्या; त्यांपैकीं कांही उपलब्ध आहेत. स्पेन, आफ्रिका व इटलीमधील यहुदी वाङ्मयाच्या काळाचा आरंभ ९ व्या शतकांत होतो.

फ्रान्समध्येंहि कांहीं प्रसिद्ध ग्रंथकार होऊन गेले व त्यांनीं टामलड वगैरे ग्रंथांवर टीका लिहिल्या. यांत 'रशि' हा प्रख्यात होता. स्पेनमध्यें बाराव्या व तेराव्या शतकांतहि वाङ्मयाची वृद्धि बरीच झपाट्यानें होत होती. इज ग्रेब्रिअल हा एक मोठा ग्रंथकार होऊन गेला. यानें पारमार्थिक टीका ग्रंथांखेरीज, तत्त्वज्ञान, ज्योतिष, गणित, व्याकरण वगैरे विषयांवर ग्रंथ लिहून एक दिवाण (काव्यगुच्छ) लिहिला. याशिवाय जूडाहालेबी यानेंहि बरीच हिब्रू पद्यरचना केली.

मध्यकालीन ज्यू ग्रंथकारांपैकीं सर्वात प्रख्यात म्हटला म्हणजे मोझेसवेन मेमन (यास ख्रिस्ती लोक मैमोनाइड्स म्हणत) हा कार्डोव्हा येथें जन्मून पुष्कळ परिस्थितींतून व देशांतून जाऊन येऊन १२०४ मध्यें केरो येथें मरण पावला. हा वैद्य असून यानें अरबी भाषेंत पुष्कळसें वैद्यकावर ग्रंथ लिहिलें. त्याचें हिब्रूमध्यें भाषांतर झालें आहे व हेच ग्रंथ पुढें यूरोपमध्यें विषयांचें अध्ययन करण्यास उपयोगी पडले. परंतु याची प्रसिद्धी मुख्यत: पारमार्थिक ग्रंथांवरूनच झाली. हें ग्रंथ मूळ अरबीत होते त्यांचें हिब्रूत भाषांतर झालें आहे. त्यांतील मुख्य म्हणजें 'मोरेने भूखीग' व 'मीरनें तोरा' हे होत. याशिवाय त्यानें मिश्र्ना व टालमल यांवर टीका लिहिल्या. व तर्कशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला. हा उदारमतवादी असें. याच्या उलट मोझेस बेन नहमान (रंबान) उर्फ नहमनाइड्स यानें मैमोनाइड्स विरुद्ध 'पेटॅटयूच' वर टीका लिहिली. याचा मंत्रतंत्रांवर  विश्वास असे असें म्हणतात. प्रथम तेराव्या शतकांतच प्रसिद्ध झालेले कब्बली ग्रंथ जाहीर आणि झोहर हे यानेंच लिहिले असावे  असा पुष्कळांचा समज आहे. परंतु बाहीर याना कर्ता ऐझॅब्झबेन अब्राहम हा होता व झोहर याचा कर्ता लिआ येथील मोझेस होता असें समजतें. या दोन्ही पक्षांचे अनुयायी पुष्कळ होऊन गेले व त्यांनीं यांच्या ग्रंथावरील टीका वगैरे लिहिल्या व इतर पारमार्थिक वाङ्मय लिहिलें. मूर लोकांच्या अंमलाखाली असणाऱ्या स्पेनमधील यहुदी लोकांनीं सर्व ग्रंथ त्यावेळीं तेथें प्रचलित असलेल्या अरबी भाषेंत लिहिलें व ती भाषा फ्रान्समध्यें कोणाला समजत नसे म्हणून त्या ग्रंथांची हिब्रू भाषेंत भाषांतरे होऊं लागलीं. यापैकीं पुष्कळशीं इब्रतिब्बन या घराण्यांनें केलीं. पुढें या हिब्रू भाषांतरांची भाषांतरे पुन्हां लॅटीनमध्यें झालीं. याप्रमाणें ग्रीक संस्कृतीचा प्रवेश प्रथम अरबी व नंतर हिब्रू भाषेंतून लॅटिन भाषेंत येऊन झाला. १३ व्या शतकांमध्यें हिंब्रू वाङ्मयाची पूर्ण वाढ झाली. या पुढच्या पारमार्थिक ग्रंथकारांनी बहुतेक मागच्याच ग्रंथांच्या आधारावर कांहीं ग्रंथरचना केली, व लौकिक वाङ्मय हें त्यावेळच्या संस्कृतीच्या ओघाप्रमाणें व बहुधां देशी भाषांतूनच प्रसिद्ध होऊं लागलें . तरी सुद्धां यापुढें निरनिराल्या देशांत कांहीं प्रसिद्ध हिब्रू वाङ्मय भक्त व ग्रंथकार होऊन गेले. छापण्याची कला निघाल्यावर पहिलें हिब्रू छापील पुस्तक 'रशि' याचें रोगीओ हें इ. स. १४७५ त निघालें. यावेळीं काहीं टाईप जुळवणा-या व प्रुफें तपासणा-या लोकांपैकी काहीं ग्रंथकार होऊन गेले. हे ग्रंथकार निरनिराळ्या देशांत होऊन गेले. व यांनी निरनिराळ्या विषयांवर ग्रंथरचना केली. ह्यापैकीं कांहींनीं व्याकरण, कोश, इतिहास वगैरे विषयांवरहि ग्रंथ लिहिलें आहेत.

१८ व्या  व १९ व्या शतकांत मोझेझ मेंडेलन यानें यहुदी धर्म व लौकिक व्यवहार यांची सांगड घालण्याचा व हिब्रू भाषा प्रचारांत आणून तिला बायबलच्या वेळच्या भाषेचें स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यानें पेटॅटयूचचें जर्मन भाषेंत भाषांतर केले. त्यावरून त्याच्या नव्याविचारांची ओळख पटते. याच्या विरुद्ध पक्षीयांचें विचार जुन्या चालीचें होते. या वेळचा वादविवाद म्हणजे बहुतेक मैमी नाइड्स व त्याच्याविरूद्ध असलेला पक्ष यांच्या वादविवादाच्या पुनरावृत्तीचा होय. १९ व्या शतकामध्यें नव्या विचारांचें प्राबल्य विशेष वाढलें. तरी जुन्या पक्षाकडून एकसारखा विरोध चालूच होता. यावेळच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख स्थानीं साधारणत: वाङ्मयभक्तापेक्षां विद्वान व पारंगत लोकच जास्त दिसून येतात. जुन्या पक्षाचा अध्वर्यु अकिबा हा टालमडचा टीकाकार होता. नव्या पक्षाकडे डब्ल्यू. हैडन हेम हा होता. यानें पेंटेटयूच व महमोर हे  ग्रंथ संपादन केले होते. या वादविवादाचा एक परिणाम असा झाला कीं, पुष्कळ ग्रंथकारांनी हिब्रूखेरीज देशभाषांमध्येंहि ग्रंथरचना केली व कांहीनीं उलटसुलट भाषांतरें केलीं.

हिब्रू भाषेचा उपयोग करावा कीं, देशभाषेचा करावा हा अद्याप जुन्या व नव्या विचारांच्या लोकांमध्यें वादग्रस्त प्रश्र्न  आहे. हिब्रूचाच उपयोग लेखन व भाषणाच्या कामीं करावा अशा प्रकारचे स्वदेशाभिमानप्रेरित प्रयत्न मधून मधून होतात. परंतु या भाषेचें अस्तित्व हें विशेषत: यहुदी लोकांच्या भवितव्यतेवर अवलंबून आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .