प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
             
स्वामीनारायणपंथ- गुजराथ प्रांतांत स्वामी नारायणपंथाचा पुष्कळ लोकांत प्रसार आहे. या पंथाचा संस्थापक स्वामी सहजानंद सरपुजारी हा जातीचा ब्राह्मण होता. यासच स्वामीनारायण असें म्हणतात. याचा जन्म अयोध्येनजीक छपया गांवीं झाला. हा लग्न झाल्यावांचून अल्प वयांत घर सोडून निघाला; व अहमदाबादेस रामानंद (साधु) स्वामी रहात असत त्यांच्या जवळ शिष्यत्वानें राहिला. स्वामी रामानंद अद्वैतवेदांत मताचे होते. याचें दुसरे अनेक शिष्य होते. रामानंद स्वामीच्या मरणोत्तर सहजानंद स्वामींनीं आपला निराळाच पंथ चालविण्याचें योजिलें. आपल्या शिष्यसमुदायाच्या उपदेशाकरितां शिक्षापत्री नांवाचा दोनशेंबारा श्र्लोकांचा एक ग्रंथ त्यांनीं लिहिला. ज्यास वाचतां येतें  अशा प्रत्येक शिष्यास सदरहू श्र्लोकांचा पाठ प्रतिदिवशीं करावा लागतो. मूळग्रंथ संस्कृत भाषेंत तयार केला. त्याचें भाषांतर गुजराथी भाषेंत संवत् १८८२ चैत्रशुद्ध प्रतिपदा (शके १७४७) रोजीं लिहून प्रसिद्ध झालें. कित्येक माहितगार लोकांचें असें म्हणणें कीं, मूळ शिक्षापत्री हा गद्यग्रंथ होता. त्यास पद्य स्वरूप मुक्काम आमोद, जिल्हा भडोच येथील दिनानाथ शास्त्री नांवाच्या गृहस्थांनीं दिलें असावें. ग्रंथाचे श्र्लोक बहुतेक अनुष्टुप छंदात आहे. स्वामीनारायण पंथाचें मुख्य दैवत श्रीकृष्ण आहे. सबब तत्पंथीय प्रत्येक भक्ताजवळ श्रीकृष्णाची मूर्ति पूजेसाठीं असते. याशिवाय ज्यांच्या घरी दुसऱ्या दैवतांची पूजा-अर्चा करण्याची चाल असेल त्यांस ती करण्यास पंथनियमांप्रमाणें हरकत नाहीं. स्वामी सहजानंद यांचे मत विशिष्टाद्वैत आहे.  यांनी शंकराचार्य, रामानुज, मण्व व वल्लभाचार्य यांसारखे मुख्य सूत्रावर भाष्य केलें नाहीं. गुजराथेंत पुष्कळ भागांत वल्लभाचार्याचें मत प्रसिद्ध आहे. त्या लोकांतील पूजनादिकांची मोहक पद्धतीच स्वामीनारायण यांनी कायम ठेविली. सहजानंद स्वामी यांनी आपल्या दोन बंधूंचे चिरंजीव अयोध्याप्रसाद व रघुवीरप्रसाद यांस आपल्या मागें आचार्य पदवी चालविण्यासाठीं मुक्रर करून त्या उभयातांमध्यें तक्रार पडूं नये असा बंदोबस्त केला होता; त्याप्रमाणेंच हल्लीं व्यवस्था चालू आहे. साबरमतीच्या उत्तर बाजूचा मुलुख व काठेवाडांतील कित्येक भाग अयोध्याप्रसाद व त्याची शिष्यशाखा यांजकडे दिला, व बाकीचा दुसऱ्या शिष्याकडे चालू ठेविला. पहिल्या आचार्यांचें मुख्य मंदिर खेडा जिल्ह्यांत वर्ताळ गांवी आहे, व दुसऱ्यांचें अमदाबाद येथें आहे. वर्ताळच्या मंदिरांत मुख्य दैवत लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती आहेत. अमदाबादच्या मंदिरांत नरनारायण (अर्जुन व कृष्ण) यांच्या मूर्ती आहेत. या पंथांतील प्रत्येक मनुष्यानें स्वामी नारायणाच्या उपदिष्ट मंत्राचा जप व वाचतां येत असल्यास शिक्षापत्रीचा पाठ नित्यनियमानें केला पाहिजे. फावल्या वेळीं दुसरेहि ग्रंथ वाचावे, असें शिक्षापत्रींत सांगितलें आहे. सहजानंद व त्यांच्या बरोबरचे साधु समाधियोगांत चांगले निष्णात होते व ते आपल्या भक्तांस विष्णुचें दर्शन स्वप्नांत करबीत अशी तत्पंथीयांची समजूत आहे.  वल्लभाचार्याची पूजापद्धति जरी स्वामीनारायणांनी सुरू ठेविली तरी तींत त्यांस बराच फेरफार करावा लागला. (केसरी ता. २७ ऑक्टोबर १८९६). वल्लभ पंथात शिरलेल्या बऱ्याचशा अनिष्ट गोष्टी नाहींशा करण्याकरितां स्वामीनारायण पंथांत कडक नियम करण्यांत आले आहेत.  उदाहरणार्थ, स्त्री-पुरुषांच्या दर्शनाच्या वेळा अगदीं निरनिराळ्या ठेवल्या आहेत. खुद्द आचार्यासहि परकी स्त्रियांशीं भाषण करण्याची सक्त मनाई आहे. स्त्रियांस उपदेश करणें तो आचार्यपत्नी करते. स्त्रियांनां आचार्याचा पादस्पर्श करण्याची सुद्धां जरूर नाहीं. कित्येक ठिकाणी स्त्रिया व पुरुष यांकरितां निरनिराळी मंदिरें बांधलीं आहेत. या पंथांत असलेल्या लोकांत संसारांत राहून परोपकार करावा, हें मोक्षप्राप्तचें सर्वसाधान तर आहेत; परंतु ज्याच्या अंगी वैराग्य बाणलें आहे. अशा संसारात तुच्छ मानणाऱ्या विरक्त पुरुषासाठीं पुढील व्यवस्था केली आहे. विरक्त मनुष्याचें मुख्य व्रत ब्रह्मचर्य. अशा विरक्तांचे तीन वर्ग केले आहेत. ब्रह्मचारी, साधु व पाळे. ब्रह्मचारी फक्त ब्राह्मण जातीचे असतात. यांत मुळीच लग्न केलेलें व संसार करून नंतर त्यापासून विरक्त झालेले असे दोन प्रकारचे लोक येतात. कुणबी लोकांस साधु करतात. गुजराथेंतील लेवे व कडवे कुणबी मद्यमांसादिकांस स्पर्श करीत नाहींत. रजपूत, कोळी वगैरे लोक पाळे होतात. ब्रह्मचारी व साधू लोकांचे कपडे भगवे असतात. पाळयांचें पांढरे असतात. सर्व वर्गास ब्रह्मचर्य कडकडीत पाळावें लागतें. स्त्रियांचा स्पर्श झाल्यात उपवास करावा लागतो. गृहस्थाच्या घरात त्यास राहतां येत नाहीं. साधु व ब्रह्मचारी होण्यापूर्वी कोणी पाळयांत राहून अनुभव पाहतात. तिन्ही वर्गांतील लोकांस ब्रह्मचर्यहानीच्या भीतीमुळें एकटें फिरण्याची मनाई आहे. जेव्हां खासगी काम करावयाचें नसतें तेव्हा मंदिरासाठीं काम करावें लागतें. उपदेश करणें, भिक्षा मागणें, मंदिराची मिळकत संभाळणें, मंदिराच्या इमारती होत असतील त्यांत काम करणें, मंदिराची शेतीं सांभाळणें वगैरें  सर्व कामें या विरक्त मंडळींस करावी लागतात. संसारी मंडळी केवळ पोटावारी मंदिरासाठीं कामें करतात. याप्रमाणें ब्राह्मण, वैश्य (कुणबी) व शूद्र या सर्व वर्गांतील परमेश्वरप्राप्तीचें एकच साधन या पंथांत आहे. या तिन्ही वर्गांतील लोकांचा समाज दर एक मंदिरांत बराच असतो. वर्ताळच्या मंदिरात ब्रह्मचारी व साधु मिळून सुमारें ८०० आहेत. जर कोणी आचार्य नीट वागला नाहीं तर त्याला काढून टाकितात. वर्ताळच्या आचार्याला वीस वर्षांपूर्वी असेंच काढण्यात आलें होतें. या पंथांतील लोकांस सामान्यत: नीतीच्या आज्ञा शिक्षापत्रीत सांगितल्या आहेत. अगदीं बारीक वस्त्र वापरण्याची मनाई केली आहे. खोटें बोलूं नये; परंतु जें खरें बोलल्यानें विरोध वाढेल असें खरेहीं बोलूं नये, अशी सूचना आहे. 'वचनामृत' या पोथींत या पंथांतील सर्व आचार व विधी दिले आहेत. स्वामीनारायणाच्या पंथांत गुजराथ व काठेवाडांतील कोळी वगैरे कांहीं जातीचे लोक शिरल्यामुळें ते पूर्वीपेक्षां सुधारले आहेत. आतां धर्मांत शिरलेले पूर्वीप्रमाणें चोरी करीत नाहींत. यामुळें लोकांत वरील प्रमाणें सुधारणा झाली आहे. दोन्ही आचार्यांच्या ताब्यांतील प्रदेश मिळून एकंदरीत सुमारें आठ पासून दहा लक्षावर या पंथांत लोक असावेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .