विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हसन- म्हैसूर संस्थान, हसन जिल्ह्याचें मुख्य शहर. म्हैसूर रेल्वेच्या म्हैसूर-अर्सिकरे फांट्यावर हें स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें ८०००. मूळचें हसन शहन चेन्नापट्टण येथें ११ व्या शतकांत चोल राजाच्या एका अधिकाऱ्यानें वसविलें व त्या वंशजांच्या ताब्यांत तें बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत होतें. पण हें घराणेंनामशेष झाल्यामुळें होयसळ राजांनीं दुसऱ्या एका सरदारास तें दिलें व त्या सरदारानें हल्लीचें शहर व किल्ला ही बांधिलीं. पुढें विजयानगरच्या राजछत्राखालीं हें बेलूर राज्याचा भाग होतें. व १६९७ सालीं तें म्हैसूरच्या राज्यांत समाविष्ट झालें.