प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
            
हाँगकाँग- आशिया, लॅड्रोन्स नांवाच्या द्वीपसमुच्चयांतील एक बेट. ही ग्रेट ब्रिटनची क्राऊन कॉलनी (बादशाही वसाहत) आहे. हें बेट चीनच्या आग्नेय दिशेस आहे. याची लांबी १०॥ मैल व रुंदी २ ते ५ मैल असून क्षेत्रफळ ३२ चौरस मैल आहे. लोकसंख्या (१९२१) ६२५१६६. याचा किनारा ओबडधोबड असून दक्षिणेस डीपवार व टायहॅम असे दोन उपसागर आहेत; त्यांच्या आश्रयानें आवडीने गांवाचें उत्तम बंदर तयार झालें आहे. या बेटाचें चीनच्या किनाऱ्यापासून किमान अंतर एक मैल आहे. या बेटाजवळच लामा नांवाचें एक बेट आहे. त्यांत स्टेनहौस नांवाचा ११४० फूट उंचीचा एक डोंगर आहे. राज्याचें व व्यापाराचें मुख्य ठिकाण व्हिक्टोरिया हें असून त्याच्या आजूबाजूस व बेटाच्या पश्र्चिम किनाऱ्यावर पुष्कळ उद्यानगृहें आहेत. या बेटांत डोंगर फार आहेत. त्या सर्वांत मोठा डोंगर 'व्हिक्टोरिया पीक', हा असून त्याची उंची १८२५ फूट आहे. किनाऱ्याजवळ तांदूळ व बटाटे यांची लागवड करण्यांत आलेली आहे. आंबे, नारिंगें व सफरचंदहि होतात. जमीनीवरील कांसव व अनेक प्रकारचे विषारी सर्प येथें आढळतात. वाळवी तर अतिशयच आहे. डोंगरांत इमारती दगड सांपडतो. १८६० च्या तहानें कोवलून  द्वीपकल्प इंग्रजास मिळून तें  हाँगकाँगला जोडण्यांत आलें. याचें क्षेत्रफळ ५ चौरस मैल आहे. येथील व्यापार वाढत चालला आहे. १८९८ त इंग्रजांनीं कोवलून द्वीपकल्पाच्या मागचा, मिर्स उपसागरापासून डीप उपसागरापर्यंत मुलूख व शेजारची बेटें ही ९९ वर्षांच्या करारानें घेतलीं. या नवीन प्रदेशाचें क्षेत्रफळ ३५६ चौरस मैल आहे; प्रदेश डोंगराळ आहे, परंतु दऱ्या सुपीक असून वर्षांतून तांदुळाची दोन पिकें निघतात. शिवाय ऊंस, नीळ, ताग, बटाटे, वाटाणें, तीळ व भाजीपाला बराच तयार होतो. खनिजांची अजून माहिती लागली नाहीं. लोकसंख्या सुमारें १००००० आहे. यांत पुंटी (शेतकरी), हक्का (डोंगरी लोक) व टंक (नाविक लोक) हे लोकवर्ग आहेत. या बेटांतील मुख्य शहर व्हिक्टोरिया आहे. याला हाँगकाँगहि म्हणतात. येथील लोकसंख्या ३५०००० असून त्यांत ६००० वर यूरोपीयन किंवा अमेरिकन आहेत. प्राया ही बंदराची जागा आहे. याच्या पुढें बाजारपेठ आहे; येथें चिनी लोकांची दाट वस्ती आहे. याच्या पुढें थोड्या उंच भागावर सरकारी इमारती व कचेऱ्या आहेत. व त्यांच्याहि पलीकडे पीकवर बंगले व खाजगी इमारती आहेत. हीच उन्हाळयांत रहाण्याची जागा होय. पोकफोलम व हायटोंम हे दोन मोठे तलाव शहरास पाण्याचा पुरवठा करतात. येथील हवेचें उष्णतामान ४५ व ९९ अंशांच्या दरम्यान असतें. मे महिन्यांत पावसाळा सुरू होऊन तीन महिनें रहातो. सरासरी ९० इंच पाऊस पडतो.

शिक्षणाकरितां कांहीं सरकारच्या मदतीनें चालणाऱ्या शाळा येथें आहेत. हिंदूकरितांहि एक शाळा आहे. त्यांत १०० पर्यंत विद्यार्थी असतात (१९२३). हाँगकाँग युनिव्हर्सिटी मार्च १९१० सालीं स्थापन झाली. वैद्यक, स्थापत्य व कला या विषयांच्या शाखा आहेत. एकंदर विद्यार्थीसंख्या (१९२२) ३०९. येथें दवाखानेंहि पुष्कळ आहेत. तेथील पोलिसांत यूरोपियन, हिंदुस्थानांतील शीख, व चिनी लोक आहेत; व लष्करहि बरेंच मोठें आहे. चिनी दळाचें हें मुख्य ठाणें आहे. शेतकी खेरीज साखर, सिमेंट, व कागद तयार करणें, लांकूड व हस्तिदंत यांवर कोरीव काम करणें, सोनें, चांदी, व चंदन यांचे जिन्नस तयार करणें, व छत्र्या, रॉकेल, आगपेट्या तयार करणें इत्यादींचे कारखाने येथें आहेत कापसाची लागवडहि आहे. येथील आयात व निर्गत मालाची किंमत प्रत्येक सुमारें ६५ कोटी पौंड आहे.

हें बेट चीननें ग्रेटब्रिटनच्या ताब्यांत १८४३ त पूर्णपणें दिलें. येथील राज्यकारभार एका गव्हर्नरच्या हातांत असून त्याला कायदे करणारें मंडळ व कार्यकारी मंडळ अशीं दोन मदतमंडळें आहेत. कार्यकारी मंडळांत बहुतेक सरकारी अधिकारीच असतात व कायदे करणाऱ्या मंडळांत हेच असून शिवाय त्यांत ६ बिन सरकारी सभासद असतात. या सहांत १ किंवा २ चिनी असतात. १९२३ सालीं हाँगकाँगचे उत्पन्न सुमारें २८ लक्ष पौंड होतें. जमीनमहसूल, लायसेन्स, खाणीचें भाडें, अबकारी वसूल व अफूचा मक्ता या मुख्य उत्पन्नाच्या बाबी होत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .