प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
              
स्वात संस्थान- वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतील दीर, स्वात व चित्रळ एजन्सीपैकीं एक भाग. हा भाग म्हणजे स्वात नदीचें खोरें होय. या संस्थानचें स्वात कोहिस्तान (डोंगराळ प्रदेश) व स्वात खुद्द असे दोन भाग आहेत. स्वात खुद्द मध्ये वर (वरचें) व कुझ (खालचें) स्वात असे पोटभाग आहेत. स्वातचें क्षेत्रफळ दीर एवढेंच आहे; परंतु खोऱ्याची लांबी १३० मैलांपेक्षां जास्त नसून रुंदी सरासरी १२० मैल आहे. स्वात व पंजकोर नद्यांच्या संगमाजवळ खोऱ्याची उंची समुद्रसपाटीच्या वर दोन हजार फूट आहे. ही उंची झपाट्यानें पुढें वाढत जान उत्तरेकडील डोंगरांच्या शिखरांची उंची समुद्रसपाटीपासून १५ ते २२ हजार फूट आहे. खालच्या खोऱ्यांतील हवा मलेरियस व रोगट आहे. दीर, स्वात, बाजौर व उतमनखेल यांचा इतिहास एकमेकांशीं इतका निगडित झालेला आहे कीं, तो निरनिराळा लिहिणें अशक्य होय. या देशासंबंधीचा पहिला उल्लेख अरियन यानें केला असून, कुनर, बाजौर, स्वात आणि बुनेर यांमधून ख्रिस्तपूर्व ३२६ या वर्षी अलेक्झांडर यानें आपलें सैन्य नेलें  होतें असें ती म्हणतो. पुढें २० वर्षांनंतर हा सर्व मुलूख सेल्युकस यानें चंद्रगुप्ताला परत दिला. बष्कर व स्वात कोहिस्तानमध्यें हल्लीं रहाणाऱ्या गुजर, तोरवाल, गढवाल वगैरे लोकांचे बौद्धधर्मी पूर्वज १५ व्या शतकापर्यंत तेथेंच रहात होते. नंतर उतमनखेलच्या मदतीनें युसुफझै व खखै वंशांच्या दुसऱ्या पठाण टोळ्यांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या; व सोळाव्या शतकाच्या सुमारास बुनेर, खालचें स्वात व पंजखोर खोरें युसूफझै लोकांच्या ताब्यांत गेलें. पठाण टोळ्यांच्या आगमनानंतर सर्व भागांत मुसुलमानी धर्म सुरू झाला. या सुमारास, बाबरानें मोठ्या चातुर्यानें युसुफझै टोळीचा मुख्य मलिकशह मनसूर याच्या मुलीशीं विवाह करून त्यांच्या मुलुखांत आपली सत्ता प्रस्थापिक केली. वरच्या स्वातमध्यें राहणाऱ्या मूलच्या स्वाती लोकांनींहि बाबरात शरण जाऊन आपलें संरक्षण करण्याविषयीं बाबरास विनंति केली. व ती त्यानें मान्य केली. परंतु हुमायूनच्या  कारकीर्दीत युसूफझै लोकांनीं आपली प्रगति चालू ठेवून शेरिंगळ, दीचा लांहीं भाग व एैनपर्यंत वचें स्वात एवढा मुलुक काबीज केला. त्यांनीं हुमायूनची सत्ता झुगारून दिली व १५८४ त अकरहि त्यांनां पूर्णपणें आपल्या ताब्यांत आणूं शकला नाहीं. पुढें त्यांच्यामध्यें धार्मिक बाबीसंबंधानें भांडणें सुरू झाल्यामुळें, त्यांनां ताब्यांत आणण्याकरितां काबूलच्या सुभेदारानें, झैनखान कोकल्ताश याला पाठवून सर्व प्रदेश जिंकून घेतला. तथापि, १६५८ त, औरंगझेब गादीवर आला त्यावेळी येथील टोळीनें कर देण्याचें नाकारून आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. नादीरशहाच्या वेळेपर्यंत त्यांचें स्वातंत्र्य कायम होतें; परंतु नादिरशहाच्या मागून अहमदशहा दुराणी व तिमूरशहा (तैमूर?) यांनीं हा प्रदेश आपल्या ताब्यांत ठेविला होता. त्यानंतर आलेल्या राजांनीहि आपला अंमल अजीबात सोडला होता असें नाहीं.  १८२३ सालीं अझीमखानानें शीख लोकांवर हल्ला केला त्यावेळीं युसूफझ टोळीनें त्याला पुष्कळ मदत केली; परंतु त्यांचा पराभव होऊन रणजितसिंग पेशावरमध्यें शिरला; परंतु त्यानें उत्तरेकडील डोंगराळ मुलुखांत जाण्याचा प्रयत्न केला नाहीं. १८४९ त पेशावरचें खोरें ब्रिटिशांच्या ताब्यांत आलें. अखुंद हा १८७७ त मरण पावल्यावर त्याच्या गादीसंबंधीं त्याचा मुलगा व दीरचा खान यांच्यामध्यें तंटा उत्पन्न होऊन बाजौरमध्यें नवगैपर्यंत सर्व प्रदेशांत अस्वस्थता माजली. त्यावेळच्या भांडणांत बाजौरच्या घराण्यांतील उमराखान नांवाचा पुरुष प्रामुख्यानें पुढें आला. त्यानें अखुंदचा मुलगा मियानगुल याशीं दोस्ती करून दीरच्या खानाचा अर्धा मुलुख काबीज गेला. परंतु पुढें त्याचें व मियानगुलचें न पटून दीर, नवगै, स्वात, उतमनखेल, सलरझै व मामूद येथील लोक उम्राखानाच्या विरुद्ध जमा झाले; परंतु उम्राखानानें त्यांचा पराभव करून (१८९०) दीरचा सर्व मुलुख आपल्या ताब्यांत घेतला. १८९४त उम्राखान व ब्रिटिश यांच्यामध्यें वितुष्ट आलें; व ब्रिटिशांकडून पराभव पावल्यामुळें त्याला १८९६ त काबुलास पळून जाणें भाग पडलें. दीरच्या खानानें लगेच आपली सत्ता परत मिळवून इंग्रजांशीं तह केला; चित्रळहि थोड्याच दिवसांत इंग्रजांच्या हातीं गेलें. १८९७ त स्वातचा मुल्ला मस्तान यानें कांहीं लोक जमवून चकदरा व मलकंद या ब्रिटिश ठाण्यांवर हल्ले केले; परंतु पुष्कळ प्रयासानंतर ते परतविण्यांत आले. नौशहर पासून मलकंद घाटाच्या पायथ्याशीं दरगैपर्यंत रेल्वे रस्ता झालेला आहे. मधून मधून टोळ्यांशीं चकमकी होतात; मागल पावशतकांत कांहीं एक महत्त्वाची गोष्ट घडलेली नाहीं. हल्लीं, खुद्द स्वात मध्यें, युसुफझै पठाणांच्या जातींपैकी अकझै नांवाच्या शाखेचे लोक राहतात (सुमारें १५००००) व कोहिस्तानमध्ये तोरवाल व गढवाल लोकांची वस्ती (२००००) आहे. कोहिस्तान खेरीज इतर ठिकाणीं शुद्ध युसूफझै पुश्तु भाषा बोलतात. येथील लोक सुनी पंथाचे मुसुलमान आहेत. सैदू येथें असलेलें अखदाचें थडगें, उत्तर हिंदुस्थानांतील स्थळांपैकीं एक महत्त्वाचें आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .