प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
             
स्वीडन- हें राज्य यूरोपच्या उत्तरेस आहे. यानें स्कँडिनेव्हियंन द्वीपकल्पाचा पूर्वेकडील बराच भाग व्यापला आहे. याची सर्वांत जास्त लांबी सरासरी ९९० मैल, जास्त रुंदी सरासरी २५० मैल आणि एकंदर क्षेत्रफळ १७३१०५ चौरस मैल आहे. स्कॉंडिनोव्हियन द्वीपकल्पाचा आधारस्तंभ म्हणजे बहुतेक द्वीपकल्पाचा पश्र्चिमेच्या बाजूस उभी पसरलेली पर्वतश्रेणी होय. ही पर्वतश्रेणी नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांमधील स्वाभाविक सरहद्द असून ती अगदीं उत्तरेपासून स्व्हीलँडच्या उत्तरमर्यादेपर्यंत गेलेली आहे. स्वीडनने स्वाभाविक चार मुख्य भाग पाडतां येतील (१) सर्व नारलँड आणि स्व्हीलँडचा पश्र्चिमभाग मिळून बनलेला डोंगराळ प्रदेश, (२) मध्य स्वीडनचा सखल प्रदेश; (३) दक्षिणेकडील व आग्नेयेकडील स्मालँड नावाचा उंच प्रदेश व (४) स्केन मैदान –द्वीपकल्पाचें अगदीं दक्षिण टोक. पहिल्या भागांत सर्वांत उंच पर्वत व सर्वोत्कृष्ट देखावे आहेत. या द्वीपकल्पाच्या मधून गेलेल्या पर्वतश्रेणीवरून पुष्कळ नद्यांचा उगम होतो व त्या आग्नेय दिशेकडे वाहात जाऊन बोथ्निआच्या आखाताला मिळतात. या नद्यांच्या वरच्या भागांत हिमनदीला गाळामुळें अडथळा होऊन सरोवरें बनली असून या सरोवरांनां या नद्यांच्या पाण्याचा पुरवठा होतो लांबीच्या मानानें या नद्यांची रुंदी कमी आहे. स्टोराल्युक सरोवराच्या खाली स्टोराल्युक नदीचा हरस्प्रांग नांवाचा धबधबा आहे. यूरोपांत हा धबधबा सर्वात मोठा असून अतिशय प्रेक्षणीय आहे. हा शंभर फूट उंचीवरून एकदम खाली पडतो. मधल्या सखल प्रदेशाच्या भागांत मोठाली सुपीक मैदानें असंख्य सरोवरें आहेत, त्यापैकीं व्वेनर, व्वैटर मालर आणि जेल्मर हीं मोठालीं आहेत. सभोंवतालच्या भागाहून १०० पासून २०० फूट उंच असलेल्या व उत्तर वायव्येकडून दक्षिण आग्नेयीकडे पसरलेल्या वाळूच्या रागांनीं या भागांतील नैसर्गिक देखाव्यात आणखी भर घातली आहे. स्मालँड प्रदेशाचा विस्तार नैॠत्येकडील जुन्या स्मालँड प्रांतभर असून हा मधल्या सखल प्रदेशाच्या दक्षिणेस व साधारणपणें व्वेट्टर सरोवर आणि गांधेन्बर्ग यांच्या दक्षिणेस आहे. याची सरासरी उचीं ३०० फुटांवर आहे. स्वीडनच्या दक्षिणेकडेहि उत्तरेकडच्याप्रमाणें डाल, क्लार वगैरे  नद्या आहेत. फिनलँड वगळून यूरोपमधील कोणत्याहि देशांत स्वीडनच्या इतकीं सरोवरें नाहीत. देशाच्या एकंदर क्षेत्रफळांपैकीं  १/१०  भाग म्हणजे सरासरी १४००० चौरस मैल क्षेत्रफळ पाण्यानें व्यापलें आहे. स्वीडनच्या किनाऱ्याला नॉर्वेच्या किनाऱ्याप्रमाणें पुष्कळ व खोल आखातें नाहींत किंवा उत्तरसमुद्राच्या किनाऱ्याप्रमाणें बोध्निआचें आखात, बाल्टिक आणि कॅट्टगट यांच्या किनाऱ्यात विशिष्ट प्रकारची नैसर्गिक शोभाहि नाही. तथापि याचें एक सामान्य लक्षण असें आहे कीं, सर्व किनाऱ्याच्या भोंवताली बेटांचे वेष्टण आहे. ह वा मा न--स्कॅडिनोव्हियन द्वीपकल्पा इतक्या उंचीवर असलेल्या इतर देशांची या द्वीपकल्पाशीं तुलना केली असतां हवामानाच्या बाबतीत यांच्या तोडीचा दुसरा कोणताहि देश नाहीं, कारण येथील हवेंत नैॠत्येकडून येणारा उष्ण वारा मिळून या हवेचा तीव्रपणा काढून टाकून तिला सौम्य करतो. परंतु याचा दक्षिणोत्तर विस्तार फार असल्यामुळें हवेंत बरेच स्थानिक फेरफारहि घडून येतात. या सर्व देशाचा सरासरी भाग आर्टिक सर्कलच्या उत्तरेस आहे. स्वीडनमध्यें जुलै महिन्यांत अतिशय उन्हाळा असतो व त्यावेळी उष्णमान सरासरी मान ५१˚ पासून ६२˚ पर्यत असतें. पण जानेवारींत ४˚ ते ३२˚ पर्यंत असतें. याशिवाय हिवाळयांत हवामान अगदीं कमी असणारीं दोन ठिकाणे आहेत, त्यापैकीं एका ठिकाणीं जानेवारी महिन्यांत उष्णतेचें मान ८.५˚ आणि दुसऱ्या ठिकाणीं ३.८˚ अंश असतें. येथे उत्तरा भागांत मे महिन्यांत वसंतॠतूस, जूनच्या मध्यांत ग्रीष्मॠतूस व आगष्टच्या मध्यांत शरदॠतूंस सुरुवात होते. दक्षिण आणि नैर्ॠत्य भागांत मार्च महिन्यांत वसंतॠतूस, मे महिन्याच्या मध्यांत ग्रीष्मॠतूस आणि ऑक्टोबर महिन्यांत शरद्ॠतूस सुरूवात हाते. कॅरेसुएन्डो येथें उत्तर अक्षांश ६८˚ २६' वर आणि समुद्रसपाटीपासून १०९३ फुटांवा मेच्या २६ व्या तारखेपासून जुलैच्या १८ व्या तारखेपर्यंत क्षितिजावर सूर्य सतत दिसतो. त्याचप्रमाणें उत्तरायणांत हपरन्ड येथें २३ तास, स्टॉकहोम येथें १८ १/२ तास आणि लुंड येथें १७ १/२ तास दिसतो. पावसाचें सरासरी वार्षिक मान १९.७२ इंच असतें. हें मान ठिकठिकाणीं उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जातें आणि नैॠत्येकडे हें सर्वांत जासत हातें. व न स्प ती.-द्वीपकल्पाच्या मधून गेलेल्या पर्वताच्या रांगेच्या वरच्या उंच भागांत एकहि वृक्ष नाहीं. या प्रदेशाच्या भोवतालीं बहुतेक बर्च वृक्षांचें रान आहे. याच्याखाली चेन्नर सरोवराच्या ईशान्येकडील आणि डाल नदीच्या उत्तरेकडील सर्व प्रदेश 'फर' वृक्षाच्या रानानें व्यापलेला आहे. 'फर, 'पाईन' आणि स्प्रूस हे वृक्ष फार आढळतात. चेन्नर सरोवराच्या पायथ्यापासून बाल्टिक किनाऱ्यावरील कल्मर पर्यंत जाणाऱ्या रेषेच्या दक्षिण भागांत 'बीच' वृक्ष आढळतात. प्रा णी.--काहीं थोडीशीं जनावरें सर्व देशभर आढळतात. तीं म्हणजे ससे व वीझल ही होत. उंच डोंगराळ प्रदेश वगळल्यास यांत खार, कोल्हा आणि इतर काही रानटी जनावरांची भर पडेल. बाकी निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या प्रकारचीं जनावरें थोड्या प्रमाणांत आढळतात. येथील लोकसंख्या सुमारें ६० लक्ष आहे. लोक आर्य वंशाच्या स्काँडिनेव्हिअन शाखेचे आहेत. परंतु यात सरासरी ३०००० फिन आणि ७००० लॅप वंशाचे लोक आहेत. स्वीड आणि नॉर्वेजिअन लोकांच्या स्वभावामधील फरक उघड आहे. स्वीड लोक जास्त आनंदितवृत्तीचे आणि रंगेल असतात. दे शां ती ल द ळ ण व ळ ण.-१९२२ सालीं १४०२७४ जहाजें व बोटी स्वीडनच्या कालव्यांतून गेल्याचें नमूद आहे. १८५६ सालीं येथें पहिल्यानें आगगाडी सुरू झाली. सध्यां सरासरी १५००० किलोमीटर आगगाडीचा मार्ग तयार आहे, व आणखी पुढें वाढविण्याचें काम चालूच आाहे. सरासरी  २/३  मार्ग खाजगी  व  १/३  सरकारी आहे. हे रस्ते सर्व देशभर पसरलेले असून उत्तरेकडे गेल्फे आणि सिल्जसरोराच्या भोवतालचा प्रांत येथेपर्यंत पसरले आहे. १९ व्या शतकांत प्रथम कालवे बांधण्यांत आले या कालव्यांची एकंदर लाबी सरासरी ७०० मैल आहे. उ द्यो ग धं दें, शेतकी:-एकंदर जमिनीपैकीं लागवडीच्या किंवा कुरणाच्या जमिनीचें सरासरी प्रमाण शेंकडा बारा आहे. हें प्रमाण कांहीं ठिकाणी फार कमजास्त आहे. उदाहरणार्थ-स्केन शेंकडा ६०, मध्यभाग ३० आणि उत्तर भाग ३ ते ४॥ आहे. एकंदर लोकसंख्येपैकी अर्धे अधिक लोक शेतकीच्या आणि गुरांची पैदास करण्याच्या धंद्यांत गुंतले आहेत. ओट, राय, बार्ली आणि गहूं ही मुख्य पिकें आहेत. याशिवाय बटाटे आणि बीटची पिकेंहि निघतात. दूधदुभत्याचें कारखने फार फायदेशीर आहेत व त्यांनां सरकारची बरीच मदत आहे. येथील दुधदुभत्याचा जास्त खप इंग्लंड आणि डेन्मार्क या दोन ठिकाणीं होतो. जंगलापैकीं  १/३  भाग सरकारी आणि बाकीचा खाजगी आहे आगगाडीचें स्लीपस, 'पिट्-प्राप' आणि लांकडाचा गादा हे लांकडी जिन्नस बाहेर देशीं पाठविण्यांत येतात. खा णी.-लोखंडाच्या खाणी सर्वांत जास्त महत्त्वाच्या आहे. १९२३ सालीं ५५८८१७३ टन लोखंड खणून काढलें. बहुतेक सर्व खाणी नोर्रलँडच्या अगदी उत्तरेस आणि बोथ्रिआच्या आखाताच्या दक्षिणेपासून वेन्नर सरोवराच्या उत्तरेपर्यंत पसरलेल्या प्रदेशांत आहेत. बहुतेक सर्व लोखंड मॅगनेटाइट आहे, आणि मधल्या प्रदेशांतील बहुतेक सर्वांत फास्फरस नाहीं. याशिवाय पुढें दिल्याप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या खाणी आहेत. तांबें-फुलून आणि अट्व्हिढबर्ग (ओस्टरगोटक्डंमध्यें). सोनें व चांदी:-फुलून व सला. शिसें – सला व कफव्हेलटोर्प. जस्त ॲम्मेबर्ग कोळसो:-स्केन, बिल्लेशोल्म, जुफ, होगॅनस. या ठिकाणी का र खा ने.-लोखंडाची यंत्रे तयार करण्याचें व यात्रिक कामें करण्याचे, लांकूड कापण्याचे, लांकडाचा गादा करण्याचे, कापड व सूत काढण्याचे, गहूं दळण्याचे, साखरेचें, मद्यार्क करण्याचें, दूधदुभते करण्याचे, कागद करण्याचे व इतर जिनसा करण्याचे कारखानें फार प्रसिद्ध आहेत. व्या पा र.-वार्षिक निर्गत सरासरी सात कोटी पौंड किंमतीच्या मालाची आहे. व आयात आठ कोटी पौंड किमंतीच्या मालाची आहे. शेंकडा पन्नास प्रमाण लांकडाच्या निर्गतीचें आहे. बाकीचा बाहेर जाणारा माल म्हणजे लोखंड आणि पोलाद, अशुद्ध लोखंड, यंत्रे आणि आऊतें, लोखंडी आणि पोलादी सामान, लोणी, कागद, सुतारकाम, आणि आगकाड्या हा होय. बाहेरून आंत येणारा माल म्हणजे कोळसा आणि कोक, धान्य, कॉफी, यंत्रें लोकर कच्चें सुत, वळीव सूत, कापूस, गरम कपडा व कच्चीं चामडीं हा होय. व्यापार करणाऱ्या नौकांची एकंदर संख्या सरासरी २७०० आहे व त्यांचें 'टनेज' १३००००० आहे. गार्थेबर्ग स्टॉकहोम, हेलसिंगबर्ग, आणि गल्फे हीं मुख्य बंदरें असून त्यापैकीं व्यापारी महत्त्वाची स्टॉकहोम, गोर्थबर्ग आणि माल्मो हीं होत. रा ष्ट्रा चा ज मा ख र्च.-आगगाड्या, जंगल, टेलेग्राक शेतसारा, जकात, दारू आणि बीटच्या साखरेवरील कर आणि पोस्टाचें उत्पन्न या उत्पन्नाच्या मुख्य बाबी आहेत. लष्कर, अंतस्थकारभार, आरमार आणि शिक्षण या खात्यांवर बहुतेक सर्व खर्च होतो. या राष्ट्राचें उत्पन्न सुमारें ४ कोटी पौंड आहे. घ ट ना रा ज्य का र भा र.--येथें इंग्लंडप्रमाणें मर्यादित राज्यपद्धति आहे. आधुनिक राज्यघटना १८०९ च्या कायद्यान्वयें झालेली आहे. राजा हा कौन्सिल ऑफ स्टेटच्या मदतीनें कारभार चालवितो. डाएटनें केलेल्या प्रत्येक नव्या कायद्याला राजाची संमति लागते. स्वीडनचा राजा लुथेरन चर्चचा असावा लागतो. पार्लमेंट किंवा डाएटचे दोन भाग (चेंबर) असतात. पहिल्या चेंबरमध्यें १५० सभासद असतात व त्यांची निवडणूक 'लानचे' वतीनें कांहीं प्रतिनिधिक संस्थांकडून आणि कांहीं मोठाल्या शहरांच्या म्युनिसिपल कौन्सिलकडून होते. दुसऱ्या भागांत २३० सभासद असतात. यांपैकी १५० खेडयांतून आणि ८० शहरांतून निवडले जातात. १९०७ सालापासून वयांत आलेल्या सर्वांनां मत देण्याचा अधिकार देण्यांत आला. स्थानिक कारभारासाठीं स्वीडनचे २९ जिल्हे पाडण्यांत आले आहेत. पैकीं प्रत्येकाला 'लान' असें म्हणतात. न्याय देण्यासाठी ती प्रकारची कोर्टे आहेत; (१) यासाठी एकंदर ११९ खेडयांतील भाग पाडून त्याचे आणखी पोटभाग केले आहेत. प्रत्येक पोटभागांत एक कोर्ट असतें, व या कोर्टासाठी एक न्यायाधीश आणि बारा बिनपगारी ॲसेसर असतात. शहरांतील कोर्टांत एक मेयॉर व कमीतकमी दोन अल्डरमन असतात. (२) स्टाकहोम, जानकोपिंग आणि क्रिश्र्चनस्टाड येथें मोठीं कोर्टें आहेत. (३) आणि या सर्वांवर एक वरिष्ठ सुप्रीम कोर्ट आहे. १९१८ त 'पूअर ला' कायद्याप्रमाणें १६ वर्षे वयावरील मुलांना व सर्व निराश्रितांनां मदत करण्याची प्रत्येक कॉम्यूनवर सक्ती केलली आहे. १९२२ सालीं अशीं मोठी अनाथगृहें १९२३ असून त्यातून सुमारें ६८ हजार लोकांची सोय होती. यांखेरीज गरीबांकरतां १५७१ लहान झोपड्या बांधलेल्या होत्या. ल ष्क र आ णि आ र मा र.--लष्करी शिक्षण सर्वांनां सक्तीचे आहे व २० पासून ४२ वर्षांपर्यंत वयाच्या प्रत्येकाला लष्करी नोकरी करावी लागते. सरासरी २८००० शिपायांची फौज कायमची असते व दर वर्षी ८५००० शिपायांनां शिक्षण देण्यांत येतें. लढाईच्या वेळी लढाईचें सर्व प्रकारचें काम करण्यास एकंदर ६ लक्ष लोक गोळा करतां येतील असा अंदाज आहे. स्टाकहोम, रशियन सरहद्दीवरील बोलेन, वेट्टर सरोवरावरील काल्सबोर्ग, कार्लस्क्रीन, गोर्थेबर्ग आणि गोटलँड या ठिकाणी किल्ले आहेत. येथील आरमार लहान आहे पण त्यांत ३६०० ते ७९८० टनांच्या ११ मोठ्या बोटी आहेत, शिवाय १० डिस्ट्रायर, ३ टार्पेडो गनबोटी, २७ टार्पेडो बोडी, एक पाणसुरुंग पेरणारें जहाज व १७ सब्मरीन्स आहेत. ध र्म.-शेंकडा ९९ वर लोक लुथेरन प्रॉटेस्टंट धर्माचे आहेत, व हाच धर्म सरकारी आहे. तथापि इतर धर्मियांनां कोणत्याहि बाबतींत कमी हक्क नाहींत. शि क्ष ण.--धर्माचा आणि शिक्षणाचा इतका निकट संबंध आहे कीं, सरकारनें हीं दोन्ही एकाच खात्याच्या देखरेखीखाली ठेवली आहेत. निरनिराळ्या दर्जाच्या साध्या शाळांतून प्राथमिक शिक्षण देण्यांत येतें. येथे स्कॉईड शिक्षणपद्धति सुरू केल्यापासून तिजकडे सर्व जगाचें लक्ष वेधलें गेलें. या पद्धतीप्रमाणें मुलांस व मुलींनां हस्तकौशल्याचीं कामें शिकविण्यांत येतात. लोकांच्या खासगी शाळांतून उच्च शिक्षण देण्यांत येतें. स्टाकहोक, गोटेबर्न येथील उच्च शिक्षणाच्या संस्थांतून धंदेशिक्षण देण्यांत येतें. सरकारी शाळांतून बिशप हा सुपरिटेंडेंटचें काम करतो. उप्सा आणि लुंड या ठिकाणी सरकारी विश्वविद्यालयें आहेत व याच तोडीची स्टाकहोम येथें एक 'कॅरोला' वैद्यकसंस्था आहे. स्टाकहोम आणि गोटेबर्ग येथें सरकारी देखरेखीखालीं असलेली खासगी विश्वविद्यालये आहेत. शा स्त्री य शि क्ष णा च्या सं स्था-स्वीडिश ॲकॅडेमीची स्थापना १७८६ त झाली व हिच्यात स्वीडिश भाषा आणि वाङ्मय शिकविलें जातें. ॲकॅडेमी ऑफ सायन्स (१७३९) मध्यें सृष्टिशास्त्राचें शिक्षण मिळतें याशिवाय निरनिराळे विषय शिकविण्यासाठीं रॉयल ॲकॅडेमी म्हणून संस्था आहेत. स्टाकहोम, उप्सला, लुंड आणि गोटेबर्ग या ठिकाणीं पदार्थ संग्रहालयें आहेत. इ ति हा स-स्वीडन देशांतील रहिवासी हे प्राचीन काळच्या गोटर व गीट राष्ट्रजातीचें वंशज असावेत इ. स. ८२० त अंस्गर नांवाच्या ख्रिस्ती धर्म प्रसारकानें ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. याच सुमारास स्वीडिश लोकांनी बाल्टिक समुद्राच्या पूर्वा किनाऱ्यावर वसाहत करण्यास सुरुवात केली. १० व्या शतकाच्या अखेरीस एरिक नांवाचा राजा होता त्यानें नॉर्वेपर्यंत आपली सत्ता नेली. एरिकच्या कारकिर्दीत ख्रिस्ती धर्माचा प्रसार बराच झाला. त्याच्यानंतर आलेला राजा तर स्वत: धर्मानें ख्रिस्ती होता. त्याच्या कारकीर्दीत नॉर्वे व स्वीडन यांच्यात बेबनाव होऊन लहान लहान लढाया होऊन १०१९ त कोंगेल्फ यथें दोन्ही राष्ट्रांत तह झाला. १२ व्या शतकाच्या सुरुवातीस स्वेरकर नांवाचा राजा गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत स्वीड व गॉथ लोकांचे कायमचें एकीकरण झालें. ११५० च्या सुमारास स्वीडिश चर्चेची रचना इतर देशांतील चर्चाप्रमाणें करण्यांत आली व कांहीं वर्षांनी उप्साला या स्वीडिश राजधानीच्या शहरीं धर्माध्यक्षाचें पीठ स्थापण्यांत आलें. १३१९ त एरिक डयूकचा मुलगा मॅगनस याला राजा निवडण्यांत आलें. याच्या आईचा बाप नॉर्वेचा राजा असून त्याचें नांव पांचवा हाकन असें होतें. हाकनच्या मरणानंतर मॅगनसकडेच नॉर्वेची गादी आली व अशा तऱ्हेनें स्वीडन आणि नॉर्वेचें एकीकरण झालें. १३८८ त स्वीडिश लोकांच्या सांगण्यावरून डेन्मार्क व नॉर्वेचा कारभार पहाणारी मार्गारेट हिनें स्वीडनचा अलबर्ट याला हांकून दिलें. १३९७ त कामर येथें तिन्ही राष्ट्रांच्या प्रतिनिधींची सभा झाली; व एरिक यास तिन्ही राष्ट्रांचा राजा निवडण्यांत आलें पण हें एकीकरण राजकीय स्वरूपाचें नसून वैयक्तिक होतें. पुढें डेन्मार्क आपल्या मर्जीप्रमाणें स्वीडन नॉर्वेवर राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करू लागतांच स्वीडननें त्याच्या बाजूचें आपलें अंग काढून घेतलें व ८ व्या चार्लसला राजा केलें. त्याच्या मरणानंतर १४७० मध्यें परत डेन्मार्कच्या पहिल्या ख्रिश्र्चन राजाच्या अंमलाखाली  नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क या तीन राष्ट्रांचें एकीकरण झालें. इ. स. १५२३ ते १५६० पर्यंत पहिला गुस्टोव्हस हा स्वीडनचा राजा होता. त्याच्या कारकीर्दीत धार्मिक व राजकीय सुधारणा झाल्या, धर्माण्यक्षास हद्दपार करण्यांत आलें, पोपच्या विरोधास न जुमानतां राजानें आपल्या हातांत धार्मिक व्यवहार घेतला व सुधारणा करण्यास प्रोत्साहन दिलें स्वीडनचा राजा तिसरा जॉन वारल्यानंतर. कांहीं परस्पर नात्यागोत्याच्या संबंधानें पोलंडच्या राजाच्या अंमलाखाली स्वीडन गेलें. तिसऱ्या जॉनच्या कारकीर्दीत स्वीडन हा देश कॅथालिक धर्मामुळे अधोगतीला जात होता. सिगिस्मंड पोलंडला राजा - याच्या अंमलांत प्रॉटेस्टंटांनी बंड केले.  व सिगिस्मंडला पळून जावें लागले. प्रॉटेस्टंटांचा नायक डयूक चार्लस हा राज्यरूढ झाला. त्यावेळीं रोमन कॅथॉलिक लोकांनां हुद्दयाच्या जागा देण्यांत येऊं नये असें ठरविण्यांत आलें. १६११ च्या सुमारास स्वीडन व रशिया यांच्यांत युद्ध जुंपलें तें पुरें होण्यापूर्वीच चार्लस वारला. त्याच्या मुलानें (गुस्टोव्हसनें) नेअर्ड येथें तहावर सही करून तें युद्ध मिटविलें. १६१७ त गुस्टोव्हसनें राज्ययंत्रांत कांहीं सुधारणा केल्या व तें अधिक लोकसत्ताक केलें व लोकप्रतिनिधीसभा स्थापन केली. अंदाजपत्रक मंजूर करण्याकरतां दर वर्षी सदर सभेची संमति मागण्यांत येत असे. सदर सभेला कायदे करण्याचाहि अधिकार असे. परंतु राजानें आपल्या हातांत व्हेटोचा अधिकार ठेवला होता. स्वीडननें यूरोपांत झालेल्या तीस वर्षांच्या लढाईत भाग घेतला होता.  तींत शेवटीं कांहीं प्रांत व जर्मनीतील ओडर, एल्ब व वेसत या नद्यांची मालकी मिळाली. दहाव्या चार्लसच्या कारकीर्दीत पोलंडशीं स्वीडनचें युद्ध झालें. व या युद्धानें स्वीडनचें लष्करी सामर्थ्य मोठे आहे. अशी लोकांची खात्री झाली. १६८० त स्वीडनमध्यें अकल्पित रीतीनें राज्यक्रांति घडून आली व राजाच्या हातांत अनियंत्रित सत्ता आली. प्रतिनिधिसभा राजाची नोकर ठरली म्हणजे तिचें म्हणणें राजानें ऐकलेंच पाहिजे असें नाहीं, तर आपल्या मताप्रमाणें वागण्यास त्यास मोकळीक आहे, असें ठरविलें गेलें. चार्लसनें सैन्य आरमारांत सुधारणा करून राज्यघटना उत्तम रीतीनें आंखली. १६९९ च्या सुमारास 'ग्रेटनॉर्दन वॉर' युद्ध झालें व त्यांत स्वीडनला आपला स्वीडनबाहेरील मुलूख गमवावा लागला. चार्लसनंतर त्याच मेव्हणा गादीवर आला व त्याच्या कारकीर्दीत परत राजसत्ता मर्यादित झाली , व सर्व सत्ता प्रतिनिधिसभेकडे आली. पूर्वीप्रमारें चार सभा होऊन आपापसांतील द्वेषांमुळें कोठलाहि कायदा पास होईना. कारण एका कायद्यास तीन सभांची संमति लागे. १७३८ च्या सुमारास, शांततावादी व युद्धप्रिय अशा मताचे दोन पक्ष पडले, व आपापसांत बेबंदशाही माजली. १७४१ त रशियाच्या फीनलंडवर स्वीडननें स्वारी करून त्या प्रांताचा कांही भाग मिळविला. तिस-या गुस्टोव्हसनें (१७७१-९२) या दोन पक्षांत समेट करण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले. तेव्हां त्यानें मुत्सद्दीगिरींच्या डावपेचांनीं ही बेबंदशाही कह्यांत आणली. याच्या कारकीर्दीत स्वीडनची बरीच भरभराट झाली. पण १७९२ त काहीं अराजकांनी त्याचा खून केला. १८०९-१९ पर्यंत १३ वा चार्लस राजा राज्यारुढ होता. ह्यास सरदारांनीं राजा केला होता. हा निपुत्रिक वारल्यामुळे सरदारांपैकीच मार्शल बर्नाडोट याला भावी राजा नेमण्यांत आलें. व याच्याच वंशांत हल्ली स्वीडनची गादी चालू आहे. १८१० त डेनमार्कच्या ताब्यांतून नॉर्वे काढून स्वीडनला जोडावें या अटीवर स्वीडन नेपोलियूनच्या विरुद्धबाजूस मिळालें. १८१४ त नॉर्वे स्वीडनला जोडण्यांत आलें. बर्नाडोट सरदार गादीवर बसला तेव्हां त्यानें १४ वा चार्लस हें नांव धारण केलें. याची कारकीर्द शांततेची गेली. यानंतर याचा मुलगा ओस्कार गादीवर आला. १८५९ त ओस्कार मेल्यावर १५ वा चार्लस गादीवर आला. त्यानें राज्यव्यवस्थेत बरीच सुधारणा केली. बड्या लोकांची व सामान्य लोकांची सभा असे प्रतिनिधीसभेचे दोन भाग करण्यांत आले. १८७२ त दुसरा ओस्कर गादीवर आला.यानें आणखी कांही सुधारणा केल्या. मतदारांचें क्षेत्र विस्तृत केलें. मतदार संघ ठरवून उमेदवारांची संख्या मर्यादीत केली. १९०५ मध्यें नॉर्वे व स्वीडन यांच्या प्रतिनिधींची कार्लस्टॅड येथें सभा भरून कांही अटी ठरून नॉर्वे स्वतंत्र प्रांत म्हणून जाहीर करण्यांत आलें. (नॉर्वे पहा) १९०७ सालीं ओस्कार वारल्यानंतर त्याचा मुलगा पांचवा गस्टाव गादीवर बसला. यावेळीं राष्ट्रीय संरक्षणाचा प्रश्र्न  प्रामुख्यानें स्वीडिश जनतेच्या पुढें उभा होता. १९०५ सालीं स्वीडन व नॉर्वे यांच्या एकीचा भंग झाल्यामुळें व फिनलंड हे रशियाच्या ताब्यांत असल्यामुळे स्वीडनला परराष्ट्रापासून आपलें संरक्षण जेणें करून होईल त्या प्रकारची तजवीज करणें आवश्यक झालें होतें. १९०७ साली या प्रश्र्नाचा विचार करण्याकरतां एक कमिटी नेमण्यांत आली. पण त्या कमीटींतील सभासदांमध्यें ऐकमत्य न झाल्यामुळें स्वीडन सरकारनें स्वतंत्र रीतीनें एक बिल पुढें आणिलें व लिबरल अगद सोशल डेमोक्रेट पक्षाच्या विरोधाला न जुमानतां तें पास करून घेतलें; हें बिल नवीन लढाऊ जहाज तयार करण्यासंबंधीचें होतें. पण १९११ सालीं लिबरल पक्ष निवडणुकीत यशस्वी झाल्यानें हें काम दिरंगाईवर पडलें. तथापि लोकांनां देखील राष्ट्रसंरक्षणाचें महत्त्व पटल्यामुळें नवीन लढाऊ जहाज जनतेनें स्वतंत्र रीतीनें वर्गणी जमवून बांधावयाचें ठरविलें व प्रधानमंडळाला न विचारतां राजानें या योजनेला संमति दिल्यामुळें प्रधानमंडळाला राजीनामा देणें भाग पडलें. १९०७ ते १९१४ पर्यंतच्या अवधींत स्वीडनमध्यें बऱ्याच सुधारणा घडून आल्या लिंडमनचे प्रधान मंडळ अधिकारावर असतां मतदानाच्या कायद्यांत सुधारणा सरकारला कायद्याच्या बाबतींत सल्ला देण्याकरता रेगेरिंग्स रॅटेनची स्थापना, जमीनबाबत कायद्यांत सुधारणा इत्यादि महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या स्टाफच्या प्रधानमंडळाच्या कारकीर्दीत सामाजिक बाबतींत बरेच कायदे करण्यांत आले. १९१४ सालीं स्टाफच्या प्रधानमंडळानें राजीनामा दिल्यानंतर हमर्सकिजोल्ड हा प्रधान झाला. याच्या कारकीर्दीत महायुद्धाला सुरवात झाली. स्वीडननें आपलें तटस्थ राहण्याचें धोरण ताबडतोब जाहीर केलें व आपल्या आरमारी हद्दींत कोणाहि युद्धमान राष्ट्राचें जहाज येऊं न देण्याची खबरदारी घेतली. त्याप्रमाणें सैन्यवाढ, नवीन जहाजाचें बांधकाम इत्यादि कामालाहि स्वीडन सराकारनें संमति दिली. महायुद्धाच्या सुरवातीनंतर  कांहीं दिवस सर्व पक्षांनीं अंतस्थ मतभेद पुढें न आणतां, महायुद्धामुळें उत्पन्न झालेल्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्र्न  सोडविण्याकडे आपलें लक्ष पुरविलें. तथापि थोडक्याच दिवसानंतर पुन्हां अंतस्थ मतभेदांनां तोंड फुटलें व त्या वावटळीत हमर्सकिगोल्डच्या प्रधानमंडळाला राजीनामा देणें भाग पडून खाट्झ हा प्रधान झाला. तथापि त्यालाहि लवकरच राजीनामा देणें भाग पडून प्रो. एडननें संयुक्त प्रधानमंडळ बनविलें. १९१८ सालीं कायदेमंडळांत लोकपक्षाला अधिक शिरकाव मिळाला. स्त्रियांनां मतदानाचा हक्क मिळाला. महायुद्धाच्या अमदानींत स्वीडन व नॉर्वे हे दोन्ही देश समान संकटांत सापडल्यामुळें त्यांच्यामध्यें पुन्हां सूत जमविण्याचा रंग दिसू लागला. स्वीडनला राष्ट्रसंघाचा सभासद करून घेण्यात आलें. तसेंच जिनेव्हा व वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय मजूर परिषदांनांहि सभासद पाठविण्याचा स्वीडनला मान मिळाला. हालंड बेटांसंबंधी स्वीडन व फिनलंडमधील वाद राष्ट्रसंघानें सामोपनें मिटविला. जातवार कराच्या प्रश्र्नावर लिबरल पक्षाचा विजय झाल्यामुळें एडनच्या प्रधानमंडळाला राजीनामां द्यावा लागला. त्यानंतर गीरच्या नेतृत्वाखाली प्रधानमंडळ बनविण्यांत आलें. तथापि लवकरच गीरनें राजीनामा दिल्यामुळें ओस्कार व्हॅन सीडो हा प्रधान झाला. १९२०-२१ सालांमध्यें स्वीडनमधील सांपत्तिक परिस्थिति फार बिघडली व ती सुधारण्याचें काम नवीन प्रधानमंडळावर पडलें होतें. वा ङ् म य.-तेराव्या शतकांपर्यंत प्राचीन स्कॉटिनेव्हियन भाषेंतील ग्रंथांहून भिन्न असें स्वीडिश वाङ्मय म्हणून मुळीच अस्तित्वांत नव्हतें; आणि त्यानंतरहि (रेफमेंशन) धर्मसुधारणेच्या काळापर्यंत मध्यंतरी स्वीडिश वाङमयाची वाढ विशेष मोठी किंवा झपाट्यानें झालेली नाहीं. स्विडिश भाषेचें अगदी जुनें लेखी नमुने म्हणजे 'कॉमन ला'वरचे हस्तलेख हे होत. त्यांत काहीं १२३० मधील व कांहीं १३४७ मधील आहेत. हे सर्व प्राचीन कायदेग्रंथ संग्रहित करून प्रसिद्ध करण्याचें काम विद्वान कायदेपंडित ग्लीटर (१७९५-१८८८) यानें केलें आहे. मध्ययुगीन स्वीडिश वाङमयाचा मुख्य अलंकार, म्हणजे 'राजे-युवराजांच्या वर्तणुकीविषयी' चा ग्रंथ होय. हा ग्रंथ १६३४ त छापला गेला. त्याचा कर्ता माहीत नाहीं. तो ११५३ मध्यें होऊन गेला असावा असें म्हणतात. यांत सामान्य नीति व राजनीतीसंबंधानें  उपदेश मोजक्या व जोरदार भाषेंत केलेला आहे. सेंट बर्गिटा ही ऐतिहासिक व्यक्ती फारच महत्त्वाची आहे. अनेक धार्मिक ग्रंथावर तिचें नांव आढळते. त्यांत ''ईश्वरप्रणीतें'' रिव्हिलेशन्स) व मोझेसच्या पांच ग्रंथांचे स्वीडश भाषांतर हीं पुस्तकें फार प्रसिद्ध आहेत. बाकीच्या बायबलचें भाषांतर ब्यूड नांवाच्या मंकनें पुढें केलें आहे. अगदीं मूळचे स्वीडिश पद्यांचे नमुने म्हणजे लौकिक गाणी होत. कांहीं पद्यांचा कर्ता बिशन थॉमस (मृत्यू १४४३) हा आहे. व हाच स्वीडिश भाषेंतील आद्य कवि होय. शिवाय मध्ययुगांतील पद्यमय बखरी आहेत. त्या १५०० च्या पूर्वीच्या आहेत. अद्भुतकाव्यें (रोमान्स) कित्येक आहेत. त्यांत अलेक्झांडर राजाच्या अद्भुत काव्यांचें भाषांतर चांगले आहे. या मध्ययुगांतील उत्तम करुणरसपूर्ण अवशिष्ट लेख म्हणजे १४९८ मध्यें लिहिलेल्या प्रणयपत्रिका होत. या पत्रिकां पर्सडोटर नांवाच्या व्हॅडक्टेनाच्या नननें विलसन नांवाच्या तरूण सरदाराला लिहिलेल्या आहेत. १६ व्या शतकांत स्वीडिश वाङ्मयांत फारच थोडी भर पडली, व ती नवीन स्थापन झालेल्या उप्साला युनिव्हर्सिटीकडून पडली. विद्या पुनरूज्जीवनाच्या चळवळीचा परिणाम स्कँडिनेव्हियावर फारसा झाला नाहीं, फार काय पण धर्मसुधारणेच्या सर्व यूरोपभर उठलेल्या धडाक्यानेंहि या देशांतील बुद्धिमान लोकांत जागृति उत्पन्न  झाली नाहीं. संबंध १६ व्या शतकांत काही स्त्रोत्रें व कांही उपदेशात्मक कविता कायत्या निर्माण झाल्या. त्यावेळचे पेट्री नावाचें दोघे बंधू प्रसिद्ध आहेत. हे विटेन्बर्ग येथें अभ्यास करीत असतां त्यांनी लूथरला नवा पंथ स्वीकारला आणि १५१८ त स्वदेशी येऊन ते नव्या पंथाचे उपदेशक बनले. या दोघांपैकीं ओर्लेस हा व्हॅसा येथें चॅन्सलर झाला पण १५४० त त्याला सुधारणावादी म्हणून फांशीची शिक्षा सांगण्यांत आली. पण लवकरच ती रद्द होऊन नवधर्मप्रसारास परवानगी देण्यांत आली. त्याचे स्वीडिश बखर, टोबी नाटक हे ग्रंथ त्या त्या वाङ्मय शाखेंतील पहिलेच ग्रंथ होत. त्याचा भाऊ लॉरेंटस हा स्वीडनचा आर्चबिशप हातो. व त्याच्या देखरेखीखालीं १५४० त बायबलचें भाषान्तर करण्यांत आलें.या दोघांचीं अनेक धार्मिक पदें प्रसिद्ध आहेत. बिशप निगरनें पहिला गुस्टोव्हस याच्या चरित्रावर बखर लिहिली. स्वीडिश वाङ्मयांतील १६ व्या शतकाचें उत्तरार्थ अगदीं कोरे गेलें. नववा चार्लस या प्रॉटेस्टंट राजाच्या कारकिर्दीपासून (१६००-१६१७) स्वीडिश वाङ्मय जोरावलें. त्या वेळचा राजग्रंथालयाचा अधिकारी ब्यूरेस यानें त्या वेळच्या सर्व शास्त्रांचा अभ्यास करून पुष्कळ ग्रंथ लिहिले. त्यानें भाषा सुधारली व लोकांत चौकसबुद्धि जागृत केली. युवराज ॲडॉल्फस व आद्यकवि स्टेर्जेल्स हे त्याचेच शिष्य होत. चार्लसच्या कारकिर्दीतच सामाजिक नाटकांचा उदय प्रथम झाला. त्या वेळचा सर्वांत प्रसिद्ध नाटकाकार व कवि नेसेनिअस हा होय. ५० नाटकांत आपल्या देशाचा सर्व इतिहास आणावयाचा असा त्याचा बेत होता. पण त्यापैकीं सहाच लिहून प्रसिद्ध झाली. गुस्टोव्हस राजाविरुद्ध बंडखोरी या आरोपावरून त्याला तुरुंगांत टाकलें होते. पण तेथेंहि त्यानें अनेक रसात्मक काव्यें व पद्यमय बखरी लिहिल्या. याशिवाय कॅटोनसचें ट्रोजेबर्ग (ट्रोजन युद्धासबंधी) प्रिझचीं धार्मिक नाटकें वगैरे अनेक नाटकें झाली. व ती शाळेंतील व युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी करून दाखवीत असत. ॲडॉल्फसच्या कारकीर्दीतील स्टर्नजेल्म (१५९८-१६७२) याला स्वीडिश भाषेंतील आद्यकवि म्हणून मान आहे. याची विद्वत्ता अगाध होती. व त्यानेंच आपल्या खडबडीत व अडखळणाऱ्या देशभाषेला मृदुपणा व लवचिकपणा आणून दिला; आणि त्याच्या गुरुनें प्रचारांत आणलेल्या षष्मावावृत्तांत कविता करुन त्या वृत्ताला पूर्ण राष्ट्री स्वरुप आणून दिलें. स्टर्नजेल्मच्या तोडीचा कवि रोझेंहेन नांवाचा (१६१९-१६८४) होऊन गेला. त्यानें पुनरुज्जीवनाच्या काळाच्या फ्रेंच कवींच्या नमुन्यावर काव्यें लिहिली. त्यानें १०० सॉनिटेस व स्वीडिशभाषेची तक्रार' म्हणून १३०० पंक्ती लिहिल्या व आपल्या देशभाषेची चांगली सुधारणा केली. कोलंबसबंधुद्वय, उप्साला येथील काव्यांचा प्रोफेसर जोहन (१६४०-८४), सॅम्युअल (१६४२-७९) 'रोझी-मुंडा वगैरे नाटकें लिहिणारा जार्ज, 'देवाचे श्रम व विश्राति' हें सहाकाव्य लिहिणारा आर्चबिशप स्पेगेल वगैरे  अनेक षण्मावावृत्तांत लिहिणारे स्टर्नजेल्मने अनुयाची कवी होऊन गेले. त्या मानानें रोझॅहेनचे अनुयायी फार नव्हते. १७ व्या शतकांत गद्यवाङ्मयांत फारच थोडी भर पडली. त्या वेळचा रुडनेक हा 'ॲटलँडा' या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता होऊन गेला. रुडबेकची बुद्धिमत्ता सर्वागामी होती. तो आपल्या तेविसाव्या वर्षीच इंद्रियविज्ञानशास्त्रांतील काहीं शोधांमुळे सर्व यूरोपभर प्रसिद्ध झाला होता. त्यानें आपला ॲटलँडा हा ग्रंथ ११ वा चार्लस याच्या सांगण्यावरून स्वीडन देशाचा मोठेपणा प्रस्थापित करण्याकरतां लिहिला. फ्रेंच तत्त्ववेत्ता डेकार्ट हा स्टॉकहोमला येऊन राहिला हाता. त्याच्या शिष्यांत रिडेलिअस वगैरे कांहीं चांगले लेखक होऊन गेले. १२ व्या वार्लसच्या मरणानंतर स्वीडिश वाङ्मयाला अधिक चांगला काळ आला. या काळांत जर्मनी व इटली यांच्या ऐवजी फ्रान्स व इंग्लंड यांचें महत्त्व वाढलें. याच काळांत स्वीडिश वाङ्मयाला प्रथम संघटित स्वरूप आलें. हा स्वीडिश वाङ्मयाचा आगस्टन काळ १७६५ मध्यें एकाएकीं संपला ट्रीवाल्ड याचें 'आपल्या मूर्ख कवीसंबंधीं व्याजोक्ति' या नामार्थाचें हें पुस्तक, डेलिनचें ॲडिसनच्या स्पेक्टेटरच्या धर्तीवरचें स्वीडिश आर्गस, पोपच्या 'एसे ऑन क्रिटिसिझमच्या' तोडीचे टीकाकरांसंबंधीं विचार, आणि स्विफ्टच्या 'टबची गोष्ट' यांसारखें घोड्याची गोष्ट, इत्यादि पुस्तकें चांगली आहेत. डेलिन हा फारच मोठ्या योग्यतेचा विद्वान झाला. त्यानें स्वीडिश राज्याचा इतिहास, 'स्वीडिश स्वातंत्र्य' नांवाचें महाकाव्य, ब्रिनहिल्ड, मत्सरी मनुष्य वगैरे नाटकें अशा अनेक प्रकारांनीं वाङ्मयांत भर घातली. त्यानें इंग्लंड-फ्रान्स देशांतील विचार चोरून घेतले व तथापि या ग्रंथचौर्थकर्मांतहि त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते. त्यानें स्वीडिश वाङ्मयाला यूरोपांतील इतर वाङ्मयाच्या बरोबरीला आणून सोडले. डेलिनचे एकंदर ग्रंथ सहा भागांत १७६७ मध्यें प्रसिद्ध झाले आहेत. लुसी यूलरीका राणीनें आपला विद्वद्रत्नदरबार बनविला होता. त्यांतील डेनी हें मौल्यवान रत्न होतें. पण याहि रत्नाची बरोबरी करणारें एक स्त्रीरत्न होतें. या नॉर्डेनफ्लिच नांवाच्या कवयित्रीनेंहि एक विद्वानांची सोसायटी बनविली होती. हिच्या कवितांचा एक 'टर्टलडोव्ह' म्हणून संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांत कवयित्रीनें परमसुखमय पण अत्यल्प अशा वैवाहिक स्थितीनंतर प्राप्त झालेल्या पतिनिधनामुळें स्वत:च्या वैधव्यदु:खाचे वर्णन केले आहे. चांगल्या होतकरू कवींना उत्तेजन दिल्याचें श्रेय या कवयित्रीला आहे. त्यातं क्रूझ व यिलेंबॉर्ग हे दोघे प्रसिद्ध आहेत. गद्यलेखांमध्यें मॉर्क याच्या कादंबऱ्या, इहर या प्रोफेसरचा ऐतिहासिक शब्दकोश, लॅगराब्रर्ग व सेल्सिअस यांचे इतिहास, ऐरिक व टेसिक यांचे राजनीति व सौंदर्यशास्त्र वगैरे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नाटयग्रंथ मात्र दरबाराचें उत्तेजन असूनहि म्हणण्यासारखे निर्माण झाले नाहींत. बर्गमन व श्र्चील हे रसायनशास्त्रज्ञ, रोझेंस्टीन हा औषधीशास्त्रज्ञ, चॅपमन हा नौकाशास्त्रज्ञ, ऑरिव्हिलस हा भाषाशास्त्रज्ञ असे अनेक विद्वान होऊन गेले; पण या सर्वांनीं लॅटिनमध्यें ग्रंथ लिहिले आहेत. गुस्टोव्हिअन काळ म्हणून म्हणतात तो तिसऱ्या गुस्टोव्हस (१७७१) पासून चवथ्या गुस्टोव्हसपर्यंत (१८०९) सुमारें चाळीस वर्षांचा आहे.या काळांत लोकांतील वाङ्मयाची अभिरुचि फार वाढली. वृत्तपत्रांची वाढ झाली. स्वीडिश ॲकॅडमी स्थापन झाली, नाटकांची भरभराट झाली व वाङ्मयाला खरें राष्ट्रीय वळण लागलें. स्वीडनचे राज्यकर्ते यांचा ग्रंथकारांना चांगला आश्रय मिळाला, इतर फ्रेंच नव्हे तर ते राज्यकर्ते स्वत: मोठे विद्वान लेखक होते. गुस्टॅव्हस हा स्वत: चांगला नाटककार होता. त्यानें एक थिएटर सुरू केलें व नाटकांनां पूर्ण उत्तेजन दिलें. त्यानें स्वीडिश ॲकॅडमीहि सुरू केली. खुद्द राजाच्या ग्रंथांचें एकंदर सहा भाग आहेत व त्याच्या कारकिर्दीतलें बेलमन, पॅरडाइझ लॉस्टचा भाषान्तरकार गिलेंबॉर्ग, कोलग्रेन, लिओपोल्ड, मेरिआ लेन्ग्रेन वगैरे प्रसिद्ध लेखक होते. यांशिवाय लिडनेर, थोरिल्ड व लेख व कला यांचे दुष्परिणाम या रूसोच्या मताचें वक्तृत्वपूर्ण खंडन करणारा रोझेस्टीन वगैरे विद्वान होऊन गेले. हॅमरस्कोल्ड व ॲटरबग यांनीं आपआपली स्वतंत्र सोसायटी काढून ग्रंथोत्तेजनाचें काम केलें. १८११ मध्यें गॉथिक सोसायटी स्थापन झाली. तिनें चालविलेल्या इडयूना मासिकाचे गेजर व टेग्नर हे दोघे प्रसिद्ध संपादक होते, या सोसायटींत दुसरे अनेक कादंबरीकार, नाटककार व कवी होऊन गेले. १८१० ते १८४० हा स्विडिश वाङ्मयांतला वसंतकाळ होय. स्टॅग्नेलिअस याची शेले कवीशीं तुलना केली आहे ती योग्य आहे. गद्यलेखकांत आल्मक्लिस्ट हा कादंबरीकार, ग्युमेलिअस हा ऐतिहासिक कादंबरीकार वगैरे झाले सर्वांत ब्रेमर या लेखिकेच्या गोष्टी दूरदूरच्या देशांतहि पसरल्या आहे. विसेलडोन यानें इतिहास व चरित्रें यांत चांगली भर टाकिली आहे. १८५० च्या सुमाराचा रुनबर्ग हा अप्रतिम कवि होता. माल्मस्ट्रॉम हा सौंदर्यशास्त्राचा प्रोफेसर होता व चांगला कवि व टिकाकाराहि होता. बॉरिजर यानें अनेक स्वीडिश विद्वानांवर एकोद्दिष्ट लेख (मोनोग्राफ) लिहिले आहेत. ब्लांच व डाल्हग्रेन हे चांगले नाटकाकार होते. १९ व्या शतकाच्या अखेरीस टोमलिअस हा अत्यंत लोकप्रिय कवि होता (१८१८ ते १८९८) हेडबर्ग हा कवि, कादंबरीकार व नाटककार होता. निब्लो व पतिपानी हे दोघेहि प्रसिद्ध लेखक होते. अ ली क डी ल च ळ व  ळ.-१८२४ च्या सुमारास वस्तुवादाची (रिआलिझम) लाट आली व त्यामुळें जुन्या व नव्या पंथाचे लेखक असे दोन भाग झाले. त्यातं नव्या पंथाचीच सरशी झाली. जुन्या पंथांतले रिडबर्ग, स्नॉइलस्की व विरसेन हे लेखक होते. त्यापैकी विरसेन यानें तर पुनरुज्जीवनांतील हरएक नवीन कल्पना, कला व ग्रंथ यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. पण असल्या अनुदार व संकुचित धोरणामुळें तो मोठा बुद्धिमान असूनहि अत्यंत अप्रिय होऊन बसला. सांप्रतच्या तरुण-स्वीडनपक्षांतील लेखकांच्या मनांवर वार गोष्टींचा विशेष परिणाम झालेला आहे. त्या गोष्टी स्पेन्सरचें इंग्लिश तत्वज्ञान, झोलाचा फ्रेंच वस्तुवाद. इबसेन वगैरे नॉर्वेजियनांची नाटकें व ब्रॅडसचे डॅनिश टिकात्मक निबंध अगदी अलीकडच्या वाङ्मयांत स्टिडबर्गचें नांव सर्वात प्रसिद्ध आहे. हा पूर्ण निराशावादी हातो. त्याचें 'मास्टर ओलॉफ' हें नाटक व 'दि रेड रूम' (तांबडी खोली) ही कादंबरी यांनीं सर्वांचें लक्ष वेधलें. नंतर मॅरिड' (वैवाहिक स्थिती) नांवाच्या लेखामुळें तर त्यांच्यावर कोर्टांत दावाच लागला. पुढें तो कांही दिवस विचाराविचारांनी वेडाच झाला होता. त्याचें 'मूर्खाची जबानी' (फूल्स कन्फेशन) हें पुस्तक छापण्यास मनाई झाली होती. शेवटी मात्र तो नास्तिकाचा पूर्ण ईश्वरवादी बनून ख्रिस्ती धर्माभिमानी झाला. एकंदरीत त्याच्या ग्रंथांनीं मोठीच खळबळ उडवून दिली होती. स्ट्रिट बर्गचा अगदी पूर्ण प्रतिस्पर्धी असा लेखक म्हणजे हॅन्सन होय. पहिला पक्का स्त्रीद्वेष्टा तर दुसरा स्त्रीला दैवत मानणारा होता. स्ट्रिडवर्गसारखाच नैराश्यवादी गिजेस्टन याचीं 'गरीब लोक' व 'उप्साला येथील विद्यार्थ्यांचा जीवनक्रम' ही दोन पुस्तकें फार खळबळ उडविणारी झालीं. पुढें त्यानें एकंदर चाळीसावर पुस्तकें लिहिली व उत्तर यूरोपभर प्रसिद्धि पावला. व्हिक्टोरिया बेनेडिक्शन ही स्त्रीलेखकांत पहिल्या दर्जाची आहे. तिची 'पैसा' (मिनी) ही कादंबरी उत्कृष्ठ आहे. अग्नेल म्हणून एका लेखिकेची 'रेस्कूड' वगैरे नाटकें व कादंबऱ्या चांगल्या आहेत. क्रूझचें नेपोलियनवरचें अद्भुतकाव्य (रोमान्स) अतोनात लोकप्रिय झालें. हेडबर्ग याचें ज्यूडास व काहीं नाटकें फार प्रसिद्ध आहेत. सेल्यालॅगरलॉफ हिच्या कांदबऱ्या उत्तम आहेत. हेलस्ट्रॉम याचें बिनेशिअन हें आनंदपर्यवसायी नाटक बरेंच लोकप्रिय झालें आहे. (१९०४) अलीकडील भावगीतकारांमध्ये बाय यानें संसारांतील अनेक दु:खकारक प्रसंगांवर गीतें लिहिली आहेत. मेलिन, लेव्हर्टिन व अलीन हेहि प्रसिद्ध आहेत. वॉशिंगचा 'जितार ॲड ॲकॉडिअन' हा काव्यसंग्रह फार विनोदी, शृंगारिक, करुणापर असून त्यानें लोकांत चांगलीच खळबळ उडवून दिली (१८९१). त्यानें आणखी दोन तीन कवितासंग्रह प्रसिद्ध केले. त्यात सर्वगामित्व विषयोद्दिपकत्व व निंदाप्रचुरत्व असले प्रकार होते. पुढें काही दिवस तो वेडा बनला होता. परंतु लवकरच बरा झाला. पण नंतर तो पक्का धार्मिक बनून वैराग्यपर लिहूं लागला. २० व्या शतकाच्या आरंभीं अत्यंत वजनदार लेखक म्हणजे हेडमामस्टम हा होय. यांची मतें वस्तुवादी नैराश्यवादी, प्रत्ययवादी,अशीं बदलत असत. पण गीताकारांत त्याचा दर्जा फार उच्च आहे. एलन की ही स्त्रीलेखिका फार प्रसिद्धीस आलेली आहे. तिचीं 'विचारचित्रें', 'मानवप्राणी', 'मुलांचे जातक' ही पुस्तकें फार चांगली आहेत. स्वीडनमधील चालू पिढीवर तिच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे. सोडरबर्ग (मार्टिन वर्क्स युथचा कर्ता) यानें १९०१ मध्यें बरीच खळबळ उडविली. प्रो. श्र्चूक यानें शेक्सपिअरवर चांगलें लेख व स्वीडिश वाङ्मयाचा इतिहास लिहिला आहे. नाटकांनां फारसें महत्त्व स्वीडनमध्यें कधीच मिळालें नाहीं. तथापि मोलॅडरचीं नाटकें बरींच लोकप्रिय आहेत. पूर्वी स्वीडिश अकेडमींने लेखकांस उत्तेजन देण्याचें काम चांगलें केलें, पण आता तें काम अगदीं बंद केलें आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .