प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
              
हंगेरी- यूरोपांतील एक राष्ट्र महायुद्धांपूर्वी ऑस्ट्रियाहंगेरी मिळून एक संयुक्त राष्ट्र बनलें होतें, पण सध्या हंगेरी स्वतंत्र असून त्यावर राजप्रतिनिधि असल्यानें अगदी प्रजासत्ताक देश नाहीं तरी तो राज्यकारभारांत तसाच आहे. पूर्वीच्या हंगेरीच्या क्षेत्रफळाचें सर्व राज्याच्या क्षेत्रफळांशीं प्रमाण शेंकडा ५१.८ होतें. त्याच्या सरहद्दीला सर्व बाजूंनीं बहुतेक जमीनच लागलेली असून फक्त ऑड्रिआटिक समुद्राकडील कांहीं भागाला (सरासरी १०० मैल) समुद्रकिनारा असे. युद्धापूर्वीच्या हंगेरींत 'खराखुरा' हंगेरी ट्रान्सिल्व्हेनिआ संस्थान आणि क्रोएशिआ, स्लाव्होनिआ हे प्रांत असत. आता ट्रान्सिव्हेनिआ रुमानीयाकडे असून क्रोएशिआ स्लाव्होनिआ हीं स्वतंत्र राज्यें बनलीं. आजच्या हंगेरीचें क्षेत्रफळ ३५८७५ चौरस मैल आहे; यावरून हा देश किती लहान झाला आहे हें दिसून येईल.

सर्वसाधारणपणें पहिलें असतां हंगेरीची हवा निरोगी आहे. कांहीं पाणथळ ठिकाणीं पाळीचा ताप आणि घटसर्प हे विकार मधून मधून उद्भवतात. येथे डोंगराळ प्रदेश सोडला तर ऑस्ट्रिआच्या मानानें येथें पाऊस कमी पडतो. डोंगराळ प्रदेशांत उन्हाळयांत सुद्धां अतिशय पाऊस पडतो.

लो क सं ख्या.- १९२० सालीं येथील लोकसंख्या ७९८०१४३ होती. जन्मसंख्येचें मान मृत्यूसंख्येपेक्षां म्हणण्यासारखें जास्त नाहीं. त्यामुळे लोकसंख्येत विशेष भर पडत नाहीं. त्यांतून देशांतरामुळें उलट लोकसंख्या कमी होत जात आहे. येथें निरनिराळ्या वंशांचे लोक आढळतात. ही एक मोठी ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे लोकांचे त्यांच्या भाषेप्रमाणें वर्गीकरण खालीं दिल्याप्रमाणें आहे. हंगेरियन शें. ८९.६; जर्मन शें. ६.९; स्लोव्हांक शें. १.८; रुमानियन शें. ०.३; रुथेनियन १५००. क्रोशिअन शें. ०.५ सर्बियन शें. ०.२ इतर ६०७४८ (१९२० च्या खानेसुमारी वरून). हंगेरियन लोक इतर यूरोपीयांपासून वंशानें भिन्न आहेत. त्यांची भाषा तार्तारादि भाषेशीं संबद्ध आहे. (''हूण'' पहा).

शे त की.- या देशांत शेतीचा मुख्य धंदा आहे. गहूं उत्पन्न होणाऱ्या यूरोपांतील भागापैकीं हा देश आहे. १८९५ सालांपेक्षां हल्लीं शेतीत बरीच सुधारणा होऊन तिचा विस्तारहि वाढला आहे. गहूं, बार्ली, राय, ओट, आणि मका हीं मुख्य पिकें आहेत. जंगलाचा विस्तार २७१६८४२ एकरांइतका आहे. जंगलांत मुख्यत्वेंकरून ओक, फर, पाईन, ॲश, आणि आल्डर हीं झाडें आहेत. येथील मुख्य खनिज पदार्थ म्हणजे कोळसा, १९२३ सालीं ७७०९०५१ टन कोळसा निघाला. हंगेरींत मासे पकडण्याचा मोठा धंदा आहे. डॅन्यूब व थीइस नद्यांतून व बॅलाटन सरोवरांत मासे पकडण्याची व्यवस्था केली आहे. बॅलाटन सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील प्रदेशांत चांगली दारू तयार होते. तथापि हंगेरीची प्रसिद्ध दारू ''टोकाज'' या डाेंगराळ प्रदेशांत तयार होते. या देशांतील इतर धंदे शेतकीवर अवलंबून आहेत; उदा. साखर, वाख इ. तयार करणें.

व्या पा र.-१९२३ सालीं सरासरी ५८ कोटी सुवर्ण क्राऊन किंमतीच्या मालाची आयात झाली आणि ५० कोटी सुवर्ण क्राऊन किंमतीच्या मालाची निर्गत झाली. निर्गतीचा मुख्य माल म्हणजे पीठ, गुरें, अंडी, मास, साखर, लोंकर, दारू, यंत्रें वगैरें होय. आयातीचा मुख्य माल म्हणजे कापसाचा आणि लोंकरीचा माल; चामडें व चामड्याचा माल, सूत, कोळसा, यंत्रें, धातू, खनिज तेल इत्यादि होय.

आ ग गा ड्या.-१८४६ सालीं वुडापेस्ट आणि व्हाक्झ यांचे मध्यें २० मैल लांबीचा आगगाडीचा रस्ता पहिल्यानें बांधण्यांत आला. १९२२ सालीं एकंदर आगगाडीचा रस्ता ५६२६ मैल होता. पैकीं १८७७ सरकारी मालकीचा होता. व्यवस्थाही त्यांचीच आहे.

रा ज्य का र भा र.- आज हंगेरी हा देश राजसत्ताक म्हणून गणला जात असला तरी सिंहासन रिकामें आहे. एक रीजंट राजाचे हक्क चालवितो. पण खरा राजसत्ता पार्लमेंटच्या हातीं असते. पार्लमेंटांत २४५ सभासद असतात. एक मुख्य प्रधान व आठ मंत्री यांच्या हातीं प्रत्यक्ष कारभार असतो. परकीय त्रास मिटल्यानंतर सावकाश राजवंशविषयक प्रश्र्न  सोडविण्याचें ठरलें आहे. वुडापेस्ट येथें दरवर्षी पार्लमेंट भरतें. सरकारी कामासाठीं मॅगिअर भाषा वापरतात. स्थानिक राज्यकारभारासाठी देशाचे कॉम्यून व म्यूनिसिपालिट्या असे विभाग आहेत.

न्या य खा तें.- राज्यकारभार चालविणाऱ्या खात्याशीं न्यायखात्याचा मुळीच संबंध नाहीं. न्याय देणारीं पुढील निरनिराळीं कोर्टें आहे. (१) डिस्ट्रिक्ट कोर्ट, (२) कौंटि कोर्टे, (३) ज्यूरी कोर्टे ४) सुप्रीम कोर्ट हें बुडापेस्टमध्यें असतें.

ज मा ख र्च.- १८६७ सालच्या आस्ट्रियाशी केलेल्या तडजोडीमुळें हंगेरीला निराळें अंदाजपत्रक करण्याचा अधिकार मिळाला. १९२४-२५ सालच्या अंदाजाप्रमाणें जमा ६५६६५१५३० सुवर्ण क्राऊन आणि खर्च ७५६५८२०३० सुवर्ण क्राऊन होता. रीजंटचें सिव्हिल लिस्ट, सार्वजनिक कर्जाचें व्याज, पेनशनें, संरक्षण व शिक्षण याकामीं मुख्यत: खर्च होतो. १९२३ सालीं हंगेरीचें कर्ज ३६४००००० पौंड होतें.

ध र्म.- येथें वंश आणि भाषा या दोहोंच्या वैचित्र्याप्रमाणे धमवैचित्र्याहि आढळून येतें. रोमन कॅथोलिक, युनिअट ग्रीक, ग्रीक ऑर्थोडाक्स, एव्हान्जेलिकल, युनिटेरियन ज्यू आणि इतर अशा निरनिराळ्या धर्ममतांचे लोक आहेत. सर्वांना पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे. रोमन कॅथोलिक हे सर्वांत जास्त (शें. ६४) आहेत. युनिअय ग्रीक हे कॅथॉलिक आहेत पण त्यांचे विधी ग्रीक चर्च विधीप्रमाणें आहेत.

शि क्ष ण.-१८६७ सालापासून शिक्षणाच्या बाबतींत जरी सुधारणा करण्यांत आल्या आहेत, तरी १९२० सालीं १८८१५९० लोक निरक्षर होते; त्यापैकी १०९०७१९ सहा वर्षावरील वयाचें होते. १८६८ सालीं केलेल्या कायद्याप्रमाणें ६ पासून १२ वर्षामधील सर्व मुलांनीं शाळेंत गेलेंच पाहिजे असें आहे. प्रत्येक काम्यूननें प्राथमिक शाळा बांधून तिची व्यवस्था ठेवली पाहिजे व एवढ्यासाठीं काम्यूनला कांहीं कर घेण्याचा अधिकार दिला आहे. १८९१ सालापासून तीन वर्षापासून ६ वर्षांच्या मुलांकरितां शिशुवर्ग कांढण्यांत आले. सार्वजनिक शिक्षणाच्या संस्थांचे आणखी तीन वर्ग आहेत.-(१) दुय्यम शाळा किंवा मिडल स्कूल. (२) हायस्कुलें (३) धंदे शिक्षणशाळा. १९२२-२३ सालीं मुलांमुलीकरितां स्वतंत्र अशी ४० व्यापारी हायस्कुले, एक कलाकौशल्याची शाळा, व ४ उच्च औद्योगिक शिक्षणाच्या शाळा होत्या. हंगेरीत चार विश्वविद्यालयें असून शिवाय बुडापेस्ट येथें अर्थशास्त्राच्या अभ्यासाकरितां एक स्वतंत्र 'फॅकल्टी' आहे. बुडापेस्टमधील नॅशनल लायब्ररी आणि युनिव्हर्सिटी लायब्ररी या मोठाल्या लायब्रऱ्या आहेत.

ल ष्क र.- महायुद्धानंतर हंगेरीला फक्त ३५००० सैन्य  ठेवण्याची मोकळीक दिलेली आहे. सोयीकरितां सात लष्करी जिल्हे पाडण्यांस आले आहेत. या राष्ट्राला आरमार किंवा वैमानिक दळ मुळींच नाहीं.

अर्वाचीन इतिहास (१९१०-२५):-१९०६ सालीं संयुक्त पक्ष अधिकाररूढ झाला. पण लौकरच मग्यार प्रकरण उपस्थित झाल्यामुळें व आस्ट्रो हंगेरियन बँकेच्या ऐवजीं हंगेरियन बँक स्थापन करण्याचा या पक्षानें आग्रह धरल्यामुळें संयुक्त पक्षाला अखेरीस अधिकार पास करणें भाग पडलें व खुएन-हेडरवारी याच्या नेतृत्वाखालीं १९१० सालीं नवीन प्रधानमंडळ अधिकारारूढ झालें. १९१० सालांतील हंगेरीचें राजकारण राष्ट्रसंघटनात्मक होतें. १९११ सालीं हंगेरी व सर्व्हिया यांच्यामध्यें व्यापारी तह झाला. त्याचप्रमाणें याच सालीं हंगेरी व जर्मनी यांच्या मध्येंहि सलोख्याचा तहनामा झाला. याचें तात्कलिक फल म्हणजे ट्रेनिंग कॉलेजामध्यें जर्मन भाषा ही आवश्यक भाषा ठेवण्यांत आली. याच सुमारास तुर्कस्तान व इटली यांच्यामध्यें युद्ध होण्याचा रंग दिसूं लागला. हंगेरीनें या लढाईंत तटस्थ रहाण्याचें ठरविलें. पण खुद्द हंगेरीच्या अंतस्थ राजकारणावर पुन्हां ढग पसरूं लागले. क्रोशियाच्या प्रतिनिधींनी आपल्या एकजात विरोधानें हंगेरियन पार्लमेंटला सतावून सोडलें होतें. १९१२ सालीं सैन्यविषयक प्रश्र्नांवर तंटेबखेडे होण्याची चिन्हें दिसूं लागलीं. विशेषत: डिफेन्स बिलावर तर मारामारी होण्याची वेळ आली. त्यामुळें खुएन-हेडेरवारीला राजीनामा देणें भाग पडलें, व लुकाक्स हा प्रधान झाला; व डेप्युटी गृहाचा टिझा हा अध्यक्ष निवडण्यांत आला. टिझानें विरोधाला न जुमानतां डिफेन्स बिल पास करून घेतलें. क्रोंएशियाच्या डायटमध्यें देखील असेच बखेडे माजल होते. १९१२ साली मताधिकाराचें बिल हंगेरियन सरकारनें कसें बसें पास करून घेतलें. लुकाक्सच्यानंतर टिझा हा प्रधान झाला. त्यानें अधिकारारूढ होतांच पूर्वी लोकांच्या ताब्यांत असलेला प्रांतिक कारभार सरकारच्या ताब्यांत घेतला त्यामुळें त्याच्याविरुद्ध फारच असंतोष पसरला.

अशा रीतीनें हंगेरीच्या राजकारणांत हरघडी असंतोषाचे प्रकार घडत असतांना १९१२ सालीं आर्चडयूक फर्डिनंड व त्याची बायको यांचा एका सर्व्हियनाकडून खून झाला. हंगेरीला या खुनाबद्दल कांहीच विषाद वाटला नाहीं. एक महिन्यानेंच ऑस्ट्रिया-हंगेरीनें सर्व्हियाशीं लढाई पुकारली. अर्थात ऑस्ट्रियाला हंगेरीची मदत मिळविण्यासाठी हंगेरीच्या लोकांनां खूष ठेवणें भाग होतें. त्यामुळें पार्लमेंटमधील विरोधी पक्षाच्या ज्या मागण्या होत्या, त्या देण्याशिवाय ऑस्ट्रियाला गत्यंतरच नव्हतें. अशा रीतीनें ऑस्ट्रिय-हंगेरीचें तात्पुरचें ऐक्य प्रस्थापित झालें, तरी खुद्द हंगेरीचें राजकारण अद्यापि दूषितच होतें. १९१६ सालीं ऑस्ट्रियन बादशहा फ्रांन्सिस जोसेफ हा वारला. व त्याचा वारस ऑस्ट्रिया-हंगेरीच्या गादीवर बसला. हंगेरीतील रुढीप्रमाणें नवीन राजाचा राज्याभिषेक 'प्रायमेट' नांवाच्या धर्मगुरुकडून व पार्लमेंटनें निवडलेल्या 'व्हाईस पॅलेटिन' कडून व्हावयाचा असतो. या व्हाईस पॅलेटिनच्या जागेसाठीं टिझानें आपली निवड करून घेतली. पण यामुळें त्याचा प्रतिपक्षी ऑर्चडयूक याला टिझाच्या विरुद्ध काहूर करण्याची संधि मिळाली. खुद्द राजाच्या मनांतहि टिझाविषयीं बिलकुल आदर नव्हता. त्यामुळें १९१७ सालीं टिझाला राजीनामा देण्याची पाळी आली. त्यानंतर एस्टर हाजी हा प्रधान झाला. पण थोडक्यांत दिवसांत त्याच्या बदलीं वेकर्ले हा प्रधान नेमण्यांत आला. तथापि त्यालाहि थोडक्यांत दिवसांत राजीनामा देणें भाग पडलें. तथापि पुन्हां त्याचीच नेमणूक करण्यांत आली. महायुद्धामुळें जी आर्थिक ओढाताण झाली होती तिचा हंगेरीवर बराच परिणाम झाला. त्यांतच टिझा, कारोली इत्यादि राजकीय पुढाऱ्यांच्या परस्परविरोधामुळें तर हंगेरीच्या राजकारणांत द्वेषाचें वातावरण पसरलें होतें. पण या सुमारास गोंधळांत भर घालण्याकरतांच कीं काय, ऑस्ट्रियाच्या बादशहानें १९१८ सालीं ऑस्ट्रिया-हंगेरी ही केवळ एक राजशासित संस्थान न राहतां यापुढें संयुक्त संस्थान राहील असें जाहीर केलें. या संधीचा फायदा घेऊन हंगेरीनें आपलें ऑस्ट्रियाशीं समान दर्जाचें व स्वतंत्र तऱ्हेचें नातें या जाहीरनाम्यानें सिद्ध झालें आहे असें जाहीर केलें. हंगेरीमध्यें लोकशाहीचें वारें हळू हळू वाढत्या प्रमाणावर वहाण्यास सुरुवात झाली होती. संकुचित मतदान पद्धतीमुळें लोकांचा, राजा व प्रधानमंडळ यावरील विश्वास पार उडाला होता. बोल्शेविक लोक हा असंतोष वाढविण्याचा प्रयत्न करीत होतें. याचा फायदा घेऊन, बंडखोर लोकांच्या मदतीनें कारोलीनें प्रधानपद मिळविलें. त्यानें बोल्शेव्हिकांच्या तत्वांनां अनुसरून हंगेरीच्या लष्कराला रजा दिली व सामाजिक क्रांतीला सुलभ वाट करून दिली. या क्रांतीच्या पहिल्या तडाक्यांत टिझाचा खून झाला. या क्रांतीच्या वेळी हंगेरीचा राज्यकारभार कारेलीचा ताब्यांत होता. १९१९ सालीं जर्मन ऑस्ट्रिलियानें व्हिएन्ना येथे लोकशाही स्थापन झाल्याचें जाहीर केलें. त्याच दिवशीं हंगेरीमध्येंहि क्रांति होऊन हंगेरींतहि लोकशासित राज्यपद्धति अस्तित्वांत आली.

१९१९ नोव्हेंबरच्या १६ व्या तारखेस लोकांनी नॅशनल कौन्सिल स्थापन करून त्यातर्फें हंगेरीचा राज्यकारभार चालविण्यांस सुरुवात केली. या कौन्सिलचा तात्पुरता अध्यक्ष म्हणून कारोली यास नेमण्यातं आलें. कारोलीनें आपल्या हातांत सत्ता येतांच, बाल्कन राष्ट्रांतील एंटिटीटयूसचा सेनापति फ्रांचेंटड एस्पेरे याच्याशीं तह केला. या तहान्वयें रुमानिया व सर्व्हियाला हंगेरीतील बराच मुलुख मिळाला पण इतक्यावर न थांबता रुमालिया व सर्व्हिया यांनी हंगेरीच्या मुलुखांत स्वारी करून अधिक मुलूख ताब्यांत घेतला अशा रीतीनें कारोलीच्या कारकीर्दीत हंगेरीची दुर्दशा होऊं लागल्यामुळें लोकांमध्यें कारोलीबद्दल तीव्र असंतोष उत्पन्न होणें स्वाभाविकच होतें. विशेषत: त्यांचा असंतोष सोशल डेमोक्रेंट व बोरगाय रॅडिकल्स या अधिकारारूढ पक्षाच्या विरुद्ध होता. १९१८ सालीं बेलाकूनच्या नेतृत्वाखालीं कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला होता. या पक्षानें सोशल डेमोक्रेंट विरुद्ध लोकांची मनें चिथावण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळें कम्युनिस्टांशीं सामाचें बोलणें लावून सोशल डेमोक्रेंट पक्षानें बोल्शेव्हिक तत्त्वाच्या धर्तीवर मजूरशाही स्थापन झाल्याचें जाहीर केलें, व सोव्हिएट रशियाशीं सलोखा संपादन केला त्यामुळें कारोलीला आपल्या अध्यक्षत्वाचा राजीनामा देणें भाग पडलें.

अशा रीतीनें इंगेरीमध्यें सोव्हिएट पद्धतीचें सरकार प्रस्थापित झालें. या सरकारनें १६ लोकनियुक्त कमिशनरांच्या हातीं हंगेरीचा कारभार दिला. गाराबाई नांवाचा पाथरवट हा अध्यक्ष झाला; व बेलाकून यास परराष्ट्रमंत्र्याची जागा मिळाली. सोव्हिएट अगर कम्युनिस्ट सरकारनें आपल्या अधिकाराच्या जोरावर लोकांवर दडपशाही करण्यास सुरुवात केली. कम्युनिस्ट धोरणाच्यविरुद्ध असलेल्या सर्व वर्तमानपत्रांनां बंदी करण्यांत आली. कम्युनिस्ट चळवळीचा प्रसार करण्यासाठीं सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यांत येऊं लागले, राष्ट्रीय अगर धार्मिक चळवळींचा बीमोड करण्यांत आला. सर्व खासगी मालमत्ता ही सार्वजनिक मालमत्ता झाल्याचें जाहीर करण्यांत आलें. उद्योगधंदे सरकारनें आपल्या ताब्यांत घेतले. अशा रीतीनें हंगेरीमध्यें जी दडपशाही माजली तिच्याविरुद्ध प्रतिक्रिया होण्यास ताबडतोब सुरुवात व्हावी हें स्वाभाविकच होय. त्याप्रमाणें मध्यमवर्गाच्या सर्व प्रमुख लोकांनीं कारोलीच्या नेतृत्वाखालीं कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठीं एक कमिटी स्थापन केली.

१९१९ सालीं रुमानियानें हंगेरीवर पुन्हां स्वारी केल्यामुळें बेलाकूनला आपलें स्वत:चें सैन्य उभारणें भाग पडलें. या सैन्यानें प्रथमत: कसें बसें रुमानियन सैन्याशीं तोंड दिलें. पण पुढें फ्रान्सचा अध्यक्ष क्लेमंको यानें बेलाकूनला शह दिल्यानें त्यास आपलें सैन्य परत घेणें भाग पडलें. याचा फायदा घेऊन रुमानियानें हंगेरीवर पुन्हां लढाई केली. पण शेवटी क्लेमेंकोनें सुप्रीम कौन्सिलच्या नांवानें रुमानियाला लढाई थांबविण्याची आशा व्यक्त केल्यानें रुमानियाला हंगेरीतून पाय काढून घेणें भाग पडलें.

१९२० सालीं वोल्शेव्हिकांची सत्ता हंगेरीतून नामशेष झाल्यावर आर्चडयूक जोसेफनें प्रधानमंडळ नेमून हंगेरीमध्ये व्यवस्था करण्यास सुरुवात केली, तथापि हॅब्सबर्ग राजघराण्याविषयीं हंगेरीच्या आसपासच्या देशांत फार वाईट मत असल्यानें जोसेफचा कार्यभाग सिद्धीस गेला नाहीं. त्याच्या बदली कार्ल हुझर याला पुन्हां तात्पुरता अध्यक्ष नेमण्यांत आलें. १९२०-२१ या सालांत हंगेरीमध्यें सुव्यवस्था स्थापन करण्याची खटपट करण्यांत आली. १९२० सालीं दोस्तराष्ट्रे व हंगेरी यांच्यामध्यें तह होऊन हंगेरीचा बराचसा मुलूख जवळच्या राष्ट्रांनां वाटून देण्यांत आला. मुजूरशाहीला लोक कंटाळलेले असल्यामुळें राजशाहीला अनुकूल असें वारें वाहूं लागलें. तथापि आसपासच्या संस्थानांनीं याला विरोध दाखविल्यामुळे हंगेरीची व्यवस्था सिंहासनाची जागा न भरतां अडमिरल हॉदीं याला केवळ रीजंट नेमून करण्यांत आली. १९२१ सालीं चार्लस राजानें हंगेरीचें राज्यपद मिळविण्याचा दोनदा प्रयत्न केला, पण त्यांत त्याला अपयश आलें. दुसऱ्या प्रयत्नांत त्याला गिरफदार करण्यांत आलें.

वा ङ्म य.- अकराव्या शतकांत कॅथॉलिक पंथांतील धर्माधिकारी लोकांनीं हंगेरीतील महत्त्वाच्या नोकऱ्यांत प्रवेश करून लॅटिन भाषेचा प्रसार केला. १२ व्या शतकांत लॅटिनमधील ''क्रॉनिकल'' हा पहिला ग्रंथ होय. १२ व्या शतकांपूर्वी मग्यार किंवा देशी भाषेंत काहीं युद्धाविषयक गाण्याशिवाय त्या भाषेंतील लेखाचा मागमूस नव्हता. लॅटिनचा आरंभ सरकारी हुकूमानें १११४ त झाला. परंतु व्यवहारांत जुनी हंगेरीयन भाषा बरीच असे. १४३७ ते १५३० या काळांत वाङ्मयाच्या वाढीला सुरुवात झाली. टामास व बालिंट या दोन मंकनी बायबलाचें (कांहीं भागाचें) मग्यार भाषेंत भाषांतर केलें. १५३० ते १६०६ या काळांत अनेक ख्रिस्ती धर्मग्रंथांची भाषांतरें झालीं.

राजकीय छलामुळें १७ वें शतक राष्ट्रीय वाङ्मयाच्या वाढीस प्रतिकूल गेलें. तथापि ईश्वरज्ञान, तत्त्वज्ञान व काव्य या विषयांत ग्रंथरचना झाली. १५३१ पासून सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत १८०० च्या वर ग्रंथ प्रसिद्ध झाले. १७११ ते १७७२ या काळांत राजकीय व आपसांतील कलहामुळें मग्यार भाषा व वाङ्मय यांकडे पूर्ण दुर्लक्ष्य झालें. तरीहि कॅल्यूडी (मग्यार सिसिरो) याच्या तत्त्वज्ञानपर, उपदेशपर व काव्यात्मक लेखानें वाङ्मयांत भर पडली. १८ व्या शतकाच्या शेवटच्या काळांत इतिहास वगैरे विषयावरील लेख लॅटिन किंवा जर्मन भाषेंत झाले. त्यानंतर उत्पन्न झालेलें फ्रेंच क्लॉसिकल, राष्ट्रीय या पंथांचें एकीकरण ''डे व्रेझेन क्लास'' मध्यें झालें. व त्यांत मग्यार व्याकरण करणारा फेल्डी प्रसिद्ध आहे. १८०७ ते १८३० या काळांतील केझिंझी व वर्झेन्वी याच्या ओजस्वी राष्ट्रभक्तीमुळें त्याची खऱ्या राष्ट्रकवींमध्यें गणना होऊं लागली.

१८३० ते १८८०:- शास्त्रांची हंगेरीयन ॲकेडमी १८३० त स्थापन झाली. या ॲकेडमीनें नाटयग्रंथ, इतिहास, पुराण, वस्तुसंशोधन, राष्ट्रीय अर्थशास्त्र व भौतिक शास्त्रें यांस उत्तेजन मिळालें. राजकीय वाङ्मयाला उत्तेजन देणारीं किस्फॅल्यूडी नावांची निराळी संस्था १८३६ त स्थापन झालीं.

काव्य:- ललित वाङ्मयाला (पोलाइट लिटरेचर) मागील काळांतच बरीच गति मिळाली होती. त्यावेळेचा सर्वांगश्रेष्ठ महाकाव्यकार व नाटककार व्होरोस मार्टी हा होय. लेव्हेनें शेक्सपीयरच्या नाटकाचीं भाषांतरें केलीं. झिग्लिगेटी यानें शंभरावर नाटकांची भर घातली.

अद्भुतकाव्य:- स्वतंत्र अद्भुतकाव्यें लिहिण्यास १८ व्या शतकांतच डयूगोनिक्स व कारमन यांच्यापासून सुरवात झाली. व १९ व्या शतकारंभी व्हर्सगी हाहि उत्तम लेखक होता. हंगेरियन लेखकांमध्यें अत्यंत बुद्धि मान जौके याची कल्पना शक्ति व उत्कृष्ट लेखनपद्धति व हंगेरीयन स्वभावचरित्र रेखाटण्याचें कौशल्य यामुळें त्याचें सर्व यूरोपभर नांव प्रसिद्ध आहे. शास्त्रीय ग्रंथासंबंधानें इतर यूरोपच्या मानानें हंगेरी मागें आहे. पॉल व्यूगेंटनें सायन्स ॲसोशिएशन १८४१ त स्थापन केली. तेव्हांपासून शास्त्रीय शोधांची व ग्रंथांची चांगली निपज सुरू झाली.

१८८० पासून माग्यार लेखकांची संख्या अतोनात वाढली. नाटयवाङ्मयहि सरकार व राजे यांच्या आश्रयामुळें चांगले वाढलें आहे. कायदेवाङमयाला कायदेकरणपद्धतीमुळें चांगले  उत्तेजन मिळावे. तत्त्वज्ञान, राजनितिशास्त्र, इतिहासग्रंथ व टीकात्मक लेख यांचाहि प्रसार झाला.

अर्वाचीन वाङ्मय (१९०८-१९२५):-१९०८ साली हंगेरियन वाङ्मयाला नवीन वळण लागलें. ''दिं किंगडम् ऑफ दि डे'' या संग्रहांत नवीन कवीनीं सर्व काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. ''वेस्ट'' नांवाच्या मासिकांत राजकीय चळवळीवरचें लेखहि घेण्यांत येऊं लागलें. वाङ्मयाला नवीन वळण लावण्याचें श्रेय ॲडी (१८७७-१९१९) या गीतलेखकास आहे. कितच्या कवितांवर पौरस्त्य काव्यांची छटा दृष्टीस पडते. सिगमुंड मोरिझ हा या काळांतील प्रसिद्ध कादंबरीकार आहे. १९१८ च्या हंगेरियन बंडानंतर हंगेरीमध्यें नवचैतन्य उत्पन्न झालें. हंगेरियन शास्त्रांची अकॅडमी या संस्थेमार्फत बरेंच उद्बोधक वाङ्मय प्रसिद्द करण्यांत आलें आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत कार्ल वोहम हा प्रसिद्ध आहे. ''व्यवहारी मनुष्य'' नांवाचा याचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. कायदेशास्त्रांत पोल्रझ, इलेस, विट्टमन, अंग्याड डर्टो एरेकी व सोम्लो यांची नांवें प्रख्यात आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .