प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
             
हंरिपंत फडके- हरि बल्लाळ फडके हा बाळंभट नांवाच्या नानाफडणिसाच्या घरच्या एका भिक्षुकाचा मुलगा. नाना फडणीस लहान असतां घराच्या एका भिक्षुकाचा मुलगा. नाना फडणीस लहान असतां घरचा कारभार हरिपंतांचा भाऊ बापू बल्लाळ पहात असे. पानपतच्या लढाईंत बापू पडला. इ. स. १७६२ त थोरले माधवराव पेशवे यांनीं हरिपंताची आपल्या कारकुनीच्या जागीं योजना केली. या कामांत हा जात्या फार वाकबगार झाला. त्याच्यावर श्रीमंतांची बहाल मर्जी असून केळशी महालची देशमुखी त्याला वतन देण्यांत आली होती. नारायणरावाच्या वधानंतर हा बारभाईच्या कारस्थानांत येऊन सामील झाला (१७७४) राघोबा कर्नाटकांतून पुण्याकडे यावयास निघाला तेव्हां याची त्यावर योजना झालीं होती. यानें मोरोबा प्रभृति मंडलीचीं पत्रें पकडून सवाईमाधवरावास आपल्या ताब्यांत घेण्याचा त्यांचा कट उघडकीस आणला (१७७४).

राघोबाचा पाठलाग करण्यास नानाबापूंनीं याची नेमणूक केली होती. माहीतीरीं राघोबाची फौज छावणी देऊन राहिली असतां यानें तिजवर अचानक छापा घालून तिला उधळून लाविली (१७ फेब्रु. १७७५). यावेळीं हरीपंताबरोबर होळकर व शिंदे यांच्या फौजा होत्या. होळकर व शिंदे हरीपंतास सोडून माळव्यांत गेले. राघोबा व इंग्रज यांचीं सैन्ये गुजराथेंत असतांना त्यांच्या लोकांच्या व हरिपंताच्या लहान लहान चकमकीं होतच होत्या (एप्रिल व मे १७७५) ता. १८ मे सन १७७५ रोजीं कर्नल कीटिंग राघोबासह पुण्यावर चालून येत असतां त्यांच्यां सैन्याशीं हरिपंतांनी आराम येथें लढाई दिली. इंग्रजांच्या तोफखान्याच्या माऱ्यामुळें अखेर जरी मराठयांचा पराभव झाला तरी या लढाईत इंग्रजाचें बरेंच नुकसान झालें. यानंतर नर्मदातीरी भाऊपीर येथें इंग्रजांच्या व याच्या सैन्याची गांठ पडण्याचा पुन्हां मोका आला होता. परंतु यानें आपल्या तोफा नदींत टाकल्या व अवजड सामान नदीपार करून नर्मदेच्या उतरतीरानें पूर्वेकडे हा घाईघाईनें निघून गेला (११ जून १७७५).इ. सन. १७७७ च्या पावसाळ्यानंतर हरीपंत फडक्याची हैदरअली वर पुणें दरबाराकडून रवानगी झाली. तो कर्नाटकांत आल्यावर त्याच्या सैन्यांतील मानाजी फकडे नांवाच्या सरदारास बाजीपंत बर्वे यानें हैदराकडे वळवून घेतलें. दुसरें दिवशीं कित्येक मानकरीहि त्याच्या मागोमाग हैदराकडे जाणार होते. परंतु यानें प्रथम मोठ्या शिताफीनें आपलें सैन्य मागें घेतलें व नंतर यशवंतराव माने नांवाच्या फितूर झालेल्या सरदारास तोफेच्या तोंडी देऊन आपल्या सैन्यांतील फितुरी कारस्थानांस आळा घातला. इ. स. १७७८ च्या आरंभाला हैदरानें कोपळ घेतलें व एप्रिल महिन्यांत धारवाडास वेढा दिला. यावेळी हरिपंतास पुण्याला येण्याविषयी हुकूम झाला असल्यामुळें त्यानें महादजी शिंद्याच्या सैन्यास मिळण्याकरितां आपण मिरजला जात आहों असें दाखविलें; व जेव्हां हरीपंत आतां महादजी शिंद्यासुद्धां आपल्यावर चालून येणार अशी हैदरास भीति वाटून त्यानें याच्याशीं तहाचें बोलणें लावलें, तेव्हां यानें त्यापासून बरीच खंडणी उकळली. हरीपंत व महादजी शिंदे हे दोघेहि कर्नाटकांतून पुरंदरास येऊन पोहोचलें तेव्हां नाना फडणवीसाच्या पक्षास जोर येऊन त्यानें यांच्या मदतीनें सर्व अंत:कलह मोडून सत्ता आपल्या हाती घेतली. इंग्रजांचें मराठ्यांशीं झालेल्या पहिल्या युद्धांत इ. स. १७८१ च्या आरंभास गॉडर्ड पुण्याच्या रोखें घालून येण्याकरितां निघाला तेव्हां हरीपंत फडके कोंकणांत होता. इंग्रज सैन्यांस घाटाकडे येतांना पाहून हरीपंत घांटावा बंदोबस्त करून पुण्यास आला, व तेथें हा व तुकोजी होळकर यांनी नाना फडणविसाच्या मुख्य सैन्याचें आधिपत्य स्वीकारून इंग्रजांनां तोंड देण्याकरितां ते सर्व घाटांकडे आलो. टिपूवरील पहिल्या मोहिमेचें अधिपत्य हरीपंतांकडे देण्यांत आल्यावरून तो सन १७८५ सालच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेच्या सुमारास पुण्याहून निघाला; सन १७८७ सालच्या एप्रिल महिन्यांत टिपूशीं तह होईपर्यंत तो त्या मोहिमेतच होता ('टिपू' पहा).

सन १७९१ च्या आरंभास हरीपंत फडक्याची टिपूवरील दुसऱ्या मोहिमेंत पुण्याहून रवानगी करण्यांत आली. १७९२ सालच्या फेब्रुवारीअखेर टिपूशीं तह झाल्यावर मार्च महिन्याच्या शेवटीं दोस्तांची लष्करें आपापल्या मुलुखांत जावयास निघालीं तेव्हां हरीपतंहि आपल्या फौजेसह महाराष्ट्रात यावयास निघाला व मे महिन्याच्या २५ व्या तारखेस पुण्यास येऊन दाखल झाला. या मोहिमेंतील हरीपंतांच्या कामगिरीविषयीं हकीकत 'टिपू सुलतान' या लेखांत सांपडेल.

१७९३ सालीं महादजीनें नानाच्या कारभारांत केलेल्या ढवळाढवळीमुळें त्या दोघांमध्यें उपस्थित झालेला कलह हरीपंत फडक्यानें मध्यस्थी करून महाप्रयासानें शांत केला. हरीपंत १७९४ त वारला. हरीपंताचा मुलगा बाबा फडके हा खडर्याच्या लढाईंत जरिपटक्याचा अधिकारी होता. याची मुलगी बाजीरावाला दिली होती. हा नानाफडणवीसाच्या बाजूचा असल्यानें बाजीरावानें याचा फार छळ केला. दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धांत हा भोंसल्यांनां मदत करीत होता. पुढें इंग्रजांच्या सांगण्यावरून बाजीरावानें त्याला वसईच्या किल्ल्यात अटकेंत ठेविलें होतें. तेथेंच तो मरण पावला याचे वंशज पुण्यास आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .