प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
           
हंथवड्डी-- दक्षिण ब्रह्मदेशांत पेरू भागांत हा जिल्हा आहे. याचें क्षेत्रफळ ३०२३ चौरस मैल आहे. ह्या जिल्ह्याच्या दक्षिणेस फळबागा पुष्कळ आहेत. जिल्ह्यांत मुख्य नदी लाइंग ही आहे. जिल्ह्यांतील हवा कोंदड व निरुत्साह उत्पन्न करणारी आहे, पण एकंदरीत प्रकृतीस अपायकारक नाहीं. ह्या जिल्ह्यांत मेपासून सप्टेंबरपर्यंत पाऊस सरासरी ९० इंच पडतो. कांहीं भागांस पाण्याच्या पुरांचें फारच भय आहे. इ ति हा स.--हंथवड्डी हें नांव हंथ व वाडी ह्या दोन शब्दांपासून बनलेलें आहे, व त्याचा अर्थ हंस पक्ष्याची नदी असा आहे. ह्या नांवाबद्दल अशी दंतकथा आहे कीं, दंतकाथांच्या कालामध्यें स्वचीडान देऊळ ज्या टेंकडीवर आहे तेवढीच टेंकडी जलपृष्ठावर होती व ह्या टेंकडीवर एका जन्मीचा गौतम हंसरूपानें रहात असें. प्राचींन काळीं हा भाग तलैंग राज्याचा होता. पुढें तलैंग राजाचा पराभव ब्रह्मी लोकांनीं केला व तंगू राज्य स्थापन झालें. १६ व्या शतकाच्या अखेरीस यूरोपियन वसाहती येथें होऊं लागल्या. दुसरें ब्रह्मी युद्ध संपल्यावर हा सगळा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यांत गेला. ह्या जिल्ह्यांत बरींच देवळें आहेत. लोकवस्ती.-लोकसंख्या (१९२१) ३६४६२४ येथील लोक मुख्यत: बौद्ध आहेत पण हिंदूहि बरेच आहेत, व ते कूली वर्गांतले आहेत लोकांची मुख्य भाषा ब्रह्मी आहे. पण करेण, शान, तलैंग ह्या मुख्य भाषाहि थोड्याबहुत प्रमाणांत प्रचारांत आहेत. शे त की.--ह्या जिल्ह्यांत तांदूळ बराच व चांगल्या जातीचा पिकतो. आणि त्याची लागवड वाढती आहे. ज्या ठिकाणीं तांदूळ पिकत नाहीं त्या ठिकाणी किरकोळ पिकें व बागाईत करतात. दर वर्षी पाऊस सरासरीनें १०० इंच पडतो व तो अगदी ऐन वेळेवर पडल्यामुळें पिकें उत्तम स्थितींत असतात. व्या पा र व द ळ ण व ळ णा चे मा र्ग.-कापसाचें कापड विणण्याचा धंदा अल्प प्रमाणांत चालतो. रेशमी कापड तयार करण्याचा धंदा बहुतेक बुडत चालला आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचा उद्योग जारीनें चालू असतो. कुऱ्हाडी वगैरे लोखंडी जिन्नस तयार करण्याचे कारखानें ह्या जिल्ह्यांत आहेत. शिवाय तांदुळ सडण्याच्या गिरण्या, करवतीनें कापण्याच्या गिरण्या व बर्मा ऑईल कंपनीचे तेल काढण्याचे कारखाने ह्या जिल्ह्यांत आहेत. ह्या जिल्ह्यांत व्यापाराचें ठिकाण मुख्य म्हणजे रंगून शहर होय, पण ट्वान्टी, धाँग्वा, पौकान यांसारख्या शहरीं सुद्धां व्यापाराच्या पेठा आहेत. मुख्य निर्गत माल म्हटला म्हणजे तांदूळ, इमारतींचे लांकूड व इतर बंगलांतला माल. येथील धान्य ठिकठिकाणीं रंगूनचे दलाल विकत घेतात व ते धान्य आगगाडीनें किंवा बोटीच्या योगानें गिरण्यांकडे आणतात. इतर किरकोळ बाहेर जाणारा माल म्हणजे लांकूड, दूध, फळें वगैरे जिनसा व जनावरें वगैरे प्राणी होत. ह्या जिल्ह्यातला आयात माल म्हणजे कापड, मीठ, तेल, साखर , पोतीं, दोर वगैरे जिनसा होत. ह्या जिल्ह्यांत रंगून-प्रोम रेल्वे व रंगून मेंडाळे रेल्वे अशा आहेत. जलपर्यटणास योग्य असे मार्ग म्हणजे लाइंग नदी ट्वॉन्टी कालवा, बाल पॅनलँग व इतर कालवे होत. रा ज्य का र भा र.--हा जिल्हा इंग्रजी राज्याला जोडला त्या वेळीं या जिल्ह्यातील मुख्य कर म्हणजे डोईपट्टी, जमीनीवरचा कर, मासे पकडण्याबद्दल कर व मिठा वरचा कर हे होत. हे कर इंग्रजसरकारनें कायम केले पण जमीनीच्या प्रत्येक एकराला कराचें ठराविक प्रमाण ठरविलें. येथें शिक्षणाचा प्रसार बराच होत आहे. १९०१ सालीं शिक्षितांचें पुरुषांत प्रमाण शेंकडा ४८ होतें व बायकांत प्रमाण शेंकडा ११ होतें हें प्रमाण ब्रह्मदेशांतल्या कोठल्याहि जिल्ह्यातल्या प्रमाणांपेक्षां श्रेष्ठ आहे. येथें लक्ष्यांत ठेवण्यासारखी शिक्षणसंस्था म्हणजे इन्सेस येथील गव्हर्नमेंट स्कूल ऑफ इंन्जीनीअरींग होय.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .