प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
               
हळद- (संस्कृत-हरिद्रा, गुजराथी-हळदर) हळद राहिल्याप्रमाणें जमिनींत होते. हळदीचें झाड कमरेइतकें उंच वाढतें. त्याला कर्दळीसारखीं पानें येतात. या पिकांची लागवड सर्व हिंदुस्थानांत होते. मद्रास इलाख्यांत व बंगाल्यांत हें पीक विशेष होतें. मुंबई इलाख्यांत मुख्यत्वें करून सातारा, सोलापूर, सांगली, मिरज वगैरे ठिकाणीं हळदीची बरीच लागवड होते. एकंदर हिंदुस्थानांत या पिकाखाली सुमारें एक लक्ष एकर जमीन असतें, व मुंबई इलाख्यांत दरवर्षी सुमारें पांचसहा हजार एकरांत या पिकाची लागवड होते. मोरशी, वर्धा वगैरे ठिकाणीं हळदीची जुजबी लागवड आढळतें.रंगाकरितां हळद परदेशीं रवाना होते. १८९५-९६ सालीं हळदीची निर्गत सुमारें आठ लक्ष रुपयांची होती. इ. स. १९१३-१४ मध्यें १ १५००० टनांची (किंमत १३१२०००रु.) व १९१४.१५ सालीं ६४००० टनांची (किंमत ६५९००० रु.) निर्गत झाली. हळदीच्या तीन जाती आहेत. एका आंबेहळद, ही औषधाकरितां लावितात. दुसरी कठीण कुड्याची (लोखंडी) ही रंगासाठी उपयोगी पडते व नरम जातीची पुड स्वयंपाकांत व औषधांत वापरतात. हळदीला आल्याप्रमाणेंच जमीन लागते. हळद मध्यम काळ्या जमीनींत चांगली पोसते. जमीन नांगरून वगैरे तयार केल्यावर तींत दर एकरी शेणखताच्या तीस गाडयांपर्यंत खत घालितात व तीत हमचौरस १० X १० फुटाचे वाफे करतात. हळदीचा फेरपालट ऊंस, मिरच्या, भुईमुग, कांदे वगैरे पिकांशी करतात. हळदीची लागवड पावसापूर्वी आल्याप्रमाणें करतात. बियाणें दर एकरी सुमारें एक हजार पौंडापर्यंत लागतें. बाकी सर्व लागवड आल्याप्रमाणेंच असते. हळद आठ महिन्यांत तयार होते. ती तयार झाली म्हणजे पानें वाळून जमिनीवर पडतात व  लोळूं लागतात.  हळद कुदळीनें खणतात व ज्यांस कांब फुटलेले असतात ते पुढील सालाच्या बियाकरतां तयार करितात.

ह  ळ द त या र कर ण्या ची री त:- हळद, गुऱ्हाळांत गूळ शिजविण्याच्या काइलींत तयार करतात. कढई चुल्यावर ठेवून हळदीचा कढईंत ढीग करून तींत शिजविण्यास लागेल इतकें पाणी ओतून त्यावर वाळलेली हळदीची पानें, जुनीं पोती वगैरे घालून त्यावर शेणाचा अगर चिखलाचा लेप देतात. नंतर खालीं जाळ लावतात. सुमारें दीड तासांत हळद शिजून तयार होते व हाताला मऊ लागते. ती जरा थंड झाल्यावर बाहेर काढून आठ दिवस उन्हांत वाळवितात. वाळल्यानंतर तिला विक्रीसाठी रंग आणावा लागतो. हें रंग आणण्याचें काम कुडी चोळून करावें लागतें. साताऱ्याकडे एक दगडी फरशीचा वाफा करून त्यांत हळद ओततात. नंतर दोन गडी पायाला गोणपाट बांधून समोरासमोर बसून पायानें कुडी फरशीवर घांसतात. यायोगानें बाहेरील पातळ कुड्याचां पापुद्रा निघून कुडीं पिवळी धमक होतात. हेंच काम करण्यास सातारा जिल्ह्यांत गिरण्या झाल्या आहेत. चोळण्याचें काम करण्याकरितां एक सिमेंटचें मोकळें टीप घेऊन त्याचें तोंडें बंद करावे. नंतर त्याच्या गर्भांतून एक लोखंडी खांब घालावा. टिपाच्या एका कुशीला ९ इंच लांब व ६ इच रुंद असें एक तोंड पाहावें. नंतर ते टीप दोन खांबांवर आडवें ठेवून फिरवावें. या टिपांत अर्धे टीप वाळलेली हळद घालून त्यांत थोडेसे दगड मिसळावे व तोंड बंद करून आंखाला बसविलेल्या हातानें वाटोळें अगर अर्ध चंद्राकार गतीनें मागेंपुढें फिरवावें. या टिपाला ४ ते ६ इंच अंतरावर टिपाच्या भोंवताली भोंकें पाडावी म्हणजे आंतील धुराळा सहज बाहेर पडतो. दगडांनीं हळद लवकर चोळली जाते. रंग चांगला वठवा म्हणून हळदीवर एक दोन वेळ पाणी शिंपावें.

दर एकरी सरासरी उत्पन्न ४००० पौंड वाळलेली हळद व तितकीच ओली हळद बियाण्याकरितां होते. या दोहोंचीं किंमत अदमासें ३०० रुपये व खर्च सुमारें २०० रुपये पडतो. म्हणजे निव्वळ फायदा १०० रुपयें होतो. वाळलेली हळद ओल्या हळदीच्या एकअष्टमांश उतरते. हळदीचा स्वयंपाकांत व औषधांतहि फार उपयोग होतो. हळदीचे गंध लावण्याचे रवे तयार करतात. हळदीचा पिंवळा रंग होतो. गुजराथेंत ओल्या हळदीचें लोणचें घालतात. आंबेहळद रक्तविकारनाशक आहे. ही अंगास लाविल्यास कंडूचें शमन होते.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .