प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
               
हस्तिदंत- हत्तीचा दांत किंवा विशेषत: पुरुषहत्तीचा दांत यालाच हस्तिदंत ही संज्ञा आहे. आफ्रिकेंत नर व मादी या दोघांनांहि चांगलें मोठाले सुळे असतात. हिंदुस्थानांत मादीला फारच लहान सुळें असतात. सिंहलद्वपांत तर दोघांनाहि सुळे नसतात. हस्तिदंत फार घट्ट व कठीण असतो. याला सूक्ष्म भोकें असतात; ती फार जवळ जवळ असतात व त्यांत सरसासारखा द्रव भरलेला असतो. यामुळें हस्तिदंतावर पालिश चांगले चढतें. हस्तिदंत हा हाडापेक्षां जास्त तंतुमय असतो व म्हणून मोडण्याची किंवा तुटण्याची याला भीति नसते. हत्तीचें सुळे लहानपणीं दातांच्या वरच्या बाजूस फुटतात. लहानपणी ते कोंवळे व थोडे मऊ असतात. जसजसे ते मोठे होत जातात तसतसे स्फुरितें व इतर पदार्थ यांत शोषिले जाऊन ते घट्ट बनतात. याच्या दातांचा पुष्कळसा भाग डोक्याच्या कवटींत घुसलेला असतो. तेथें तो आंतून पोकळ असतो. व ही पोकळी पुढें पुढें बारीक होत जाऊन शेवटी बारीक दोऱ्याच्या रूपानें दातांच्या शेवटापर्यंत जाते. याशिवाय पाणघोडा (हिपापोटेमस), वालरस, नारबल, व देवमाना व कांही जातीचे रानटी डुकर याचे देखील सुळे बाजारांत हस्तिदंत या नावाखालीं विकले जातात. आफ्रिकेंतून पुष्कळ हस्तिदंत परदेशी पाठविला जातो. सैबीरियामध्यें लेना नदीच्या काठीं जुन्या काळचे हस्तिदंत सांठविलेले सांपडतात. सैबिरीयांतील खाणीचें काम आज २ शतकें चाललें आहे. परंतु तेथील हा सांठा कोळशाच्या खाणींप्रमाणें अगाध आहे असें दिसतें. आफ्रिकेच्या पूर्वकिनाऱ्यावर सांपडणारे हस्तिदंत मऊ असतात व ते पहिल्या प्रतीचे समजले जातात. हा दंत ताजा कापला असतां पारदर्शक असतो. आशियांतील दंत दाट पांढऱ्या रंगाचा असतो, व त्याची घटना दाट नसते. याला पालिश चढविणें कठीण असतें. हस्तिदंताला हाडाप्रमाणें अगोदर तयार करावा लागत नाहीं. तो एकदम कामाला लावतां येतो. कामेरून येथील हस्तिदंत सर्वांत उत्तम. त्याच्या खालोखाल लोआंगो, कांगो, गबून व अंब्रीझ येथील दंत. फ्रेंच सूदन व अंब्रीझ येथील हस्तिदंतावर वाटोळीं चक्रें दिसतात. झांझिबार व मोझांबिक येथील दंत मऊ असतो. सयाम येथील दंत मऊ नसतो. अबिसीनियाचा थोडा मऊ असतो. परंतु याची वरची साल (कवच) फार जाड असते. ईजिप्तमधील दंताला भेगा पडतात. एकदम उष्णमान कमी जास्त झालें असतां हस्तिदंत भेगलतो म्हणून हस्तिदंताचें पदार्थ फार काळजीनें ठेवावे लागतात.

हस्तिदंत इतका लवचीक असतो कीं त्याचे लांब घोडे हाकण्याचें कांही चाबूक केलेले आहेत. आशियांतील हस्तिदंत साधारण ५० पौंडापेक्षां जास्त वजनाचे नसतात. तरी कधीं कधीं ९ फूट लांब व १५० पौंड वजनाचें सुळे तेथें सांपडले आहेत. पाचव्या जॉर्ज बादशहाला त्याच्या लग्नाच्या वेळी नजर केलेला हस्तिदंत ८ फूट ७॥ इंच लांब व १६५ पौंड वजनाचा होता. यापेक्षाहि लांब हस्तिदंत असतात. कांही काळापूर्वी बहुतेक सर्व हस्तिदंत लंडनमध्येंच जात असे. सध्यां अंटपूर्व येथे याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. अमेरिकेंत फार हस्तिदंत खपतो दरसाल खुद्द इंग्लंडात ३०-४० हजार हत्तींचे सुळे जातात हे सर्वच हत्ती मारून आणिले जातात असें नाहीं. आफ्रिकेंतील रहिवाशांजवळ त्याचा बराचसा भाग सांठविलेला च असतो, व कांही हत्ती म्हातारे होऊन मरतात. इंग्लंडांत याचा भाव दर हंड्रेडवेटास ५५ पौंडप्रमाणें चढला होता. १९०४ सालीं ९०४६ हंड्रेडवेट हस्तिदंत इंग्लंडांत गेला होता.

उ प यो ग.- हा कित्येक प्रकारांनीं उपयोगी पडतो. याचे बिलियर्ड खेळण्याचें चेंडू, चाकूसुऱ्यांच्या मुठी, बाजाच्या पेट्यांतील सुरांचे पडद, फण्या व इतर शृंगाराचें पदार्थ करितात. हे पदार्थ केल्यावर जो चुरा उरतो, तो देखील बाजारांत विकला जातो. या चुऱ्याचा उपयोग चिनी शाई करण्याकडे होतो. व कांहीं लोक याची शिजवून खीर करून खातात. बिलियर्ड खेळण्याचे चेंडू तयार करण्यासाठींच पुष्कळसा चांगल्या प्रतीचा हस्तिदंत खपतो. हे चेंडू काढून घेतल्यावर जी कडीं राहतात. ती हिंदुस्थानांत बांगड्या म्हणून खपतात.

व न स्प ति ज न्य ह स्ति दं  त.- दक्षिण अमेरिकेंत फायटेलिफ्स या नांवाचें झाड आढळतें. याचें बुंध लठ्ठ असतें व याला १२ ते २० मोठाली पानें असतात. यांत नर व मादी असा भेद असतो. याला नारळासारखें मोठें फळ येतें. या  फळांत कोंवळेपणीं फक्त पाणी असतें. व त्याचें हळू हळू खोबरें होत जाऊन मग फळ पिकल्यावर आंत एक घट्ट गोळा होतो. याला हस्तिदंताप्रमाणेंच उपयोग करतात.

कृ त्रि म ह स्ति दं त- बटाट्यावर गंधकाम्लाची क्रिया होऊन कृत्रिम हस्तिदंत होतो. तसेंच सेल्युलॉइड याचाहि उपयोग हस्तिदंताप्रमाणें होतो. बेंझोलिनचें बिलिडयर्डचें चेंडू करितात.
 
इ ति हा स.- इतिहास ज्या काळापासून उपलब्ध आहे. त्याच्या पूर्वीपासून हस्तिदंती काम होत असे असें दिसतें. यानंतर ईजिप्त व असुरीया येथील राजघराण्यांत हस्तिदंती सामान असें झ्यूस अथीना यांचे मोठाले हस्तिदंती पुतळे होते. असें जुन्या लेखांवरून दिसतें. यांचे हात, पाय, तोंड इत्यादि अवयव हस्तिदंतीच आहेत. इतक्या मोठ्या रुंदीचा हस्तिदंत त्यांना कोठें मिळाला असावा तें समजत नाहीं. कदाचित हस्तिदंत मेणासारखा मऊ करून पुन्हां घट्ट करण्याची कला त्यांत अवगत असेल. सध्यां तरी तशी कला उपलब्ध नाहीं. हल्लीं तो मऊ करतां येतो पण तो पुन्हां कठीण होत नाही. १३ व्या व १४ व्या शतकापर्यंत याचा उपयोग देवांदिकांचीं चित्रें व पूजेचीं उपकरणें करण्याकडेच होत असे. परंतु पुढें फण्या, आरशाच्या पेट्या, तरवारीच्या मुठी इत्यादि पदार्थ करण्याकडे त्याचा उपयोग होऊं लागला. ईजिप्त देशांतील लोक या कामांत फार कुशल होते असें प्राचीन लेखांवरून कळतें. ते एथिओपियांतून हस्तिदंत आणीत असत. इंग्लंडांतील व केरो देशांतील पदार्थसंग्रहालयांत कित्येक जुन्या वस्तू सांठविलेल्या आहेत. एक नकशीदार पेयी आहे ती ख्रि. पू. ४००० त तयार केलेली असावी. लेयर्ड यानें १८४० त सध्यांच्या मोसल शहराच्या समोर पुष्कळ प्रदेश खणून काढला. त्यांत सापडलेल्या वस्तू अगदीं कुजून गेलेल्या होत्या परंतु त्या सरसांत उकळल्यानंतर त्या हात लावण्याइतक्या बळकट झाल्या. यांतील कांहीं इंग्लंडांतील व कांहीं बाहेरील पदार्थसंग्रहालयांतून ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानांत फार प्राचीनकाळापासून हस्तिदंताचा उपयोग करीत. स्टीन यानें (एन्शंट खोतान) उल्लेखिलेला हस्तिदंत हा हिंदुस्थानांतील हस्तिदंताचा अत्यंत प्राचीन नमुना होय असें कित्येक विद्वानांचें मत आहे. हा खोतानमधील ओलवणांत सांपडलेला हस्तिदंत सुमारें ८ व्या शतकांतील असावा असा पुष्कळांचा तक आहे. हिंदी राजेलोकांच्या शस्त्रागारांत, अशा किती तरी कट्यारी आढळतील कीं, ज्यांच्या मुठी भूमिगत हस्तिदंताच्या किंवा 'वालरस' प्राण्याच्या दातांच्या केलेल्या आहेत. या शस्त्रांपैकी कित्येकांच्या मागें एक किंवा एकाहून अधिक शतकांचा इतिहास आहे. हिंदुस्थानांत दिल्ली, मूर्शिदाबाद, म्हैसूर व त्रावणकोर येथें आणि ब्रह्मदेशांत मौलमीन येथें हस्तिदंताचें उत्कृष्ट खोदकाम होतें. हिंदुस्थानांत हिंदु लोकच हें काम करतात. हस्तिदंती कातकाम मात्र हिंदुस्थानांत व बहुतेक सर्वत्र करण्यांत येतें. तथापि आग्रा, अलवार, बिकानेर, जोधपूर, अमृतसर, लुधियाना, पतियाळा, इत्यादि ठिकाणें विशेष प्रसिद्ध आहेत. कंगव्याचा उपयोग करणें ही शीख लोकांत एक प्रकारची धार्मिक बाब मानली असल्यामुळें, अमृतसर येथें आणि पंजाबांतील कित्येक शहरांत, उत्तम प्रतीचें कंगवे तयार करतात, कित्येक ठिकाणीं तर, खुर्च्या, हौदे, सिंहासनें इत्यादि वस्तूंकरितां सगणित द्रव्य खर्च करण्यांत येतें. हत्तीच्या सुळयांचें दोरे कापून त्यांच्या चट्या व पंखें तयार करतात. दिल्ली, भरतपूर, मूर्शिदाबाद, टिप्पेरा इत्यादि स्थळें हस्तिदंताच्या चट्यांविषयी प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानांतील पुष्कळशा भागांत लांकडी सामानावर हस्तिदंती नकशीकाम करतात. म्हैसूर, पंजाबामधील हॉशिअरपूर व बंगालमधील मोंगीर या तीन ठिकाणीं हें काम जास्त कुशलतेनें करण्यांत येतें. या कामीं कित्येक वेळां हाडाचाहि उपयोग करतात.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .