प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
             
हॉलंड- यूरोपखंडाच्या वायव्य भागांतील एका समुद्रतीरच्या देशाचें हालंड हें नांव आहे. या देशालाच नेदर्लंडचें राज्य (नेदरर्लंड पहा) म्हणतात. याची सर्वांत जास्त दक्षिणोत्तर लांबी १६४ मैल असून सर्वांत जास्त रुंदी १४४ मैल आहे. दरवर्षी समुद्रकाठची कांहीं जमीन समुद्रांत गडप होते व नवीन जमीन उघडी पडते त्यामुळें या देशाचें क्षेत्रफळ बदलत असतें. इ. स. १९२० त उपसागरें वगैरे धरून एकंदर क्षेत्रफळ १५७६० चौरस मैल होतें. देशांतील जमीनीची आमस्टरडॅम जलपातळी धरली असतां उंची १०५७ फू. व १६ फूट यांच्या दरम्यान असून लिंबर्गचा अर्धा दक्षिण भाग हाच कायतो होंगराळ मुलूख आहे. हॉलंडमधील सर्व नद्या उत्तरसमुद्राला मिळतात. ऱ्हाईन, म्यूज व शेल्ट या नद्या मुख्य आहेत. हॉलंडमधील सर्व सरोवरें दलदलीचीं असल्यामुळें विशेष महत्त्वाची नाहींत. नेल्डरलँडमधील उडेलेमीर नांवाचें सरोवर सुंदर आहे. हॉलंडचा बराचसा भाग समुद्रपृष्ठाच्या खाली आहे या गोष्टीचा हॉलंडच्या हवामान वगैरेंवर बराच परिणाम होतो. समुद्रापासून खोल असलेल्या प्रदेशांचे संरक्षण करण्यास १२ व १३ व्या शतकांत सुरुवात झाली. नद्यांच्या मुखांजवळ बंधारें बांधून अगर पाट काढून पुरापासून या प्रदेशाचे संरक्षण करतात. या बंधाऱ्यावरून हॉलंडमधील गावाच्या नावाच्या शेवटी ''डॅम'' लावतात. उदा. अमेस्टरडम, राटरडॅम इत्यादि. ह वा मा न.- वारें बदलणारे आहेत. सर्वसाधारण वार्षिक उष्णमान ४९ ८˚ अंश आहे. पावसाचें सर्वसाधारण मान २९.९३ इंच आहे. क्षेत्रफळ व लोक संख्या- हॉलंडचे जमीनीवरील क्षेत्रफळ १२५८७ चौरस मैल असून १९२३ मध्यें तेथील लोकसंख्या ७२१२७३९ होती. म्हणजे ती दर चौरस मैलास ५७३ या प्रमाणांत होती.  द ळ ण व ळ णा चीं सा ध नें. -हॉलंडांतील सडकांचें (१) राष्ट्रीय, (२) प्रांतिक, (३) कम्युनल व (४) खानगी असे चार वर्ग आहेत. येथील कालवेपद्धति पूर्णावस्थेस पोहोंचली असून प्रत्येक भागांत कालवे आहेत. एकंदर कालव्यांची लांबी दोन हजार मैलांपेक्षां जास्त आहे. इ. स. १८९२ पर्यंत हॉलंड देशांत सरकारच्या मालकीच्या आगगाडयांचे रस्ते बांधण्यात आले. नंतर रस्ते बांधणारांस सरकार मदत देऊं लागलें. १९२२ सालीं २३९२ मैल लांब रेल्वेसडक होती. इ. स. १९०४ मध्यें हॉलंडमध्यें विजेच्या ट्राम्बे सुरू झाल्या. सर्व रेल्वे कंपन्या खासगी आहेत. अमस्टरडॅमपासून लंडन, पॅरिस, ब्रुसेल्स येथें जाणारी सरकारी विमानें आहेत. शे ती, धं दे व गै रे.-हॉलंडमध्यें ओट, जव, गहूं राय, बकव्हीट, बटाटे व बीटरूट हे पदार्थ पिकतात. ओटखेरीज इतर धान्यें हॉलंडला पुरण्यासारखी पिकत नाहीत. कोबी, कांदे, काकडी, वाटाणें वगैरे बागाईताचे पदार्थ असून सर्व ठिकाणी फळें होतात व दक्षिण हॉलंडांत द्राक्षें व अंजिरे यांची स्वतंत्र लागवड होते. शेतीप्रमाणे गुरांच्या वाढीसहि सरकार उत्तेजन देतें. हॉलंडमध्यें १३ व्या शतकापासून मासे धरण्याचा धंदा चालू असून मासे पुष्कळ दिवस राखण्याच्या उपायाच्या शोधापासून हा धंदा वाढला आहे. हॉलंडमधून बराचसा माल परदेशांतहि रवाना होतो. खनिज द्रव्यांचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळें हालंडमध्यें उद्योगधंद्यास मिळावें तसे उत्तेजन मिळत नाहीं. तथापि बेलजमपासून विभक्त झाल्यापासून या देशचे उद्योगधंदे बरेच वाढलें आहेत. कांहीं थोड्या कोळशाच्या खाणी लिंबर्ग प्रांतांत असून यापैकीं कांहीं सरकारी आहेत. १९२३ सालीं ३३१ अल्कोहलसारख्या दारूचे, ३१ साखर शुद्ध करण्याचे, १९ मिठाचे व २२९ बीअरचे कारखाने होते. कापसाच्या कापडाच्या कारखांन्याची वाढ होत आहे. त्याचप्रमाणें लोंकरीच्या कापडाचे कारखाने, गालिचे, जोडे वगैरेचेहि कारखाने येथें आहेत.

हॉलंड हा खुल्या व्यापाराचा प्रदेश आहे. हॉलंडच्या वसाहतींतून हॉलंडमध्ये कॉफी, साखर, तंबाखू, नीळ व दालचिनी येते; इंग्लंड व बेलजम मधून तयार माल व कोळसा येतो; बाल्टिक प्रांतातून धान्य; इंग्लंडहून सूत, फ्रान्समधून दारू व स्पेनमधून खनिज लोखंड येतें. हॉलंडमधून शेतीचा माल लंडनला जातो व मासे बेलजम व जर्मनीला जातात. हॉलंडचा बराचसा व्यापार इंग्लंड व जर्मनी या देशांशी चालतो. या देशांच्या खालोखाल जावा, बेलजम रशिया व संयुक्त संस्थानें यांचा नंबर लागतो. १९ व्या शतकाच्या दुसऱ्या अर्धांत हालंडचा परदेशी असलेला व्यापार तिप्पटांपेक्षां जास्त झाला. १९२४ त आयात २३६३५३२ सहस्त्र गिल्डरची व निर्यात १६०६५६; गिल्डरची होती.

रा ज्य व्य व स्था:- राजा हा अनितिक्रमणीय असून प्रधानमंडळ त्याला जबाबदार असतें. गादीला पुरुष वारस नसल्यास गादी स्त्रीवारसाकडे जाते. हल्ली स्त्रीच गादीवर (विलहेलमिना हेलना पालीन मारिआ; जन्म १८८०) आहे. वडील मुलाला गादी मिळण्याचा कायदा असून गादीच्या वारसाला प्रिन्स ऑफ ऑरेंज म्हणतात राज्य व्यवस्था प्रजेस जबाबदार मंत्रि मंडळ असलेल्या देशापेक्षां फारशी निराळी नाहीं. हॉलंडमध्यें दोन प्रतिनिधिसभा आहेत पहिल्या (अप्पर चेंबर) सभेंत ५० सभासद असून तें प्रांतिक संस्थानांकडून निवडले जातात. सभेची मुदत ९ वर्षांची असून दर तीन वर्षांनी निम्या सभासदांनां राजीनामा द्यावा लागतों. दुसऱ्या (सेकंड चेंबर) सभेंत १०० सभासद असतात. यांत लोकांनीं प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात. १९१७ च्या कायद्यानें सार्वत्रिक मतदार व लोकसंख्येच्या मानानें प्रतिनिधी पाठविणें हे अधिकार मिळाले. या दुसऱ्या सभेचे प्रतिनिधी चार चार वर्षांनी निवडले जातात.  हॉलंडचे ११ प्रांत व १०८२ कॉम्यून (जिल्हे) आहेत. प्रत्येक प्रांताची एक प्रतिनिधिक सभा असते. प्रत्येक कॉम्यून म्हणजे एक कॉर्पोरेशन असून त्यांत एक कौन्सिल असते. या कॉन्सिलला कायदे करणें, कर बसविणें वगैरे अधिकार असतात. सैन्य. देशाच्या संरक्षणाकरितां शिक्षण देऊन करार करून  राखलेले लोक आहेत. त्यांना वेळ पडेल तेव्हां बोलावतात. हें लष्करी शिक्षण सार्वत्रिक असून पहिल्या रांगेच्या सैन्यांत व दुसऱ्या रांगेच्या सैन्यांत ७ वर्षे नोकरी करावी लागते, १९२४ सालीं ७५५१ अधिकारी व २९०४२३ शिपाई इतकें हॉलंडचे लष्करी बल होते. हालंडचें आरमार दोन कारणांकरितां आहे. हॉलंडचें संरक्षण व ईस्ट इंडियन वसाहतीचें संरक्षण न्या य --हेग येथील हाय कौन्सिल हें हॉलंडातील वरिष्ठ न्यायमंदिर असून याशिवाय पांच मुख्य न्यायमंदिरे आहेत. ज्युरी नेमून निकाल देण्याची पद्धत या देशांत नाही. मुलांचे खटले चालविण्याकरितां वेगळी कोर्टे आहेत. भिक्षेच्या भटकेपणाच्या वृत्तीला गुन्हेगारी समजण्यांत येते. गरीबांकरितां निरनिराळ्या संस्थांमार्फत मदतीची सोय करण्यांत येत असते. १९१६ सालापासून बेकार लोकांच्या विम्याची सरकारी योजना अंमलांत आहे. ध र्म -सर्वांना धर्मस्वातंत्र्य आहे. तथापि राजघराणें व बहुजनसमाज हे 'रिफॅर्म्ड चर्च' चे अनुयायी आहेत.

शि क्ष ण.- १९०० साली ७ ते १३ वयापर्यंत सक्तीचे शिक्षण सुरू झाले. दुय्यम प्रतीच्या शाळांतून इंग्रजी, फ्रेंच व जर्मन या भाषा ऐच्छिक विषय म्हणून शिकविल्या जातात. विशेष प्रकारचें शिक्षण देणाऱ्या विद्यालयांत. व्यापारी शाळा, गृहशिक्षणाच्या शाळा वगैरे मुख्य आहेत. नौकानयनाचें शिक्षण देणाऱ्या शाळा १२ असून कामकऱ्यांकरितां ५८३ शाळा आहेत. सरकारतर्फे मिळणाऱ्या शेतकीच्या शिक्षणाची व्यवस्था उत्तम असते. हालंडमध्यें ४ सरकारी विद्यापीठें आहेत. एक धंदेशिक्षणाचें विद्यापीठ आहे. व प्रत्येक विश्वविद्यालयांत, कायदा, ईश्वरशास्त्र, वैद्यक, सायन्स व गणित, वाङ्मय व तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जातात. वसाहतींतील वरिष्ठ अधिकारी तयार करण्यासाठी एक सरकारी शाळा १९०८ सालापासून आहे.

रा ष्ट्रा चा ज मा ख र्च.- देशाचें १९२५ सालचें उत्पन्न ७०८९३९ सहस्त्र गिल्डर (१२ गिल्डर - १पौंड) असून खर्च ७७६२११ सहस्त्र गिल्डर होता. अबकारी उत्पन्न सर्वांत जास्त असून खर्चाची मोठी रक्कम कर्ज फेडण्यांत जाते. दर माणसी कराचे प्रमाण १९२३ सालीं ७४.०२ गिल्डर होते. नेदर्लंड बँक ही खासगी संस्था असली तरी तिला नोटा काढण्याचा अधिकार आहे. ही हिंदुस्थानांतील इंपीरियल बँकेप्रमाणें निमसरकारी व विश्वासु म्हणून समजण्यांत येते.

व सा ह ती.- ईस्ट इंडीज आणि वेस्ट इंडीज यांमध्यें हॉलंडच्या मालकीचे मुलुख आहेत. त्यांचें एकंदर क्षेत्रफळ ७८८००० (इंग्लिश) चौ. मी. असून लोकसंख्या ४९५३४६१८ किंवा हॉलंडच्या लोकसंख्येच्या सुमारें सातपट आहे. डच ईस्ट इंडीज या नावांखाली जावा आणि मदुरा, सुमात्रा बेट, रिआऊ लिंगा द्वीपसमूह, बधा, बेलिटोएंग, बोर्निओ, सेलेबेस बेट, मोलुका बेटें, टिमॉर द्वीपसमूह, व बलि आणि लोंबोक हे प्रदेश येतात या सर्वांचें क्षेत्रफळ सुमारें ७३३६४२ चौ. मैल असून लो. सं. (१९२०) ४९३५०८३४ आहे. या सर्वांवर एक गव्हर्नर जनरल असतो (जावा, सुमात्रा बलि हे लेख व विभाग  १ प्र. ६ पहा) डच वेस्ट इंडीजखाली सुरिनाम किंवा डच ग्वायाना व कुराचावी वसाहत ही येतात. डच ग्वायानासंबंधी माहिती ग्वायाना (वि. १२) या लेखांत सांपडेल. कुराचावी वसाहतींत सहा बेटें असून त्यांचे एकंदर क्षे. फ. ४०३ चौ. मै. असून लो. सं. (१९२३) ५६३७१ आहे. यावर एक गव्हर्नर असतो.

इ ति हा स.- हॉलंड आणि बेल्जम ही दोन राष्ट्रें नेदर्लंड या नांवाखाली जेव्हां एकत्र होती तेव्हांचा इतिहास नेदर्लंड या लेखांत दिलेला आहे. आतां  इतिहास द्यावयाचा तो १५७९ पासूनचा होय. यावेळेस बेल्जम हालंडपासून वियुक्त झालें. पण त्याशीं उत्तरेकडील अनेक प्रदेश संयुक्त झालें. तेव्हांपासून हालंड हें एक तऱ्हेचें संयुक्त राष्ट्र बनूं लागलें या संयुक्त राष्ट्रात दृढ संघटना थोडीच होती. वालून भाषेचा प्रदेश आणि क्वाथलिक सरदारांचा प्रदेश हातचे गेल्यामुळें सर्व राष्ट्र डबघाईस येण्याचा संभव होता, तथापि संपूर्ण वसाहत ऑरेंजच्या राजाच्या परिश्रमानें बचावली. त्याला हालंड आणि झीलंड यांचें अनुयायित्व होतें. पण इतरत्र त्याच्याविषयीं अविश्वास होता. त्याला हें दिसून आले कीं राष्ट्रास जर परकीय राष्ट्राकडून मदत मिळणार नाहीं तर स्पेनचा फिलिप (दुसरा) त्याचा धुव्वा उडवूं शकेल आणि यामुळें फ्रान्सची मदत घेण्याचा निश्र्चय करून आंज्यूच्या डयूकला राज्यपद देण्याचें त्यानें ठरविलें, आणि १५८१ च्या जानेवारी (२३ तारीख) त्यानें डयूकशीं तह केला. या तहांत डयूकनें हालंड व झीलंडखेरीज इतर प्रांतांचे अधिपत्य स्वीकारावयाचें ठरविलें; कॅथलिक राजाचा लोकांस अविश्वास वाटत होता तरी देखील व्यावहारिक आवश्यकता म्हणून आरेंजच्या विल्यमनें ही योजना केली. आंज्यूचा डयूक आला आणि स्थानिक प्रजेनें स्पेनचें आधिराज्य झुगारून दिल्यानें जाहीर केलें; पण पुढें आंज्यूच्या डयूकला आपली सत्ता स्थानिक सरदारांच्या व ऑरेंजच्या राजाच्या कृपेवर आहे. हें न आवडून त्यानें आरेंजच्या विल्यमवर व दुसऱ्या एका सरदारावर घाला घालण्याचें ठरविलें. हल्ला केला पण तो फुकट गेला. परिणाम झाला कीं, आंज्यूची स्थिति बिकट झालीच; पण विल्यम देखील अप्रिय झाला, आणि पुढें तो कॅथलिक पक्षाच्या लोकांकडून मारला गेला. (१० जुलै १५८४). इकडे स्पेनच्या राजानें हालंडवर पार्माच्या डयूकच्या हाताखाली लष्कर पाठविलेंच होते.

विल्यम दि सायलेंटच्या खुनानंतर त्याचा दुसरा मुलगा नॅसावचा मारिस याला कौन्सिल ऑफ स्टेटचा अध्यक्ष, युनियनचा ॲडमिरल जनरल, कॅप्टन व हॉलंड झीलंडचा स्टॅडहोल्डर करण्यांत आलें. पण हा फार अल्पवयी म्हणजे केवळ १७ वर्षांचा होता. तेव्हां ऑरेंजच्या विल्यमच्या दोघा विश्वासूं अनुयायांनी राज्यसूत्रें हातीं घेऊन ते राजा पहाण्याच्या खटपटीस लागले. फ्रान्सच्या ३ ऱ्या हेनरीनें ही राजलक्ष्मी  नाकारली, तेव्हां इंग्लंडच्या एलिझाबेथकडे स्टेटस-जनरलनें याचना केली. पण तिनेंहि स्पेनच्या भीतीमुळें ही राज्याची माळ न स्वीकारतां अर्ल ऑफ लीस्टरच्या हाताखालीं डच प्रांतांच्या रक्षणासाठी सैन्य पाठविण्याचें कबूल केलें त्याप्रमाणें लीस्टर हॉलंडमध्यें येऊन गव्हर्नर जनरल बनला (१५८६)

पण अनेक कारणांमुळें लीस्टरचा कारभार सुरळीत चालला नाहीं. स्टेट्स-जनरल मध्यें मोठें वजन असलेलें हालंड हें पोट संस्थान त्याच्या विरुद्ध होतें; तेव्हा लीस्टर इंग्लंडात परत गेला. इकडे इंग्लंडवर स्वारी करण्याच्या तयारीत स्पेन असल्यानें नेदर्लडवरील त्याचा ताबा ढिला पडून योहन व्हान ओल्डन बार्नेवेल्ट हा या रिपब्लिकचा नेता बनला. मॉरिसहि मोठा होऊन युद्धकौशल्य दाखवूं लागला. त्याचा ओल्डन बार्नेवेल्टच्या ठिकाणीं मोठा विश्वास असल्यानें दोघांत फूट पडण्याचें कारण नव्हतें. १५९१ पर्यंत सरकारनें स्वीकारलेलें केवळ संरक्षणाचें धोरण सोडून त्या साली शत्रूंवर चढाई करून जाण्याच्या मोहिमा काढल्या, व त्यांत चांगलें यशहि लाभलें. या मोहिमांत मॉरिशची योद्ध म्हणून सर्वत्र कीर्ति पसरली. उत्तर नेदरर्लंड स्पॅनिश सैन्याच्या तडाख्यांतून मोकळें झालें.

१५९६ मध्यें फ्रान्स आणि इंग्लंड यांनीं या संयुक्त प्रांतांशीं दोस्तीचा तह करून स्टेटस् जनरलची राजसत्ता कबूल केली. पुढील सालीं स्पेनला फार मोठा मार बसला; तेव्हां स्पेनच्या फिलीपनें निराळा डाव टाकिला. आपली थोरली मुलगी इन्फंटा इझाबेला हिचें लग्न १५९६ पासून नेदर्लंड्चा गव्हर्नर जनरल असलेला कार्डिनल आर्चडयूक अलबर्ट याशी करून देऊन या दोघांच्या अंमलाखाली हें प्रांत स्वतंत्र राष्ट्राच्या दर्जाचे बनवावयाचें असें त्यानें ठरविलें. त्याचप्रमाणें फिलिपनें केलें पण स्टेट्स जनरलनें आपला ताबा सोडला नाहीं. लोकांनांहि ही नवीन राजाराणी नको होती. तेव्हां यापुढें आर्चडयूक आणि स्टेट्स जनरल यांच्यात लढाया सुरू होत्या. शेवटी १६०९ सालीं बारा वर्षांपुरता शांततेचा तहनामा झाला.

पण या तहामुळें देशांत कलह माजले. ओल्डेन बार्नेवेल्ट विषयीं मॉरिस व इतर स्टेडहोल्डराचा ग्रह चांगला राहिला नाहीं. भरींत भर म्हणून कीं काय देशांत एक धार्मिक वाद उपस्थित होऊन 'रेमॉन्स्ट्रन्टस' आणि 'कॉऊंटर रेमॉन्स्ट्रन्टस' असे दोन तट पडले. दुसऱ्या पक्षाचीं मतें जुन्या कॅल्वि्हनिस्ट सारखीं असून, पहिला पक्ष या मतांवर हल्ला चढवीत असे. हें भांडण विकोपास जाऊन स्टेट्स जनरल कडे त्याची दाद गेली. अड्व्होकेट ओल्डेन बार्नेवेल्ट आणि हालंड पोटसंस्थान यांनीं रेमॉन्स्ट्रन्टसची बाजू घेतली. मॉरिस व बहुतेक स्टेट्स जनरल यांनी दुसरी बाजू उचलली तेव्हा तर प्रकरण हातघाईवर येऊन मॉरिसच्या पक्षानें ओल्डेन बार्नेवेल्ट व त्याचे अनुयायी यांनां कैद केले. ओल्डेन व बार्नेवेल्टची स्पेशल कोर्टापुढें चौकशी होऊन त्याला फांशी देण्यांत आलें (१६१९) व रेमॉन्स्ट्रंटसवर बहिष्कार पुकारण्यांत आला.

१६२१ मध्यें द्वादशवार्षिक शांततेचा तह पुरा होऊन पुन्हां स्पेनशी लढाई जुंपली. पण यावेळी मॉरिसला उत्साह वाटत नव्हता. त्याचा थोर मुत्सद्दी  मित्र ओल्डन बार्नेव्हेल्ट याचा अप्रत्यक्षपणें त्याच्याच हातून मृत्यु झाला होता. तेव्हां ब्रेडाच्या वेढ्यांत मॉरिसला अपयश आलें असतां त्यानें हाय घेतली व तो लवकरच मरण पावला.

मॉरिसनंतर त्याचा धाकटा भाऊ फ्रेडरिक हेनरी त्याचा गादीवर आरूढ झाला. फ्रेडरिक हा मॉरिसप्रमाणेंच शूर असून मुत्सद्दीहि होता. त्याची कारकीर्द डच रिपब्लिकच्या इतिहासांत फार उज्वल समजली जाते. त्यानें अंत:कलह मिटवून देशाला बळकटी आणली. त्याच्याच कारकिर्दीत डच ईस्ट कंपनीनें केप ऑफ गुडहोपपासून जपानपर्यंत जागजागी व्यापारी ठाणीं केली. वेस्ट इंडिया कंपनीनेंहि दक्षिण अमेरिकेंत डच राज्य स्थापिलें, फ्रेडरिकनें फ्रान्सशीं सख्य घडवून आणून जर्मनींतील प्रॉटेस्टंट लोकांना मदत दिली. त्यानें बऱ्याच लढाया जिंकून स्पेनला जर्जर केलें. यावेळीं तह होण्याचा रंग दिसत होता, पण १६२३ त इन्फंटा इझाबेल वारल्यानें नेदर्लंड्स पुन्हां तत्त्वत: स्पेनच्या राजाकडे आलें. पण स्पेनविरुद्ध फ्रान्सशीं तह करून फ्रेडरिकनें त्याची मदत मिळविली व स्पेननें नेमलेल्या गव्हर्नरशीं युद्ध सुरू केलें. या युद्धांत स्पेनचें नाविक बल कमी झालें व डचांचें वाढलें. पण यामुळें इंग्रजांनां डचांविषयीं मत्सर वाटूं लागला. ईस्ट इंडीज व इतर ठिकाणीं इंग्रज आणि डच व्यापारी यांच्यांत भांडणें चाललीच होती. इंग्लंड आणि नेदरर्लंड्स यांचे सख्य व्हावे म्हणून इंग्लंडच्या पहिल्या चार्लसची अल्पवयी मुलगी फ्रेडरिकच्या एकुलत्या एक मुलास लहान वयांतच करून घेतली (१६४१). फ्रेडरिक १६४७ त मरण पावला. मरणापूर्वी त्यानें संयुक्त प्रांतांनां सरहद्दीवर संरक्षण म्हणून मजबूत ठिकाणी किल्ले करून दिले होते. मरणापूर्वी त्याची फार इच्छा होती त्याप्रमाणें स्पेनशीं १६४८ त नेदर्लंडचा तह होऊन स्पेननें अखेर ८० वर्षांच्या युद्धानंतर या प्रांतांचें स्वातंत्र्य कबूल केलें. यावेळीं संयुक्त नेदर्लंड्सचें लोकसत्ताक राज्य वैभवाच्या व उन्नत्तीच्या शिखरावर होतें.

या स्वातंत्र्याच्या तहानंतर लष्कर कमी करण्याचा प्रश्र्न  पुढें येऊन स्टेट्स जनरलनें तशी आज्ञा दिली. पण विल्यम याच्याविरूद्ध होता. फ्रान्सशीं संधान बांधून पुन्हां स्पेनशी युद्ध करण्याचा त्याचा बेत होता. त्यानें तशी तयारीहि केली होती. पण एकाएकीं देवी येऊन तो वारला (१६५०).  तो वारल्यानंतर त्याचा मुलगा तिसरा विल्यम जन्मास आला. हालंड प्रांत ऑरेंज घराण्याच्या विरूद्ध असल्यानें विल्यमच्या मृत्यूनंतर एक मोठी सभा भरविण्यांत येऊन राज्यपद्धतीचे नवीन नियम घालण्यांत आले. त्याअन्वयें स्टॅडहोल्डरांनां मुळीच अधिकार नसे. ग्रँड पेन्शनरी नांवाचा एक अधिकारी राज्यव्यवस्था बघण्यास पांच वर्षांपुरता नेमण्यांत येई. जॉन डि विट हा पहिला ग्रँड पेन्शनी होय. यानंतर इंग्लंडशीं आरमारी युद्ध सुरू झालें. क्रामवेलचें मत नेदर्लंडच्या सरकाराविषयी चांगले नव्हतें; व डच व्यापाऱ्यांनीहि इंग्रज व्यापाऱ्यांची कागाळी केली होती. त्यामुळें युद्ध उत्पन्न झालें ते १६५४ त मिटलें. तहांच्या कलमांत ऑरेंजच्या राजपुत्राला पूर्वीचे हक्क देण्यासंबंधी जी क्रामवेलनें अट घातली होती तीमुळें उलट ऑरेंजचें नासाव घराणें नेदरर्लंडमध्यें फार अप्रिय झालें. पण दुसरा चार्लस इंग्लंडचा राजा बनल्यानंतर राजपुत्र विल्यमकडे डच सरकार लक्ष देऊं लागलें. पण चार्लसचें मन डचांविषयीं अनुकूल नसल्यानें क्रामवेलच्या कारकीर्दीत अंमलांत आणलेला (नॅव्हिगेशन ॲक्ट) नौकानयनाचा कायदा पुन्हां जोरानें त्यानें पुढें आणला, तेव्हां पुन्हां इंग्लिशांशीं डचांचे युद्ध सुरू झालें. व न्यू नेदर्लंडसची राजधानी न्यू आमस्टरडॅम जिंकून तिला न्यूयॉर्क नांव दिलें (१६६५). दोन वर्षांनीं हें युद्ध बंद पडलें.

पण लगेच फ्रान्सच्या १४ व्या लुईनें डचांविरुद्ध सर्व यूरोपियन राष्ट्रें एकत्र करून त्यांचा समुद्रावर व जमीनीवर नायनाट करण्याचा डाव आरंभिला. डच सरकारची तयार नसल्यानें तें अगदी टेंकीस आलें. पण यावेळीं विल्यम पुढें सरसावला व त्यानें शत्रूंनां मोठ्या धिटाईनें तोंड दिलें.तेव्हां लोकांनीं त्याला त्याच्या वाडवडिलांचे सर्व मानमरातब व अधिकार दिले, व तो लोकांचा खरा पुढारी बनला. १६७७ त चार्लसची पुतणी राजकन्या मेरी हिचें विल्यमशीं लग्न लागलें, व पुढें फ्रेंचांशी तह होऊन डचांचें सर्व जिंकलेले मुलूख परत मिळाले. पुढें लुईच्या वरचढ धोरणामुळें सर्व राष्ट्रें याच्याविरुद्ध एकत्र झालीं व त्यांचे पुढारीपण विल्यमला मिळालें. १६८८ त इंग्लंडमध्यें राज्यक्रांति होऊन विल्यम व त्याची पत्नी मेरी ही इंग्लंडच्या गादीवर बसली.

यानंतर स्पॅनिशवारसायुद्ध सुरू झालें पण लवकरच विल्यम मरण पावला (१७०२). त्याच्या ह्यातीत त्याचें वजन कोठेंच कमी झालें नाहीं. पण तो निपुत्रिक मेल्यावर त्याच्या गादीवर कोण बसवावा हा प्रश्र्न  पुढें आला, व पुन्हां देशांत तट पडले. हीन्सिअस हा ग्रँड पेन्शनरी हुषार व कर्तबगार असल्यामुळें त्याच्या मृत्यूपर्यंत (१७२०) फारसा गोंधळ झाला नाही. पण पुढें डच राष्ट्राचा संबंध यूरोपांतील दर्जा खालावत चालला. यापुढं डचांनीं आंतर्राष्ट्रीय कारभारांतून आपलें अंग काढल्यासारखें केलें, व व्यापाराकडे लक्ष लाविलें पण आस्ट्रियनवारसायुद्धांत त्यांनां फ्रान्सविरुद्ध लढावें लागलें.

या युद्धांत डच संयुक्तप्रांताचा पराभव होण्याची वेळ येऊन ठेपली असतां १६७२ सालाप्रमाणें लोकांचें लक्ष चवथ्या विल्यमकडे जाऊन, तो सात प्रांतांचा स्टँडहोल्डर बनला व स्टेट्स जनरलनें त्याला यूनियनचा कॅप्टन व ॲडमिरल जनरल नेमलें. विल्यमची पत्नी इंग्लंडच्या दुसऱ्या जार्जची वडील मुलगी असल्याकारणानें त्याचें यूरोपच्या मंत्रिमंडळांत वजन असे. तेव्हां त्यानें देशांत शांतता प्रस्थापित करून व्यापार व उद्योगधंदे वाढविले; पण तो १५५१ त वारला. त्याची मुलगी तीन वर्षांची असल्यानें इंग्लंडची ॲनी राजकन्या रीजंट (राजप्रतिनिधी) बनली. पांचवा विल्यम १७६६ त वयांत आला. पण तो स्वतंत्र बुद्धीचा नसे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धांत त्याची सहानुभूति इंग्लंडकडे, तर त्याच्या प्रजाजनांची अमेरिकन लोकांकडें होती. या युद्धांत डचांचा व्यापार बुडाला. त्यांच्या वसाहती असंरक्षित अशा होत्या. पॅरिसच्या तहामुळें त्यांच्या कांही ईस्ट इंडियन वसाहती जाऊन पूर्वसमुदांत त्यांना इंग्लंडला मोकळीक द्यावी लागली. यानंतर ५ व्या विल्यमविरूद्ध एक पेट्रियट पक्ष उत्पन्न होऊन त्यानें विल्यमला घालवून देण्याचा व चालू राज्यकारभाराची (स्टँडहोल्डरेट) पद्धत बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हां प्रशियन सैन्यानें प्रांतावर स्वारी करून पुन्हां विल्यमचा वचक बसविला. इंग्लंडचीहि त्याला मदत होती. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रेंच सैन्यानें नेदरर्लंडवर स्वारी केली असतां विल्यम इंग्लंडांत पळून गेला. पण 'पेट्रियट' पक्षानें फ्रेंचांनां मिळून त्यांच्या सहकारितेंनें नवीन बटाव्हियन रिपब्लिक स्थापिलें. पण लवकरच त्याला या फ्रेंच दोस्तीचा पश्चात्ताप होऊं लागला. कारण फ्रेंचांबरोबर डचसरकारलाहि लढायातून भाग घ्यावा लागून त्यांचा व्यापार ठार बुडाला. शिवाय देशांत नवें नवें राज्ययंत्र निर्माण होऊं लागलें. यावेळीं सर्व डच प्रांतांनां मिळून हालंड हें नांव पडलें. १८०५ सालीं नेपोलियननें एक नवी राज्यपद्धति हालंडवर लादली, व त्याचा आपल्या मांडलिकांच्या प्रभावळींत ओढलें, आपला भाऊ लुई बोनापार्ट याला त्याच्या व डच लोकांच्या मनाविरुद्ध हॉलंडचा राजा केलें. पण चार वर्षांनंतर लुईनें राज्यत्याग केला. १८१० त उत्तर नेदरर्लंड्चा फ्रेंच साम्राज्यांत समावेश झाला. पण लाईपझिगच्या पराभवानंतर नेदर्लंडांत नेपोलियनविरुद्ध बंड उभारलें जाऊन ऑरेंज राजपुत्राला राजा म्हणून परत बोलाविण्यांत आलें. लंडनच्या तहानें बेल्जिअन व डच प्रांत एकत्र करून नेदर्लंड्सचे राज्य बनविलें; व या राजपुत्राला पहिला विल्यम या नांवानें त्या राज्यावर बसवलें. व्हिएन्नाच्या काँग्रेंसनही याला मान्यता दिली. पण डच व बेल्जियन प्रांताचे  केलेलें एकीकरण फार दिवस टिकणारें नव्हतें. कारण डच व बेल्जिअन हे लोक परस्पर विरूद्ध असून त्यांचा एकोपा होणें अशक्य होतें तेव्हां सन १८२० मध्यें बेल्जिअनांनीं बंड करून स्वातंत्र्य मिळविलें. पहिल्या विल्यमची सत्ता अधिक वाढून त्याला राजीनामा द्यावा लागला. त्याचा मुलगा दुसरा विल्यम १८४९ पर्यंत गादीवर होता. तो वारल्यानंतर तिसरा विल्यम १८९० पर्यंत राज्य चालवीत होता. १८४८ त राज्यघटना बदलून ती जास्त लोकमतानुवर्ती झाली. तिसऱ्या विल्यमच्या कारकीर्दीत धार्मिक शिक्षणसंबंधीं देशांत वाद माजून राहिला होता व निरनिराळे पक्ष पडले होते. मताधिकाराचा सर्वत्र प्रसार, सावत्रिक लष्करी नोकरी यांसारखे आणखी प्रश्र्नहि मांडण्याकरितां तयार होतेच.

१८७१-७२ सालांत ग्रेटब्रिटननें गिनीच्या किनाऱ्यावरील डचांच्या कांहीं मुलुखाबद्दल, सुमात्राच्या उत्तर भागांत डचांची वसाहत होण्यास मोकळीक दिली. पण अचिनचा राजा या गोष्टीला विरोध करूं लागला असतां डच सरकारला त्याच्याशीं युद्ध करावें लागलें. १८९० साली तिसरा विल्यम वारल्यावर त्याची एकुलती एक मुलगी विल्हेलमिना गादीवर बसली. ती अल्पवयीन  असल्यानें तिची आई रीजंट म्हणून कारभार पहात असें. १८९८ मध्यें ती वयांत येऊन स्वत: कारभार पाहूं लागली. १८९९ त बोअर युद्ध सुरू झालें असतां डच प्रजाजनांची मनें साहजिकच दक्षिण आफ्रिकेंतील आपल्या बांधवांकडे वळलीं. पण डच सरकारनें मोठ्या धोरणानें ग्रेटब्रिटनशीं वांकडे न येईल असें वर्तन ठेविले होतें. विल्हेलमिना राणीचें लग्न १९०१ साली मेकलेनबर्गच्या प्रिन्स हेनरी बरोबर लागलें होते. पण १९०९ पर्यंत. तिला संतति न झाल्यानें लोक मोठ्या फिकिरीत पडले होते. पण त्या सालीं राणीला मुलगी होऊन सर्वत्र आनंदीआनंद झाला.

अ र्वा ची न (१९१०-२०)-१९०८ सालीं मीस्टरच्या लिबरल प्रधानमंडळानें राजीनामा दिल्यानंतर हीम्सकर्क या पाद्री पुढाऱ्यानें आपलें प्रधानमंडळ बनाविलें. याच्या कारकीर्दीत बरेच महत्त्वाचें कायदे पास झाले. त्यापैकीं महत्त्वाचा कायदा म्हणजे प्रत्येकानें आपला विमा उतरलाच पाहिजे असा सक्तीचा कायदा होय. याशिवाय युद्धमंत्री कॉलीन यानें सैन्याच्या पुनर्घटनेसंबंधीचा कायदा पास करून घेतला. व त्याचा फायदा महायुद्धाच्या वेळीं दिसून आला. तसेंच फ्लशिंग जवळ एक मजबूत किल्ला बांधण्यात आला. १९१३ सालीं कोर्ट डरव्हॉन लिंडन हा प्रधान झाला. या प्रधानानें आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर पार्लमेंटनें दिलेल्या अधिकाराबाहेरचें जादा मंत्रिमंडळ बनविले व त्याच्या साहाय्यानें अनेक उपयुक्त गोष्टी घडवून आणल्या. ५० वर्षे हॉलंडमध्यें ज्या प्रश्र्नांवर रणें माजली होतीं तो शिक्षणविषयक प्रश्र्न सर्वांस समाधानकारक वाटेल अशा रीतीनें त्यानें सोडविला. १९१७ सालीं त्यानें हालंडच्या शासनघटनेंची पुनर्रचना करण्याचा कायदा पास करून घेऊन त्यानें त्याप्रमाणें घटनेंत सुधारणा केल्या. महायुद्धामध्यें हॉलंडने आपलें ताटस्थ्य शेवटपर्यंत राखलें. त्यासाठीं हॉलंडने आपलें सैन्य ५ लाखांनी वाढविलें. हॉलंडने महायुद्धांतील अनाथ व जखमी स्त्रीपुरुषांनां मदत करण्यासाठीं अँब्यूलन्स व पैसा या दोन्ही मार्गांनी मदत केली. नवीन निवडणुका होऊन पाद्री पक्ष अधिकारारूढ झाला; व नीलेन्स हा मुख्य प्रधान झाला. युद्धतहकुबी जाहीर होतांच हॉलंडमधील शिपायांनी आपल्याला रजा मिळविण्याविषयी आग्रह धरला व त्यामुळें थोडी फार वेदिली माजली. तथापि लौकरच सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. डॉ. नोलेन्सच्या कारकीर्दीत ''आजारविम्याचा कायदा'', ''प्राथमिक शिक्षणाचा कायदा'' व आठतासी कामाची मर्यादा हे कायदे प्रसार झाले. १९१८ सालीं जर्मन कैसर हा हॉलंडमध्यें आश्रयार्थ आला व हॉलंडनें त्याला आश्रय दिला. १९२० साली दोस्तराष्ट्रांनीं कैसरला आपल्या हवाली करण्याविषयीं हॉलंडला विनंति केली. पण हॉलंडनें ती नाकारली. याशिवाय याच सुमारास हॉलंड व बेल्जममध्यें कांहीं मुलुखासंबंधी भानगड उपस्थित झाली. हॉलंडनें प्रमुख यूरोपियन राष्ट्रांनां पंच नेमून त्यांच्याकडून या प्रश्र्नाचा निकाल लावण्यास वसूली दिली, पण तिचा उपयोग झाला नाहीं. पुढें बेल्जम व हॉलंड याच्या प्रतिनिधीमध्यें भानगडीच्या विषयावर चर्चा होऊन तडजोड होण्याचा रंग दिसूं लागला, तथापि बेल्जमनें कांही बाबतींत आपल्या मताप्रमाणेंच निकाल लावला पाहिजे असा आग्रह धरल्यामुळें तडजोड फिसकटली. १९२० साली हॉलंड राष्ट्रसंघांचें सभासद झालें. १९१९ सालच्या वॉशिंग्टन येथील मजूरपरिषदेंत हॉलंडने आपला प्रतिनिधी पाठविला होतो. सार्वराष्ट्रीय न्यायखाते हेग येथें स्थापन करण्यांत आलें.

वाङ्मय.- सध्यां डच आणि फ्लमिश या नांवानें ओळखल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्यांना इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या अखेरपर्यंत मूर्तस्वरूप प्राप्त झालेलें नव्हतें. आठव्या शतकांतील स्तोत्रें आणि ९ व्या शतकांत केलेलीं भाषातरें या दोन अवशेषांवरून एक प्राचीन डच भाषा फार पूर्वीपासून असावी असें म्हणतां येईल. परंतु डच वाङमयाचा वास्तविक आरंभ १३ व्या शतकांत होतो. शा ही र वि ले म.-डच लोकांच्या पौराणिक कथा अगर जर्मन दंतकथा. यापैकीं प्राचीन डच भाषेंत कांहीं उपलब्ध नाहीं. उलटपक्षीं शार्लेमन आणि आर्थर यांची कथानकें मध्यकालीन डच भाषते लगेच आढळतात. ही कथानकें पोटासाठीं हिंडणाऱ्या भाट लोकांकडून घेऊन नंतर त्यांचे भाषांतर मोठ्या लोकांकरिता डच भाषेंत झालें असावें, हें उघड आहे. ही भाषांतरें कोणी केली असावींत यासंबंधीं काहीं माहिती नाहीं, तथापि फ्रेंच रोमान्सचे जे कांहीं अवशेष शिल्लक आहेत ते मात्र 'क्लास व्हान हार्लेम' नांवाच्या माणसानें ११९१-१२१७ च्या दरम्यान डच भाषेंत लिहिले आहेत. याच सुमारास ''जान्सन व रोलंड'' व नंतर बऱ्याच दिवसांनी पार्थेन प्युअस द ब्लाईस या पुस्तकांची भाषांतरें झाली. फ्लेमिश भाट डीडेरिक व्हान अस्सेंडे यानें ''फ्लॉरिस द ल्बँचेफूर'' या ग्रंथांचे भाषांतर १२५० खाली पुरें केलें. वेल्स देशांत वसाहत करण्यासाठीं गेलेल्या कांहीं फ्लेमिश लोकांनीं स्वदेशीं परत येतांना ''ऑर्थरसंबंधींचे कांहीं पोंवाडे'' आणले असावेत असें वाटतें. सुमारें १२५० सालीं ब्रॅण्ट देशांतील एका शाहीरानें बॉल्टर मॅपच्या ''लॅन्सेलॉट डयू लॅक''चें आपला धनी लोडेविनग व्हान व्हेल्थेम याच्या आज्ञेवरून भाषांतर केलें. पेनिक आणि ऱ्हॉस्टीअर्ट यांनी ''गॉव्हेन'' चें भाषांतर १२६० सालापूर्वीच केलें आणि त्याच सुमारास डच भाषेंतील पहिला स्वतंत्र आणि प्रख्यात लेखक जेकब व्हान मीअरलँट यानें मर्लिन आणि होलीग्रेल यासंबंधींचीं अद्भुत कथानकें लिहिण्यास सुरुवात केली. ''रेनार्ड दि फॉक्स'' या पौराणिक ग्रंथाचें हल्लीं असणारे अवशेष फ्लेमिश धर्मोपदेशकांनी लॅटिनमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या पहिल्या भागाचें फारच महत्त्वाचें डचमध्यें वुईलेम शाहीर यानें १२५० च्या सुमारास भाषांतर केलें. या ग्रंथकारासंबंधीं मॅडॉक नांवाच्या एका अद्भुत कथानकाचा कर्ता, यापेक्षां जास्त माहिती मिळत नाहीं. डच वाङ्मयांत नांव घेतां येण्याजोगा असा हाच पहिला ग्रंथकार होय. यानें लिहिलेल्या पहिल्या भागास १४ व्या शतकाच्या शेवटीं दुसऱ्या लेखकानें दुसरा भाग जोडला. तेराव्या शतकांत धर्मप्रसारकांची गाणीं व्हर्जिन मेरीची स्तुतिस्तोत्रें हीं डच भाषेंत पुष्कळ झाली. वाङ्मय या दृष्टीनें जरी वरील काव्यांस कांहीं महत्त्व नसलें तरी वाङ्मयाच्या बाल्यावस्थेंत लिहिण्याचा सराव होण्याकरितां अशा तऱ्हेचे प्रयत्न खरोखरच फारच महत्त्वाचे आहेत. हॉलंड देशांतील भावपूर्ण काव्यें लिहिणारा पहिला कवि, पहिला जॉन, ब्रॅबंटचा डयूक, हा होय. १५४४ सालीं अगदीं प्राचीन डच लौकिक गाणीं पुढें आलीं आणि या पुस्तकांत १४ व्या शतकांतील एक दोन कथानकेंहि आहेत. या कथानकापैकीं ''हेट डाघेट इन डेन ऊस्टेन'' हें सर्वश्रुत आहे. डच लौकिक गीतापैकीं सर्वांत जुनें गीत म्हणजे १२९६ सालीं झालल्या पांचव्या कौंट फ्लॉरिसच्या खुनाचा पोवाडा होय. हेरेमॅन्स व लेडेगँग यांनी प्रथम १८७५ सालीं ब्रँबंट मधील मठवासिनी सिस्टर हेड्विच हिनें तयार केलेल्या काहीं रहस्यात्मक पद्यांचा संग्रह छापून प्रसिद्ध केली तेहि मध्ययुगीत आहे.

आतापर्यंतच्या हकीकतीवरून आपणांस असें दिसून आलें कीं, ''मध्यकालीन डच भाषा सर्वस्वी श्रीमंत लोक व धर्मपंथांचे आश्रम यांच्या वर्णनापलीकडे पाऊल टाकूं शकली नाहीं. साधारण जनतेच्या संबंधाचे व उपयोगाचें असें यांत कांहींच नव्हतें. नंतर १३ व्या शतकाच्या अखेर प्रचलित डच वाङ्मयांत एकदम फेरफार झाला. १३ व्या शतकाच्या अखेर फ्लेमिश शहरांची भरभराट होऊं लागली व पूर्व समुद्रावर व्यापारदृष्टया आपलें वर्चस्व आहे असे फ्लेमिश लोक सांगूं लागलें. दुसरा वुइल्यम व पांचवा मॉरिश यांच्यासारख्या सौम्य राजाच्या अंमलाखाली डॉर्ट व ॲमस्टरडॅम येथील नागरिकांनीं राजकीय स्वातंत्र्यासारखे हक्क पदरांत पाडून घेतले व या स्वातंत्र्यापासूनच डच वाङ्मयाला एक तऱ्हेचें नवीन वळण लागलें. या नवीन वळणाच्या स्वतंत्र वाङ्मयाचा संस्थापक जेकब व्हान मीअरलँट हा होय. यानें १२६३ सालीं लिहिलेले ''नॅटयुरेन ब्लोएम'' हें पुस्तक त्या कालांतील वाङ्मयांत फार श्रेष्ठ दर्जाचें आहे. या पुस्तकांत सर्व समाजाला उद्देशून पुष्कळ नैतिक व औपरोधिक गोष्टी लिहिल्या आहेत. कौंट फ्लॉरिस (पांचवा) याच्या आज्ञेवरून त्यानें १२८४ मध्यें ''डी स्पिघेल हिस्टोरिआएल'' (इतिहासाचा आदर्श) या पुस्तकास सुरुवात केली. हें पुस्तक त्याच्या सर्व पुस्तकांत अप्रतिम साधलेलें आहे. त्याच्या शिष्यांपैकीं जॉन व्हान बोएंडल उर्फ जॉन डी क्लर्क याचें नांव प्रामुख्यानें सांगतां येईल. ऐतिहासिक व नैतिक विषयांवर यानें पुस्तकें लिहिली आहेत. परंतु त्याच्या ग्रंथांत ''शिव्हलरी'' व अद्भुत कथानकें या विषयांवर कांहीच आढळत नाहीं. १३५० सालीं त्यानें 'ब्रॅबंटशे यीस्टेन' हें काव्य संपविलें. या काव्यांत त्यानें ब्रँबंटचा १३५० पर्यंतचा इतिहास ग्रथिक केला होता. मीअरलंडचा यिप्रेसमध्यें राहणारा दुसरा शिष्य जॉन डी बीअर्ट यानें २ बोधपर व औपरोधिक पुस्तकें लिहिली. उत्तर हॉलंडमध्यें वर सांगितलेल्या मीअरलंडच्या दोन शिष्यांहून बुद्धिमान अशा मेलिस स्टोक नावांच्या मठवासीनें १३०५ पर्यंत हॉलंडचा इतिहास लिहिला. हा ग्रंथ १५९१ मध्यें छापला; व पुढें १८८५ मध्यें युट्रेक्ट इतिहासमंडळाकरितां या ग्रंथाचें संशोधन करण्यांत आलें. या ग्रंथांत सर्व गोष्टी बिनचूक दिल्या असल्यामुळें नंतरच्या सर्व इतिहासकारांस या ग्रंथापासून फारच मदत झाली आहे. १४ व्या शतकाच्या माध्यान्हकालीं लोकांचें लक्ष पुन्हां शिव्हलरीकडे वळलें. वुइल्यम (तिसरा)च्या कारकीर्दीत पुन्हां सरंजामी पद्धतींतील रुढींचें पुनरुज्जीवन झालें. साहसी वीरांच्या अद्भुत कथानकांवर काव्यें होऊं लागलीं. याच सुमारास हीलू आणि आकेन यांनीं पौराणिक व अद्भुत यांचें मिश्रण करण्याचा प्रयत्न केला.

चौदाव्या शतकाच्या शेवटी डर्क पॉटर यानें फार जोरदार भाषेंत भक्तिपर काव्यें तयार केली. हा कवि एकदा हॉलंडचा वकील म्हणून रोमला गेला असतांना बोकॅशिओच्या लेखांचा त्याच्या मनावर परिणाम होऊन परत आल्यावर 'प्रेमाचा मार्ग' या विषयावर  ''डर मिनेन लूप'' या नावाचे एक मोठें काव्य लिहिलें. या काव्यांत त्यानें प्रेमाकरितां केलेली अनेक धाडसाचीं कृत्यें वर्णन करून निर्मल व उज्वल प्रेम म्हणजे काय हें समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ग द्य वा ङ् म य.- आतापर्यंत आपण काव्यात्मक वाङ्मय संबंधी विचार करीत आलों. आतां गद्य वाङ्मयांसंबंधी विचार करूं. डच भाषेंत सर्वांत जुनें असे जर कांहीं गद्य सांपडलें असेल तर तें फ्लँडर्स व झीलंड गांवांनां दिलेल्या सनदा होय. या सनदांवर १२४९, १२५१ व १२५४ ही सालें  आहेत.  १३०० मध्यें जुन्या कराराचें गद्य भाषांतर व ख्रिस्ताच्या चरित्राचें भाषांतर झालें. जुन्या वाङ्मयांपैकी अडाणी लोकांकरितां सोप्या भाषेंत जी अद्भुत कथानकें लिहिली आहेत, ती भाषेच्या दृष्टीनें फारच चटकदार झाली आहेत. धा र्मि क ना ट कें:- इतर युरोपियन राष्ट्राप्रमाणें डच वाङ्मयांत देखील धार्मिक नाटकांनीं बरेंच वरचें स्थान पटकावलें आहे. १४०० पासून धर्मपर नाटकांचे प्रयोग हॉलंडमध्यें सुरू झाले आहेत. तशांपैकीं अगदीं अलीकडचें ''विधिरहस्य'' नाटक (कर्ता-स्मेकेन) हें ब्रेडा येथें १५०० त रंगभूमीवर आलें. हें नाटक १८६७ सालीं छापलें. या धार्मिक नाटकाबरोबर लौकिक हास्यकारक फार्सहि करीत असत. वर सांगितलेलीं नाटकें करणाऱ्या नाटककंपन्या पासून ''साहित्य मंदिरें'' या आशयाच्या नांवाखाली वाङ्मयविषयक चळवळी करणारी एक संस्था १५ व्या शतकांत अस्तित्वांत आली. धंद्याच्या संघापासून धंदेवाल्यांना कसकसे फायदे होतात हें हॉलंडच्या कवींना पूर्णपणे कळलेलें होतें. ''कॉलेजेस डी ऱ्हेटॉरिक'' अथवा साहित्यशास्त्राच्या शाळा हें नांव जरी १४४० च्या सुमारास प्रचारांत आलें तरी अशा तऱ्हेच्या संस्था त्यापूर्वीहि बरेच दिवस अस्तित्वांत होत्या. हे साहित्य शास्त्राचें संघ १६ व्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकले आणि बरेच दिवस मध्ययुगीन धोरणावरच चालत असत. हे संघ प्रथम सामान्य जनतेकरितां चमत्कारिक नाटकें व अद्भूत गोष्टी तयार करीत असत. अशा तऱ्हेच्या संघांची वाढ फार झपाट्यानें होऊन प्रत्येक शहरांत साहित्यमंदिरें स्थापन झाली व नवीन नवीन नाटकें रंगभूमीवर येऊं लागलीं. थोड्याच दिवसांनी वाङ्मयपरिषदा भरूं लागल्या व साहित्यमंदिरांच्या तर्फे प्रतिनिधी जाऊं लागले. या परिषदांचे अहवाल उपलब्ध नाहींत. तथापि यांत काय कार्य झालें हें आपणांस सहज पाहतां येण्यासारखें आहे. तत्कालीन नाटकें नीतिपर असत, व फार्स हास्यकारक असत. फार्स लिहितांना फाजील व ग्राम्य विनोद, धर्मोपदेशकांची थट्टा, म्हातारा नवरा व तरणी बायको वगैरे उपकरणांचा उपयोग केलेला आढळतो.

सोळाव्या शतकाच्या मध्यकालांत साहित्यशास्त्रज्ञांनी विविध विषयांवर काव्यें लिहून वाङ्मयाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत हबेअर्ट यानें अग्रेसरत्व घेतलें होतें. याच सुमारास धर्मासंबंधी यूरोपखंडांत प्रचंड खळबळ उडाली व कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट असे दोन पंथ झाले. हॉलंडमधील नव्या पंथाच्या लोकांनीं स्तुतिपर पद्यें या वेळीं रचण्यास सुरुवात केली.

अर्वाचीन डच वाङ्मयाचा खराखुरा प्रारंभ आना बिजन्स या कसलेल्या लेखिकेपासून होतो. आतापावेतों डच भाषा म्हणजे अस्थिर असून तिच्यांत माधुर्य व खुमारी यांचा पूर्णपणे अभाव होता. पण ती उणीव या लेखिकेनें भरून काढली व तिच्या लेखनशैलीमुळें भाषेला सौंदर्य व याथार्थ्यं प्राप्त झालें. व यामुळें या लेखिकेला साहित्यराज्ञी म्हणत असत. या लेखिकेचा काल म्हणजे मध्ययुगीन व अर्चावीन डच भाषेचा संक्रमणकाल होय. याच सुमारास मार्विक्स व कूर्नहर्ट या दोन लेखकांनी अर्वाचीन भाषा फारच जोमदार बनविली. १६ व्या शतकाची अखेर म्हणजे डच वाङमयाचा पुनरुज्जीवनकाल होय. याच कालांत शेमर व्हिशरच्या मुली, हुफ्ट, ब्रडेरो, कॉस्टर, व्होंडेल वगैरे विद्वद्रत्नें हॉलंडला लाभलीं. हुफ्ट यानें हॉलंडचा इतिहास फारच उत्कृष्ट लिहिला आहे. परंतु फक्त इतिहासकार म्हणूनच केवळ तो प्रसिद्ध नसून डच वाङ्मय पूर्णावस्थेस नेणाऱ्यांपैकी तो एक आहे. ब्राडेरिक हा तत्कालीन उत्तम व कसलेला नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानें लिहिलेल्या नाटकांपैकी ''जेरोलिमो दि स्पॅनिश ब्रॅबंटर'' हें आनंदपर्यवसायी नाटक फारच अप्रतिम साधलें आहे. व्होंडेल हा सर्व डच ग्रंथकारांत मोठा होऊन गेला. याचा लेखनव्यवसाय फारच दांडगा होता. वयाच्या सत्तराव्या वर्षी काहीं सांपत्तिक अडचणींत सांपडल्यामुळें यास १० वर्षे म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत या विद्वान गृहस्थास एक पेढीवर नोकरी करणें भाग पडलें. पुढें गांवातंतील त्याच्या चाहत्या नागरिकांनीं त्याला पोटगी देण्याची व्यवस्था केली व नोकरी सोडून स्वतंत्रपणे लेखनव्यवसाय करण्यास त्यास सांगितले. म्हातारपण झालें असतांहि त्याने १० वर्षे आपला व्यवसाय चालू ठेवला व ९० व्या वर्षी तो मरण पावला. पहिल्या प्रतीची बुद्धिमत्ता व कल्पकता यांचे व्होंडेल हें अद्वितीय उदारहरण म्हणतां येईल. सत्तराव्या शतकांत तत्त्वज्ञानविषयांत, बेकर स्पिनोझा व प्रॉटिअस या तिघांनी डच भाषेंत फारच विद्वतापूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. १६०० ते १६५० या अवधींत फारच झपाट्यानें ग्रंथ तयार झालें.

का व्या चा ऱ्हा स.- अठराव्या शतकाच्या प्रारंभी व्हॉन एफेन या लेखकानें काव्यास अजिबात फांटा देण्याचा उपक्रम सुरू केला. टॅटलर स्पेक्टेटर मधील जोरदार लेखांचा एफंनवर परिणाम होऊन त्यानें ॲडिसनचा मुद्दाम अभ्यास केला व स्विफ्ट आणि डीफो यांच्या लेखाची फ्रेंचमध्ये भाषांतरें केलीं. पण पुढें तो स्वभाषेकडे वळला.

अर्वाचीन डच वाङ्मयामध्यें सृष्टिसौंदर्याकडेच विशेष लक्ष दिलें जात आहे. मिसेस गर्ट्रुड बॉस्यूय टाउसेंट, केलर, स्लूट, पर्क, कलूस एर्म्नटस, नेशर वगैरे आधुनिक प्रसिद्ध लेखक आहेत. पर्क आपल्या वयाच्या २१ व्या वर्षी वारला. त्याच्या निधनानंतर त्याचें अप्रकाशित काव्य त्याच्या भक्तांनीं लोकांपुढें आणलें. क्लस, एम्टटस व नेशर यांनींहि आपापल्या परीनें वाङमयाची सेवा बजावली आहे व सध्यां डच भाषेंत जें विविध विषयांवर वाङ्मय झपाट्यानें बाहेर पडत आहेत. त्याचें श्रेय या लेखकांसच दिलें पाहिजे. डच वाङ्मयाच्या इतिहासांत १८८२-१८८८ हा काल फारच महत्त्वाचा आहे. हा काल म्हणजे वाङ्मयाच्या उत्कांतीचा काल होय. जुनें म्हणून सर्व कांहीं नाहीसें होऊन सर्व नव्या विचारानें परिप्लुत असें वाङ्मय या काळांत तयार होऊं लागलें.

१९ व्या शतकांत हॉलंडमध्यें व हॉलंडच्या वाङ्मयामध्यें व्यक्तिवादाची छटा प्रामुख्यानें दिसत होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून तिचा प्रघात नाहींसा होऊं लागला. महाकाव्यें लिहिणाऱ्यांमध्यें मार्सेलस एजंटस हा प्रमुख होय. याच्यावर फ्रेंच निसर्गवाद व तत्त्वज्ञान यांचा व इब्सेनच्या लिखाणाचा फार परिणाम झालेला दृष्टीस पहतो. याची 'वान' व 'लीफ डेलेवेन' हीं महाकाव्यें अतिशय प्रसिद्ध आहेत. याशिवाय अर्मन रॉबर्स (रोपन वान ईनगेझीनचा कर्ता), इना बोडीएर बक्केर (आर्मोडेचा कर्ता), टॉफनेस, हेयरमन्स क्वेरीडो यांची काव्येंही प्रसिद्ध आहेत. अर्वाचीन अद्भुत का्वयाच्या लेखकांमध्यें शेंडेल, मोयर कर्केन, ओर्ट हे प्रसिद्ध आहेत. कौपेरस याचें एनबर्ग व्हॉन लिक्ट, इल्कंदर इत्यादि ग्रंथहि लोकप्रिय आहेत. बुद्धिप्रधान गीतलेखकांमध्यें बोटेन्स हा महशूर असून त्याचे 'कार्मिना' व 'प्रेल्यूडेन'' हे  गीतखंड फार नावाजलेले आहेत. त्याशिवाय या क्षेत्रातं लीवु ईक, गोसाएर्ट, ब्लोएम, स्फीनहॉफ इत्यादि लेखकांची नांवें प्रसिद्ध आहेत. नाटयवाङमयामध्यें मुख्यत: हेरमन्स (हूप व्हॉन झेगेनचा धट्टो, या नाटकांचा कर्ता) मिसेस सायमन्समीज ('डेव्हेरोरार' नाटकाची कर्ती), करमन , शेथाईस, व्हर्केड हे चमकतात. चर्चात्मक वाङ्मयामध्ये व्हर्वे हार्डेन व इडेन यांची नांवें श्रुत आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .