प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद

स्थापत्यशास्त्र— (भाग ३)
(सिव्हिल इंजिनिअरिंग)

जेव्हां पाणी जास्त खोल असेल तेव्हां मोटेचा उपयोग करतात. विहीर जितकी जास्त खोल असेल तितकी तितकी बैल चालण्याची धाव जास्त लांब करावी लागतें. महाराष्ट्रांतल्या मोटांनां सोंडेसारखी कातड्याची नळीं जोडलेली असते व त्या सोंडेला दोरी बांधलेली असते तिच्या योगानें बैल हांकणारा मनुष्य बैलांबरोबर धावेच्या शेवटापर्यंत गेला तरी मोट थारोळ्यांच्या वर आल्याबरोबर ती त्यास सर्व पाणी थारोळ्यांत ओतून घेऊन रिकामी करतां येते. परंतु गुजराथेंत रामी या नावाच्या लहान मोटा असतात, त्यांनां अशी सोंड नसते. व त्यामुळें बैल हांकणारा बैलांच्या बरोबर धावेच्या शेवटीं गेल्याकारणानें थारोळ्याच्या तोंडाशीं दुसरा मनुष्य उभा करावा लागतो, व तो भरून आलेली मोट हातानें थारोळ्यांत पालथी करून घेतो. सिंधप्रांतांत मोटेच्या ऐवजीं रहाटगाडगें वापरतात. व तें फिरविण्यासाठी बैल किंवा उंट जोडतात. ह्या रहाटगाडग्यांनां जी दोरांची माळ बसविलेली असते तिला एक फूट पासून दीड फूट अंतरावर गाडगीं किंवा पोहरे बांधलेले असतात. आणि ज्या रहाटावर ही माळ फिरत असते तो रहाट बहुधा चार फूट व्यासाचा आणि ज्या उभ्या रहाटाला दोर गुंडाळलेला असतो, व ज्याच्या भोंवती तो फिरविण्यासाठीं एक किंवा दोन बैल किंवा उंट फिरत असतात तो रहाट चार पासून पांच फूट व्यासाचा असतो. विहीर फार खोल असली म्हणजे रहाट फिरावयास फार मेहनत पडूं नये म्हणून रहाट मोठ्या व्यासाचें करतात किंवा पोहरे दूर दूर अंतरावर बांधतात. सारख्याच खोलीच्या विहिरींतून उक्तीनें जितकें पाणी एका दिवसांत निघतें त्याच्या चौपट, पांच पट मोटेनें पाणी व मोटेच्या सव्वापटीपेक्षांहि जास्त रहाट गाडग्यांनीं निघते.

ज्या ठिकाणीं पाण्याचा झरा मोठा असेल किंवा ओढ्याचा प्रवाह सारखा वाहात असेल त्या ठिकाणीं बंबानें पाणी चढविणें स्वस्त पडतें. हे बंब चालवावयास वाफेच्या एंजिनाचा किंवा राकेलानें चालणार्या आईल एंजिनाचा उपयोग करतात. दोन हॉर्स पावरचें एंजिन असलें तर तें बैलांच्या आठ जोड्या इतकें काम सहज करूं शकतें. लहान एंजिन आणि पंप वापरल्यास व शेती बरीच मोठी असल्यास बराच फायदा होण्याजोगा आहे. कांही ठिकाणीं पवनचक्कीनेंहि (हिलाच इंग्रजींत वुइंडमिल किंवा एअर मोटर म्हणतात) पंप चालवितात. पण त्यांचा उपयोग लहानशा बागेला पाणी देण्यापलीकडे फारसा होऊं शकत नाहीं. कारण ही पवनचक्की चालविण्यास वार्याचा जितका वेग सतत असावयास पाहिजे तितका नेहमीं असत नाहीं. आणि ही चक्की फार मोठी केली तर तुफानी वार्याच्या वेळेला ती मोडून किंवा उलथून पडण्याचा संभव असतो. ज्या ठिकाणीं पाणी पुष्कळच असेल त्या ठिकाणीं १०।१२ हॉर्सपॉवरचें एंजिन आणि ९ इंचापासून बारा इंच व्यासाच्य सेंट्रीफ्यूगल पंपाचें दर तासी लाख सवा लाख ग्यालन पाणी चढवितां येतें. पण असे करण्याला शेतीचा विस्तार मोठा पाहिजे.

ज्या ठिकाणीं विहिरी पुष्कळ असतात आणि जमीन चिकण आणि पाणी बर्याच खोलीवर सांपडतें अशा ठिकाणीं कालव्यांची फारशी जरूर भासत नाहीं. परंतु जेथें एकंदर कालव्यांची फारशी जरूर भासत नाहीं. परंतु जेथें एकंदर जमीनीचा चवथा भागहि विहिरींनी भिजूं शकत नाहीं आणि विहिरीहि २०।२५ फुटांपेक्षां खोल कराव्या लागत असतील त्या ठिकाणीं कालव्याचें पाणी आणतां येत असल्यास तें पुष्कळ लोक वापरण्याचा संभव असतो.

का ल वें.- हे दोन प्रकारचे असतात; एक जमीनीला पाणी देण्यासाठीं आणि दुसरे त्यामधून होड्या किंवा नावा चालवून माणसांची व मालाची नेआण करण्यासाठीं दुसर्या प्रकारचे कालवे आपल्या इकडे फारसे नाहींतच असें म्हटलें असतां चालेल. अशा प्रकारच्या कालव्यांनां फारसा उतार किंवा ढाळ असतां उपयोगी नाहीं. कारण जर उतार जास्ती असेल तर ज्या बाजूला प्रवाह वाहात असेल तर उतार जास्ती असेल त्या दिशेस नावा फार जलद जातील. परंतु त्याच्या उलट दिशेस जावयाचें म्हणजे त्यांनां फार मेहनत पडेल. या कारणास्तव असे कालवे जमीनीच्या नीच भागांतूनच न्यावे लागतात, आणि त्यांनां स्लोप किंवा उतार फारच कमी असल्याकारणानें त्यांतील पाण्याला वेग बहुतेक नसतोच व यामुळें त्यांत पाणीहि फारच थोडें म्हणजे जेवढें उन्हानें वाळून जाईल किंवा जमीनींत जिरून जाईल तेवढेंच नवें सोडोवें लागतें. उलटपक्षीं शेतीला पाणी देण्यासाठीं जे कालवे करतात, ते सडकाप्रमाणेंच त्या त्या प्रदेशाच्या उंच भागावरून न्यावे लागतात. कारण असें केलें म्हणजेच दोन्ही बाजूंच्या लांब पर्यंतच्या जमीनींनां चार्या खोदून पाणी देतां येतें.

आपल्या हिंदुस्थानांत इंग्रज सरकारनीं आरंभी आरंभी जे कालवे बांधले ते बहुतेक जुन्या मुसुलमान व बादशहांनीं केलेले व कालगतीनें नादुरुस्त झालेलेच फिरून सुधारून चालू केले. हिंदुस्थानांतील प्रथमचा नवा कालवा म्हणजे गंगा नदीचा होय, त्यानंतर पंजाबांतील 'बारी दुआब' हा होय त्यानंतर कृष्णा व गोदावरी यांच्या जवळील सुपीक व सपाट प्रदेशांत मोठाले कालवे काढले, आणि अलीकडे तर पंजाबांत फारच मोठालें कालवे काढण्याचें काम चालू आहे. आणि अशाच प्रकारचे फार मोठे दोन कालवे सिंधु नदीच्या पश्चिम बाजूकडे एक व दुसरा पूर्वेकडे सक्कर शहराजवळ सिंधु नदीला मोठा बंधारा घालून पाणी अडविण्याची व तें अडविलेलें  पाणी ह्या वर सांगितलेल्या दोन कालव्यांतून नेऊन शेतीस देण्याची योजना तयार झाली आहे व तें काम चालू झालें आहे.

सर्व नद्या देशाच्या उंच भागांत उगम पावून सखल प्रदेश जिकडे असेल तिकडेच वाहात जातात आणि शेवटीं समुद्रास मिळतात. त्यांच्या पात्रांनां उगमाजवळ जास्ती ढाळ असतो आणि मुखाजवळ फारच थोडा असतो, यामुळें मोठ्या पुरांत उगमाजवळच्या भागांत पाण्याचा वेग अतिशय असतो आणि मुखाकडे तो कमी कमी होत जातो त्यामुळे असें घडतें कीं उगमाजवळच्या पहिल्या कांहीं मैलांत माती व वाळू हीं तर वाहून जातातच पण मोठमोठाले गोटेहि दर पावसाळ्यांत मैल अर्धामैलपर्यंत पाण्याच्या लाटांच्या बरोबर गडगडत जातात. असे गोटे वाहून जाण्याला ताशी चार पासून सहा मैल पाण्याचा वेग असावा लागतो. इतका वेग येण्याला पात्राला उतार किंवा स्लोपहि फार असावा लागतो. जास्ती उतार मोठ्या ओढयांनां आणि डोंगराजवळच्या भागांत बर्याच मोठ्या नद्यांनांहि असतो. यामुळें अशा ठिकाणी नद्यांच्या व ओढयांच्या पात्रांतून मोठाले गोटेच आढळतात. अशा प्रदेशाच्या खालच्या भागांतून नद्यांच्या पात्रांनां उतार कमी असल्याकारणानें पाण्याचा वेग कमी होते व त्यामुळे अशा ठिकाणा पर्यंत गोटे वाहून जात नाहींत. पण जाडी रेती वाहून जाण्याइतका वेग असल्यामुळें पात्रांतून जाडी रेती वाहून जाण्याइतका वेग असल्यामुळें पात्रांतून जाडी रेती सांपडते. व अशा भागाच्या खालच्या (म्हणजे मुखाकडील) बाजूस बारीक रेती आढळते. आणि ज्या भागांत उतार फारच कमी असल्याकारणानें पाण्याचा वेग तासी दोन मैलांपेक्षांहि कमी असतो अशा ठिकाणीं अतिशय बारीक वाळू आणि माती मात्र प्रवाहाबरोबर वाहात जाते. यामुळें जसजसें नदीच्या मुखाकडे जावें तसतशी नदीच्या पात्रांत फक्त बारीक वाळू आणि मातीच आढळते आणि मुखाजवळ तर वेग अतिशय कमी झाल्याकारणानें पात्र फारच रुंद व उथळ बनतें. आणि अशा कित्येक मैलपर्यंत पसरलेल्या पात्रांतून अनेक मुखानीं मोठमोठाल्या नद्या समुद्रास जाऊन मिळतात. सिंधप्रांस सिंधु नदीच्या मुखाजवळ असल्याकारणानें व तेथील जमीनहि सपाट मैदान असल्याकारणानें तेथें जे जुने (सिंधु नदीला पूर आला असतां चालू होणारे) कालवे काढलेले होते ते ५० पासून १०० फूट रुंदीचे असून त्यांतून ८।१० फूट खोलीचें पाणी वाहील असे केलेले असत; व त्यांच्या तळचा स्लोपहि फारच कमी (दोन मैलांत ६ इंच इतका) दिलेला आहे. हा स्लोप इतका थोडा असल्याकारणानें त्यांतून वाहाणार्या पाण्याचा वेगहि फारच कमी असतो. त्यामुळें असें घडतें कीं, सिंधु नदीच्या पुराच्या वेळच्या गढूळ पाण्यांतील सर्व गाळ पाण्याचा वेग कमी झाल्याकारणानें या कालव्यांच्या तळाशीं बसतो. व पाणी ओसरून गेल्यावर हा २।३ फूट जाडीचा गाळाचा थर पुढचा पावसाळा यावयाच्या अगोदर काढून टाकावा लागतो. याच कालव्यांचें पाणी त्याच्या शाखा काढून जसजसें वापरलें जातें तसतशी कालव्याची रूंदी कमी कमी केलेली असते. म्हणजे आरंभीं जरी १०० फूट रुंदीचा कालवा असला तरी कांहीं मैल गेल्यानंतर ह्याची ८० फूट रुंदी, नंतर ६०, नंतर ४०, नंतर २० अशी रुंदी कमी करीत जातात. व पाण्याची खोलीहि आरंभी १०।१५ फूट असली तरी ती पुढें कमी होत होत ४ फुटांपर्यंत ठेवतात. असें केल्यानें पाण्याचा वेग साधारण रीतीनें दर सेकंदास दोन फूट राहतो.

बा र म हा चा लू अ स णा रे का ल वे.-असे कालवे काढावयाचे म्हणजे ज्या नद्यांनां बाराहि महिने पुष्कळ पाणी असेल अशा नद्यांपासून ते काढावे लागतात. अशा प्रकारच्या नद्या म्हणजे उत्तरहिंदुस्थानांत हिमालयांतून निघणार्या नद्याच होत. या नद्यांनां पावसाळ्यांत डोंगरावर व सर्व प्रदेशांत पाऊस पडत असतो तेव्हां तर विपुल पाणी असतेंच पण भर उन्हाळ्यांत सुद्धा हिमालयावरील बर्फ वितळल्याकारणानें त्याचें पाणी मिळतें, अशा नद्या म्हणजे गंगा, यमुना, गंडकी, सिंधु नद व त्यास मिळणार्या बियास, रावी, सतलज, चिनाब आणि झेलम, ब्रह्मपुत्रा वगैरे होत. या नद्यांच्या कालव्यांनां पावसानें व बर्फाचें मिळून बाराहि मास पाणी पुरतें. याखेरीज शोणभद्र नद आणि कृष्णा, गोदावरी, कावेरी वगैरे महानद्या फार लांबपर्यंत वाहात असल्याकारणानें व त्यांनां पुष्कळ लहान नद्या मिळत असल्याकारणानें त्यांच्या मुखाजवळच्या भागांत बरेंच पाणी बाराहि मास वाहात असतें व अशा नद्यांच्या मुखाजवळील सपाट प्रदेशांत थोड्या उंचीचीं धरणें बांधून त्यांचें बहुतेक पाणी त्यांच्या दोन्ही बाजूला कालवे काढून उपयोगांत आणलेलें आहे. दुसर्या लहान नद्यांतून बाराहि मास मोठासा प्रवाह वाहात नसतो. परंतु ज्या डोंगरांतून त्या निघतात त्या डोंगरावर पावसाळ्यांत पुष्कळच पाऊस पडत असतो आणि हें सर्व पाणी समुद्राला व्यर्थ जाऊन मिळत असतें. अशा नद्यांच्या डोंगराजवळील भागांत उंच उंच धरणें बांधून मोठमोठाल्या जलाशयांतून (तलावांतून) कालवे काढून त्यांतून बाराहि मास पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली असते. असे मोठाले जलाशय बनविणें हें डोंगराळ प्रदेशांत जरी मोठ्या खर्चाचें असलें तरी होऊं शकतें व असे तलाव आणि कालवे गोदावरी, प्रवरा, नीरा, मुळा-मुठा वगैरे नद्यांवर बांधलेले आहेत आणि कृष्णा, घटप्रभा या नद्यांनां धरणें बांधून कालवे काढलेले आहेत. दुसर्या कांहीं मोठमोठ्या नद्यांनां तलाव बांधून कालवे काढण्याच्या योजना तयार झालेल्या आहेत परंतु कांहीं कारणानें ती कार्य अद्याप झालेलीं नाहींत. या खेरीजहि लहान लहान नद्यांनां तलाव बांधून दहा-वीस मैल लांबीपर्यंत कालवे काढलेले आहेत. सध्यां जलशक्तीपासून वीज उत्पन्न करण्यासाठीं म्हणून ३ मोठमोठाले जलाशय लोणावळ्याजवळ टाटा कंपनीनें बांधलेले आहेत. व कोयना नदी आणि निळामुळा, आंध्रादरी या ठिकाणीहि मोठाले जलाशय करून त्यांचें पाणी वीज उत्पन्न करण्याकडे वापरण्याचा टाटा कंपनीचा इरादा आहे.

नद्यांच्या उगमाजवळ स्लोप किंवा उतार जास्ती असतो. अशा ठिकाणीं थोड्या उंचीचा बंधारा घालून पाणी अडविलें तर तेथून कालवा काढण्याला सुगम पडतें. कारण अशा ठिकाणीं नदीचा स्लोप दर मैलाला ६ फूट असला व नदीची दरड २० फूट उंचीचीं असली आणि नदीच्या कांठावरील जमिनीलाहि दर मैलास ६ फूट प्रमाणें उतार असला व धरण पांच फूट उंचीचें घालून कालवा काढला आणि त्याला दर मैलांला २ फूट स्लोप दिला तर दर मैलाला चार फूटप्रमाणें नदीचा तळ व कालव्याचा तळ यांजमध्यें अंतर पडत जाईल आणि कालव्याचा तळ जरी आरंभीं जमिनीपासून २० फूट खोलीवर असला तरी जेथून कालवा काढला तेथून ५ मैल अंतरावर म्हणजे कालव्याच्या सहाव्या मैलाच्या आरंभी त्याचा तळ जमिनीबरोबर होईल आणि अशा रीतीनें सहाव्या मैंलाच्या खालीं कोणत्याहि मैलांत शेतीला पाणी देतां येईल अथवा ज्या ठिकाणीं नदींत खडक असून पाण्याचा धबधबा असेल अशा ठिकाणाच्या थोड्याशा वरच्या बाजूला लहानसें धरण बांधून कालवा काढला असतां आरंभींच कालव्याची खोली फारशी न घेतां कालव्याचा तळ जमिनीच्या पृष्ठभागाजवळ लवकरच आणतां येतो व शेतीस पाणी देतां येतें. मुद्याची गोष्ट ही कीं, कालव्याच्या तळाचा स्लोप अथवा उतार आणि नदीच्या तळाचा स्लोप यांमध्यें जेथें जेथें जास्ती अंतर पडूं शकेल अशीं ठिकाणें कालवा काढण्याला सोईचीं होत. नदीचें पाणी अडवून तें शेतीसाठीं वापरण्याकरितां बांधलेले कालवे कोणत्या ठिकाणापासून काढावे यांची तत्त्वें वर सांगितलींच आहेत. पण ज्या ठिकाणीं पावसाचें पाणी सांठवून मोठमोठे जलाशय अथवा तलाव बांधलेले असतील त्यांचे पाणी उपयोगांत आणण्यासाठीं जे कालवे तयार करावे लागतात किंवा पाट काढावे लागतात त्यांनांहि कालव्याचा तळ जितक्या लवकर जमीनीच्या तळाबरोबर येईल अशा जमिनीवरून त्यांची मांडणी केलेली असते. व तेथून पुढेंहि अशा जमिनीवरून कालवा नेतात कीं, कोणत्याहि ठिकाणीं तो फार जमिनीच्या वर येऊं नये किंवा जमिनीच्या फार खाली जाऊं नये. साधारण धोरण असें ठेवतात कीं, कालव्यांतील पाण्याच्या खोलीपैकीं २/३ खोली जमिनींत असावी व १/३ खोली वर असावी. उदाहरणार्थ कालव्यांत पाणी आठ फूट खोलीचें नेहमीं वाहात असलें तर त्यापैकीं चार फूट पाणी जमिनींत कालवा काढण्यासाठीं खोदलेल्या चरांतून आणि बाकीचें कालव्याच्या दोन्ही बाजूंला जे मातीचे बांध असतात त्यांमधून वाहील असें करतात.

का ल व्या चें प्र मा ण.- कालवा केवढा मोठा बांधावयाचा हें ज्या नदीचें पाणी अडवून न्यायालयाचें असतें त्या नदींत उन्हाळ्याच्या आरंभी कमींतकमी किती प्रवाह वाहात असतो त्यावर अवलंबून असतें. साधारणत: रब्बीच्या दिवसांत जितकें पाणी नदीत मिळत असेल तितकें सर्व पाणी जाण्याइतका मोठा कालवा बांधतात, व खरीपाच्या वेळीं त्याच्या दुप्पट पाणी त्यांत सोडतां व उपयोगांत आणतां येईल इतकी जास्ती खोली ठेवलेली असते.

पा ण्या चें प्र मा ण.- कोणत्याहि कालव्यानें किती एकर जमीन भिजेल याचा हिशेब करतांना कालव्यांत दर सेकंदाला जितके घनफूट पाण्याचा प्रवाह वाहात असेल त्यांतल्या दर घनफुटांनें चाळीसपासून पंच्याहत्तर एकर भात जमीन किंवा इतर खरीपाचीं पिकें भिजवितां येतात. किंवा १५० पासून २०० एकर रब्बीचें पीक काढतां येतें. जितकी जमीन दरवर्षी भिजते त्याच्या निदान साधारणत: दुप्पट तरी पडतर असते. पण कांहीं कांहीं ठिकाणीं जितकी भिजावयाजोगी जमीन असेल त्याच्या पाऊणपटीपेक्षांहि जास्ती जमीन कांहीं काहीं गावांतून दरवर्षी कालव्याचें पाणी घेऊन भिजवितात.

का ल व्यां तू न वा ह तू क.- ज्या ठिकाणीं कालव्यांतून माल किंवा माणसें भरून होड्या किंवा नावा चालावयाच्या असतात अशा मोठाल्या शोणभद्र किंवा गंगानदीच्या कालव्यांतून अशा खास नावा चालण्यासाठीं म्हणून दर सेकंदास ४०० पासून ६०० घनफूट इतका प्रवाह सोडतात. याखेरीज शेतीला द्यावयासाठीं लागणारें पाणी तें वेगळेंच. ज्या ठिकाणी कालवा रेताळ जमिनीतून गेलेला असतो अशा ठिकाणीं कधीं कधीं १५।२० मैल लांबीच्या भागांत दर सेकंदांत दोनशें किंवा अडीचशें घनफूट पाणी झिरपून गेलेलें आढळून आलें आहे. मोठमोठ्या कालव्यांची रुंदी बरीच ठेवावी लागते. कारण त्यांतून दोन होड्या एकमेकीच्या बाजूनें निघून जातील इतकी तरी त्याची रुंदी असलीच पाहिजे. त्यांचप्रमाणें मालानें भरलेल्या नावा तरण्यासाठी पाण्याची खोली २॥ फुटांपेक्षां कमी असतां कामा नये. यामुळें पंजाबांतील सतलज कालवा, यमुनेचा कालवा वगैरे कालव्यांतून पाण्याच्या खोलीच्या १३ पासून १५ पट रुंदी ठेविलेली आढळते. कालव्याच्या तळाला जो स्लोप म्हणजे उतार द्यावयाचा तो अशा बेताचा असावा लागतो कीं, कालव्यांत पुरें पाणी सोडलें असतां उतार फार असल्यामुळें त्याचा तळ किंवा बाजू यांची माती पाण्याच्या वेगानें वाहून न जाईल. वेग जास्ती झाल्यास कालव्यावरील पुलांच्या वगैरे पायांनां धक्का लागण्याचें भय असतें. उलट उतार फारच कमी ठेवला तर पाण्याचा वेग फार कमी होतो व त्यामुळें दर सेकंदास जितकें घनफूट पाणी त्या कालव्यांत सोडावयाचें असेल तितकें घनफूट पाणी वाहून जाण्यासाठीं वेग फार कमी असल्यामुळें कालव्याची खोली व रुंदी वाढवावी लागते. खेरीज पाण्याला वेग कमी असला म्हणजे कालव्यांत गाळहि पुष्कळ बसतो. कारण गाळ वाहून जाण्यालाहि पाण्याला ठराविक वेग असावा लागतो. आणि गाळ बसला म्हणजे लव्हाळें वगैरे पाण्यांत उगवणार्या वनस्पतींपासूनहि बराच त्रास होता. खेरीज तळाला स्लोप कमी असला व जमीनीला ढाळ जास्ती असला म्हणजे कालव्याला (त्याचा तळ जमीनीच्या वर येऊं नये म्हणून) दगडी बांधकामाचें धबधबे किंवा धोत बांधून कालव्याचा तळ जमीनीच्या खालीं राहील अशी व्यवस्था करावी लागते. गाळ बसूं नये किंवा लव्हाळें वाढूं नये म्हणून पाण्याचा वेग दर सेकंदास दीड फुटापेक्षां कमी न येईल इतका तरी स्लोप किंवा ढाळ दिला पाहिजे. म्हणून मोठमोठाल्या कालव्यांतून दर मैलाला सहा इंचापेक्षां कमी स्लोप देत नाहींत. कालव्यांतील पाण्याची खोली जसजशी वाढत जाईल तसतसा त्यांतील पाण्याचा वेगहि वाढत जातो आणि कालवा ज्या जमीनींतून काढला असेल ती जमीन रेताळ असली तर दर सेकंदास ३ फुटांपेक्षां पाण्याचा वेग जास्ती असतां उपयोगी नाहीं. याचा अर्थ असा कीं, पाणी कमी असेल त्यावेळेस सेकंदास दीड फुटांपेक्षां पाण्याचा वेग कमी न होईल आणि जास्तींत जास्ती पाणी असतांना सेकंदास तीन फूट यापेक्षां जास्ती वेग न होईल असा तळाचा स्लोप ठेवला पाहिजे. गंगा नदीच्या कालव्याला वरच्या भागांत मैलाला दोन फूटप्रमाणें स्लोप किंवा ढाळ दिलेला आहे,व खालच्या भागांत एक मैलास सवा फूट स्लोप दिलेला आहे. इतका स्लोप दिला असला म्हणजे कालव्यांत पांच फूट खोलीचें पाणी वाहात असलें म्हणजे पाण्याचा वेग माफक राहतो. याचा अर्थ असा कीं गाळाहि बसत नाहीं किंवा जमीन धुऊन जात नाहीं. उलट पक्षीं याच कालव्यांत सहा पासून आठ फूट पाणी सोडले तर वेग वाढून तळ व बाजू यांची माती वाहून जावयास लागते. म्हणून साधारण नियम असा आहे कीं, दर सेकंदास तीन फूट म्हणजे दर तासास दोन मैल यापेक्षां वेग जास्ती न वाढेल इतका स्लोप द्यावा. गंगा नदीच्या खालच्या कालव्यांत मैलाला सहा इंचाचा स्लोप असून त्यांत दहा फूट खोलीचें पाणी सोडलें तर दर सेकंदास पावणेतीन फूट इतका वेग येतो. ज्या ज्या ठिकाणीं कालव्यांतून नावा चालवावयाच्या असतील त्या त्या ठिकाणीं पाण्यापासून कालव्याच्या एका बाजूस तरी एक पासून तीन फूट उंचीवर माणसांनां चालावयासाठीं रस्ता करतात व ह्या रस्त्यावरून नावांनां दोर बांधून त्यांना खेंचून घेऊन जातात. ह्या रस्त्याचीं रुंदी निदान १२ ते १५ फूट ठेवतात आणि पुलाखालून जातांना रुंदी निदान सहा फूट ठेवतात.

कालव्यासाठीं सर्व्हे (पाहणी व मापणी).- ही करतांना लेव्हल्स फार काळजीपूर्वक घ्याव्या लागतात व त्यांत शंभर मैलांत एक फुटापेक्षां जास्ती चूक असतां कामा नयें. वर सांगितलेंच आहे कीं, कालवा काढावयाचा तो दंडावरून (वाटर शेड) काढावा म्हणजे लहान लहान ओढे-नाले ओलांडून जाण्यांत लागणारीं दगडाचीं बांधकामें बांधण्याची फारशी जरूर पडत नाही. जेथें जेथें ओढा किंवा नदी ओलांडून जाण्याचा प्रसंग येईल त्या त्या ठिकाणी त्या ओढयांतून पुराच्या वेळीं जास्तीतजास्त किती पाणी वाहून जात असेल याबद्दलचा बरोबर अंदाज काढावा लागतो. कालवे होतां होईल तों सरळ रेषेंत नेलेले चांगले. जर वळण देणें जरूरच असेल तर वळणाची त्रिज्या मोठी ठेवावी. कालव्याची लांबी मांडतांना जेथून कालवा निघाला असेल त्याच्या माथ्याजवळ जी मोठी भिंत बांधून त्यांत कमानी ठेवून त्या कमानींनां लोखंडाचीं किंवा लांकडी दारें बसविलेली असतात अशी भिंत हेंच कालव्याचें आरंभस्थान समजतात. ही दारें भिंतीच्या माथ्यावर स्क्रू फिरवून वर-खाली करतां येतात, आणि ती बंद केली असतां पाण्याचा थेंबहि त्यांतून न जाईल अशा रीतीनें कमानींच्या बाजूला पितळी चौकटी कमानीना बसविलेल्या असतात. त्या पितळी चौकटींच्या दारांनांहि तशाच प्रकारच्या गुळगुळीत चौकटी बसविलेल्या असतात. त्या बरोबर एकमेकीला लागून त्यांतून एक थेंबहि पाणी न जाईल अशी व्यवस्था केलेली असते. कालव्यांच्या दोन्ही बाजूंस जे भराव करावयाचे असतात ते फार काळजीपूर्वक व मोठ्या जाडीचे करतात, आणि अशा भरावांची माती जर रेताळ असेल तर त्यांच्या मधोमध चर खणून त्यांत चिकण मातीची भिंत घालतात.

जेव्हां जेव्हां कोणत्याहि नदीपासून कालवा काढावयाचा असतो तेव्हां तेव्हां सर्व ॠतूंत कालव्याला मुबलक पाणी मिळावें म्हणून अशा ठिकाणच्या खालच्या बाजूला धरण किंवा बंधारा घालतात त्याच्या योगानें बंधार्याच्या माथ्यापर्यंत पाणी चढवितां येतें. अशा रीतीनें कालव्यांत कमींतकमी पाणी वाहात असतांना बंधार्याच्या माथ्याइतक्या उंचीपर्यंत त्यांत पाणी सोडतां येतें. पुष्कळ ठिकाणीं अशा बंधार्याच्या दोन्ही टोंकाजवळून नदीच्या दोन्ही काठांवरून सारखेच कालवे काढलेले असतात. कारण बंधार्यानें एकदां पाणी आलें म्हणजे तें नदीच्या दोन्ही कांठांजवळ एकाच लेव्हलमध्यें राहतें, आणि म्हणून वाटेल तर एका कांठावरून किंवा जरूर असल्यास दोन्ही कांठावरून दोन कालवे काढतां येतात, आणि अशा रीतीनें प्रत्येक कालव्यास लागणार्या एका धरणाची बचत होते. उन्हाळ्यांत नदींतून जितकें पाणी येत असेल तितकें सर्व पाणी कालव्यांतून सोडून तें जमीनीला पाणी देण्याच्या कामी उपयोगांत आणतात.

द ग ड चु न्या च्या बां ध का मा चे बं धा रे.- अशा बंधार्यांचें बांधकाम टिकाऊ डबरदगड व हॉयड्रॉलिक चुन्याचें असतें, आणि तें (१) दर्शनी बाजूच्या आवरणाचें तोडकाम सुतकीनें टापलेल्या चौरस खांडक्यांचें व आंतल्या बाजूस बिनथरी डबरचुन्याचें, (२) मागील बाजूचें आवरण बिनथरी डबरचुन्याचें व (३) पुरणीचें काम बिनथरी डबरचुन्याचें किंवा कांक्रीटचें असें करतात, दर्शनी आवरण म्हणजे बंधार्याचें बाह्यावरण सरासरी ३ फूट जाडीचें असून त्याचें तोडकाम सुतकीनें टापलेल्या चौरस खांडक्यांच्या थरांचें असावें. खांडक्यांचे तळ व माथे दर्शनी बाजूच्या पातळीशीं काटकोनांत असावे तोंडकामाच्या मागील आवरणाचा भाग थराच्या डबरकामाचा असावा. तोंडकामाचा व मागच्या बाजूच्या कामाचा चांगला मिलाफ असतां मागल्या बाजूच्या दगडांची उंची तोंडाकडील थराबरोबर म्हणजे ७ इंचांपासून १० इंचांपर्यंत असावी, व त्याचे तळ व माथे सांधणींत असावे. पण उभे सांधे ओळंब्यांत नसले तरी चालतील. दगड विशेष न घडतां होईल तितके एकमेकांस ठपून बसवावे. आवरणांतील प्रत्येक दर्शनी थराच्या बाजूस व आंतील रचनेंत सांधमोड झाली पाहिजे. सर्व दगड चुन्यांत बसविण्यापूर्वी चांगले भिजवावे, व मोगणीनें ठोकून एकमेकांस लागून बसवावे. मागच्या बाजूच्या दगडांमध्यें राहिलेल्या पोकळ जागेंत मळलेला चुना घालून त्यांत कपर्या घालून ठोकून बसवाव्या. कपर्या बसविल्या म्हणजे चुना थोडा लागून बांधकामाचें वजन वाढतें. बांधकाम चाललें आहे तोंच दर्शनी बाजूचे सांधे साफ करावे. म्हणजे दरजा भरण्याची आवश्यकता राहणार नाहीं. आवरणांतीं दगडाची मागील बाजू खाणींतून जशी येईल तशीच राहूं द्यावी. म्हणजे तोंडकामाचा किंवा बिनथरी डबरकामाचा किंवा कांक्रीटाचा एकजीव होईल. मागील बाजूच्या आवरणाचें किंवा पुरणीचें काम बिनथरी डबरचुन्याचें करावें. आणि दगडाचे तळ व माथे सांधणींत नसून दगडावर दगड जसे खाणींतून येतील तसे मोगरीनें ठोकून बसवावे. आवरणाचें बांधकाम थोड्या उंचीचें झालें कीं, लागलीच पुरणींतील मांडणी सुरू करावी. व दोहोंच्या मांडणीची एकमेकांत चांगली सांधमोड व्हावी. दोन्ही आवरणांतील थर पाणसळींत असावे.

बं धा र्या चा पा या.- बांधण्याच्या भिंतीचा पाया प्रत्येक ठिकाणी खडक लागेपर्यंत व थोडा खडकांत जाईल अशा बेतानें खणावा. बंधार्यावरून पाणी पडेल अशा बंधार्याच्या भिंतीचा पाया अतिशय खोल खडकापर्यंत नेला पाहिजे व पायाचे थर दर्शनी बाजूच्या उताराच्या पातळीशीं काटकोनांत येण्यासाठीं खडकांत उतार भरून काढला पाहिजे.

बं धा र्यां ती ल कां क्री टा चें का म.- हें कांक्रीट करतांना हॉयड्रॉलिक लाइमच्या मळलेल्या चुन्यांत खडी, लहान दगड, स्वच्छ वाळू अथवा लहान गोटे पाण्यानें भिजवून मिसळून हें मिश्रण फावड्यानें चांगलें एकेठिकाणीं कालवावें. खडी व गोटे, सोईनें कालवतां व धुमस करतां येतील अशा आकाराचे असावे. कांक्रीटांतील सर्व फटी व पोकळ जागा अगदीं बुजून जाऊन हकल्या. धुमसानें ठोकलें असतांहि पातळ चुना पृष्ठभागावर यावा म्हणून मळलेल्या चुन्यांत २ भाग वाळू व १ भाग चुना घालून मळलेल्या चुन्याचे ३ भाग घ्यावे आणि खडी २ भाग, लहान गोटे २ भाग, व मोठे गोटे २ भाग घेऊन त्यांचें मिश्रण तयार केलेल्या जागेवर निदान ७ वेळां खालवर कालवावें, व कांक्रीट तयार झालें म्हणजे, दर्शनी बांधकामाच्या थराच्या जाडीइतका थर १ दिवसाआड घालीत जावा. कांक्रीटच्या बाजूचे बांधकाम चांगलें भिजवून अणकुचीदार काठीनें, आवरणाचा व कांक्रीटांचा एकजीव व्हावा अशासाठीं कोनाकोपर्यांत तें ठेंचून बसवावें. बाहेरचा भाग बांधून एक दिवसाहून अधिक काळ झाला असेल तर त्यांतील दगडाच्या कडा चांगल्या भिजवून त्यांवर पातळ मळलेल्या चुन्याचा गिलावा करावा. म्हणजे त्यास कांक्रीट आवळून धरील. परंतु असें करण्याची बहुधां जरूरी पडत नाहीं. कारण दोन्ही बाजूंच्या आवरणांचें थर बांधले कीं, लागलीच पुरणीचें काम सुरू करतात. बंधार्यांत १ चौरस इंचावर ६० पौंडांपेक्षां अधिक ओझे येण्याचा संभव नसेल अशा ठिकाणीं पुरणींत सर्व ठिकाणी कांक्रीट घालावें.

कांक्रीट तयार करतांना त्यांत न मिसळतां येतील असे मोठे दगड अथवा मुंडे कांक्रीट पसरतांना त्यांत घालावें. हे घातल्यानें निरनिराळे थर आवळून बसतात, मळलेला चुना कमी लागतो व बंधार्याचें वजन अधिक होतें. असे दगड कांक्रीटाच्या घनफळाचा एकतृतीयांश असावेंत. ते कांक्रीटाच्या पुरणींत घालण्यापूर्वी व त्याभोवतीं कांक्रीट पसरण्यापूर्वी पाण्यानें भिजवावे. बांधकाम व कांक्रीटांतील चुना पाणी शिंपडण्याइतका आळल्याबरोबर त्यावर पाणी घालून तो नेहमीं ओला ठेवीत जावा. वर सांगितलेल्या कांक्रीटासाठीं व बांधकामासाठी फार काळजीनें मळलेला चुना वापरला पाहिजे. तो तयार करतांना घाणीत चांगला भाजलेला हायड्रालिक चुना सारका पसरून त्यावर पाणी शिंपडावें. परंतु चुना पाण्यांत बुडेल इतकें पाणी घालूं नये. एका तासांत तो चांगला भिजवावा, व त्यानंतर १ तास लोटल्यावर तो खालवर करून त्यांतील न विरलेले खडे काढून टाकून पुन्हां पाणी घालून दोन तास तसाच राहूं द्यावा. म्हणजे चुना एकंदर ४ तास पाण्यांत राहावा. नंतर तो घाणींत ३ तास मळून बारीक करावा; घट्ट झाल्यास थोडें पाणी घालावें. नंतर स्वच्छ व बारीक भिजलेली वाळू चुना चांगला होईल अशा प्रमाणानें चुन्यांत घालावी. बहुतकरून १ भाग चुना व २ भाग वाळू यांचा मळलेला चुना चांगला होतो. जुना व वाळू घाणींत घालून हें मिश्रण चांगलें २ तास मळावें, चुना मळण्यास एकंदर ५ तास लागतात.

पा टा सं बं धी पू ल व मो र्यां चें बां ध का म, ड ब र चु न्या चें बी न थ री बां ध का म.- हे बांधकाम बिनथरी डबरचुन्याचें असतें. दगड कठिण असून प्रत्येक दर्शनी दगड निदान पाऊण घनफूट असला पाहिजे. बांधकामांत दगड चुन्यांत लपेटून बसवावे, व त्यांचे तळ बहुतेक समांतर असले पाहिजेत. सांध्यांत दर्शनी बाजूपासून निदान ३ इंच कळाशी असावी, व एकमेकांजवळ असणार्या दोन दगडांचे दुमाले सारखे नसावे. दगडांच्या तळाशीं काचळा असूं नयेत, परंतु बाजूच्या सांध्याच्या फटीत मात्र चुना फारसा लागूं नये म्हणून काचळा घालाव्या. सर्व बांधकामाच्या रचनेंत ६ इंचाची सांधमोड व्हावी. बांधकामांत बसविण्यापूर्वी सर्व दगड चांगले भिजवावे व खालच्या थरावर वरचा थर येईपर्यंत खालचा थर ओला ठेवावा.

क मा न का म.- ज्या पुलावरून पाट जातो त्या पुलाच्या कमानीच्या तोंडच्या दगडांचे व पलखांचे तळ कमानीच्या आंतल्या वर्तुळखंडाच्या वळणांत असावे, व त्यांच्या बाजूंच्या सांध्यांत व मागील टोंकाशीं रचनेंत सांधमोड व्हावी.

कमानीच्या तोंडच्या दगडांची आणि पलखांची लांबी किंवा दुमाला तिच्या जाडीच्या अर्ध्याहून कमी नसावा. चावीचे दगड खेरीज करून पलखांचे व तोंडच्या दगडांचे माथे कमानी व मच्छ यांच्यामधील पुरणींत शिरावे, परंतु कमानीच्या मध्यांतील तोंडचे दगड व त्याजवळच्या पलखा फार काळजीनें घालून त्यांची जाडी कमानीच्या जाडीहून अधिक असल्यास त्या घडून माथ्याबरोबर कराव्या. म्हणजे पाणी जाण्याच्या मार्गांत कांही अडथळा राहणार नाहीं. कमानीच्या तोंडाचे दगड फक्त तळांत व सांध्यांत घडलेले असावे व एका आड एक दगडाची वरील पुरणीच्या भिंतीशी (स्पँड्रील) सांधमोड व्हावी. वर पुरणींसाठीं करावयाचें कांक्रीट २ भाग खडी, १ भाग लहान गोटे, १ भाग जाडी वाळू व एक भाग चुन्याची फक्की यांचे करावें. चुना विरवून त्यांत बारीक वाळू घालून अजमासें ७ तास घाणींत मळल्यावर तो मळलेला चुना भिजविलेली खडी, लहान गोटे, यांच्या मिश्रणांत घालून चांगला कालवावा. कांक्रीट ताजे आहे तोंच त्याचा उपयोग करावा, आणि ९ इंचाचे थर घालून त्यावर धुमस करावा. सिमेंटच्या दरजा करणें झाल्यास बांधकामाच्या सांध्यांतला चुना १ इंच खोलीपर्यंत खरडून काढून सिमेंटांत समभाग स्वच्छ रेती घालून साधारण घट्ट करून तें आळूं लागण्याच्या अगोदर दरजा भरण्यास वापरावें, म्हणजे सांध्यांतून पाणी गळणार नाहीं.

ज्यावरून पाट जातो अशा मोर्यांच्या छावण्या सारख्या ६ इंच जाडीच्या असून त्यांच्या प्रत्येक भिंतीवर टेकणार्या बाजूची लांबी ६ इंचापेक्षां कमी नसावी. दोन्ही तोंडाकडील छावण्यांचा, प्रत्येक बाजूस भिंतीवर टेकणार्या लांबीची भाग ८ इंचांपेक्षां कमी नसावा. छावण्यांचा दर्शनी भाग सडकीय असून मधल्या छावण्या सुतकीनें साधारण टापलेल्या असाव्या. छावण्यामधील सांधे मळलेला चुना व कपर्यांनी भरून टाकावे. म्हणजे सर्व छावण्या व बांधकाम आवळलें जाईल.

पा टा च्या कि ना र्या चे भ रा व.- हे भराव करतांना ६ इंच जाडीचे थर घालावे. प्रत्येक थरावर पाणी घालून तो ठोकून बसविला म्हणजे दुसरा थर घालावा. कालव्याच्या खोदाईच्या बाजूस उतार मातींत दिडास एक; मऊ मुरमांत एकास एक; कठिण मुरमांत अर्ध्यास एक; व खडकांत एक चतुर्थांशास एक किंवा लंबरेषेंत ठेवावा.

कालव्याचा तळ दर्शविणारे दगड व भरावाच्या माथ्यावरील दगड प्रत्येक एक हजार फुटावर पुरून त्यावर ओळीनें नंबर घालावे. तळ दाखविणार्या दगडाचा माथा कालव्याच्या तळाच्या सांधणींत असावा. प्रत्येक मैलावर व पाव मैलावर दगड हद्दीच्या कुंपणाच्या जवळ पुरावे व त्यांच्या माथ्यावर टाकीनें वेंचमार्काच्या खुणा कराव्या. भरावाच्या उताराच्या संरक्षणार्थ पाहिजे असतील अशा जाडीचे पिचिंगचे दगड मुरुमांत ठोकून बसवावे. त्यांची रुंदी बाजू खाली असावी.

बं धा रे.- कोणत्या ठिकाणीं नदीला बंधारा घालून शेतीला पाणी देतां येईल हें स्थूलमानानें १ इंचास १ मैल ह्या प्रमाणांत काढलेलें ट्रिग्नामेट्रिकल सर्व्हेचे टोपोग्राफिकल सर्व्हे शीट्स ह्यांवरून ठरवितां येतें. परंतु सर्व्हे म्हणजे पाहाणी व मापणी सुरू करावयाच्या पूर्वी त्या सर्व प्रदेशाची स्थूलमानानें पाहाणी करून त्यावरून ठोकळ अंदाज करतां येतो. ह्या स्थूल पाहाणीमध्यें ज्या जमीनीला पाणी द्यावयाचें ती कोणत्या जातीची आहे व तिच्यांत पिकें कोणत्या प्रकारचीं निघतात, लोकवस्ती किती आहे, कालवा नेणें तो कोणीकडून कसा न्यावा व तो बांधतांना अडचणी कोठें कोठें कशा प्रकारच्या येतील व सामान आणि माल नेण्याआणण्यास रस्त्यांची वगैरे कशी काय सोय आहे हें सर्व पाहावें लागतें.

पाटाच्या पाण्यानें भिजावयाजोगी नीच जमीन जर 'अ' असली तर त्यांपैकी ४/५ भाग मशागत करावयाजोगा असेल असें गृहीत धरतात. आणि ३/१० 'अ' इतके एकर पाटाच्या पाण्यानें हमेष भिजविले जातील असें हिशेबांत धरून दर १०० एकरास दर सेकंदास १ घनफूट पाणी कालव्याच्या मुखापाशीं सोडलें पाहिजे असें कल्पून साठ हजार 'अ' इतकें घनफूट पाणी दर वर्षास कालव्यांत सोडावयास लागेल व तितकें तरी पाणी तलावांत कालव्याच्या तळाच्या वर सांठवून ठेविलें पाहिजे असा अंदाज करतात. खेरीज उन्हानें सुकून जाणारें व बाजूच्या जमीनींत झिरपून जाणारें पाणी वेगळेंच. ह्या सर्व कामाला ४० 'अ' ते ८० 'अ' पर्यंत साधारणत: खर्च येतो. ज्या नदीवर धरण बांधावयाचें त्या नदीचा प्रवाह रोजच्या रोज मापें घेऊन किती असतो हें नमूद केलें असतां पाणी किती दिवस टिकेल ह्याची कल्पना करतां येते.

बाराहि मास वाहाणार्या नद्यांच्या प्रवाहाच्या मापण्या (गेजिंग) घेतां असें आढलून आलें आहे कीं, दुष्काळाच्या वर्षी त्यांतला प्रवाह नेहमींच्या सरासरी प्रवाहाच्या निम्यानें असतो. आणि म्हणून अशा वर्षी नेहमींच्या निम्म्याइतकीच जमीन भिजवितां येते आणि ही गोष्ट पाणीपट्टीचा वसूल किती येईल याचा अंदाज करतांना विचारांत घेतली पाहिजे. अशा कामाची पाहाणी करतेवेळेस जें लेव्हलिंग करावयाचें त्याची आरंभीची बेंचमार्क समुद्राच्या मध्यम सपाटीपासून किती उंच आहे हें काढावें लागतें आणि अशा रीतीनें कामाची सर्व लेव्हलें समुद्रसपाटीच्या किती वर आहेत हें समजतें. बंधार्यासाठीं जागा ठरवितांना जी सर्व्हे करावी लागते तींत नदीच्या दरींतून वरवर लेव्हल्स घेत जातात व दर मैलावर किंवा २ मैलांवर नदीच्या दरीचे आडवे छेद घेतात आणि त्या आडव्या छेदांच्या वरच्या बाजूच्या टोंकांजवळ बेंचमार्कस्चे खुंट उभे करतात किंवा बांधतात आणि त्या आडव्या छेदांवरून बंधारा घालावयास कोणती जागा योग्य आहे हे स्थूलमानानें ठरवितात. अशा जागा ठरल्यानंतर कांटुर्स म्हणजे समस्थितपातळीच्या रेषा लेव्हलिंगच्या योगानें काढून बांधलेल्या तलावांत जमिनीचा किती भाग बुडेल व त्यांत वेगवेगळ्या खोलीचें पाणी असतांना किती घनफूट पाणी राहील हें काढतात. बंधार्याला पाया वगैरे कोठें चांगला लागतो ह्या दृष्टीनें ज्या ज्या जागा इष्ट असतील त्या त्या जागीं सूक्ष्मरीतीनें पाहाणी व मापणी करतात आणि हजार हजार फुटांवर व पायांतील जमीन योग्य असल्यास पांचपांचशें फुटांवर किंवा त्याहिपेक्षां जवळ जवळ ट्रायल पिट्स म्हणजे पायाची तपासणी करण्यासाठीं खड्डे घेतात. बंधारा घातल्यानंतर पुराचें पाणी त्यावरून वाहून जाऊं नये म्हणून त्याच्या जवळपासच जो वेस्ट वेअर म्हणजे सांडपाण्यासाठी धक्का बांधावा लागतो तो बांधावयाच्या जागीं व त्याच्या वर आणि खालींहि खड्डे खोदून खडक किती खोलीवर आहे हें पहावें लागतें; कारण त्याच्या खालच्या जमिनीवरून पुराचें सर्व पाणी वाहून जावयाचें असतें. हे सर्व वर सांगितलेले ट्रायल पिट्स किंवा खड्डे खडकापर्यंत खणून खडक चांगला मजबूत आहे कीं नाहीं, हें पहाण्यासाठी १० फूट खोलीची बोअरिंग्ज् खडकांत घेतात. बंधारा बांधून तलावांत पाणी किती उंचीपर्यंत राहूं द्यावयाचें हें ठरवून त्याच लेव्हलला वेस्ट वेअर बांधण्याचा हें नक्कीं करतात आणि तलावात कोणकोणत्या प्रकारची किती जमीन जात आहे. तसेंच त्यावर सरकारी सारा किती चढला आहे व पिकें कोणतीं होतात, तसेंच कोणतीं खेडेगांवे आणि कितीं घरे बुडतांत व त्यांची साधारणत: किती किंमत आहे हें टिपून ठेवतात. तसेंच लोकवस्ती किती उठवावी लागेल याचीहि नोंद करून ठेवतात आणि त्यावरून लोकांनां नुकसानी दाखल किती पैसे द्यावे लागतील याचा अजमास करून कालवा केला असतां किती नफा होईल याचा कयास करतां येतो. बंधारा बांधल्यानंतर तलावापासून कालव्याच्या मुखाजवळ बांधावयाच्या मोर्या कोठें करावयाच्या तें ठरवून तेथून कालवा कसा न्यावा लागेल याचा अजमास करण्याकरतां मैलास ८ ते २४ इंच उतार असलेली लाईन कोणत्या दिशेनें व कशी जाईल हें लेव्हलिंग करून शोधून काढतात. असा कालवा, पाणी किती जमिनीला देतां यावयाजोगें आपल्या जवळ आहे याचा हिशोब करून तितकी जमीन पाटाखालीं भिजेल तेथपर्यंत त्याची मापणी करतात. अशा प्राथमिक पाहाणीच्या वेळीं मध्येंच उंच किंवा फार उतार असलेली जमीन किंवा मोठे ओढे नाले लागत असल्यास त्यावरून पूल वगैरे करण्यास वेगवेगळ्या दोन तीन जागा असल्या तर अशा वेगवेगळ्या आदळून बदलून करतां यावयाजोग्या कालव्यांच्या मध्यरेषांची स्थूल मापणी करून त्यावरून सर्वात जी चांगली ठरेल ती रेषा शेवटच्या मापणीच्या वेळीं घेतात. दुसरी म्हणजे पक्की मापणी करतांना होतां होईल तितक्या सरळ रेषा घेतात. त्या अशा बेतानें कीं, त्यांत खोदाणहि फार करावें लागू नये. तसेंच भरावहि फार उंचीचा करावा लागूं नये, वळणें देणें ती १२० अंशांपेक्षां जास्ती कोनाचीं असावींत. ती काटकोन किंवा त्यापेक्षां लहान कोनाची असतां कामा नयेत. या सर्व्हेमध्यें दर एक मैलावर बेंचमार्क ठेवाव्या आणि तितक्याच अंतरावर किंवा जरूर पडेल तर जवळ जवळ आडवे छेद घ्यावे. आपण कोणत्या प्रकारच्या जमिनीवरून जात आहों याची नोंद करून ठेवावी. तसेंच कालव्याच्या मध्यरेषेवर दर मैलांत निदान ८ तरी ट्रायल पिट्चे खड्डे बांधावयाच्या कालव्याच्या तळापर्यंत खोल घेऊन त्यांचे छेद नमूद करून ठेवावेत. असेच खड्डे घेणें ते ज्या ज्या ठिकाणीं पूल किंवा मोर्या बांधाव्या लागतील अशा सर्व ठिकाणीं पाया किती खोलीवर लागतो हे पहाण्यासाठी घ्यावें. हें  सर्व काम चालत असतां दुसर्या एका मनुष्यानें कालव्याच्या मुखापासून त्याच्या शेवटच्या टोंकापर्यंत मधल्या बेंचमार्क जोडींत लेव्हल्स घेऊन जी पहिली सर्व्हे (मापणी) झाली आहे त्यांतील लेव्हल्स बरोबर आहेत किंवा नाहींत याबद्दल खात्री करून घेणें अवश्य असतें. अशी पाहाणी व मापणी, मुख्य कालवा व त्याच्या शाखा, ह्यांची जमिनीवर बरोबर आंखणी करून व्यवस्थित रीतीनें केली म्हणजेच कामाचा खराच अंदाज करतां येतो.

बं धा र्या चे न का शे.- बंधारा व कालवा आणि त्याच्या शाखा हे सर्व दाखविणारा ४ मैलांस १ इंच ह्या स्केलचा निर्देशक नकाशा:- बंधारा व त्याच्या योगानें बनलेला तलाव व त्यांत जेवढ्या क्षेत्रावरून पावसाचें पाणी वाहून येत असेंल त्या सर्व क्षेत्राचा एक मैलास एक इंच या स्केलनें काढलेला नकाशा. कालवा व त्याच्या शाखा आणि त्याखालीं जेवढी जमीन भिजावयाजोगी असेल त्या सर्व क्षेत्राचा नकाशा. हाहि १ मैलास १ इंच या प्रमाणांत काढतात; ह्याच प्रमाणांत काढलेला जेवढी जमीन भिजावयाजोगीं असेल तेवढी सर्व जमीन व ती कोणकोणत्या प्रकारची आहे हें दाखविणारा नकाशा ६६० फुटास १ इंच अथवा मैलास ८ इंच या प्रमाणांत काढलेले गांवांचे नकाशे, ह्यांत वेगवेगळ्या गावांच्या हद्दींतील कोणकोणते सर्व्हेनंबर बुडणार हें दाखविलेलें असतें. ह्या खेरीज बंधारा अथवा धरण दाखविणारे प्लॅन व लांजी टयुडिनल सेक्शन दाखविणारे नकाशे हे ४०० फुटांस १ इंच या प्रमाणांत अंतरे दाखवितात. परंतु छेदापैकीं उंची दाखविण्याचें प्रमाण २० फुटांस १ इंच असें असतें. दगडी बांधकामाचें धरण, तसेंच पुराचें पाणी वाहून जाण्यासाठीं बांधावी लागणारी सांड (वेस्ट वेअर) याचा सविस्तर तपशील दाखविणारे नकाशे हें १० फुटास १ इंच या प्रमाणांत काढतात व त्यांतच पाण्याच्या धक्क्यानें बंधार्याची भिंत उलथून पडणार नाहीं वगैरे दाखविणार्या आकृती (डायग्रॉम) काढतात. अशाच प्रकारचें व त्याच स्केलावर काढलेले कालव्यात पाणी सोडण्यासाठीं बांधाव्या लागणार्या मोर्यांचें (हेड्वर्क्स) तसेंच त्यांत पाणी जावें. म्हणून बांधावे लागणारे बंधारे (पिकअप् वेअर) यांचे तपशीलवार नकाशे तयार करावे लागतात. कालव्याचे नकाशे बहुधा ६६० फुटांत १ इंच या प्रमाणांत काढतात आणि त्यांत कोणकोणत्या सर्व्हे नंबरांतून कसकसा कालवा जातो हें दाखवितात. कालव्याचा पथकच्छेद (लाँजिटयुडीनल सेक्शन) हा अंतरे दाखविण्यासाठीं ४००० फुटास १ इंच या प्रमाणांत काढतात. परंतु त्यांतील उंचीचें स्केल २० फुटांस १ इंच एवढें ठेवतात. याखेरीज कालव्याचें तपशीलवार प्लॅन व लाँजिटयूडिनल सेक्शन ४०० फुटांस १ इंच या प्रमाणांत काढतात. परंतु उंचीचे स्केल मात्र २० फुटांस १ इंचच ठेवतात. याखेरीज कालव्याचे आडवे छेद व नाल्यांचे छेद हे सर्व २० फुटांस १ इंच या प्रमाणांत काढून त्यावरून अंदाजपत्रकें तयार करतात. याशिवाय ओढ्या-नाल्यावरून कालवा जाण्यासाठीं बांधावे लागणारे जलवाहक पूल (आक्वेडक्ट) तसेंच कालव्यावरून रस्ते नेण्यासाठीं किंवा आडवें वाहून येणारें पाणी काढून टाकण्यासाठीं बांधावे लागणारे पूल, तसेंच कालव्यांत जास्ती पाणी आल्याकारणानें कालवा फुटून नुकसान होऊं नये म्हणून बांधावे लागणारे सांड (एस्केप्स) व कालव्यांतून वाहून जाणारें पाणी वाटेल तेव्हां वाटेल तितकें सोडतां यावें म्हणून बांधावे लागणारे नियामक (रेग्युलेटर) म्हणजे वाटेल तेव्हां अंशत: अथवा पूर्णपणें पाणी वाहण्याचें बंद करण्याची योजना या सर्वांचे तपशीलवार नकाशे १० फुटांस १ इंच या प्रमाणांत काढतात. कांहीं कांही ठिकाणीं पाणी अडविण्याचा बंधारा किंवा धरण डोंगरांत बांधून पाणी द्यावयाजोगी जमीन बर्याच अंतरावर खालीं असली म्हणजे दुसरा लहान बंधारा बांधून त्याच्या साहाय्यानें कालव्यांत पाणी चढेल अशी व्यवस्था करताच व अशा दोन्ही बंधार्यानें तपशीलवार नकाशे व अंदाजपत्रकें तयार करतात. अशा मोठ्या बंधार्यांचा किंवा धरणांचा पाया तळास खडक लागला असला तरी त्यांत ५ ते १० फूट खोलीपर्यंत दगड फोडून काढून नव्या दगडाच्या बांधकामानें भरून काढतात कारण कधीं कधीं खडकांतून मोठामोठाल्या भेगा आढळून येतात. आणि अशा भेगा पायांत राहणें इष्ट नसतें.

बंधारा फार उंचीचा असल्यास तो दगडाचाच बांधावा लागतो. परंतु तो कमी उंचीचा असल्यास मातीचा बांधला तरी चालतो. असा बंधारा बांधतांनाहि खालीं लागणाऱ्या खडकांत निदान फूट दोन फूट तरी चर खोदून त्यांत चुन्याचें कांक्रीट किंवा चिकणमातीची भिंत बांधून बंधाऱ्याच्या मधोमध ती भिंत एका कांठापासून दुसऱ्या काठांपर्यंत, पुराच्या वेळीं जितक्या उंचीपर्यंत तलावांत पाणी चढण्याचा संभव असेल त्याच्या वरपर्यंत बांधली म्हणजे तलावांतील पाणी झिरपून जाण्याचा संभव रहात नाहीं. खेरीज हा मातीचा बांध करतांना तळाशीं खारी  माती किंवा शाडू आणि झाडाच्या मुळ्या, गवत किंवा पानें सांपडल्यास ती सर्व काढून टाकून पायापासून चांगल्या मातीनें बंधारा बांधीत आणला पाहिजे. तसेंच बंधाऱ्याच्या मध्यरेषेपासून खालच्या बाजूला जें थोडेंफार पाणी झिरपून येईल तें सर्व काढून टाकण्यासाठी सुक्या डबराच्या मोऱ्या थोडथोडें अंतर टाकून बांधून आणाव्या. कालव्यापासून शेतापर्यंत करावे लागणारे लहान पाट वगैरेंचा खर्च सर्व क्षेत्रांतील जमिनीच्या दर एकरामागें १ ते ४ रुपये प्रमाणें येतो.

वर पाटानें भिजण्याजोगी जमीन कोणकोणत्या प्रकारची आहे हें दाखविणारे नकाशे करतात असें सांगितलेंच आहे. त्या नकाशास वेगवेगळ्या प्रकारचे रंग देतात. हे रंग देतांना प्रत्येक गांवांतील प्रत्येक सर्व्हेनंबरास काय आणेवारी लाविली आहे हें रेव्हेन्यूसर्व्हेच्या दप्तरांतून काढून त्याप्रमाणें प्रत्येक सर्व्हेनंबरास त्याच्या आणेवारीला अनुरून असा रंग देतात. या रंगाच्या ४ प्रकारांपैकीं १ ला प्रकार म्हणजे १० ते १६ आणे लागलेला म्हणजेच सर्वांत अतिशय सुपीक जमीन असेल अशा नंबरांचा २ रा प्रकार म्हणजे ५ ते १० आणे अशी योग्यता लागलेले चांगल्या जमिनीचे नंबर, कीं ज्यांत पाटाचें पाणी देण्यानें पुष्कळच फायदा होईल असें; ३ रा प्रकार म्हणजे ५ आणेपर्यंत नंबर लागलेल्या जमिनी, कीं ज्यांनां पाणी दिलें असतां त्यांत पुष्कळ सुधारणा होईल अशा; आणि ४ था प्रकार म्हणजे नापीक जमीन, माळरान किंवा फारेस्ट रिझर्व्ह पैकीं. याखेरीज बऱ्याच नंबरांतून खराबा म्हणजे निरुपयोगी म्हणून जे भाग सोडलेले असतात ते वेगळ्या रीतीनें दाखवितात. जेथून कालव्याची रेषा जात असेल तेथून अर्धा मैल, एक मैल आणि २ मैल अंतरावर असणाऱ्या दोनहि बाजूंच्या विहिरीनां कालवा करावयाच्या पूर्वी पाणी किती होतें यांची नोंद करून ठेवतात आणि कालवा बांधल्यानंतर याच विहिरीच्या पाण्याची पातळी कशी काय बदलतें हें पहातात. तसेंच ज्या ठिकाणीं तलाव बांधावयाचा असेल त्यावर पाऊस किती पडतो याची नोंद पाऊस मापण्याचें गेज बसवून सर्व ठिकाणीं ठेवतात.

ज्या नदीवर धरण बांधणें असेल त्या नदीचा प्रवाह रोज सकाळचे ६ वाजतां व संध्याकाळचे ६ वाजतां मापण्याची व्यवस्था करावी. हें प्रवाहमापन जेथें पाणी सांठविण्यासाठीं बंधारा बांधावयाचा असेल अशा ठिकाणीं आणि या बंधाऱ्यापासून कांही मैल अंतरावर दुसरें धरण बांधून कालवा काढणें असेल अशा ठिकाणीहि प्रवाहमापन कांहीं वर्षेपर्यंत करतात आणि यावरून बिन पावसाळ्याच्या दिवसांतहि रोज पाणी किती मिळेल याची कल्पना करतां येते.

महाराष्ट्रांत साध्या मातींत कालवा खोदलेला असेल तर त्याच्या बाजूना दिडास १ एवढा स्लोप देतात. मऊ मुरमाड जमीन असेल तर तींत एकास १; कठिण मुरुम असेल तर अर्ध्यास १; व खडकांत ३ इंचास १ फूट अथवा कधीं कधीं अगदीं उभे काठ करतात. कालव्याच्या तळाशीं दर एक फर्लांगावर ६ X ६ X १२ इंच मापाचे दगड कालव्याचा खरा तळ कोणत्या लेव्हलवर आहे हें दाखविण्यासाठीं बसवितात. या दगडाचा ६ X ६ इंच माथा बरोबर साफ घडून इच्छित लेव्हलमध्यें बसविलेला असतो. कालव्याची लांबी दाखविण्यासाठीं मैलाचे व फर्लांगाचे दगड तपासणीसाठीं जो रस्ता केलेला असतो त्याच्या बाहेरील धारेवर बसवितात हे फर्लांगाचे दगड ६ X ६ X १८ इंच असून ते माथ्याजवळ ६ इंच घडलेले असतात. या दगडाच्या माथ्यावर मैलाचा आंकडा खोदतात व बाजूंवर फर्लांगाचा आंकडा खोदतात. कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या भरावांतून पाणी झिरपून जाऊं नये म्हणून त्यांचा मध्यभाग तांबड्या किंवा भुरकट मातीचा करतात किंवा काळी माती आणि मुरुम अथवा रेती यांच्या मिश्रणाचा बनवून वरून मुरमाचें आस्तरण देतात. भरावाच्या गर्भांतील तांबडी किंवा काळी माती कालव्यांत जितक्या उंचीपर्यंत पाणी चढणार असेल त्याच्यापेक्षां निदान २ फूट तरी उंच ठेवून माथ्याजवळील रुंदी ३ फूट ठेवतात. आणि बाजूचा स्लोप १ फुटास १ फूट ठेवून त्याच्यावरून मुरमाचें आस्तरण करून भरावाचा माथा पाण्याच्या वर २ ते ४ फूट उंच व माथ्यापाशीं २ ते ४ फूट रुंद इतका करून दोन्ही बाजूंचे स्लोप १॥ स एक असे साधारणत: ठेवतात, परंतु कालव्यांत ६ फुटांपेक्षां जास्ती पाणी वाहणार असल्यास बाहेरील बाजूंचा स्लोप २ फुटांस १ फूट ठेवतात. ज्या ठिकाणीं कालवा अर्ध्या खोदारांतून व अर्ध्या भरावांतून जात असेल अशा ठिकाणी खोदाईच्या वरच्या धारेपासून २ ते ५ फूट रुंदीचा पट सोडून भरावाची खालची धार येईल अशी व्यवस्था करतात. कालव्याच्या एका काठांवरून तपासणींसाठीं रस्ता करतात आणि या रस्त्यावरून बाहेरील बाजूस उतरण्यासाठीं जागोजाग उतार करून ठेवतात.

मा ती चा बं धा रा.- मातीचा बंधारा बांधतांना त्यांतून पाणी झिरपून जाऊं नये म्हणून जी चिकण मातीची भिंत बंधाऱ्याच्या मधोमध बांधतात तिची रुंदी बंधाऱ्याच्या उंचीच्या दशांशापेक्षां ३ फुटांनीं जास्त रुंदीची असावी व ती तळाच्या खडकांत निदान २ फूट तरी जाईल इतकी खोल नेऊन तिचा माथा, तलावांत जितकें पाणी सांठणार असेल त्याच्यावर २ फूट असावा. या भिंतीची रुंदी दोन्ही थडी पाशीं कमी करीत करीत सहा फूट ठेवतात. अशा चिकणमातीच्या भिंतीच्या ऐवजीं प्रत्यक्ष नदीच्या पात्रांत मात्र कांक्रीटची भिंत खडकांत २ फूट जाईल इतकी खालपर्यंत नेतात आणि तिची रुंदी निदान ५ फूट तरी ठेवतात. बंधाऱ्याचा भराव करावयाचा तो मधील बाजूस चिकणमातीचा, पाणी न झिरपूं देणारा असा व पुढील व मागील बाजूस माती व मुरुम यांच्या मिश्रणांचा करतात. भराव करतांना ५ ते ६ इंचांचे थर घालून त्यांवर रूळ फिरवून दाबून ४ इंच करतात. जर वाफेचा जड रूळ वापरणें असेल तर दर एक थर टाकतांना भरावाच्या दोन्ही धारा मध्यापेक्षां ३ ते ६ इंच उंच राहतील अशा बेतानें खोलगट थर टाकतात. दगडाचे अगर बिडाचे रूळ फिरविणेंचे ते रुळाच्या दर एक फूट लांबीत पाऊण ते अर्धा टन वजनांत भरतील असे असावे. ज्या ठिकाणीं रूळ फिरविण्याची सोय नसेल अशा ठिकाणीं ३ इंच जाडीचे थर घालून ते धुमसानें ठोकतात. भराव जरी रुळानें दाबून बसविला तरी सुद्धां तो एकदोन पावळ्यानंतर थोडा फार दबतोच आणि हें दबण्याचें प्रमाण फुटास अर्धा इंच अथवा २४ फुटांत १ फूट इतकें धरून भराव करतात. भरावाच्या बाहेरच्या स्लोपावर हरळी  किंवा दुसरें गवत उगवावें असा हेतु असेल तेव्हां नुसत्या मुरमाच्या ऐवजीं माती मिसळलेला मुरुम वरच्या बाजूस वापरतात.

मातीच्या भराव करतांना पाण्याकडील बाजूंस ३ फुटांस १ फूट इतका स्लोप तळापासून तों जास्तीत जास्ती पुराच्या वेळीं पाणी किती उंच चढेल तितक्या उंचीपर्यंत देतात आणि भरावाच्या बाहेरील बाजूचा स्लोप २ फुटांस १ फूट इतका तळापासून माथ्यापर्यंत देतात. भरावाची उंची जर ४० फुटांपर्यंत असली तर भरावाची माथ्याजवळील रुंदी ६ फूट आणि माथा पुराच्या लेव्हलच्या वर ६ फूट ठेवतात. भराव ४० ते ६० फूट उंचीचा असल्यास रुंदी ७ फूट व उंचीहि ७ फूट ठेवतात. भराव ६० ते ८० फूट उंचीचा असल्यास माथ्याची रुंदी ८ फूट व उंची ७ फूट ठेवतात. परंतु भराव जर ८० फूटांपेक्षां जास्ती उंच असला तर भरावाच्या माथ्याची रूंदी १० ते १२ फूट ठेवतात, आणि माथा महापुराच्या रेषेवर ८ ते १० फूट ठेवतात.

ज्या ठिकाणीं चिकर माती मिळत नसेल अशा ठिकाणी भरावाच्या मधोमध चिकण मातीचा भराव करून पाण्याच्या बाजूला साधारण चिकण मातीचा भराव करून बाहेरील सर्व बाजू डबर, चिपा, गोटे किंवा रेताळ माती घालून भरून काढतात, वरच्या बाजूनें मुरमाचें जें आस्तरण घालतात तें पुराच्या लेव्हलस्लोपाच्या काटकोनांत निदान ३ फूट जाडीचें असावें आणि तळापर्यंत २० फुटांस १ फूट ह्याप्रमाणें त्याची जाडी वाढवीत जावी. वर चिकण मातीची जी भिंत (पडल वॉल), त्या भिंतीच्या बाहेरील बाजूस परंतु तिला समांतर असें गोट्यांनी व डबरानें भरलेलें गटार करतात आणि त्याच्या काटकोनांत त्याच जातीचीं लहान लहान (२ X २) गटारें सुमारें ५०-५० फूट अंतरावर बांधून व त्यांनां १०० फुटांत १ फूट येवढा स्लोप देऊन झिरपणाचें पाणी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस बांधलेल्या ३ फूट खोलीच्या गटारांत नेऊन सोडतात.

जेव्हां वाफेचा रूळ फिरवून भराव कठिण करतात तेव्हा १२ इंच जाडीचे थर घातले तरीहि चालतात आणि अशा ५ फूट रुंदीच्या व ८ टन वजनाच्या रुळाच्या योगानें २० ते २५ हजार घनफूट माती प्रत्येक पट्टीवरून ४ वेळा रूळ फिरवून दाबून काढतां येते. हेंच काम करण्यास बैलांनीं खेंचले जाणारे ३ ते ४ रूळ लागतात. मुंबई इलाख्यांत जे मातीचे भराव घालून तलाव बनविलेले आहेत त्यांच्या बांधांतून किंवा भरावांतून पाणी हळू हळू झिरपत असतें व त्या झिरपण्याचा स्लोप साधारणत: ४ फुटांस १ फूट ह्या प्रमाणांत आढळून येतो ह्या स्लोपाचें वरचें टोंक म्हणजे तलावांत जितक्या उंचीपर्यंत पुराच्या वेळीं पाणी चढतें त्या लेव्हलपाशीं घ्यावयाचें. अशी रेषा काढली असतां जर ती भरावाच्या बाहेरच्या स्लोपाच्या वर कोठेंहि येत असेल तर अशा ठिकाणीं १५ फूट रुंदीचे बर्म अथवा पट्टी जोडून सर्व भरावाची रुंदीच तितक्या फुटांनी वाढवितात. ही जी ४ फुटांस १ फूट ह्या स्लोपाची ओलीची रेषा (लाईन ऑप स्यॉचुरेशन) सांगितली त्या रेषेवर प्रत्येक ठिकाणीं ८ फुटांपेक्षा जास्ती उंचीचा भार असला तरच भरावाच्या बाहेरील बाजू सुरक्षित राहते.  असें नसलें तर भरावाच्या खालच्या टोंकांजवळील भाग ओला होऊन ढासळूं लागतो.

तलावाच्या आंतील बाजूस जे पिचिंग करावयाचें तें मातीच्या स्लोपावर ६ इंच जाडीची खडी अथवा सुमारें २॥ इंच व्यासाचें गोटे पसरून त्यांवर जें डबर बसवावयाचें तें लाटांच्या तडाख्यानें उपसून बाहेर निघूं नये म्हणून प्रत्येक दगडाचें वजन ६० ते ८० पौंड असावें. तें निदान ४० पौंडांपेक्षां तरी कमी असूं नये. हे दगड एकमेकांला ठेपून व त्यांची रुंद बाजू खडीवर टेंकून ठेवून ठोकून बसवितात आणि ह्या मोठ्या दगडांच्या फटींतून लहान डबर ठोकून बसवितात.

भरावांत त्याच्या गर्भासाठीं जी माती वापरावयाची ती काळ्या मातीसारखी भिजली असतां व फुगून वाळली असतां तडकणारी नसावी आणि म्हणूनज काळी माती भरावाच्या पायांत असली तर तीहि खोदून काढावी लागते. ह्यां गर्भाच्या व मध्यभागाच्या मधोमध निदान १० फूट रुंदीचा चर खणून तो तयार केलेल्या चिकण मातीनें (पड्ल) भरून काढतात. हा चर खालीं खडकापर्यंत पोंचविला पाहिजे. परंतु खडक जर २० फुटांपर्यंत लागला नाहीं तर चर २० फुटाचाच खणून भरून काढतात. भरावाचा खालच्या बाजूचा अर्धा भाग मुरमाचा किंवा पाणी झिरपून जाण्याजोगा असला पाहिजे, आणि म्हणून व अशा भागांतली पायांतील सर्व चिकण माती उकरून काढून मुरुम किंवा गोट्यांसारख्या विरळ द्रव्यानें तो भरून काढतात. चरांत चिकण माती भरतांना ३ इंच जाडीचे थर करून व धुमस करण्यासाठीं ओळीनें माणसें उभीं करून २० पौंडी धुमसानें प्रत्येक थर धुमसून कठिण करतात. भरावांतील सर्व माती ६ इंचांचा थर करून व प्रत्येक थर रुळानें दाबून अथवा अर्ध्या भरलेल्या बैलगाड्या सर्व थरावरून फिरवून कठिण करतात. भरावाच्या चिकण मातीच्या मध्यभागाच्या आंतल्या बाजूस जो मुरुम पसरणें तो सर्व बारका मुरुम असावा. परंतु बाहेरच्या बाजूचा मुरुम चिकण मातीला लागून अगदीं बारका, त्याच्या पलीकडील बाजूस ह्या मुरमापेक्षां अंमळ जाडी मुरुम आणि त्याच्याहि बाहेरील बाजूस मोठा मुरुम व मोठे गोटे, डबर वगैरेंचा थर घालतात. भरावाचा पाया जेव्हां खडकावरच असेल तेव्हां भरावाचा तळाजवळील सर्व भाग निदान २० फूट रुंद व कमींतकमी ५ फूट उंचीपर्यंत तरी डबराचा किंवा गोट्यांचा असावा. पिचिंग करतांना त्याची जाडी तळचे १० फूटपर्यंत १२ इंच ठेवून वरील प्रत्येक १० फूट उंचीस ६ इंचांचा वाढावा करावा. साधारणत: मातीचे भराव ५० फुटांपेक्षां जास्त उंचीचे न करणें बरें.

तलाव बांधल्यानंतर तलावांतील पाणी हवेंतील उष्णतेच्या योगानें घाटांतील तलावांतून वर्षास ६ फूट आणि महाराष्ट्रांतील इतर भागांतील तलावांतून ८ फूट खोलीचें पाणी नाहीसें होतें व ह्यांतील ५ ते ६ फूट खोलीचें पाणी १५ ऑक्टोबर पासून १५ जूनपर्यंतच्या अवधींत सुकून जातें. कालव्यांतूनहि थोडथोडें पाणी झिरपून जातच असतें; तें गोदावरीच्या उजव्या बाजूच्या कालव्यावर दर १० मैल लांबीला ४ टक्के व डाव्या बाजूच्या कालव्यावर ७॥ टक्के, प्रवरेच्या डाव्या बाजूच्या कालव्यावर ६॥ टक्के  आणि प्रवरेच्या उजव्या बाजूच्या कालव्यावर तर १६ टक्के पाणी नाहींसें होत असतें. ह्याचाच अर्थ प्रवरेच्या उजव्या बाजूच्या कालव्यावर पहिल्या १० मैलांतच कालव्यांत सोडलेल्या पाण्याचा ६ वा हिस्सा झिरपून व सुकून जातो. इरिगेशन खात्यांत रब्बी १५ ऑक्टोबर पासून १४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे १२३ दिवस, उन्हाळी १५ फेब्रुवारीपासून १४ जूनपर्यंत म्हणजे १२० दिवस, पावसाळी १५ जून पासून १४ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे १२२ दिवस. ह्या तीनहि काळांत दर सेकंदास १ घनफूट पाणी सुटत असलें म्हणजे प्रत्येक चार माहीस सुमारें १०५ लक्ष घनफूट पाणी दिलें असें होतें म्हणजे प्रत्येक ४ माहीस २४४ एकर फूट जमीन भिजले असें समजावयाचें. दर सेकंदास १ घनफूट प्रमाणें १ दिवसभर म्हणजे २४ तास पाणी सोडलें तर तेवढयानें २ एकर फूट जमीन भिजेल म्हणजेच २ एकरांवर १ फूट जाडीचा थर अथवा १ एकरावर २ फूट पाण्याचा किंवा २४ इंच जाडीचा थर होईल. महाराष्ट्रांत रब्बीच्या पिकाचें प्रमाण दर सेकंदास १ घनफूट पाणी सुटत असल्यास १२० एकर भिजतात परंतु उसास पाणी देणें असल्यास फक्त ५० एकरच भिजूं शकतात. ह्यामुळें दर सेकंदास घनफुटांस ८० एकर असें हिशोबांत धरतात. पाळीनें पाणी द्यावयाचें तें साधारणत: १० दिवसांनीं देतात. महाराष्ट्रांतील कालव्यांवर इरिगेशन डिपार्टमेंटकडून वेगवेगळ्या पिकांसाठीं काय आकार घेतला जातो ते पुढें दिलें आहे.

पिकांसाठी दर एकरास काय आकार सध्यां घेतला जातो त्याचें कोष्टक.
हंगाम हंगामाचा काळ पिकांचे प्रकार हंगामाला एकरी आकार रु एक पाणी दिल्यास आकार, रुपये किती दिवसांनी पाण्याची फेरी
उन्हाळी १५ फेब्रु. ते १४ जून हुंडी, कडवळ, कडबा वगैरे चाऱ्याचीं पिकें. १५ ते २०
पावसाळी १५ जून ते १४ ऑक्टो. बाजरी, मका, मूग, तूर, उडीद, मटकी, राळा, वरई, हवरी, हुलका, कडवळ, कारळा.  २० ते ३०
रब्बी १५ ऑक्टो. ते १४ फेब्रु. गहूं, चणा, ज्वारी, करडई, जवस २० ते ३०
८ मासीं १५ जून ते १४ फेब्रु. कांदे, हळद, मिरच्या, वांगी. साळ भुइमूग, कपाशी, तंबाखू रताळीं, तूर, लसूण. १२ १० ते १२
१२ मासीं ऊंस ४५ १० ते १२
'' पानमळा ३० १० ते१२
'' केळीं, आंबे, वगैरे फळझाडें, ल्युसर्न ग्रास,आणि भाजीपाला. २२॥ १० ते १२
'' ब्लॉक १/३ ऊंस आणि  १/३ भुसार पिकें. २० पिकाप्रमाणें पाणी देणें.

कालव्यांतील पाणी किती एकरांस पुरेल हें गणतांना कालव्यांत सुटणाऱ्या दर सेकंदास प्रत्येक घनफुटास किती एकर भिजतील त्याचें कोष्टक.

पिकाचें नांव एकर
ऊंस किंवा भात ४० ते ४५
कपाशी ८० ते ८५
८ मासी पिकें ८० ते १००
रब्बी पिकें १२० ते १५०
उन्हाळीं पिकें ४५ ते ५०
खरीप, पावसाळीं पिकें १८० ते २००पिकांनां पाणी किती लागतें त्याचें कोष्टक.

पिकाचें नांव एक पाणी देण्यास एकरी घनफूट पाणी पाण्याची जाडी (इंचांत)
भात १५००० ते २०००० ४.१ ते ५.५
ज्वारी व बाजरी १०००० ते १२०००  २.७ ते ३.३
ऊंस ११००० ते १५००० ३ ते ४.१
हरभरा ८००० २.२
गहूं  ५००० १.४
भुईमूग ६००० १.७
मका ५००० १.४
ल्युसर्न ग्रास ८५०० २.३
केळीची बाग ९००० २.५
पानमळा ३००० ०.८
भाजीपाला ७००० १.९
हळद ४००० १.१
राताळीं ४५०० १.२
गाजर ५५००  १.५
कांदे ८००० २.२
टोम्याटो १०००० २.८

 

प्रत्येक पिकाला किती वेळां पाणी द्यावे लागतें तें.
पिकाचें नांव किती वेळां पाणी देणें 
ऊंस ३० ते ३५
बाजरी व दुसरी खरीपाचीं पिकें २ ते ३
ज्वारी आणि दुसरी रब्बीचीं पिकें ३ ते ४
८ मासीं पिकें १० ते १३

 

सं द र्भ ग्रं थ- कॅ. मॅरिएट यांच्या पी. डब्ल्यू. डी. हॅण्ह बुकचा उपयोग या लेखांत प्रामुख्यानें केला आहे. (वि. आगाशे)

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .