विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हळशी- मुंबई इलाख्यांतील बेळगांव जिल्ह्यांत खानापूर तालुक्यांत हें खेडेंगांव आहे. हें कदंब राजाच्या राजाधानीच्या ठिकाणावर वसलें आहे. या ठिकाणीं वराह नरसिंह व सुवर्णेश्वर या देवांचीं प्राचीन देवालयें आहेत. या ठिकाणीं ११६९ सालांतील वराहनरसिंहाच्या देवळावर खोदलेला एक शिलाळेख आहे. १८६० साली चक्रतीर्थाजवळ सहा ताम्रलेख सांपडले व त्यावरून जैनधर्मी कदंबराजे यांनी ५ व्या शतकांत देवळाकरितां देणग्या दिल्याचा उल्लेख सांपडतो. हळशी गांवाला पूर्वी पळशिक, पळशी हळसिगी असेंहि म्हणत असत.