प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद     
         
स्पेन- स्पेनचें राज्य यूरोपच्या नैर्ॠत्येस आहे. आयबेरीयन द्विपकल्पाचा स्पेन हा ११/३३  वा हिस्सा आहे. या राज्यांत बालिआरीक बेटें, क्यानडी बेटें व स्युटा हें तटबंदी ठिकाणी हींहि अंतर्भूत होतात. सन १९२० मध्यें येथील लोकसंख्या २१३४७३३५ होती. याचें एकंदर क्षेत्रफळ १९४८०० चौरस मैल आहे. हें ग्रेटब्रिटनच्या दुप्पटीपेक्षां थोडें मोठें आहे. फ्रान्सच्या बाजूला पिरिनीज पर्वत असून इतर सर्व बाजूंला समुद्र आहे. या द्वीपकल्पाच्या दक्षिण भागांत ब्रिटिशांच्या ताब्यांत असलेला जिब्राल्टरचा किल्ला आहे. स्पेनची वसाहतीचीं ठाणीं. ल्युटाशिवाय मोरोक्कोजवळ स्पेनच्या ताब्यांत मेलिला, अल्हुसिमास, पेनान ही डी ला गोमेरा इफनी, आणि चाफारीनास हीं लहान लहान बेटें आहेत. याशिवाय सहाराच्या सीमेवर रीओ डी ओरो व स्पॅनिश ग्वायना, फरनॉन डे पो, अन्नोबोन, कोरीस्को ही स्पेनच्या ताब्यांत आहेत. क्यानटाब्रियन पर्वताची ओळ पूर्व-पश्र्चिम असून बिसकेच्या उपसागराला समांतर आहे. मध्यभागांत ज्या पर्वताच्या ओळी आहेत त्यांनां स्पॅनिश लोक कार्पेटानो व्हेटोनिका म्हणतात. याच्या पूर्व भागाला सेरा डी ग्वाहारामा असें म्हणतात. याची सर्वसाधारण उंची ५२५० फूट आहे. यांच्या पश्र्चिम भागाला सेरा डी ग्रेडास म्हणतात. याचें अत्युच्च शिखर फ्लाझा ही अलमान्झार हें ८७३० फूट उंच आहे. याहिपेक्षां महत्त्वाचें पर्वत म्हणजे ईशान्यभागातं पिरिनीज, त्याचप्रमाणें सेरा नेव्हाडा, आणि दक्षिण भागांत किनाऱ्याजवळ असलेल्या पर्वताच्या ओळी ह्या होत. पिरिनीज पर्वताचें अत्युच्च शिखर ॲनेडो हे १११६८ फूट उंच आहे. सेरा नेव्हाडाचें अत्युच्च शिखर मुल्हासेन हें ११४२१ फूट  उंच आहे. नद्या स्पेनमध्यें तेगस, डौरो, एब्रो, ग्वाडलक्लिव्हर आणि ग्वाडियाना या पाच मुख्य नद्या आहेत. या सर्व स्पेनमध्यें उगम पावतात. यापैकीं एब्रो व ग्वाडलक्लिव्हर याच फक्त पूर्णपणे स्पेनमध्यें आहे. एब्रो (४६६ मैल लांबी) भूमध्यसमुद्राला, तेगस (५६५ मैल) अटलांतिक महासागराला, डौसो (४८५ मैल) अटलांतिक महासागराला, ग्वाडीयाना (५१० मैल) केडीझच्या उपसाराला व ग्वाडलक्लिव्हर (३६० मैल) ही केडीझच्या उपसागराला मिळते.हवामान- उष्णकटिबंधातील हवेशिवाय इतर सर्व कटिबंधांतील हवा स्पेनमध्यें आहे. उंचवट्याच्या प्रदेशाच्या मध्यभागांत उष्णतामान मध्ययूरोपच्या बहुतेक कोणत्याहि भागाइतकें वाढूं शकतें. उत्तरेकडील आणि वायव्येकडील प्रांतांत इंग्लंडच्या पश्र्चिम भागाइतकी हवा समशीतोष्ण व कुंद असते. स्पे न चे भा ग व लो क सं ख्या.-राज्यव्यवस्थेकरतां स्पेनचे १८३३ सालापासून ४९ प्रांत केले आहेत. स्पेनची पहिली खानेसुमारी १५९४ साली झाली. द ळ ण व ळ ण.-स्पेनमधील दळणवळण १९ व्या शतकांत फार वाढलें. १८०८ सालीं गाडीरस्ता ५०० मैल होता. तो १९१९ सालीं ४६६४७ मैल झाला. डोंगराळ प्रदेशांत मालाची नेआण करण्यास खेचरांचा व बैलगाडयांचा उपयोग करतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यांत आगगाडीची बरीच प्रगति झाली. अगदीं पहिला आगगाडीचा रस्त्ता १८४८ सालीं तयार झाला. १९२२ सालीं ९५३४ मैल रस्ता तयार होता. शे ती.-शेती हा स्पेनचा अतिशय महत्त्वाचा धंदा आहे. सर्वसाधारण शेती फार मागासलेली आहे. रोमन व मूर लोकांच्या वेळी तीतं जितकें पीक होई तितकें सुद्धां हल्लीं होत नाहीं. आगगाडी सुरू झाल्यापासून शेतीत बरीच सुधारणा होत आहे. प्रत्येक प्रांतात एक कमिशनर या धंद्यावर देखरेख करण्यास व शेतीस उत्तेजन देण्याकरितां नेमिला आहे. शेतीच्या वाढीकरितां काढलेल्या संस्थांत अरांगझुऐज येथें काढलेली शेतकीची शाळा व तिला जोडलेलें एक नमुनेदार शेतहि आहे. स्पेनच्या जमिनीपैकी शेंकडा ७९.६५ जमीन लागवडीखाली आहे. शेंकडा ३३.८ शेतीच्या व बागांच्या उपयोगांत आहे, शेंकडां २०.८ फळांकरतां, शेंकडा १८.७ चाऱ्याकरितां व शेंकडा ३.७ द्राक्षांच्या मळ्याकरितां उपयोगांत आहे. खाण्याची धान्ये हेंच बहुधा लागवडीचे पीक आहे. त्यात गहूं, जव, ओट, राय, तांदूळ व मका ही धान्यें या देशांत होतात. शेरी नांवाची दारू या देशांत तयार होते. फळांमध्ये ओलीव्ह, नारिंगें, बदाम, संत्री आणि लिंबे हीहि होतात. या देशांत साखर तयार होते, व १९०१ मध्यें उंसापासून साखर तयार करण्याचे २२ कारखाने व बीटपासून साखर तयार करणारें ४७ कारखाने होते. पक्का माल तयार करण्याचे कारखाने बहुतके समुद्रालगतच्या प्रांतांत आहेत, व असला या देशांतला मुख्य कारखाना म्हणजे कापसाचा आहे. १० व्या शतकांत या देशांतून फारच थोडा माल बाहेर जात असे. परंतु सन १८८८-९८ या वर्षांत सरासरी वार्षिक २००००० स्टरलिंगचा माल बाहेर गेला. परंतु क्युबा, पोर्टोंरिको, फिलिपाईन्स ही स्पेनच्या ताब्यांतून गेल्यापासून ही निर्गत बंद झाली आहे. हल्ली स्पेनमध्येंच हा कापसाचा पक्का माल खपतो, व शिवाय स्पेनमध्ये परदेशांतून माल येतो. याशिवाय रेशीम, कातडीं, धातू यांचा पक्का माल बनविणारे कारखानें या देशांत आहेत. सन १८९८ ते १९०८ हीं दहा वर्षे व्यापाराच्या पुनर्रचनेकरितां प्रसिद्ध आहेत. या अवधींत विजेचा उपयोग या देशांत व्हावयास लागला व या वर्षांत दुसरा फरक म्हणजे उत्पादक कंपन्यांची रचना हा होय. धातू आणि दुसरे खनिज पदार्थ, दारू, साखर, फळें ,कापूस व कापसाचा माल, लोंकर व इमारतीचें लांकूड हे निर्गत व्यापाराचे जिन्नस असून धान्य, वाळलेले मासे, यंत्रें कांच, औषधें व जहाजें हे आयात व्यापाराचे जिन्नस आहेत. स्पेनमध्यें व्यापारी आरमारला नवीन उत्तेजन दिलें गेलें असें दिसतें. सन १९०५ मध्यें या देशांतील व्यापारी आगबोटी ४४९ होत्या व जहाजें ५४१ होती. पे ढी प त.-'दि व्यांक ऑफ स्पेन'' या पेढीला नोटा काण्याची सनद आहे व ती वेळोवेळी वाढविली गेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं या सनदेची पुनर्रचना झाली व ती १९२१ पर्यंत अमलांत राहिली. या सनदेप्रमाणें या पेढीला जास्तीतजास्त १० कोटी पौंड किंमतीच्या नोटा काढण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र ६ कोटीपर्यंत नोटा काढण्यास या पेढीला काढलेल्या नोटांचा १/३  हिश्शा इतकी गंगाजळी ठेव ठेवावी लागते. ही ठेव निम्मी चांदीच्या व निम्मी सोन्याच्या रुपानें असली पाहिजे. आणि सहा कोटी पौंडांच्यावर काढलेल्या नोटांबद्दल एकद्वितीयांश हिश्शाइतकी गंगाजळी ठेव ठेवावी लागते. ना णी- या देशांत किमतीचें प्रमाण दोन प्रकारचें आहे. सोनें व चांदी हे ते प्रकार आहेत. यांचे एकमेकांशी प्रमाण या देशांत १:१५ १/३ आहे.  या देशांतील नाण्याला पेसोटा असें म्हणतात. २५.२२५ पेसोटांची किंमती १ पौंड आहे. फक्त ५ पेसोटा किंमतीचे चांदीचे नाणे कोणत्याहि रकमेपर्यंत ''लीगल टेंडर'' समजलं जातें. बाकीची लीगल टेंडरें समजली जाणारी नाणी सोन्याचीं आहेत. रा ज्य र चना व स र कार-स्पेनमध्ये वंशपरंपरागत राजसत्ता आहे. व या राजसत्तेची रचना, कोटेंसच्या मतानें होऊन तोच १८७६ चा मूळ कायदा असें मानतात. या कायद्याने गादीवरील हक्काचा क्रम पुढील प्रमाणे ठरविला :- बाराव्या अलफान्झोचा कायदेशीर वंशज राहिला नाही तर त्याच्या बहिणीकडे गादी जावी; नंतर त्याच्या आतेकडे अथवा तिच्या कायदेशीर वंशजाकडे जाईल; व सरतेशेवटीं सातव्या फर्डीनांडच्या कायदेशीर वंशजाकडे जाईल. व सर्व वंश जर निर्वंश झाले तर राष्ट्रानें आपला राजा निवडावा. राजा अनुल्लंघनीय आहे. परंतु त्याचें मंत्री कोर्टेसला जबाबदार आहेत. मंत्र्यांच्या जोडसहीखेरीज राजाला हुकूम कायदेशीर समजला जात नाही. या राष्ट्राचें निशाण तांबडे व पिंवळे आहे. निशाणाचे तीन भाग असून दोन लालपट्टयांच्यामध्यें पिवळा एक पट्टा असतो. कार्टोसच्या संमतीनें कायदे करण्याचा अधिकार राजाला असतो. कांर्टेसचे दोन भाग आहे. एकाला सीनेट व दुसऱ्याला प्रतिनिधिसभा असें म्हणतात. सीनेटमध्यें तीन प्रकारचे लोक असतात. (१) जन्मामुळें अथवा अधिकारामुळे सभासद असलेले रजवाडे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६०००० पेसोटापेक्षां जास्त आहे असे सरदार, ॲडमिरल्स, धर्माध्यक्ष वगैरे. (२) राजानें नेमिलेले सभासद. (३) प्रत्येक प्रांताने ३ या प्रमाणे ४९ प्रांतांनी निवडलेले सभासद आणि बाकी विश्वविद्यालये, विद्यालयें व सरकारी संस्था यांनी निवडलेले सभासद पहिल्या दोन प्रकारचे लोक १८० पेक्षां जास्त असूं शकत नाहीत.  तिस-या प्रकारचे सभासद तितकेच असूं शकतील प्रतिनिधीसभेंतील सभासद निवडण्याचा अधिकार १८७७-९० पर्यंत फार नियंत्रित होता. १८९० मध्ये सार्वत्रिक मताधिकार देण्यांत आला. याप्रमाणें ज्याचे सामाजिक व नागरिकत्वाचे अधिकार काढून घेण्यांत आले नाहींत, व जो अनुक्रमे २ वर्षे त्यास ''पॅरिश'' मध्ये राहिला त्या स्पॅनिश मनुष्याला त्याच्या वयाची २५ वर्षे पुरी होताच मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो. शिपाई व आरमारावरील नोकर यांनां नोकरीवर असतांना मत देण्याचा अधिकार नसतो. ''हो ली आ र्ड र'' मध्यें कारकून नसलेल्या व २५ वर्षांच्या वर वय असलेल्या कोणत्याही स्पॅनिश मनुष्याला सभासद म्हणून निवडता येते. कार्यकारी राज्य व्यवस्था एका जबाबदार मंत्रिमंडळाकडे सोंपविली आहे. या मंत्रिमंडळाचे भाग परराष्ट्रीय कारभार, न्याय, जमाबंदी, आंतरराष्ट्रीय कारभार, युद्ध, शिक्षण, सार्वजनिक काम, शेती व व्यापार असे आहेत. प्रत्येक प्रांतांच्या स्थानिक कारभारावर ''सेक्रेटरी ऑफ स्टेट'' ची देखरेख असते व प्रत्येक प्रांताच्या कारभारावर एक मुख्य गव्हर्नर असतो. व तो प्रांतिक सभेचा मुख्य असतो. ही प्रांतिक सभा सुद्धां सार्वत्रिक मताधिकारानें निवडलेली असते. प्रांतिक सभा प्रत्येक वर्षी भरते. प्रत्येक म्युनिसिपालिटी आपली ''अयुन्टामेन्टो'' निवडते. व तिचा स्थानिक कारभारावर पूर्ण अधिकार असतो. तिला कर बसविण्यचा व गोळा करण्याचा अधिकार असतो. तिच्या सभासदापैकीं निम्मे २ वर्षांनीं निवडले जातात ते सभासद आपल्यापैकीं एकाला अध्यक्ष निवडतात. का य दा व न्या य - स्पेनचे कायदे रोमन कायद्यांच्या आधारानें केलेले आहेत. येथें ''सिव्हिल कोड'', ''क्रिमिनल कोड'', ''कमर्शिअल कोड'', ''कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर'' व ''क्रिमिनल प्रोसिजर कोड'' हे कायदे आहेत. न्यायाकरितां प्रांत ४९५ जिल्हे असून प्रत्येकांत एक पहिल्या दर्जाचें कोर्ट आहे. या खालच्या दर्जाच्या कोर्टांतून १५ अपिल कोर्टांत अपिल होतें. माड्रीडमध्यें एक ''सुप्रीम कोर्ट'' आहे. व तें कायद्याच्या प्रश्र्नांवर निकाल देतें. शिवाय प्रत्येक प्रांतात एक याप्रमाणें ४९ ''ऑडीयन्सीयास क्रीमिनेलस'' नांवाची कोर्टे आहेत ती वर्षांतून ४ वेळां भरतात. ध र्म.-रोमन कॅथॉलिक धर्म राजधर्म आहे. मुख्य धर्माधिका-याच्या बारा जागा असून, टोलेडो येथील मुख्य धर्माधिकारी त्यांचा मुख्य आहे. स्पेनचा कायदा धर्माविरुद्ध अपराध करणाऱ्याला शिक्षा करतो. १८९९ पासून बी.ए. ची पदवी मिळविण्याकरितां लागणाऱ्या ७ वर्षांच्या अभ्यासक्रमापैकीं ६ वर्षे प्रत्येक विद्यार्थ्याला धर्मसंबंधीं व्याख्यानाला हजर रहावेंच लागतें. शिक्षण १८५७ च्या कायद्यान्वयें प्राथमिक शिक्षण सक्तीचें व गरिबांकरितां फुकट करण्यांत आलें. सक्तीची वयोमर्यादा ६ ते ९ वर्षे होती. परंतु हा कायदा अमलांत आणणें अशक्य ठरलें व स्पेनमध्यें हल्लीं अशिक्षितांचें प्रमाण अधिक आहे. मुलामुलींच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळा म्युनिसिपालटी चालविते, व सरकार त्यांनां फार थोडी मदत करतें. यांचा वार्षिक खर्च दहा लक्ष पौंड आहे. दुय्यम प्रतीच्या शिक्षणाची शाळा एक तरी प्रत्येक प्रांतांत असलीच पाहिजे. व ह्या शाळा स्वत:च्या उत्पन्नावर चालतात. स्पेनमध्यें ९ विश्वविद्यालयें आहे. माड्रीड विश्वविद्यालयांत सर्वांत जास्त विद्यार्थी आहेत, व सालमानकाचें विश्वविद्यालय सर्वांत जुनें आहे. बहुतेक सर्व विश्वविद्यालयें मॅट्रिकच्या व पदवीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फीवर खर्च भागवूं शकतात. याशिवाय सरकारनें चालविलेल्या धंदेशिक्षणाच्या पुष्कळ शाळा देशांत आहेत. एक मंत्री सल्लागार मंडळाच्या अधिकारांत सर्व देशाची शिक्षणपद्धत आहे. मुलींच्या सरकारी शाळा असून धार्मिक मठांनी चालविलेल्याहि शाळा आहे. सं र क्ष ण:-स्पेनमध्यें सैन्यभरती सक्तीनें होते. ज्या वर्षी विसावें वर्ष पुरें होतें त्या वर्षाच्या आरंभापासून प्रत्येक मनुष्याची लष्करांत नोकरी करण्याची जबाबदारी सुरू होते. लढाईच्या दिवसांशिवाय इतर वेळीं ४० पासून ६० हजारांच्या वर सैन्य क्वचित बोलविलें गेलें, व असल्या सैन्यांतील नोकरींतून, जर देशांतल्या देशांत नोकरी असेल तर ६० पौंड व वसाहतींत असेल तर ८० पौंड देऊन माफी मिळवीत असत. नोकरीची मर्यादा १२ वर्षे आहे. भाऊ आपल्या भावाबद्दल नोकरीवर जाऊं शकतो. विधवांच्या अथवा म्हाताऱ्या आईबापांच्या वडील मुलांनां माफी मिळते. पुष्कळ वर्षेपर्यंत खडें सैन्य ८५ हजार पासून १ लक्ष पर्यंत होतें. कार्लिस्ट युद्धाच्या वेळी स्पेनचें सैन्य दोन लक्ष एैंशींहजार होते. व अलीकडील एका युद्धाच्या वेळी तीन लक्ष पन्नास हजार होतें. पोर्तुगीज सरहद्दीचें रक्षण करण्याकरितां पुष्कळ किल्ले आहेत. परंतु त्यांच्यावर पुरेसें सैन्य नाहीं व किल्ले उपयोगांत नाहींत. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जिल्ह्यांतून सक्तीनें आरामारांत भरती केली जाते. सन १९०८ मध्यें स्पेनच्या ताब्यांत १ लढाऊ जहाज ८ क्रझरें, ५ विनाशका बोटी व ६ पाणतीर फेकणाऱ्या बोटी होत्या. इ ति हा स .-अगदीं प्राचीन काळचे येथील रहिवासी कोण होते याविषयी माहिती अनुपलब्ध आहे. ख्रिस्तपूर्व तीन शतकें स्पेनमध्यें ऑयबेरियन, केल्ट व केल्टीवेरियन हे रहात असल्याबद्दल रोमन लोकांनीं लिहून ठेविलें आहे. फिनिशियन लोक कार्थेजच्या भरभराटीच्या काळीं स्पेनमध्यें व्यापारार्थ येऊन रहात असत. ख्रिस्तपूर्व २०१ या वर्षी रोमनें स्पेनवर स्वारी केली.  रोमने सत्तेखाली स्पेनची बरीच भरभराट झाली.  परंतु रानटी लोकांच्या स्वा-यांमुळे तिस-या शतकांत स्पेनचा –हास झाला. व्हँडाल्स, व्हिसिगॉथ वगैरे लोकांनी स्वा-या केल्या.  ६ व्या शतकाच्या उत्तरार्धांत रेक्लारेड हा व्हिसिगॉथिक राजा होऊन गोला.  यानें स्पेनभर कॅथोलिक धर्माचा प्रसार केला.  एका शतकांत कॅथॉलिक धर्माचा अंमल सबंध स्पेनवर होऊन पाद्रयांचा जिकडे तिकडे सुळसुळाट झाला, व ते जुलूम करु लागले.  उत्तर आफ्रिकेंतील खलिफाचा सरदार तारीक हा स्पेनमध्यें ७११ या सालीं आला व त्याचें गोंथ लोकांचा पराभव करुन त्यांनां हाकून लावले.  अरब लोक धार्मिक बाबतींत कोणावर जुलूम करीत नसत.  अरबांनी फक्त श्रीमंत लोकांवरच डोईपड्डी बसविल्यानें व गरीब शेतकरी म्हातारे, बायका यांनां ही पट्टी माफ केली असल्यानें त्यांना अरब हे देव वाटूं लागले व लोक भराभर महंमदी धर्माची दीक्षा घेऊं लागले. पुढें मुसुलमानांतहि भेद पडले. खलिफाची गादी कोणाकडे असावी याबद्दल भांडण सुरू झालें. अबदुलरहमान नांवाचा उमियाद वंशी एक गृहस्थ स्पेनमध्यें आला. त्यानें बराचसा रक्तपात करून कार्डोव्हा येथें स्वतंत्र अमीरी स्थापन  केली. मुसुलमानांनीं आतां धार्मिक बाबतींत जुलूप सुरू केला, व सन ९०० च्या सुमारास या अमीराचे तुकडे तुकडे होण्याची वेळ आली. परंतु तिसरा अबदुल रहमान नांवाचा अमीर चांगला निघाला. त्यानें देशांत माजलेली अंदाधुंदी बंद केली. त्यानें लोकांनां नि:पक्षपातीपणानें न्याय दिला. याच्या कारकीर्दीत जिकडे तिकडे शांतता माजली. हा ९१२ ते ९६१ पर्यंत अमीर होता. याच्यानंतर आलेले दोन तीन राजे रहीमाप्रमाणेंच चांगले निघून राज्यव्यवस्था सुरळीत चालली. ११ व्या शतकाच्या उत्तरार्धांत रहिमान सांचाल हा राजा झाला. हा गर्विष्ठ असल्यानें तत्कालीन खलिफाकडून त्याच्या मृत्यूनंतर आपल्या वंशाकडे गादी जावी असें त्यानें जबरदस्तीनें लिहून घेतल्यानें त्याचा खून झाला. याच सुमारास ख्रिस्ती लोक आपलें एकीकरण करूं लागले व मुसुलमानांनां हाकलून देण्याचें प्रयत्न सुरू झाले. ख्रिस्ती लोकांनीं एकदां सबंध स्पेन काबीज केलें. परंतु आफ्रिकेंतील मुसुलमान राजाला मुसुलमानांनीं बोलावून ख्रिस्त्यांचा पूर्ण पराभव केला; अशी स्पेनच्या सत्तेचीं आंदोलनें कांहीं काळ चालू होती. १२१२ मध्यें मुसुलमानांनीं स्पेनवर स्वारी केली पण तिचा काही उपयोग झाला नाहीं. आतां या पुढील काल हा स्पेनच्या उत्कर्षाचा काल आहे. १४ वया शतकांत मुसुलमानांचां छळ होऊं लागला. तान्स्तामाराचा हेनरी (१३६८-१३७९) हा चांगला राजा झाला. यानें राज्यांतील अंतर्व्यवस्था सुधारली. यानें इंग्लिशांच्या आरमाराचा रोवले येथें पराभव केला. यानंतर हेनरी, पहिला जॉन व दुसरा जॉन हे राजे झाले. येथपर्यंतचा इतिहास हा स्पेनच्या राष्ट्रीय जीवनाच्या वाढीचा इतिहास झाला. १५व्या शतकाच्या उत्तरार्धांत फर्डिनंड राजा राज्य करीत होता. हा इटलीच्या राजकारणांत ढवळाढवळ करूं लागला. आपलें आरमार युरोपीय समुद्रांत अप्रतिहत फिरावें अशी स्पेनची इच्छा असल्यामुळें इंग्लंडशीं वारंवार झटापटी होऊं लागल्या. फ्रान्स विरुद्ध झालें, शिवाय स्पेनच्या मनांत तुर्क लोकांच्या दक्षिण यूरोपांतील प्रगतींस आळा घालावयाचा व अमेरिकेंत दुसऱ्या कोणास येऊं द्यावयाचें नाहीं. या दोन गोष्टी असल्यामुळें स्पेनची शक्ति दिवसेदिवस क्षीण होत चालली. राजे लोक प्रजेवर निरनिराळें कर बसवून पैसे उकळीत व त्यामुळें स्पेनदेश अगदीं दरिद्री बनला होता. फर्डीनंडनंतर त्याचा नातू चार्लस हा गादीवर आला. लवकरच तो ऑस्ट्रियाचाहि राजा झाला. स्पेननें पेरू व मेक्सिको हे देश घेतले. इटलीच्या राजकारणांत वारंवार येणाऱ्या संबंधामुळें स्पेन प्रसिद्धीस चढलें. याच सुमारास फ्रान्सचा राजा त्याच्या हातीं लागल्यामुळें तर स्पेनला स्वर्ग दोन बोटें उरला. चार्लसनंतर फिलीप गादीवर आला. याच्या कारकीर्दीत नेदरर्लंडांत बंड झालें, इंग्लंडशीं लढण्याकरता पाठविलेल्या प्रचंड स्पेनी आरमारचा पराभव पूर्ण झाला. पश्र्चिम यूरोपमध्यें प्रचंड सत्ता निर्माण करण्याच्या हावेनें बरेचसें कर्ज झालें. अशा तऱ्हेनें सर्व बाजूंनीं देशास ओहोटी लागली. १६२१-६५ दरम्यान चौथा फिलीप गादीवर होता. याच्या कारकीर्दीत जय मिळाले पण त्याचा म्हणण्यासारखा परिणाम झाला नाहीं. स्पेनच्या सत्तेपासून एकहि बंदुकीची गोळी फुकट न दवडतां पोर्तुगाल स्वतंत्र झालें. चौथ्या फिलीफनंतर दुसरा चार्लस गादीवर आला. याच्या कारकीर्दीत फ्रान्सबरोबर चार-पांच युद्धें  झालीं. चार्लसच्या मरणानंतर फ्रान्सच्या १४ व्या लुईचा नातू आंज्यूचा डयूक यास स्पेनचें राज्य मिळालें (१७००).   १७५७ त तिसरा चार्लस गादीवर आला. हा राजा फार चांगला होता. यानें सर्व देशभर सडका, गटारें व पूल बांधलें. इक्किझीशन कोर्टें बंद केलीं. स्पेनचा जमिनीवरील व खुष्कीवरील व्यापार वाढविला, व राष्ट्रांत चैतन्य उत्पन्न झालें. इंग्लंडकडे गेलेली सत्ता परत मिळविण्याच्या उद्योगास स्पेन पुन्हां लागलें. त्यानें फ्रान्सची मदत मागितली, पण फ्रान्स ती देईना, तेव्हां तत्कालीन प्रधान फाराब्लँकानें फ्रान्सविरुद्ध युद्ध सुरू केलें. पण राज्ञी मराया लुईसा ही विरुद्ध गेली व फाराब्लँकास पदच्युत व्हावें लागलें. व तिनें गोंडायला आपला प्रधान केलें. फ्रान्समध्यें जेव्हां १६ व्या लुईना खून झाला. त्यावेळी स्पेन हें राजपक्षी होतें. फ्रान्समधील प्रजासत्ताक पद्धती नष्ट करण्याकरतां, स्पेनच्या राजानें फ्रान्सवर स्वारी केली, पण चिकाटी नसल्यामुळें पराभव घेऊन परत जावें लागलें व तह करावा लागला. इंग्लंडवर दर्यामार्गानें हल्ले करण्याचा बेतहि रहित करावा लागला. रोममध्यें प्रजासत्ताक पद्धति स्थापित झाली. इंग्लंडनें स्पेनच्या अमेरिकेंतील वसाहतींत असंतोष पसरविला. अशा तऱ्हेंनें स्पेनची चोहोंकडून मानहानि झाली. १७९८ त गोंडायनें प्रधानपदाचा राजीनामा दिला नेपोलियननें गोंडायला पुन्हां हातीं धरून प्रधान केलें. पण तो परत शिरजोर झाला तेव्हां नोपोलियननें स्पेनवर स्वारी केली. स्पेनकडून ६० लक्ष फ्रँक वसूल केले. इंग्लंडनें ट्रॅफलगारच्या लढाईंत स्पेनचा पूर्ण पराभव केल्यानें त्यास पुन्हां तोंड वरकाढणें अशक्य झालें. स्पेनच्या गादीवर नेपोलियननें जोसेफला बसविलें. स्पेनच्या लोकांनीं त्याविरुद्ध बंड केलें. तें नेपोलियननें मोडलें व स्पेनच्या मदतीला आलेल्या इंग्लिशांचाहि त्यानें मोड केला. १८१२ मध्यें राज्यव्यवस्थेंत फेरफार करण्यांत आले. १८१४ च्या सुमारास गादीवर आलेल्या फर्डीनंड राजानें उदारमतवाद्यांचा फार छळ केला. हा स्वत: वाईट चालीचा राजा होता. फौजेनें त्याच्याविरुद्ध बंड केलें, व राजाला कैद केलें. सर्वत्र अंदाधुंदी माजली. सन १८२२ मध्यें व्हिएन्ना येथें भरलेल्या सार्वराष्ट्रीय काँग्रेसनें फ्रान्सला स्पेनमध्यें शांतता प्रस्थापित करण्याचा अधिकार दिला. फ्रान्सनें स्पेनमध्यें सैन्य पाठविलें. फ्रान्सच्या राजानें पळ काढला, परंतु लवकरच तो फ्रेंचांच्या हाती सांपडला. १८२३ ते १८७४ पर्यंत स्पेनची स्थिति विशेष समाधानकारक नव्हती. याच वेळी स्पेनच्या अमेरिकेंतील वसाहती स्वतंत्र झाल्या. त्यांचा इंग्लंडाबरोबर स्वतंत्र रीतीनें व्यापारहि सुरू झाला. स्पेननें त्या परत मिळविण्याविषयीं मनांत इच्छा धरली, परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. १८३३ त फर्डिनंड मरण पावला. त्याच्या पश्चात ईसाबेला ही गादीवर आली. हिच्या लग्नाबद्दल निरनिराळ्या राष्ट्रांत वाद होता. हिच्या कारकीर्दीत अव्यवस्था फार होती. १८५४ मध्यें बंड होऊन निरनिराळ्या राजमंडळांच्या हातीं कांहीं काल राज्यव्यवस्था फिरत होती. पुढें यूनियन लिबरल प्रधानमंडळ अस्तित्वांत आल्यावर राज्ययंत्र सुरळीत चाललें. १८९३ मध्यें पुन्हां गोंधळ माजला. १८७५ पासून १८८० पर्यंतचा काल शांतता प्रस्थापित करण्याकडे गेला. नंतर नवीन सेनेट भरली. तींत अर्धे लोक सरकारनियुक्त अगर श्रीमंत घराण्यांतील होते. खुल्या व्यापाराची पद्धति अमलांत आणली गेली. १८८६ च्या सुमारास कॅनोवहास व सॅगोस्टा हे दोन मुख्य प्रधान स्पेनला मिळाल्यानें स्पेनच्या अन्तर्व्यवस्थेंत पुष्कळ सुधारणा झाली. १८९८त वसाहतीसंबंधीच्या वादावरून अमेरिकेचें व स्पेनचें युद्ध झालें. त्यांत स्पेनचा पराभव झाला. यामुळें स्पेनला कर्ज झालें. १९०२ मध्यें समाजसत्तावाद्यांनीं दंगे केले. १९०९ या वर्षी वारसेलोना येथें बंड पुकारण्यांत आलें. अराजक फेस्ट यांस गोळी घालून ठार करण्यांत आलें. आजच्या जागतिक राष्ट्रांत स्पेनला अगदी खालचें स्थान आहे. १९१० पासून १९२५ पर्यंत:-१९१० च्या अखेरच्या महिन्यांत कॅनालेजसच्या मंत्रिमंडळानें बरींच महत्त्वाचीं बिलें पसार केलीं. त्यापैकीं पॅडलॉक बिल व 'स्पॅनिश-मोरोक्को' तहनामा ही होत. तथापि लवकरच मोरोक्कोसंबंधी नवीनच भानगड उपस्थित झाली.  फ्रेंचांनी फेझ आपल्या ताब्यांत घेण्याची तयारी चालविल्यानें स्पेनलाहि मोरोक्कोमध्यें आपल्या हक्कांचें संरक्षण करण्याकरतां सैन्य पाठवावें लागलें व याला लोकांचा विरोध असल्यानें सरकारला लोकांचा असंतोष सहन करावा लागला. तशांतच बिलबाओ, अस्तूरियास इत्यादि ठिकाणीं संपाचा वणवा पेटला. तथापि सरकारनें मोठ्या धैर्यानें या सर्व परिस्थितीला तोंड दिलें. १९११ च्या मे महिन्यांतील पार्लमेंटच्या बैठकीत कॅनालेजसनें स्थानिक स्वराज्याच्या पुनर्घटनेबद्दलचें एक बिल आणलें व तें बहुमतानें मंजुरहि झालें. तथापि त्याला उदारपक्षांतील बऱ्याच लोकांनीं विरोध केल्यामुळें त्यानें तें अंमलांत आणलें नाहीं. याच सुमारास पुन्हां संपांची वावटल उठलीं; संप मोडण्याकरतां कॅनालेजसला बरेच जादा उपाय अमलंत आणावे लागले. त्यानंतर आक्टोबरच्या बैठकींत पुन्हां स्थानिक स्वराज्याच्या बाबतचें बिल मांडण्यांत येऊन तें पसार झालें. पण या बैठकींनंतर थोडक्याच दिवसांत कॅनालोजसचा खून झाला. त्याच्यामागून रोमानोनेस हा प्रधान झाला. त्यानें १९११ च्या डिसेंबरमध्यें फ्रान्सशीं तह  घडवून आणला. सीनेटमध्यें ज्या वेळी स्थानिक स्वराज्यविषयक बिल मांडण्यांत आलें त्यावेळीं त्याला जोराचा विरोध झाल्यामुळें  रोमानोनेसला राजीनामा देणें भाग पडलें, पुढें बऱ्याच वाटाघाटीनंतर दातो याला राजानें प्रधानकीची वस्त्रे अर्पण केली. दातीच्या कारकीर्दीत यूरोपमध्यें महायुद्धाला सुरुवात झाली. स्पेननें या युद्धांत अगदीं तटस्थ रहावयाचें ठरविलें. तथापि साधारणत: दोस्त राष्ट्रांच्या बाजूचेंच स्पेन होतें असें म्हणावयास हरकत नाहीं. महायुद्ध चालू असेतों रेल्वे, जकात, आरमारखातें इत्यादि खात्यांत जरूर ते फेरफार करण्याचा हक्क प्रधानमंडळानें खास कायदा करून आपल्याकडे घेतला. त्याबरोबरच बरींच लढाऊ जहाजें. विनाशिका व पाणबुड्या बांधावयाचें बिलहि कायदेमंडळानें पास केलें. तथापि स्पेनची आर्थिक परिस्थिति यावेळीं बिघडल्यामुळें व स्पेन सरकारला पाहिजे तितकें कर्ज न मिळाल्यामुळें, मंत्रिमंडळाला राजीनामा देणें भाग पडलें. त्यामुळें रोमानोनेस हा पुन्हां प्रधान झाला. त्यानें उदारपक्षामधील फूट नाहींशी करून आपलें प्रधानमंडळ बनविलें. तथापि त्याच्याविरुद्ध जर्मनांनां अनुकूल पक्ष आपली चळवळ करीत होता. त्यांतच पुन्हां संप सुरू झाले. त्यामुळें व इतरहि बऱ्याच भानगडी अंतर्गत कारभारांत उपस्थित झाल्यानें रोमानोनेसनें राजीनामा दिला व दातो हा पुन्हां प्रधान झाला. रोमानोनेसच्या कारकीर्दीत इन्फंट्री कमिटी ऑफ डिफेन्स सैन्यावर आपली हुकमत चालावी. या निमित्त जी चळवळ चालविली होती ती अधिक फैलावूं लागली होती. या 'जुंटा' चळवळीच्या पुढाऱ्यांनीं स्पेनच्या शासनघटनेंत फेरबदल होण्याबद्दल जारीनें प्रयत्न सुरू केलें, पण ते फसले. तथापि पुन्हां संपाला सुरुवात झाली, व सर्व देशभर संप होऊं लागले. संपवाल्यांचा उद्देश राजसत्ता उलथून पाडण्याकडे दिसूं लागला. त्यामुळें सैन्यानें मोठ्या निर्दयपणानें हा संप मोडून टाकला. शेवटीं कांही काळ स्पेनच्या कारभारांत बेबंदशाही माजल्यानंतर प्रिएटोनें संयुक्त प्रधानमंडळ बनविलें. तथापि त्याच्यानेंहि ही जुंटा चळवळ मोडवेना. शेवटीं राजाच्या खास विनंतीवरून सर्व पक्षांतील कर्त्यांचें मिळून मंत्रिमंडळ बनविण्यांत आलें. तरी तेंहि लवकरच मोडलें. त्यानंतर प्रीएटो, रोमानोनेस यांनीं अनुक्रमें प्रधानकी स्वीकारली पण त्यांनांहि लवकरच राजीनामा देणें भाग पडलें. शेवटीं पुन्हां दातोनें प्रधानकीची वस्त्रें घेतली व काँझवेंटिव्ह पक्षाची एकी घडवून आणून त्यांच्या साहाय्यानें राज्यकारभार करण्याचा बेत योजिला, पण अशा परिस्थितींत त्याचा खून झाला. अशा रीतीनें स्पेनच्या अंतर्गत कारभारांत जरी क्रांति घडून येत होती तथापि महायुद्धाच्या अमदानींत स्पेननें बरीत आर्थिक प्रगति केली व आपले उद्योगधंदे ऊर्जितावस्थेला आणले. स्पॅ नि श वा ङ् म य.-स्पॅनिश वाङ्मयाचे कॅस्टिलिअन व कॅटलॅन असे दोन विभाग आहेत. दि मिस्टरी ऑफ दि मॅजिअन किंग्ज हा ग्रंथ बाराव्या शतकांत कॅस्टिलिअन भाषेंत लिहिलेला सर्वांत जुना आहे. एपिफनी सणाच्या वेळीं टोलेडोच्या चर्चमध्यें करून दाखविण्यासाठीं हें उपासनात्मक नाटक लिहिलें गेलें. रॉड्रिग्ज डायझ डी विव्हर किंवा सिड या शूर पुरुषाचें वर्णन कॅस्टिलिअन भाषेंत दोन कवितांमध्यें केलेलें आहे. 'कँटर' किंवा 'पोएमा डेल सिड' या काव्यांत याच्या शूरपणाचें वर्णन, व्हॅलेनशियाचा पाडाव, राजाशीं झालेला सेमेट व त्याच्या मुलीचीं लग्नें वगैरे गोष्टीं सांगितलेल्या आहेत. सिड हा राजनिष्ठ असून, राजापासून दूर जावें लागल्यामुळें त्यास वाईट वाटलें असें या काव्यांत दर्शविले आहे, परंतु 'कानिका रिमाडा डेल सिड' या काव्यांत सिड हा बंडखोर व हट्टी होतो, असें सांगितलें आहे. रेमोन मनीडीझ पिडल  यानें १८९६ त दि कोनीका जनरल या काव्यांवरून 'दी इन्फन्टेस डी लारा' हें काव्य लिहिलें  आहे. कॉस्टिलिअन भाषेंत वीररसप्रधान काव्य बरेंच लिहिलें गेलें असावें असें वाटतें. पारमार्थिक व नीतिपर काव्य तेराव्या शतकांत प्रचारांत आलें; गाँझल्स ही बसेओ (११८०-१२४६) यानें स्पेनमधील कित्येक साधूंचीं चरित्रें व कांहीं भक्तिरसात्मक काव्यें लिहिली आहेत. याचें काव्य फक्त वाचनीय आहे. गाण्यालायक नाहीं. लॅटिन व फ्रेंच ग्रंथांच्या आधारावरून, अलेक्झांडर दि ग्रेट व अपोलोनियस ऑफ टायर यांवर दोन मोठीं काव्यें झालीं आहेत. अलेक्झांडर दि ग्रेट यावर लिहिलेलें काव्य गातां येण्यासारखे आहे. 'ए लाइफ ऑफ सेंट मेरी दि इजिप्शिअन', 'ॲन ॲडोरेशन ऑफ दि थ्री किंग्स', 'ए डिबेट बिट्वीन सोल अँड बॉडी' हीं पुस्तकें तेराव्या शतकांत लिहिलीं गेलीं. 'लॉ रेझॉन फीटा ढी आमर' हें सर्वांत जुनें रसात्मक काव्य कॅस्टिलिअन भाषेंत लिहिलें गेलें. चौदाव्या शतकांत स्पेनमध्यें अनेक स्वबुद्धिप्रेरित कवी होऊन गेले. जुअन रुदूझ यानें स्त्रिया व प्रेम या विषयावर कविता केल्या आहेत. यानें 'दि रिमॅडो डी पॅलॅसिओ' या काव्यांत धर्माधिकारी व सामान्य लोक यांच्या दुर्गुणांवर बरीच कडक टीका केली आहे. रोमान्य म्हणजे लहान वीररसप्रधान कविता असें स्पेनमध्यें अलीकडे समजण्यांत येतें. पंधराव्या शतकाच्या अखेरीस व सोळाव्या शतकाच्या आरंभीं, ज्या अद्भुत गोष्टी पूर्वीपासून तोंडी सांगण्यांत येत होत्या त्या लिहून काढण्यांत आल्या व नंतर त्या छापल्या गेल्या. दहाव्या ॲल्फांझो राजाच्या आश्रयाखाली, 'लास सांटे-पार्टिडास' या नांवाचा कायद्याचा ग्रंथ व कित्येक शास्त्रीय विषयांवर ग्रंथ प्रसिद्ध झाले. याच्या देखरेखीखालीं तयार झालेल्या 'क्रानिका जनरल' या ग्रंथाचे दोन विभाग आहेत; पहिल्या भागांत जगाच्या उत्पत्तीपासून ख्रिस्ती शतकाच्या आरंभापर्यंतचा सर्वसामान्य इतिहास आहे व दुसऱ्या भागांत अल्फांझोचा बाप फर्डिनंड (तिसरा) याच्या मृत्युपर्यंतच (१२५२) फक्त राष्ट्रीय इतिहास आहे. चौदाव्या शतकांत 'क्रॉनिफा जनरल डी एस्पाणा ऑर्डि कॉस्टिला' या नांवाच्या पुस्तकांत सन १०३० पासून १३१२ पर्यंतचा इतिहास आहे. पहिला पेड्रो, दुसरा हेनरी, पहिला जॉन व तिसरा हेनरी यांच्या कारकीर्दीचा इतिहास पेरो लोपेझ डि अयाला यानें व दुसऱ्या जॉनला इतिहास ऑल्व्हर गारशिआ डि सन्ता मेरिआ यानें लिहिला आहे. राजांच्या चरित्रांशिवाय, कांहीं महत्वाच्या मोठ्या लोकांचीहि चरित्रें लिहिलेलीं आहेत; पेड्रो निनो, ब्युएलनाचा काऊंट याचें चरित्र पंधराव्या शतकांत लिहिलें गेलें. राज गुझालेअ ही क्लेव्हिजो यानें अल्वहारो डी लुना याचें चरित्र एक प्रवासवृत्त, व तिसऱ्या हेनरीनें १४०३ त तैमूरकडे पाठविलेल्या शिष्टमंडळाची हकीकत लिहिलेली आहे. तेराव्या शतकाच्या द्वितीयार्थांत अनेक उपदेशपर नैतिक गोष्टी लिहिल्या गेल्या. चौदाव्या शतकांत, दहाव्या अल्फान्झीचा पुतण्या ज्वान मॅन्युअल यानें अनेक महत्त्वाचें गद्यात्मक ग्रंथ लिहिले. 'एल काँडे लुकोनार' हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यानें कांही उपदेशपर ग्रंथहि लिहिले. चौदाव्या शतकापर्यंत पुराणकालाची नीटशी माहिती नव्हती; परंतु चौदाव्या शतकांत अनेक जुन्या वस्तूंचें ज्ञान प्राप्त झालें; प्राचीन काळासंबंधी जिज्ञासा उत्पन्न होऊन अनेक प्राचीन ग्रंथांची भाषांतरें झाली. फ्रान्समधील राऊंड टेबलासंबंच्या मुख्य मुख्य अद्भुत गोष्टींचे स्पेन व पोर्तुगाल देशांत चौदाव्या शतकांत भाषांतर झालें. शौर्यशालितेसंबंधाच्या पुस्तकांत स्पेनमध्यें बराच प्रसार झाला होता. यावरून फ्रान्समधील अद्भुत गोष्टी स्पॅनिश लोकांनां माहीत होत्या हें उघड आहे. अमाहिस डी गान्ला हें शौर्यशालितेसंबंधाचें पुस्तक महत्त्वाचें आहे. पंधराव्या शतकाच्या प्रथमार्धांतील काव्यांत तोंडपुजेपणा व कृत्रिमपणा आढळून येतो, कॅस्टिलिअन वाङ्मयावर इटलीमधील वाङ्मयाच्या परिचयामुळें दृष्टांतात्मक काव्याची छाप पडून स्पॅनिश लोकांस नवीन अभिरुचि उत्पन्न झाली व पुराणवस्तुसंशोधनाबद्दल प्रयत्न होऊं लागले. जुअन डीमेना, इनिगो लोपेझ डी मेंडोसा व फ्रॅन्सिस्को इंपीरिअल यांनी इटलीमधीलं काव्यपद्धतीला अनुसरून स्पेनमध्यें काव्य लिहिलें. अनिगो लॉपझे डी मेंडोझा यानें पंधराव्या शतकांतील वाङ्मयामध्यें फार महत्त्वाचें काम केलेलें आहे; त्यानें स्वत: कविता केल्या, इतकेंच नव्हे तर इतर लेखकांनां यानें प्रोत्साहन देऊन पुराणवस्तूंची माहिती मिळविण्याकडेहि लोकांचें मन वळविलें या कालांत गॉमेझ, मॅनरिक व जार्ज मॅनरिक हे प्रसिद्ध लेखक होऊन गेले. कांहीं चरित्रें, शौर्यशालितेसंबंधीं काहीं पुस्तकें यांशिवाय पंधराव्या शतकांत उत्तम गद्यात्मक ग्रंथ झाले नाहींत. 'कॉर्बाचो' (१४३८) हें मनोरंजक व चमत्कारिक पुस्तक अल्फान्झो मार्टिनेझ डी टोलेडो यानें लिहिले आहे; यांत स्पॅनिश लोकांच्या चालीरीतीचें वर्णन केलेलें आहे. यांत स्त्रियांबद्दल बराच औपरोधिक मजकूर आहे. ख्रिस्तस एपिफनी, ईस्टर वगैरे मोठाल्या सणांच्या वेळीं चर्चमध्यें नाटके करण्यांत येत असत. प्रथमत: या नाटकांत फक्त उपासना पद्धतीवर टीका असे; परंतु पुढें त्यामध्यें थट्टामस्करीचा समावेश होऊन धर्माधिकारी अशा नाटकांचा द्वेष करूं लागले. दहाव्या अल्फान्झोनें असा कायदा केला कीं, फक्त वाद स्टच्या चरित्रांतील गोष्टींचा नाटकांत समावेश केला जावा. कोर्पस् ख्रिस्ती हा सण स्पेनमध्यें फार लोकप्रिय होता. या सणामध्यें नाटक करण्यांत येत असे; त्याचा उद्देश प्रभुभोजना संबंधाचा रहस्यवाद लोकांस समजाऊन देणें हा होता. सतराव्या शतकांत हीं नाटकें चर्चमध्यें न होतां सार्वजनिक पटांगणांत होऊं लागलीं; व नंतर नाटकांचें धार्मिक स्वरूप जाऊन प्रत्यक्ष नेहमीं घडणाऱ्या गोष्टींचा समावेश नाटकांमध्यें होऊं लागला. मेषपालविषयक (पॅस्टोरल) नाटकें या नवीन ठिकाणीं (सार्वजनिक पटांगणांत) पंधराव्या शतकाव्या अखेरीस होऊ लागली. 'ला सेलेस्टिना' या कादंबरीच्या योगानें स्पॅनिश लोकांना संवादाची कला अवगत झाली व समाजांतील सर्व दर्जाचे लोक एकमेकांशीं मोकळ्या मनानें बोलूं लागले. लोप डी रूएडा यानें इटलीच्या धर्तीवर आनंदपर्यवसायी नाटकें, व लहान लहान चटकदार असे प्रवेश लिहिले जुअन डी ला क्यूव्हा यानें सिड बर्नार्डो डेल, कार्पिओ वगैरे लोकांनीं केलेल्या शूर कृत्यांचा समावेश नाटकांमध्यें केला. जेरोमिनो बर्म्युडेझ क्रिस्टोबल डी व्हिसएस वगैरे लोकांनीं शोकपर्यवसायी नाटकें लिहिण्याचा प्रयत्न केला. नाटकें गद्यात्मक असावीं किंवा पद्यात्मक असावीं, नाटकाचे किती अंक असावे, वगैरेबद्दल मतभेद होतो. प्रथमत: पांच अंकी नाटकें; सोळाव्या शतकाच्या अखेरीस चार अंकी व शेवटीं तीन अंकीं नाटकें प्रचारांत आली. सो ळा व्या स त रा व्या श त कां ती ल, स्पॅ नि श वा ङ् म या चा सु व र्ण का ल.-१५५० पासून १६५० या काळाला स्पेनच्या वाङ्मयाचा सुवर्णकाल असें म्हणतात. कॅथोलिक पंथाच्या राजांच्या पूर्वी फक्त कॅस्टिलिअन वाङ्मय प्रचारांत होतें; फ्रान्स व इटली या देशांमधील वाङ्मयाचें वळण कॅस्टिलिअन वाङ्मयास लागलेलें होतें; परंतु ॲरेगॉन व कॅस्टाईल हीं राज्यें एकत्र झाल्यावर व स्पेनच्या राजास बादशाही पद प्राप्त झाल्यावर स्पॅनिश वाङ्मयाचें एकीकरण झालें. चौथ्या फिलिपच्या मृत्यूनंतर (१६६५) लढाया व राजकीय अव्यवस्था यामुळें स्पॅनिश वाङ्मयाचा ऱ्हास होऊन पूर्वीप्रमाणें स्पेनमध्यें फ्रान्सचें वर्चस्व होईल असा रंग दिसूं लागला. इटलीमधील काव्यामुळें रसात्मक काव्य करण्याची स्फूर्ति झाली असें म्हणतात. जुअन बॉस्कान, गॅलीलस डी ला व्हेगा वगैरे कवींनीं स्पॅनिश काव्यांत बरीच भर टाकली. लोप डी व्हेगा यानें इटलीमधील काव्याच्या धर्तीवर कविता केल्या. सतराव्या शतकांत रसात्मक काव्याची बरीच प्रगति झाली. गोंगोंरा यानें कॅस्टिलिअन काव्यांत पाल्हाळिक पद्धत सुरु केली. हा कवि फार नामांकित होता. केव्हेडो यानें लिहिलेलें गद्य, पद्यापेक्षां चांगलें आहे; तथापि औपरोधिक काव्यांत याची कुशलता विशेष दिसून येते. यावेळी स्पेनमधील वीररसप्रधान काव्यहि बरेच प्रसिद्ध होतें; परंतु हास्यरसप्रधान काव्य लिहिण्यांत सैनिक लोकांनी बरेंच यश संपादन केलें होतें. कादंबऱ्या व नाटकें लिहिण्यांत स्पॅनिश लोकांचें बुद्धिवैभव दिसून आलें. मेषपालविषयक अद्भूत गोष्टी इटलीपासून स्पेननें घेतल्या. मॅटेओ अलेमान यानें चोरांबद्दल कांदबऱ्या लिहिल्या आहेत. हळू हळू चोरांसंबंधाच्या गोष्टी व इटलीच्या पद्धतीवर लिहिलेल्या कादंबऱ्या यांचें मिश्रण होऊन नवीन प्रकारच्या कादंबऱ्या प्रचारांत आल्या. यांत कांहीं साहसाच्या गोष्टी असून, चालीरीतीचेंहि वर्णन केलेलें असे. अशा प्रकारच्या कादंबऱ्या व्हिसेंट मार्टिनेझ एस्पिनेल, आलोसो जेरोनिमा डी सालास बार्बाडिलो वगैरे लेखकांनी सतराव्या शतकांत लिहिल्या. जिनेस पेरेझ डी हिटा यानें 'ग्वेरास सिव्हिलेस डी ग्रानाडा' या नांवाची ऐतिहासिक अद्भूत गोष्ट लिहिली. यांत ग्रानडा राज्याच्या उतरत्या कलेचा इतिहास असून दुसऱ्या फिलिपच्या वेळीं आल्पुजारासच्या मूर लोकांनीं केलेल्या बंडाचीहि हकीकत आहे. सर्व्हाटेस यानें 'डॉन क्विझोटे' या नांवाची सामाजिक अद्भुत गोष्ट लिहिली. हींत सोळाव्या व सतराव्या शतकांतील स्पेनचें चित्र रेखाटलें आहे. खरें धैर्यं व खरी निष्ठा यांचा निषेध करण्याच्या सर्व्हाटेस याचा हेतु नाहीं. शौर्यशालितेचा अतिरेक झाला असतां काय परिणाम होतो हें दाखविण्याचा त्याचा उद्देश आहे. सतराव्या शतकांत स्पॅनिश लोकांचें नाटकांकडे बरेंच लक्ष वेधलें. अशिक्षित लोकांनां नाटकें आवडूं लागलीं. बायबल, धर्मवीरांच्या कथा, जुन्या दंतकथा, नित्य घडून येणाऱ्या गोष्टी, द्वंद्वयुद्धें, खून मारामाऱ्या वगैरे सर्व गोष्टींचा नाटकांत समावेश होऊं लागला. या वेळच्या नाटयविषयक वाङ्मयाचें दोन विभाग आहेत ऐहिक व पारमार्थिक. टिर्सो डी मोलीना यानें कांहीं ऐतिहासिक नाटकें व आनंदपर्यवसायीं नाटकें लिहिली आहेत. त्याची कविताहि फार प्रसिद्ध आहे. जॉन रुइझ ही अलार्कान याचें नाटयविषयक काव्य प्रसिद्ध आहे. पेड्रो केल्ड्रन डी लॉ बार्का हा मोठा नाटककार होऊन गेला; इतर देशांतहि याची फार वाहना झाली. लोव्हिडा एस् सुएगो या नांवाचें याचें तत्त्वज्ञानाविषयक नाटक फार उच्च प्रतीचें आहे. अनेक ग्रंथकारांनीं केल्ड्रनची पद्धत उचलली. विद्येचें पुरुज्जीवन झालें त्यावेळीं एक नवीन लेखनपद्धति प्रचारांत आली. वस्तूंबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपलें मत न देतां व एकमेकांचा संबंध न दर्शवितां एकामागून एक गोष्ट लिहिण्याची पद्धत वेडगळपणाची आहे, असें समजण्यांत  येऊं लागलें. जुआन डी मारीआना यानें लिहिलेल्या इतिहासांत फक्त घडून आलेल्या गोष्टींची नोंद आहे असें नाहीं, त्याच्या पुस्तकांत एक प्रकारची कुशलता दिसून येते. “डिस्टरी डी एस्पेनो” हे पुस्तक जेस्निथ यानें १५९२ त लॅटिनमध्ये लिहिलें; परंतु त्याचें कॅस्टिलिअन भाषेंत सुंदर भाषांतर झालें. या पुस्तकाचीं एकंदर मांडणी उत्तम असून या पुस्तकाशीं तुलना करतां येण्यासारखें स्पेनमध्यें दुसरें पुस्तक नाहीं. डीगो हुर्टाडो डी मेंडोझा, फ्रान्सिस्को डी मोकांडा, फ्रँसिस्को मॅन्युएल डी  मेलो वगैरे इतिहासकारांनी लॅटिन ग्रंथकारांच्या स्फूर्तीनें इतिहास लिहिले. प त्र ले ख न.-स्पॅनिश वाङ्मयांत पत्रलेखन बरेच होऊन गेले. वास्तविक, पत्रलेकाखांचा व इतिहासकारांचा निकट संबंध आहे. सार्वजनिक पत्रें लिहिणें हें इतिहास लिहिण्यासारखेंच आहे. फर्नांडो डी पुल्गुर यानें आपल्या वेळेच्या हकीकतीबद्दल अनेक पत्रें लिहिलीं आहेत. अँटोनिओ डी ग्वेल्हेरे यानें सोळाव्या शतकांत 'एपिस्टोलस फॅमिलीआरेस' या सदराखाली आपल्या समकालीन लोकांशीं पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावरून पांचव्या चार्लसच्या वेळेची स्थिति कशी काय होती हें कळतें. अँटोनिओ पेरेझ यांचें व दुस-या फिलिक राजाचें वैमनस्य आल्यामुळें अँटोनिओ परेश यानें स्पेनच्या दरबारचीं सर्व गुप्त कारस्थानें पत्रद्वारां आपल्या मित्रांस व फ्रान्स व इंग्लंडच्या राजास कळविलीं. ही पत्रें अस्सल प्रतीचीं आहेत. सोळाव्या व सतराव्या शतकांमध्यें स्पॅनिश भाषेंत तत्त्वज्ञानावर फारसें ग्रंथ झाले नाहींत. त्या वेळच्या स्पॅनिश तत्त्वज्ञानांनीं लॅटिनमध्यें ग्रंथ लिहिलें. र ह स्य वा द.-लुई डी ग्रॅनाडा, लुई पाँसे डी लेऑन वगैरें रहस्यवाद्यांनीं सर्व लोकांस आपला रहस्यवाद कळावा म्हणून आपले ग्रंथ स्पॅनिशभाषेंत लिहिलें. त्यांच्या ग्रंथांचा इतर देशांतहि प्रसार होऊन फ्रान्समधील रहस्यवादावर त्यांचा बराच परिणाम झाला. स्पॅनिश रहस्यवादी आपल्या विचारशक्तीबद्दल प्रसिद्ध आहेत असें नाही, तर त्यांची लेखनपद्धतीहि उत्तम असून, त्यांच्यापैकीं कांहींनीं उत्कृष्ट काव्यें केलीं आहेत. नी त्यु प दे श क.-सोळाव्या व सतराव्या शतकांत अनेक नीत्युपदेशक होऊन गेले. राज्यपद्धति, राजपुत्रांचें शिक्षण, प्रजाजनांचीं कर्तव्यें, वगैर विषयांवर ग्रंथ लिहिले गेले. उपदेशपर वाङ्मय लिहिण्यांत, पेड्रो, फर्नंडिझ डी नॅव्हरेट वगैरे ग्रंथकारांनीं आपलें बरेच कौशल्य दाखविलें आहे. क्वेव्हेडो हा मोठा औपरोधिक लेखक होऊन गेला. त्या वेळच्या एकंदर समाजाची व्यंगें त्यानें आपल्या ग्रंथांत स्पष्टपणें उघडकीस आणिलीं आहेत. ग्रॅसिड यांच्या लेखांत थोडक्यांत नैतिक उपदेश केलेला आहे. याच्या नीतिमत्तेबद्दल याची सर्वत्र ख्याति आहे. अ ठ रा वें श त क.-सतराव्या शतकाच्या अखेरीस, स्पॅनिश विचारसरणी व एकंदर राष्ट्राचा उत्साह नाहींसा झाला. बोरबन घराण्याचा उदय व राजकीय व वाङ्मयाच्या बाबतींत फ्रेंच लोकांचें वर्चस्व यांमुळे स्पॅनिश लेखकांचे कांहीं चालेनासें झालें. रसात्मक काव्याचीहि फार निकृष्टावस्था झाली. लवकरच या विद्यापीठानें एक शब्दकोश लिहिण्यास सुरुवात केली. इटली व फ्रान्स येथील वाङ्मयांत पारंगत असलेला इग्नेसिओ डी लुआन यानें आपल्या 'पोईटिका' नांवाच्या ग्रंथांत या नवीन विद्यापीठाचें नियम व फ्रान्समध्यें सर्वमान्य असलेलीं तीन प्रकारची ऐक्यें (युनिटीज) आपल्या देशबांधवांस समजावून दिलीं. बेनिटो फैजू यानें 'टीट्रो क्रिटिको' व 'कार्टस एरूडिटसी क्यूरिओसस' हे ग्रंथ लिहून दुसऱ्या देशांतील मुख्य शास्त्रीय शोधांची माहिती आपल्या देशबांधवांस करून दिली, व त्यांचा धर्मभोळेपणा नाहींसा केला. ग्रेगोरिओ मयान्सी वायू सिस्कार (१६९९-१७८१) यानें प्राचीन उत्तम ग्रंथ व राष्ट्रेतिहास व वाङ्मय यांचा नीट अभ्यास करून जुन्या स्पॅनिश लेखकांच्या माहितीचें एक पुस्तक प्रसिद्ध केलें. गेल्या शतकांतील भावात्मक काव्याच्या मानानें, अठराव्या शतकांतील भावात्मक काव्य नीरस होतें; परंतु ग्रेनीडेझ व्हाल्डेस्, डीगो गोंझालेझ वगैरे कवींची भाषापद्धति फार उत्तम होती. लोड्रो फर्नांडेझ ही मॉरटिन व क्विंटाना यांनी बोधपर काव्य लिहींलें. या शतकांत नाटकें अगदींच थोडीं लिहिलीं गेलीं. फ्रान्समधील शोकपर्यवसायी व आनंदपर्यवप्तायी नाटकें स्पेनमध्यें सुरू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु तिकडे लोकांचें लक्ष लागलें नाहीं. रेमोन डी ला क्रूझ या ग्रंथकारानें चौथ्या चार्लसच्या वेळेच्या स्पेनमधील सामाजिक स्थितीचें उत्तम वर्णन केलें आहे. ए को णि सा वें श त क.- दि वार ऑप इंडिपेडन्सचा (१८०८ ते १४) स्पॅनिश वाङ्मयावर कांहींएक परिणाम झाला नाहीं. अद्भुत वाङ्मयाचा जेव्हां स्पेनमध्यें शिरकाव झाला, तेव्हांहि स्पेनमधील कवींनीं फ्रेंच कवींचेंच अनुकरण केलें. डयूक ऑफ रायव्हस् हा मोठा कवि होऊन गेला. एस्प्राँसेड यानें रसात्मक काव्य लिहिलें. यावेळीं फ्रान्समधीला प्रचलित असलेल्या शोकपर्यवसायी नाटकांप्रमाणें स्पेंनमध्यें नाटकें लिहिण्यांत आली. ब्रेटोंडे लॉ हेरेरॉस यानें अनेक आनंदपर्यवसायी नाटकें लिहिली. त्यानें ही सर्व नाटके सतराव्या शतकांतील संप्रदायाप्रमाणें लिहिलीं. मारिआनो जोसे डी लारा यानें लिहिलेले गद्यात्मक लेख उत्तम आहेत. यानें लिहिलेलीं राजकीय गोष्टीसंबंधाचीं पत्रें फार महत्त्वाचीं आहेत. मेसोनेरो रोमॅनॉस' व 'एस्टीबेनेझ काल्डेरॉन' हे विनोदीलेखक होते. आल्बर्टो लिस्टा व ॲगुस्टिन डयुरॅन हे वाङ्मयटीकाकार होऊन गेले. नवीन पिढींतील लोकांनां असे वाटूं लागलें कीं, फ्रान्सचें अनुकरण न करतां स्पेनचें स्वतंत्र वाङ्मय असावें. ना ट कें.-ऑरेलीआनो फर्नाडेझ, ग्वेरा वाय ऑर्बे (१८१६ ते १८९४) व फ्रँसिस्को सॉचेझ डी कॅस्टो यांनीं लोप डी व्हेगा याची नाटकांची पद्धत पुन्हां सुरू करण्याचा प्रयत्न केला. ॲडेलॉडो लेपेझ डी अयल; व टामायो वाय् बॉस यांनी लिहिलेल्या नाटकांत प्राचीन व अर्वाचीन चालीरीतीनें मिश्रण  आहे. जोसे एचेगारे यानें आपल्या नाटकांत सामाजिक प्रश्र्न  सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. सेराफिन आल्यारेझ क्विटेरो व त्याचा भाऊ जोआक्विन हे हल्लीचे स्पॅनिश नाटकाकार फार होतकरू आहेत, या दोघांनीं मिळून 'एल ऑपिटॉ डेरेको' व 'आबानिकॉस वाय् पँडेरेटेस', ही नाटकें लिहिलीं आहेत. यांत विनोदी भाग बराच आहे.  का व्य.-नुनेझ डी आक्रे हा एकोणिसाव्या शतकांत एक मोठा कवि होऊन गेला. 'ग्रिटॉस डेल कॉबार्ट' हें त्यानें लिहिलेंलें काव्य उत्तम आहे. हा मुत्सद्दी होता. एमिलिओ पेरेझ फेरारी व बोसे व्हेलाडें हेहि मोठे कवी होते. मॅन्युएल डेल पॅलॅसिओ (१८३२-१९०७) या कवीच्या अंगीं बुद्धीवैभव व काल्पनिक शक्ति होती. परंतु याची कविता अगदीं थोडी आहे. जोसे मारिआ गेब्रीअल वाय् गॅलेन यानें लिहिलेलें 'एल आमा' हें काव्य फार प्रसिद्ध आहे. एका विशिष्ट प्रकारची कविता स्पॅनिश भाषेंत करणें फार सोपें झालें आहे. यामुळें स्पेनमध्ये अगणित कवी होऊन गेले. का ल्प नि क गो ष्टी.--१८५० पासून स्पॅनिश कादंबऱ्यांचें पुनरूज्जीवन होत आहे. फेर्नान कॅबॅलेलरस हिनें वाङ्मयाच्या इतिहासांत बरेंच नांव मिळालेलें आहे. जोसे मेरिआ डी पेरिड हा स्पेनमधील वस्तुवादात्मक कल्पना सृष्टीचा हल्लीच्या पंथांचा संस्थापक होय. त्याला गरीब लोकांबद्दल कळकळ वाटते, व सृष्टिसौंदर्याची किंमत पूर्णपणे ओळखतां येते. खेडेगांवांतील लोक, खलाशीं, कोळी वगैरे लोकांचें त्यानें वर्णन केले आहे. नेहमीं आयुष्यांत घडून येणाऱ्या गोष्टीचेंहि त्यानें वर्णन केलें आहे. जुआन व्हालेरा हा पेरेडाचा प्रतिस्पर्धी आहे. 'एपिसोडिऑस नॅसिओनॅलेस' या नांवाच्या ग्रंथांत वेनिटो पीरेझ गाल्डोस यानें ऐतिहासिक कादंबरीला नवीन वळण लाविलें. स्पेनमधील स्वभाववादाचा पंथ आर्मांडो पालासिओ व्हाल्डेस यानें काढिला. एमिलिआ पार्डो बझान ही एक मोठी कादंबरीकार होती. लीओपोल्डो आलास (१८५१-१९०१) हाहि एक कादंबरीकार होता. परंतु तो कडक टीकाकार म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. 'ला रीजेंटा' या त्याच्या कादंबरीमध्यें रहस्यवाद व मनोविकार यांचा संबंध दाखविला आहे. व्हिन्सेंट ब्लास्को इबानेझ हा अगदीं अलीकडचा कादंबरीकार फार प्रसिद्ध आहे. रॅमोन डेल व्हाले इनक्लान, जे मार्टिनेझ रूइझ, पिओ वारोजा व ग्रेगोरिओ मार्टिनेझ सीरा हे अलिकडचे ग्रंथकार बरेच प्रसिद्ध आहेत.  इ ति हा स व टी का.-इतिहास लिहिण्यापेक्षां इतिहासाची साधनें गोळा करण्याकडे स्पॅनिश लोकांची अधिक प्रवृत्ति आहे. अँटोनिओ कानोव्हास डेल कॅस्टिलो हा राजकारणांत निमग्न होऊन गेल्यामुळें, वाङ्मयाचा तोटा झाला. 'एन्सायो सोब्रेला कासा डी आस्ट्रिया एन एस्पाना' या त्याच्या ग्रंथांत पुष्कळ माहिती आहे. परंतु तो फार घाईनें लिहिला गेल्यामुळें भाषा पद्धति चांगलीशी नाहीं. फ्रान्सिस्को कार्डेनास (१८१६-९८) यानें हिस्टो़रिया डी ला प्रोप्रायडाड टेरिटोरियल एन् एस्पाना' हा ग्रंथ लिहून स्पेन देशाची मोठी कामगिरी केली. एडयुर्डो पीरेझ पुजोल यानें 'हिस्टोरिया डी लास इनस्टिटयुशनेस डी ला एस्पाना गोडा' हा ग्रंथ लिहिला. जोक्विन कोस्टा यानें लिहिलेलें 'एस्टुडिओस इवेरिकॉस' व कोलेक्टिव्हिस्मो ॲगुरिओ एन् एस्पाना' हे दोन ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत; त्यात उत्तम प्रकारची माहिती असून त्या ग्रंथांवरून ग्रंथकाराची विद्वत्ता दिसून येते. फ्रान्सिस्को कोडेरा वाय् झैडेन, सेसरेस फेर्नाडेझ डूप वगैरे लोकांचे ग्रंथ स्पेनचा इतिहास लिहिणाच्या कामी फार उपयुक्त आहेत.  एमिलिओ कोटॅरेलो बायमोरी यानें नाटकगृहांचा इतिहास लिहिला आहे.  आडाल्फे बोनिला वाय् सान मार्टिन यानें लिहिलेलें जुआन “लुई व्हिव्हेस” याचें चरित्र प्रसिद्ध आहे.  या चरित्रांत स्पॅनिश लोकांच्या वाड्मसरवर इतिहास उत्तमप्रमारें दिलेला आहे. कॅ ट लॅ न वा ङ् म य, मध्यकालीन काव्य:-कॅटलॅन भाषा ही दक्षिणेंकडील गॅलो रोमन भाषेची एक शाखा आहे. तथापि कॅटलॅन वाड्मय ही प्रोव्हेन्स वाड्मयाची पुरवणी आहे.  तेराव्या शतकापर्यत कॅटलॅन प्रांतांत प्रोव्हेंन्स वाड्मयाशिवाय दुसरे कोणतेंहि वाड्मय नव्हतें; व स्पेनच्या ईशान्येकडील भागांतील कवी हे फ्रान्समधील अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत झालेल्या कवींचीच भाषा वापरीत असत. बाराव्या व तेराव्या शतकांतील रॉलोन व्हिडाल हा व्याकरणकार असून कवि होता. त्याचा 'रॅसॉस डी ट्रॉवर' हा ग्रंथ प्रार्व्हेसल भाषेंत लिहिलेल्या कॅटलॅन काव्याला आधारभूत झाला होता. रॅमोन व्हिडाल व इतर व्याकरणकारांचे वजन टिकाऊ हातें. मुंटानेर याच्या गद्यात्मक लेखांची भाषा, त्यावेळी बोलण्यांत येणाऱ्या भाषेसारखीच आहे; परंतु त्याच्या काव्याची पद्धति फ्रान्स देशांतील अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत झालेल्या कवींच्या पद्धतीप्रमाणेंच आहे. सार्डिनिआ व कार्सिका हे देश जिंकल्यावर मुंटानेर यानें लिहिलेला 'सेर्मो' चौदाव्या शतकांतील कॅटलॅन कवींच्या काव्याप्रमाणेंच मिश्र भाषेंत लिहिलेला आहे. पं ध रा वे श त क.-पंधरावें शतक हें कॅटलॅन काव्याचें सुवर्णयुग होय. पहिला जॉन मार्टिन,व फर्डिनंड या ॲरेगानच्या राजाच्या आश्रयाखालीं, बार्सिलोना येथें एक धर्मसभा स्थापन झाली; यावेळेपासून प्रॉव्हेंसल काव्यपद्धतीपासून कॅटलॅन काव्याची पद्धति भिन्न भिन्न होऊं लागली. गद्याची भाषा व नेहमीं बोलण्यांत येणारी भाषा यांचा उपयोग पद्यांत होऊं लागला. ऑझिआस मार्च यानें लिहिलेलें 'कँटस डी आमोर अँड  कँस डी मार्च' हें काव्य कॅटलॅन भाषेंतील सर्व काव्यांपेक्षां उत्तम आहे. परंतु कांहीं कांही ठिकाणीं त्याची कविता फार दुर्बोध झाली आहे. जौमे रोइग यानें लिहिलेल्या  'लिब्रे डी लेस डोनेस' या काव्यांत स्त्रियांवर कडक टीका केलेली असून, कवीनें आपला स्वत:चा इतिहास दिलेला आहे. जरी या काव्यांत कवीचा उल्लेख आहे. तरी हें काव्य काल्पनिक आहे असेंच म्हणतां येईल. यानंतर कॅटलॅन काव्याचा ऱ्हास होत चालला. यांत कवींचा दोष नसून केवळ परिस्थितीमुळें त्या काव्याला उतरती कळा लागली. ॲरेगान व कॅस्टाईल यांचें ऐक्य होऊन, सर्व स्पेनमध्यें कॅस्टिलिअन लोकांचें वर्चस्व झाल्यामुळें, कॅटलन वाङ्मयास बराच धक्का बसला. जुआट बोस्कन या नांवाच्या एका कॅटलॅन मनुष्यानें कॅस्टिलिअन भाषेंत एक नवीन प्रकारचें काव्य करण्यास सुरुवात केली; व त्यांत कॅस्टिलिअन लोकांनाहि त्यास एक नवीन पंथाचा मुख्य असें कबूल केले ही महत्त्वाची गोष्ट आहे. बोस्कनचे ग्रंथ १५४३ त प्रसिद्ध झाले; तेव्हांपासून कॅटलॅन काव्याचा शेवट झाला असें म्हणतां येईल. ते रा व्या श त का पा सू न पं ध रा व्या श त का प र्यं त चे ग द्य.-तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत कॅटलॅन भाषेंत गद्यग्रंथ नव्हतें. तेराव्या शकताच्या अखेरीस प्रथमत: कॅटेंलन भाषेंत गद्यग्रंथ लिहिले गेलें; ते अगदीं मूळग्रंथ होते. पहिल्या जेम्सच्या वेळेपासून देण्यांत आलेल्या सनदा ज्या भाषेंत लिहिलेल्या आहेत, त्याच भाषेंत हे गद्यग्रंथ लिहिलेले आहेत. मध्यकालीन कॅटलॅन भाषेंतील दिनवृत्तें फार महत्त्वाची आहेत. त्यापैकीं पहिल्या जेम्सचें, बर्नाट डेस्क्लाटचें, रॅमन मन्टानेरचें व चौथ्या पेड्रोचें या चार दिनवृत्तांची भाषा उत्तम असून त्यांतील माहितीहि उत्तम आहे. रेमॉड लुली यानें कित्येक नैतिक व प्रवर्तक ग्रंथ लिहिले. लुलीच्या बहुतेक ग्रंथांचे भाषांतर त्याच्या शिष्यांनी लॅटिनमध्यें केले आहे. फ्रान्सेच झिमेनेझ हा लुलीचा प्रतिस्पर्धी होता. त्यानें लिहिलेला 'क्रेस्टिआ' हा ग्रंथ धर्मशास्त्राचा मोठा विश्वकोश आहे. 'व्हिडा डी जेसुक्रिस्ट', 'लिब्रे डेल एन्जल्स' व 'लिब्रे डे लेस डोनेस' हे क्रेस्टिआचे पूरक आहेत. 'लिब्रे ही लेस डोनेस' या ग्रंथांत कॅटॅलन स्त्रियांच्या चालीरीतीचें व त्यावेळच्या ऐश्वर्याचें वर्णन केलें आहे. चौदाव्या शतकांतील ग्रंथकारांपैकील लुली व फ्रान्सचे किमेनेज या दोनच ग्रंथकारांच्या ग्रंथांचे थोडक्याच वेळांत फ्रेंच भाषेंत भाषांतर झालें. पंधराव्या शतकांतील लेखकांपैकीं बहुतेक भाषांतरकारा व इतिहासकार होते. बेर्नाट मेटगे हा इटालियन वाङ्मयांत पारंगत असल्यामुळे त्यानें ग्रिसेलिडिस या ग्रंथाचें भाषांतर करून इटलीमधील मोठमोठ्या ग्रंथकारांची ओळख आपल्या देशबांधवांनां करून दिली. जोहॅनॉट मार्टोरेल यानें लिहिलेला 'टिरंट लो ब्लँक' हा ग्रंथ पंधराव्या शतकांतील वाङ्मयाचें स्वरूप समजण्यास उपयुक्त आहे. सो ळा व्या श त का पा सू न अ ठ रा व्या श त का प र्यं त.--राजकीय स्वातंत्र्याबरोबरच कॅटेलिअन देशाचे वाङ्मय स्वातंत्र्यहि नष्ट झालें. कॅटॅलन भाषा ही गावंढळ भाषा आहे असें समजण्यात येऊं लागलें व लिहिण्याकडे तिचा फारच कमी प्रमाणांत उपयोग होऊं लागला. फक्त बोलण्याकडे तिचा थोडासा उपयोग करण्यांत येत असे. विद्वान लोकांनींहि कॅटॅलन भाषेकडे दुर्लक्ष केलें. पेरे सेरॅफी या कवीशिवाय दुसरा चांगला कवि सोळाव्या शतकांत झाला नाहीं थोडेबहुत गद्यात्मक ग्रंथ सोळाव्या शतकांत लिहिले गेले. परंतु अगदीं थोड्या पंडितांनीं कॅटॅलन भाषेंचें उपयोग केला.  सतराव्या व अठराव्या शतकांत तर कॅटॅलन भाषेचा बराच –हास झाला.  हरिमोनिम पुडेडेस, व्हिन्सेंट गार्सिआ वगैसे ग्रंथकारांनी कॅटेलन भाषेचें पुनरुज्जीवन करण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला, परंतु त्यांत त्यास यश आलें नाहीं. धर्मोपदेश, साधूची चरित्रें व कांहीं बोधप्रद गोष्टी एवढेंच कायतें एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत कॅटॅलन भाषेंत लिहिलेलें वाङ्मय होय. कॅस्टिलिअन भाषेचा स्पेनमध्यें इतका प्रसार झाला होता कीं, विद्वान कॅटॅलन लोकांनांहि आपली मातृभाषा चांगलीशी येत नव्हती; व त्या भाषेंत लेक लिहिणेंहि हास्यास्पद  आहे असें त्यांस वाटत असे. कॅ टॅ ल न भा षे चें पु न रू ज्जी व न.- इ. स. १८१४ त जोसेफ पॅन बॅलट वाय् टोरेस यानें 'ग्रॅमॅटिक वाय् आपोलो जिआ डी ला उएनक्क कॅथलॅन हा ग्रंथ लिहिला व तेव्हांपासून कॅटॅलन भाषेच्या व्याकरणाचा व वाङ्मयाचा अभ्यास पुन्हां सुरू झाला. पुढें लवकरच कॅटॅलन भाषेचें पुनरुज्जीवन करण्याचें, अनेक पद्यात्मक ग्रंथांच्या रूपानें बरेच प्रयत्न झाले. ब्यूनाव्हेंटुरा कॉर्लास आरिबान यानें लिहिलेलें 'ओडा आ ला पार्शिआ' (१८३३) हें काव्य उत्तम आहे. यांतील कविता स्फूर्तिदायक आहेत. जोआक्विन रुबिको वाय् ओर्स. अँटोनिओ डी वोफरुल वगैरे ग्रंथकारांनी कॅटॅलन भाषेंत ग्रंथ लिहून त्या भाषेचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ही चळवळ इतर प्रांतांतहि पसरली व इ. स. १८५९ त उत्तम कविता करणाऱ्याला बक्षिसें देण्यासाठीं एक संस्था काढण्यांत आली. परंतु कॅटॅलन भाषेचा अभ्युदय कायम राहील किंवा नाहीं याची शंकाच आहे; कारण सर्व भाषांचें एकीकरण करण्याची सर्व यूरोपची अलीकडे प्रवृत्ति झालेली आहे. जुनी भाषापद्धति व हल्लीचा बोलण्याचा भाषासंप्रदाय यांतील वाद नाहींसा होऊन एकंदर भाषापद्धति निश्र्चित होणें इष्ट आहे. अशा प्रकारच्या कांही सुधारणा जोअन मारागाल, अपिलेस मेस्ट्रे, नार्सिस जोलर, साँशिआगो रुसिनॉट वगैरे ग्रंथकारांनीं आपल्या ग्रंथांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व अशा प्रकारचे प्रयत्न सतत झाल्यास कॅटॅलन भाषेस चांगले दिवस येतील असें मानण्यास हरकत नाहीं. अ र्वा ची न.-विसाव्या शतकांतील स्पॅनिश वाङ्मयांत 'प्राचीन स्पॅनिश संस्कृतीचा अभिमान' हें अंग प्रामुख्यानें दृग्गोचर होतें. मिग्युएल डे उनामुनो याच्या ग्रंथांत ही गोष्ट ठळक रीतीनें नजरेस येते. उनामुनो हा कादंबरीकार, नाटककार, व उत्कृष्ट टीकाकार अशा तिन्ही दृष्टींनीं प्रसिद्ध आहे. मनुष्याचा विश्वाशीं काय संबंध आहे हें दाखविण्याचा उनामुनोचा आपल्या सर्व ग्रंथांत प्रयत्न दिसतो. त्याच्या 'ॲबेल सांशेझ', 'ट्रेस नोव्हेलास', 'इ उन प्रोलोगो' या कादंबऱ्या, 'फेड्रा' हें नाटक, एन् टोर्नोअल कास्टिसिस्मो ऐसायासें ' हे निबंध इत्यादि प्रमुख ग्रंथ आहेत. याच्या ग्रंथांत पौरस्त्य कल्पनांचें प्रतिबिंब दृष्टीस पडते. ओर्टेग इ. गॅसेट (१८२३) याच्या ग्रंथांवर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा फार परिणाम झालेला आढळतो. त्याचे ग्रंथ मुख्यत: तात्विक व टीकात्मक स्वरूपाचे आहेत. 'मेरिटासि योनेस', 'डेल कुइयोटे' व 'एल एस्पेक्टाडॉर' हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. मार्टिनेझ रुइझ उर्फ अॅझोरिन याचा कॉस्टिल्ला, लॉस पुएष्लास' हा ग्रंथ नांवाजलेला आहे. कादंबरीवाङ्यामध्यें इबानेझ हा प्रमुख कादंबरीकार असून त्याच्या 'ला बॅरॅका' 'संग्रे इ अरेना', 'लॉस कुआट्रो जिनेटेसे डेल ॲपो कलिप्सिस' इत्यादि जगप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. पीयो बॅरोजा हा लोकप्रिय कादंबरीकार आहे. 'इडिलियॉस व्हॅल्कॉस' ही त्याची अत्यंत प्रसिद्ध कादंबरी आहे. याशिवाय आयला हाहि उत्तम कादंबरीकार म्हणून श्रुत आहे. नाटयवाङ्मयांत बेनाव्हेंटे हा अग्रस्थानी बसलेला नाटककार होय. 'लॉस इंटरएसेस की एडॉस' (१९०७) ला नोते डे लसबॅडो' व 'ला मालकुएरिडश' ही त्याची तीन नाटकें स्पॅनिश रंगभूमीवर अत्यंत लोकप्रिय आहे. अलवारेझ क्विंटेरो या बंधुद्वयांचीं 'ला सडे केन, ' पुएष्ल डे लास मुथेर्स' इत्यादि अनेक नाटकें नांवाजलेली आहेत. अँटोनियो मचाडो, साल्व्हाडार डे मदारियागा, निमेनेझ इंक्लान व आयला हे सुप्रसिद्ध कवी आहेत. पियोडात मरीन ओनीस व कॅस्ट्रो यांची इतिहासक्षेत्रांत प्रसिद्धि आहे. स्पेनमध्यें वृत्तपत्रकला अत्यंत लोकप्रिय असल्यामुळें या क्षेत्रांत पुष्कळच विद्वानांनी भाग घेतलेला आढळतो. त्यांतल्या त्यांत मेझटू व ॲराक्विस्टेन या दोघांची अत्यंत प्रसिद्धि आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .