प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
               
स्वार्थवाद (इगोइझम)-- स्वार्थवादाचे किंवा अहंभावाचे तात्त्विक व व्यावहारिक असे दोन प्रकार आहेत. तात्विक अहंभाव ऊर्फ सब्जेक्टिव्ह आयडियॅलिझम तत्त्वज्ञानांतील मताचा अर्थ असा कीं, स्वत:च अहं (मी) आहे एवढेंच कायतें मनुष्याला वास्तविकपणें सांगतां येणें शक्य आहे. कारण स्वत:च्या मनांत काय आहे, तेवढेंच कायतें मनुष्याला निश्र्चितपणें कळतें. स्वत:च्या अस्तित्वाच्या ज्ञानाखेरीज इतर दुसरें काहीं कळत नाही. त्यामुळें इतरांच्या अस्तित्वाबद्दल बोलण्यास त्याला कांही आधार नाहीं. तथापि जगांत स्वत:शिवाय दुसरें कोणीहि नाहीं, हें म्हणणेंहि मूर्खपणाचें असल्यामुळें हा दोष टाळण्याकरितां मूळापासूनच ज्ञाता आणि ज्ञात अशी जोडी असल्याचें गृहीत धरण्यांत येतें. व्यावहारिक अहंभावाचे तीन प्रकार : एक तर्कशास्त्रीय, दुसरा सौंदर्यशास्त्रीय व तिसरा नीतिशास्त्रीय. तर्कशास्त्रीय अहंभाव हा स्वत:च्या न्यायबुद्धीला दुस-याच्या बुद्धीची कसोटी जरुर नाही असे म्हणतो. सौदर्यशास्त्रीय अहंभाव हा स्वत:ची रतिकता हीच सौदर्याची आत्यंतिक कसोटी मानतो.  नैतिक अहंभाव स्वत:चें हि हेंच सर्व व्यवसायाचें ध्येय मानतो. ज्यांत स्वत:चें हित नाहीं तें सर्व तो निरुपयोगी समजतो. नीतिशास्त्रांतील अहंभाववाद असें प्रतिपादितो कीं, व्यक्तीच्या वागणुकीची कसोटी स्वत:चें एकंदरीनें होणारे कल्याण ही असतें. ही कसोटी आणि निव्वळ अप्पलपोटेपा यांत मात्र फरक आहे. मनुष्याचा कल व हेतू स्वत:चा फायदा-तोटा पाहण्याकडे असतो, एवढाच अहंवादी (इगोइस्टिक) या शब्दाचा सामान्य अर्थ आहे. असला अहंभाव योग्य किंवा न्याय्य तत्वावर उभारलेला असतो असें नाहीं. कारण तो साधारण लहान मुलांत व अविचारी माणसांतहि दृष्टीस पडतो. आणि आयुष्याचा दूरवर विचार न करतां जी तावत्कालापुरतीच अत्यंत सुखकारक किंवा कमीतकमी दु:खदायक असेल ती गोष्ट करण्यास तो प्रवृत्त होत असतो. दुसऱ्या पक्षीं, असला अहंवाद शांतपणें व दूरवर केलेल्या विचारांचाहि परिणाम असूं शकतो. असल्या अहंभावांतून अप्पलपोटेपणा न्यायत:च उत्पन्न होतो असें म्हणतां येत नाहीं. अहंभाव असलेल्या मनुष्याला नि:स्वार्थीपणानें इतरांच्या कल्याणाकरितां झटणें ही गोष्ट अशक्य नाहीं. ज्याला आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा असें वाटतें, त्याला ती गोष्ट दुस-यांचा उद्धार करण्यास झटण्यानें साध्य होण्यासारखी असते. स्वत:चा देह खर्ची घालून तो कीर्तिरूपानें जिवंत राहूं शकतो. म्हणून नीतिशास्त्रांतील अहंभाववाद म्हणजे निव्वळ अप्पलपोटेपणा असें म्हणतां येणार नाहीं. समाजाचे अवयव या नात्यानेंहि व्यक्तीचा अहंभाववाद साधार ठरतो. कारण समजा व्यक्तींचा बनलेला असतो, व प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या जीवाचें रक्षण करणें, स्वत:चें हित साधणें व स्वत:च्या इच्छा तृप्त करणें, स्वत:चें हित साधणें व स्वत:च्या इच्छा तृत्प करणें याच भावनांनीं प्रेरित झालेला असतो. व्यक्तीव्यक्तींच्या हितसाधनांचा परस्पर विरोध ध्येयरूप म्हणून जी समाजव्यवस्था सुचविण्यांत  आली आहे, त्यांत येणारे नाहीं, असें हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो (डाटा ऑफ एथिक्स, प्र. ११). पण हल्लीच्या समाजांतहि स्वार्थावर पाणी सोडून दुसऱ्याच्या हितकरिता झटण्यानें खरें आत्महित साधतें असें मानून कार्य करीत राहणारे इसम आढळतात. ते स्वत:ची आपला देश किंवा धर्म यांशी इतकी एकवाक्यता करून येतात कीं, देशाच्या किंवा धर्माच्या रक्षणाकरितां व उन्नतीकरितां मरण्यांतहि ते समाधान मानतात. आत्मयज्ञ करणें म्हणजेच आत्मोद्धर करणें अशीं त्यांची समजूत असते.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .