प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
            
स्वित्झर्लंड- हें मध्य यूरोपांतील लोकसत्ताक राज्य असून यांत 'स्विस कान्फेडरेशन' चा समावेश होतो. याचा आकार विषमभुज चतुष्कोनासारखा असून त्याची सर्वांत जास्त लांबी (पूर्वपश्र्चिम) २२६ १/२ मैल आहे. आणि सर्वांत जास्त रुंदी (दक्षिणोत्तर) जवळ जवळ १३७ मैल आहे. एंकदर क्षेत्रफळ १५९७५ चौरस मैल आहे. याचे लहान  लहान भाग असून प्रत्येक भाग भाषा, धर्म, वंश चालीरिती वगैरे गोष्टींत दुसऱ्यापासून अगदीं भिन्न आहे. परंतु कांहीं राजकीय कारणासाठीं- उदाहरणार्थ , सामन्य शत्रूशीं लढाई करावयाची असल्यास, या सर्व भागांनीं आपापसांत दोस्ती केलेली आहे. देशाच्या राजकीय सरहद्दी आणि नैसर्गिक सरहद्दी एक नाहींत. देशाच्या दक्षिणेस आल्प्स पर्वताची मुख्य रांग आहे. आल्प्स रांग आणि तिच्या उत्तरेकडील रांग या दोन्ही रांगा माँट डोलेंटोपासून समांतर जातात. या दोन रांगांमधून ऱ्होन आणि ऱ्हाईन या दोम मोठाल्या नद्या अनुक्रमें पश्र्चिमेकडे आणि पूर्वेकडे वाहात जातात. स्वित्झर्लंडमध्यें आल्प्सपर्वतांचें डुफोरस्पित्झ (माँटे रोझाचें) नांवाचें शिखर सर्वांत उंच असून त्याची उंची १५२१७ फूट आहे. एकंदर क्षेत्रफळापैंकी  १/६०  भाग आल्पसपर्वतानें १/१० भाग ज्युरा पर्वतानें, व बाकीचा डोंगरपठारानें व्यापला आहे. ग्रिसान्स, बर्ग आणि व्हलेस या तीन मोठाल्या कँटनचें क्षेत्रफळ सरासरी या देशाच्या निम्में आहे. येथून चार मोठाल्या नदीपाणवठयांनां पाण्याचा पुरवठा होतो.  स रो व रें.-स्वित्झर्लंडमध्यें लहान-मोठी बरींच सरोवरें आहेत. जिनेव्हा आणि कान्स्टन्स हीं सर्वांत मोठीं आणि विस्तीर्ण सरोवरें आहेत व ती अनुक्रमें नैर्ॠत्य आरि ईशान्य कोंपऱ्यांत आहेत. याशिवाय न्युच्याटेल, लॅगो मॅज्जिओर, ल्युसर्न, झ्यूरिच, लुगंनो, थुन, बिएन्ने, झुग, ब्रिएन् , मोरट, वलेन्सी आणि सेम्पक ही सरोवरें आहे. या फक्त चवदा सरोवरोंचेच क्षेत्रफळ चार चौरस मैलांपेक्षां अधिक आहे. बाकीच्या लहान सरोवरांपैकीं प्रवाशांस चांगली माहीत असलेलीं डाबेन्सी, ओएस्वीनेन्सी आणि मार्जेलेन्सी ही तीन आहेत. धबधब्यांची संख्या अतिशय असून त्यापैकीं कांहींचा प्रवाह मोठा असून उंची कमी आहे तर याच्या उलट कांहींचा प्रवाह अगदीं सुतासारखा बारीक असून उंची अतिशय आहे येथे एक हजार हिमनद्या (ग्लसिअर्स) आहेत असें म्हणतात. ग्रेट अलेत्स्क (१६ १/२ मैल), फिक्चर (१० मैल), उन्टेरार (१० मैल) या तीन सर्वांत लांब हिमनद्या असून या आल्प्स पर्वताच्या उत्तरे डील उंच भागांमध्ये आहेत. जं ग ल.-१९२३ सालीं एकंदर जंगल २४०७७३३ एकर होतें. बर्न, ग्रीसन्स, व्हाड, हालेस, आणि टिसिनो या पांच कँटेनमध्यें जंगल फार आहे. ह वा मा न.-स्वित्झर्लंडमध्यें हिंवाळा निरनिराळ्या ठिकाणीं तीन महिन्यापासून बारा महिन्यांपर्यंत असतो. बेव्हर्स (उंची ५६१० फूट) येथें हिंवाळयांत सर्वांत कमी उष्णमान (१४˚) असतें. आणि उन्हाळयांत सर्वात जास्त उष्णमान (७७˚) असतें. आल्प्स पर्वताच्या बर्फाच्छादित शिखरावर अतिशय पाऊस किंवा (दरवर्षी ८९.७ इंचांपर्यत) पडतें. लो क सं ख्या.-येथील लोकसंख्या १८५० सालीं सरासरी २३९२७४० आणि १९२० सालीं ३८८०३२० होती आत्प्सच्या प्रदेशांतील वस्ती अतिशय पातळ आहे. ज्युरा पर्वताच्या टापूंतील वस्ती त्याहून बरीच जास्त आहे व स्विस डोंगरपठारावरील अतिशय दाट आहे.  स्विसेतर वंशाचे लोक १८५० मध्यें ७३५७० होते ते १९२० मध्यें ४०२३८५ झाले. त्यांत जर्मन सर्वांत जास्त आहेत. त्यानंतर इटालियन, फ्रेंच आणि ऑस्ट्रिअन येतात. प्रॉटेस्टंट धर्मपंथाचे लोक शेंकडा ५८ असून, रोमन कॅथोलिक पंथाचे शें. ४० आणि बकीचे ज्यू व इतर पंथाचे आहेत. १८४८ आणि १८७४ च्या फेडरल कॉन्स्टिटयूशनप्रमाणें जर्मन,फ्रेंच आणि इटालियन या तीन राष्ट्रभाषा ठरविण्यांत आल्या होत्या व पुढें पार्लमेंटमध्यें वादविवाद करतांना आणि कायदेकानू करण्यासाठीं या तीन भाषांचाच उपयोग करण्यांत येत असें. जर्मन भाषा बोलणारे लोक सर्वांत जास्त आहेत. मुख्य रा ज की य भा ग आ णि श ह रें.--राज्यकारभारांसाठीं आणि राजकींय कामासाठीं १८७ 'डिस्ट्रिक्ट' पाडले आहेत. डिस्ट्रिक्ट आणि कँटन हें अगदी निरनिराळे भाग आहेत.  कॅटेन हीं राज्यें आहेत. त्यांची संख्या बावीस आहे. १९२० सालीं २५ शहरांची लोकसंख्या दहा हजारावर होती. पुढें दिलेलीं शहरें सर्वांत मोठी आहेत झ्युरिच (लोकसंख्या २ लाख), बाल, जेनेव्हा आणि बर्न, द ळ ण व ळ णा चे मा र्ग.-१९ व्या शतकांत येथें अल्पाईन घाटांत गाड्यांचे मोठाले रस्ते बांधले. सिम्फ्लोन वरील रस्ता पहिला होय (१८००-१८०७).  त्यानंतर फुर्क, ग्रेट सेट बर्नार्ड, ग्रिम्सल आणि क्लोसेन घाट या ठिकाणीं रस्ते बांधले. १९०१ सालीं तयार केलेला उम्ब्रेल घाटावरील रस्ता सर्वांत उंच (८२४२ फूट) आहे. जेनेव्हा, कॉन्स्टन्स, लेंगोमाँजआर न्यू च्याटल, युन, ल्युसर्न आणि ब्रिएन्झ या सरोवरांवरून बोटी चालतात. यांपैकीं जेनेव्हा सरोवरावर प्रथम (इ. स. १८२३ मध्ये) दळणवळण सुरू झालें. झ्युरिचपासून आरगौमधील बडेन पावेतों आगगाडीचा पहिला मार्ग (इ. स. १८४७ मध्यें) सुरू झाला. मुख्य मार्ग सरकारी आहेत. आगगाडीचा सर्वांत उंच डोंगरी मार्ग एद्दसमीर स्टेशनावरून (१०३७१ फूट) गेला आहे. सेंट गोत्थर्ड, आल्बुल, आणि सिम्प्लोन यासारखे बरेच बोगदे आल्प्स पर्वतांतून खोदले आहेत. परदेशीय पाहुण्यांची किंवा चैनीखातर आलेल्या लोकांची सोय (खाण्यापिण्याची) करून देण्याचा धंदा सर्वांत मोठा आहे कारण या धंद्यातील उत्पन्न इतर धंद्यापेक्षां जास्त असतें. शेतकीच्या जमिनींपैकीय १/३  जमीन लागवडीखाली आणि कुरणांची आहे आणि यापैकी कुरणाच्या जमिनीचें प्रमाण शेंकडा ८३ आहे. येथें चीज आणि दूध घट्ट करण्याचे कारखानें आहेत. धान्याची लागवड फार थोड्या (शेंकडा १४) जमिनींत होत असल्यामुळें बरेंच धान्य परदेशांतून मागवावें लागतें. याशिवाय तंबाखू फळफळावळ वगैरे पिकें होतात. खनिज पदार्थांपैकी आसफाल्ट मुख्य आहे. लोखंड, तांबे, व रौप्यमिश्रित शिसें या धातूंच्या खाणी आहेत. याशिवाय आँथ्रासायट, मीठ, संगमरवरी दगड वाळूचे दगड, ग्रॅनाइट वगैरेंच्या खाणी आहेत. येथें कापड विणण्याचे, घड्याळें करण्याचे, कशिद्याचें काम करण्याचे आणि यंत्रें करण्याचे मुख्य कारखाने आहेत. व्या पा र.-सन १८७० पर्यंत या देशाचें अगदीं खुल्या व्यापाराचें धोरण होतें, परंतु त्यानंतर त्यानें हें धोरण बदलून संरक्षित व्यापाराचें धोरण स्वीकारलें जाऊन व्यापार संरक्षणार्थ मालावर जबर जकात बसविण्यांत आली. १९२४ सालांत जकातीचें उत्पन्न सरासरी २०५१००००० फ्रँक होतें. १९२४ सालीं आयात १००१७८७२० पौंड व निर्गत-त्याच सालीं ८२८०८६८० पौंड होती. १८९५ पासून रेशमाच्या कशिद्याच्या, घड्याळांच्या व यंत्राच्या व्यापारांत बरीच वाढ होत आहे. रा ज्य का र भा र.-(अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांप्रमाणें) स्वित्झर्लंडमध्येंहि निरनिराळीं लहान स्वतंत्र संस्थानें आहेत.  त्यांनां कँटॉन असें म्हणतात. ह्या संस्थानांनीं कांही बाबतींतील स्वत:चे हक्क ''स्विस कान्फेडरेशनकडे'' दिलेले आहेत. प्रत्येक कँटॉनमध्यें ''काम्यून'' अथवा ''गेमॉइंडेन'' नांवाचे राजकीय विभाग आहेत; व तेच देशांतील घटकावयव होत. काम्युनांची एकंदर संख्या ३१६४ असून प्रत्येक काम्यूनला आपला बहुतेक सर्व कारभार पाहण्याचा अधिकार असतो. बावीस कँटीनचे राज्यकारभाराच्या सोईसाठीं १८७ 'डिस्ट्रिक्ट' केले आहेत व प्रत्येक डिस्ट्रिक्टचा कारभार चालविण्यासाठीं प्रिफेक्टची नेमणूक केलेली असते. प्रत्येकाला आपाआपले फौजदारी आणि दिवाणी कायदे करण्याचा अधिकार असतो. इ. स. १८४८ त फेडरेशनची निदान कायदे करण्याच्या बाबतींत तरी पुनर्घटना झाली. राज्यकारभार चालविण्यासाठीं फेडरेशनच्या दाने सभा असतात; (१) स्टँडे राट किंवा कौन्सिल ऑफ स्टेट्स सभा-या सभेंत प्रत्येक कँटॉनमधून दोन प्रतिनिधी जातात. (२) नॅशनल राट किंवा नॅशनल कौन्सिल सभा:-हिच्यांत जे प्रतिनिधीं येतात ते कँटोनमधून दर २०००० लोकांतून एक या प्रमाणानें निवडलेले असतात. दोन्ही सभांचा दर्जा सारखाच असतो व कोणताहि मसुदा व्यावहारिक सोईप्रमाणें कोणत्याहि सभेंत मांडतां येतो. या सभांची बैठक दरवर्षी एकदां बर्न राजधानींत होते. कार्यकारी सत्ता दोन्ही सभानीं तीन वर्षासाठी निवडलेल्या सात सभासदांच्या हातीं असते. या सातांपैकीं कोणतेहि दोन एकाच कँटोनमधले नसले पाहिजेत. या फेडेरल कौन्सिलच्या अध्यक्षांची नेमणूक दर वर्षी होते. परराष्ट्रीय कारभाराचें खातें अध्यक्षाकडे व बाकीचीं खातीं इतर सभासदांकडे असतात. पण सर्व खात्यांच्या कारभारांचा शेवटीं निकाल सभेनेंच दिला पाहिजे. फेडरेशनचें २४ सभासदांचे एक 'ट्राब्यूनल' असतें. ह्या कोर्टाची बैठक लौसन्ने येथें असून याच्या अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची नेमणूक फेडरेलतर्फे दर दोन वर्षांनीं होते. फेडरेशनच्या कारभाराविषयीं कॉनफेडरेशन, कँटॉन आणि एखादा नागरिक यांमध्यें कांहीं भांडण उपस्थित झाल्यास या कोर्टाला त्याचा निकाल लावण्याचा अधिकार आहे. या निकालावर फेडेरल कौन्सिलकडे, किंवा दोन्ही सभांकडे 'अपील' करतां येतें. सन १९२४ मध्यें या राज्याचें उत्पन्न ९३१४६०८ पौंड आणि खर्च १२१७८८६०० पौंड होता. १८७४च्या संयुक्त घटनेप्रमाणें पोस्ट आणि टेलेग्राफ हीं दोन्ही खातीं संयुक्त राज्याच्या देखरेखीखालीं आली व १८७८ त टेलेफोन खातेंहि आलें. १९०७ त स्विस नॅशनल बँक स्थापन झाली. ध र्म.-संयुक्त घटनासंमत अशा एकाहि धर्मपंथाची येथें स्थापना झालेली नाहीं. १८७४ च्या घटनेप्रमाणें सर्वांना धर्मस्वातंत्र्याचे व प्रार्थनास्वातंत्र्याचे हक्क दिले होते पण त्यानंतर या हक्काला अपवादात्मक असे एक दोन कायदे करण्यांत आले. प्रॉटेस्टंट धर्मपंथाच्या लोकांची संख्या एकंदर लोकसंख्येच्या तीनपंचमाशांवर आहे. शि क्ष ण.-येथें शिक्षणाकडे बरेंच लक्ष देण्यांत येतें व त्याच्या प्रीत्यर्थ कँटोन आणि काम्यून यांचा दर वर्षी बराच खर्च होऊन शिवाय संयुक्त राज्याकडून देणग्याहि मिळतात. शिक्षणसंस्थाचे पुढील चार वर्ग आहेत:-(१) प्राथमिक शिक्षणाचा कारभार कँटॉनच्या हातीं असून देखरेख कॉन्फेडरेशनच्या हातीं आहे. कांहीं शाळांनां देणग्यांची मदत असून या देणग्यांचा विशिष्ट कामाकडे उपयोग करण्यांत येतो. ६ पासून १६ वर्षांच्या वयाच्या मुलास शिक्षण सक्तीचें केलें आहे. (२) दुय्यम शाळा.:-प्राथमिक शाळेंतील ज्या मुलांनां उच्च शिक्षण न घेतां पुढें ज्ञान मिळवावयाचें असतें. त्यांच्यासाठीं आणि कांहीं मुलांनां 'मिडल स्कूल' मध्यें जाण्याची परवानगीं मिळण्यासाठीं या शाळांची स्थापना केलेली आहे. शिक्षणक्रम दोन पासून चार वर्षांच्या वर असतो व दहा वर्षांच्या वयावर असलेल्या मुलांनां शाळेंत घेण्यांत येतें. (३) मिडल स्कूल:-या नांवाखाली निरनिराळ्या शाळा येतात. त्यांचे ठोकळ मानानें दोन वर्ग करतां येतील-(अ) धंदेशिक्षणाच्या शाळा, आणि (ब) प्राथमिक शाळा, विद्यालयें आणि कँटानमधील शाळा. (४) निरनिराळ्या धंद्यांच्या शाळा (पॉलिटेक्निकल स्कूल्स), शिवाय विश्वविद्यालयें आणि इतर संस्था उघडण्यांत आल्या आहेत. बॅसेल, झ्यूरिच, बर्न, जेनेव्हा, फ्रिबर्ग, लौसन्ने आणि न्यु चॅलट या सात ठिकाणीं विश्वविद्यालये आहेत. सिलोन येथें एक कायदेशिक्षणाची शाळा आहे. लष्कर.--२० ते ४८ वर्षेपर्यंत वयाच्या प्रत्येक नागरिकानें लष्करी शिक्षण घेतलेंच पाहिजे. या नियमांतून कांहीं लोक वगळलेहि आहेत. उदा. वरिष्ठ हुद्याचें अधिकारी क्लजींमन, वगैरे. जे लोक या कामाला नालायक असतात. त्यांच्यापासून वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत एक प्रकारचा विशिष्ट कर केला जातो. संयुक्त सरकार आणि कँटान यांच्यामध्यें वसूल झालेल्या कराची वांटणी होते. कांहीं ठरविलेल्या ठिकाणीं कँटानमधील वीस वर्षांच्या वयाचे लोक गोळा करून त्यांची परीक्षा घेण्यांत येते व त्यांत नालायक ठरलेल्या लोकांची पुन्हां चार वर्षांनी परीक्षा घेतली जाते. १९२४ सालीं असें शिकाऊ लष्कर ४६२०० सैनिकांचें होतें. युद्धप्रसंगीं स्वित्झर्लंडला दोन लाखांपर्यंत सैन्य जमवितां येतें. इ ति हा स.-ता. १ ऑगस्ट १२९१ रोजी उरी, स्विस, व निडवालइब या खोऱ्यांतील लोकांनीं आत्मसंरक्षणाकरतां एक चिरस्थाई संघ स्थापन केला. हा संघ भावी स्विस संयुक्त राज्याचा पाया होय. स्विस लोक ८५३ पासूनच राज्यकारभार स्वत: चालवीत असत. परंतु १२७३ मध्यें रुडॉल्फ हा सम्राट झाला पण त्याच्या हेतूविषयी स्विस लोकांच्या मनांत संशय असे. व म्हणून स्विस लोकांनीं चिरस्थाई संघ स्थापून पुढें येणाऱ्या प्रसंगास तोंड देण्याची पूर्वीपासूनच तयार केली. १२९२ त अडॉल्फ हा जर्मन सम्राट निवडला गेला. व त्यानें १२९७ व उरी येथील लोकांनां नवीन सनदा देऊन त्यांचे पुरातन हक्क मान्य केले. त्यानंतर आलेल्या अलबर्ट हेनरी. लुई वगैरे सम्राटांनी यांस मान्यता दिल्यानें उत्तरोत्तर संघाची भरभराट होत गेली व १३५२ मध्यें या संघाला स्वित्झर्लंड हें नांव प्राप्त झालें. हळू हळू संघाला शहरें मिळू लागलीं. ल्युसर्न, झ्युरिच, ग्लेसर वगैरें ८ शहरें संघाला मिळाली होतीं. पुढें ल्युर्सन, ग्लेसर हीं शहरें हॅम्पबर्गस घराण्याच्या मालकाची होतीं म्हणून ऑस्ट्रिया त्यांवर हक्क सांगू लागला. व शेवटीं युद्धांचा प्रसंग आला. बाकीच्या शहरांनी संगनमत करून आस्ट्रियाचा पूर्ण पराभव केला. या युद्धांत संघ विजयी झाल्यानें त्याचें सामर्थ्य वाढलें. यानंतर अण्झेलचा डोंगराळ मुलूख संघानें आपल्या संरक्षणाखालीं घातला. सेंटपॉल व बोले हीं दोन शहरेंहि संघास मिळालीं. सिगिस्मंड बादशहाच्या अंमलाखालीं काहीं कारणानें संघाला अधिक मुलूख व सत्ता गिळाली. व हा संघ लवकरच साम्राज्याचें जूं झुगारून देईल अशीं चिन्हें दिसूं लागलीं. संघातील प्रांत आपल्या हद्दीं वाढवू लागलें. उरीनें आजूबाजूला आक्रमण करून पुढें विस्तार करण्याला जागा नसल्यानें दक्षिणेकडे चाल करण्यास सुरवात केली. उरतरेनचें खोरें व सेंट गोथार्ड पास हीं उरी प्रांतानें काबीज केलीं. पण मिलनच्या डयूकनें या प्रांतावर सैन्य पाठविलें. उरीनें संघाच्या मदतीनें मिलनच्या डयूकला तोंड देण्याचा निश्र्चय केला पर डयूकनें संघांतील सभासदांनां लाच दिल्यामुळें त्या बाबतींत ऐकमत्य होईना. पण उरीनें ते प्रांत परत मिळविले. पुढें कांहीं प्रांतांच्या वांटणीसंबंधानें झ्यूरिच व स्विस प्रांतांत भांडण लागलें. झ्यूरिचनें संघातून फुटून जर्मन साम्राज्याशीं व आस्ट्रियाशीं संगनमत करून युद्धाचीं तयारी केली, पण संघाच्या सैन्यानें टिकाव धरून शत्रूच्या सैन्याचा बीमोड केला. या विजयानें संघ सामर्थ्यवान् बनला व त्यानें फ्रान्सशीं दोस्ती केली, व नवीन प्रांत काहीं अटीवर संघांत घेतले. त्यांनां प्रथम कांहीं दिवस युद्ध, तह, वगैरे बाबतींत मताचा हक्क नसून 'डाएट' निकाल देईल त्याप्रमाणें त्यांनां वागावें लागे. नवीन प्रांतांनां कांहीं मुदतीनंतर 'डाएट' चें सभासदत्व देण्यांत आले. पुढें कांहीं कारणानें सिगिस्मंडचा ताबा असलेल्या संघाच्या जमिनीबद्दल तंटा निघून शेवटी युद्धपर्यंत प्रकरण गेलें. यावेळी साम्राज्य सरकारनें सैन्याची कुमक आयत्या वेळी बंद केली तरी संघानें चार्लस राजाशी लढून त्याचा पराभव केला. पुढें संघांत आपापसांत भांडणें उत्पन्न झालीं. पण एकी कायम रहाण्यासाठीं आपापसांत कांहीं नियम करण्यांत आले. फ्रीबर्ग व सोळेअर हीं शहरें संघांत सामील करण्यांत आली. संघाचें सामर्थ्य दिवसानुदिवस वाढत गेल्यानें साम्राज्य व संघाचें पटेनासें झालें. १४९९ च्या मे महिन्यांत संघ व साम्राज्य यांत युद्ध जुंपले. परंतु लवकरच आपापसांत तह होऊन युद्ध बंद झालें. संघाची उत्तर बाजू बळकट करण्याकरतां १५०१ मध्यें बेसल व शाफ हौसेन हीं शहरें संघानें आपल्यांत सामील करून घेतलीं. १५१३ मध्यें अपेंझेल शहराला संघाचें सदस्य करण्यांत आलें. आतां संघांत एकंदर १३ शहरें झालीं. या सुमारास प्रॉटेस्टंट पंथ निघाला. या धार्मिक क्रांतीचा परिणाम स्वित्झर्लंडवर होणें साहाजिक होतें. तेथें नवमतवादी शहरांनीं आपला संघ बनविला व त्याची प्रतिक्रिया पुराणमतवाद्यांचा हंगेरीचा राजा फर्डीनंड याच्या नेतृत्वाखालीं दुसरा संघ स्थापण्यांत झाली. पुढें हा बेबनाव फार वाढून रक्तपातापर्यंत मजल आली, पण शहरें लवकर शहाणीं होऊन त्यांनी आपापसांत तडजोड केली व प्रत्येकात धार्मिक स्वातंत्र्य दिलें. पुराणमतवाद्यांनीं हंगेरीशीं जोडलेला हितसंबंध तोडला. लूथरनंतर धार्मिक सुधारणेचा लंबक परत फिरला व स्वित्झर्लंडमध्यें जेसूईट पंथी लोकांचा जिकडे तिकडे सुळसुळाट झाला. आतांपर्यंत हा संघ जरी स्वतंत्र राष्ट्राप्रमाणें वागत असें, तथापि  इतर राष्ट्रांनी त्यास संमति दिली नव्हती. पुढें वेस्टफालियाच्या तहांत यूरोपांतील प्रमुख राष्ट्रांनीं त्यास स्वतंत्र राष्ट्राप्रमाणें मान्यता दिली, व आतां संघ स्वतंत्र राष्ट्राप्रमाणें वागूं लागला. संघाला यानंतर मध्यवर्ती सरकारची आवश्यकता वाटूं लागली पण एक-दोन संघसदस्यांच्या विरोधामुळें तें शक्य झालें नाहीं. पण कांहींनीं फ्रान्सच्या कांतिकारकांशीं संगनमत करून संघावर स्वारी करविली. फ्रान्सशी स्वारी होऊन संघाचा पराभव झाला तेव्हां फ्रेंच क्रांतिकारकांनी लादलेली राज्यघटना संघाला निमूटपणें मान्य करून घेणें भाग पडलें. फ्रेंच क्रांतिकारकांनी सीनेट व ग्रेट कौन्सिल या दोन लोकनियुक्त प्रनिनिधींच्या सभा बनवून मताधिकार ठरवून दिला. निरनिराळ्या सभेंतील प्रतिनिधीहि ठरविले. कार्यकारी सत्ता पांच डायरेक्टरांच्या हातीं दिली. पुढें यूरोपमध्यें नेपोलियन प्रभावशाली बनला. त्यानें १८०३ मध्यें या संघाला स्वित्झलेंड हें नांव दिलें. यानें 'ग्रेट कौन्सिल' ही कायदेकारी सभा केली व 'स्मॉल कौन्सिल' हे कार्यकारी मंडळ बनविलें. शासनविभागांनां स्वतंत्रपणें परराष्ट्रांशीं व्यवहार करण्यास मज्जाव करण्यांत आला. नेपोलियननंतर दहा वर्षेपर्यंत ही शासनघटना कशी तरी चालली. पण पुढें भानगडी उपस्थित होऊं लागल्या व पूर्वीप्रमाणें स्वित्सर्लंडमधील एका विभागानें आस्ट्रिया व रशियाच्या मदतीनें लोकशासित घटनेचें लोकमतानुवर्तित्व कमी केलें, व राजसभेची योजना केली. प्रत्येक शासनविभागाला या सभेंत एक मत देण्यांत आलें. परराष्ट्रीय धोरण निश्र्चित करण्याकरितां ३/४ बहुमत आवश्यक  करण्यांत आलें व संयुक्त सैन्याची तरतूद करण्यांत आली. १८३० मध्यें फ्रान्सांत राज्यक्रांतीची चळवळ पुन्हां उद्भवली.  तिची परिणाम स्वित्झर्लंडवर होऊन राज्यघटनेची दुरुस्ती व्हावी असें म्हणणारा एक पक्ष निघाला. परंतु बेकीमुळें तें अशक्य झालें. तरी पण १८४७ मध्ये राज्यघटना तपासण्यांत येईल असें जाहीर करण्यांत आलें. पुढें एक नवीन योजना तयार झाली. तीवर वादविवाद होऊन पुढीलप्रमाणें घटना मान्य करण्यांत आली. मातृभूमीव्यतिरिक्त शासनविभागांत कोणाला रहावयाचें असल्यास २ वर्षांनंतर त्यास तेथील नागरिकत्वाचे हक्क प्राप्त होतील मध्यवर्ती संयुक्त सरकार स्थापन करण्यांत आलें व त्यास शासन विभागांनीं आपलें आधिपत्य देण्याचें कबूल केलें. 'राजसभा' व 'राष्ट्रीय सभा' या दोन सभागृहांचें मिळून एक संयुक्त कायदेमंडळ स्थापण्यांत आलें. राजसभेंत प्रत्येक शासनविभागाचें दोन प्रतिनिधी व राष्ट्रीय सभेंत २०,००० लोकांस एक याप्रमाणें प्रतिनिधी निवडण्यांत येतील असें ठरलें सात सभासदांचें एक कार्यकारीमंडळ करण्यांत आलें, व हें कार्यकारीमंडळ निवडण्याचा अधिकार संयुक्त कायदेमंडळास देण्यांत आला. न्यायदान व विद्यादानाची व्यवस्था केली, व धार्मिक स्वातंत्र्य दिलें. शासनविभागांवर लोकमताचा दाब पडावा म्हणून रेफरेंडमची पद्धत ठेवण्यांत आली. म्हणजे कोठल्याहि ठरावावर लोकांची मतें घेतलींच पाहिजेत असें ठरलें. १८७४ मध्यें ही घटना पुन्हां सुधारण्यांत आली. यांत शिक्षण मोफत करण्यांत आलें व रेफरेंडमची पद्धत मध्यवर्ती शासन सत्तेलाहि लागू करण्यांत आली. यापुढील काळांत इतर ठिकारांप्रमाणें पक्षोपपक्ष पडूं लागले. पुराणमतवादी, उदारमतवादी, मूळ सुधारणावादी (जहाल), समाजसुधारणावादी, संयुक्तसत्तावादी वगैरे अनेक पण स्वित्सर्लंडमध्यें आहेत. रॅडिकल पक्ष बराच जोरदार आहे. आगगाडयांचें मार्ग मध्यवर्ती सरकारच्या ताब्यांत असावेत किंवा नाही. याविषयीं वाद निघून संयुक्त सरकारनें फक्त पांच मुख्य फांटे आपल्या ताब्यांत ठेवावे असें ठरलें. स्वित्झर्लंडनें प्रथमत: 'खुलाव्यापारपद्धति' ठेवली होती, पण देशाच्या व्यापारास धक्का बसतांच संरक्षकपद्धति अमलांत आणली व तो देश आतां संरक्षक जकातीचा पुरस्कर्ता बनला आहे. १९१० ते १९१४ या सालांत स्वित्झर्लंडमध्यें महत्त्वाचें असें कांहीं एक घडून आलें नाहीं. १९१४ सालीं महायुद्धाला सुरुवात होतांच स्वित्झर्लंडनें ताबडतोब आपल्या सरहद्दीच्या संरक्षणासाठीं सैन्य रवाना केलें. थोडक्याच दिवसांत युद्धमान राष्ट्रांनीं स्वित्झर्लंडचें ताटस्थ्य राखण्याबद्दल आपली ग्वाही दिल्यामुळें सरहद्दीवरून सैन्य काढण्याविषयी स्वित्झर्लंडनें विचार चालविला. तथापि बेल्जमचें ताटस्थ्य जर्मनीनें कसें झुगारून दिलें याची प्रत्यक्ष कल्पना झाल्यामुळें स्वित्झर्लंडनें सरहद्दीवर बरेंच सैन्य ठेवावयाचें ठरविलें. महायुद्धामध्यें स्वित्झर्लंडला व्यापारविषयक बाबतींत व खाद्याच्या बाबतींत फार हाल सोसावे लागले. धान्याचे दर अंदाजापेक्षां जास्त वाढल्यानें मजूरवर्गांत भयंकर असंतोष पसरला त्याचा फायदा सोशालिस्टांनीं घ्यावयाचें ठरविलें. त्यामुळें बंड होण्याच्या भीतीनें स्वित्झर्लंड सरकारनें आपलें सैन्य तयार ठेवलें. त्यामुळें मजूर लोक अधिकच चिडीला जाऊन त्यांनीं संप पुकारला. स्वित्झर्लंड सरकारनें या संपाचें भय न बाळगतां ठराविक वेळेच्या आंत संप न मोडल्यास संपवाल्यांच्या पुढाऱ्यांनां कैद करण्यांत येईल अशी धमकी दिली व त्याचा इष्ट तो परिणाम होऊन संप मोडला. महायुद्धामध्यें स्वित्झर्लंडनें दोन्ही पक्षांनां अनाथ जखमी शिपायांनां त्यांच्या त्यांच्या राष्ट्रांत पोहोंचविण्याच्या कामीं व जखमीं शिपायांच्या मुलाबाळांची काळजी घेण्याच्या कामीं सारखीच मदत केली. १९१९ च्या ऑक्टोबरमध्यें जातवार प्रतिनिधित्वाचें तत्व सरकारनें मान्य केलें व त्याचाच अनुवाद प्रांतिक सरकारांनीहि हळू हळू केला. राष्ट्रसंघाची पहिली बैठक १९२० मध्यें स्वित्झर्लडमधील जिनेव्हा शहरीं भरली, व त्याच सालीं लोकांच्या संगतीनें स्वित्झर्लंड हें राष्ट्रसंघाचा सभासद झालें. वा ङ् म य.-वास्तविक पाहतां स्वित्झर्लंडचें राष्ट्रीय वाङ्मय असें मुळीच नाहीं. याचें कारण असें कीं, स्वित्झर्लंड देशांतील संस्थांनांमध्यें भिन्नभाव फार आहे. भिन्न-भिन्न भाषा बोलणाऱ्या लोकांत तो देश विभागाला गेला आहे. त्यामुळें तेथील बौद्धिक कामगिरी देखील एकजातीय नाही. तेव्हां स्वित्झर्लंड देशांत वाङ्मयाच्या चार शाखा आहेत. त्या अर्थांत तेथें प्रचलित असलेल्या चार भिन्नभिन्न भाषांमुळें निर्माण झाल्या आहेत. तथापि १२९१ पासून १७९८ पर्यंत स्विस संघांत (कॅन्फेडरेशन) फक्त जर्मन भाषा बोलणाऱ्या प्रांतांचाच भरणा असल्यामुळें खरें स्विसदेशीय वाङ्मय म्हणजे जर्मन भाषेंतील वाङ्मयच होय असें, म्हणण्यास हरकत नाहीं. पुढें १८ व्या शतकांत बर्न व इतर ठिकाणीं फ्रेंच भाषा विशेष प्रचारांत आली व फ्रेंच भाषेचें महत्त्व वाढत चाललें. तथापि जर्मन संप्रदाय अधिक महत्त्वाचा व अधिक राष्ट्रीय होता. फ्रेंच संप्रदाय स्विस नसून १८१५ पासून स्विसवाङ्मयांत त्याची स्वतंत्र गणना होऊं लागली. यांशिवाय इटालियन व रोमांचलेडीन हे आणखी दोन संप्रदाय आहेत, पण यांना फारसें महत्त्व नसल्यामुळें त्यांची शेवटी थोडीशी हकीकत दिली म्हणजे काम भागणार आहे. (अ) ज र्म न सं प्र दा य :- १२९१ मधील मूळची लीग (संघ) लॅटिनभाषेंत झालेली आहे. पण कँटनमधील नंतर झालेली संघ दोस्तीपत्रकें, सार्वदेशीय संघाबद्दलचे कागदपत्र व डाएटचे सर्व नियम हीं सर्व जर्मन भाषेंत आहेत. १३ व्या व १४व्या शकतांतील अनेक हस्तलिखित गाण्यांचा संग्रह जपून ठेवलेला आज उपलब्ध आहे. त्यावेळचा हॅडलॉब हा प्रसिद्ध कवि आहे. पूर्वीच्या स्विसलोकांनीं मिळविलेल्या विजयांच्या वर्णनपर असलेल्या युद्धविषयक गाण्यांचा संग्रह आहे. सेंपाचच्या प्रसिद्ध लढाईवरील (१३८६) व बर्गेडियन युद्धांतील नाफेल्सच्या विजयाबद्दलची गाणीं फार चांगली आहेत. याशिवाय त्या वेळच्या स्वित्झर्लंडच्या निरनिराळ्या भागांतील इतिहासवजा बखरी लिहून ठेविलेल्या आहेत. बर्गेडियन युद्धानंतर ऐतिहासिक ग्रंथ लिहिण्याची लाट जोरांत उसळली. शिलिंग, रूस, एटर्लिन, लेझ, बांस्टेटन वगैरे लेखक प्रसिद्ध आहेत. स्विस ह्युमॅनिस्ट लॅटिनमध्यें लिहीत असत. निकोल मॅन्युअलनें जर्मनमध्यें पोपविरुद्ध पुष्कळ औपरोधिक कविता लिहिल्या.  म्यून्स्टनरें जर्मनमध्ये कॉस्मोऑफिआ हे पुस्तक लिहिले.  स्टंफनें स्वित्झर्लंडचा इतिहास व वर्णय जर्मनभाषेंत लिहिले.  टोपोग्राफिया म्हणून एक पुस्तकमाला (१६४२-८८) प्रसिद्ध करण्यांत आली होतीं. एकंदरीत १७ व्या शतकाच्या अखेरपर्यंत जर्मनप्रमाणें लॅटिनमध्येंहि बऱ्याच लेखकांनीं पुस्तकें लिहिली आहेत. उदा. स्प्रेचर, ज्यू हेल्टा, लॅटिन वगैरे लेखकांनीं लॅटिनमध्यें पुस्तकें लिहिलीं आहेत. १८ व्या शतकांत स्वित्झर्लंडमधील बौद्धिक चळवळ जोरांत आली. बॅसेल, बर्न व झ्यूरिच हीं या चळवळीचीं मुख्य ठिकाणें होत. बॅसेलची गणितज्ञांबद्दल विशेष प्रसिद्धी होती. त्यांत यूलर, बर्नोली, जेकब, जोहेन्स डॅनियल हे प्रसिद्ध आहेत. त्या सर्वांच हेल्वेटिक सोसायटीच्या संस्थापकांपैकीं एक इसेलिन हा प्रसिद्ध होता. यानें इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र यांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. बर्न येथील हॅलर हा शास्त्रीय विषयावरील लेखक होता, तथापि त्याच्या 'डाय आल्पेन' या कवितेनें व प्रवासवर्णनांनी लोकांमध्ये पर्वतावरील देखावें पाहण्याची आवड वाढविली. वायटेन बेंचनें अनेक ठिकाणीं प्रवास करून व त्यांची वर्णनें लिहून देशांती सृष्टिसौंदर्यं अवलोकन करण्याकडे लोकांचें मन ओढलें. याशिवाय सूनर वगैरे इतर लेखकांनीहि स्वित्झर्लंडमधील निसर्गनिर्मित सृष्टिसौंदर्य व पर्वतशोभा, रमणीय देखावे यांची चित्ताकर्षक लेख लिहून यूरोपभर प्रसिद्धी करून सोडली. १८ व्या शतकात जर्मन भाषा बोलणाऱ्या स्विस लोकांच्या बौद्धिक चळवळीचें झ्यूरिच हेंच केंद्रस्थान होतें. त्यावेळीं बॉडमेर व ब्रेंटिजर हे अत्यंत प्रसिद्ध लेखक होतें. यांनी विशेषत: शेक्सपिअर, मिल्टन वगैरे इंग्लिश कवीची स्तुति व महत्त्व गाईलें आहे. त्यांच्या या गोष्टीचा गॉटचेड वगैरे लेखकांनीं निषेध केला आहे व त्यावेळीं या भांडणाला बराच जोर आलेला होता. लॅव्हॅटेर नांवाच्या लेखकानें असें प्रतिपादन सुरू केलें कीं, चेहऱ्यावरून माणसाच्या स्वभावाची परीक्षा करतां येते व म्हणून मुखसामुद्रिकशास्त्र म्हणून एक स्वतंत्र शास्त्रच बनविण्यासारखें आहे. पेस्टॉलोजी हा प्रसिद्ध शिक्षणशास्त्री (१७४६-१८२७), हिझेंल व सूल्झर हा सौंदर्य कलानियम यावरील लेखक वगैरे प्रसिद्ध लोक होऊन गेले. वर सांगितलेल्या तीन शहरांखेरीज इतरत्रहि प्रसिद्ध लेखक होऊन गेले. त्यांपैकीं झुमरमन यानें आपल्या समकालीन लोकांवर फारच छाप बसविली होती. व्हॉन मुल्लरनें स्वित्झर्लंडचा इतिहास पद्धतशीर असा प्रथम लिहिला. व एबेलनें या देशाचें 'गाईड बुक' फार चांगलें लिहिलें आहे. झोके यानें सामान्य लोकांकरितां एक इतिहास लिहिला तो अजूनहि पुष्कळ प्रचारांत आहे. पुढील काळांतील जर्मन लेखकांमध्यें गॉथेल्फ, केलर व मेयर हे फार प्रसिद्ध कवी व कादंबरीकार होऊन गेले. स्विस फॅमिली रॉबिन्सन हें पुस्तक जे. डी. वाईसनें लिहिलें. जे. कुन्हा यानें आल्प्सपर्वत व तेथील रहिवाशी यांवर पुष्कळ कविता लिहिल्या आहेत. इसाबेल कैसर या लेखिकेनें कविता व गोष्टी लिहून स्त्रीवर्गाचा मान राखला आहे. जोहाना स्पिरी हिनेंहि लिहिलेल्या लहान मुलांच्या गोष्टी अद्याप लोकांपुढें आहेत. एकोणिसाव्या शतकांतील ऐतिहासिक ग्रंथलेखकांमध्यें सेंट गॉलचा इतिहासकार आर्प्स, प्रॉटेस्टंट चर्चचा इतिहासकार ब्लोच, स्विस राज्यघटनेवर लिहिणारा कुमर, स्विस इतिहास लिहिणारे कॉप व मॅग, स्विस इतिहासकार व त्यांचे  ग्रंथ आणि स्वित्झर्लंडचे कायदे व राज्यव्यवस्था यांचा इतिहास लिहिणारे वाइस बंधू वगैरे लेखक प्रसिद्ध आहेत. चालू काळांत बूची, डयूरर, एशर, मेर्झ रेहन सॅलिस शौलेनबर्गर, वॉर्टमन वगैरे अनेक इतिहासलेखक आहेत. (आ) फ्रें च सं प्र दा य:-स्विस रोमान्डेच्या वाङ्मयांतील वाईट ऑथॉन हा अगदीं आद्य लेखक होय. त्याच्या अनेक शृंगारपर कविता आहेत, व गॉसरनीहि त्याची स्तुति केली आहे. १५३५ मध्यें बायबलचें प्रॉटेस्टंट फ्रेंच भाषांतर करण्यांत आलें. जिनेव्हा येथें कॉल्व्हिनिझम स्थापन झाला; त्याची हकीकत जेन डी ज्यूसी हिनें लिहिली आहे. स्विसे रामान्डेच्या सुधारणावाद्यांनी आपले ईश्वरविषयक व धर्मवादविषयक ग्रंथ फ्रेंच भाषेंत लिहिले आहेत. सॅव्हॉयच्या डयूकच्या हातून जिनेव्हाची मुक्तता केली त्याचें गद्यमय वर्णन पिगेटनें व पद्यमय वर्णन चपझूनें केलें आहे. तथापि १८ व्या शतकांतील स्विस रोमान्डेच्या वाङ्मयवृद्धांपुढें १७ व्या शतकांतील वाढ म्हणजे अगदींच फिकी पडते. १८ वें शतक हें त्या वाङ्मयाचें सुवर्णयुगच होय; आणि हें सुवर्णयुग प्राप्त होण्याचें कारण म्हटलें म्हणजे १६८५ मध्यें एडिक्ट ऑफ नान्टीज रद्द झाल्यापासून फ्रान्स सोडून स्वित्झर्लंडमध्यें आपल्या कुटुंबासह कायम येऊन राहिलेल्या अनेक विद्वान आश्रितांची (रॅफॅजीग) मदत हें होय. या फ्रेंच विद्वानांनी स्विस प्रेंच्च संप्रदायी वाङ्मयांत अमूल्य ग्रंथांची भर घातली व आपल्या प्रत्यक्ष वास्तव्यानें स्वित्झर्लंडला अपूर्व महत्त्व आणून दिले. स्वित्झर्लंड देशाच्या इतिहासांतहि ही गोष्ट अनेक दृष्टींनीं महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या विद्वान फ्रेंच अश्रितांपैकीं पहिला बर्गेड यानें भूस्तरशास्त्रविषयक ग्रंथ लिहिले व दोन मासिकें चालवून अनेक विद्वानांचें शास्त्रीय लेख प्रसिद्ध केलें, दुसरा रुचॅट यानें स्वित्झर्लंडचे उत्तम गाईड-बुक प्रसिद्ध केले, त्याच्या आजपर्यंत अनेक आवृत्या निघाल्या आहेत. क्रोसेझनें डेकार्टच्या तत्त्वज्ञानाचा तेथें प्रसार केला. याशिवाय बाबेंरॅक बुलॅमॅक, हेटेल वगैरे लेखकांनीं चांगलें ग्रंथ लिहिले. १७५४ हें साल स्विसे रोमान्डेच्या वाङ्मयेतिहासांत फार महत्त्वाचें आहे. कारण या सालांत रूसो जिनेव्हा येथें परत येऊन कायम राहिला. व्होल्टेअरनें फर्नेला मुक्काम ठेवला  आणि गिबन लौसेनमध्यें १७५३ मध्येंच येऊन राहिला होता. या व इतर मोठमोठ्या विद्वानांनी मागील विद्वानांच्या मृत्यूमुळे रिकाम्या झालेल्या जागा भरून काढल्या, तथापि जिनेव्हाला राहणाऱ्या रुसो व नेकर व त्याची मुलगी स्टील तसेंच बेंजामिन, सिस्मांडी या व इतर कित्येकांची स्विस वाङ्मयलेखकांत गणना करतां येत नाहीं; तर ते अखिल यूरोपियन वाङ्मयांतीलच बडे लेखक आहेत. मॅडम चेरअरच्या कांहीं कादंब-या व पत्रें प्रसिद्ध आहेत. याशिवाय दुसऱ्या कांहीं लेखकांनी आल्प्स पर्वताच्या उच्च उच्च भागावर प्रवास करून सृष्टिशास्त्राचें संशोधन करण्याकडे इतरांचे लक्ष ओढलें यापैकीं सौसर या भूस्तरशास्त्र व हवामानशास्त्र (मेटिऑरॉलॉजी) यांच्या संस्थापकानें आपल्या आल्प्सपर्वताच्या उच्च उच्च प्रवासांच्या वर्णनांनीं सामान्य लोकांनां एक नवीन जगच जणूंकाय दाखवून दिलें. डी ल्यूक या बंधूंनी आल्प्सपर्वतांतील पदार्थविज्ञानाकडे (फिजिक्स ) लक्ष दिलें. ब्रिडेल (१७४५-१८४५) यानें आल्प्सपर्वताच्या अनेक भागांत प्रवास करून तेथील देखावे, मूळ रहिवाशांच्या चालीरीती व स्थानिक इतिहास वगैरे माहिती राष्ट्रीय दृष्टीनें लिहून मासिकांमध्यें प्रसिद्ध केली, व याच त्याच्या लेखामुळें टॉफर, रंबर्ट, जॅव्हेल वगैरे प्रवाशांनां उंच उंच शिखरांपर्यंत प्रवास करण्याची स्फूर्ति झाली. ऑलिव्हर हा चांगला कवि होऊन गेला. मुल्लरच्या इतिहासाचें भाषांतर करून त्याच्या पुढें १८१५ पर्यंतचा इतिहास लिहिण्याचें काम मोनार्ड व त्याचा मित्र या दोघांनीं मिळून पार पाडलें. याशिवाय डेंगेट, हिसेली, वगैरे अनेक लेखकांनीं इतिहासलेखनाचें काम केलें. पेटिटसेन हा मोठा मर्मभेदक उपरोधिक लेख व गूढार्थी कविता लिहिणारा होता. व्हिक्टर चेर्बुलीझ हा फारच ओजस्वी कादंबरीकार होऊन गेला. याशिवाय चेंब्रिअर, गॅस्पेरिन या लेखिका व अनेक लेखक होऊन गेले. अलीकडील वाङ्मयांत रॉड हा कादंबरीकार व मोनिअर हा टीकाकार कवी, कादंबरीकार व नाटककार हे उच्च दर्जाचे आहेत. त्याशिवाय वाईसरेली, टी रीगल, कार्नट, फावरे, गॉडेट मोनिअर, सेंजर, रॉसेल, व्हलेट, वगैरे अनेक आहेत. मुख्य वाङ्मय-मासिक बिब्लिओथिक युनिव्हर्सल हें आहे. स्वित्झर्लंडांत जन्मलेला अत्यंत प्रसिद्ध इतिहासकार ग्रीमॉड हा होय. चालू काळातील इतिहासकार म्हणजे बर्चेड, क्रू, फेझी, माँड्रॅट, रॉट वगैरे आहेत.  (इ) इ टा लि य न सं प्र दा य.- या शाखेची प्रसिद्धि झाली आहे ती त्या शाखेतील चित्रकारामुळे (आर्टिस्ट्स) होय; व या शाखेच्या वाङ्मयाला साहजिक इटालियन वळणच फार मोठें आहे. फ्रॅस्किनी यानें आपल्या जन्मभूमीकरतां शिक्षण विषयक बाबतींत फारच मेहनत घेतली, व त्यानें स्वत:च्या रहात्या कँटनची माहिती लिहून प्रसिद्ध केली. तथापि त्यानंतर लॅविझेसिनें लिहिलेलें पुस्तकच फार उत्तम झालें आहे. टिसिरोमध्यें कादंबरी लेखनकलेला ऊर्जितावस्था आली नाहीं, तथापि पेरी, बूझी, ऐसेल्डी, सिओकेरी हे कवी व नाटककार होऊन गेले. (ई) रो मा न्स व ले डि न सं प्र दा य.-फक्त ग्रिसोन्समध्यें फ्रेंच व इटालियन यांनां बहिणींप्रमाणें असलेली एक चमत्कारिक भाषा आहे. वास्तविक पाहतां ती याच्यापूर्वी केव्हांच नाहीशी व्हावयाची, पण तेथेील कांहीं लेखकांच्या व सोसायट्यांच्या चिकाटीमुळें तिची ऊर्जितावस्था आली आहे. त्यांत पुन्हां दोन प्रकार आहेत; ऱ्हाईन नदीच्या दरीतील म्हणजे ऑबरलँडमधील रोमान्सभाषा व दुसरी एंगॅडाईन व शेजारच्या दऱ्यांतून असलेली लेडिन भाषा. रोमान्य भाषेंतला अगदीं आद्य लेख म्हणजे सेंट ऑगस्टाईनच्या सर्मनच्या कांहीं मूळ लॅटिन भाषेंतील ओळी त्यांचें भाषांतर हा होय. हा लेख १२ व्या शतकांतला असावा. लेडिन भाषेंतील पहिली कविता १५२७ मध्यें व्हॉन ट्रॅव्हर्सनें लिहिलेली म्यूसो युद्धासंबंधाची आहे. १५६० मध्यें न्यू टेस्टामेंटचें भाषांतर झालेलें आहे. त्यानंतरची या दोन्हीं भाषेंतील मुख्य पुस्तकें म्हणजे भाषांतरें होत. त्यांत धार्मिक व शिक्षणाविषयक ग्रंथांचीच भाषांतरे मु्ख्यत: आहेत. रोमान्स भाषेंतील मुख्य लेखक म्हणजे केस्टलबर्ग हा कवि व भाषांतरकार लेटूर हा कवि, होंडर हा रसात्मक काव्यकार, बॅलेट्टा हा अद्भुत गद्यलेखक वगैर आहेत. लेडिन भाषेत प्लुजी हा कवि; कडेरस हा कवि, कादंबरीकार व भाषांतरकार व व्हलेंटिन, जुव्हेल्टा लंसेल वगैरे कवि इत्यादि होऊन गेले आहेत. अ र्वा ची न स्वि स वा ङ् म य (१९१० ते २०) इ ति हा स.-१९१० ते २१ या काळांत नामांकित इतिहासकारांचा मृत्यूनें बळी घेतला. १९१२ सालीं प्राक्कलीन स्वित्सर्लंडचा इतिहास  लिहिणारा मुइडेन हा वारला. भाबेर हा प्रवासवर्णनपर ग्रंथ लिहिण्याच्या कामांत वाकबगार असलेला लेख १९१३ सालीं वारला. डेकुर्टिन्स हा 'रोमान्स भाषा' या विषयावरील तज्ज्ञ होतो तो १९१६ सालीं दिवंगत झाला. याशिवाय स्विस शिलेदारीवरचा प्रसिद्ध लेखक ग्रेलेट 'बुलेटिनो डेला स्विझेरा इटालियाना' या पत्राचा जनक व संपादक प्रमुख होत. ल लि त क ला.-इतिहासाचीच पुनरावृत्ति ललितकलेच्या बाबतींत दिसून येतें. होडलर हा प्रसिद्ध चित्रकार १९१८ साली वारला. बूरी हा स्विस कृषिजीवित रंगविण्यांत नांवाजलेला होता. तो १९१५ त वारला. शिवाय स्विस ललिलकलांचा इतिहासकार हा सन १९१२ सालीं मरण पावला. वाङ्मय.--१९१०-२१ सालांतील शास्त्रज्ञांत प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे कोचर (१८४१-१९१७). सुप्रसिद्ध सर्जन ब्लूद हा नाणकशास्त्रज्ञ, ग्राफ हा गणितज्ञ, हे प्रमुख होत. बॅलेटे, मोनियर, व रॉड हे प्रसिद्ध लेखक होते. फर्डिनंड हा भाष कोविद म्हणून प्रख्यात होता. हार्किनचें बॉनस्टेटेनचें चरित्र फार मनोरम आहे. त्याचप्रमाणें विनिगरनें लिहिलेलें 'झेंप' चें चरित्र, वीसचें 'स्टाफ्ली' चें चरित्र हें प्रसिद्ध चरित्रविषयक ग्रंथ या काळांत निर्माण झाले. धर्मविषयक ग्रंथांत, मेनरचा 'अँग्लेमोंटाना' व डोमेर्गचे 'गे शीस्टेडेस विस्थूम्स चर (१९१४) हे ग्रंथ विशेष नांवाजलेले आहेत. भूस्तरशास्त्रावर, हाईमचा 'जीॲलाजी डर इबीझ, हा ग्रंथ सर्वश्रुत आहे. वर्णनात्मक लिहिणाऱ्यामध्यें गॅलेट डान्स लाल्पे इग्नेरि हार्पे, 'लेस आल्पेस बनॉइसेस' इत्यादि ग्रंथकार प्रसिद्ध आहेत. शूबर व स्टकेलबर्ग हे ललितकलाशास्त्रावर नांवाजलेले लेखक आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .