प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
             
स्थापत्यशास्त्र— (भाग २) (सिव्हिल इंजिनिअरिंग)

जि ने व दा द र.- एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी ज्या बांधकामाच्या पायर्या बांधलेल्या असतात त्यांना जिना असें म्हणतात. ह्या पायर्या लाकडाच्या असतील तर त्यांनां दादर असें म्हणतात. तळमजल्यांत पाया घालून जड बांधकामाचा जिना करतां येतो म्हणून तो तसा करतात. परंतु वरच्या मजल्यावर बांधकामाचा जिना करणें अवघड असतें. कारण त्याचा जड भार सहन करण्याइतक्या मजबूत भिंती करणें फार खर्चाचे असतें. सबब लोखंडी अथवा लांकडी दादरच एका मजल्यावर दुसर्या मजल्यावर जाण्याला करण्याचा प्रघात आहे. कांही ठिकाणीं लांब पल्ल्याचे दगड भिंतीत घालून व त्यांना बाहेरचा भाग घडून त्यांचे सांधे कमानीच्या तत्त्वावर करून रुंद दगडी जिनें केलेले असतात. परंतु त्यांनां खर्च फार येतो. अशा जिन्यांचा तळ बहुतकरून एकसारख्या चढत्या पातळींत असतो. मजल्याची उंची जास्ती असेल तर अर्ध्या उंचीवर विसावा घेण्यासाठी तबकडी करण्याची वहिवाट आहे. तोच जिना तीन बाजूंच्या भिंतींना लागून वर तीन भागांत चढत असेल तर प्रत्येक कोपर्यांत एक एक चौकोनी तबकडी करतात. जिन्यांतून एका बाजूला निमुळच्या व दुसर्या बाजूला रुंद अशा पायर्या कोपर्यातून घालतात. पण त्यावरून माणसें पडण्याची भीति असल्याकारणानें तशा पायर्या होता होईल तों करूं नयेत. जिन्याच्या पायर्या जितक्या जास्ती रुंद असतील तितका त्यांचा चढ कमी असला पाहिजे. पायरी जर १२ इंच रुंदीची असेल तर तिचा चढ ५॥ किंवा ६ इंचापेक्षां जास्त असूं नये.

तक्त्याचें छत.- हें बहुतकरून वर्मा टीक किंवा चांगल्या मुरलेल्या देवदारी (पाईन) लांकडाचें असावें. छप्परांतील मुख्य मुख्य लांकडें (म्हणझे कैच्या किंवा पाखाड्या) दिसूं शकतील अशा रीतीनें फळ्या, त्यांच्या खालच्या बाजूंस बसवाव्या. तक्त्यांची जाडी अर्धा किंवा पाऊण इंच असावी, आणि रुंदी ६ इंचापेक्षां अधिक नसावी. त्यांचा रंग सारखा असून रुंदी सारखी असावी. फळ्यांचे सांधे खोबणदात्याचे किंवा नळाचे असावेत. फळ्यांच्या खालच्या अंगास रंधा फिरलेला असून त्यांच्या कोंपर्यास गोलची किंवा इराप असावा. तक्ते भिंतीशीं समांतर किंवा काटकोनांत ठेवून छप्परांच्या सांगाड्याच्या खालच्या बाजूस पितळेच्या स्क्रूनीं घट्ट बसवावेत. तक्त्यांवर, जवसाच्या पक्क्या कढविलेल्या तेलाचा एक हात द्यावा व त्यावर रोगण लावावें. पाखाड्यांच्या (पर्लिन्सच्या) किंवा वाशांच्या खालच्या बाजूस छत बसवावयाचें असेल तर भिंती व आढ्याजवळीत कांही तक्ते न बसवितां, त्यांच्या ऐवजीं जस्ताचे जाळीदार पत्रे किंवा पाऊणइंच भोंकें (मेश) असलेली तारेची जाळी बसवावी. जरूर वाटल्यास भिंतीच्या माथ्यासभोंवतीं लांकडी कारनीस बसवावें. तक्तांचें छत करतांना कैच्यांच्या तुळ्यांच्या (टायबीमच्या) खालीं २ x २॥ इंच मापाच्या कड्या गर्मापासून गर्मापर्येत २ फूट अंतरावर ठोकून त्यांच्या खालच्या बाजूस कळ्या स्क्रूनीं बसवाव्यात.

कापडाचें छत:- थोड्या जाडी व रुंदीच्या सागवानी लांकडांच्या खाट्या (फ्रेमी) करून त्यांनी कांहीं भाग भिंतीवर टेंकून कैचीच्या तुळईशीं (टायबीमाशीं) स्क्रूनीं जोडावा व त्याच्या खालच्या बाजूंस बळकट खादीचें छत ताणून बांधावें. ताट्यातील लांकडांच्या खालच्या बाजूंस खादीला झोळ न पडेल अशा रीतीनें जवळ जवळ चुका मारून,खादीवरून चुन्याचा हात द्यावा. कधीं कधीं ताट्यांतील लांकडें दिसतील असें छत देतात. ह्यात छताच्या खादीचें तुकडे करून साठ्यांतील निरनिराळ्या क्षणांत किंवा चौकटीत बसवितात. व साठ्याच्या लांकडास रोंगण (वारनीश) देतात.

गिलाव्याचें छत:- छताच्या कड्यांनां सव्वा इंच व्यासाच्या भरीव बांबूच्या कामट्या खिळ्यांनी ठोकून त्यावर चुन्याचा गिलावा करतात. बांबू सरळ असून पक्के झालेले असावे. एका बांबूच्या दोन कांबी करून त्यांची गोळ बाजू खाली करून प्रत्येक तुकड्यामध्यें तीनअष्टमांश इंच अंतर सोडून खिळ्यांनीं सागवानी कड्यांनां खालून ठोकावे. या कड्या २ x ३ इंच मापाच्या असून गर्मापासून गर्मापर्यंत २ फूट अंतरावर ठेवाव्यात. व कामट्या बसवितांना सांधमोह व्हावी. सर्व कामठ्या ठोकल्यानंतर गिलावा करण्यापूर्वी चांगल्या भिजवाव्या. व त्या कड्यांनां ठोकण्यापूर्वीहि भिजवाव्या. मळलेल्या चुन्यांत वाळू व फकीचा चुना समभाग घेऊन त्यांत स्वच्छ व ताज्या तागाचे १॥ इंच ते २ इंचापर्यंत तुकडे तोडून घालावे फकीचा चुना  व वाळू ४ घनफूट असली तर त्यात ताग १ पौंडपर्यंत घालावा. कुडावर चुना जोरानें मारावा म्हणजे तो बांबूच्या फटीतून जाऊन कुडास चिकटून धरील. गिलावा बराच आळून कठीण होईपर्यंत ओला ठेवून त्याच्या पृष्ठभागावर ठोकणींनें ठोकून करणीनें खाचे करावे. व त्यावर पाव इंची जाडीची गिलाव्याची चट देऊन ती चांगली कठीण होईपर्यंत घोटावी, गिलावा पुरता वाळला म्हणजे त्यावर सफेतीचा हात द्यावा. बांधकाम पुरे झाल्यानंतर घराच्या आंतील भाग साफ व गुळगुळीत व्हावा म्हणून इमारतीस चुन्याचा किंवा कच्च्या मातीचा गिलावा करतात. बांधकामाचे सांधे निदान पाऊण इंच खोल उकरून काढावे. म्हणजे भिंतीस गिलावा आंवळून बसेल, गिलावा करण्यापूर्वी भिंतीचा दर्शनी भाग चांगला धुवून टाकून ६ तास ओला ठेवावा. गिलाव्यासाठी चुना साधारण घट्ट करून दगडाच्या बाहेर आलेल्या बाजूवर निदान पाव इंच जाडीचा गिलावा बसेल अशा जाडीची चट द्यावी. खांडक्यांच्या बांधकामास पाऊण इंच व विटांच्या बांधकामास अर्धी इंच जाडीची चट बहुधा पुरी पडते. मळलेल्या चुन्यांत १ भाग फकीचा चुना व १ भाग स्वच्छ बारीक वाळू असावी. चट सारख्या जाडीची असून, तिचा पृष्ठभाग सपाट असावा. व तिजवर ठोकणीनें चांगलें ठोकावें. १०० घनफूट गिलाव्याच्या मळलेल्या चुन्यांत ६ पौंड तोडलेल्या ताग व ६ पौंड गूळ मिळवावा. गिलाव्याचा दुसरा थर देणे झाल्यास पहिल्याथराचा पृष्ठभाग ओला आहे. तोंच त्यावर टांचे मारून ठेवावेत. गिलाव्याचा पृष्ठभाग बराच वाळला म्हणजे त्यावर सनल्याच्या चुन्यांत ताग तोडून टाकून व गुळांचें पाणी घालून त्याची पातळ चट देऊन गुळगुळीत होई. पर्यंत घोटून काढावा. गिलाव्यांत कंगणीचें किंवा नक्षांचे काम करणें झाल्यास नमुन्याबरहुकूम नीट व साधनीत करावा दरवाज्याजवळील कोपरे, कोरां नीट जपून करावा. पाहिजे असल्यास कोरांस गोलची करावी. सनला हातघाणींत मळावा अथवा पाट्यावर वाटावा. गिलाव्याचें माप घेतांना भिंतीच्या लांबीरुंदीचें क्षेत्रफळ काढून त्यांत दरवाजे, खिडक्यांसाठीं कांही वजा करू नये. कारण दरवाजाच्या बाजूस कमानीच्या आंतल्या बाजूस गिलावा करावा लागतो व त्याचें क्षेत्रफळ बहुतकरून दरवाजे किंवा खिडक्यांच्या क्षेत्रफळाच्या जवळ जवळ असतें.

भरड्या चुन्याचा गिलावा अर्धा इंच जाडीचा:- अशा गिलाव्यासाठीं कळीचा चुना आणि खरखरीत वाळू किंवा चुना चाळून त्यांतील राहिलेले बारीक खडे मिसळून मळलेला असावा. भिंतीच्या बाहेरील बाजूस याचा अर्धा इंच जाडीचा गिलावा करावा. गिलावा करतेवेळी चुना जोरानें भिंतीवर सारख्या जाडीची चट होईल असा मारावा. गिलाव्यास रंग देणें झाल्यास तो चुन्यांतच रंग मिसळावा.

विटांनीं घासून केलेला खरखरीत गिलावा:- भिंत चांगली भिजवावी व तिच्या पृष्ठभागावर पाण्यांत कालविलेल्या दाट फकीच्या चुन्याचा शिडकाव करावा. व तांबडी मऊ वीट गुळाचें पाण्यांत बुचकळून तिनें भिंतीवर फेकलेल्या ओल्या चुन्यावर तो साधारण बळकट होईपर्यंत घांसावे; चुना थोड्याच मिनिटांत आळूं लागतो. भिंतीच्या दर्शनी बाजूवरील उंचसखल भाग भरून साफ होईल अशा बेतांचीच गिलाव्याची चट असावी. एक ग्यालन पाण्यांत १ ग्यालन गूळ या मापानें गुळाचें पाणी करावे.

मातीचा गिलावा:- मातीच्या गिलाव्यासाठीं कमावलेल्या मातीचा उपयोग करावा. विटा ज्या मातीच्या करतात ती माती चालेल. पण तींत झाडाच्या मुळ्या व वाळू असूं नये. माती चांगली गाळून एका खाड्यांत घालावी. व तिचा चिखल करून त्यांत गवत तोडून टाकावें. व पाणी खूप घालून एक अगर दोन आठवडे तसाच राहूं द्यावा. गिलावा करतांना त्याच्या अनेक पातळ चटी द्याव्या, एक जाड चट देऊं नये.

सिमेंटाचा गिलावा:- पोर्टलंड सिमेंट व बारीक वाळू यांचे समभाग मिश्रण करून १ इंच जाडीच्या गिलाव्याची चट देऊन करणीनें त्यावर टांचे मारावेत परंतु त्यावर टाकू नयें. पहिल्या चटीवर एकअष्टमांश इंच जाडीची नुसत्या पोर्टलंड सिमेंटाची चट द्यावी व पृष्ठभाग घोटून गुळगुळीत करावा.

द र जा भ र णें:- सवड असल्यास सांध्यांतील चुना निदान पाऊण इंच खोलीपर्यंत उकरून काढून त्यांतील धूळ झाडून काढावी व भिंत पाण्यानें भिजवावी. दरजांच्या चुन्यांत चांगला फकी चुना व स्वच्छ बारीक वाळू हीं सहभाग असावी. १ घनफूट मळलेल्या चुन्यांत १ पौंड ताग या मानानें तोडून टाकावा. दरजा भरलेले साधे स्पष्ट दिसतील. अशा रीतीनें दरजा सारख्या जाडीच्या असून चपट्या, गुलाईच्या किंवा तारेच्या घोटणीच्या असाव्या. दरजांचें काम संपल्यानंतर त्या ३ दिवसपर्यंत ओल्या राहतील अशी तजवीज ठेवावी. बांधकामाच्या सर्व दर्शनी बाजूंस दरजा कराव्या.

सिमेंटाच्या दरजा:- या जितक्या जलदीनें भरवतील तितक्या जलदीनें भराव्या. दरजांतील सिमेंट कठिण होऊं लागलें म्हणजे त्यास हात लावू नये. त्या केल्यापासून थोड्याच वेळांत सिमेंट कठिण होण्यास सुरूवात होते. त्या बरेच दिवस ओल्या ठेवाव्या. दरजासाठी सिमेंट व वाळू समभाग घेऊन त्यांचें मिश्रण करावें.

भिंतींना रंग:- नुसती सफेती देणें झाल्यास दर घनफूट विरविलेल्या चुन्यांत ५ तोळे या प्रमाणांत बाभळीचा डीक गरम पाण्यांत वितळवून घालतात. डीकाचें ऐवजी तांदुळाची खळ करून घातली तरी चालते. सुरती चुना वापरावाचा असल्यास १ हंड्रेडवेट असा कळी चुना घेऊन तो ऊन पाण्यांत झांकलेल्या भांड्यांत विरवावा आणि त्यांत ऊन पाण्यांत १४॥ पौंड खाण्याचें मीठ विरवून घालावें आणि त्यांतच ८॥ पौंड तांदुळाची खळ करून घालावी. व नंतर गरम पाण्यांत १॥ पौंड सरस विरघळून तो घालावा व या सर्वांचें चांगलें ढवळून मिश्रण करून भिंतींचां लावण्याजोगी पातळ सफेती होण्यासाठी जरूर तितके पाणी घालावें. आणि तें सफेतीचें भांडें काहीं तासपर्यत विस्तवावर ठेवून चांगलें उकळूं द्यावें; त्यानंतर ही सफेती खादीच्या फडक्यांतून गाळून ऊन असतांच भिंतीस लावली असतां पुसून जात नाही किंवा हाताला लागत नाहीं.

भिंतीला फिकट हिरवा रंग देणें असल्यास सव्वादोन ग्यालन पाण्यांत चार पौंड कळीचुना विरवावा. व त्यांत १। पौंड पाण्यांत ५ तोळे डीक उकळून घालावा. तसेंच ३॥। पौंड पाण्यांत १० तोळें तांदुळाची खळ करून तीहि घालावी. खेरीज अर्धा ग्यालन पाण्यांत ७ पौंड आंब्याच्या झाडांची साल दोन मिनिटेंपर्यंत उकळून तो काढाहि त्यांत घालावा. आणि रंग येण्यासाठीं दोन पौंड मोरचूद ३॥। पौंड पाण्यांत उकळून तें रंगाचें पाणी त्यांत घालावे. आणि हें मिश्रण ढवळून व फडक्यातून गाळून भिंतीला लावावें.

ओलें रंग:- जवसाचें तेल निवळ, रंगास फिक्कें व तकतकीत असून चव घेतली असतां गोड व मुरलेलें लागावें. त्यास वाईट वास येऊं नये, व तें एकदां किंवा दोनदां कढविलेलें असलें पाहिजे. देशी जवसाच्या तेलाचा उपयोग करणें झाल्यास त्यांत शेंदूर (रेडलेड) व मुरदाडशिंग (लिथॉर्ज) (एक ग्यालन तेलांत १ पौंड मुरदाडशिंग या प्रमाणांत) टाकून २ किंया ३ तास सडकून उकली येईपर्यंत कढवावें. मुरदाडशिंग तेलांत कढविण्याची उत्तम रीत म्हटली म्हणजे तें एका लहानशा पिशवींत घालून ती पिशवी एका कांठीच्या टोकास बांधावी व तेल कढत असतांना ती २ किंवा ३ तास त्यांत बुचकळलेली राहील अशी ठेवावी व नंतर काढावी. या कढवलेल्या तेलास जवसाचें पक्के तेल (बेलतेल) म्हणतात. कधीं कधीं हें तेल स्वच्छ करण्यासाठीं त्यांत ऑइल ऑफ व्हीट्रीअल (गंधकाम्ल) मिश्र करून ते चांगलें ढवळल्या नंतर पाण्यानें धुवावें. म्हणजे त्यांत राहिलेल्या अम्लाचा (अॅसिडाचा) अंश निघून जातो. ह्या तेलाच्या अंगी लवकर वाळण्याचा गुण म्हणूनच त्यांत मुरदाडशिंग किंवा शेंदूर घालतात.

लांबी:- लांबी खडू किंवा चॉक यांची करतात. कोरड्या खडूची पूड करून ती १ इंचांत ४५ भोंकें असतील अशा चाळणींतून गाळून तींत खळीप्रमाणें घट्ट होईल अशा बेतानें कच्चे जवसाचें तेल घालून मळून ठेवावी व या स्थितींत ती १२ तास राहिल्यानंतर पुन्हां अगदीं मऊ होईपर्यंत मळावी म्हणजे लांबी तयार झाली.लांबी वाळली तर ऊन करून मळावी. म्हणजे उपयोग करण्याजोगी होते.

रंग दळण्यास जातें असतें. पण जातें मिळण्याजोगें नसेल तर पाटावरवंटा ह्यांचा उपयोग करावा. पाट्याकरतां २ फूट चौरस कठिण दगडाची शिळा वापरावी. वरवंटा कठिण दगडाचा असून शंक्वाकृति असावा म्हणजे खाली रुंद व वर निमुळता व त्याच्या तळाचा व्यास सुमारें ४ इंच असावा व त्याची उंची दोन हातांनीं धरून घोटतां येईल अशा बेताची असावी. रंगांत पहिल्यानें फार थोडें तेल घालून पाट्यावर वाटून त्याची बारीक पूड केल्यानंतर बारीक भोंकांच्या चाळणींतून चाळून त्यांत भिजण्यापुरतें जवसाचें तेल घालून प्रत्येक खेपेस लिंबायेवढा गोळा पाट्यावर वाटावा व तो चांगला मऊ झाल्यानंतर दुसरा गोळा घेऊन वाटावा. वाटलेल्या रंगांत पक्के जवसाचें तेल अथवा टरपेनटाईन किंवा दोन्हीहि घालून रंग पातळ करावा म्हणजे ओला रंग लावण्याजोगा तयार होतो. ओल्या रंगांत कोणत्याहि रंगाची लकेरी पाहिजे असल्यास लकेरीच्या रंगाचें प्रमाण समजण्यासाठीं थोडा मासला तयार करावा. व तो पसंतीस पडला म्हणजे त्यांतील द्रव्याच्या प्रमाणानें हवा तितका ओला रंग तयार करावा. तो तयार करतांना सफेत्यांत थोडें जवसाचें पक्कें तेल घालून चांगलें मिसळावें. व मग त्यांत ज्या रंगाची लकेर पाहिजे असेल तो रंग घालावा आणि साधारण दाट होण्याइतकें तेल अथवा टरपेनटाईन घालून रंग खादीतून किंवा बारीक भोंकाच्या चाळणींतून गाळावा. ओला रंग शाईप्रमाणें पातळ असावा. म्हणजे तो लावण्यास सुलभ पडतो.

ज्या लांकूडकामास ओला रंग देणे असेल तें स्वच्छ धुवून त्यावरील पूर्वीच्या ओल्या रंगाच्या किंवा सरसाच्या खपल्या वगैरे, बोथट सुरीनें खरडून काढून लांकडांत गाठीं असतील तर त्यांवर सफेत्याचे किंवा शेंदराच्या ओल्या रंगाचे अथवा सरस ऊन करून त्याचे २ हात द्यावे व वाळल्यावर कांचफोडीच्या कागदानें घासावें.

ओल्या रंगाचा पहिला हात देण्यापूर्वी लांकूडकामाचा पृष्ठभाग खडखडीत वाळलेला असावा. पहिल्या हातासाठी केलेल्या ओल्या रंगांत पुढें लिहिल्याप्रमाणे द्रव्यें असावीं:- १ भाग सफेता, ८ भाग खडूची पूड, ४ भाग दोनदां कढविलेलें पक्कें जवसाचें तेल हीं सर्व एकेठिकाणीं चांगली मिश्र करावी. लांकडांतील सर्व भोकें, चिरा व खिळ्यांचीं किंवा स्क्रूची भोकें लांबीनें बुजवून टाकावीं व पृष्ठभाग खरखरीत असेल तर वाळूच्या कागदानें (सँडपेपरनें) घांसून साफ करावा. लोखंडी कामावर असलेली धूळ व तांब पुसून टाकून प्रथम शेंदरी ओल्या रंगाचा १ हात द्यावा. नारिंगी, किंवा तांबडा, या दोन्ही रंगांची लकेरी देणें झाल्यास पहिला हात गुलाबी रंगाचा असावा. जुन्या ओल्या रंगावर नवीन ओला रंग द्यावयाचा असल्यास जुना ओला रंग चुन्याच्या निवळीनें धुवून काढावा. कोठें चिरा असतील तर त्या लांबीनें भरून काढाव्या. जुना ओला रंग धूर लागून मेंचट झाला असेल तर पहिल्या हाताच्या ओल्या रंगांत जवसाच्या तेलाच्या ऐवजीं टरपेनटाईन घालावें. जुना ओला रंग काढून टाकणें असल्यास मऊ साबर (सॉफ्टसोप) अर्धा भाग, पोटॅश १ भाग आणि कळी चुना अर्धा भाग यांचे मिश्रण वापरावें. हें मिश्रण करतांना पहिल्यानें साबण व पोटॅश अधणाच्या पाण्यांत विरवावे व नंतर त्यांत चुना टाकावा. हें मिश्रण उष्ण आहे तोंच जो रंग पुसून काढावयाचा असेल त्यावर कुंच्यानें लावून १२ पासून २४ तासपर्यंत राहूं द्यावा व नंतर ऊन पाण्यानें रंग धुऊन काढला म्हणजे तो तेव्हांच निघून जातो. जुन्या ओल्या रंगावर छटे पडले असतील किंवा त्याच्या खपल्या पडावयास लागल्या असतील तर असा पृष्ठभाग पमीस दगडानें (प्यूमिस स्टोन) घांसावा. व त्यावर ओल्या रंगाचे दोन तीन हात द्यावे व हे वाळल्यानंतर सर्व पृष्ठभागांस नवा ओला रंग लावावा. ओल्या रंगाचा एक हात वाळला म्हणजे त्यावर दुसरा हात द्यावा. सफेत्याचा ओला रंग करणें झाल्यास सफेता वजनी ४ भाग व पक्कें जवसाचें तेल वजनी ३ भाग एके ठिकाणीं खलून त्यांत थोडें टरपेनटाईन घालतात. कधीं कधीं यांत थोडा अस्मानीं रंग (पर्शियन ब्ल्यू) टाकतात. हिरवा ओला रंग करणें झाल्यास ब्रॅस बुईक किंवा मरीन ग्रीनचा उपयोग करतात. जंगल्याचा (ए मेटल ग्रीन) उपयोग केला तर तो रंग हवेंत राहून फिक्का पडतो. तोच वापरणें असल्यास जंगला वजनी १३ भाग व सफेता वजनी २२ भाग घेऊन त्यांचें मिश्रण भिन्न भिन्न वांटून मग एके ठिकाणीं मिश्र करावे. तांबड्या ओल्या रंगात दोन भाग गेरू, तीन भाग शेंदूर व ४ भाग तेल असतें. काळ्या ओल्या रंगांत खडू एक भाग, अर्धा भाग सफेदा व पाव भाग काजळ मिश्रित तेल असतें. रोगणाचा (व्हारनीश) उपयोग करणे झाल्यास कोपळ रोगणाचा उपयोग करावा. हें करतांना कोपळ म्हणजे चंद्रूसा किंवा राळ ३ भाग टरपेनटाईन ५ भाग आणि जवसाचें तेल २ भाग घालतात.

गिलाव्यावर ओला रंग देणें झाल्यास गिलावा चांगला वाळून घट्ट झालेला असावा. पहिल्या हाताच्या रंगांत सफेता व जवसाचें तेल मिसळून त्यांत थोंडें मुरदाडशिंग घालावें दुसरा हातहि अशाच प्रकारचा असावा. तिसर्या हातासाठी रंग थोडा दाट असून त्यांत थोडें टरपेनटाईन व ज्या प्रकारचा पाहिजे असेल तो रंग थोडा टाकावा. चवथ्या हातासाठी रंग जितका दाट असेल तितका चांगला व त्यांत जवसाचें तेल व टरपेनटाईन समभाग घालून थोडें शुगर ऑफ लेड घालावें, पांचव्या हातासाठी सफेत्यांत जो रंग पाहिजे असेल तो मिश्र करून त्यांत फक्त टरपेनटाईन घालून शेवटचा हात द्यावा. लांकूडकामास ओल्या रंगाच्या ऐवजी जर नुसतें तेल द्यावयाचें असेल तर जवसाच्या तेलांत थोडा गेरू (रेडओकर) घालून कडवून लावावें. लांकडांस किंवा लोखंडास पातळ डामर (कोल्टार) लावणें झाल्यास तें कडवून तें उष्ण आहे तोंच कुंचलीनें लावावें. डामर विशेष पातळ असल्यास १ ग्यालन पातळ डामरांत त्याच्या १६ व्या हिश्शाइतकी देशी दारू घालून मिश्रण उष्ण आहे तोपर्यंत लावावें.

लोखंडी सामान सुटें असलें तर तें चांगलें तापवून त्यावर पातळ डामर लावावें. पण तें इमारतींत बसविलेलें असल्यास पातळ डामर त्यास कढवून लावावें. १०० चौरस फुटास निदान १० पौंड तरी पातळ डामर (कोल्टार) लागतें. लोखंडास किंवा लांकडास २ पौंड पातळ डामरांत अर्धा पौंड आसफाल्ट व तितकीच राळ घालून खूप कढवून मिश्रण निवालें म्हणजे लावावें. ही द्रव्यें कढवितांना त्यांनां अग्नी वा स्पर्श होऊं न देण्याबद्दल खबरदारी घ्यावी.

ओला रंग:-हवेंत उघडे राहील म्हणजे ऊन व पाऊस लागेल अशा ठिकाणीं लांकूड व लोखंडकामास ओल्या रंगाचे ४ हात द्यावे. इमारतीच्या आंतल्या बाजूस असणार्या लांकूड व लोखंडकामास ३ हात दिल्यास पुरें. लाकूड चांगले मुरल्याशिवाय त्याला ओला रंग लावणें प्रशस्त नाहीं. ज्या पृष्ठभागास ओला रंग किंवा रोगण (व्हारनीश) द्यावयाचें असेल तो स्वच्छ वाळलेला व गुळगुळीत असून त्यावर धूळ किंवा गंज असूं नये. पहिल्या हाताच्या तेलांत रंग असूं नयें. व हा हात दिल्यावर भोंकांत आणि भेगांत लांबी घालून ती बुजवून टाकून गांठी न दिसतील असें करावें. तेलांत रंग चांगला खलून त्यांत दोनदां कढवलेलें पक्के जवसाचें तेल व टरपेनटाईन यांचे योग्य प्रमाणानें मिश्रण करावें. चांगलें काम पाहिजे असल्यास ओल्या रंगाचा प्रत्येक हात दिला म्हणजे तो वाळल्यावर त्यावर प्यूमिस दगडानें किंवा कांचपुडीच्या कागदानें घासावें. आणि दुसरा हात देण्यापूर्वी धूळ झाडून टाकावीं.

रोंगण देणें (व्हारनीश):- लांकूडकाम चांगले स्वच्छ करून घांसलें म्हणजे त्यावर स्वच्छ पक्क्या जवसाच्या तेलाचे दोन हात द्यावे. तें असें कीं, एक दिल्यानंतर कांही वेळानें दुसरा हात द्यावा. व हे वाळले म्हणजे त्यांवर कोपल व्हारनीशचे पातळ हात द्यावे. सफेतीचा चुना किंवा रंग देणें झाल्यास चुना पांढर्या चुनखडीचा भाजलेला असून कळ्या ताज्या असाव्या. एक मोठें पातेलें घेऊन त्यांत पुरेसें पाणी घालून कळीचा चुना विरवून चांगला ढवळून स्वच्छ खादीच्या फडक्यात गाळावा. नंतर स्वच्छ डिंक ऊन पाण्यांत विरवून त्यांत घालावा. १ घनफूट चुन्यात ५ तोळे डिंक असावा. डिंकाऐवजी तांदळाच्या पिठाची खळ करून प्रत्येक हात कुंचलीनें द्यावा. पहिला हात भिंतीच्या माथ्यापासून खाली देतांना कुंचलीचे फटकारे खालीवर द्यावे दुसरा हात ह्याप्रमाणेंच पण भिंतीच्या तळापासून माथ्याकडे देत न्यावा. व तिसरा हात डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फटकारे देत न्यावा. याप्रमाणें ३ हात द्यावे. नव्या भिंतीस चुना देण्यापूर्वी तो स्वच्छ करून झाडून टाकावी. एकदां ज्या भिंतीस सफेती दिली असेल त्या भिंतीस पुन्हां सफेती देण्यापूर्वी पहिला चुना घांसून काढून कोठें कोठें गिलावा पडला असल्यास त्याची दुरुस्ती करावीं.

कागद लावणें:- भिंतीवर चुना किंवा कांहीं घाण असल्यास खरडून भिंतीचा पृष्ठभाग घांसून त्यावर सरसाचा किंवा तांदुळाच्या कांजीचा हात द्यावा. मौल्यवान कागदांचा उपयोंग करणें झाल्यास पहिल्यानें साधा लायनिंग पेपर चिकटवावा. कागद लावण्यापूर्वी भिंत अगदीं वाळलेली असावी. चांगल्या कणकीची खळ करून तींत थोडा सरस, व किड्यांनीं कागद खाऊं नये म्हणून थोडा मोरचूद टाकून या खळीनें कागद चिकटवावा. खळींत थोडी तुरटी टाकली म्हणजे ती लवकर पसरतां येऊन साफ बसतें. भिंतीस कागद लावल्यावर त्यावर स्वच्छ फ्ल्यानेल गुंडाळलेला वाटोळा रूळ फिरवून साफ करावा, सुरकुती पडूं नये. हातानें साफ करण्याचा बिलकुल प्रयत्न करूं नयें. कारण कागद नाजूक असल्यास फाटून त्याची घाण होतें.

जुन्या कामास ओला रंग देणें:- ज्या जुन्या कामास ओला रंग द्यावयाचा तें काम फार मळलें असेल तर घासून व खरडून साबणाच्या पाण्यानें धुवून काढावें. धुरकट किंवा ओशट झालें असेल तर चुन्याच्या पाण्यानें धुवून काढून प्यूमिस दगडानें त्याचा पृष्ठभाग घासावा व नंतर रंगाचा पहिला हात द्यावा. हा हात देतांना १० पौंड सफेत्यांत अर्धा ग्यालन जवसाचें तेल, २॥ तोळें शेंदूर व मुरदाडशिंग ५ तोळे घालतात. व एवढ्या रंगांत २०० चौरस फूट पृष्ठभाग झांकला जातो. हा हात वाळल्यावर दुसरा हात देतांना १० पौंड सफेत्यात ग्यालन जवसाचें तेल व ३/१४ टरपेनटाईन आणि ५ तोळे मुरदाडशिंग घालतात. व एवढ्या रंगानें सुमारें ३५० चौरस फूट पृष्ठभाग झांकला जातो. हा हात वाळल्यावर तिसरा हात देतात.ह्यांत १० पौंड सफेत्यांत पाव ग्यालन जवसाचें तेल, ५ तोळे मुरदाडशिंग व पाच ग्यालन टरपेनटाईन घालतात.

वि द्यु द्वा ह क:- जेव्हां कोणतीहि इमारत फार उंच असेल व तिच्याभोंवतीं तिच्या उंचीच्या इमारती नसतील त्यावेळी अशा इमारतीवर वीज पडण्याची भीति असते. व ती पडूं नये म्हणून विद्युद्वाहक पट्टया किंवा गज अर्धा इंच व्यासाचे बसवितात. जेथें सुरुंगाची दारू वगैरे एकदम पेट घेणारे पदार्थ भरलेले असतील त्या ठिकाणीं तर विद्युद्वाहकाची आवश्यकता फार असतें. हे विद्युत् वाहक म्हणजे तांब्याच्या सळ्या किंवा १'' x १/८'' मापाच्या पट्टया असतात. त्यांचे वरचें टोंक इमारतीच्यावर पांच फूट ते सात फूट ठेवावें व त्याला त्रिशुळा सारखें ३ किंवा ५ टोकांचें तांब्याचें फळ बसवितात. व त्या पट्टया किंवा गज माध्यापासून तों थेट पायापर्यंत सांधे झाळून एकजीव केलेले असावे लागतात. म्हणजे वरून त्रिशुळानें आकर्षिलेला विद्युतूप्रवाह ह्या पट्टीतून किंवा गजांतून खालील विहिरींतल्या पाण्याला जाऊन मिळतो. जवळ पाण्याची विहीर नसली तर येवढ्याकरितां लहानशी विहीर, पाणी लागेपतोपर्यंत खोल करतात, किंवा जवळून पाण्याच नळ जात असल्यास हा विद्युद्वाहक त्या नळाला जोडतात व जेथे नळ नसेल अशा ठिकाणीं दमट माती निघेपर्यंत खाडा करतात व त्या खाड्यात ३ फूट लांब व ३ फूट रुंद व एकषोडशांश इंच जाड असा तांब्याचा पत्रा पुरुष त्या पत्र्याला विद्युद्वहक पट्टी झाळून जोडतात व त्याच्या भोंवतालीं साधे कोळसें व गोटे किंवा रेती घालून खाडा भरून काढतात. पावसाळ्याच्या पूर्वी मे महिन्यांत असे विद्युद्वाहक तपासावे. आणि ते तपासतांना ज्या भुईंत विद्युतद्वाहक नेऊन सोडला असेल तिचा विद्युतप्रतिरोधकपणा (रिझीस्टन्स) दहा ओमपेक्षांहि कमीच असला तर तो विद्युतद्वाहक आपलें काम योग्य रीतीनें करील असें समजावें. कधीं कधीं विद्युद्वाहकाची पट्टी पाण्याच्या नळांनां सांधा करून जोडतात.

इमारतीवर वीज पडू नये म्हणून इमारतीचा अतिशय उंच भाग असेल अशा भागावर विद्युद्वाहक तोडगा बसवितात. विद्युद्वाहकाचा वरील टोंकाकडील भाग भरीय पाऊण इंच व्यासाचा तांब्याच्या सळईचा असावा व त्याचें टोंक वर्तुळ शंकूप्रमाणें असावें. शंकूची लंब उंची सळईच्या त्रिज्येबरोबर असावी. ह्यावरील टोंकाकडील भागाची उंची ज्या इमारतीस विद्युद्वाहक लावावयाचा त्या इमारतीचा जो भाग सर्वांत उंच असेल त्यावर ५ फूट असावी. वाहकाच्या टोंकांस फ्लटिनम धातूची अणकूची बसवितात. किंवा त्यावर गंज वाढूं नये म्हणून मुलामा अथवा कल्हई करतात.

वाहक माध्यापासून तळापर्यंत अविच्छिन्न असून त्यास इमारतीवर ठिकठिकाणीं अटक करून तो बसवावा. इमारतीच्या ज्या बाजूस पावसाचा झोक विशेष असेल त्या बाजूस विद्युद्वाहक लावून जमिनींत न्यावा. आढें, छप्पर, पन्हळ वगैरेंत धातूचें जे पृष्ठभाग असतील ते सर्व वाहकांशीं तांब्याच्या पट्टयांनी जोडावे. जेथें जेथें वेगवेगळ्या पट्टया जोडावयाच्या असतील तेथें तेथें वाहकांच्या तुकड्यांची टोकें स्वच्छ करून त्यास तिरपा पालव साधा करून स्फूर्ती किंवा रिव्हेटानीं पक्का जोडून कस्तूरसांधा करावा. वाहकाचा खालचा भाग जमिनींत ३ फूट खोल न्यावा. व त्याच्या टोंकांस १॥ x अष्टमांश इंच या मापाची तांब्याची पट्टी वस्तूर करून जोडून जमिनींत ३ फूट खोल चर खणून त्यांतून इमारतीपासून ३० किंवा ४० फूट लांब नेऊन तिच्या टोंकाशीं ३ x ३ फूट x एकषोडशांस इंच इतक्या जाडीचा तांब्याचा पत्रा जोडून हा पत्रा, ओली राहील अशा मातीत खळगा करून त्यांत पुरून त्यासभोवतीं लोणारी कोळसे घालावेत. तसेंच चरांत तांब्याच्या पट्टीसभोंवतीहि कोळसे घालून चराच्या राहिलेल्या भागांत वाळू घालून चर बुजवून टाकावा. आणि इमारतीच्या आसपासचे सर्व पाणी या खळग्यांत जाईल असें करावे.

का रा गि री व म जु री.

दर एक वाकबगार मनुष्यानें दररोज किती काम केलें पाहिजे ह्याचे साधारण मान:- उत्तम माठीव काळ्या दगडाचें काम १॥। घनफूट, ठोकळ्याचें काम (ब्लॉक इन कोर्स) ४ घनफूट, थराचें पहिल्या प्रतीचे बांधकाम ९ घनफूट, दुसर्या प्रतीचें १२॥ घनफूट, तिसर्या प्रतीचें २० घनफूट; बीन थराचें उबराचें बांधकाम २० ते २५ घनफूट, दगडमातीचें बांधकाम ५० घनफूट, सुक्या दगडाचें बांधकाम ३३ घनफूट, वीट चुन्याचें पहिल्या प्रतीचे बांधकाम १७ घनफूट, दुसर्या २५ घनफूट (९ इंच जाडीचीच भिंत असेल तर ह्याच्या पाऊणपट काम उतरतें), चिंखलविटांचें बांधकाम २५ घनफूट, माठीव दगडाच्या कमानीं १ ते १॥ घनफूट, ठोकली कमान २॥ घनफूट, विटा-चुन्याच्या कमानी १० ते १२॥ घनफूट , दगडाच्या कामाच्या दरजा भरणें ६६ चौरस फूट, वीटकामाच्या दरजा भरणें ५० चौरस फूट, पाऊण इंची सिमेंटची अस्तरगारी ३३ चौरस फूट, चुन्याचें फ्लॅस्टर ३ हात २२ चौरस फूट, काळ्या दगडाची फरशी पहिल्या प्रकारची ३ चौरस फूट, दुसर्या प्रकारची ४॥ चौरस फूट, ३र्या प्रकारच्या ६चौरस फूट, शहाबादी फरशी ३० ते ४० चौरस फूट, सिलिंग किंवा छत ५० चौरस फूट, मंगलोरी कौलांसाठी रिपा बसविणे १०० चौरस फूट, साध्या कौलांसाठी रिपा बसविणें ६० चौरस फूट, देशी कौले दुहेरी बसविणें १०० चौरस फूट, नळीच्या पत्र्याचें रूफ ३३ चौरस फूट, मंगलुरी ढापे बसविणें ५० रनिंग फूट, पन्हाळी गटारें बसविणें १२ ते १६ रनिंग फुट, सागवानी चौकटीचे काम २ घनफूट, रंगाचे ३ हात ६० चौरस फूट, व्हारनिशचे २ हात १ चौरस फूट, व्हाईट वॉश किंवा सफेतीचे ३ हात ४०० चौरस फूट, जाळीकाम एक्सपांडेड मेटल किंवा छरपट्टयांचें काम ५० चौरस फूट, जाळीकाम लांकडी चौकटी सुद्धां ३३ चौरस फूट, खोदाण मातींत ५ फूटपर्यंत उंची, वाहतूक १०० फूटांपर्यंत ७५ फूट वरील मापाचेंच कच्च्या मुरमांत ५० घनफूट, मध्यम मुरुमांत ३५ घनफूट व कठिण मुरुमांत २५ घनफूट, मऊ किंवा पिठ्या दगड (वाहातूक ५० फुटांपर्यंत) १६ घनफूट, खोदकाम काळ्या कठिण दगडांत (वाहतूक ५० फूट ८ घनफूट काळी खडी फोडणें १॥ इंची १० घनफूट, खडी डोक्यावरून वाहून नेणें (वाहतूक १०० फूट) ८६ घनफूट (वाहतूक ३०० फूट) व ५० घनफूट (वाहातूक ६६० फूट) ३५ घनफूट.

घुमट:- घुमट म्हणजे नियमित बहुकोणाकृति किंवा वर्तुळाकृति जागा झांकण्यासाठीं अर्धगोलाकृति किंवा लंबगोलाकृति दगडानें बांधलेलें अच्छादन होय. खालच्या इमल्याच्या भिंती किंवा खांब यांच्या योगानें जरी गाभारा चौरस होत असला तरी कांही उंचीवर चारी कोपर्यांत दगडांचे थोडथाडें थर बाहेर काढून किंवा कमानी करून समभुज अष्टकोन तयार करून घेतात. त्याच्या वरील भाग षोडशभुजांचा व त्याच्या वरील भाग वर्तुळ असा करून घेतात. व त्याच्यावर मुसुलमानी पद्धतीचें अर्धगोलाकृति घुमट किंवा शिखरपद्धतीचे लंबगोलाकृति घुमट बांधतात. भिंती फार जाड व मजबूत असाव्या लागतात. कारण त्यांच्यावर फार भार यावयाचा असतो. घुमट अर्धगोलापेक्षां जास्ती उंचीचे असलें म्हणजे चांगले दिसते व व मजबुतीलाहि चांगले असते.

इ मा र ती चा ये णा रा ख र्च.- ह्या खर्चाचा अदमास करतांना इमारतीची बाहेरील लांबी व रुंदी यांचा गुणाकार करून त्या गुणाकारास उंचीनें गुणिले असतां जें घनफळ येईल त्या घनफळाला इमारत कोणत्या प्रकारची आहे तें हिशेबांत घेऊन दर घनफुटास इतके आणे घेऊन त्यावरून ठोकळ मानानें इमारतीची एकंदर किंमत काढतां येते. असें करतांना इमारतीची उंची म्हणजे जमिनीपासून रुफाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जें माप असेल तें घेतात. आणि व्हरांडा किंवा पडव्या यांचेहि संबंध माप घेतात. सन १८६० पासून १८७५ पर्यंत मुंबईच्या मोठमोठ्या सरकारी इमारती झाल्या त्यांत युनिव्हर्सिटीच्या राजाभाई टॉवरला दर घनफुटास सुमारें १५॥ आणे इतका खर्च लागला आणि युनिव्हर्सिटी हॉल, लायब्ररी, सेक्रेटरी एट, पब्लिक वर्क्स ऑफिस वगैरेंनां दर घनफूटास ७ पासून १० आणे इतका खर्च लागला आणि पोस्ट ऑफिस तारऑफिस, हायकोर्ट वगैरेंनां दर घनफुटास ४॥ ते ६ आणे इतका खर्च लागला व त्यानंतर सन १९०० पर्यंत बांधलेल्या पुण्याच्या टेलिग्राफ बिल्डींग्स आणि सेक्रेटरीएट ऑफिसेस व मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज, स्कूल ऑफ आर्ट, कॅथेडूल हायस्कूल वगैरेस दर घनफुटास ४ आणि इतका खर्च आला परंतु १९१४ नंतर बांधलेल्या इमारतींनां दुपटीपेक्षांहि गस्ती सर्व लागलेला आहे.

पा णी पु र व ठा.

श ह रा स कि बा गां वा स पा णी पु र व ठा.- अशा पाण्याचा पुरवठा (१) विहिरीतून, (२) बोअरिंग म्हणजे जमीनीत भोकें पाडून त्यांतून येणार्या पाण्याचा, (३) नदीला किंवा ओढ्याला धरण बांधून बनविलेला तलाव, (४) जिवंत झरे अथवा निर्झर ह्यांतून वाहून येणारा.

शु द्ध पा णी.- कोणत्याहि प्रकारानें पाणी आणले तरी तें शुद्ध असलें पाहिजे. तें पिण्याचें पाणी इतकें शुद्ध असले पाहिजे कीं, त्यांत शुद्ध अमोनिया १० कोट भागांत ८ भागापेक्षां जास्ती असूं नये. तसेंच अल्युमिनाईक अमोनिया १ कोट भागांत १ भागापेक्षां जास्ती नसावा. तसेंच पाण्याचें काठिण्य (क्ला्र्कच्या स्केलप्रमाणें) २ ते ५ अंशापेक्षां कमी असूं नये आणि १५ अंशांपेक्षा जास्ती असूं नये. खेरीज त्यांत कोणत्याहि विषारी धातूचें लवण असतां कामा नये. अशा रासायनिक शूद्धतेचे पाणी असावें आणि जंतुशास्त्राच्या दृष्टीनें पाण्यांत रोगोत्पत्ति करणारे सूक्ष्म जंतूहि त्यांत असतां कामा नये.

पा ण्यां त दो ष क से ये ता त.- साधारणत: ज्या विहिरीत झरणाचें पाणी येतें तें ज्या जमिनीतून झरून येतें त्या जमिनींत पाण्यांत दोष उत्पन्न करणारे क्षार किंवा जंतू असण्याचा संभव असेल अशा उथळ विहिरीचें पाणी वापरांत घेऊं नये. तसेंच पिण्याच्या पाण्यासाठी जे तलाव बांधावयाचें त्या तलावांत जेवढ्या भूप्रदेशावरून पावसाचें पाणी वाहून येऊन तलाव भरतो त्या प्रदेशांत शेती किंवा मनुष्याची किंवा जनावरांची वस्ती असतां उपयोगी नाहीं. कारण अशी वस्ती असली म्हणजे माणसें व जनावरें यांपासून उत्पन्न होणारी सर्व घाण, तसेंच शेतीला जें खत वगैरे घालतात त्याची घाण पाण्याबरोबर वाहून येऊन सर्व पाणी दूषित होतें. ओढ्यानाल्यांतूनहि घाण पडण्याचा संभव असतो आणि त्यांतीलहि पाणी थोड्या फार शुद्धीकरणानंतर वापरांत घेता येतें. कोणत्याहि प्रकारचे पाणी वापरण्याचें नक्की करण्यापूर्वी निदान वर्षभर तरी त्या पाण्याचे नमुने वरचेवर घेऊन त्यांचे रासायनिक पृथक्करण करून त्यांत दोष फार नाहींत आण मनुष्यास वापरावयास तें बिनधोक्याचें आहे अशी खात्री करून घ्यावी लागते. रासायनिक शुद्धता ज्याप्रमाणें तपासावयाची त्याप्रमाणेच जंतुशास्त्रज्ञाकडूनहि पाण्याची (बॅकट्रिवालाजिकल) तपासणी करवून त्यांत रोगबीजे नाहींत ह्याबद्दलहि खबरदारी घ्यावी लागते.

पा ण्या ची त पा स णी.- पाण्याचे नमुने पाठवितांना पाव ग्यालनची स्वच्छ बाटली भरून व तिला कांचेचें अथवा नवीन म्हणजे कोरें लांकडी बूच बसवून व सील करून धाडतात. आणि त्या नमुन्याबरोबर तें पाणी झर्याचें किंवा नदीचें किंवा ओढ्याचें किंवा तलावाचें किंवा विहिरीचें असेल त्या बद्दलची माहिती, नमुना विहिरीतून घेतला असेल तर त्या विहिरीचा व्यास, खोली, कोणत्या प्रकारच्या जमिनीत ती खोदली आहे आणि वरच्या बाजूच्या जमिनीतून घाण पाणी झिरपून विहिरीत जातें की काय याबद्दलचा खुलासा असावा. तसेंच विहिरीत किती फूट पाणी आहे व तें किती खोलीवर आहे हेंहि नमूद करावे. तसेंच विहिरीच्या जवळ घाण पाण्याच्या कुंड्या मोर्या खताचे ढीग किंवा तबेले आहेत की काय व पाण्याचा नमुना तलावांतील असल्यास कोणत्या प्रकारच्या जमिनीवरून तें पाणी येत आहे व तलावांची स्वच्छता ह्याबददलहि दोन शब्द लिहिले असावेंत. तसेंच मोठा पाऊस पडून गेला कीं काय किंवा बरेच दिवसांत पाऊस पडला नाहीं हेंहि लिहावें. नमुन्यांच्या प्रत्येक बाटलीवर चिठ्ठी लावून त्यावर नंबर किंवा अक्षर लिहावें.

त पा स णी च्या का मां त ख ब र दा री.- जंतुशास्त्रज्ञाकडून पाण्याचे परीक्षण करावयाचें असल्यास नमुन्याच्या बाटल्याहि त्यांच्याकडूनच मागवून त्यांच्या सांगण्याप्रमाणें त्या बाटल्या शुद्ध करून व भरतांनाहि आणि बंद करून झांकतांना सुद्धां कोणत्याहि घाणीचा किंवा रोगबीजाचा संसर्ग न लागेल अशी खबरदारी घ्यावी लागते. हे नमुने घेतल्याबरोबर आणि इच्छित पद्धतीनें बंद करून ताबडतोब धाडले पाहिजेत कारण ह्या आपल्या उष्ण हवेच्या प्रदेशांत पाण्यांत जे सूक्ष्म जंतू असतील ते उष्णतेच्या योगानें भराभर वाढण्याचा संभव असतो.

द र मा ण शी पा णी.--कोणत्याहि शहराच्या पाणी पुरवठ्याचा अंदाज करताना दर माणशी दररोज १५ ते ३० ग्यालन पाणी लागेल असे हिशेबांत धरतात. मुबलक पाणी मिळावयाजोगें असल्यास जास्ती आणि येणारें पाणी थोडे असल्यास माणशीं १५ ग्यालनच घेतात. परंतु शहरांत घाण पाण्याच्या मोर्या असून मैला वगैरे सुद्धां पाण्याच्या लोटानें वाहून जावा अशीं व्यवस्था केली असेल आणि गिरण्या किंवा दुसरे इतर कारखानें असतील किंवा यात्रेचें ठिकाण असेल व लोकांचा एकदम मोठा जमाव जमण्याचा संभव असेल अशा ठिकाणी दर माणशी दर दिवसांत ३० ग्यालन पाणी लागेल असें अंदाजांत धरावें. ह्या पाण्यापैकीं ५ ते ६ ग्यालन रोजच्या व्यवहाराला लागते आणि स्नान व धुण्याला ५ ते ६ ग्यालन लागतें. मिळून प्रत्येक माणशीं १० ते १२ ग्यालन पाणी दररोज लागतेंच. ह्याखेरीज सार्वजनिक पायखाने व मुतार्या, रस्त्यावर पाणी शिंपडणें. सार्वजनिक बागा वगैरेकरतां, गाव ५-१० हजार वस्तीचें असल्यास माणशीं २ ग्यालन आणि ५० हजारांपेक्षां जास्ती वस्तीच्या मोठ्या शहरांतून माणशी ५ ग्यालन. जेथें फ्लशिंगचें पायखाने असतील अशा ठिकाणी माणशी ३ ग्यालन, तसेंच धोबी, घाट, तबेले, जनावरें ह्यासांठी २ ते ३ ग्यालन आणि खाजगी बागांसाठी माणशी २ ते ५ ग्यालन अशा रीतीनें १५ ते ३० ग्यालन पाणी माणशी लागतें. ह्याखेरीज मोठाल्या कारखान्यांनां पाणी लागेल तें वेगळेंच.


न ळां चा आ का र:- यात्रेच्या ठिकाणी पाणीपुरवठा करणें असल्यास यात्रेंतील प्रत्येक इसमास रोज ५ ग्यालन पाणी लागेल असें हिशोबांत धरतात. नळांचा आकार म्हणजे व्यास किती मोठा पाहिजे हें काढतांना रोज साधारणतः जितकें पाणी लागत असेल त्याला १४४० नीं भागिलें म्हणजे दर मिनिटाला अमुक ग्यालन पाणी लागतें तो आंकडा येतो. ह्याच्या तिप्पट पाणी वाहून जाईल एवढें मोठाले नळ घातले पाहिजेत. आणि सध्या जितकें रोज पाणी लागत आहे त्याच्या दीडपट पाणी कांही वर्षांनी लागेल असा हिशेब धरून तितकें पाणी मिळावें अशी व्यवस्था करून ठेवतात.

फि ल्ट र.- पाणी जेव्हां विहिरीतून किंवा बोअरिंग मधून किंवा झर्याच्या नळांतून आणलेले असेल जेव्हां ते आहे तसेंच वापरू देण्यास हरकत नाहीं. परंतु तेव्हां तलावांतील किंवा ओढे नाल्यांतून आणून वापरावें लागतें. तेव्हा ते पाणी जरा वेळ ठरून देऊन नंतर फिल्टरमधून गाळून निघाल्यानंतर वापरावयास देतात. हें पाणी ठरून देण्याचें फिल्टरमधून गाळून काढण्याचें हौद गांवाच्यां वरच्या बाजूस परंतु जवळच करतात.

पा णी ठ र वि ण्या चे हौ द.- पाणी ठरविण्यासाठीं हे हौद बांधतात ते दोन प्रकारचे असतात. एका प्रकारांत जें पाणी येईल तें एक दिवसभर ठरल्यानंतर तें फिल्टरांतून गाळण्याची व्यवस्था केलेली असते. आणि दुसर्या प्रकारांत पाणी एकसारखें वाहात येत असतें आणि अतिशय सावकाश गतीनें वळसे घालीत घालीत तें शेवटी त्यांतून वाहात जाऊन पाणी गाळण्याच्या फिल्टरांत जाऊन पडते. पाणी जास्ती गढूळ असेल तर तें जास्ती वेळ ठरवावे म्हणजे निवळून द्यावें लागतें. हें पाणी ठरविण्याचे हौद २ किंवा अधिक विभागांत बांधतात. असें केलें म्हणजे एका विभागांतील गाळ काढून धुवून टाकीत असतां दुसर्या विभागांतील पाणी वापरतां येतें. हे सर्व विभाग त्यांत ६ ते १२ फूट पाणी राहील इतके खोल करतात आणि प्रत्येक विभागाची जितकी रुंदी असेल त्याच्या दीडपट लांबी ठेवतात.

या हौ दां ती ल न ळ.- या हौंदांत पाणी सोडण्याचा नळ जितक्या उंचीपर्यंत पाणी भरावयाचें असेल त्याच्या वरच्या बाजूस ठेवतात. आणि त्यांतून पाणी निघून जाण्याचा नळ हा हौदाच्या तळच्या कांक्रीटावर सुमारें ६ इंच ठेवतात व या हौदांतील ठरलेले किंवा निवळलेले पाणी, हौदांतील पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली १५ ते १८ इंच नळाचें तोंड राहील असा पाण्यावर तरणारा नळ बसवून त्यांतून फिल्टरांत जाऊन पाणी पडेल अशी व्यवस्था करतात. हौदाच्या प्रत्येक विभागाला वेगवेगळे पाणी आंत येण्याचे व आंतील पाणी बाहेर जाण्याचे नळ, तसेंच पाणी जास्त झाल्यास आपोआप पाणी बाहेर जाण्यासाठी  हौदाच्या पूर्णत्वाच्या रेषेबरोबर बसविलेले हौदाच्या भिंतीतील नळ आणि तो तो विभाग धुऊन काढण्यासाठी अगदीं तळच्या कांक्रीटांत बसविलेले असे चारहि प्रकारचे नळ लागतात. हे शेवचे दोन म्हणजे जास्त पाणी वाहून जाण्याचे आणि धुवून टाकण्याचे नळ बाहेरील बाजूस सगळ्या विभागाचें मिळून एकच असतात.

हौ दां ची बां ध णी. - ह्या हौदांचे सर्व पाणी आंत येण्याचे व बाहेर सोडण्याचे व्हॉल्व्ह पाण्याच्या बाहेरच असावेत आणि ते जमीनीवरून फिरविण्याची व्यवस्था करावी. हे सर्व हौद पाण्याचें टिपूस बाहेर न जाईल असे असावेत आणि त्यांच्यावर रूफ किंव आच्छादन असावें आणि खाली कांक्रीटची जमीन केलेली असते तिला मधोमध एक गटार बांधून त्या गटाराकडेस जमिनीला दोन्ही बाजूंकडून उतार द्यावा. एक दिवसपर्यंत किंवा निदान १२ तास पर्यंत तरी पाणी ठरूं देण्याची सोय असेल अशा ठिकाणीं ह्या प्रकारचे हौद बांधतात. परंतु ज्या ठिकाणी जसजसें येईल तसतसें पाणी वापरूं देणें इष्ट असेल अशा वेळी वेगळ्या प्रकारची रचना करतात. ह्यांत हौद मोठाले असून त्यांत लांबच लांब खण किंवा विभाग पाडून पाणी अगदीं सावकाश म्हणजे तासाला सुमारें १ इंच गति ह्या प्रमाणांत पाणी वाहील अशी व्यवस्था करतात. पाण्याची गति इतकी सूक्ष्म असल्यामुळें हे हौद फार मोठे बांधावे लागतात. परंतु त्यांत पाण्याची उंची (हेड) फारशी कमी होत नाहीं हा फायदा असतो.

फि ल्ट र चे प्र का र.- ह्या हौदांतून निघालेलें पाणी फिल्टरमधून म्हणजे गाळण्यांतून घालवितांत. ह्या गाळण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एक प्रकार रेतीच्या थरांतून सावकाश पाणी वाहूं देणे आणि दुसरा प्रकार गाळणीच्या यंत्रांतून पाणी जलदीनें गाळून काढणें; ह्यापैकीं पहिला प्रकार धुळें, सातारा कँप, कर्हाड, विजापूर आणि खडकी ह्या ठिकाणी पहावयास सांपडतो. आणि दुसरा प्रकार हुबळीं व पुणें येथें दिसून येतो.

फि ल्ट र किं वा गा ळ ण्या.- ह्यांचा आकार ठरवितांना रेतीचा केवढा पृष्ठभाग पाणी गाळण्यास उपयोगी पडतो त्यावरून ठरवावयाचा असतो. अशा गाळण्यांतून, रेती, गोटे व खडी वगैरेंच्या ५ फूट जाडीच्या  थरांतून (ह्या पैकीं निदान २॥ फूट जाडी तरी बारीक रेतीची असली पाहिजे) पाणी घालविलें असतां २४ तासांत दर चौरस फूट रेतीच्या पृष्ठभागांतून ५० ग्यालन म्हणजेच दर तासी सुमारें २ ग्यालनपेक्षां जास्ती पाणी जातां उपयोगीं नाहीं. ह्यापेक्षां पाणी जास्ती गेलें तर तें बरोबर गाळलें गेलें नाहीं असें समजावयाचें.

फि ल्ट र हौ दां ची र च ना.- हे फिल्टरचे हौद बहुतकरून ४ विभागांचे करतात आणि त्यांतील ३ विभागांतून जितकें पाणी आपल्याला रोज पाहिजे असेल तितकें मिळावें एवढे मोठे ते केले पाहिजेत. राहिलेला चौथा भाग त्यांतील रेती वगैरे धुऊन साफ करून फिरून घालण्यासाठी बंद ठेवतात व अशा रीतीनें जो भाग रेतीतील छिद्रें गाळानें बुजून गेल्यामुळें पुरेसें पाणी देईनासा होतो असा भाग धुण्यासाठीं बंद करून बाकीच्या ३ भागांतून पाणी वाहातें ठेवतात. ह्या सर्व चाराहि विभागांचें नियंत्रण मधोमध बांधलेल्या चौरस हौदाच्या आंतून करतां येतें. ह्या प्रत्येक विभागाची लांबी रुंदीच्या दीडपट असते आणि ते सर्व भाग वीटचुन्याचे किंवा दगडचुन्याचे बांधलेले असतात व त्यांची जमीनहि कांक्रीटची असते यामुळें त्यांतून पाणी बिलकुल झिरपून जात नाहीं. ह्या कांक्रीटांच्या नळांत मध्यापासूनच्या कर्णरेषेत गाळलेलें सर्व पाणी वाहून भोंवर्यांत बसविलेल्या नळांतून बाहेर जावें म्हणून एकेक प्रणालिका बांधून व्यवस्था केलेली असते. ह्या चार विभागांतील मध्यस्थ प्रणालिकेवर फरशा ठेवून व त्या फरशांमध्यें थोडथोडें अंतर ठेवून झांकून काढतात व नंतर सर्व जमिनीवर पक्क्या विटांच-प्रत्येकामध्यें थोडथोडी जागा सोडून –थर एकमेकांवर ठेवून तळाचा सर्व भाग झिरपलेलें पाणी वाहात जाऊन प्रणालिकेंत पडेल अशी विटांची मांडणी करतात. असा हा दोन विटांचा म्हणजे सुमारें ६ इंच जाडीचा जाळीदार थर झाला म्हणजे त्यावर ६ इंच जाडीचा जाळीदार थर झाला म्हणजे त्यावर ६ इंच जाडीचा फोडलल्या खडीचा थर देतातं. या थरावर ६ इंच जाडीचा मोठ्या मोठ्यांचा थर व त्यावर ६ इंच जाडीचा बारक्या गोट्यांचा थर असावा आणि त्यावर ६ इंच जाडीचा जाड्या रेतीचा थर असावा. आणि ह्या थरांवर २ फूट जाडीचा बारीक रेतीचा थर असावा. रेती इंचांत ७० ते १०० भोकें असणार्या चाळणीतून चाळून न जाणारी आसावी. ह्या २ फूट जाडीच्या थरावर ६ इंच जाडीचा अतिशय बारीक रेतीचा थर घालावा. अशा रीतीनें तळच्या ६ इंच जाडीच्या विटांच्या थराखेरीज ४॥ फूट जाडीची गाळणी तयार होते. वरील बाजूचे ३ फूट जाडीचे रेतीचे थर हे शुद्ध सिकतेचे म्हणजे गारेच्या कणांचें असावे. त्यांत माती बिलकुल असूं नये. ह्या फिल्टरांच्या तळापर्यंत हवा पोहोचावी म्हणून रेतीचे थर घालावयाच्या पूर्वी नळ उभे करून ठेवतात. त्यांतून फिल्टरिंगचें काम चाललें असतां हवा खेळत राहते.

पा ण्या चें ले व्ह ल.- अशा प्रकारच्या फिल्टरांतून ती चांगली बनलीं म्हणजे पाणी नीट गाळून शुद्ध करूं लागलीं म्हणजे फिल्टरांतील पाण्याचें लेव्हल हें त्यांतून गाळून शुद्ध झालेल्या पाण्याच्या टाकींतल्या पाण्याच्या लेव्हलपेक्षां २॥ फुटांनी जास्त असलें पाहिजे. परंतु असें होण्यापूर्वी ह्या दोन लेव्हलमध्यें फरक पुष्कळ वेळां १८ इंचहि आढळून येतो. असा १८ इंचांचा फरक असतां जर रेतीच्या दर चौरस फुटाएवढ्या पृष्ठ भागांतून दर तासास २ ग्यालन पाणी गाळून मिळत असेल तर बरेंच; परंतु बरेच दिवस फिल्टर वापरांत राहिलें आणि रेतींतील छिद्रें गाळानें भरून गेली म्हणजे वरील दोन लेव्हलमध्यें (फिल्टरिंग हेड) २॥ फूटपर्यंतहि फरक पडतो आणि असें केलें म्हणजेच दर तासी दर चौरस फुटांतून २ ग्यालन पाणी येऊं शकतें. पाहिल्यापासूनच हा २॥ फुटांचा फरक ठेवला तर दर तासीं २ ग्यालनपेक्षां पाणी जास्त येऊं लागलें म्हणजेच त्याचें गाळणें किंवा शुद्धीकरण बरोबर होत नाहीं असें समजतात. २॥ फुटांचा फरक असतांनाहि तासीं २ ग्यालन पेक्षा कमी पाणी जर गळून येऊं लागलें तर तें फिल्टर धुण्याची किंवा साफ करण्याची वेळ आली आहे. असे समजावे. याच्या उलट फिल्टर नवें भरललें असलें तर त्यांतून फिल्टरिंग हेड १८ इंच असतांनाहि त्यांतून तासीं २ ग्यालन पाणी मिळूं शकतें आणि म्हणून इतकेंच फिल्टरिंग हेड साधारणत: ठेवतात. यासंबंधांचा साधारणत: नियम असा आहे कीं, रेतीचा थर जितक्या जाडीचा असेल त्याच्या पेक्षा जास्ती फिल्टरेशन  हेड ठेवूं नये. म्हणजेच रेतीचा थर ३ फूट जाडीचा असला तर फिल्टरेशनहेड २ फुटांच्या पेक्षां जास्ती असतां कामा नयें. फिल्टरेशनच्या हौंदांत पाणी सारख्याच उंचीवर म्हणजेच साधारणत: रेतीच्या पृष्ठभागाच्या वर २ ते ३ फूट राहील असें करतात. या रेतीच्या गाळणीची सर्वांत उत्तमावस्था रेतीच्या पृष्ठभागावर एक प्रकारच्या सायटीचा पातळ थर तयार झाला म्हणजेच होय. अशा अवस्थेंत पाण्याचें जास्तीत जास्ती शुद्धीकरण होऊं शकतें. अशी अवस्था पुष्कळ दिवस टिकावी या हेतूनेंच अशा फिल्टरच्या थराला पुष्कळ दिवसपर्यंत हात लावूं नये. जेव्हा २॥ फूट फिल्टरेशनहेड ठेवूनहि पाणी नीटसें गळेनासें होतें तेव्हां फिल्टरचा तोहि भाग बंद करून त्याच्या वरील सायटी खरवडून काढतात आणि नंतर त्यात शुद्ध केलेलें पाणी खालून सोडून वरपर्यंत तें भरून देऊन नंतर तो विभाग फिरून गाळणीच्या उपयोगासाठीं सुरू करतात. अशा प्रकारच्या शुद्धीकारणाला व पाणी गाळून काढण्याला पुणें येथें दर हजार ग्यालनास सुमारें १ पैसा खर्च येतो आणि प्याटर्सन फिल्टरर्समधून जलदीनें पाणी गळून काढण्यासहि सुमारें तितकाच खर्च येतों.

हीं दुसर्या प्रकारचीं फिल्टरें जेव्हां रोज पाण्याचा खप दांडगा असेल तेव्हांच चांगले काम देतात. म्हणजे पाण्याचे शुद्धीकरणहि चांगले होतें व खर्चहि कमी लागतो. ह्या फिल्टरांत थोडी तुरटी घालून तिच्या योगानें पाण्यातील घाण व माती जलदीनें तळाला बसवितात आणि एक प्रकारची सायटी बनून त्यांतून पाणी चांगलें गाळून निघतें. अशा फिल्टरांत रेती धुण्यासाठी यांत्रिक योजना केलेली असते आणि पुणें येथील प्याटर्सन फिल्टरमध्यें दाबलेल्या हवेच्या पेट्टयांतून किंवा हौदांतून दाबलेली हवा जोरानें सोडून तेंच काम करून घेतात.

ह्या जलदीनें पाणी गाळण्याच्या पद्धतीत आलेल्या अशुद्ध पाण्यांत दर एक ग्यालनास एकतृतीयांश ते दोन २ ग्रेन तुरटी किंवा सल्फेट ऑफ अॅल्युनिमा टाकून तसें पाणी ४ ते ६ तासपर्यंत ठरूं देतात आणि  त्यानंतर यांत्रिक गाळणीतून दर चौरस फुटास दर तासास ८० ग्यालन याप्रमाणें दाबून गाळून काढतात म्हणजेच रेतीच्या साध्या फिल्टरांतून जे ताशी २ ग्यालन पाणी मिळतें त्याच्या ऐवजीं यांत ८० ग्यालन म्हणजे सुमारें ४० पट पाणी गाळतां येतें. आणि फिल्टरांतून ताशी ८० ग्यालनाइतका प्रवाह सुरू ठेवण्यास पाण्याचा दाब (फिल्टरेशन हेड) ५ ते १२ फूट ठेवावा लागतो. अशा गाळणींतून पाणी गाळून काढल्यानंतर दर लाख ग्यालयन पाण्याला १॥ पौंड ब्लीचिंग पावडर म्हणजे धोबी वापरतात तो शुभ्रकक्षार म्हणजेच क्लोराईड लॉक लाईन (जिच्यांत शेंकडा तीस टक्के तरी क्लोरीन असेल अशी) पाण्यांत टाकून त्यांतील रोगजंतूंचें विनाशन करतात. ही गाळ तळाला बसविण्यासाठीं घालावी लागणारी तुरटी व रोगजंतुविनाशक शुभ्रकक्षार यांचें द्रावण (सोल्युशन) करून वेगवेगळ्या हौदांतून साटवून ठेवतात. आणि वर दिलेल्या प्रमाणांत ती प्रत्येक पाण्यात मापसर ओततात.

अशा रीतीनें शुद्ध कलेलें पाणी मोठ्या टाकींत साठवून तें शहरांत जाणार्या मोठ्या नळांत सोडतात. अशा तळ्याचा सांठा दिवसभर मिळून जितकं पाणी लागतें त्याच्या निदान तृतीयांशाइतका तरी असला पाहिजे. अशा बहुतकरून दोन टाक्या बांधतात. व कधीं कधीं दिवसभर लागणार्या पाण्याइतका सांठा दोन टाक्या राहील इतक्या त्या मोठ्या बांधतात. मोठ्या टाक्या बांधतांना या टाक्यांतील पाण्याची खोली ९ ते १५ फूट ठेवतात. आणि त्यांनां तळाशीं धुऊन टाकण्यासाठीं नळ बसवितात. आणि त्यांवर आच्छादनानें छप्पर किंवा गच्ची करून त्यांतून हवा जाण्यासाठी नळ बसवितात.

ह्या शुद्ध पाण्याच्या हौदातून सर्व गांवाला पुरेल इतकें पाणी वाहून नेणारा मोठा नळ बसवून तो, त्यापासून शाखा व उपशाखा काढल्यानंतर लहान लहान आकाराचा करीत करीत जेथपर्यंत पाणी न्यावयचें असेल तेथपर्यंत नेतात.

बि डा चे  न ळ घा ल णे:- ज्या जागेंतून नळ जावयाचा असेल त्या जागेंत नळावर सुमारें २।। फूट भरती येईल अशा बेताचा चर खणावा. नळ टाकल्यानंतर त्याच्या भोंवती माती घातल्यावर ती ठोकून तुडवावी. नळावर १ फूट उंचीचा थर होईल अशा बेताने माती घातल्यावर  तीवर पाणी घालून ठोकावी. व याच्या वरील थर ६ इंच जाडीचे घालून ठोकावे. रस्ता असल्यास त्याचा पृष्ठभाग पूर्ववत् करावा. खडकाळ जमिनींत नळ घालणें झाल्यास त्यांत चर खणून खडकाच्या तळावर त्यांची तोंडें व उथळ्या एकमेकांत ठोकून बसवाव्या. व नंतर सांधे भरावे. पहिल्यानें नळाच्या उथळीच्या (साकेट) आंतील बाजूस पिंजलेल्या पांढर्या तागाचा १ थर ठोकून बसवावा. शिसें ओतण्यास अदमासें २॥ इंच जागा राहीपर्यंत जाईल तितका नुसता पिंजलेला किंवा पातळ डांमरात भिजवून पिंजलेला ताग फटींत ठोकून बसवावा. राहिलेल्या जागेंत नव्या गटाचें शिसें असून एकदा ओतल्या बरोबर ती जागा भरून जाईल अशा बेतानें ओतावें. शिसें नळाच्या तोंडाबरोबर असून तें निदान ३ वेळां तरी ठोकावें. ठोकण्याकरितां छिनीं चांगली बेताची असून हातोडा अदमासें ४ पौंड वजनाचा असावा. शिसें ठोकून बसविल्यानंतर त्याचा भाग उथळीच्या बाहेर आला असल्यास तो तोडून टाकावा. छिनीनें ठोकण्यापूर्वी शिशाचा रस निवूं द्यावा. नळांचीं तोंडे व उथळ्या कातलेल्या असल्यास त्यांनां शेंदरी ओला रंग द्यावा. आणि ती नीट एकमेकांत ठोकून सांध्यांत राहिलेल्या जागेंत शिसें ओतून तें निवाल्यावर छिनीनें ठोकून बसवावें.

पा ण्या च्या ख पा च्या मा ना नें न ळां ची यो ज ना.- ज्या ज्या भागांत वस्ती दाट असल्यामुळें पाण्याचा खप फार मोठा, त्या त्या भागांतून पाण्याचें मुख्य मोठे नळ नेतात. पाण्याच्या खपाचें दर मिनिटास जें सरासरी प्रमाण असेल त्याच्या दुप्पट पाणी नळांतून जाऊं शकेल एवढ्या मोठ्या आकाराचे  नळ बसवितात. आणि अशा नळांतून जास्तीत जास्ती खपाच्या वेळीं पाणी वाहात असतां कोणत्याहि ठिकाणी जमीनीच्या वर २० ते ३० फूट पाणी चढेल (दोन मजली घरें आहेत असें समजून) इतका पाण्याचा दाब (रेसिडयूअल हेड) राहील अशा हिशोबानें नळांचा व्यास कायम करतात. शहराचा पृष्ठभाग फार उंचनीच असला म्हणजे वरच्या भागासाठीं वेगळा हौद आणि खालच्या भागासाठी वेगळा हौद (सर्व्हिस रेझरवायर) बांधून त्यांतून त्या त्या भागांतले नळ भरलें जातील अशी व्यवस्था करतात. प्रत्येक हौदाचें सांठवण त्या त्या भागाला एक दिवसभर पाणी पुरेल एवढें मोठें ठेविलें पाहिजें. आणि हे हौद १ ते २४ तासांत भरतील अशा बेताचे मोठे नळ, शुद्ध पाण्याच्या मुख्य हौदापासून ह्या वेगवेगळ्या हौदांपर्यंत बसविले पाहिजेत.

न ळ ब स वि णें.- हे सर्व नळ बिडाचे असतात आणि ते होतां होईल तितक्या सरळ रेषेंत बसवितात व ते बसवितांना त्यांना एकसारखा आधार मिळेल असा सारखा चरासा तळ ठेवून व त्याचा डोक्याजवळचा जाडी भाग जेथें यावयाचा तेथें चरांत जास्त खोलीची खोबण पाडून नळ सर्व ठिकाणीं जमिनीवर टेंकून राहील आणि त्याला बाजूनेंहि सारखा आधार मिळाल्यामुळें चर भरल्यानंतर वरून जाणार्या गाड्यांच्या वगैरे वर्दळीमुळें ते फुटत किंवा तडकत नाहींत असे बिडाचे नळ ३ इंच व्यासापर्यंतचे वापरतात. ह्याच्यापेक्षां कमी व्यासाचे नळ जस्ताची कल्हई केलेले लोखंडाचे असतात.

व्हा ल्व्ह, ए  अ र व ल्का व र व्हा ल्व्ह.- हे नऊ बसवितांना नळाच्या रेषेंत जर चढउतार असतील तर नळाचा उंचांत उंच जो भाग असेल त्या ठिकाणीं हवेचे बुडबुडे जमून नळाचा पाणी वाहण्याचा मार्ग रोधतात. आणि हा उपसर्ग दूर करण्यासाठीं तेथें एअरव्हाल्व म्हणजे हवा बाहेर सोडून देण्याचे पडदे बसवितात. व जरूर पडेल तेव्हां हा व्हाल्व्ह उघडला म्हणजे सांठलेली सर्व हवा ह्याच नळाच्या रेषेंतील नीचांत नीच जो बिंदु असेल त्या ठिकाणी स्का ब र व्हा ल्व्ह म्हणजे नळांत बसणारा गाळ धुवून काढण्यासाठीं बसविलेला पडदा बसवितात; हा उघडला म्हणजे सांठलेला गाळ आणि नळांतील सर्व पाणी काढून टाकातां येतें.

रि फ्ल क्स व्हा ल्व्ह.- जेव्हां नळाची रेषा एकसारखी पुष्कळ लांबपर्यंत चढत जात असते तेव्हां नळ फुटला असतां सर्व पाणी नळाकडे वाहात येऊन जें नुकसान होतें ते वांचविण्यासाठी रिफ्लक्स व्हाल्व्ह बसवितात. हे व्हाल्व्ह नळांतून पाणी नेहमीं जिकडे वाहात असतें तिकडे थोड्या दाबानें उघडतात. परंतु नळ फुटल्याच्या योगानें पाणी उलट दिशेस वाहूं लागलें तर लागलीच बंद होतात.

स्लू स व्हा ल्व्ह.- कोणत्याहि नळांतून पाणी वाहाणें बंद करणें असेल किंवा त्याचा प्रवाह कमी जास्ती करावयाचा असेल अशा ठिकाणीं स्लूस व्हॉल्व्ह म्हणजे वरखालीं सरकवितां येण्याजोगें पडदे बसवितात. असे पडदे जेथें जेथें शाखा किंवा उपशाखा मुख्य नळांतून काढाव्या लागतात. त्या त्या ठिकाणीं बसवितात. व मुख्य नळावरहि अशा शाखांच्या खालच्या बाजूंस ते बसवितात. त्यांच्या योगानें कोठेंहि आग लागली असतां बाकीच्या बाजूंकडे पाणी जाणें बंद करून फक्त आगीच्या ठिकाणींच पाण्याचा दाब पुष्कळ वाढल्यामुळें

 

बिडाच्या नळांचें प्रमाण व ते बसवितांना लागणारें सामान वगैरे बद्दलचें कोष्टक
नळाचा व्यास इंच नळाची लांबी फूट नळाची जाडी इंच नळाचें वजन पौंड खाकेटची खोली इंच दर सांध्यास शिसें पौंड दर खांब्यास ताग पौंड सांध्यांतील शिशाची लांबी इंच
०.३८ १२९ ४|| ०.२५
०.३९ १७२ ५|| ०.३८
०.४३ २८६ ३|| ०.४४ २.४०
०.४९ ४८५ १३|| ०.६९ २.९०
१० १२ ०.५२ ७३० १४.७५ ०.७५ २.९०
१२ १२ ०.५७ ९३० १७ १.०६ २.२०
१८ १२ ०.६९ १६८५ ४|| ३१.५० २.०७ ३.१०
२४ १२ ०.८० २६०४ ४१.२५ २.६६ ३.७
३६ १२ ०.९७ ४७०८ ७१|| ४.१३ ३.२५

 

जुन्या नळांतून दर मिनिटास किती ग्लालन पाणी वाहून जाईल याचे कोष्टक
स्लोप दर हजारी फुटास ३ इंची नळ ग्लालन पाणी ४ इंची नळ ग्लालन पाणी ६ इंची नळ ग्लालन पाणी ९ इंची नळ ग्लालन पाणी १२ इंची नळ ग्लालन पाणी २४ इंची नळ ग्लालन पाणी
०.५ ६.२ १३.४ ३८.९ ११२.९ २४०.६ १४९०
९.१ १९.५ ५६.५ १६४.२ ३४९.८ २२६८
१३.३ २८.३ ८२.२ २३८.७ ६०८.८ ३१४९
१९.३ ४१.१ ११९.५ ३४६.१ ७३९.८ ४५७१
२८.१ ५९.८ १७३.७ ५०४.७ १०७६.७ ६६५८
१६ ४०.८ ८७.० २५२.६ ७३३.९ १५६४ ...
२० .४६ ९८.१ २८४.९ ८२७.९ १७६४ ...
लहान जुन्या नळांतून दर मिनिटास किती ग्यालन पाणी वाहतें त्याचें कोष्टक
स्लोप १/४ इंची नळ १/२ इंची नळ २ इंची नळ १ इंची नळ १|| इंची नळ २ इंची नळ २||इंची नळ
०.८३ .०११९ .०६८१ .२४५२ .४६२६ .२४९० .२८३४६ ५.०६०३
१० .०४५७ .३११६ .९४०३ १.७७३ ४.७७९८ १०.८४७९ १९.१९
१०० .१५८६ १.०८ ३.२६ ६.१५ १६.५७ ३७.६१ ६६.५५
५०० .३७८५ २.५९ ७.७७ १४.६६ ३९.५२ ६९.६६ १५८.७२

फायर इंजिनला पुरेसें पाणी मिळेल अशी व्यवस्था करतां येते. मोठ्या नळावरील अशा व्हाल्व्हवर दाब फार असल्यामुळें ते उघडण्यास फार कष्ट पडतात. उदाहरणार्थ:- जर नळ ३६ इंच व्यासाचा असेल आणि त्यावर पाण्याचा दाब २५० फूट उंचीच्या पाण्याचा असेल तर त्या व्हॉल्व्हवर ५० टनांइतका दाब पडेल आणि असा दाब पडला असतां तो व्हॉल्व्ह वरखालीं सरकविण्यास ७ टनांइतकें खेचाण उपयोगांत आणलें पाहिजे. बिडाच्या नळाच्या प्रमाणांसंबंधीं कोष्टक वर दिलें आहे.

वि हि री.- दहा फूट खोलीच्या व यापेक्षां कमी खोलीच्या विहिरी बांधून काढतांना वीटकामाची जाडी १३॥ इंचांची ठेवतात. याच दगडाच्या बांधल्यास १२ इंच जाडी ठेवतात. ह्यापेक्षांहि खोली जास्ती असल्यास दर ७ फुटांस ३ इंच ह्याप्रमाणें जाडीत वाढावा करतात. जेथें विहीर बांधून काढण्याची जरूरी भासत नसेल अशा ठिकाणीं  सुद्धां अगदीं वरचें ६ फूट बांधून काढले असतां जमिनीवरील घाण पाणी आंत जाण्याचा संभव रहात नाहीं. ज्या वेळेला कठडा अथवा बाभूळ, चिंच यांचा सांगाडा करून त्यावर विहिरीचें बांधकाम करतात तेव्हां ६ फूट व्यासापर्यंत जाड फळ्यांच्या २ थरांचा आणि ह्यापेक्षां जास्ती व्यासाच्या विहिरीसाठीं ३ थरांचा सांगाडा करतात. बारीक रेतींत विहीर खोदली आणि तिचा तळ विहिरीच्या बाहेरील पाण्याच्या लेव्हलपेक्षां ५ पासून ७ फूट ठेवला तर अशा विहिरीतून दर चौरस फुटास दर तासास सुमारें १६ ग्यालन पाणी मिळतें. तशीच विहीर जाड रेतींत खोदली तर निम्में म्हणजे दर ताशीं ६ ग्यालन पाणी मिळण्याचा संभव असतो.

पं प.- जेव्हां विहिरींतलें पाणी पंपानें चढवून शहरास पाणीपुरवठा करणार्या टाकींत नेऊन सोडतात तेव्हां ते पंप किती हॉर्सपावरचे (अश्वशक्तीचे) असले पाहिजेत. ह्याचा हिशेब करतांना पंपानें दर मिनिटास जितकें ग्यालन पाणी काढलें पाहिजे. तितक्या ग्यालनांनां १० नीं गुणिलें म्हणजे दर मिनिटास तितकें पौंड पाण्याचें वजन पंपाचें उचललें असें समजावयाचें, आणि हया आंकड्याला, पाणी जितकें फूट चढवावयाचें असेल (पंपाच्या उच्छोषणनलिकेंत-म्हणजे सेक्शन पाईपांत पाणी शिरेल त्या लेव्हलपासून, ज्या टाकींत पाणी नेऊन सोडलें असेल त्या टाकीच्या माथ्याजवळ ज्या लेव्हलवर पाणी चढविले असेल तेथपर्यंत उंची जितके फूट असेल तितक्या फुटांत उच्छोषण व उच्चालन नलिकांतून पाणी ढकललें जात असतांना जितक्या फुटांचा घर्षणरूपी विरोधाचा परिहार करावा लागतो तितके फूट मिळवून) तितक्यानें गुणून ३३ हजारांनी भागलें म्हणजे किती पंपहार्सपांवर लागेल हें निघतें.

पं पिं ग एं जि न ची श क्ति.- पंपिंग एंजनची जितकी इंडीकेटेड् हॉर्सपॉवर (वाफेनें किती दाबानें किती लांबपर्यंत सिलेंडरांतील दट्टया सरकविला ह्यावरून काढलेल्या कामाचे माप 'वर्कडन') असेल त्याच्या ४/५ इतकी ब्रेकहॉर्सपॉवर म्हणजेच त्या एंजिनची प्रत्यक्ष काम करण्याची शाक्त असते. आणि ह्या ब्रेकहॉर्सपॉवरच्या ११/२० पासून ते १३/२० पर्यत पंप हॉर्सपॉवर म्हणजे पंपानें प्रत्यक्ष काढलेल्या पाण्यावरून मोजलेलें काम वर्कडन असतें. ह्यावरून वर काढलेल्या पाण्यावरून मोजलेलें काम वर्कडन असतें. ह्यावरून वर काढलेल्या पंप हॉर्सपॉवरच्या १॥ पट ते २ पट इंडीकेटेड हॉर्सपॉवरचें एंजिन वापरलें पाहिजे असें निघतें. असें पुरें काम करील एवढ्या शक्तीच्या पंपाचे दोन सेट किंवा संच ठेवावे लागतात. कारण एक नादुरुस्त झाल्यास दुसरा सुरू करतां येतो.

पं पिं ग प्लँ ट च्या किं म ती.- अशा प्रकारचे पंपिंग प्लँट ५ हॉर्सपॉवरपर्यंतचे असले तर त्यांनां दर पंपहॉर्सपॉवरला ३ हजार रुपये खर्च येतो. तेच १० हॉर्सपॉवरचे असले तर २२५० रु.; २० हॉर्सपॉवरचे असले तर १५००रु.; ४० हॉर्सपॉवरचे असले तर ११२५ रु. आणि ८० हॉर्सपॉवरचे असले तर दर हॉर्सपॉवरला फक्त ९०० रुपयेच खर्च येतो.

त्या चा रो ज चा ख र्च.- अशा प्रकारचीं पंपिंग एंजने चालविण्यांत १० हॉर्सपावरपर्यंतच्या लहान एंजिनांस दर पंपहॉर्सपॉवरला दर तासास सुमारें १२ आणे खर्च येतो. आणि ह्याच्यापेक्षां मोठ्या एंजिनांस, ती रोज ८ तास काम करीत असलीं तर ताशी ६ आणे आणि मोठीं एंजिनें एकसारखीं काम करीत असलीं तर दर पंपहॉर्सपॉवरला दर तासास फक्त १॥ आणा खर्च येतो. यांत एंजिन चालविणार्या माणसांचे पगार, दगडी कोळसा, तेल वगैरेंचा समावेश होतो. परंतु रिपेअरर्स, घसारा किंवा झीज आणि मुदलावरील व्याज हीं येत नाहींत असें पंप बसवून नळांतून पाणी चढविण्यास नळ केवढ्या व्यासाचा असला पाहिजे हें काढतंना नळांतून दर सेकंदास एक ते तीन फूटपर्यंतचा वेग घेतात आणि त्यावरून नळाचा प्रकार ठरवितात.

न ळां चा ख र्च.- पाणीपुरवठ्याच्या कामासाठीं जे बिडाचे नळ बसवितात त्यांनां सध्यां (१९२५ सालीं) खर्च येतो तो असा:- ३ इंची नळास २रु. १४ आणे दर फुटास; ४ इंची नळास ३ रु. ११ आणे दर फुटास; ६ इंची नळास ५ रु. ११ आणे दर फुटास; ९ इंची नळास ९ रु. ३ आणे दर फुटास; १२ इंची नळास १२ रु. ११ आणे; १८ इंची नळास २२ रु. ४ आणे; २४ इंची नळास ३३ रु. आणि ३६ इंची नळास ५९ रु. दर फुटास खर्च येतो. ह्यांत चर खणून त्यांत नळ बसविणें, शिसें ओतून त्याचें सांधे बसविणें वगैरें सर्व कामें येतात. जस्ताची कल्हई चढविलेले बारीक नळ बसविण्यास सध्यां (१९२५) एक इंची नळास सुमारें ८ आणे आणि २ इंची नळास १ रु. २ आणे खर्च येतो.

हा य ड्रॉ लि क रॅ म.- ज्या ज्या ठिकाणी उंचीवरून पाणी खालीं पडतें त्या त्या ठिकाणी ह्या खालीं पडणार्या पाण्याचा, काम करून घेण्याकडे उपयोग करून घेता येतो. उदाहरणार्थ; पुणें येथें जो कालवा आहे त्या कालव्यांतून ४ इंचांच्या नळांतून पाणी आणून तें ३० फूट खोलीवरील एका ओढयांत हॉयड्रोलिक रॅम बसवून त्यांत ह्या ३० फूट उंचीवरून पडणार्या पाण्याची जी धडक बसते त्याच्या योगानें तर ३०० फूट उंच असणार्या पर्वतीच्या टेंकडीवर १॥ इंची नळांतून पाणी चढविलें आहे. ३० फुटांच्या धडकीनें ३०० फूट म्हणजे १० पट उंचीवर पाणी चढवायाचें म्हणजे तें अर्थात १० वा हिस्साच चढणार. परंतु पाण्याच्या धडकेची कांही शक्ती घर्षणांत व व्हॉल्व्हचे पडदे उघडण्यांत गेल्यामुळें त्या धडकेच्या सुमारें २/३  इतकेंच प्रत्यक्ष काम पदरांत पडतें. ह्याचाच अर्थ पाणी १० वा हिस्सा न चढतां १५ वा हिस्साच चढतें आणि कालव्यांतून पाणी दर मिनिटास ६० ग्यालनप्रमाणें वाहून येते तरी फक्त ४ ग्यालनच पाणी दर मिनिटास वर हौदांत जाऊन पडतें आणि ५६ ग्यालन खाली ओढ्यांत वाहून जातें.

ज ल प त न श क्ति.- लोणावळ्याजवळ टाटा कंपनीनें मोठाले तलाव बांधून जें पाणी पूर्वेकडेस वाहात जाऊन कृष्णा नदींतून बंगालच्या उपसागरास मिळालें असतें तें पाणी सह्याद्रीच्या पश्चिम  बाजूच्या दरडीवरून खाली कोंकणांत उतरवून अरबी समुद्रांत सोडलें आहे व अशा रीतीनें  पाण्याला सुमारें १८०० फूट इतक्या खोलीवर पडण्याला वांव मिळाल्यामुळें किती तरी हजार हॉर्सपॉवरची शक्ति ह्या जलपतनापासून उत्पन्न करून व त्या विद्युच्छक्तीचा उपयोग मुंबईस केला जात आहे.

वै द्यु त अ श्व श क्ति. - ही वाटरहॉर्सपावर (औदक अश्वशक्ति) दर सेकंदास जितके पौंड पाणी वाहून जात असेल तेवढ्याला जितक्या फूट उंचीवरून तें पाणी खालीं पडतें तितक्या फुटांनीं गुणून ५५० नीं भागिलें असतां जी येईल ती होय. परंतु ज्या टरबाईंडला (जलौघानें प्रेरित चक्राला) ह्या जलौघानें प्रेरणा मिळते त्या औदक शक्तीच्या इतकें काम तें टरबाईड देऊं शकतें. म्हणजेच दर सेकंदास जितके घनफूट पाणी नळांतून सोडलें असेल त्याला, जितक्या उंचीवरून सुटून तें टरबाईडवर जाऊन आपटत असेल तितक्या फुटांनीं गुणून ११ नीं भागिलें असतां येईल तितकें ब्रेकहॉर्सपॉवर समजावयाची. ह्या आंकड्यांतून त्याचा सुमारें २० वा हिस्सा कमी केला म्हणजे इलेक्ट्रिकल हॉर्सपॉवर (वैद्युत अश्वशक्ति) निघते. आणि अशी एक वैद्युत अश्वशक्ति ही पाऊण किलोवाटबरोबर असते. ह्या शक्तीच्या सुमारें २/३ पासून ३/४ पर्यंतच शक्ति, ज्या कारखान्यांत विद्युच्छक्तीचा उपयोग करावयाचा असेल त्या ठिकाणीं उपयोगांत आणतां येईल.

वर सांगितलेल्या प्रकारचें मोठे तलाव बांधतांना पाणी जर एक हजार फूट खोलीवर सोडतां आलें आणि ४९ कोटी घनफूट पाण्याचा सांठा आपल्याला आपल्या तलावांत करतां आला तर तेवढ्या पाण्यानें आपल्याला एक वर्षपर्यंत एक हजार किळोवाट इतक्या विद्युच्छक्तीचा उपयोग करूं देतां येईल. परंतु असें कोणतेंहि काम एकसारखें चालत नसल्यामुळें पाण्याच्या तेवढ्याच सांठ्यानें २ हजार किलो वाटपर्यंत काम करून घेतां येतें. टाटा कंपनीच्या लोणावळ्याजवळील वळवण तलावांत २८० कोटी घनफूट पाणी सांठवितां येतें.

पि ण्या च्या पा ण्या सा ठी बां धा व या च्या वि हि री. -अशा विहिरी स्वच्छ जागा पाहून त्या ठिकाणीं बांधाव्या आणि त्या आंतून वीटचुन्यानें किंवा दगडचुन्यानें बांधून काढाव्या आणि त्यांच्या फक्त तळांतूनच पाणी येईल असें करावें. विहिरीच्या तोंडाशीं विहिरीच्या वरवंडीपासून सर्व बाजूंनी उतार करावा. म्हणजे वर सांडलेलें घाण पाणी झिरपून पुन्हां विहिरींत जाणार नाहीं.

वि हि रीं ची नि गा.- विहिरींवर पंप बसवावा किंवा सांखळी किंवा दोर आणि त्याला बादली बांधलेली असावी. विहिरीच्या माथ्याजवळ ३ फूट उंचीची वरवंडी असावी आणि तिच्या बाहेरील बाजूंस ६ फूट रुंदीची कांक्रीटची गच्ची किंवा फरसबंदी करून बाहेर सांडणारें पाणी लांब निघून जाईल असें करावें. सोय असल्यास विहिरीवर आच्छादन असावें. परंतु हवा खेळेल अशी व्यवस्था करावी. विहिरीच्या आसपास खड्डे असल्यास तें भरून काढावे आणि आंत पानें वगैरें पडूं नयेत म्हणून जवळपास झाडें असूं नयेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ कपडें धुणें, आंघोळ करणें वगैरे करूं नये. विहिरीच्या आसपास घाण पाण्याच्या कुंड्या, पायखानें, उकिरडा हीं असतां कामा नयेंत. त्याच  प्रमाणें माणसें पुरण्याची जागाहि जवळ असूं नये.

वि हि री बां ध णें (पाण्याकरतां).- विहीर वीट चुन्याची किंवा दगडचुन्याची बांधून काढणें झाल्यास तळांत कडें घालून त्यावर बांधकाम करण्यापूर्वी खोदईचें कांम उन्हाळ्यांत वाहणार्या कायम झर्याच्या क्षितिजपातळीच्या खालपर्यंत जाऊं द्यावें. विहीर खोदल्यानंतर बांधकामाखालील जो वाटोळा लांकडाचा तराफा करतात त्याला कडें म्हणतात. कित्येक वेळेस कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला थर लागेपर्यंत, त्यावर बांधलेल्या बांधकामासह कड्याखालची जमीन उकरून मग कडें खालीं उतरावें लागतें. कडें खैर, बाभळ अथवा चिंत किंवा पाण्यांतून कुजेल अशा कोणत्याहि लांकडाचें करतात. गुजराथेंत अशीं कडी बहुतकरून शमीच्या लांकडाची करतात. ६ फूट किंवा कमी व्यासाचें विहिरीचें कडें (कर्व्ह) ज्या जाडीचें करणें असेल तिच्या अर्ध्या जाडीच्या लांकडाची दोन कडी करून ती एकमेकांवर जोडावी. पण ह्या व्यासाहून अधिक व्यास असला तर एकंदर जाडीच्या एकतृतीयांश जाडीची निरनिराळीं ३ कडीं करून ती बोलटांनीं एकमेकांवर जोडावीं. बांधकामाची रुंदी एका विटेहून म्हणजे ९ इंचांहून अधिक असल्यास विटांची चक्रे बांधून एकमेकांस जोडावीं. व त्यांची सांधमोड करावी. वेगवेगळ्या चक्रांचा जोड मजबूत व्हावा. मधून मधून एका चक्रांतील विटा दुसर्या चक्रांत शिरतील अशा बेतानें घालव्या. निरनिराळ्या थरांतील लंबरेषेंत असणारें सांधें एकमेकांवर येऊं देऊं नयेत. कित्येक ठिकाणीं खालच्या लांकडी कड्यांत बोल्ट घालून तें बांधकामांतून जमीनीच्या पृष्ठभागापर्यंत आणून बांधकामाच्या माध्यावर लोखंडी चक्र बसवून त्यावर बोल्टाच्या चाक्या फिरवितात. विहिरीचा व्यास फारच थोडा असेल तर २ इंच जाडीची व १२ इंच रुंदींची खापरी चक्रे एकमेकांवर ठेवून विहीर बांधून काढावी. कड्याखाली उकरून तें वरील बांधकामासह खालीं उतरतांना बरोबर लंबरेषेंत उतरवावें. व तसें तें उतरत आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठीं बांधकामाच्या आंतल्या बाजूस ३ ओळंबे टांगून ठेवावे. बांधकाम जितकें उतरावयास पाहिजे तितकें उतरल्यावर त्याच्या सभोंवती खोदलेल्या जागेंत दगडाच्या काचळा किंवा मुरुम घालून ठोकावें. कशा प्रकारच्या विहिरी गुजराथेंत बांधतात. इकडे महाराष्ट्रांत विहीर खोदून चांगला धर लागला म्हणजेच बांधकाम त्या घरापासून वर बांधीत आणतात. चांगला  थर लागला नाहीं तरच बांधकामाखालीं कडें घालतात.

पा णी पु र व ठ्या च्या का मां ती ल प रि मा णें.- १ ग्यालन = ८ पाइंट = २७७ घनइंच = ७०००० ग्रेन वजन + ग्यालन; १ पातळ अंस = ४३७०५ ग्रेन (अव्हार्डू) व १ पौंड अव्हार्ड = ७००० ग्रेन; १ घनफूट बर्फ ५७.८ पौंड भरतें व समुद्राचे पाणी ६४.११ पौंड भरतें. पाणी ३९ अंश (फा. ही.) असतांना त्याचें वजन ६२.४२५ पौंड असतें तेंच १०० अंश (फा. ही.) पर्यंत तापविलें असतां बरोबर ६२ पौंडच भरतें; १ चौरस मैलावरून १ इंच पाणी वाहून गेलें. तर तें दर सेकंदास ६४६ घनफूट इतकें भरतें आणि एक एकरावरून वाहून येणारे पाणी सुमारें १ घनफूट येतें; दर सेकंदास १ घनफूट पाणी वाहून येत असलें तर तें ५४००० माणसांनां एक दिवसांत १० ग्यालन प्रमाणें पुरेसें होतें. (दर सेकंदास १ घनफूट म्हणजे सुमारें १६ मोटांचें पाणी असें समजावें. ); १०००० माणसांनां रोज १० ग्यालन पाणी दिलें तर वर्षाला ५८॥ लक्ष घनफूट पाणी लागेल; दर चौरस इंचावर १ पौंडाचा दाब पडला म्हणजे तो २.३ फूट इतक्या उंचीच्या पाण्याचा समजावयाचा, कारण हवेचा दाब दर चौरस इंचावर १४.७ पौंड इतका म्हणजेच ३३.९ फूट पाणी = २९.९ इंच पारा एवढा असतो; १५.५६ पौंड दर चौरस इंचावर म्हणजेच दर चौरस फुटावर १ टन होय. स्थूलमानानें हवेचा दाब दर चौरस इंचावर १५ पौंड घेतांत = पार्याचे ३० इंच = पाण्याचे ३४ फूट; एक हार्सपावर (अश्वशक्ति) = ३००० पौंड १ मिनिटांत १ फूट उचलण्याइतकी = दर सेकंदास ५५० पौंड १ फूट उचलण्यास लागणारी = ८.८ घनफूट पाणी १ सेकंदांत १ फूटभर खालीं पडलें असतां उत्पन्न होणारी शक्ति.

ध र ण.

नद्या आडवून जलसंचयासाठी मोठमोठाले तलाव बांधतात. अशा तलावांच्या नदीच्या पात्रांतून बांधलेल्या ज्या भिंती त्यांनां धरण असें म्हणतात. या भिंतीचा पाया खाली भेगा नसलेला मजबूत खडक लागेपर्यंत खोल न्यावा लागतो. नाहींतर भिंतीचा भार व पाण्याचा धक्का सहन करण्याइतका मजबूत जरी खडक असला तरी त्याच्या भेगांतून पुष्कळ पाणी झिरपून जाण्याचा संभव असतो. त्या भिंती १५० पासून २०० फुटांपर्यंत उंचीच्याहि बांधाव्या लागतात. इतकी उंच भिंत बांधली म्हणजे तिच्या पायावरहि भार फार येतो. खेरीज तलावांत पाणी नसलें म्हणजे भार जशा प्रकारचा आणि ज्या ठिकाणीं येतो त्याच्यापेक्षां वेगळ्या प्रकारचा व वेगळ्या ठिकाणीं, तलाव पाण्यानें भरला असता येतो आणि म्हणून अशा भिंतीची रुंदी तळापाशीं फार ठेवावी लागते. ती अशी कीं, तलाव रिकामा असो अथवा भरलेला असो त्याचा एकंदर सर्व प्रकारचा भार पायाच्या रुंदीच्या मधल्या तृतीयांश भागांतच यावा अशा रीतीची त्या भिंतीची जाडी ठेवावी लागते. प्रो रॉकिंन यांनी अशा धरणाचीं मापें दिली आहेत ती:-धरणांत भिंतीच्या माथ्याची जाडी सुमारें १९ फूट असून त्यापैकीं १॥ फूट आंतील बाजूस व १७॥ फूट बाहेरील बाजूस व १२० फूट खोलीवर ८४ फूट (पैकीं ६ फूट आंतल्या बाजूला व ७४ फूट बाहेरच्या बाजूला) आणि १८० फूट खोलीवर भिंतीची जाडी १७८ फूट (पैंकीं सुमारें १३ फूट आंतल्या बाजूला व १६५ फूट बाहेरच्या बाजूला).

ध र णां ची म ज बु ती.- हीं धरणें फार चांगल्या टिकाऊ,मजबूत दगडांची बांधलेली असावीं. परंतु त्यांच्या मजबुतीचा हिशोब करतांना भिंत बांधतेवेळी लागणार्या सामानांत सगळ्यांत कमी मजबूत पदार्थ म्हटला म्हणजे दगडांचे सांधे करावयासाठी व मध्यें पुरणींत वापरलेला चुनाच होय. म्हणून एकंदर भिंतीची मजबुती म्हणजे चुन्याचीच मजबुती असें घ्यावें लागतें. म्हणून दर चौरस फुटास सुमारें ५ टन यापेक्षां जास्ती भार कोठेंहि न येईल अशी व्यवस्था करावी लागते. चुन्याच्या सांध्याची साहकशक्ति साधारण रीतीनें दर चौरस इंचास ८० पौंड म्हणजे दर फुटास ५ टन इतकी साधारण असतें. म्हणून कोणत्याहि सांध्यावर याच्यापेक्षां जास्ती भार येतां कामा नये. जर भार जास्ती यावयास लागला तर भिंतीची रुंदी वाढवून तो कमी केला पाहिजे. खेरीज ज्यावेळी तलाव रिकामा असाते त्यावेळीं धरणाच्या भिंतीच्या आंतल्या दर्शनी बाजूवर भार जास्ती असतो आणि ज्यावेळी तलाव भरलेला असतो त्यावेळीं पाण्याच्या धक्क्यानें किंवा बाहेर ढकलण्यानें धरणाच्या भिंतीच्या बाहेरील दर्शनी बाजूवर भारातिशय होतो.

बि न थ री बां ध का म.- येवढ्या थोरल्या उंच व जाडी थराच्या भिंतीचा भार सगळीकडे सारखा वांटला जावा म्हणून ही सर्व भिंत एकाच प्रकारच्या बांधकामाची असते. तिच्यांत दर्शनी काम एका प्रकारचें व पुरणीचें काम दुसर्या प्रकारचें असें करता येत नाहीं. कारण दर्शनी भागाला संगीन काम व आंतल्या बाजूला भानगड काम किंवा कांक्रीट असें वापरल्यानें ती वेगवेगळ्या रीतीनें दबण्याचा संभव असतो. व असें झालें म्हणजे या दोन भागांमध्ये तड किंवा फाट पडावयाचीच. येवढ्यासाठी धरणाचे  सर्व बांधकाम बिनथरचें करतात. व त्याच्या योगानें यरामधून पाणी झिरपून जाण्याचा जो संभव असतो तो रहात नाहीं. या बांधकामांतील प्रत्येक दगड ठोकून नीट रीतीनें बसविला पाहिजे व त्यांत पोकळ जागा किंवा फट राहतां कामाची नाहीं. धरणांचा पाया नेहमीं खडक लागेतोपर्यंत खोदतात. कारण १०० फुटांपेक्षां जास्ती उंचीची भिंत मुरमाच्या किंवा मातीच्या पायावर बांधल्यास ती एवढ्या मोठ्या भारानें दबून जाण्याचा संभव असतो.

ध र णा क रि तां त ज वि जी.- धरण बांधतांना मुख्यत: पुढील तीन गोष्टींची तजवीज करावी लागते:-(१) सांड (वेस्ट विअर) म्हणजे तलाव भरल्यावर अधिक पाणी काढून देण्याची व्यवस्था. धरण फार म्हणजे २५/३० फुटांपेक्षां जास्ती उंचीचें नसल्यास सांडपाणी तलाव भरल्यावर आपोआप धरण्याच्या माथ्यावरून वाहवितां येतें. परंतु धरण उंच असल्यास या पाण्याचा धरणांत भिंतीच्या बाहेरील बाजूच्या दगडावर, तसेंच पायाच्या खडकावर परिणाम होऊन धरणाच्या पायास धक्का पोहोचण्याचा संभव असतो. म्हणून धरणाच्या कोणत्याहि एका बाजूस म्हणजे ज्या बाजूकडून कालवा काढला नसेल त्या बाजूस जास्तीत जास्ती पूर आल्यास त्या तलावाचें सांडपाणी वाहून जाण्याएवढी सांड म्हणजे वेस्ट विअर भिंत बांधतात; धरणाच्या बाजूच्या टेंकडींत एखादी खिंड असल्यास व अशा खिंडीतून पाणी जवळच्या नाल्यांत काढून देणें शक्य असल्यास अशा खिंडीत थोड्या खर्चात सांड करतां येते. (२) स्कावरिंग स्लुइसिस (गाळ धुवून काढावयाचें दरवाजे):-हे दरवाजे धरणाच्या अगदीं खोल भागांत तळाशीं ठेवलेले असतात हे फक्त पावसाळ्याच्या आरंभी गाळ धुवून काढण्याकरितां उघडे ठेवितात. (३) पाणी सोडण्याकरितां दरवाजे:- शेतकरीला जरूर लागेल. त्याप्रमाणें पाणी सोडण्याकरितां हे दरवाजे असतात.

मो ठ्या त ला वा क रि तां मा ती च्या  भ रा वा चें बं धा रे.- असे भराव मातीचे असून त्यांच्या मध्यभागी कमावलेला चिखल व कांक्रीटानें भरलेला चर असतो. ज्या जागेवर भराव करावयाचा त्या जागेवरील झाडें झुडपें. गवत किंवा केरकचरा असेल तो काढून टाकून जागा स्वच्छ करावी. जमिनीचा पृष्ठभाग अदमासें ४ इंच खोल खणून त्यांतील झाडांच्या मुळ्या काढाव्या. जेथें भराव नाला किंवा नदी ओलांडून जात असेल अशा ठिकाणीं कमावलेल्या चिखलाच्या किंवा कांक्रीटच्या चराच्या वरच्या, म्हणजे प्रवाहाच्या उगमाच्या बाजूस असलेली सर्व जाडी व बारीक वाळू कठीण जमीन लागेपर्यंत काढून दूर नेऊन टाकावी झर्यांतून पाणी झिरपूं लागलें असतां त्यायोगानें न हालेल किंवा न खचेल अशी वाळू किंवा वाळूमिश्र कठिण गाळ चराच्या खालच्या अंगास असेल तर तो तसाच राहूं द्यावा. वर सांगितल्याप्रमाणें प्रवाहाच्या उगमाकडील बाजूस काढलेली वाळू आणि कमावलेला चिखल भरण्यासाठीं खणलेल्या चरांतील खणून काढलेली माती बंधार्याच्या जागेपासून दूर अंतरावर न्यावी. भरावाच्या मध्यभागांतील किंवा पोटांतील (हार्टिंग) माती पाण्याच्या गतीस प्रतिबंध करणारी असावी. व त्याचे आवरण (केसींग) हवेंत राहून खराब न होईल अशा द्रव्याचें म्हणजे मिश्रित माती आणि मुरुम किंवा वाळूचे असावें.

बं धा र्या क रि तां मा ती.- बंधार्याच्या मध्यभागास लागणारी माती पाणी झिरपून न देईल अशी असावी. व असल्या प्रकारची माती जवळपास अर्ध्या मैलाच्या आंत शोधून काढावी. बंधार्याच्या आंतल्या बाजूस मातीकरितां खड्डा करणें झाल्यास तो भरावाच्या निदान तिपटीच्या अंतरावर असावा. बंधार्याजवळ कोणताहि खड्डा ५ फुटांपेक्षां अधिक खोल असूं नये बंधार्याच्या मध्यभागांतील मातींत कोणत्याहि प्रकारचा क्षार, मुरुम किंवा दुसरें कोणतेंहि गदड नसावें.

बं धा र्या चें  आ व र ण.- हें वर सांगितलेल्या मातीचें असून त्यांत समभाग मुरुम किंवा वाळू असावी. किंवा आवरण जवळपास असलेल्या शाडवट कंकराचें अथवा मुरमाड वाळूचें असावें.परंतु त्यांत लिंबाहून मोठालें गोटे नसावें. स्वच्छ काळ्या मातीचा बंधारा उत्कृष्ट होतो. आवरणाकरतां मिश्रण हातानें करावयाचें झाल्यास मिश्रणांतील द्रव्ये कामापासून कांहीं अंतरावर ठेवावीं. मातीचे आणि मुरमाचे निरनिराळे ६ इंचांचे थर एकमेकांवर घालून ते फावड्यानें चांगलें खालीवर केल्यावर हें मिश्रण घमेल्यांत घेऊन भरावयाच्या जागीं सारख्या जाडीचे थर होतील अशा बेतानें टाकावें.

भ रा व घा ल ण्या चें व ते ठो ण्या चें का म.- हें पुढें सांगितल्याप्रमाणें करावें. वर सांगितल्याप्रमाणे बंधार्याची जागा स्वच्छ करून चांगली पाण्यानें भिजवावी व त्यावर गर्मांतील व आवरणाच्या मातीचे थर ठोकून ३ इंच जाडीचे होतील अशा बेतानें म्हणजे अदमासें ४ ते ५ इंच जाडीचे साफ पसरावे. गर्भाची व आवरणाच्या थरांची रुंदी बंधार्याच्या उंचीच्या मानानें असावी. पहिल्या थरावर रूळ फिरवून चांगला बसला म्हणजे त्यावर भरपूर पाणी घालनू तो भिजू द्यावा. याप्रमाणें थर पसरणें व रूळ फिरविणें हें काम बंधारा संपेपर्यंत चालू द्यावे. रूळ फिरविण्यास अडचण असेल अशा ठिकाणीं भरावयाचें थर जड धुमसानें ठोकून बसवावे. हा धुमस लोखंडी असल्यास बरें.

रूळ.- रूळ दगडी किंवा लोखंडी असावा. परंतु त्याचें वजन प्रत्येक फूट लांबीस पाऊणपासून एक टनपर्यंत असावे. फिरवितांना त्यास माती किंवा मुरुम चिकटल्यास तो काढून टाकावा. भरावावर रूळ फिरविण्याची सोय नसेल अशा ठिकाणी ३ इंच जाडीचे थर घालून त्यावर भरपूर पाणी घालून भिजविल्यानंतर धुमसास चिखल न लागेल असा कांहीं वेळ थर वाळून देऊन त्यावर चाळलेल्या मातीचा थर द्यावा व थर चांगला घट्ट बसेतोपर्यंत धुमस करावा. धुमसाचें डोके लोखंडी असल्यास बरेंच व त्याचें वजन १४ पौंड असावे. नवा भराव जुन्यास जोडावयाचा असल्यास जुन्या भरावाच्या जोडाच्या जागीं उतार देऊन त्यावरील २ फूट उंचीची माती खणून पोकळ करावी. व जुन्या आणि नव्या घातलेल्या भरावावर पाणी घालून ते चांगले ठोकून बसवावे.

क मा व ले ल्या चि ख ला क र तां  च र. - हा चर बंधार्याच्या भरावाच्या मध्यरेषेंत असून त्याच्या बाजू ओळंब्यांत असाव्या. ह्याची खोली खडक लागेपर्यत किंवा कोणत्याहि प्रकारचें पाणी न झिरपून देईल असा तळ म्हणजे मांड जमीन लागेपर्यंत असावी अशी जमीन लागल्यानंतर तींत किंवा खडकाच्या पृष्ठभागाखाली चर, दोन किंवा तीन फूट खोल जावा. परंतु त्याच्या आंतल्या बाजूस उतार एकाच एक या मानानें असावा. चराच्या बाजू ढांसळण्याचा संभव असल्यसा त्यांस लांकडाच्या तक्त्याचे धीरे द्यावे. व चर थोड्याथोड्या लांबीचा खणावा. म्हणजे लवकर भरून काढतां येईल. चराच्या लांबीच्या बाजूस पायर्यांचे टप्पे सांधणीत असून अंधार्यास उतार असावा. टप्पपे व अंधार्या काटकोनांत नसाव्या.

च रा ची रुं दी.- ही बंधार्याच्या भरावाच्या उंचीच्या एकदशांशापेक्षा ३ फूट अधिक असावी. चराच्या दोन्ही बाजूस असणार्या जमीनीवरील चराच्या रुंदीइतकी रुंद व पृष्ठभागापासून २ फूट खोलीची माती काढून तिच्या ऐवजी चांगली पसंत केलेली माती भरून पाणी घालून ठोकून बसवावी. कमावलेल्या मातीचा चिखल घालण्यापूर्वी चरांत असलेले पाण्याचे झरे बंद करावे.

चि ख ल - कमावलेल्या मातीचा चिखल हा स्वच्छ चिकण व पाणी न झिरपूं देईल अशा मातीचा असावा विषेश मऊ, रेवल, कुजलेली, वाळू मिश्रित क्षारयुक्त व फुफाट्याची माती अशा कामास वर्ज करावी. कमावलेल्या मातीच्या चिखलांत मुरुम, लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे खडे, गवत किंवा कचरा असूं नये. चर ओला असेल तर चिखलांत १ भाग माती व १ भाग वाळू असावी. चरांत ९ इंच जाडीचे थर घालावे. व त्यांत थोडें पाणी घालून फावड्याने चिखल चांगला कालवून पायांनी चांगला तुडवावा. परंतु चर फार खोल असून आंत मनुष्याच्यानें काम न करवेल असा तो निरुंद असेल तर फावड्यानें चिखल बाहेर कालवून त्याचे गोळे करून चरांत टाकून ते आंत तुडवावे. चिखलाचे थर सारख्या जाडीचे असून सांधनींत असावे. चिखल चरांत अगदीं वाळूं देऊं नये. कदाचित वरच्या थरावर भेगा पडल्या तर चिखल थोडा उकरून पाणी घालून तुडवावा चिखलाचा पृष्ठभा थोडा वाळूं लागला म्हणजे त्यावर धुमसानें ठोकावें. चिखलाचे थर घालण्याचें काम संपले म्हणजे त्यावर लागलीच भराव करावा. पण भराव करावयास अवकाश असेल तर त्यावर भिजलेल्या गवताचें व मातीचे आच्छादन करावें.

कां क्री टा चा च र.- बंधारा ओढा किंवा नदी ओलांडून जात असेल तर नदींत किंवा ओढांत चिखलाच्या चरापासून १५ किंवा २० फूट खालच्या बाजूस पांच फूट रुंदीचा चर खणून त्यांत कांक्रीट भरावें. हा चर प्रवाहाच्या पात्रांत शाडवट जमीन, खडक किंवा मांड जमीन लागेपर्यंत खणून त्यांत कांक्रीट भरावें. ज्या ठिकाणीं कांक्रीट व कमावलेल्या चिखलाचे चर जोडणें असेल त्या ठिकाणी कांक्रीट चिखलांत दाते करून जोडावें.

को र ड्या द ग डा ची फ र शी.- बंधार्याच्या आंतल्या बाजूंस म्हणजे पाण्याच्या अंगांस पाणी जाण्याचा धारेच्या उंबर्याच्या क्षितिजपातळीखाली २ फुटांपासून महापुराच्या खुणेच्या क्षितिजपातळीवर ३ फूटपर्यंत सुक्या दगडाची फरशी करावी. हे दगड चांगले कठिण खाणींतलें, किंवा हर्षल राहिल्यानें खराब न होतील अशा गुंड्या दगडाचे असावेत. ते बसविल्यावर त्यांच्या खालची माती उघडी पडूं नये म्हणून ते एकमेकांस लागून बसतील असे हातोड्यानें टापून साधारण चौरस करावे. दगडाची मोठ्या तोंडांची बाजू खालीं करून ती मुरुमांत चांगली बसवावी. व फरशीचा उतार सारखा करण्यांसाठी दगडाखाली चिपा ठोकून बसवाव्या. चिपांचा उपयोग फक्त तळाशीं करावा. त्या दगडाच्या बाजूमध्यें ठोकून बसवूं नयेत. दगड हातोड्यानें किंवा मोगरीनें एकमेकांशीं लागतील असे ठोकून बसवावेत. व त्यांचे एकमेकांशीं लागून असलेले सांधे भरावाच्या उताराच्या पातळीशीं काटकोनांत असावे. फरशीची जाडी उताराच्या पायथ्याशी ६ इंच असून ३ इंचांनीं चढत जाऊन महापुरच्या रेषेपर्यंत १ फूट ९ इंच असावी व उताराच्या माथ्याशीं ९ इंच होईल अशा बेतानें कमी करावी. कोरड्या फरशीच्या जाडींत एकाहून अधिक दगड नसावे. बंधार्यास जो उतार नकाशांत दिला असेल तोच उतार कोरड्या फरशींचें काम झाल्यानंतर तिच्या पृष्ठभागास असावा. दगडांचा दुमाला कमीजास्त असेल तर तो भरावाच्या मुरुमांत बसवावा. फरशीचें काम संपलें म्हणजे तिच्या पृष्ठभागावरील गदळ व चुरा काढून टाकावा.

द ग डी ध र णें.

ध र णा मु ळें नु क सा न.-दगडाचें धरण बांधून पाणी आडविलें म्हणजे त्या भिंतीला ३ प्रकारें नुकसान लागण्याचा संभव असतों:-(१) पाण्याच्या दाबाच्या योगानें सबंधच्या सबंध भिंती सरकून जाणें, किंवा (२) पाण्याच्या दाबानें भिंत उलथून पडणें, किंवा (३) भिंतीच्या बाहेरच्या तोंडावर कोण्या एका विवक्षित स्थळीं भाराच्या अतिरेकानें दगड चुरून जाऊन भिंत पडणें ह्या तिन्ही प्रकारांनी भिंतीला नुकसान लागूं नये म्हणून तिचा पाया बर्याच खोलीवर घालून म्हणजेच तळांतील खडकांत सुद्धा ५-१० फूटपर्यंत नेऊन आणि भिंतीची जाडी मोठी ठेवून म्हणजेच चितें वजन वाढवून ती पाण्याच्या भारानें उलथून न पडेल इतकी मजबूत घेऊन, तसेंच भिंतीच्या बाहेरील बाजूस स्लोप देऊन कोणत्याहि ठिकाणीं भारातिरेक होऊन दगड चुरुन जाऊं नये अशी व्यवस्था करावी लागते. बहुतेक ठिकाणीं धरणें तुटून जाण्याचें कारण कममजबूत पाया हेंच असतें. कांहीं कांहीं ठिकाणीं धरणाच्या भिंतीच्या दोन्ही टोकांनां वळसा घालून पाणी वाहूं लागल्यामुळेंहि नुकसान पोहोचतें.

पा ण्या चा दा ब.- पाण्याची खोली जसजसी वाढत जाते तसतसा त्याचा दाबहि वाढत जातो आणि ह्या दाबाची किंवा धरणाच्या आंतील बाजूच्या पृष्ठभागाला काटकोनांत असल्यामुळें आणि ज्या चुन्यानें दगड बांधून बसवितांत त्याची साहकशक्ति फार नसल्यामुळें सगळीच्या सगळी भिंत, ती पुरत्या भाराची नसल्यास सरकून जाते. भिंतीचा जितका भार असेल त्याच्या ५५ शतांशापासून ७० शतांशापेक्षां जास्ती पाण्याचा दाब दगडाच्या बांधकामावर आला तर तें सरकून जाण्याचा संभव असतो. कारण बांधकामाचा घर्षण गुणक (कोएफीशंट ऑफ फ्रिक्शन) इतका म्हणजे ०.५५ ते ०.७० इतका असतो. हाच गुणक रेतीवर बांधकाम केलें असेल तर ०.४० होतो आणि ओल्या मातीवर काम केलें असल्यास .३० इतका होईल.

ध र णा च्या रुं दी चें उं ची शीं प्र मा ण.- खेरीज धरणाच्या भिंतीचे वजन याची क्रिया धरणाच्या गुरुत्व मध्यापासून ओळंब्यांत खालच्या बाजूला असते व सांठविलेल्या पाण्याच्या दाबाची क्रिया म्हणजे स्थूलमानानें क्षितिजसमपातळींत (हॉरिझाँटल) असते आणि ह्या दोहोंंचीं परिमाणरेषा (रिझल्टंट) धरणाच्या पायाच्या मधल्या तिसर्या भागांत पडली तरच भिंतीच्या बाहेरच्या बाजूला बांधकामावर भारातिरेक कधींहि होत नाहीं व त्यामुळें दगड चुरून जाण्याची अथवा भिंत उलथून पडण्याची भीति रहात नाहीं. तसेंच धरण बांधकामाचें व कांक्रीटचें असल्यामुळें त्याचें विशिष्टगुरुत्व २ ते ३ पर्यंत असतें. ह्यामुळें धरणाची रुंदी उंचीच्या साधारण २/३ इतकी ठेवावी.

ध र णा ची मा थ्या ज व ळी ल रुं दी.- ही धरणाच्या उंचीच्या जर दशांशाइतकी ठेवली आणि धरणाची उंची २०० फूट असली आणि भिंतीच्या बांधकामाचें वजन दर घनफुटास १४६ पौंड धरलें तर त्याची माथ्याजवळील रुंदी २० फूट घ्यावी आणि तितकीच १८ फूट खोलीपर्यंत घेऊन ३० फूट खोलीवर २१ फूट; ४० फूट खोलीवर २४ फूट; ६० फुटांवर ३५ फूट. माथ्यापासून ८० फूट खोलींवर रुंदी ५० फूट आणि १०० फूट खोलीवर ६४ फूट होईल आणि त्या ठिकाणीं दर चौरस फुटास ७०६ टन इतका भार बांधकामावर येईल अणि १५० फूट खोलीवर १०१ फूट व बांधकामावर भार दर चौरस फुटास ११ टन इतका होईल आणि २०० फूट खोलीवर त्याच धरणाची रुंदी १३७ फूट आणि भार दर चौरस फुटास १४॥ टन इतका होईल. ह्या १३७ फुटांपैकीं ८॥ फूट आंतल्या बाजूच्या स्लोपाचे आणि २० फूट धरणाच्या माथ्यावरील रुंदीचे आणि १०८॥ फूट आहे. वरील बाजूच्या स्लोपाचे समजावयाचे. ६० फुटांपेक्षां जास्ती उंचीचें धरण असल्यास त्याची माथ्याजवळील रुंदी कमींत कमी ८ फूट ठेवलीच पाहिजे. ती १२ फूट केल्यास वरून रस्ता केल्यासारखें होते. धरणाची उंची थोडी असली आणि दगडी बांधकामाचे वजन दर घनफुटास १५० पौंडांप्रमाणें असलें तर धरणाची रुंदी तळापाशीं उंचीच्या २/३ इतकी ठेवतात. आणि माथ्यापासून उंचीच्या चौथ्या हिश्श्यापर्यंत एकंदर उंचीच्या षष्ठांशाइतकी रुंदी ठेवतात.

धरणाची उंची थोडी असली व भिंत सारख्याच जाडीची बांधिली तर तिची जाडी उंचीच्या निम्म्यानें ठेवावी लागते. पाण्याच्या ऐवजीं, मातीचा भराव घातलेला असेल आणि त्या भरावाचा धक्का ह्या भिंतीला सहन करावयाचा असेल तर ती उंचीच्या ३/१० ते ४/१०  इतक्या जाडीची ठेवली पाहिजे. हीच भिंत माथ्याजवळ २ फूट जाडीची ठेवली आणि तिला पाण्याचा दाब सहन करावयाचा असेल तर ती भिंत तळाशीं उंचीच्या सुमारें २/३  इतकी जाडी ठेवावी लागते. परंतु नुसत्या मातीचाच दाब सहन करावयाचा असेल तेव्हां तिची तळाजवळील एकंदर रुंदी उंचीच्या ७/२० ते ९/२० इतकी ठेवावी.

पा ण्या चा वे ग व गै रें सं बं धीं.

पा णी.- पाणी जेव्हां नळांतून किंवा कोणत्याहि प्रकारच्या द्वारांतून वाहातें तेव्हां त्याची गुरुत्वाकर्षणासंबंधानें येणारी गति कांहीं तरी कमी होतेच. जर हौदांतील पाण्याच्या पृष्ठभागापासून एक फूट खोल असणार्या छिद्रांतून पाणी वाहूं दिलें तर त्याचा वेग दर सेकंदास ८ फूट इतका गुरुत्वाकर्षणाच्या योगानें झाला पाहिजे. तसेंच ही खोली २ फूट असेल तर आठ गुणिले वर्गमूळ दोन, बरोबर ११.२ फूट; आणि हीच खोली ४ फूट असल्यास आठ गुणिले वर्गमूळ ४ बरोबर १६ फूट दर सेकंदास. या रीतीनें जितके फूट खोली असेल त्याच्या वर्गमूळानें आठाला गुणिलें असतां जितका गुणाकार येईल तितके फूट दर सेकंदास, इतका त्या पाण्याचा वेग समजावयाचा. परंतु असा वेग पहाण्यांत येत नाहीं. याचें कारण कोणत्याहि छिद्रांतून किंवा भिंतीवरून पाणी वहातांना जें घर्षण होतें किंवा पाणी चिमटल्यासारखें होतें. त्याच्या योगानें पाण्याचा वेग कमी होतो. हें पाण्याच्या धारेचें चिमटणें किंवा वर्तुळाकार आकुंचन होणें सव्वास एक या प्रमाणांत होतें. म्हणजे सव्वा इंच व्यासाच्या गोल छिद्रांतून पाणी वाहात असलें तर तें एक इंच व्यासाच्या छिद्रांतून वाहिल्यासारखें होतें. आणि हें आकुंचन व्यासाच्या ५/८ इतक्या लांबींतच होतें. ह्याचाच अर्थ आकुंचनाचा जो बांक सर्व बाजूंनी असतो त्याची त्रिज्या व्यासाच्या १ ५/८ इतकी असतें. या आकुंचानलाच व्हेना कंट्रॉक्ट्रा म्हणतात. अशा रीतीनें गुरुत्वाकर्षणामुळें उत्पन्न होणारा पाण्याचा वेग जो कमी होतो त्याचें प्रमाण पुढें दिल्याप्रमाणें असतें.-

पाण्याचा वेग कमी होण्याबद्दल कोष्टक
प्रवाहद्वाराचा प्रकार वेग कमी होण्याचें प्रमाण.
 भोंक पाडलेला पातळ पत्रा.  .६२५
 ६॥ इंचापेक्षां कमी व्यासाचा नळ.  .६२०
 निर्गनद्वारांत त्याच्या २॥ तें ३ पट लांब नळ.  ८२
 धरणाच्यां दारासारखा लोखंडी दरवाजा.  .६२
 लहान गाळ्याची पुलाची कमान  .८२
मोठ्या गाळ्याच्या पुलाखालून. .९२
रुंदी व उंचीच्या मानानें चौरस निर्गमद्वारांतून .६० ते ७०

पा ण्या चा वे ग.- बारीक द्वारांतून किंवा छिद्रांतून पाणी आंकुचित होऊन येत असेल तर हें आंकुचन द्वाराच्या किंवा छिद्राच्या क्षेत्रफळाच्या ६४ शतांशाइतकें होतें. आणि प्रवाह हा क्षेत्रफळ गुणिले पाण्याच्या खोलीनें वर्गमूळ (पाण्याची खोली म्हणले पाण्याच्या पृष्ठभागापासून द्वाराच्या किंवा छिद्राच्या गुरुत्वमध्यापर्यंत फुटांत मोजावयाची, तसेंच क्षेत्रफळहि चौरस फुयांतच घ्यावयाचे). पाण्याच्या या खोलीमुळेंच पाण्याला वेग उत्पन्न होतो व या खोलीपैकीं ३८॥ टक्के वेग उत्पन्न करण्यामुळें व ६१॥ टक्के आकुंचनामुळें आणि घर्षणरूपी विरोधामुळें नाहीसें होतात. पाणी बाहेर वाहण्याचें तोंड घाटेसारखें रुंदावलेलें असलें म्हणजे आकुंचनामुळें होणारा दुष्परिणाम टळतो.

द र से कं दा स वा हा णा रें पा णी.- १/८ इंच जाडीच्या पोलादी पत्र्यांत चव पाडलेल्या तिकोनी खोबणातून पाणी वाहून दिलें तर पाण्याची उंची फुटांत मोजून त्या उंचीचा पंचमघात करून त्याचें वर्गमूळ काढून त्या वर्गमुळाला २॥ नी गुणिलें असतां दर सेकंदास किती घनफूट पाणी वाहून जाईल हें काढतां येतें.

ध र णा च्या भिं ती व रू न वा हा णा र्या पा ण्या नें प्र मा ण.- जेव्हां धरणावरून पाणी वाहनू जात असेल तेव्हां पाणी जितक्या फूट उंचीचें वाहात असेल त्या उंचीचा घन धरून त्याचें वर्गमूळ काढावें आणि त्याला धरणाच्या लांबीनें गुणून त्या गुणाकाराला ३ १/१०  एवढ्यानें गुणिलें असतां दर सेकंदास धरणाच्या रूंद भिंतीवरून किती घनफूट पाणी वाहून जाईल हें निघतें. पाणी जेव्हां धरणावरून वाहनू जात असेल तेव्हां धरणाच्या लांबी (फूट) ला वाहाणार्या पाण्याच्या उंचीचें (फूट) गुणून त्या गुणाकाराला उंचीच्या (फूट) वर्गमूळानें गुणून त्याला ५ १/३ गुणावें. व त्याचा २/४  घ्यावा व तितकें घनफूट दर सेकंदास वाहून जातील असें समजावें.

न ळां तू न वा हा णा रें पा णी.- नळांतून जें पाणी वाहातें तें त्या पाण्यावर किती फूट पाण्याचा भाग (हेड) आहे यावर अवलंबून असतें. आणि हा भार एक सारखाच ठेवला आणि त्या भारानें एक इंच व्यासाच्या नळींतून अमुक वेळांत एक घनफूट पाणी वाहिलें तर तितक्याच वेळांत पाव इंच व्यासाच्या नळींतून तीनशतांश घनफूट व अर्धा इंच व्यासाच्या नळींतून ०.१७७ घनफूट आणि पाऊण इंच व्यासाच्या नळींतून ०.४८५ घनफूट व १॥ इंच व्यासाच्या नळींतून २.७ घनफट व २ इंच व्यासाच्या नळींतून ५.६ घनफूट व २॥ इंची नळींतून ९.८; ३ इंची नळीतून १५.५, ४ इंची नळींतून ३२ घनफूट; ६ इंची नळीतून ८८; १२ इंची नळींतून ४९८, २४ इंची नळींतून २८११ आणि ३६ इंची नळांतून ७७७६  घनफूट पाणी वाहील.

पा ण्या चा वे ग व न ळा चा व्या स.- गांवांत पाणी सोडण्याच्या नळांतून वेग जास्ती ठेवला तर नळ जितका लहान असेल तितका पाण्यावरील भार (हेड्) कमी होत जातो व पाणी मजल्यावर चढेनासे होतें म्हणून नळ्यांचा व्यास ठरवितांना पुढें दिलेले वेग जास्तींत जास्ती असें समजून नळांचा आकार ठरवितात. नळ जर ३६ इंची व्यासाचा असेल तर त्यांत ६.५ फूट दर सेकंदास पाणी येईल असें समजतात. तोच वेग २४ इंची नळांत ५-५ फूट, १५ इंची नळांत ४ फूट, १२ इंची नळांत ३॥ फूट, ८ इंची नळांत ३ फूट आणि ४ इंची नळांत २॥ फूट असें धरतात. यापेक्षां कमी वेग असावे, जास्ती असूं नयेत.

पा ण्या च्या उ क ळी चें प्र मा ण.- समुद्रसपाटीपाशीं २१२ अंशा (फा. ही.) पर्यंत पाणी तापविलें असतां त्याला उकळी फुटते. समुद्रसपाटीच्या वर ५२० फूट उंचीची टेंकडी असेल तर तिच्यावर पाण्याची उष्णता २११ अंशापर्यंत चढविली असतां उकळी फुटते आणि याप्रमाणें दर ५२० फुटांस एकेक अंश कमी  होत होत समुद्रासपाटीपासनू सुमारें १ मैल उंचीवर २०२ अंशापर्यंत पाणी तापविलें असतां त्याला उकळी फुटतें.

पा ण्या ची घ् न ता.- पाण्याची उष्णता कमी कमी करीत गेलें तर ३९ अंश (फा. हीं.) त्याचें टेंपरेचर असतांना तें घनांत घन असतें म्हणजे हवेच्या ८१५ पट होतें. यापेक्षां जास्ती थंड केल्यास तें हलकें हलकें होत जातें आणि तें ३२ अंशाइतकें थंड झालें म्हणजे गोठतें म्हणजे त्याचें बर्फ बनतें आणि त्या अवस्थेंत मूळच्या आकाराहून स्वतःच्या द्वदशांइतकें वाढतें. त्या गुणामुळें बर्फ पाण्यावर तरंगतें. पाण्यांतून सर्वकाळ वाफ निघतच असते (पाण्याचा घनफूट = ६.२४ ग्यालन =६२०.४२५ पौंड वजन).

मो -या व ग टा रें.

उ द्दे श.- मोर्या व गटारें करण्याचा हेतु असा असतो कीं, मनुष्यवस्तीपासून दूर अंतरावर सर्व प्रकारची घाण म्हणजे मनुष्याचें व जनावरांचें मलमूत्र व इतर सर्व प्रकारचें घाण पाणी घरांपासून नळ घालून मनुष्यवस्तीपासून दूर अंतरावर नेऊन त्या घाण पाण्याचा उपयोग करणें हा होय. मनुष्य रोगी असो वा निरोगी असो त्याच्या शरीरांतून बाहेर टाकले गेलेले सर्व प्रकारचें द्रव व घन पदार्थ हे वस्तीजवळ राहूं दिल्यास खास अपायकारक होतात. तसेंच जनावरांचा मल व मूत्र हीं मनुष्यवस्तीजवळ राहूं दिल्यास अपाय करतात. तसेंच मोर्यांत अन्नाचे कण किंवा खरकटें पडून राहिलें तरी तेंहि कुजून त्यापासून घाण सुटते. व त्या घाणीपासून नानाप्रकारचे रोग उद्भवतात. या करतांच कोणतीहि घाण उत्पन्न झाली कीं, ती मोरीत टाकून लगेच पाण्याबरोबर गांवाबाहेर वाहून जाईल अशा आकाराचें झिलईदार नळ घालतात.

रो ग भ य.- ज्याप्रमाणें माणसें व जनावरें यांच्या मळाचा दुर्गंधीपासून रोग उद्भवतात तसेंच सडका भाजीपाला किंवा कोणतेंहि उद्भज्ज द्रव्य भिजत व सडत पडलें म्हणजे अपायकारक होतें. आणि म्हणूनच अशा प्रकारची घाण रोजच्या रोज घरांच्या आवारांतून काढून टाकून गावांबाहेर वाहून नेली पाहिजे. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या घाणी मनुष्यवस्तीजवळ राहूं दिल्यास त्यापासून रोगोत्पादक जंतू उत्पन्न होऊन व मनुष्याच्या रक्तांत भिनून व वाढून कॉलरा, सन्निपातज्वर यांसारखें रोग उद्भवून अनुकूल परिस्थिति असली तर ते मोठ्या प्रमाणांत वाढतात.

मनुष्याच्या शरीरांत अशा प्रकारच्या रोगजंतूंचा प्रवेश हवा, पाणी किंवा अन्न यांच्याद्वारां होतो. आणि म्हणूनच ही तिन्ही रोगबीजरहित राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जी व न श क्ती व र भ र.- मनुष्याच्या शरीरांत एक प्रकारची शरीरसंरक्षक जीवनशक्ति असल्यामुळें बर्याच वेळां असें विष शरीरांत शिरलें असतांहि तें वेगवेगळ्या रूपानें शरीराबाहेर मळाबरोबर काढून टाकलें जातें. मनुष्य निरोगी दिसतो. परंतु ही जीवनशक्ति कमी झाल्यावर रोगबीजांचा जोर जास्ती असल्यास त्याचा बाह्य परिणाम रोगरूपानें दिसूं लागतो. उदाहरणार्थ:- क्षतांत्रज्वर (टॉयफॉईड) नांवाचा रोग ज्या सूक्ष्मजंतूंपासून उत्पन्न होतो तें जंतू धुळीबरोबर वार्यांतून उडतात. व पाणी किंवा दूध दूषित करतात. असें दूषित पाणी किंवा दूध प्यायल्यास तो रोग होण्याचा संभव असतो. एरव्हीच्या मोर्यांच्या पाण्यांत, घाणीचें जितकें प्रमाण असतें तितकेंच प्रमाण शौचकूप मोर्यांनां जोडण्यापासून साधारणत: रहातें. कारण सहा सात तोळे भार मळाबरोबर दोन ते तीन ग्यालन म्हणजे सुमारें ८०० ते १२०० तोळे पाणी साधारणत: मोरींत पडतें. ह्यावरूनच घाणीचें प्रमाण शेंकडा एकापेक्षांहि कमी पडतें.

शे त खा न्यां पा सू न अ पा य.- पेवाच्या शेतखान्याच्या योगानें घराच्या जवळच सदासर्वकाळ घाण रहाते व  जमिनीचा खोलपर्यंत भाग दूषित होतो आणि पावसाळ्यांत अशा जमिनींतून झिरपून आसपाच्या विहिरींत जाणारें पाणीहि दूषित होतें. परंतु ज्या ठिकाणी भंगी लोग रोजच्या रोज शौचकूपांतील मैला काढून नेतात, व गाड्यांतून गावाबाहेर नेतात त्याठिकाणीं हा मैला बरेच तास किंवा केव्हां केव्हां दिवसभरहि शौचकूपांत पडून राहिल्यानें भोंवतालची हवा दूषित होते व मनुष्यांस बाधते.

फ्ल शिं ग चे पा य खा नें.- जर मैला वाहून नेणारी गटारें बांधलीं आणि त्यांत भरपूर पाणीं सोडीत राहिलें व शौचकूपहि त्यांस जोडले तर शेटखान्यांत पडणारा मळ, दर वेळेस दोन-तीन ग्यालन म्हणजे १० ते १५ शेर पाणी दरवेळेला शौचपात्रांत टाकण्याची व्यवस्था असल्यामुळें लागलीच वाहून जातो. अशा रीतीनें कोणत्याहि मोरींत किंवा घरांत मळमूत्र थोडा वेळ न पडून राहिलें तर हवा शुद्ध रहातें.

ग टा रें.- कांहीं कांहीं ठिकाणीं घाण पाणी जाण्याच्या ज्या मोर्या असतात त्यांतच पावसाचें पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली असते. परंतु असें करण्यास खर्च फार येतो. कारण आपल्या इकडे कधीं कधीं तासांत एक इंचापेक्षां जास्तीहि पाऊस पडतो. आणि त्यामुळें उन्हाळ्यांत केला जेवढें पाणी घरकामास साधारणत: वापरतील तितकें मोरीतून वाहून जाणारें थोडें पाणी त्या गटारांतून वहात असलें तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडून बर्याच अंतरावरून पावसाचें पाणी वाहून येत असेल तर त्या रस्त्यांतील गटार फार मोठें करावें लागेल. गटारें फार मोठ्या आकाराचीं बांधलीं असतां खर्चहि फार येतो. व यामुळें अतिसंपन्न शहर असल्यावांचून अशा गटारांचें खर्च सहन करण्याची शक्ति साधारणत: आपल्या इकडील शहरांत नसते. व यामुळें घाण पाणी जाण्याचे लहान आकाराचे नळ किंवा गटारें रस्त्याच्या खालून वेगवेगळीं करतात. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंस पावसाचें पाणी वाहून जाण्यासाठी वेगळीं गटारे आहे. ह्या दुसर्या प्रकारांतहि चौकांचें पाणी मोर्यांतून घाण पाण्याचा गटारांत शिरतेंच. आणि म्हणून दर माणशीं १५ ते २५ ग्यालन घाण पाणी दिवसांत वाहून जाईल असें धरतात. याखेरीज दर माणशी कौलावर पडणारें कांही पावसाचें पाणी चौकांतून मोरींत वाहून जाईल असें साधारणत: हिशोबांत धरतात.

घा ण पा णी जा ण्या चे न ळ.- हें घाण पाणी जाण्याचे नळ जमिनींतून रस्त्याखालून घालतात. व त्यांनां रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या घरांतून मोर्या नळांनीं जोडतात. हे नळ २४ इंच व्यासापर्यंतचे, झिलई दिलेले, मातीचें, खूप जोरानें दाबून तयार केलेले असून चांगले पक्के भाजलेले व मजबूत असतात. आणि त्यांनां फार आंच देऊन व सांधे मिटवितेवेळीं वितळून त्यांस आंतून बाहेरून झिलई चढेल असें करतात. ह्या झिलईच्या योगानें नळांत पाणी बिलकुल मुरत नाहीं. आणि नळ बसवितांना ते सारखे एका उतारांत बसविल्यामुळें त्यांतून सर्व प्रकारची घाण झटकन वाहून जाते व कोनेकोपरे नसल्यामुळें घाण कोठेंहि चिकटून बसत नाहीं. हे नळ जमीनींत बसवितांना ज्याप्रमाणें सारखा उतार देतात. त्याचप्रमाणें ते एका सरळ रेषेंत बसवितात. हेतु हा कीं, घाण पाणी वाहून जाण्याला कोणत्याहि प्रकारचा अडथळा होऊं नये. ही गटारें जेव्हां दोन फुटांपेक्षां जास्ती व्यासाची करावयाचीं असतील त्यावेळीं तीं सिमेंट कांक्रीटची अथवा विटांच्या कमानीची करतात आणि त्यांच्या आंतल्या बाजूस सिमेंटचें प्लॅस्टर करतात. कारण विटा उघड्या राहिल्या असतां त्यांवर घाण पाण्याच्या योगानें लोणा लागून त्या झरूं लागतात. त्यांचा आकार वर्तुळाकृति, किंवा दीर्घवर्तुळाकृति, किंवा अंड्याच्या आकाराचा (म्हणजे वर रुंद व खालीं निमुळतें वर्तुळ असा) असतो. आणि त्यांनां इतका उतार दिलेला असतो कीं, त्यांतून वाहणार्या घाण पाण्याला दर सेकंदास १ ते ३ फूट इतका वेग याचा आणि ज्यावेळीं गटार धुवून टाकण्यासाठीं (फ्लशिंग) त्यांत एकदम हजार किंवा दोन हजार ग्यालन पाणी सोडतात त्यावेळीं तर वरील वेग वाहून तो दर ताशीं ६ ते ७ मैल होईल अशा बेताचा गटाराचा तळास उतार दिलेला असतो. लांबच लांब असलेली गटारें सर्व ठिकाणीं बंद असावी लागतात. आणि या कारणाकरतां त्यांतील घाण व विष ही जागोजाग उंच नळ (व्हेंटिलेटर) घालून वायु हवेंत सोडून देतात. असें केल्यामुळें गटारांतील वायूच्या दाबानें घरजोडापाशीं ठेवलेल्या ट्रयाप (म्हणजे पाण्यानें हमेष भरून राहणारा उलटा सायफन) म्हणून विषारी वायु लोकांच्या घरांतून शिरत नाहीं.

वि डा चे न ळ व मॅ न हो ल.- ज्या ठिकाणीं गटारांतील किंवा नळांतील पाण्याचा वेग फार वाढण्याचा संभव असेल (उदाहरणार्थ उंच जमिनीवरून येणारा नळ सखल जमिनींतील नळाला जोडणें असेल) अशा ठिकाणीं मातीचें नळ न घालतां बिडाचें नळ घालतात. जेथें जेथें वेगवेगळ्या बाजूंकडून येणारे नळ एके ठिकाणीं जमत असतील, तेथें तेथें मुख्य नळ १ ते ३ इंच खालीं ठेवतात. असे नळ बसवितांना किंवा गटारें बांधतांना ज्या ज्या ठिकाणीं नळाची किंवा गटाराची मध्यरेषेची दिशा बदलतें अशा ठिकाणी मनुष्यला खालीं उतरण्यासाठीं चौकोनी म्यानहोल सिमेंट चुन्याचें बांधून घेऊन वरील बाजूस १॥। फूट व्यासाचें वाटोळें तोंड ठेवतात. व त्याला बिडाचें झांकण, वरून जाणार्या गाड्याघोड्यांच्या वर्दळीनें व खचेल व न तुटेल इतक्या मजबुतीचें बसवितात. अशाच प्रकारचें म्यानहोल जेथें जेथें नळांत वळण असेल अशा ठिकाणीं किंवा दोन नळांचा सांधा होत असेल तेथें बांधतात. तसेंच सरळ जाणारा नळ फार लांबपर्यंत असला तर वेळ पडल्यास नळ स्वच्छ करतां यावा म्हणूनहि अशीं भोकें जागोजाग ठेवतात.

न ळां ती ल वि षा री वा यु.- हे नळ किंवा गटारें एवढीं मोठीं असावींत कीं, त्यांतून एरव्हींच्या दिवसांत जास्तीत जास्त येणारें पाणी वाहांत असतां तें अर्ध्यापेक्षां ज्यास्ती (म्हणजे खालच्या अर्धवर्तुळाइतकें) चढतां कामा नये. एवढं मोठे नळ असावेंत. अशा गटारांतून वाहून येणारें घाण पाणी सुमारें २४ तासापर्यंत सांधारणत: घाणत नाहीं. ह्याच्यापेक्षां जास्ती वेळ राहिल्यास मात्र दुर्गंधि सुटते व त्यांतून विषारी वायु, पाणी सडण्याच्या किंवा कुजण्याच्या योगानें त्यांतून निघूं लागतात. ह्याकरतां त्यांत पडलेली सर्व प्रकारची घाण २४ तासांच्या आंत सर्व वाहून जाईल अशी व्यवस्था करतात. अशा नळांतून वाहून जाणारें पाणी सकाळपासून दुपारपर्यंत लोकांच्या आंघोळी व धुणीं वगैरे होत असल्यामुळें जास्ती वहात असतें आणि विशेषत: उत्तर रात्रीच्या प्रहरीं पाण्याचा वापर फारच कमी असल्यामुळें सगळ्यांत कमी प्रवाह त्यांतून वहात असतो. अशा नळांना शेतखाने जोडलेले असल्यास सकाळच्या प्रहरीं तीहि सर्व घाण आणि दर वेळेस दोन ते तीन ग्यालन टाकलेलें पाणी ह्यामुळें नळांतून वाहाणारा प्रवाह सकाळीं नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त असतो. आणि तो साधारण प्रवाहाच्या निदान दुप्पट तरी असतो. आणि असा दुप्पट प्रवाहच नळाचें आकारमान ठरवितांनां घेतात. नळ वाजवीपेक्षां फार मोठ्या आकाराचे घातले तर ते साफ रहात नाहींत. यासाठीं नळ एवढ्याच आकाराचे असावे कीं, त्यांतून पावसाचें थोडे पाणी (चौकांतील) वाहात असतांना तें दोनतृतीयांशापर्यंतच भरून वहावें अशा बेताचे नळ ठेवतात. हे नळ साधारणत: ६ इंचापेक्षां कमी कधींहि असूं नयेत. आणि घरजोड वगैरे सगळें ४ इंच व्यासाच्या नळाचे करावें. घाण पाणी वाहून जाण्याचे थोड्या लांबीचें घरांतील नळ ३ इंच व्यासाचें असले तरी चालतात. परंतु जेथें शेतखाने वगैरे जोडावयाचें असतील तेथें ते ४ इंचांपेक्षां कमी नसावे.

श ह र च्या भा वी व स्ती व रू न अं दा ज.- अशा नळांतून किंवा गटारांतून किती घाण पाणी वाहून न्यावें लागेल. याचा अंदाज करतांना शहराची जितकी वस्ती असेल किंवा शहराची एकसारखी वाढ होत असल्यास २५ वर्षांनंतर त्याची किती वस्ती होईल याचा कयास करून आणि दर माणशी अमुक ग्यालन पाणी अहोरात्र वापरलें जाईल ह्याचा अदमान करून त्यावरून एकंदर दिवसातं पाणीकिती वाहून जाईल हें काढतात आणि ह्या पाण्याच्या तिप्पट किंवा चौपट पाणी पावसाच्या वेळीं चौकांतून वगैरे मोर्यांतून वाहात येऊन या गटारांतून न्यावें लागेल असाहि हिशेब करतात.

वा प र ण्या च्या पा ण्या व रू न ग टा रां चें आ का र मा न.- अशा प्रकारचे नळ घालण्याची आवश्यकता, जेव्हां गांवांत नळांचें पाणी आणलें असेल त्यावेळींच अतिशय भासूं लागतें. कांहीं लोक जरी विहिरीचें पाणी वापरतात तरी नळाचें जें पाणी गावांत आणलेलें असतें तें दर माणशी १० ग्यालन ते २० ग्यालन किंवा ३० ग्यालन अशा प्रमाणांत तें गावांत येत असतें. आणि तें सर्व पाणी मोर्यांच्या वाटें अशा गटारांत किंवा नळांत येऊन पडणार असें हिशोबांत धरतात. समजा की, दर माणशी जर २ अहोरात्रांत मिळून २४ ग्यालन पाणी वापरलें जात असेल तर त्यांपैकीं सुमारें १२ ग्यालन ८ तासांत व राहिलेले १२ ग्यालन बाकींच्या १६ तासांत असें साधारणत: वापरलें जातें आणि गटाराचा नळ केवढा पाहिजे त्याचा हिशोब करतांना ८ तासांत १३ ग्यालन म्हणजे दर माणशीं दर तासांत १॥ ग्यालन पाणी वाहून जाईल असें हिशोबांत धरतात.

न ळां नां उ ता र दे णें.- या घाण पाण्याच्या नळांनां किंवा गटारांनां स्लोप किंवा उतार देणें तो लहान नळ असतां उतार जास्ती द्यावा लागतो. व नळांना व्यास जसजसा वाढेल तसतसा कमी उतार दिला तरी पुरतो. नळांतून गाळ बसूं नये म्हणून ६ ते ९ इंच व्यासाच्या नळांतून दर सेकंदास ३ फूट यापेक्षां वेग कमी असूं नये. आणि १२ ते २४ इंच व्यासाच्या नळांतून दर सेकंदास २॥ फुटांपेक्षां वेग कमी असूं नये. याच्यापेक्षां मोठ्या गटारांतून दर सेकंदास २ फुटांपेक्षां वेग कमी असूं नये व या हिशोबानें पाहतां ४ इंची नळास ३६ फुटांत १ फूट; ६ इंची नळास ७० फुटांत १ फूट; आणि ९ इंची नळास १३० फुटांत १ फूट; व १२ इंची नळास २९५ फुटांत १ फूट; आणि २४ इंची नळास ८२० फुटांत १ फूट आणि यापेक्षां मोठ्या गटारांनां १२५० फुटांस १ फूट इतका स्लोप दिला पाहिजे. १९ इंचांपासून ४५ इंचांपर्यंतच्या गटारांनां ६०० फुटांत १ फुटाचा उतार दिलेला बरा. कारण पाणी थोडें वाहात असलें तरीहि अशानें बराच वेग येऊं शकतो. वर सांगितलेले पाण्याचे वेग म्हणजे मध्यम वेग समजावयाचें. परंतु वाहात्या पाण्यांत वरच्या बाजूस जास्ती वेग आणि तळच्या पाण्यात घर्षणामुळें कमी वेग असतो. आणि हा तळजवळचा कमीतकमी वेग कीं, ज्याच्या योगानें गटाराच्या तळावर बसलेला किंवा बसणारा गाळ वाहून जावयाचा तो वेग मध्यम वेगाच्या सुमारें पाऊणपट असतो.

त ळा चा वे ग.-मोठाल्या गटरातून हा तळाचा वेग दर सेकंदास २ फुटांपेक्षां कमी असतां उपयोगी नाहीं व तळाजवळचा वेग २ फूट असला तर व मोरीचा एकतृतीयांश भाग भरून वहात असला तर मध्यम वेग २॥ फुटांचा व गटार अर्धे भरून वहात असले तर २॥। फूट आणि दोन तृतीयांश भरून वहात असलें तर हा मध्यम वेग दर सेकंदास ३ फूट होतो. याबाबतीत हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जेव्हां गटारें धुण्यासाठी एकदम पाणी सोडतात, निदान त्यावेळीं तरी गटारांतील सर्व गाळ धुवून गेला पाहिजे. इतका स्लोप किंवा उतार गटारांच्या नळांनां दिला पाहिजे. असे स्लोप म्हटले म्हणजे ८ इंची नळाला १७५ फुटांत १ फूट; ९ इंची नळाला ६०० फूटांत १ फूट; १८ इंची नळास ८०० फुटांत १ फूट आणि २१ इंची नळास १००० फुटांत १ फूट असे स्लोप दिले पाहिजेत. यापेक्षां कमी उतार असतां उपयोगी नाहीं. ज्याप्रमाणें कमी स्लोप उपयोगी नाहीं. त्याचप्रमाणें फार स्लोपहि देतां कामा नये. कारण साधारणत: नळांतून किंवा गटारांतून वाहाणार्या पाण्याचा वेग दर सेकंदास ४ ते ४॥ फुटांपेक्षां जास्ती असूं नये व तो वेग ६ फुटांचा झाल्यास तो नळ किंवा गटारें झिजवून टाकतो. आणि म्हणून झिलई दिलेले मातीचे नळ (स्टोनवेअर) वापरणें असतील तेव्हां ६ फुटांपेक्षां जास्ती वेग केव्हांहि होतां कामा नये. घरजोडाच्या नळांतून पाणी फार थोडें वाहात असल्यामुळें त्यांनां दर सेकंदास ३ फुटांपेक्षांहि जास्ती वेग, त्या नळ्या अर्ध्या भरून जात असतां यावा इतका स्लोप दिला पाहिजे. जेव्हां नळ अर्धे भरून किंवा पुरे भरून वाहात असतील तेव्हां कोणत्या आकाराच्या नळाला किती स्लोप दिला असतां दर सेकंदास किती फुटांचा वेग येईल तें पुढें दिलें आहे.

व्यास इंच दर सेकंदास स्लोप (फूट)
२||
५० ३२ २२ १२
८२ ५२ ३६ २० १३
१५५ १०० ७० ३९ २५ १७
२९६ १९० १३० ७६ ४८ ३३
१२ ४६० २९६ २०५ ११५ ७५ ५२
१५ ६४० ४१५ २९० १६० १०५ ७३
१८ ८४० ५४० ३७५ २१० १३५ ९५
२४ १२५० ८२० ५७० ३२५ २०५ १४५

सा य फ न प द्ध ति.- ज्या ठिकाणी नळांनां पाहिजे तितका म्हणजे निदान १ सेकंदास ३ फूट इतका तरी वेग येण्याजोगा उतार किंवा स्लोप देतां येत नसेल त्या ठिकाणी, नळ जेथून सुरू होतो त्याच्या वरील बाजूस गटार धुण्याचा हौद (फ्लशिंग सीस्टर्न) बांधतात आणि तो सतत भरत रहावा म्हणून पाण्याची नळी त्यांत सोडतात आणि तो अमुक उंचीपर्यंत भरला असतां त्यांतलें सर्व पाणी सायफन पाईप (वासुदेवपेल्यासारखी नळी) याच्या योगानें तो हौद एकदम रिकामा होईल अशी व्यवस्था करतात. असें केलें म्हणजे जितक्या वेळां दिवसांतून तो हौद भरेल तितक्या वेळां तो हौद एकदम रिचवला जाऊन गटाराचा नळ तितक्या वेळां साफ धुतला जाईल. हा हौद दिवसांतून किती वेळां भरेल हें त्या हौदाची साठवण किती ग्यालनची आणि आंत वाहणार्या पाण्याची नळीचा व्यास किती यावर अवलंबून राहातें.

घा ण पा णी शे तां नां दे ण्या ची यो ज नां.- वर सांगितल्याप्रमाणें घाण पाण्याच्या नळांनां किंवा गटारांनां फार उतार किंवा स्लोप द्यावा लागत असल्यामुळें शहर मोठें किंवा लांबच लांब पसरलेलें असेल तर शेंवटच्या गटारांची खोली २० ते २५ फूट देखील होतो. आणि इतक्या खोलीवर वाहाणारें घाण पाणी शेतीला देण्यासाठी गटाराच्या शेवटीं बांधलेल्या मोठ्या हौदांतून तें पंपाच्या योगानें शेताच्या पृष्ठभागाच्या वरपर्यंत चढवून लांबच लांब नळ घालून किंवा पक्की पाटवण बांधून त्यांतून शेतांना देतात. हे पंप जितके साधे असतील आणि त्यांस व्हॉल्व्ह किंवा पडदे कमी असतील तितके चांगले. कारण ह्या घाण पाण्यांत रेती किंवा विटकराची पूड वगैरे चरचरीत परमाणू असलेले पदार्थ असल्यामुळें पंपाच्या दट्टयांनां सिलेंडरांनां  हमेप चरे पडतात आणि त्यांतून पाणी झिरपूं लागतें.

ग टा र का मां त सि में ट ची आ व श्य क ता.- गटारांच्या कामांत जेथे घाण पाण्याचा संपर्क येण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं पोर्टलंड सिमेंटखेरीज कोणतेहि संयोजक द्रव्य उपयोगी पडत नाहीं. चुन्यावर फार त्वरित परिणाम होतो आणि तो झरूं लागतो. सिमेंटवर मात्र कोणत्याहि प्रकारचा परिणाम होत नाहीं. सिमेंटमध्यें चिकण मातीचा भाग सुमारें ३५ टक्के किंवा थोडा जास्तीच आणि चुन्याचा भाग सुमारें ६१ टक्के किंवा थोडा कमी असावा लागतो. आणि हे मिश्रण साधारणत: वितळण्याच्या बेताला येईल इतकी त्याला आंच देऊन नंतर ते दळून त्याची पूड केलेली असते व त्यांत पाणी घालून तें वापरलें कीं, त्याची एकमेकांवर रासायनिक क्रिया होऊन असें 'सिलीकेड ऑफ लाईम' नांवाचे संयुक्त संधि द्रव्य बनतें की घाणींत असणार्या अॅसिडाचा किंवा अम्लाचा त्यावर कांहीहि अंमल चालत नाहीं. कामावर सिमेंट वापरतांना त्यांत स्वच्छ धुतलेली रेती सिमेंटाइतकी किंवा त्याच्या दुप्पट पर्यंत वापरली तरी हरकत नाहीं. १ भाग सिमेंटांत १ भाग रेती घातली तर त्यांचे मिश्रण १॥ भाग होतें. आणि २ भाग रेतींत १ भाग सिमेंट घातलें तर २॥ भाग, आणि ३ भाग रेतींत १ भाग सिमेंट घातलें तर तें मिश्रण ३ भाग होते. झिलईच्या नळाचे सांधे करतांना त्यांत ५॥ भाग सिमेंट घेऊन त्यांत ३ भाग स्वच्छ पाणी घालून केलेलें दाट मिश्रण नळांच्या सांध्यांत ओतलें असतां सांधे फार चांगले मजबूत होतात. सिमेंटकांक्रीट करणें झाल्यास १ भाग सिमेंट, २ भाग रेती व ४ भाग खडी घातल्यास मजबूत कांक्रीट होतें. पायासाठी वगैरे १ भाग सिमेंट, ३ भाग रेती आणि ६ भाग खडी घातली तरी चालते. कांक्रीट टाकल्याबरोबर ५-१० मिनिटेंपर्यंत ठोकावें. नंतर ठोकूं नये. १०० घनफूट सिमेंट कांक्रीट करण्यास १५ ते ३० शेर म्हणजे २॥ ते ५ घनफूट ग्यालन पाणी पुरें होतें. जास्ती पाणी घालूं नये.

लो खं डी जा ळ्या.- अलीकडे सिमेंटकांक्रीटला जास्ती मजबुती आणण्यासाठीं त्यांत तारांनी बांधलेल्या सळ्या किंवा लोखंडी जाळ्या (एक्सप्यांडेड मेटल) घालून अशा कांक्रीटचे लांब लांब नळ तयार करतात. आणि जेव्हां मोठ्या मोर्या बांधणे असेल त्यावेळीहि त्या अशाच प्रकारच्या (रीईन फोर्स्ड) सिमेंट कांक्रीटच्या करतात.असें सिमेंट कांक्रीट करतेवेळीं त्यांत घालावयाच्या सळ्या किंवा लोखंडी जाळ्या वगैरे अगदीं स्वच्छ करून म्हणजे गंज किंवा ताबेरा चढलेला असल्यास खरडून टाकून त्या सर्व लोखंडी कामाला दाट सिमेंटाचा हात द्यावा, पण बेलतेल किंवा ओला रंग कधीहि लावूं नये. आणि अशा लोखंडी सळ्या किंवा कांबी बहालें बनविण्यासाठीं उपयोगांत आणल्या असतील तर त्यांवर निदान १ इंच जाडीचें सिमेंट कांक्रीटचे आवरण असलें पाहिजे. आणि इतर ठिकाणीं ही जाडी निदान अर्धा इंच तरी असली पाहिजे. हें कांक्रीट आणि सळ्या किंवा जाळ्या यांचें उत्तम संघटन व्हावें. यासाठीं त्याच्या भोंवतीं कांक्रीट घालून ठोकतांना ३ इंचांपेक्षा जास्ती थर करूं नयेत. सिमेंट कांक्रीटच्या कमानीं करतांना त्यांच्या खालचें कलबूत निदान २४ दिवसपर्यंत तरी राहूं द्यावें. परंतु बहालें किंवा जमिनी ह्यांच्या खालचें कलबूत १४ दिवसांनीं काढलें तरी चालतें.

झि ल ई दि ले ले न ळ.- हे वापरणें ते अगदीं पक्के भाजलेले आणि मिठाची झिलई चढविलेले असावे. आणि त्या नळांची जाडी त्यांच्या व्यासाच्या निदान दशांशाइतकी तरीअसली पाहिजे. आणि पाण्यानें भरून त्यावर दर चौरस इंचास सुमारें ११ पौंड म्हणजेच २५ फूट पाण्याइतका दाब त्यावर घातला असतां त्या नळांतून पाणी झिरपतां कामा नये. ह्यापेक्षाहि जास्ती मजबुतीचें म्हणजे ५० फूट पाण्याच्या दाबानेंहि न झिरपणारे नळ २४ इंच व्यासापेक्षां जास्ती व्यासाचे मिळत नाहींत. आणि हे जर १५ फुटांपेक्षां जास्ती खोलीवर किंवा मऊ जमिनींत घालावयाचे असतील तर त्यांच्या भोंवताली कांक्रीटचें आवरण घालतात. हे नळ ३ इंच व्यासाचें असले तर अर्धा इंच, ४ इंची असल्यास १/८ इंच, ६ इंची असल्यास पाऊण इंच, ९ इंची असल्यास १ इंच, १२ इंची असल्यास १ १/८  इंच व १५ इंची असल्यास १। इंच, १८ इंची असल्यास १ ३/८ इंच जाडीचे साधारणत: करतात. बहुतेक कारखानदार ९ इंचांपेक्षां जास्ती व्यासाचें नळ त्यांच्या व्यासाच्या एकदशांश ते एकद्वादशांश इतक्या जाडीचे करतात. हे नळ बहुधां २। फूट लांबीचे असतात. आणि सांध्याचे ३ इंच वजा जातां त्यांची लांबी २ फूटच भरते. ९ इंचांपेक्षां मोठ्या व्यासाचें नळ २॥ ते ३ फूट लांबीचे क्वचित करतात. ह्या नळांनां त्यांच्याच व्यासाचे किंवा त्यापेक्षां कमी व्यासाचें नळ जोडण्यासाठीं इच्छित आकाराचे ओतलेले जोडनळच आयते मिळतात.

असे नळ अर्धवर्तुळाकृति म्हणजे पन्हळासारखे किंवा बांक असलेले अथवा एका तोंडाला मोठा व्यास व दुसर्या तोंडाला लहान व्यास असलेले किंवा सायफनच्या आकाराचे आणि दुसरेहि वेगवेगळ्या आकाराचे मिळतात व म्हणून वेगवेगळ्या दिशांकडून येणारे नळ जोडण्यासाठीं हे नळ कधीहि कापावे लागत नाहीं. आणि ते कापूंहि नाहींत. कारण सांधा आंतल्या बाजूला खडबडीत झाल्यास घाण चिकटून राहण्याचा आणि वाहात्या पाण्याला रोध होण्याचा संभव असतो. अशा नळाचे सांधे करतांना ते सिमेंटाचेच केले पाहिजेत, मातीचे कधीहिं करूं नयेत. हें साधे करतांना सांध्यांत पहिल्यानें डांबर लावलेल्या तागाच्या दोरीचे ३-४ आटे बसवितात हेतु हा कीं, नंतर ओतलेलें दाट सिमेंटातील पाणी झिरपूर साध्यातून नळांत जाऊं नये, तागाच्या दोरीच्या बाहेरचा सर्व पोकळ भाग शुद्ध सिमेंटानें किंवा सिमेंट १ भाग व रेती १ भाग यांच्या मिश्रणानें भरून काढून सांध्याच्या बाहेरील बाजूस सुमारें ४५ अंशांचा कोन होईल अशा रीतीनें सांधा पुरा करतात. हे सांधे भरतांना नळाच्या आंतल्या बाजूस सिमेंट वाहून न जाईल अशाबद्दल खबरदारी घेतली पाहिजे. याचे सांधे इतके चांगले झाले असले पाहिजेत कीं, त्यांतून एक मैल लांबीच्या नळांतून दर मिनिटास एक घनफुटापेक्षां जास्ती झिरपा असतां कामा नये, ज्या ठिकाणी असे नळ दलदलीच्या जागेंतून घालावयाचे  असतील त्या ठिकाणीं ते बिडाचे घालावेत. असे नळ जमिनीत बसवितांना अगदीं सरळ रेषेंत आणि एकसारखा उतार देऊन बसवितात. हे नळ घालण्यासाठी लांबच लांब चर खोलपर्यंत करावे लागतात. आणि चरांच्या बाजू ढांसळून खाली पडूं नयेत म्हणून दोन्ही बाजूंला फळ्या आडव्या व उभ्या बसवून आडवे ठेपे द्यावे लागतात. या चराची रुंदी मनुष्याला नळ बसवितांना चरांत काम करण्याइतकी ठेवली पाहिजे. असे चर १६ फुटांपेक्षां म्हणजे सुमारें ३ माणसांच्या उंचीपेक्षां जास्ती असतील तेव्हां इतका खोल चर न घेतां तळाशीं आडवा घळ कधीं कधीं पाडतात. परंतु असे घळ पाडणे बहुतकरून इष्ट नसतें. कारण त्यांतून बसविलेले नळ सरळ रेषेंत आणि एकाच स्लोपांत बरोबर बसले आहेत किंवा नाहीं हें पाहण्यास अवघड पडतें. चरांतून बसविलेल्या उभ्या फळ्या बहुतकरून १॥ पासून ३ इंच पर्यंत जाडीच्या आणि ९ इंच रुंदीच्या आणि ६ ते १२ फूट लांबीच्या ठेवतात. आणि जमीन वाईट असल्यास आडव्या फळ्या ९ x ३ इंच मापाच्या आणि ठेपे चौरस किंवा वाटोळ्या गंडेर्यांचे देतात. चर खणतांना ते नळ ज्या लेव्हलला बसवावयाचे असतील तितक्या खोलीचेच खणावे, जास्ती खणूं नये. कारण जास्ती खणल्यास मातीनें फिरून भरावे लागतात. आणि अशा मातीवर नळ बसविले असतां ते मागाहून खचतात, किंवा ते खचूं नयेत म्हणून नळांच्या खाली कांक्रीट करून त्यावर ते बसवावे लागतात. कांक्रीट करणें ते साधारण मजबूत जमीन असल्यास ४ इंच जाडीनें करतात, आणि जमीन मऊ किंवा पोकळ असल्यास ६ इंच जाडीचें आणि नळाचा आंतील व्यास असेल त्याच्या पेक्षां १ फूट जास्ती रुंदीचे कांक्रीट करतात. आणि त्याचा माथा नळाच्या मध्यरेषेच्या उंचीला नेऊन मिळवितात. हे नळ बसवितांना इतक्या खोलीवर ते बसविले पाहिजेत. की घरांतील सर्व मोर्यांचे पाणी त्यांत सहज रीतीनें वाहून जावे. ज्या रस्त्याखालून जसे नळ घालावयाचे असतील त्या रस्त्यावरून गाड्यांची वगैरे रहदारी असेल त्या नळांचा माथा रस्त्यांच्या खाली ५ फूटांपेक्षां कमी खोलीवर असता उपयोगी नाहीं. पायरस्त्यांखालून वाणपाण्याचे नळ नेणे झाल्यास २ फुटांपेक्षां जास्ती खोलीवर बसविले पाहिजेत. नळांतून पाणी ज्या बाजूस वाहत असेल त्याच्या उलट दिशेस म्हणजे खालून वर नळ बसवीत आणतात. कोणत्याहि नळाचा सांधा पुरा बसविल्यावर आंत सिमेंट वाहून आलेलें असल्यास तें कोणत्याहि रीतीनें आळण्यापूर्वी काढून टाकलें पाहिजे. नळाच्या सांध्यांतील सिमेंट चांगले आळून कठिण झालें कीं, लागलीच शेवटच्या नळाच्या तोंडांस एक बांक व २ उभे नळ बसवून पाणी ५ फुटांपर्यंत चढेल असें  करावें. आणि बसविलेला नळाचा सर्व भाग पाण्यानें भरून काढावा. या ५ फूट उंचीच्या पाण्याच्या दाबानें कोणत्याहि सांध्यातून पाणी झिरपून बाहेर निघालें नाहीं तर नळांचे सांधे चांगले बसलें असें समजावें. यदाकदाचित एखाद्या सांध्यातून पाणी झिरपूं लागलें तर तो सांधा फिरून घट्ट करावा. किंवा अशा झिरपणार्या भागाभोंवतीं कांक्रीटचें आवरण करावें. अशा रीतीनें नळ तपासल्यानंतर चर, पहिल्यानें बारीक मातीनें आणि नंतर जाडी मातीनें सहा सहा इंचांचे थर घालून व ठोकून वर जमीनीपर्यंत भरून काढावें. मात्र नळाच्यावर २ फूट भराव होईतोंपर्यंत ठोकूं नये. नाहीं तर नळाचें सांधे हदरून गळावयास लागतील. २ फुटांवरील मात्र सर्व थर नीट ठोकून बसवावे. अशी माती भरतांना पाणी टाकून ठोकलें असतां मागून मातीचा भराव खचत नाहीं. चर भरत आल्यावर शेवटीं पुष्कळ पाणी चरांत सोडलें तर आंत राहिलेली सर्व पोकळ जागा नीट रीतीनें भरून येते. व नंतरच्या पावसाळ्यांत जमीन खचून खड्डे पडत नाहींत. जेव्हां म्यानहोलाच्या (निरीक्षणार्थ प्रवेशासाठीं बांधलेल्या कुंड्या) भिंतीतून किंवा कोणत्याहि बांधकामांतून नळ घालावयाचें असतील तेव्हा ते नळ घातल्यावर त्यांच्या वरील बाजूस बारीकशी कमान बांधतात. हेतु हा कीं, वर येणारा सर्व बोजा त्या कमानीनेंच झेलावा. खालच्या नळावर येऊं नये.

प क्के स्टो न वे य र (माती यंत्रसाहाय्यानें दाबून, व पक्के भाजून आणि झिलई देऊन दगडासारखे कठिण बनविलेले नळ).- हे नळहि कधीं कधीं फुटतात. याची कारणें (१) खडकावरून नळ बसवितांना खडकांत खोबण पाडून नळाचें साकेट (जास्त व्यासाचें तोंड) खडकांत खोबण न करतां बसविलें तर साकेटाखेरीजचा प्रत्येक नळाचा १।॥ फूट लांबीचा भाग अंधांत्रीं रहातो. साकेटे मात्र खडकावर टेकलेलीं असतात व वरून येणार्या भाराच्या योगानें फुटतात. अशा ठिकाणी खडकावर रेती किंवा मातीचा थर करून त्यावर नळ सारखे बसतील असें करावें. (२) मऊ किंवा भुसभुशीत जमिनींत नळ घातले असतां भार कमी जास्ती पडल्यामुळें ते फुटण्याचा फार संभव असतो आणि म्हणूनच ते अशा ठिकाणी कांक्रीटांत बसवावे. (३) नळ फार खोलीवर बसविलेले असल्यास आणि त्यामुळें त्यांच्या वर वरील जमिनीचा भार फार येतो अशा ठिकाणी नळांच्या सभोंवार कांक्रीटचा निदान सहा इंच जाडीचा तरी थर देतात. असें कांक्रीट घातलें नाहीं तर दाबानें नळ मध्येंच फुटण्याचा संभव असतो. आणि म्हणूनच नळ बसविल्याबरोबर आणि नंतरहि नळांतील पाणी जाण्याचा मार्ग अगदीं साफ आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठीं म्यानहोल किंवा निरीक्षणार्थ कुंड्या बांधतात. अशा कुंड्यांत उतरून नळ्या बरोबर साफ आहेत किंवा नाही हें पाहतां येतें. नळ अगदीं सरळ रेषेंत आणि सारख्या स्लोपांत अथवा उतारांत बसविलेले असल्यामुळें नळाच्या एका तोंडांच्या मधोमध पेटविलेली मेणबत्ती धरली असतां दुसर्या म्यानहोलाच्या तळांतून नळांतून येणारा मेणबत्तीचा प्रकाश दिसला पाहिजे. (४) हे नळ बसवितातांना नळाचा प्रत्येक तुकडा नीट तपासून किंवा ठोकून पाहिल्यावांचून बसविला तर तडा गेलेल्यावर भार आला असता फुटण्याचा संभव असतो.

न ळ न पा हा ण्या ची का र णें.- हे घाण पाण्याचे नळ कधीं कधीं वाहीनासे होतात. ह्याची  कारणें: (१) नळाला जर पुरेसा स्लोप दिलेला नसला तर आंतून वाहाणार्या पाण्याचा वेग फार कमी असल्यामुळें त्यांतनू वाहून जाणारी माती, रेती किंवा कमी असल्यामुळें त्यांतून वाहून जाणारी माती, रेती किंवा कागद, चिंधुक वगैरे नळांत जागोजाग सांचून राहतात आणि असें होतां होतां नळाला तुंबारा बसतो. (२) कधी कधी नळाच्या सांध्यांतून किंवा नळ फुटला असल्यास त्याच्या चिंरेतून पाणी झिरपून नळांबाहेर जातें. आणि त्यामुळेंहि गाळ वाहून जाण्यास जितकें पाणी पाहिजे तितकें पाणी न मिळाल्यामुळें गाळ सांचून राहातो व तुंबारा बसतो (३) जेथें वेगवेगवेळ्या दिशांनी येणार्या नळांचे सांधे किंवा बाक बरोबर करून गुराम नळाला मिळविले नसतील अशा ठिकाणी वेग कमी झाल्यामुळें गाळ सांचून राहतो व त्यामुळेंहि तुंबारा बसतो. (४) अशा नळांत पाणी किंवा पाण्यानें सहज वाहून जाणार्या बारीक अन्नकणांशिवाय कोणतेहि तंतुमय पदार्थ, असे चिंध्या किंवा कागद व काट्या, पानें वगैरे अशा नळांत बिलकुल जातां उपयोगीं नाहीं. असे पदार्थ थोड्याहि प्रमाणांत गेले तरीहि नळाला तुंबारा बसतो. (५) कधीं कधीं एखादा नळ फुटून त्याचे तुकडे व बारीक माती नळांत पडून त्यानीहि नळाला तुंबारा बसतो. चांगल्या रीतीनें बसविलेल्या नळालाहि कधीं कधीं तुंबारा बसतो. असा नळांत बसलेला तुंबारा काढण्यास वेगवेगळ्या प्रकाराच्या हत्यारांचा उपयोग करतात. अशा हत्यारांच्या पुढच्या बाजूला फिरणारे - चाक पुली किंवा दुसर्या कोणत्याहि तर्हेचें फळ असून असे फळ नळांत ढकलण्यासाठी बांबूचें किंवा वेताचे दोन्ही तोंडांस स्क्रू पाडलेले ३ ते ४ फूट लांबीचें तुकडे म्यानहोलांतून एकेक उतरवून आणि ते जसजसे नळांत जातील तसतसें जास्ती तुकडे त्यांचे स्क्रू एकमेकांत जोडून २०० फूट लांबीपर्यंतहि नळ साफ करतां येतो. नळ फुटून तुंबारा बसलेला असल्यास असे फुटके नळ काढून टाकून नवे नळ बसविणें जरूर असतें. हे नळ जवळील म्यानहोलापासून किती अंतरावर फुटले आहेत किंवा पक्का तुंबारा बसला आहे हें वर, सांगितलेल्या बांबूच्या किंवा वेताच्या सळ्या किती लांबपर्यंत नळांत जाऊन पुढें बिलकुल सरकेनाशा होतील, त्यांच्या लांबीवरून काढतां येतें आणि म्यानहोलापासून तितकें अंतर जमिनीवर मोजून चर केला असतां फुटलेला किंवा गाळानें कोंदलेला नळ बरोबर सांपडतो. आणि असा नळ काढून तेथें नवा बसवून तुंबारा काढून टाकतां येतो. ह्या बांबूच्या सळ्या नळांत स्क्रू घालून फिरवितांना ज्या बाजूला फिरविलें असतां स्क्रू जास्त घट्ट बसतील त्या बाजूस म्हणजे डावीकडून उजवीकडे नेहमीं फिरविल्या पाहिजेत. जर चुकून उजवीकडून डावीकडे फिरविल्या तर नळ्यांत घातलेल्या ह्या नळ्यांच्या सांध्यांपैकीं एखादा सांधा निसळून निघेल आणि हया सळ्या बाहेर ओढून काढतांना सुटून वेगळ्या पडलेल्या सळ्या व फळ एवढा भाग नळांतच अडकून राहील व तो काढण्यासाठी रस्त्यावर वर पाडून व नळ फोडून अडकलेला भाग बाहेर काढावा लागेल.

जेव्हां चोवीस इंचापेक्षां जास्ती व्यासानें स्यूअर म्हणजे गटारें बांधावयाचीं असतील तेव्हां ती सिमेंटकांक्रीटचीं (जरूर असल्यास आंत लोखंडी सळ्या व कांबी घालून त्याची मजबुती वाढविणें म्हणजेच रीइन फोर्स्ड होय) किंवा विटांची बांधून सिमेंटचें प्लॅस्टर केलेली बांधतात. ही गटारें विटांची बांधणें झाल्यास विटा-ज्या गोलाईंचें गटार बांधावयाचें असेल त्या गोलाईला अनुरूप अशा आंतल्या बाजूला कमी व बाहेरील बाजूला जास्ती रुंतीच्या मुद्दाम पाडून भाजून तयार करवितात. असें केल्यानें सर्व सांधे सारख्या जाडीचे होतात. या विटा बसवितांना एक भाग सिमेंट व दोन भाग रेती घेऊन त्यांत बसवाव्या. व पुढें त्या घाणींतील अम्लाच्या योगानें झिरपून जाऊं नयेत म्हणून आंतील बाजूंनी सिमेंटचें प्लॅस्टर करावें. जेव्हां अशी गटारें ३ फूट व्यासापेक्षां किंवा उंचीपेक्षां जास्ती नसतील तेव्हा कमानीची जाडी ४॥ इंच म्हणजे अर्ध्या विटेची असली तरी पुरते. मात्र अशा गटाराचा तळ जमिनीखालीं २० फुटांपेक्षां अधिक खोलीवर असतां कामा नये. यापेक्षां खोली जास्ती असल्यास किंवा गटारांची रुंदी ३ फुटांपेक्षा जास्ती असल्यास कमानीची जाडी ९ इंच करावी लागते. जर गटारांसाठी जमीनीत केलेला चर 'खो' इतके फूट असेल आणि जें गटार बांधावयाचें त्याची कमानीच्या बाहेरील बाजूची त्रिज्या 'त्रि' इतके फूट असेल तर खो   x त्रि-१०० इतके फूट विटेच्या कमानीची जाडी असली पाहिजे. ९ इंच जाडीची कमान ६ फुटांपर्यंत चालते. आणि ६ ते ८ फुटांपर्यंत १४ इंची असावी लागेत. अशी (व्यास किंवा उंची) ४॥ इंच जाडीची विटांची कमान बांधल्यानंतर कमानीच्या बाहेरील रुंदीइतका आणि कमानीच्या माथ्यावर ४॥ इंच जाडी येईल असा कांक्रीटचा थर देतात.

अं डा कृ ती मो -या.- जेव्हां एरव्हीं वाहाणारें पाणी फार थोडे असेल आणि पावसाच्यावेळीं चौकांतून वाहून जाणारें पाणी जास्त असेल अशा वेळीं अशा मोर्या बांधतांना गटाराच्या माथ्याकडील भाग अर्धवर्तुळकृति ठेवून त्याचा मास म्हणजे जास्तींतजास्ती रुंदी जितकी असेल त्याच्या दीडपट अंडाची उंची (जास्तीतजास्ती) ठेवतात. पूर्वी अंडाच्या तळाची त्रिज्या व्यासाच्या चौथ्या हिश्शाइतकी ठेवीत असत. परंतु हल्लीं ती व्यासाच्या एकअष्टमांश ठेवतात.

अं डा कृ ति ग टा रां चें क्षे त्र फ ळ.- सध्यांच्या अंडाकृति गटारांचें क्षेत्रफळ पुढें लिहिल्याप्रमाणें असतें.

अंडाकृति गटाराचा आकार (इंचांत)  अंडाकृति गटारांचें क्षेत्रफळ (चौरस फुटांत)
१२ x १८ १.११
१६ x २४ १.९८
२० x ३० ३.९
२४ x ३६ ४.४६
३० x ४५ ६.९६
३६ x ५४ १०.०३
४८ x  ७२ १७.८४
६० x ९० २७.८७
७२ x १०८ ४०.१४

क ल बू त.- अशीं गटारें बांधतांना कलबूत खालच्या निमुळत्या भागाचा वेगळा आणि वरच्या अर्धवर्तुळाकृति भागाचा वेगळा करतात. आणि त्याचे दोन बाजूला दोन फर्मे रिपा मारून सांगाड्यासारखे बनवितात. हें अंडाकृति स्यूअर बांधतांना वरील कमानीची जेवढी बाहेरील रुंदी असेल त्या रुंदीपेक्षां ८ ते १२ इंच जास्ती रुंदीचे व ९-१२ इंच जाडीचें कांक्रीट तळाशीं करून त्यावर उलट्या कमानीच्या विटा किंवा मुद्दाम भाजून तयार केलेले ठोकळे बसवितात. व त्यावर कलबूत ठेवून कलबूताच्या बाजूनें सिमेंटविटांचें ४॥ इंच जाडीचें कमानीचें बांधकाम दोन्ही बाजूला कांक्रीट भरीत भरीत उलटी कमान पुरी होईतोंपर्यंत म्हणजे अर्धवर्तुळाच्या मध्यापर्यंत बांधीत आणितात. वर सांगितलेला कांक्रीटचा थर या लेव्हलपर्यंत भरून आणून त्यावरच ४॥ इंच जाडीचा कमानीच्या बाहेरचा थर बांधून आणतात. कमानीचा आंतला थर खालून बांधीत आणलेल्या आंतल्या थरावरच चालू ठेवतात. लहान नळीवर जेव्हां भार येत असेल तेव्हा २ ते ३ फूट रुंदीचें व ६ इंच जाडीचें कांक्रीट करून त्यावर १२ इंचापर्यंत व्यास असणारे नळ बसवून नळाच्या मध्यरेषेच्या उंचीपर्यंत दोन्ही बाजूंनीं कांक्रीट भरीत आणतात. आणि वरील बाजूलाहि ६ ते १२ इंच जाडीचें आवरण करतात.

सी में ट कां क्री ट चीं ग टा रें.- जेव्हां विटांच्या एवजीं सिमेंट कांक्रीटचीं गटारें बांधणें असतील तेव्हां विटांच्या जितक्या जाडीच्या कमानी वरून होतील तितक्या जाडीच्या सिमेंटकांक्रीटच्या कमानी केल्या तरी चालतात. या कमानीचें कांक्रीट करतांना १ भाग सिमेंट, २ भाग वाळू आणि ३ भाग बारीक फोडलेली (म्हणजे ॥। इंच) खडी वापरतात.

म्या न हो ल अ थ वा प्र वे श द्वा रें:- हीं बहुतकरून नळाची रेषा अगदी सरळ असली तरी सुद्धां सुमारें ३०० फूटपर्यंत ठेवतात. आणि इतक्या दूर अंतरावर म्हणजे मैलांत सुमारें १८ अशीं प्रवेशद्वारें ठेविलीं असतां तीं एकमेकांपासून बरींच दूर पडतात आणि म्हणून अशा दोन प्रवेशद्वारांच्या मधोमध दिवा आंत सोडण्यासाठीं लहान नळ उभा बसवितात. ह्या नळांतून दिवा सोडून तो तळाला पोचल्यानंतर जर दोन्ही बाजूंच्या म्यानहोलांतून प्रकाश दिसला तर मधला सगळा नळ साफ आहे. गाळानें कोंदलेला नाहीं असें समजावयाचें. हीं प्रवेशद्वारें किंवा म्यानहोल मनुष्यांनीं आंत जाऊन गटाराची तपासणी करण्यासाठी आणि  गाळ साठला आसल्यास तो काढून टाकण्यासाठी उपयोगी पडतात. अशी प्रवेशद्वारें जेथें जेथें गटारांत वांक, कोपरें वगैरे असतील अशा ठिकाणीं व दोन गटारांचा सांधा जेथें होत असेल अशा ठिकाणीं बांधतात. ह्या म्यानहोलचा वातागमनिर्गम नळ बसविण्याकडे किंवा गटारें धुवून काढण्यासाठीं एकदम सोडावयाचें पाणी सांठविण्यासाठीं उपयोग होतो. म्यानहोलच्या तळांतून नळ नेण्याच्या वेळीं अर्धवर्तुळाकृति नळ बसवितात. आणि त्याच्या दोन्ही बाजूंकडून सर्व पाणी त्यांत ओघळून येईल अशा रीतीनें दोन्ही बाजूला स्लोप देतात. सर्व म्यानहोलांमधून खालीं उतरण्यासाठी बिडाचे दीड फूट अंतरावर पायटे बसवितात. अशीं म्यानहोलें अलीकडे आंतील व्यास सत्तावीस इंच असणार्या नळांचाहि करतात. आणि त्यांच्या तळाशीं ४२ इंच व्यासाचे दोन फुटी दोन नळ बसवून म्हणजे ४ फूट उंची करून त्याच्यावर एक नळ तळाशीं ४२ इंच, आणि माथ्याशीं २७ इंच असा १॥। फूट उंचीचा नळ बसवून त्याच्यावर वर सांगितलेले २७ इंच व्यासाचें नळ जमिनीपर्यंत बसवितात. सर्व प्रकारच्या म्यानहोलांच्या माथ्यावर आंतील विषारी हवा बाहेर न येईल अशीं वाताभेद्य झांकणें बसवावीं लागतात. ज्या ठिकाणीं जमीन पोकळ असेल किंवा अतिशय भार सहन करावयाचा असेल अशा ठिकाणी बिडाचे नळ वापरावेत. हे नळ ३०० पूट उंच पाण्याचा, म्हणजे दर चौरस इंचास सुमारें १३० पौंडांइतका दाब सहन करावयाजोगे असल्यास पुढील मापाचे असावे लागतात.

नळाचा व्यास इंच नळाची जाडी इंच ९ फुटी नळाचें व. पौंड सांध्यास शिसें पौंड ताग तोळे
११/३२ ११२ २|
५/१३ १५४ ३ ३/८
१३/३२ २६६ १३
१५/३२ ३७८ १० २०
|| इंच ५३४ १४ ३०
१२ ९/१३ ७०० १७| ४०

असें बिडाचे नळ बसविण्यापूर्वी ते पातळ खडेडामर आणि थोडें जवसाचें तेल यांचें मिश्रण करून तें सुमारें ४०० अंश तापवून त्यांत नळ १० मिनिटें उभे बुचकळून ठेवून अंतर बाहेर काढून वाळूं द्यावे. हीच डॉ. एँगस स्मिथ यांची बिडाचें संरक्षण करण्याची पद्धति होय. नळाला वरील मिश्रण सर्व ठिकाणीं चांगलें चिकटलेलें असलें पाहिजे. आणि तें तडकून त्याच्या खरपुड्या पडून जातां उपयोगी नाहीं. मिश्रणाच्या थराची जाडी इंचाच्या शंभरांइतकीं सुमारें असावी ह्या मिश्रणांत घालण्यापूर्वी नळांवर कोणत्याहि ठिकाणीं गंज चढला असल्यास तो खरडून काढावा.

न ळा व र गं ज.- बिडाचे नळ हे मोर्यांतील घाण पाणी त्यांतून नेहमीं वाहात असेल तर फार वर्षे टिकतात. परंतु असे नळ वातोद्गम (व्हेंटिलेटिंग) नळासाठीं वापरले तर मात्र ते, मोर्यांतील विषारी वायूच्या विनाशी क्रियेनें फार लवकर गंजतात व निरुपयोगी होतात. आणि म्हणून ह्या दुसर्या प्रकारच्या म्हणजे व्हेंटिलेटिंग पाईपसाठी शिशाच्या किंवा आंतून शिसे लावलेल्या लोखंडाच्या नळ्या वापरणें बरे. बिडाचे नळ वापरतांना त्यांचे सांधे करण्यासाठीं पाव इंचापासून ५/४ इंच इतक्या रुंदीचा एका नळाच्या बाहेरील भाग व दुसर्या नळाचें सुमारें ४ इंच लांबीचें तोंड यांमध्यें पहिल्यानें तागाची दोरी घालून शिशानें भरून काढतात. जेव्हा पायखानें जोडले असतील तेव्हां ३ ते ४ इंच व्यासाचें नळ जोडळे पाहिजेत. व ह्या नळांतून घरांच्या माथ्यापर्यंत व्हेंटिलेटिंग पाईप जोडला पाहिजे. घराला जास्ती मजले असून वरील मजल्याचे शेतखानेहि त्या एकाच नळाला जोडतात. परंतु असे जोड करतांना खाली ट्रयापच्या बाहेरील बाजूस २ इंची नळी जोडून ती व्हेंटिलेटिंग पाईपला जोडतात. असें केल्यानें वरील मजल्यावरील वाहात येणार्या पाण्याच्या योगानें नळीत जो निर्वात्प्रदेश उत्पन्न होतो त्यानें दुसर्याहि ट्रयाप्समधील पाणी खेचून जाण्याचा जो संभव असतो तो टळतो. लहान लहान मोर्यांतील व स्नानगृहांतील पाणी गटारांत वाहून जाण्यासाठीं दर फूट लांबीस ६ पौंड वजन भरणारे शिशाच्या पत्र्याचे नळ वापरतात.

सां धा जो ड णें.- ज्याप्रमाणें बिडाचे नळ जोडतांना सांध्यांतून शिसें ओततात त्याचप्रमाणें लोखंडी नळ जोडतांना करतात. अथवा गंजाचा सांधा (रस्ट जॉइंट) करतात. हा सांधा करतांना लवकर कठिण होऊन घट्ट बसावा असें करणें असेल तर वजनानें १ भाग नवसागराची पूड, २ भाग गंधकाची पूड, ८० भाग लोखंडाचा चुरा (चरकी धरतांना निघालेला किंवा सामत्यानें भोंक पाडतांना निघालेला) ह्यांचें पाण्यांत दाट मिश्रण करून त्यानें लोखंडी नळाचा सांधा भरतात. जेथें सांधा हळू हळू कठिण झाला तरी चालत असेल तेथें ९ भाग नवसागर, १ भाग गंधक, २०० भाग लोखंडाचा चुरा अशींच द्रव्यें घेऊन पाण्यांत कालवून त्या मिश्रणाने सांधा भरून काढावा जेव्हां शिशाची नळी बिडाच्या नळास जोडणें असेल तेव्हा त्या दोहोंच्या सांध्यावर पितळेच्या नळीचा तुकडा बसवितात आणि शिशाच्या नळीचा आणि पितळेच्या नळीचा सांधा डाक लावून करून घेतात.

घा ण पा ण्या चे न ळ.- घाण पाण्याचे नळ इमारती. खालून कधीहि येऊं नयेत. नेणें जरूरच असल्यास बिडाचे नळ घालून व त्यांचे सांधे अगदीं मजबूत करून न्यावेत. कारण विटांचे रोडे, पाण्यात दर सेकंदास २ फुटांचा वेग असतां वाहून जातात. घाण पाण्याचे नळ ६ ते ९ इंच व्यासाचें असल्यास आंतील पाण्याचा साधारण वेग दर सेकंदास ३ फुटांपेक्षा कमी नसला म्हणजे त्यांत गाळ बसत नाहीं. हेंच नळ १२ ते २४ इंच व्यासाचे असले तर हा वेग २॥ फूट असला तरी चालतो. आणि ह्याच्यापेक्षांहि मोठ्या गटारांत मध्यम वेग दर सेकंदास २ फुटांपेक्षां कमी नसावा.

व्हें टि ले टिं ग पा ई प.- वर एके ठिकाणीं सांगितलेंच आहे कीं, घाण पाण्याच्या नळांत किंवा गटारांत एक दिवसापेक्षां जास्ती वेळ कोणतीहि घाण राहूं नये, याकरतां गटारें धुण्याचे हौद एकदां तरी सोडावे. असें केलें नाहीं तर सांचलेल्या घाणींतून नाना प्रकारचे विषारी ग्यास उत्पन्न होऊन गटारांच्या वरच्या भागांतून सांचतात. आणि ते मनुष्याच्या श्वासोच्छ्वासाच्या योगानें त्याच्या शरीरांत प्रविष्ट झाले तर ते अपाय केल्यावाचून कधींहि रहात नाहींत. यासाठींच गटारांनां व घाण पाण्याच्या नळांनां, तसेंच पायखान्यांच्या नळांना जागोंजाग व्हेंटिलेटिंग पाईप्स (वातागमनिर्गम नळ) बसवितात. आणि गटारांतील दूषित हवा कोठेंहि अन्य ठिकाणीं बाहेर पडूं नये म्हणून पाण्यानें भरलेले वायुनिरोधक ट्रयाप बसविल्यावांचून बाहेरील कोणताहि नळ व मोरी त्यांत सोडीत नाहींत. व्हेंटिलेटिंग पाईप्स घालून स्वच्छ हवा गटारांत शिरून दूषित हवा बाहेर निघून जाईल अशी व्यवस्था प्रत्येक ठिकाणीं केली पाहिजे. मोठ्या गटारावर असे व्हेंटिलेटिंग शाप्ट घालणें ते ६ इंच व्यासाचे नळ म्यानहोलाच्या माथ्याजवळून सुरू करून ते जवळील घराच्या कौलाराच्या वरपर्यंत नेऊन सोंडतात. आणि त्यावर अर्धगोलाकृति जाळीचें झांकण बसवितात. त्याच्या सारखेच दुसरे नळ गटारांत स्वच्छ हवा सोडण्यासाठीं उभे करतात. परंतु ते फार उंचीपर्यंत नेत नाहींत.

गटारांतील घाण मोरीच्या भोंकांतून घरांत शिरूं नये म्हणून जे बिडाचे किंवा झिलई दिलेल्या स्टोनवेअरचे नळ बसवितात त्यांत नेहमीं पाणी सांठून रहावें व घाण हवा येऊं नये हा हेतु असतो. परंतु त्यांतील पाणी कोणत्याहि कारणानें कमी झालें म्हणजे त्यांतून हवा अलीकडून पलीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. व अशा रीतीनें तो ट्रयाप असून नसून सारखा अशी स्थिति होते. यासाठीं ट्रयापच्या बाहेरच्या बाजूनें वरपर्यंत व्हेंटिलेटिंग पाईप घातली असल्यास बरें, हे ट्रयाप्स आंतून गोल व गुळगुळीत असावे. म्हणजे त्यांना कोठेंहि मळ चिकटून रहात नाहीं व पडलेला सर्व मळ पाण्याच्या लोटाबरोबर वाहून जातो. ट्रयापमधील पाणी वेगवेगळ्या कारणांनी कमी होतें. किंवा गटारांतील वायूचा दाब जास्ती झाल्यास घाण किंवा विषारी वायु ट्रयापमधून घरांतील मोरींत शिरतात.

ट्रॅया प म धी ल पा णी क मी हो णें.- कधीं कधीं पाणी फार जोरानें किंवा एकदम ओतल्यानें बाहेरच्या बाजूला सायफनक्रियेनें निर्वातप्रवेश उत्पन्न होऊन ट्रयापच्या नळांतलें पाणी खेंचलें जातें. किंवा ट्रयापमध्यें एखादें चिंबूक पडलें असल्यास आणि त्याचें एक टोंक पाण्यांत आणि दुसरें टोंक खालीं जाणार्या नळांत लोंबत असलें तर केशाकर्षणाच्या योगानें पाणी खेंचलें जाऊन त्या चिंधीच्या द्वारें पाणी खाली टिपकत रहातें. आणि अशा रीतीनें ट्रयापच्या तळांतील पाणी कमी होतें. किंवा घर कांहीं दिवस बंद राहिल्यास ट्यापमधील पाणी सुकून जातें. आणि अशा रीतीनें मोरींतून घाण घरांत पसरते. व कधीं कधीं ट्रयापमधील पाण्यांत मळ पडून राहिल्याने किंवा त्यांत स्वच्छ पाणी असलें तरीहि त्या पाण्यांत गटाराकडील बाजूचे विषारी वायू येऊन व तें पाण्यांत विरून ट्रयापच्या पाण्याचा जो पृष्ठभाग आंतल्या बाजूस असतो त्यांतूनहि हे विषारी वायू आंतील बाजूस प्रवेश करतात. ह्या कारणामुळें असे ट्रयाप घरांपासून बर्याच अंतरावर ठेवावेत. व त्यांनां बाहेरील मोर्या नेऊन मिळवाव्या. अशा हौदाचें व त्यास जोडलेल्या नळांचें मान पुढें दिले आहे.

घाण पाण्याचे नळ दिवसांतून निदान एक वेळ तरी हौदांतून एकदम सोडून धुवून टाकले पाहिजेत.

नळाचा व्यास इंच स्लोप किती फुटास १ फूट हौदाचें प्रमाण (ग्यालन पाणी)
४० ३०
५० ४०
६० ६०
१०० १००
२०० १६०
१०० २००
१५० २५०
२०० ३००
२०० ३००
१२ ... ५००
१५ ... ६०० ते ८००

सा य फ न.- ह्या हौदांतील पाणी आपल्या आपण सुटण्यासाठीं आंतल्या बाजूस सायफन बसवितात. आणि त्यांतून दिवसांतून जितक्या वेळां पाणी सुटावें असें ठरविलें असेल तितक्या वेळां हौद रिकामा व्हावयाचा असा हिशेब करून तितकें तितकें पाणी २४ तासांत जेवढ्या नळांतून वाहून येईल त्या आकाराचा पाण्याचा नळ बसवावा. हीं घाण पाण्याचीं गटारें धुतांना खालपासून म्हणजे मोठे नळ प्रथम धुवून नंतर वरचें म्हणजे लहान नळ धुतात.

पा व सा च्या पा ण्या ची ग टा रें.- पावसाचें पाणी जाण्यासाठीं रस्त्याच्या बाजूस गटारें निमगोल आकाराची बांधून काढलेली असल्यास त्यांच्या तळाचा स्लोप ८० फुटांस १ फूट इतका साधारण देतात. आपल्या इकडेस अशीं रस्त्याच्या बाजूनें पावसाच्या पाण्यासाठीं गटारें काढणें, आणि घाण पाण्यासाठीं रस्त्याच्या मधोमध बर्याच खोलीवर लहान नळ घालणें हेंच कमी खर्चाचें असतें. कारण आपल्या इकडेच पाऊस कधीं कधीं फार जोराचा पडतो आणि अशा पावसाचें पाणी घाण पाण्याच्या नळांतून किंवा गटारांतून वाहून नेण्यासाठीं हीं गटारें फारच मोठीं बांधावीं लागतील. आणि त्यामुळें खर्चहि फार येईल. ह्याकरतां घाण पाण्याची आणि पावसाच्या पाण्याचीं गटारें वेगळीं असावीं.

शे तां ती ल मो र्या.- जेव्हां जमिनीत पाणी सांचून राहते व त्यापासून मनुष्यांना, त्याचप्रमाणे त्या जमिनीत उगवणार्या शेतीलाहि फार अपाय होतो अशा वेळी जमिनीतून जास्त असणारे पाणी काढून टाकण्यासाठी कांही कांही अंतरावर समांतर मोर्या बांधतात. ह्या मोर्या बांधणें त्या ३ पासून ४ फूट खोलीवर बांधतात. त्याच्या काटकोनांत ज्या लहान मोर्या बांधतात त्यांची खोली २॥। फुटांपासून ३॥ फुटांपर्यंत ठेवतात. आणि ज्या मोठ्या मोर्यांत यांचें पाणी जाऊन पडतें, त्या मोर्या ३। फुटांपासून ४ फुटांपर्यंत खोलीच्या कराव्या. असें केल्यानें शेतीची जमीन, किंवा गटारांतील घाण पाणी खतासांठीं दिलेली जमीन जास्त पाणी झाल्यानें दलदलीसारखी बनत असल्यास वर सांगितलेल्या प्रकारच्या मोर्या बांधल्यानें जमीनींतील जास्त पाणी वाहून गेल्यामुळें जमीन फिरून शेतीच्या कामाच्या उपयोगी पडते. अशा मोर्यांनां १०० फुटांस १ फूट ते २०० फुटांस १ फूट इतका उतार देतात. जमीन रेताळ असेल तर अशा मोर्या, त्यांची जितकी खोली असेल तिच्या १० ते १२ पट इतक्या अंतरावर ठेवल्या तरी चालतात. कमी रेताळ मातींत हें अंतर ६ ते ८ पट असावें लागतें. आणि साधारण चिकण मातींत ४ ते ६ पट असलें पाहिजे. उदाहरणार्थ जर अशा मोरीची खोली सरासरी ३ फूट असली तर अशा मोर्या रेताळ जमिनींत ३० ते ३६ फूट अंतरावर असाव्या. परंतु चिकण मातीत त्या १२ ते १८ फूट अंतरावरच ठेवाव्या. ह्या मोर्या खणलेल्या चरांत ३ ते ४ इंच व्यासाचे नळ घालून किंवा दोन दगड उभे व माथ्यावर आडवा दगड ठेवून व त्यांवर मोठे गोटे घालून मातीनें चर भरून काढतात. अथवा २ ते ४ इंच व्यासाच्या गोट्यांनी चराचा तळ १ ते २ फूट उंचीपर्यंत भरतात. म्हणजे अशा गोट्यांच्या सापटींतून पाणी वाहून जातें.

रो ग जं तु वि ना श क द्र व्यें.- रोगजंतुविनाशक आणि शुद्ध करणारे पदार्थ नेहमीं उपयोगांत आणतात ते येणेंप्रमाणें:- उकळणारें पाणी, वाफ, फार तावलेली हवा, रस कापूर, कॅरबॉलिक अॅसिड, आयोडीन, पोट्याश परम्यांग्यानेट, क्लोरिनचें पाणी आणि विस्तव हीं सर्व जलाल, कृमिघ्न व सूक्ष्म जंतुघ्न आहेत. ह्यांच्यापेक्षां कमी योग्यतेचीं द्रव्यें म्हणजे वरील रासायनिक द्रव्यें जास्ती पाणी घालून उग्रता कमी केलेली आणि लाईम क्लोराईड, हायड्रोक्लोरिक अॅसिड, सल्फ्युरस अॅसिड क्रिओसोट, कळी चुना, कॉस्टिक सोडा, वगैरे. ह्यांच्या योगानेंहि साधारणत: सर्व रोगजंतू मरतात. पूतिस्तभंक (अँटीसेफ्टीक) द्रव्यें म्हणजे झिंक सल्फेट, लाईम क्लोराईड, मोरचूद, हिराकस बोरोसीक अॅसिड, सवागी, थॅमोल, टरपेन तेल, यूक्यालिप्टस ऑईल हे सर्व रोगबीजवृद्धीविरोधक पदार्थ आहेत. पोट्याशपर  म्यांड्यानेट हें दुर्गेंधिविनाशक द्रव्य आहे पण अॅटीसेफ्टीक नाहीं. हवेंतील दुर्गंधि नाहीशीं करणारी द्रव्यें क्लोरीन वायु, सलफ्ल्यूरस अॅसिड म्हणजे साधा गंधक जाळून उत्पन्न होणारा वायु, ओझोनो, युक्लोरीन, फॉरम्यालीन, ह्यांची धुरी दिल्यानें घाण नाहीशीं होते.

रो ग प्र ति बं ध क उ पा य.- कोणताहि रोग उद्भवण्याची भीति असेल तेव्हां पायखाने, मोर्या वगैरे, कॅरबॉरिक अॅसिड, रसकापूर किंवा अशाच द्रव्यांनी शुद्ध करावे. घरांत किंवा घराजवळ उकिरडा पडला असल्यास व तो काढून टाकण्याची सोय नसल्यास अथवा तो त्यावेळी हलविला असतां सभोंवती जास्ती घाण पसरण्याचा संभव असल्यास त्या उकिरड्यावर २ ते ३ इंच जाडीचा लांकडाच्या कोळशाचा थर करावा. आणि अशा रीतीनें सर्व उकिरडा झांकून टाकावा किंवा चांगली स्वच्छ शेतांतील माती आणून त्या मातीचा थर करावा.असें केल्यानें ढिगांतून बाहेर येणारी घाण बंद होते. घाणीनें भरलेले खड्डे, दर ग्यालन पाण्यांत ३ पौंड हिराकस घालून त्या पाण्यानें शुद्ध करावे. मोर्या वगैरे धुण्यासाठीं पाण्यांत पोट्याशियम परम्यांग्यानेट विरघळून वापरावे म्हणजे घाण नाहींशी होते. हेंच काम फिनाईलनें सुद्धां होतें.

औ ष धें  पि च का री नें मा र णें.- नुसत्या धुरीनें सर्व रोगबीजें नाश पावत नाहींत. तसें करण्याला घराच्या जमिनी, भिंती व पाटणी वगैरे सर्व भाग रसकापूर घातलेल्या पाण्यानें धुतल्या पाहिजे. रसकापूर हें मोठें भयंकर विष आहे. म्हणून तें अशा कामासाठी वापरतांना असलें विषारी पाणी कोणाच्याहि पोटांत न जावें ह्यासाठीं तीन ग्यालन पाण्यांत अर्धा औस म्हणजे १। तोळा रसकापूर आणि एक पातळ औस भर हायड्रोक्लोरिक अॅसिड घालतात. आणि हें कांहीं वेगळेंच औषध आहे असें समजण्यासाठीं त्यांत ५ ग्रेन जांभळ्या शाईची पूड घालतात. असें केल्यानें तें मनुष्याच्या पोटांत जाण्याचा संभव रहात नाहीं. हें मिश्रण तयार करून ठेवलें तरी टिकतें. आणि जेव्हां जेव्हां तें वापरावयाचें असेल तेव्हां सफेरी लावण्याच्या कुंच्यानें तें सर्व जमिनीला, भिंतीनां व पाटणीला वगैरे लावावें. म्हणजे सर्व रोगबीजाचा नाश होतो. हें मिश्रण वापरतांना धातूची भांडी उपयोगांत आणूं नयेत, लांकडी पिपें किंवा भाजलेले मातीचें कुंडे वापरावे. ज्या भेगांतून किंवा चिरांतून नुसत्या कुंच्यानें हें विनाशक द्रव्य जाणार नाहीं अशा ठिकाणीं पिचकारीनें तें फटींत मारावें.

मो र्यां ची दु र्गं धि.-ज्या शहरांतून घाण पाण्याचीं गटारें बांधलीं असतील अशा ठिकाणीं गटारांतील दूषित हवा घरांत न शिरेल अशी व्यवस्था अवश्य केली पाहिजे. अशी दूषित हवा आंत येत आहे कीं काय हें सुटणार्या दुर्गंधींवरून तेव्हांच लक्षांत येतें. आणि म्हणून दुर्गंदींची कधीहि उपेक्षां करतां कामा नये. दुर्गंधि कशामुळें सुटते आहे त्याचा तपास करून त्याचें कारण काढून टाकलें पाहिजे नाहीं तर अशा दुर्गंधीपासून आंत्रज्वल (टायफाईड) किंवा अन्य तर्हेचे ताप घरांतील माणसांनां होण्याचा संभव असतो. असे मारक रोग न झाले तरी सुद्धां बारीक बारीक नाना प्रकारचें आजार किंवा मर्गळ हीं या मोर्यांच्या घाणीपासून मनुष्यांस जडतात. निजाबसावयाच्या जागेंत मोर्या बिलकुल उपयोगी नाहींत. आणि स्वयंपाकघर, आंघोळीची जागा वगैरे ठिकाणच्या मोर्याहि, त्यांतून मोकळी हवा खेळेल अशा असल्या पाहिजेत. तसेंच आवारांतील व गटारांतील घाण मोरीच्या तोंडांतून घरांत न शिरेल अशी व्यवस्था अवश्य केली पाहिजे. जर घरांत किंवा आवारांत कोठेंहि मोरीची घाण येत असेल किंवा भिंतीला ओल आली असेल तर त्या ठिकाणीं मोरी फुटून कोठें तरी घाण मुरत आहे असें समजावें व लगेच मोरी दुरुस्त करावी. या घाण पाण्याचा उपयोग शेतीकडे तरी रोजच्या रोज केला पाहिजे. कारण दररोज येणार्या लाखों ग्यालन पाण्याचा निकाल लागणें जरूर असतें.

घा ण पा ण्यां ती ल द्र व्यें.- सूएज म्हणजे गटारांतील घाण पाणी एक ग्यालन घेतलें तर त्यांत १०० ग्रेन घन द्रव्यें सांपडतात. व या शंभरांपैकीं ४० ग्रेन सेंद्रिय पदार्थ असतात. आणि असें घाण पाणी शुद्ध करणें म्हणजेच हे ४० ग्रेन सेंद्रिय पदार्थ काढून टाकणें होय. व जे निघावयाजोगे नसतील त्यांनां प्राणवायुयुक्त करणें (आक्सीडाईज) होय.

ज ल शु द्धी क र णा च्या प द्ध ती.- सेंद्रिय पदार्थ नासतात किंवा कुजतात व यामुळें त्यांचें निरिंद्रिय किंवा अचेतन अथवा जड पदार्थांत रूपांतर करणें जरूर असतें. असें रूपांतर करण्यासाठीं शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण झाल्या आहेत. त्या सर्वांत, गटारांचें आलेलें घाण पाणी बांधलेल्या मोठमोठ्या हौदांतून कांहीं काळ पर्यंत भरून ठेवून त्या पाण्यांतील जड पदार्थ तळाशीं बसतील इतका अवधीं देतांत. किंवा कांहीं ठिकाणीं रासायनिक द्रव्यें घालून गाळ खालीं बसेल असें करतात. व दुसर्या कांहीं ठिकाणीं पूतिजनक मोठमोठालें हौद (सेफ्टीक ट्यांक) त्यांत बॅक्टेरिआ (अति सूक्ष्म आद्य जंतु) यांच्या साहाय्यानें आंतील घन पदार्थांचें द्रवीकरण करवून निरिंद्रिय जड पदार्थ तळाला गाळ बनून बसावे अशी व्यवस्था करतात किंवा कांहीं प्रकारच्या स्ले ट फि ल्ट र मधून गाळून काढतात. व अशा रीतीनें पाण्यात न विरघळलेले सर्व जड पदार्थ (सॉलीड म्याटर इन् सस्पेनशन्) गाळाच्या रूपानें काढून टाकतात. ह्यानंतर पाण्यांत विरवून राहिलेल्या सेंद्रिय पदार्थांचें प्राणवायूशी संयोजन करतात. असा प्राणवायूशीं निरिंद्रिय पदार्थांचा संयोग झाला म्हणजे ते अचेतन असे पदार्थ बनतात. आणि नंतर ते कुजण्याची भीति रहात नाहीं. व असें शुद्ध केलेलें पाणी सुटें सोडलें तरीहि चालतें. हें प्राणवायुसंयोजन कार्य घाण पाणी जमिनीवर किंवा शेतांतून सोडण्यानें साधतें.

घा ण पा ण्या चें ख त.- आपल्या इकडेस मुंबईसारख्या समुद्रकांठच्या ठिकाणीं गटारांतील सर्व घाण पाणी समुद्रांत सोडतां येतें. परंतु इतर ठिकाणीं गटारांतील सर्व पाणी पंपाच्या योगानें चढवून आणि कांही वेळपर्यंत तें हौदांत ठरून राहिल्यानंतर त्या हौदापासून पक्के नळ घालून किंवा पाटवणें बांधून आणि आडवे बारके नळ घालून २०० ते ४०० एकर एवढ्या शेतीला पाणी देतां येईल अशी व्यवस्था करतात. वर सांगितलेल्या हौदांत जो गाळ तळाशीं बसतो तो वरचेवर काढावा लागतो आणि त्याचा खताकडेस उपयोग करतात. कधीं कधीं पाण्यांतील घाणीचें प्रमाण उन्हाळ्या दिवसांत इतकें वाढतें की अशा घाण पाण्यांत पुष्कळसें स्वच्छ पाणी घातल्यावाचून तें शेतीस सहन होत नाहीं.

सु ए ज फा र्म.- शेतीला घाण पाणी देण्यासाठीं शेत शहरांत हद्दीपासून निदान दोन तीन मैल दूर असावें म्हणजे त्याच्या घाणीपासून उपसर्ग लागण्याचा संभव राहात नाहीं. तसेंच शहरापासून दूर असल्याकारणानें जमिनीला किंमतहि कमी पडते व जास्ती जमीन घ्यावयाची असेल तेव्हा ती मिळूंहि शकते. खेरीज लांबच लांब नळांतून वाहून जाण्यानें पाण्यांतून वाहात जाणारा मळ पाण्यांत विरघळून सारखें मिश्रण बनतें. सुएजफार्म म्हणजे ज्या शेतीला घाण पाणी द्यावयाचें तेथें पंप केलेलें पाणी आल्यावर तें हौदांत निदान २-३ तास तरी ठरलें पाहिजे. म्हणजेच त्यांतील जड पदार्थ तळाशीं बसतील. ह्या हिशेबानें पाहिलें असतां हा हौद एवढा मोठा बांधला पाहिजे कीं, त्याचा सांठा, जेवढें पाणी सार्या चोवीस तासांत गांवांतून येणार असेल त्याच्या तृतीयांशाइतका मोठा असला पाहिजे. या हौदांचे बरोबर २ भाग करावे. म्हणजे त्यांपैकीं एकांत पाणी वाहून येत असले तर दुसर्यांतील पाणी शेतीला देऊन तळाला राहिलेला गाळ काढतां येतो. शेतीला पाणी देण्याचे नळ किंवा पाट १ ते २ फूट व्यासाचे असतात. आणि त्यांनां उतार ५०० ते १००० फुटांत  १ फूट इतका असतो आणि ते चुन्याविटांचें व कांक्रीटचे किंवा भाजलेल्या झिलईदार नळांचे अर्धवर्तुळाकृति करतात. आणि शेतांतून पाणी नेण्याचे नळ अर्धवर्तुळाकृति ६ इंची एकमेकांपासून ३० ते ६० फूट अंतरावर बसवितात. किंवा जमिनींत पाटवणें करतात.

सु ए ज फा र्म व री ल पि कें.- अशा रीतीनें जितकी जमीन, येणार्या सर्व घाण पाण्यानें आठवडयात भिजेल त्याच्या तिप्पट ते सातपट भिजावयाजोगी जमीन असली पाहिजे. म्हणजेच आळीपाळीनें पिकें काढतां येतात. ह्या घाण पाण्यावर कोबी वगैरे भाजीपाला चांगला येतो. कांहीं ठिकाणीं ऊंसहि लावतात पण त्याला गोडी कमी असतें. गहूं वगैरे धान्येंहि करतां येतात. अशा शेतीला दर एकरास एका दिवसांत ४ ते ९ हजार ग्यालन घाण पाणी देतां येतें.

खो द का म, मा ती चें भ रा व.

खो द ण्या ची प द्ध त.- कोणत्याहि प्रकारचें खोदाण करतांना व पाया खोदतांना आंत जो मनुष्य काम करीत असेल त्याच्या अंगावर, केलेल्या चराच्या बाजूची माती ढांसळून पडूं नये अशी खबरदारी घेतली पाहिजे. व म्हणून चिकण मातीची जमीन असेल तर १०/१५ फूट खोलीपर्यंतहि चराच्या दोन्ही बाजू सरळ उभ्या म्हणजे ओळंब्यांत खोदल्या तरी चालतात. यापेक्षां जास्ती खोल जावयाचें असल्यास चराच्या दोन्ही बाजूंला ३ पासून ५ फूट अंतरावर रायवळ लांकडाच्या फळ्या उभ्या करून एकमेकांसमोर असणार्या फळ्यांनां पिढी मारून लांकडाचें किंवा वाशाचे आडवे तुकडे घट्ट ठोकतात. म्हणजे चराच्या बाजू ढांसळून आंत पडण्याची भीति रहात नाहीं. पाया खोदावयाची जमीन जर किंचित दमट-रेताळ मातीची असेल तर पायाचे चर खोदतांना वरीलप्रमाणें फळ्यांचा आधार दिल्यावांचून ३/४ फुटांपेक्षां जास्ती खोल खणणें धोक्याचें असतें. व तीच जमीन किंवा नदीचें पात्र कोरडी वाळू व गोट्यांनीं भरलेलें असलें तर त्यांच पाया खोदावयाचा असल्यास वरपासूनच लांकडाची पेटी करून त्यांत खोदकाम करावें लागतें.

ढा ळ दे णें.- बाजूची माती खोदून आणून जर रस्त्याचा भराव करावयाचा असेल तर ह्या भरावाच्या बाजूंनां दीड फुटास एक फुटपासून दोन फुटास एक फूटपर्यंत ढाळ किंवा स्लोप देतात. इतका ढाळ किंवा स्लोप दिला म्हणजे केलेला स्लोप कायम राहतो, पावसानें भिजल्यावरहि ढासळून सरकून जात नाहीं. कारण साधारण माती नुसती टाकली तरी इतक्या स्लोपानें राहूं शकते. खोदकाम करतांना ही माती चिकण असेल तर एक फुटास एक फूट इतका स्लोप किंवा ढाळ देतात. १० फूटांपेक्षां जास्ती असल्यास दीड फुटास १ फूट व ३० फुटांपेक्षां जास्त असल्यास दोन फुटांस एक फूट इतका स्लोप देतात. दोन फुटास एक फूट म्हणजे दोन फूट रुंदीला एक फूट उंची असें समजावयाचें. खोली ३० फूट असली तर स्लोपाचें वरचें टोंक, खालच्या टोकांपासून त्या टोंकावर ओळंबा सोडला असतां जी उभी रेषा येईल त्या उभ्या रेषेपासून स्लोपाची वरची धार ६० फुटांवर असते. असें केलें म्हणजे त्या स्लोपाची लांबी ६७॥  फूट होते. भराव जर गोट्यांचा करावयाचा असेल तर त्याच्या बाजूंनां एकास एक पासून दिडास एक इतका ढाळ द्यावा लागतो. रेताळ मातीला दीड फुटास एकपासून अडीच फुटास एक इतका व दमट माती असेल तर तिला एकाच एक व पाण्यानें अतिशय भिजलेली चिखलासारखी माती असेल व त्यांत खोदकाम करावयाचें असेल तर बाजूंचा स्लोप तीन फुटांस एक फुटापासून चार फुटांस एक फूट द्यावा लागतो. चार फुटांस एक फूट द्यावा लागतो. चार फुटास एक फूट  उंची म्हणजे आडवें चार फूट अंतर घेतलं असतां एक फूट उंची समजावयाची असें असल्याकारणानें माती फार भिजून तिचा चिखल होईल इतकी भिजूं देतां उपयोंगी नाहीं. नाहीं तर खोदकाम उगीच जास्ती रुंदीचे करावें लागतें. व येवढ्यासाठींच मातीत पाणी जिरून ती फार सैल होऊं नये म्हणून वरच्या बाजूनें येणारें. पाणी गटार खोदून एका बाजूला काढून देतात व असे केल्यानें दीड फुटास एक फूट इतका उभा ढाळ देता येतो.

ख ड कां त खो द का म.- खडकांतून खोदाण करावयाचे असल्यास व तो खडक सुरुंग लावून फोडण्याइतका कठिण असल्यास त्यातील खोदकामाच्या बाजू उभ्या म्हणजे ओळंब्यांत ठेवल्या तरी चालतात. पण तोच खडक मुरमासारखा मऊ असेल तर अर्ध्या फुटाला एकपासून दीड फुटास एक फूट इतकाहि स्लोप द्यावा लागतो. मातींत कोणतेहि खोदकाम किंवा भराव केला तर खोदकामांत किंवा भरावावर पाणी सांठून न राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. एवढ्यासाठीं खोदकामाच्या दोन्ही बाजूंनां गटारें करून पाणी बाहेर काढून दिलेलें असतें. त्याचप्रमाणें भराव केलेला असेल त्याच्या बाजूलाहि पाणी सांठून भरावाची माती भिजलेली राहूं नये म्हणून ह्यांच्या आसपासचें दोन्ही बाजूचें पाणी जवळपास नी व जमीन असेल तिकडे काढून देतात.

भ  रा वा ची उं ची.- भराव करतांना तो जितक्या उंचीचा रहावा असा हेतु असेल ह्यापेक्षां ती करतांना जास्ती उंचीचा करतात. उदाहरणार्थ तलावाची पाळ बांधतांना तिची उंची माती दबल्यावर १२ फूट रहावी असा इरादा असेल तर ती करतांना १३ ते १३॥ फूट किंवा कधीं कधीं १४ फूटहि करतात. ही एक दोन फूट जास्ती उंची ठेवण्याचें कारण असें की, भराव करतांना जी थोडीफार पोकळ जागा राहते त्यामुळें पाऊस पडून सगळा भराव चांगला भिजला म्हणजे ती सर्व भरावाची माती खाली दबते. व सर्व पोकळ भाग भरून जातो व काम मजबूत होतें. व हें असें दबणें एक दोन पावसाळें त्यावरून जाईतोंपर्यंत चाललेलें असतें.व तितक्या अवधीमध्यें दर फूट उंचीस एक इंचपासून दोन इंचपर्यंत तो भराव दबतो म्हणजे करतांना जो तेरा फूट किंवा १४ फूट केलेला  असतो तो दबून १२ फूट उंचीचाच होतो. तलावाच्या पाळीसाठी भराव करतांना तो भराव सहापासून १२ इंच जाडीचे थर धुमसानें ठोकून अगर रूळ फिरवून तो मजबूत झाल्यावर त्याच्यावर दुसरा थर अशा रीतीनें पाणी शिंपडून व ठोकून भराव केला म्हणजे त्यांतून पाणी झिरपून जाण्याचें भय रहात नाही व तो भरावहि पाऊस पडल्यानंतर दबून खालीं फारसा बसत नाहीं. हे थर घालावयाचे म्हणजे त्यांची दोन्ही शेवट उंच व मधील भाग नीच असे करतात. व असें केलें म्हणजे माती ओली झाल्यावर ती घसरून जाण्याची भीति रहात नाही. असा भराव करण्यास वेळहि जास्त लागतो व खर्चहि जास्त लागतो.

त ला वा चे बां ध.- परंतु तलावाचे बांध, कालव्याच्या बाजूचें बांध वगैरे कामांत अशा रीतीनें बांध घालणेंच जरूर असतें. ज्या वेळेला बांध पुष्कळ रुंदीचा व १५ फूट उंचीपेक्षा जास्ती उंचीचा घालावयाचा असतो त्यावेळेला बांधाच्या दोन्ही बाजू पहिल्यानें करून घेतात. व नंतर मध्ये राहिलेली लांबच लांब नीच जागा मातीनें भरून घेतात. मातींत खोदकाम केलें असतां जर त्या खोदकामाच्या बाजूंनां एका फुटास एक फूट इतका स्लोक द्यावा लागेल इतकी चिकण ती माती असेल तर त्यात मातीचा भराव केला म्हणजे त्या भरावाला १॥ फुटास एक फूट इतका स्लोप द्यावा लागतो. मोठमोठ्या तलावांसाठी बांध घालतांना त्यांतल्या बाजूला २ किंवा २॥ फुटांस एक फूट व बाहेरच्या बाजूला ३ फुटास १ फुटें इतका ढाळ देतात.

आंतल्या बाजूला दोन फुटांस एक फूट स्लोक देतात असें म्हटलें आहे  पण अशा स्लोपावर, पाण्यानें किंवा वार्यानें ज्या लाटा उसळतात त्यानें माती धुपून जाऊं नये म्हणून विटांचे किंवा दगडाचें ९ इंचांपासून १ फूट जाडीपर्यंतचें आस्तरण घालतात. ज्या ठिकाणी अशा प्रकारचें आस्तरण घालीत नाहींत त्या ठिकाणी ५ फुटास एक फूट इतका स्लोप द्यावा लागतो. इतका स्लोप दिल्यावरहि लाटांच्या पाण्यानें माती धुवून जातेच. फक्त स्लोप ढासळून घसून जाण्याचा मात्र संभव कमी असतो.अशा ठिकाणी हरळी, काशा किंवा दर्भ या प्रकारचें गवत लावतात, म्हणजे माती आवळते.

च र ख ण णें.- जलसंचयासाठीं जे तलाव बांधावयाचे असतात त्या तलावांतील पाणी, घातलेल्या मातीच्या भरावांतून थोडेंहि झिरपून जाऊं नये  म्हणनू तो बांध घालतानाच त्याच्या मध्यभागी ८/१० फूट रुंदीचा चर खणतात व तो चर खालीं खडक लागेपर्यंत किंवा चिकण मातीचा थर लागेपर्यंत खोल खणतात. व तयार केलेल्या चिकणमातीनें तो भरून काढतात. व जसजसा भराव उंच उंच होत जाईल तसतसा हा मधला भाग चिकण मातीनेंच भरतात व ज्या उंचीपर्यंत पाणी तलावांत चढण्याचा संभव असेल म्हणजे अतिशय जोराचा पाऊस पडत असतांना व त्या तलावाच्या सांडींतून पाणी वहात असतांना जितक्या उंचीपर्यंत तलावांत पाणी चढेल तितक्या उंचीपर्यंत ही चिकणामातीची भिंत भरावाच्या मधोमध चढवितात व दोन्ही बाजूंस साधी माती घालून भराव करतात. त्यांतील वरच्या बाजूस म्हणजे पाणी ज्या बाजूला भरावयाचें असेल त्या बाजूला जास्ती चिकण असेल अशी माती व खालच्या बाजूस जास्ती रेताळ माती वापरतात. यामध्यें घातलेल्या चिकणमातीच्या योगानें तलावांतील पाणी बिलकुल झिरपून जात नाहीं.

चि क ण मा ती च्या भिं ती:- वरील प्रकारच्या पण कमी जाडीच्या चिकण मातीच्या भिंती कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या भरावांच्या मधोमधहि कराव्या लागतात. व असें केलें म्हणजे कालव्यांतील पाणी झिरपून वाया जात नाहीं. भरावाची माती जर रेताळ असेल तर ५-१० मैलांतच काव्यांतलें पाणी नाहीसें होतें. या चिकणमातीच्या भिंती एकदां केल्या म्हणजे त्या केव्हांहि वाळूं न दिल्या तर त्यांतून पाण्याचा एक थेंबहि बाहेर जाऊं शकत नाहीं. या भिंती करतांना पुराबरोबर वाहून आलेली मळी किंवा गाळ यांचा फार उपयोग होतो. फार कठिण व अतिशय चिकट माती असेल ती या कामाला फारशी उपयोगी पडत नाहीं  कारण ती भिजवून, तुडवून तयार करावयाला फार श्रम लागतात. कधीं कधीं कालवा खोदतांना रेताळ जमिनींतून पुष्कळ पाणी नाहींसें होतें व हें पाणी झिरपणें बंद करावयाचें असल्यास कालव्याच्या तळाला, त्याचप्रमाणें बाजूलाहि वर सांगितल्याप्रमाणें तयार केलेल्या चिकणमातीचा थर द्यावा लागतो व हा थर केव्हांहि कोरडा पडूं दिला नाहीं तर त्यांतून पाणी बिलकुल झिरपून जात नाहीं. कांही कांही ठिकाणीं तलावाचा तळहि अशाच प्रकारच्या रेताळ जमिनीचा असतो; अशा ठिकाणीं पावसाळ्यांत कितीहि पाणी त्या तलावांत भरलें व तलावाच्या पाळींतहि मधोमध चिकण मातीची भिंत केलेली असली तरी देखील पारी झिरपून जाण्यानें तो तलाव उन्हाळ्यापर्यंत कोरडा पडतो. अशा तलावालाहि वर कालव्यांतील पाणी झिरपून जाण्याचें बंद करण्यासाठीं जो उपाय सांगितला आहे. तोच उपाय तशाच रीतीनें म्हणजे तलावाच्या तळाला व बाजूलाहि जितक्या उंचीपर्यंत त्या तलावांत पाणी चढतें तितक्या उंची जितक्या उंचीपर्यंत त्या तलावांत पाणी चढतें तितक्या उंचीपर्यंत चिकणमातीचा थर देतात, म्हणजे त्या तलावांतीलहि पाणी झिरपून जाण्याचें बंद होतें. अशा प्रकारचा थर सुमारें १ फुटाचा असला तरीहि पुरा होतो. पण तो वरच घातल्यास वाळून जाण्याचा व जनावरें आंत उतरत असली तर त्यांच्या पायांनीं त्यांत खड्डे पडून खालची रेताळ जमीन उघडी होण्याचा संभव असतो म्हणून अशा प्रकारचा चिकण मातीचा थर द्यावयाचा त्याच्या वरचा बाजूला साध्या मातीचाहि थर दिला म्हणजे ही खालच्या बाजूची चिकण माती कायम राहूं शकते. व ती लवकरच वाळून तडकतहि नाहीं. कारण वरच्या दोन तीन फूट साध्या मातीच्या थराच्या योगानें उन्हापासूनहि त्याचें रक्षण होतें.

मा ती चे थ र.- कालव्याच्या दोन्ही बाजूचे भराव जर रेताळ मातीचे असले तर त्यांतून पाणी झिरपून जाऊं नये म्हणून त्या भरावांत अडीच पासून ३ फूट रुंदीचे चर तळाला चिकणमाती लागेतोपर्यंत खोदतात व नंतर त्या चरांत पाणी सोडून पायानें खूप तुडवितात. म्हणजे तळांतल्या मातीला चिकणपणा येतो. त्यानंतर चरांत वरून चिकणमाती टाकतात. व पाणी घालून तुडवितात. त्यामुळें जुन्या व नव्या मातीचा व तळांतील मातीचा उत्तम सांधा बनतो व त्यांतून पाणी झिरपून जात नाहीं. खालचा थर तयार झाला म्हणजे तो वाळावयाच्या पूर्वीच दुसरा ९ इंच जाडीचा चिकण मातीचा नवा थर घालतात व तो पाणी घालून तुडवून तयार झाला म्हणजे तिसरा व अशा रीतीनें त्या कालव्यांत जितक्या उंचीपर्यंत पाणी चढणार असेल तेथपर्यंत वर सांगितल्याप्रमाणें ९ इंच जाडीचे चिकण मातीचें थर पाण्यानें नीट भिजवून व तुडवून घालतात. प्रत्येक थरांत इतकें पाणी घालून तो तुडविला पाहिजे कीं, त्यावर पाय ठेवला असतां तो आठ किंवा नऊ इंच खोलीपर्यंत मनुष्याच्या स्वतःच्या भारानेंच जावा व अशा रीतीनें तो चर आंतील सपाटीपेक्षां फूट दीडफूट उंचीपर्यंत भरून काढल्यावर वरचा भाग साधी माती टाकून भरावाच्या माथ्यापर्यंत बुजवून टाकतात. व अशा रीतीनें आंतील ओल्या चिकणमातीला वरून ऊन लागून ती सुकत नाहीं.

थ रां ती ल ओ ला वा.- मातींतील ओलावा बाजूच्या साध्या मातीनें जरी थोडा फार शोषून घेतला तरी हा अडीच किंवा तीन फूट जाडीच्या चिकर मातीचा थर सदासर्वदा ओलाच राहतो. कारण त्याच्या आंतल्या बाजूची माती रेताळ असल्यामुळें कालव्यांतील पाणी त्यांतून झिरपून जाऊन चिकण मातीला मिळतेंच. व अशा रीतीनें चिकण मातीचा चरांत घातलेला भिंतीसारखा भाग नेहमीं ओला राहिल्याकारणानें कधींहि तडकत नाहीं व त्यामुळें आंतील पाणीहि कधीं झिरपून जात नाहीं. ही सांगितलेली रीत ज्या वेळेला कालवा तयार झाला असेल व त्यांतील पाण्याचा झिरपा बंद करणें असेल तेव्हां उपयोगांत आणतात. पण जेव्हां कालवा करतानांच ही चिकण मातीची भिंत करावयाची असें ठरलें असेल तर जमिनीच्या खालचा चर खणून तो चिकण मातीनें भिजवून व तुडवून भरून काढतात व नंतर भरावाची माती दोन्ही बाजूला टाकून मधला भार चिकणमातींचे ९/९ इंचांचे थर टाकून त्यावर पाणी घालून व तुडवून तयार करतात. म्हणजे कालव्याच्या दोन्ही बाजूंचे बांध एकाच लेव्हलवर सारखे चढवितां येतात. असें केलें म्हणजे भरावांत फिरून चर खोदून त्यांत चिकण मातीचे थर भिजवून व तुडवून घालण्याची आवश्यकता रहात नाहीं. जेथें चर खोल खणूनहि चिकण माती लागत नाहीं त्या ठिकाणीं याप्रमाणें दोन्ही भरावाच्या पोटांत ३ फूट जाडीची चिकण मातीची भिंत करावी लागते. अशा दोन्हीं बाजूंच्या भिंती जोडणारा ३ फूट जाडीचा चिकर मातीचा थर कालव्याच्या तळालाहि घालावा लागतो. हा थर वर सांगितल्याप्रमाणेंच ९ इंच जाडीचा व पुष्कळ पाणी घालून तुडवून तयार केलेल्या थरांचा बनवितात. व तो इतक्या रुंदीचा घालतात कीं, त्यावरच दोन्ही बाजूंच्या बांधांत करावयाच्या ३ फूट जाडीच्या चिकण मातीच्या भिंती उभारतात. व अशा रीतीनें ३ फूट जाडीचा चिकण मातीचा पन्हळच बनविला जातो. तो तयार झाल्यावर भरावाच्या आंतल्या बाजूचे स्लोप साधी माती टाकून करून घेतात व याप्रमाणें चिकर मातीच्या दोन्हीं बाजूंच्या भिंती साध्या मातीनें सर्व बाजूंनीं झांकून जातात.

भ  रा वा ची जा गा.- ज्या जागेवर मातीचा भराव करणें असेल, त्या जागेवरील झाडेंझुडपें, गवत, केरकचरा, मोकळे दगड व कोठें कोठें विशेष मऊ माती असेल ती सर्व काढून टाकावी. झाडांचे बुंधे व मुळ्या खणून काढाव्या. कोणत्याहि प्रकारचा निवडुंग असेल तर तो खणून काढावा. भरावाच्या जागेच्या पृष्ठभागावरील माती एका बाजूस काढून ठेवावी. व भराव पुरा झाल्यानंतर ही माती भरावाच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारखी साफ पसरावी. जमिनीला भरावाच्या रुंदीच्या बाजूनें उतार असेल तर अशा जागेंत भराव करण्याकरितां उतारावर पायर्या कराव्या व त्यांचे टप्पे उताराशीं काटकोनांत असावे. भरावाकरतां ज्या खळग्यांतून माती आणावयाची ते खळगे भरावाच्या उताराच्या टोकांपासून दूर करावे. निदान ते दर ३ फूट खोलीस १० फूट अंतर इतक्या अंतराच्या आंत तरी असूं नयेत म्हणजे पहिला १० फूट रुंदीचा खड्डा उताराच्या टोंकापासून १० फूट पलीकडे सुरू करून ३ फूट खोल झाला म्हणजे दुसरा खड्डा भरावाच्या उताराच्या टोंकापासून २० फूट अंतरावर घ्यावा.

भ रा वा ची उं ची व रुं दी दा ख वि णें.- भरावाचें काम सुरू करण्यापूर्वी त्याच्या बाजूचें उतार कोठपर्यंत यावयाचें हें खुंट्यांनी दर्शवावें. या खुंट्या दर २० फुटांवर असून त्या भरावयाच्या मध्यरेषेंशीं काटकोनांत असाव्यात. काम करणार्या लोकांस भरावयाची रुंदी व उंची दर्शविण्याकरिता भरावाच्या मध्यरेषेंत व तिच्या दोन्ही बाजूंस काटकोनांत असणार्या रेषेंत रुंदी दर्शविण्याकरितां बांबू रोवून त्यावर ज्या उंचीपर्यंत भराव पाहिजे त्या उंचीबरोबर चुका माराव्या. अथवा कांहीं अंतरापर्यंत थोड्या लांबीचा भराव करून त्याची रुंदी, उंची व उतार बरोबर दाखवावें. भरावाची उंची समजण्याकरतां ज्या चुका बांबूवर मारावयाच्या त्या अशा उंचीवर माराव्या कीं, पावसानें माती भिजून दबल्यानंतर भरावाची ठरलेली उंची बरोबर यावी.

भ रा वा ची री त.- भरावामध्यें चिखल, विहिरींतील अगर झर्यांतील गाळ, कुजलेली लांकडें अगर पानें अथवा दुसरा कोणताहि कुजलेला पदार्थ असूं नये. भरावाकरतां माती खणतांना असले पदार्थ लागले तर ते बाहेर फेकून द्यावे. भराव सारख्या थरांचा करीत आणावा. जेथें उतार जमिनीस जाऊन पोंचतो तेथून भरणीस आरंभ करून रस्त्याच्या मध्याकडे थराथरानें भराव करीत आणावा. पहिला तळ पूर्ण रुंदीचा करून मग दोन्हीं बाजूंच्या कडांकडून मध्याकडे माती भरीत आणावी. कित्येक प्रसंगी मातीचे थर पाणी घालून धुमसानें ठोकले पाहिजे. भरती करतांना सर्व थर पूर्ण रुंदीचे करीत आणावे. म्हणजे भराव नियमित उंची बरोबर झाल्यावर उतार बरोबर करण्यासाठीं माती घालण्याची आवश्यकता राहणार नाहीं.

भरावाच्या मातींतील सर्व ढेंकळें फोडावी. म्हणजे माती दबली असतां सर्वत्र सारखी दबेल. भराव केलेली माती पाऊस पडल्यानें खचते. सबब भराव करतांना प्रत्येक फूट उंचीस पुढील प्रमाणें अधिक उंची ठेवावी. घट्ट मातीस दर फुटास १॥ इंच, साधारण पोकळ मातीस दर फुटास २ इंच, व जीत कापूस पिकतो, अशा काळ्या मातीस दर फुटास ३ इंच.

पा या.- भरावाचा माथा नकाशांत दाखविल्याप्रमाणें (खणण्याबद्दल उंची मिळून) पाणसळींत आणावा. व बाजूचे उतार चोपून साफ करावा. पुलांवर व मोर्यांवर भराव करतांना भरावाचें ओझें सारखें वांटलें जावें म्हणून त्याच्या दोन्हीं टोंकाकडून भराव करीत आणावा. पुलाच्या दोन्ही टोंकांकडील भराव पक्षभित्ती (वुइंगवॉल)जसजशा चढतील तसतसा करीत आणावा व त्याचप्रमाणें पुलाच्या दोन्ही बाजूंच्या दर्शनी भिंती जसजशा वर येतील तसतशी दोन कमानीमध्यें मातीची भर घालावी म्हणजे भराव मजुराकडून चांगला तुडविला जाऊन चांगला घट्ट बसतो. घाटांतील दरडीच्या बाजूकडील भिंती (रीटेनिंग् वॉल्स) बांधतांना मातीच्या भरावाचें काम वर सांगितल्याप्रमाणेंच करावे. जेथे जुन्या भरावाशीं नवा भराव मिळविणें असेल तेथे जुन्या भरावास उतार देऊन नवा भराव त्याच्याशीं जोडावा  व नव्या व जुन्या भरावाचा जेथें जोड येईल तेथें पाणी घालून धुमस करावा.

पा य -या.- उतरत्या जमीनीवर भराव करतांना उताराची भरती फार लांब जाईल व कदाचित घसरून जाण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं उताराच्या बाजूस पायर्या पाडून त्यावर भरती घालावी. पायर्यांचें टप्पे क्षितिजपातळीशीं समांतर असावे. उंच जमिनींत खोदाई करणें झाल्यास रुंदीच्या दोन्ही बाजूंकडून पायर्या करीत निदान तळाशीं जातें. दोहोंकडील बाजू लंब ठेवाव्या. व उतार खोदण्यास मागून सुरुवात करावी. भुसभुशीत जमिनींत खोदाईच्या बाजूच्या संरक्षणार्थ टेंकडीवरच्या भागांवरील पावसाचें पाणी काढून देण्यासाठी (कॅचवॉटरड्रेन) मार्ग करावा. अथवा उतारावर पाणी निघून जाईल अशा तिरप्या मोर्या कराव्या. खोदाईच्या उताराच्या तळापासून रस्त्याच्या आंतील बाजूपर्यंत थोडी रिकामी जागा (बर्भ) ठेवून तिच्यावर रस्त्याच्या दरम्यान पाणी जाण्याकरतां गटारें ठेवावी.

ख ळ गें.- रस्त्याच्या भरावाकरतां बाजूस जे खळगे करावयाचें ते समचतुष्कोणाकृति असून रस्त्याच्या मध्यरेषशीं समांतर ठेवावे. त्यांची रुंदी सारखी असावी परंतु जेथें त्यांची खोली ४ फूट ठेवली असतांहि भरावास माती पुरणार नाहीं, तेथें त्यांची रुंदी अधिक करावी. पण खोली ४ फुटांहून अधिक वाढवूं नये. खळग्याच्या आकृती अनियमित असूं नयेत. जेथें बाजूंच्या खळग्याचा उपयोग पाणी जाण्याकरतां करणें नसेल तेथें हें खळगे एकसारखे खणलेले नसावे. परंतु प्रत्येक १०० फट लांबीस १० फूट जमीन न खोदता सोडावी. असल्या खळग्यांचा उपयोग पाणी जाण्यासाठीं करणें झाल्यास त्यांच्या बाजू तासून साफ कराव्या. खोदाई करतांना जी फाजील माती उरेल ती हवी तशी इकडे तिकडे न टाकतां एका बाजूस नीटनेटका भराव करून त्याच्या बाजूस दिडास एक याप्रमाणें उतार ठेवावा. पाट अथवा नदीच्या किनार्यावरील खोदाईंतील फाजील मातीच्या भरावाच्या माथ्यास असा उतार द्यावा कीं, त्यावर पडलेलें पाणी नदीच्या किंवा पाटाच्या खोदाईच्या उतारावर किंवा मोकळ्या जागेवर (बर्मवर) येणार नाहीं. पावसाच्या पाण्यानें भराव चांगला खचून घट्ट बसावा म्हणून त्यावर पाणी कोंडण्यासाठीं थोड्या थोड्या उंचीचे मातीचें बांध कांहीं अंतरावर भरावाच्या कडेनें व आडवे घालावें. भरावाचें माप घेणें झाल्यास मातीकरतां जे खळगे खणतात त्यांचें माप घ्यावें म्हणजे तेंच मातीच्या भरावाचें काम होय. भरावाकरतां आणलेल्या मातीचें अंतर मोजणें झाल्यास खळग्याच्या मध्यापासून भरावाच्या मध्यापर्यंत लांबी मोजावी. माती १ फूट उंच उचलणें म्हणजे क्षितिजाशीं समांतर १० फूट नेण्याबरोबर आहे. तलावाच्या बांधाची दुरुस्ती करतांना ज्याप्रमाणें नव्या भरावाचें काम करतात त्याप्रमाणेंच करावें. तलावाच्या बांधाच्या भरावाची रुंदी वाढविणें झाल्यास नवीन भराव आंतील बाजूस म्हणजे पाण्याच्या बाजूस घातला पाहिजे. जुन्या बांधाच्या उतारावर पायर्या कराव्या व त्यावर भरती घालावी. म्हणजे नव्या व जुन्या भरावाचा एकजीव होईल. पायरी पायटा १ फूट असावा. व अंधारी ६ इंच असावी. कमावलेला चिखल स्वच्छ असून, चिकण व पाणी धरील अशा मातीचा असावा. त्यातील सर्व दगड व झाडाच्या मुळ्या काढून टाकाव्या. व त्यांतून पाणी न झिरपेल अशा प्रमाणानें बारीक वाळू त्यांत मिश्र करावी. अशा चिखलाचे थर ९ इंच उंचीचे असावे. प्रत्येक थरांतील चिखलावर पाणी बेताचें घालून पायांनी व फावड्यांनी चांगला सारखा गारा होईपर्यंत कालवावा. हे थर सारख्या उंचीचें व पाणसळींत असावे. व ते वाळू देतां नयेत. कमावलेल्या चिखलांत कदाचित् भेगा पडल्या तर भेगा पडलेला भाग खणून काढून वर सांगितल्याप्रमाणें तो तुडवून चांगला करावा. भराव व खोदाईच्या उतारावर जरूर पडेल तेव्हां गवत लावावें. हें गवत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लावले म्हणजे चांगलें उगवेल.

र स्ते किं वा स ड का.

रस्त्याचे भराव.- आगगाड्या प्राचारांत येण्यापूर्वी व सध्यांहि एका गांवाहून दुसर्या गांवास जाण्यासाठीं जो मोठा मार्ग असतो त्याला रस्ता किंवा सडक म्हणतात. रस्त्याची प्रथमावस्था म्हणजे वाटेंतील झाडेंझुडपें कापून गाड्या जाण्यायेण्या इतकी रुंद पट्टी साफ करणें, नंतर पावसाळ्याच्या दिवसांतहि जातां यावें म्हणून रस्ता कोरडा राखण्याकरितां २०/२२ फूट रुंदीचा भराव घालून व त्या भरावाला मधून व बाजूकडेस ढाळ देऊन व त्यावर मुरुम व खडा घालून सडकेचा पृष्ठभाग कठिण व गुळगुळीत करणें, हें नंतरचें काम. अशा प्रकारें रस्ता केला म्हणजे गाड्या ओढणार्या जनावरांनां फारसे कष्ट न पडतां सर्व ॠतूंत सहज रीतीनें प्रवास होतो. हा भराव उंच केला असल्यामुळें व भरावाचा मध्यभाग उंच व बाजू नीच असल्यामुळें त्यावर पडलेलें पावसाचें पाणी जलदीनें बाजूला वाहून जातें व त्यामुळें तो भराव नेहमीं कोरडा राहतो; व कोरडा राहिल्याकारणानें व त्याचा पृष्ठभाग मुरुम व खडी यांच्या योगानें कठिण व गुळगुळीत केल्यामुळें चाकाच्या गाड्यांनां जाण्यायेण्याला सुखकर होतो. जेथें जेथें रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूला पाणी जाण्याचा संभव असेल अशा ठिकाणीं लहान लहान मोर्या बांधतात. ओढे, नाले, नद्या वगैरे ओलांडून जाण्याला त्यांच्या त्यांच्या आकाराप्रमाणें लहान मोठे पूल बांधतात.

कच्चे रस्ते.- तात्पुरत्या कामापुरतें जे कच्चे रस्ते तयार केलेले असतात ते साधारण रीतीनें जमीन साफ करून व दोन्ही बाजूला पाणी वाहून जाईल इतक्या बेतानें मध्येंच थोडीशीं भर टाकून व चाकें चिखलांत खचूं नयेत म्हणून थोडासा मुरुम टाकतात . कोणत्याहि दोन बिंदूंमधील कमीतकमी अंतर म्हणजे त्या दोहोंमध्यें ओढलेली सरळ रेषा होय. म्हणून रस्ता एका गांवाहून दुसर्या गांवाला करावयाचा असला म्हणजे शक्य तितकीं त्या रस्त्याला वळणें कमी असतील तितकें चांगलें. म्हणून जो कच्चा रस्ता पुढें पक्का करणें असेल अशा रस्त्याची रेषा होताहोईल तितकी सरळ ठेवावी. त्याला जास्ती बाक किंवा वळणें देऊं नयेत. अशा रीतीनें कच्च्या रस्त्याची मांडणी केलेली असल्यास तोच पुढें पक्का करावयाच्या वेळी कच्च्या रस्त्यावर केलेला खर्च वाया जात नाही. अशा कच्च्या रस्त्यांनां ओढे किंवा नाले येतील त्या ठिकाणीं लांकडांचे कच्चे पूल बांधतात. किंवा त्यांच्या दोन्ही दरडी, १५/२० फुटांपासून १ फूट इतका ढाळ रस्त्याला येईल अशा बेतानें रस्त्याच्या रुंदीइतक्या कापून खालीं ओढयांत उतरावयासाठीं व फिरून चढण्यासाठीं रस्ता करतात; व ओढ्याच्या रेतीतं चाकें खचूं नयेत म्हणून जवळ मिळत असलेल्या दगडांची फरशी करतात. असा कच्चा पक्का करणें झाल्यास रस्त्याच्या रुंदीइतका म्हणजे सुमारें २०/२२ फूट इतका भराव घालतात व नंतर त्यावर खडी व मुरुम घालतात. अशा कच्च्या रस्त्यांची जमीन रेताड असेल तर तिच्यांत चकार्या फार जलदींनें पडतात. अशा चकार्या पडून या चकार्यांतील रेती सैल झाली म्हणजे बैलांनां गाडी ओढावयास अतिशय जड जातें. अशा ठिकाणीं चांगल्या मातीचा थर पसरला म्हणजे रस्ता पुष्कळ सुधारतो. नद्यांच्या वालुकामय रुंद पात्रांतून रस्ता नेणें झाल्यास पहिल्यानें कोणत्या तरी प्रकारचें सरकट, काशा वगैरें नदीच्या पाण्यांत उगवणार्या मोठमोठ्या उंच वाढणार्या गवताचा ३/४  इंच जाडीचा थर २० फूट रुंदीचा करून त्यावर कांठावरून चांगली माती आणून जवळजवळ फूटभर जाडीचा थर करतात. असें केलें म्हणजे भरलेल्या गाड्यांनां जाण्यास फारसे कष्ट पडत नाहींत. याच्या उलट रस्ता ज्या जमीनींतून जात असेल त्या जमीनींतील माती फार चिकण असल्यास तीवर बाहेरून आणलेली रेती किंवा मुरुम पसरतात. असें केलें म्हणजे पावसाळ्यांत सुद्धां अशा रस्त्यांवरून जाण्यास त्रास पडत नाहीं. कोणत्याहि रस्त्याची उपयुक्तता त्या रस्त्यावरील अतिशय दुर्गम भागावरून जितकें ओझें नेतां येईल त्यावरून ठरवावी लागते. उदाहरणार्थ, एखाद्या रस्त्यावर घाट असला आणि त्या घाटांतून ६ किंवा ८ मणच ओझें नेण्याइतका त्याला अवघड ढाळ असेल त्या रस्त्याच्या इतर भागावरून १५ मण एका गाडींत ओझें नेण्याइतका जरी रस्ता चांगला असला तरी त्या घाटामुळें त्या रस्त्यावरून जाणार्या गाडींत ६ किंवा ८ मणापेक्षां जास्ती भार नेतां येणार नाहीं. ह्याकरितां रस्त्याचा जो भाग अतिशय अवघड असेल तो पहिल्याने सुधारणें हें इष्ट होय. म्हणून ठराविक रकमेत कोणत्या प्रकारची सुधारणा करावयाची हें त्या त्या ठिकाणची जास्ती अडचण कोणती भासते त्यावर  अवलंबून असतें. जसें एखाद्या कच्च्या रस्त्यावर एखादी दलदल असली तर ती भरून काढणें, किंवा थोडासा रेताळ भाग असेल तर त्यावर गवत किंवा माती पसरणें; किंवा एकदम फार चढ असला तर तो कापून कमी ढाळ येईल असा रस्ता करणें; किंवा एखादा ओढा ओलांडून जाण्याला अतिशय अडचण असेल तर त्या ठिकाणीं पूल बांधून किंवा सुलभ ढाळ देऊन रस्ता चालू करणें. अशा प्रकारच्या ज्या ठिकाणीं जसजशा अडचणी असतील त्या त्या दूर कराव्या म्हणजे कच्च्या रस्ताहि उपयोगी पडतो.

प क्के र स्ते.- हे रस्ते होतां होईल तितके सरळ असले म्हणजे बरें. परंतु ज्या अर्थी लोकांचें दळणवळण वाढावें व व्यापारासंबंधीची वाहतूकीची सोय व्हावी म्हणून ते केलेले असतात, त्या अर्थी ते होईल तितक्या मोठमोठ्या गांवावरून व शहरावरून न्यावे लागतात. यामुळें एखादा रस्ता ६०० किंवा १००० मैल दूर असणारीं शहरें जोडणारा असला, (उदा. पुणें-बंगलोर किंवा मुंबई-आग्रा रस्ता) म्हणजे त्याच्या शेवटच्या दोन्हीं टोकांमध्ये तो सरळ नसतो, पण त्या रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या गांवांतील रस्त्याचा भाग मात्र बहुधां सरळ असतो. रस्ता कारणावांचून लांब किंवा वळणाचा केला म्हणजे त्यावर जास्त लांबीवर झालेला खर्च वाया जातो. जर एका गावांपासून दुसर्या गांवापर्यंत सरळ रेषेंत ५ मैल लांबीचा रस्ता होत असेल आणि त्यास विनाकारण वळण देऊन जर तो ७ मैल लांबीचा केला तर दोन मैल जास्त लांब झालेल्या रस्त्याला केलेला खर्च एक व दरवर्षी रस्ता दुरुस्तीस लागणारा खर्च दुसरा मिळून दुप्पट खर्च होऊन पुन्हां जाणारायेणारास दोन मैल जास्त लांब जावें लागलें हें निराळेंच. एवढ्या करितां रस्ता सरळ रेषेंत आणि कारणांवांचून वांकडीं तिकडी वळणें न घेतां केलेला चांगला. परंतु आपल्याला जर पर्वताची रांग ओलांडून जावयाचें असेल तर त्या रांगेमध्यें जेथें सगळ्यांत कमीतकमी उंचीची खिंड असेल अशा खिंडींतूनच जावें लागतें. अशा बाबतींत खिंडींतून जाणार्या रस्त्याला जरी वळण द्यावें लागलें तरी तें अपरिहार्य आहे म्हणून तें द्यावें. त्याचप्रमाणें पूल बांधावयाजोगा नदींच्या पात्रांत खडकाचा पाया मिळेल अशी जागा व त्या ठिकाणीं नदीचें पात्रहि अरूंद व दरडी उंच असतील अशी जागा रस्त्याला बरेंच वळण देऊन सांपडली असेल तर रस्त्याला वळण देणें इष्ट आहे. खेरीज एक वेळ रस्ता लांब असलेला पुरवतो. परंतु त्याला चढ असलेला मात्र चालत नाहीं. याकरितां रस्ता थोडा लांब करून जर चढ टाळतां आला तर बरें. साधारण चांगल्या रस्त्यावर सपाटीवरून गाडी ओढण्यास जितकी मेहनत लागते त्याच्या सुमारें दुप्पट मेहनत रस्त्याला २४ फुटास १ फूट इतका चढ असल्यास लागते. त्याचप्रमाणें १०० फूट उंच टेंकडी चढून जाण्याला जितके श्रम लागतात तितक्यांचे श्रमानें सपाटीच्या रस्त्यावर सुमारें २०००  फूट जातां येतें. या कारणाकरितां रस्त्याला जितका चढ कमी देतां येईल तितका द्यावा. खेरीज श्रमाच्या मानानें पाहतां चढ असलेला रस्ता फार वाईट व अशा रस्त्यांवर गाडी चढतांना फार वेळ लागतो व खालीं उतरतांनांहि गाडीचा वेग मुद्दाम कमी करावा लागतो. व त्यामुळें घोड्यांच्या व बैलांच्या पायांनां मागून गाडीचें ओझें पुढें ढकलीत असल्यामुळें व गाडीचा वेग वाढूं नये म्हणून जोडलेल्या जनावराला ती मागें रेटून धरावी लागते यामुळें श्रम होतात. याखेरीज उतारावर जनावर पाय ठेचळून पडण्याचीहि भीति असते. रस्त्याची लाईन होताहोईल तो दंडा(वाटर शेड) वरून घेता यावी; असें केल्यानें मोर्या बांधण्याची जरूर पडत नाही. जरी रस्ता अगदीं सरळ असला म्हणजे त्याची लांबी कमीत कमी असते तरी सरळ रेषेशीं १० अंश कोन होईल इतक्या प्रदेशांत त्याला थोडींफार १० अंश कोन होईल इतक्या प्रदेशांत त्याला थोडीफार वळणें असलीं ती त्यांची लांबी फारशी लक्षांत येण्याजोगी वाढत नाहीं. आणि या सवलतीचा उपयोग रस्त्याला वळण घेऊन तो जर दंडावरून नेतां येत असला तर तसा नेऊन मोर्यांचा खर्च वांचविता येतो. किंवा थोडें वळण देऊन रस्त्याच्या घालण्याच्या खडीच्या खाणीजवळून तो रस्ता नेतां येत असलां तर न्यावा, किंवा थोडे वळण देऊन ज्या ठिकाणीं भराव करावा लागणार नाही किंवा फार खोदाई करावी लागणार नाहीं अशा रीतीनें रस्त्याची रेषा (लाईन) घ्यावी.

र स्त्या स च ढ ठे व ण्या चें प्र मा ण.- वर सांगितलेंच आहे कीं, रस्त्याला चढ होतां होईल तितका कमी द्यावा. याचें कारण असें कीं, सपाटीच्या रस्त्यावर बैलांच्या जोडीला जर १० मण ओझें गाडीतून नेतां येत असलें तर त्याच बैलांनां रस्त्याला १० फुटाला एक फूट इतका चढ असला म्हणजे फक्त अडीच मणच ओझें नेतां येईल. तो चढ २४ फुटांत एक फूट असला तर ५ मण नेतां येईल व ४५ फुटांत एक फूट असला तर ७॥ मण ओझें नेतां येईल. व १०० फुटांत एक फूट असला तर ९ मण नेतां येईल. अशा रस्त्यावर गाडींत जितकें ओझें भरलें असेल त्याच्या २४ व्या भागाइतका जोर ती गाडी ओढावयास लागेल म्हणून अशा रस्त्याला २४ फुटांत एक फूट इतका चढ असेल तर बैलांनां सपाटीच्या रस्त्यापेक्षां दुप्पट मेहनत पडेल. व म्हणून त्याला २४ फुटांत एक फुटापेक्षां जास्ती चढ देऊं नये असें ठरतें. चढावरून गाडी ओढून घेऊन जावयाची म्हणजे घोड्याला त्याच्या शरीररचनेच्या कारणामुळें जास्ती श्रम पडतात. म्हणजे सपाटीच्या रस्त्यावर पांच माणसें जितकें ओझें खेचून नेऊं शकतात तितकेंच ओझें एक घोडा सहज नेऊं शकतो. परंतु चढावर जितकें ओझें तीन माणसें नेऊं शकतात तितकेंहि ओझें घोड्याला नेववत नाहीं. रस्त्यावरचें चढ असे कष्टदायक असल्यामुळें एखादा घाट ओलांडून जावयाचा असला म्हणजे रस्त्याला एकसारखा चढच द्यावा  लागतो, जनावरांनां विसावा देण्यासाठीं अशा रस्त्याचा कांहीं भाग सपाट करतात. परंतु त्याला मध्यें उतार कधीहि देत नाहींत, कारण जितका उतार द्यावा तितका चढ पुन्हां चढून जावा लागतो.

पक्का व मो ठा रस्ता.- या संबंधानें साधारण नियम असा आहे कीं, मैदानांतील कोणत्याहि रस्त्याला ३० फुटांत एक फूट या पेक्षां जास्ती स्लोप देत नाहींत व घाटांतून जाणारा रस्ता असला तर २० फुटांत एक फूट यापेक्षां जास्ती चढ देऊ नये. रस्त्यावरून जाणार्या येणार्या गाड्यांनां सहज रीतीनें एकेमेकांच्या बाजूनें जातां यावें.या करितां रस्त्याची रुंदी निदान सोळा फूट असावी लागते. परंतु खेरीज माणसांनां व मोकळ्या जनावरांनां जाण्याकरितां वाव असावा म्हणून मोठे रस्ते बहुधा २० फुटांपेक्षां कमी करीत नाहींत. उत्तर हिंदुस्थानांतील कांहीं राजमार्ग ४० फूट रुंदीचेहि असतात. या ४० फुटांपैकीं मदील १६ फुटांवर खडी पसरलेली असे व दोन्ही बाजू १२/१२ फूट मुरुम घालून माणसांनां व जनावरांना चालवयाजोग्या केलेल्या असतात. कोणत्याहि मोठ्या रस्त्यावर गाड्यांची वाहतुक फार असली तर त्याचा मधील १४ किंवा १६ फूट भाग खडी घालून तयार करावा लागतो. पण गाड्यांची वरदळ फारशी नसल्यास खडी पसरलेला भाग १२ फूट रुंदीचा असला तरी चालतो. रस्त्याच्या भरावाच्या दोन्ही बाजूंचे स्लोप जेथें संपतात. तेथपासून बाजूच्या गटारांपर्यंत १०/१५ फूट जागा सोडलेली असते. या जागेवर रस्त्याला दुरुस्ती करण्यासाठी लागणारी खडी, मुरुम, रेती वगैरेंचे ओटे करतात. या जागेच्या पलीकडे ३ ते ५ फूट रुंदीची, रस्त्यावरील पाणी वाहून नेण्यासाठीं गटारें केलेलीं असतात. एक टन ओझें गाडींत घालून ओढून न्यावयाचें असल्यास सपाट मैदानावर दगडाची फरशी केलेली 3 सेल व ३४ पौंडांचा जोर लावावा लागेल. आणि खडीचा रस्ता वाफेच्या रुळानें दाबलेला कठिण व गुळगुळीत असेल तर त्यावर ४६ पौंडांचा जोर लागतो. साधारण खडीचा कठिण रस्ता असला तर त्यावर जोर ६६ पौंडांचा लागतो व गोट्यांचा रस्ता केलेला असेल तर १५० पौंडांचा जोर लागतो. यावरून असें प्रमाण निघतें कीं, गोट्यांचा रस्ता असल्यास त्याला १५ फुटांस एक फूट यापेक्षां जास्त चढ नसावा व खडीचा अगदीं गुळगुळीत रस्ता असेल तर त्याला ५० फुटांस एक फुटापेक्षां जास्ती चढ असूं नये. रस्त्याला द्यावयाचा ढाळ किंवा चढ अमुल अंशांचा असें म्हणण्याचा प्रघात आहे. एक अंशाचा चढ म्हणजे ५७ फुटांत एक फूट, २ अंशाचा चढ म्हणजे २९ फूटांत एक फूट, ३ अंशाचा म्हणजे १९ फूटांत एक फूट , चार अंशांचा म्हणजे १४ फुटांत एक फूट, व पांच अंशांचा म्हणजे ११ फुटांत एक फूट चढ होय.

र स्त्या ची झा डें.- रस्त्याच्या बाजूंनां ३० पासून ५० फूट अंतरावर दोन्हीं बाजूला झाडें लावतात. व ज्या ठिकाणीं गाड्या उतरण्याचा तळ असेल त्या ठिकाणीं जवळ जवळ अशीं झाडें असावी. म्हणजें त्यांच्या छायेंत माणसांनां व जनावरांनां विसावा घेतां येतों. ही झाडें बहुतकरून आंबा, चिंच, लिंब, वड, नांदुकी इत्यादि जास्ती छाया देणारी असावींत.

ज्या ठिकाणीं भराव करावयाचा असेल त्या ठिकाणीं रस्त्याच्या माथ्याची रुंदी २०-२२ फूट ठेवतात व दोन्ही बाजूंचें उतार (स्लोप) १॥ फुटाला १ फूट ते ३ फूटाला एक फूट पर्यंत ठेवतात. ज्या ठिकाणीं मध्येंच टेंकाड असेल  आणि त्यांतून कापून, खोदाई करून, रस्ता करावयाचा असेल त्या वेळेला रस्ता २० फूट रुंद व बाजूला ३-३ फूट रुंदीचीं गटारें व नंतर १ फुटाला एक फूट म्हणजे ४५ अंशांचा ढाळ (स्लोप) देतात. जमीन रेताड असेल तर १॥ फुटात एक फूट इतका स्लोप द्यावा लागतो. साधारण रस्त्याची रुंदी २०-२२ फूट असते; व त्याचा मध्यभाग दोन्ही बाजूंपेक्षां ४-५ इंच उंच केलेला वर्तुळखंडाकृति असतो, त्याच्यामुळें रस्त्यावर पाणी कधीहि सांठून रहात नाही; दोन्ही बाजूंस वाहून जातें. व त्यामुळें रस्त्याच्या पृष्ठभाग नेहमीं कोरडा व त्यामुळें मजबूत राहतो. घाटांत रस्ता करावयाचा असेल त्यावेळेला मात्र बाहेरून आंतल्या बाजूला (टेंकडीच्या बाजूला) फुटाला अर्धा इंच याप्रमाणें स्लोप दिलेला असतो. व टेंकडीच्या बाजूनें सारखें गटार केलेलें असल्यामुळें रस्त्यावरील सर्व पाणी या गटारांत वाहून येतें. या गटारांतलें पाणी रस्त्याच्या खालून कांहीं कांहीं अंतरावर मोर्या बांधून मोकळ्या बाजूस सोडून दिलेले असतें. असा स्लोप देण्याचा दुसरा हेतु असा आहे कीं, वरून खाली उतरणार्या गाड्या वेगासरशी दरडीवरून खालीं पडूं नयेत. खेरीज दरडीच्या बाजूला दगडाची पाळ किंव वरवंडीं बहुतकरून बांधलेली असतेच. या टेंकडीच्या बाजूच्या गटारांत टेंकडीवरचें पाणी वाहून आल्यामुळें रस्ता धुवून जाऊं नये याकरितां टेंकडीच्या बाजूवरून पाणी वरच्यावर अडवून नेण्यासाठीं गटारें बांधलेलीं असतात व या वरच्या गटारांचे पाणी रस्त्याच्या खालून जाणार्या मोर्यांनां मिळविलेलें असतें. रस्त्याचा पृष्ठभाग कठिण व गुळगुळीत करण्याचा हेतु असा असतो कीं, त्यावरून जाणार्या गाड्यांनां ओढावयास जोर कमी लागावा. कच्च्या सपाट रस्त्यावर जितकें ओझें ओढून नेतां येतें त्याच्या तिप्पट ओझें खडीच्या कठिण व गुळगुळीत रस्त्यावरून ओढून नेतां येतें, व खडीच्या रस्त्यावरून जितकें नेतां येतें, त्याच्या सहापट रेल्वेच्या रूळावरून ढकलगाडीने ओढून नेता येते. म्हणजे कच्च्या रस्त्यावर जर २ मण ओझें मनुष्याला ओढून नेतां येत असलें तर कठिण व गुळगुळीत रस्त्यावरून ६ मण ओझें नेतां येईल व तेंच रेल्वेनें ३६ मण ओझें ओढून किंवा ढकलून नेतां येईल. खडी घालून रस्त्याचा पृष्ठभाग कठिण व गुळगुळीत करण्यापासून दुसरा फायदा असा आहे कीं, पावसाचें पाणी चटकन वाहून गेल्यामुळें रस्ता कोरडा राहतो व तो कोरडा राहिल्यामुळें चकार्या न पडण्याइतका कठिण राहतो. रस्त्यावर घालावयाची खडी किंवा दुसरा कोणताहि पदार्थ असा असला पाहिजें कीं, त्यावरून रूळ फिरवून रस्ता पुरा केला म्हणजे त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत, कठिण व चिकण व्हावा व तो तसाच रहावा यासाठीं त्याच्या खालीं साधारण कोणत्याहि ओझ्यानें न दबणारा असा पाया घालावा लागतो. असें करायाचें म्हणजे भरावावर पाणी घालून ठोकून तो कठिण करावयाचा किंवा भराव केल्यावर एखाददुसरा पावसाळा गेल्यानंतर त्यांवर मोठमोठालें अनघड दगड ठोकून बसवून किंवा फूट सव्वा फूट जाडीची खडी घालून त्यावर मोठमोठाले जड रूळ फिरवावयाचें. रस्त्याच्या पृष्ठभागासाठीं वापरावयाची खडी बारीक १ इंची फोडलेली असावी लागतें. अशी खडी पाणी शिंपून वाफेच्या रूळानें दाबून रस्त्याचा पृष्ठभाग कठिण झाला म्हणजे त्यावर रेती किंवा मुरुम घालून व त्यावर रूळ फिरवून गुळगुळीत करतात. याच्यापेक्षां जास्ती गुळगुळीत रस्ता पाहिजे असल्यास त्यावर पातळ डामर ऊन करून व त्यांत कांहीं प्रमाणांत डामराचें खडे टाकून त्यांत खडी बुचकळून काढतात व ती पसरून त्या खडींत राहणारा पोकळ भाग दगडाचा चुरा व चुना व डामर घातलेली जाड रेती पसरून वरून रूळ फिरवितात; त्याच्या योगानें वरचा भाग गुळगुळीत व कठिण होतो. अशा रस्त्यांत पावसाचें पाणीहि जिरत नाहीं व उन्हाळ्यांत उन्हानें फुटून खडेहि निघत नाहींत. ज्या प्रांतांत खडी मिळत नाहीं त्या ठिकाणी खडीचा किंवा पक्का रस्ता करणें झाल्यास चुनखडी किंवा खंगरी विटांचे रोडेहि वापरतात. यांपैकीं चुनखडीचा किंवा तांबड्या मऊ दगडाचा केलेला रस्ता बैलांनां चालावयास व माणसांनांहि चालावयास फार सुखकारक होतो. परंतु जास्ती ओझें नेणार्या गाड्यांची जास्त वर्दळ असेल तर मात्र त्यास चकार्या पडतात. खडी ज्या दगडाची करावयाची तो दगड कठिण व चिकण असावा लागतो. महाराष्ट्रांत सांपडणारा काळा दगड किंवा कार याची खडीं फार चांगली असते. खेरीज सिकतोपल (सँड स्टोन), व चूर्णोपल (लाईम स्टोन) या दगडांची खडी गुजराथेंत मिळते व तीहि चांगली असते. कांहीं कांहीं शहरांतून (उदाहरणार्थ, भडोच) गाड्या जाण्यासाठीं सुद्धां फरशी करतात. पण अशा फरशींचे दगड चार इंचांपेक्षां जास्त रुंदीचें असतां कामा नये नाहीं तर घोड्याचे पाय घसरून घोडे पहावयास लागतात. हे फरशीचें दगड ८ पासून १० इंच लांब, ४ इंच रुंद व ४ पासून ६ इंच जाड असे असतात व त्यांच्या खालीं चुन्याचें कांक्रीट केलेले असतें व त्यांचे सांधे वाळूनें भरलेले असतात. फरशीची रुंदी १६ फूट असली तर १० फूट लांब रस्ता करण्याला ५००/५५० दगड लागतात. कारण ४ इंचांची दगडाची रुंदी व अर्ध्या इंचाचा सांधा मिळून ४॥ इंच होत असल्याकारणानें १० फूट लांबींत २७ थर होतील व प्रत्येक थर १६ फूट लांब असल्याकारणानें त्यांत १८ पासून २३ पर्यंत दगड असतात. ज्या ठिकाणीं फोडून खडी करावयाजोगे दगड नसतील अशा ठिकाणीं नदींतील गोटे व वाळू ह्याचाहि खडीप्रमाणें उपयोग करतात. ज्या ठिकाणीं ओझ्याच्या गाड्यांची रहदारी फार नसेल अशा ठिकाणीं खडीच्या ऐवजी मुरुमाचाहि उपयोग करतात. मुरुमाचे रस्ते जनावरांना चालावयास सुखकर असतात व त्यांनां खर्चहि कमी येतो. मुरुम म्हणजे काळा दगड किंवा कारा दगड ह्यांचा पाऊस, ऊन, वगैरेंच्या नैसर्गिक परिणामानें फुटून होणारा चुराच होय.

र स्त्या चे प्र का र, वर्ग पहिला.- पहिल्या वर्गाचा रस्ता करणें झाल्यास भरावाची उंची दोन फुटांपेक्षां जास्ती नसली तर निदान १०८ फूट रुंदीची जागा लागते. यांपैकीं मधले ३० फूट रस्त्याची रुंदी, भरावाचे दोन बाजूचे ढाळ दर एक बाजूला ४/४ फूट; त्यच्याहि पलीकडे दर एक बाजूला २०/२० फूट रुंदीचे खडी, मुरुम वाळू वगैरेचे ओटे करण्याकरितां व त्यांच्या पलीकडे १५/१५ फूट गटारासाठीं; ज्या ठिकाणी जमिनीची किंमत फार असेल त्या ठिकाणीं वरच्या हिशेबांत काटकसर करून ८० फूट रुंदी घेतली तरी चालते. अशा रस्त्याची रुंदी ३० फूट भरावाच्या दोन्ही बाजूला ढाळ दोन फुटाला १ फूट व चढाचें मान २५ फुटांत एक फुटांपेक्षां जास्ती असूं नये. अशा रस्त्यावरील १० फुटांपर्यंत गाळ्याच्या पुलांची दोन वरवंड्यांमधील रुंदीहि ३० फूटच करतात. याच्यापेक्षां मोठे पूल असले तर त्या ठिकाणीं रूंदी २० फुटांची केली तरी चालते. अशा रस्त्याच्या मधल्या १८ फूट रुंदीवर एक फूट जाडीचा मुरुमाचा थर पसरतात. व त्यावर ६ इंच जाडीची खडी किंवा कंकर (चुनखडी) पसरतात. ज्या ठिकाणीं मुरुम मिळत नसेल व जमीन कठिण असेल त्या ठिकाणीं ९ इंच जाडीचा खडीचा थरच घालतात.

वर्ग २ रा:- दुसर्या वर्गाच्या रस्त्याची रुंदी २४ फूट करतात व त्याला जमीन ८० फूट रुंदीची लागते. परंतु बागाईत जमिनींतून रस्ता करणें झाल्यास ही रुंदी ६२ फुटांपर्यंत सुद्धां कमी करतां येते. अशा रस्त्यावर २० फुटांस एक फूट यापेक्षां जास्ती चढ असूं नये. आणि मोठ्या पुलावर त्याची रुंदी १८ फुटांपर्यंत करतात. यावर खडी घातलेल्या भागाची रुंदी १५ फूट असते.

वर्ग ३ रा.- तिसर्या वर्गाच्या रस्त्याची रुंदी २० फूट व एकंदर जमिनीची रुंदी ७२ फूट असते. मोठ्या पुलावर त्यांची रुंदी १४ फुटांपर्यंत कमी करतात. यालाहि २० फुटांत एक फुटांपेक्षा जास्ती चढ असूं नये. व त्यावर खडी घातलेल्या भागाची रुंदी १४ फूट असते.

वर्ग ४ था:- चवथ्या वर्गाचा रस्ता म्हणजे कच्चा रस्ता होय. अशा रस्त्याला ५४ फूट रुंदीची जागा घेतात. व दोन्ही बाजूंच्या हद्दीच्या गटारांच्या मथला भाग झुडपें वगैरें काढून साधारण रीतीनें सपाट करतात. नद्या नाल्यावरून पूल न बांधतां त्यांत उतरण्याजोगे ढाळ करतात अशा रस्त्यालाहि १८ फुटांस एक फूट यापेक्षां जास्ती चढ असूं नये. स्वस्ताईचे दिवस होतें (२५-३० वर्षांपूर्वी) त्यावेळी पहिल्या वर्गाच्या रस्त्याला दर मैलाला १४००० रुपये, दुसर्या वर्गाच्या रस्त्यास १०,००० रुपये, तिसर्या वर्गाच्या रस्त्यास ६००० रुपये व चवथ्या वर्गाच्या रस्त्यास १००० रुपये खर्च येत असे. साधारण रीतीनें महत्त्वाचे रस्ते दुसर्या वर्गाचे व त्याच्यापेक्षां कमी महत्वाचें रस्ते तिसर्या वर्गाचे होत.

पा व सा च्या पा ण्या च्या मो र्या व भ रा व.-जोराचा पाऊस पडत असतांनाहि रस्त्याच्या बाजूला तुंबलेले पाणी रस्त्यावर न येईल इतका भराव उंच करावा लागतो. व खेरीज पावसाचें जितकें पाणी पडून वाहून जाईल तितकें खाण्याइतका मार्ग अंतराअंतरावर मोर्या व पूल बांधून ठेवला पाहिजे. अशा मोर्या व पूल असूनहि मोठ्या पावसाच्या वेळीं जितक्या उंचीपर्यंत पाणी चढेल त्या सपाटीपेक्षां ३ फूट उंच भरावाचा माथा ठेवावा लागतो. मोठ्या लांबचलांब मैदानांत रस्ता करावयाचा झाल्यास कधीं कधीं  मोर्या बांधण्याचा खर्च अतिशय होण्याचा संभव असतो. अशा ठिकाणी भराव एकसारखा न करतां मध्यें ५०० पासून १००० फूट लांबीच्या खिंडी ठेवतात. व या खिंडींतील रस्ता जमिनीच्या सपाटीबरोबरच ठेवतात. व पाण्याच्या प्रवाहानें तो वाहून जाऊ नये म्हणून सर्व रस्त्याच्या रुंदीची व खिंडीच्या इतक्या लांबीची (५०० पासून १००० फुटांपर्यंत) फरशी करतात. रस्त्यासाठीं भराव करतांना दर फुटाला १ पासून १॥ इंचपर्यंत इतकी त्याची उंची वाढवितात. रस्ता पुरा झाल्यावर भराव ६ फूट उंचीचा रहावा अशी अपेक्षां असल्यास तो भराव करावयाच्या वेळीं ६ फूट ६ इंचापासून ६ फूट ९ इंच उंचीचा करावा म्हणजे एकदोन पाऊस गेल्यावर असा भराव दबून शेवटीं ६ फूट उंचीचाच भराव राहतो. कारण भराव करतांना माती पोकळ असते. व पाऊस पडल्यानंतर तिच्यांतील पोकळ जागा, वर पडलेल्या मातीच्या कणांनीं भरून जाते व त्यामुळें भरावाची उंची कमी होते. मातीचा भराव केल्यानें जें पावसाचें पाणी जमिनीच्या सपाटीवरून सारखें वाहून जात होतें त्याला वाहून जावयास वाव मिळत नाहीं व त्यामुळें तें तुंबतें व अशा पाण्याला थोडथोड्या अंतरावर हें तुंबलेलें पाणी दर सेकांदास ३ किंवा ४ फूट इतक्या वेगानें निघून जाण्याएवढा वाव या मोर्यांतून ठेवावा लागतो. अशा मोर्यांतून जी बाजू नीच असेल त्या बाजूस पाणी वाहातें व जवळील कोणत्या तरी नाल्याला अथवा ओढ्याला मिळतें.

ख डी घा ल णें.- रस्त्यावर जी खडी घालावयाची तिची जाडी सहा इंचांपेक्षां कमी जाडीची कधीहि असूं नये. रस्त्याची जमीन वाईट असल्यास ९ इंचहि खडी घालावी. खडीचे थर ३-३ इंच जाडीचे घालतात; व एक थर रूळ फिरवून चांगला दबला म्हणजे त्यावर दुसरा थर घालतात. शेवटचा थर घातल्यावर तो रुळाच्या भारानें मुळी सुद्धां दबेनासा झाला म्हणजे त्यावर चरचरीत वाळू किंवा दगडाचा चुरा किंवा बारीक चुनखडी सुमारें एक इंच जाडी होईल इतकी पसरतात व त्यावर पाणी टाकून रूळ फिरवितात. म्हणजे रस्ता कठिण, गुळगुळीत मजबूत असा होतो. ही रेती किंवा चुनखडी पसरणें ती खडी पोकळ असतां त्यावर पसरूं नये, नाहीं तर ती खडीच्यामध्यें जाऊन खडीचा खड्यांचा एकमेकांशीं सांधा होऊं देत नाहीं व असे खडे एकमेकांत न गुंतले तर एकेक खडा निघूं लागतो व त्यामुळें रस्ता खराब होतो. रस्त्यावर पसरलेली वाळू किंवा चुनखडी वरच्या खडीच्या सांधींतून व भेगांतून फक्त २-३ इंच खोलीपर्यंतच जावी, जास्त खोल जाऊं नये. ही वाळू पसरावयाची म्हणजे दर वेळेला थोडथोडी म्हणजे सुमारें पाच इंच जाडीची पसरावी. म्हणजे दर वेळेला थोडथोडे सांधे बुजत जातील व तिसर्या किंवा चवथ्या थराला सर्व सांधे बुजून रस्ता गुळगुळीत होईल. रस्त्यावर पसरावयाच्या खडीचा प्रत्येक दगड साधारण घनाकृति असावा. चपटे दगड किंवा पातळ कपर्या असूं नयेत. कपर्या असल्या तर त्या रूळाच्या भारानें फुटून जातात.

ख डी.- ही फोडल्यानंतर बरोबर मापांत फुटली आहे किंवा नाहीं हें पाहण्यासाठीं लोखंडी तारेच्या बांगड्या वर्तुळाकार केलेल्या असतात व अशा बांगडीतून कोणताहि खडा वाटेल त्या दिशेनें सहज गेला पाहिजे.१॥ इंची खडी वापरावयाची म्हणजे या बांगडीचा व्यास दीड इंच ठेवावयाचा व अशा बांगडींतून खडीचे सर्व तुकडे सहज जातील येवढ्या आकाराचे सर्व तुकडे असावे लागतात. व जो खडा अशा बांगडींतून न जाईल तो फोडून बांगडींतून जाईल असा केला पाहिजे. समजा कीं, एक इंच लांब, एक इंच रुंद व एक इंच जाड असे खडीचे घनाकार तुकडे पाहिजे आहेत. असें ठरविलें तर त्याला बांगडी १॥। इंच व्यासाची लागेल. कारण १ इंच घनाचा कर्ण ض १ + १ + १ = ض३ = १.७३  इंच इतका असतो; म्हणजे असा घन १॥। इंचाच्या बांगडीतून सहज जाईल. त्याच्या वरच्या बाजूच्या एका कोनापासून तळाच्या सभोंवारच्या बाजूच्या कोनापर्यंतचें अंतर १॥। इंच हीच त्याची जास्तीतजास्ती लांबी होय. बाकी कोणत्याहि दिशेनें त्याची लांबी मोजली तर ती १॥। इंचापेक्षां कमीच भरेल अशा एक इंच आकाराच्या खडीला १॥। इंची खडी असें म्हणण्याचा प्रघात आहे. व ही खडी बरोबर फुटली आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां १॥। इंची बांगडीचा उपयोग करतात. हीच खडी पाऊण इंच घन या आकाराची असेल तर त्याला १। इंच व्यासाची बांगडी वापरावी लागते व अशा खडीला १। इंची खडी असें म्हणतात. प्रत्येक खडा १। इंच घन आकाराचा असल्यास त्या खडीला २। इंची खडी म्हणतात; व अशाच घनाची प्रत्येक बाजू जर १॥ इंच असेल तर त्या खडीला २॥ इंची खडी म्हणतां येईल. रस्त्यासाठीं वापरावयाची खडी १॥ पासून २ इंच मापाची म्हणजे इतक्या व्यासाच्या बांगडींतून जाणारी असावी लागते. यापैकीं पहिल्यानें पसरावयाचा (म्हणजे तळाचा) थर दोन इंच मापाचा; म्हणजे प्रत्येक खडा दोन इंच व्यासाच्या बांगडीतून जाणारा असावा व त्याच्या वरचा थर १॥ इंच मापाचा असावा खडीचे खडे जर मोठे असले तर त्याच्यामध्यें भेगा मोठाल्या रहातात व त्यामुळें रस्ता गुळगुळीत होत नाहीं. यासाठींच अगदीं वरचा थर बारीक खडीचा असला तरी चालतो. पण वरचा थर पाऊण इंच पासून १ इंच घनाकृति असावा लागतो. आणि म्हणूनच खालचा थर दोन इंच मापाचा (बांगडीचा) व वरचा १॥ इंच मापाचा (बांगडीचा) असावा असा साधारण नियम आहे. खडी जितकी कठिण व चिकण दगडाची असेल तितकी ती बारीक फोडावी म्हणजे रस्ता कठिण व गुळगुळीत होतो. मुरुम किंवा जांभे दगड यांची खडी केलेली असल्यास ती इतकी बारीक फोडीत नाहींत. रस्त्यावर खडी पसरून त्यावर रूळ फिरविण्याचें काम पावसाळ्यांतच करावें लागतें. कारण रूळ फिरत असतांना सर्व खडी व तिचा खालचा भाग ओला व दमय असला म्हणजेच ती खडी चांगली दबते व रस्ता कठिण होतो. पाणी पुरतें व मिळाल्यास खडीचा जम चांगला बसत नाहीं व उन्हाळ्यांत खडी फुटून रस्ता उघडतो. उलटपक्षीं पावसाळ्यांत जितकी खडी भिजलेली असते तितकी बाहेरून पाणी आणून भिजविण्यास खर्च फार येतो. रस्त्यावरच्या खडीचा थर कमीतकमी सहा इंचांचा असतो. तो थर झिजून ४ इंच जाडीचा ठरला म्हणजे फिरून २ इंच जाडीचा थर घालावा.असें बहुतकरून दर चवथ्या वर्षी करावें लागतें. हा थर घालवयाच्या पूर्वी जुना थर इंच दीडइंच खोलीपर्यंत टाचून नंतर त्यावर नवा थर पसरतात. व तो भिजल्यावर रूळ फिरवून कठिण करतात. खडी पसरतांना तिच्यांत रेती, मुरूम किंवा माती फटी भरण्यासाठीं कधीहि मिसळूं नये. खडीवरून रूळ फिरवून ती जस्ती न दबेल इतकी कठिण झाल्यावर मग मुरुम किंवा रेती पसरून रस्ता गुळगुळीत करावा.

कं क र.- म्हणजे चुनखडीचा रस्ता करणें झाल्यास त्याचा प्रत्येक थर ४॥ इंच जाडीचा पसरून त्यावर रुळ फिरवून तो कठिण झाल्यावर दुसरा थर ४॥ इंच जाडीचा पसरतात, व पहिल्या थराप्रमाणेंच तोहि रूळ फिरवून कठिण करतात, साधारण रस्त्याला असे दोन थर पुरे होतात. परंतु गाड्यांची रहदारी फारच असली तर तिसरा थरहि घालावा लागतो. कंकरच्या रस्त्याला सुद्धां जाडा कंकर तळाच्या थराला घालतात व बारका कंकर वरच्या थराला घालतात. कंकर पसरल्यावर पुष्कळ पाणी घालून त्यावर जड धुमसानें ठोकतात. कंकर पसरल्याबरोबर पहिल्यानें कोरडाच ठोकतात. मग थोडें पाणी घातल्यावर आणकी एकदां धुमसतात व फिरून जास्ती पाणी घालनू जमीन पुरती भिजल्यावर फिरून तिसर्यानें ठोकतात. ४॥ इंच जाडीचा थर ठोकून तो ३ इंच जाडीचा झाला म्हणजे हें धुमसणें पुरें झालें असें समजावें. कंकर महाग असतो म्हणून तळचा थर कंकरचा न करतां फुटलेल्या विटांचा किंवा रोड्याचा करतात व त्यावर ६ इंच जाडीचा कंकरचा थर घालतात. कधीं कधीं खडी किंवा कंकर मिळत नसेल अशा ठिकाणीं रस्ता करण्यासाठीं विटा वापरतात. पण अशा रस्त्यावरून जड ओझें भरून गाड्या गेल्या म्हणजे अर्धकच्चा विटांचें पीठ होतें व रस्त्याला खड्डे पडतात व अशा रीतीनें खर्च केलेला पैसा वाया जातो.

मु र मा चा र स्ता.- अशा रस्त्याचा प्रत्येक थर ४ इंचांचा घालतात. असे तीन थर घातले म्हणजे काम भागतें. हा प्रत्येक थर भिजवून रूळ फिरवून बहुतेक कठिण झाला म्हणजे त्याच्या वरचा थर ४ इंचांचा घालतात. अगदीं वरच्या थरावर मात्र रस्ता अगदीं गुळगुळीत होईपर्यंत पाणी घालून रूळ फिरवितात. कांही कांहीं ठिकाणीं लाल दगड मिळतो. अशा ठिकाणीं तो खडीसाठीं वापरतात. त्याचा थर निदान ६ इंच जाडीचा तरी घालतात. व प्रत्येक खडा १॥ इंच पासून २॥ इंच व्यासाचा होईल असा फोडतात आणि खालच्या थराला जाडी २॥ इंची व वरच्या थराला १॥ इंची खडी वापरतात. अशा रस्त्यावरून ओझ्यानें भरलेल्या गाड्या गेल्या म्हणजे त्याला चकार्या पडतात पण कमानीच्या गाड्यांनां हा रस्ता सुखकर असतो. कांहीं कांहीं ठिकाणीं कांक्रीटचेहि रस्ते करतात. खडीप्रमाणें कांक्रीटचाहि थर ६ इंच जाडीचा करतात व तो धुमसानें ठोकतात.

स ड के व र फि र वि ण्या चें रू ळ.- खडी दबविण्यासाठीं दगडाचे किंवा बिडाचे रूळ वापरतात. हे २॥ पासून ४॥ फूट व्यासाचें व ४॥ फूट लांबीचे असतात. साडेचार फूट व्यासाचा व ५ फूट लांबीचा रूळ ओढण्यास पहिल्यानें ७ जोड्या लागतात व खडी अमल बसल्यावर ५ जोड्या लागतात. व एका दिवसांत ३२०० घनफूट खडी अशा रुळानें दावतां येते. मुरुम दाबावयाचा असल्यास २ फूट व्यासाचें व ४ फूट रुंदीचे म्हणजे सुमारें १ टन वजनाचे रुळ वापरतात. अशा रुळाचें १ टन हें वजन ४ फूट लांब म्हणजे ४८ इंच लांब इतक्या रस्त्याच्या रुंदीवर पडतें. म्हणजे एका इंचावर ४७ पौंड. परंतु भरलेल्या गाड्यांचें वजन साधारण रीतीनें बंगाली १९ मण (१५६० पौंड) असतें. आणि हें वजन दोन चाकांवर म्हणजे ९ इंच रुंदीवर (हरएक चाकाची धांव २॥ इंच रुंदीची असते असें समजल्यास) पडतें. म्हणजे हरएक इंचावर ३१२ पौंड इतका भार झाला. आणि वर दोन फुटी रुळाचा भार दर इंचाला ४७ पौंड असतो असें सांगितलें आहे. व त्याच हिशोबानें ५ फूट व्यासाचा रुळ असेल तर त्याचा भार २९४ पौंडाइतका म्हणजे साधारण रीतीनें गाड्यांचा भार जितका पडतो तितका होईल. ४॥ फूट व्यासापर्यंतचे रूळ करतातच म्हणजे ह्या व्यासाच्या रुळानें खडी दाबली असता काम भागण्याजोगे असतें. व्यास ४।। फूट असला म्हणजे त्याची लांबीहि ५ फूट असावी लागते. नाहीं तर असा रूळ बाजूवर कलंडून जाण्याचा संभव असतो. पण रूळ करावयास एवढा मोठा थोरला ४॥ फूट समचौरस व ५ फूट लांब असा म्हणजे १०० घनफुटांचा, म्हणजे ८ टन वजनाचा दगड मिळणें फार कठिण पडतें. व तो वाहून नेण्यासहि फार त्रास पडतो. यासाठी विडाचेच रूळ साधारण वापरण्याची प्रवृत्ति दिसून येते. बिडाचे रूळ वाटेल त्या वजनाचे ओततां येतात. व ते सडकेवर आणल्यानंतर त्यांत कांक्रीट भरून व खेरीज लोखंडाचीं मोडकीं हत्यारें घालून भार वाढवितां येतो. वर सांगितलेंच आहे कीं, भरलेल्या गाड्यांचें वजन दर इंचाला ३१२ पौंड असतें. त्याच हिशोबानें रुळाचें वजन ठेवल्यास दर फुटाला ३३ हंड्रेडवेट इतकें त्याचें वजन पाहिजे. व असा रूळ ६ फूट लांबीचा असल्यास त्याचें वजन १० टन झालें पाहिजे. म्हणून १० टन वजनाचे व ६ फूट रुंदीचे वाफेचे रुळ खडी दाबावयास हल्लीं वापरतात. ह्याच्यापेक्षां जास्ती भार नेणारे वाफेचे रणगाडे किंवा पेट्रोलचे भार वाहून नेण्याचे गाडे ज्या रस्त्यावरून नेणें असेल असा रस्ता दाबावयास २० टनांचें रूळ वापरणें. वाफेचे रुळ ६ ते ३० टन वजनाचे मिळतात व त्यास  ५०० ते १५००० रु. पर्यंत पडते व ते चालविण्यास रोज खर्च १५ ते ४० रु. पर्यंत येतो.

घा टां ती ल र स्ते.- घाट चढून जावयाच्या रस्त्याला चढ किती द्यावयाचा, तें कोणत्या प्रकारचीं वाहनें तो रस्ता वापरणार. ह्यावर अवलंबून असतें. नुसतीं डोक्यावर ओझें घेऊन माणसें चढून जाणार, असा रस्ता असला तर ५ फुटास एक फूट, घोडी जावयाचीं असल्यास ८ फुटांस एक फूट, उंच चढून जावयाचें असल्यास १५ फुटांस एक फूट व गाड्या जावयाच्या असल्यास २५ फुटांस एक फूट यापेक्षां जास्ती चढ नसावा. सरासरी मानानें घाटांतील एकंदर रस्त्याची लांबी, जितके फूट एकंदर चढ असेल त्याच्या निदान आठ पट इतकी लांबी नुसती माणसें चढून जावयाची असल्यास असावी लागतें. घोडीं चढून जावयाची असल्यास १० पट, उंच जावयाचें असल्यास २० पट, आणि गाड्या जावयाच्या असल्यास ५० पट, म्हणजे सरासरी प्रत्येक १०० फूट उंचीला सुमारें १ मैलभर लांबीचा रस्ता करावयास पाहिजे. रस्त्याला एकसारखा किंवा एकाच प्रकारचा चढ असला म्हणजे स्नायूंनां एकसारखी मेहनत पडल्यामुळें चढणारी माणसें किंवा जनावरें लवकर थकून जातात. ह्याकरितां चढ थोड्या थोड्या अंतरानें बदलतात. व प्रत्येक पाव मैलाला निदान थोडथोड्या अंतराने बदलतात. व प्रत्येक पाव मैलाला निदान १०० फूट लांबीचा रस्ता तरी लेव्हरमध्यें म्हणजे एका सपाटीतं किंवा किंचित उलट्या स्लोपाचा करतात. याच्या योगानें माणसांच्या व जनावरांच्या पायांनां विसांवा मिळतो व वर चढावयास हुरूप येतो. खेरीज अशा ठिकाणी भरलेल्या गाड्यांना उभ्या करून बैलांनां विसांवाहि घेतां येतो. खेरीज रस्त्याखालून जाणार्या मोर्या कांहीं कारणानें बुजल्यास रस्त्यावरूनच जें पाणी वाहात खालीं येतें तेंहि अशा सपाटीच्या रस्त्याला आलें म्हणजे त्याचा वेग कमी होऊन रस्ता धुवून जाण्याचे बंद होते. अशा घाट चडून जावयाच्या रस्त्याच्या पृष्ठभागाला बाहेरच्या बाजूकडून आंतल्या बाजूला म्हणजे टेंकडीच्या बाजूला १८ फुटांस एक फूट इतका ढाळ देतात. असें केल्यानें रस्त्यावर पडणारें पावसाचें सर्व पाणी टेंकडीच्या बाजूला, टेंकडीवरून येणारें पाणी घेण्यासाठीं जें गटार बांधलेलें असतें. त्या गटारांत तें सर्व पाणी निघून जातें. व अंतराअंतरावर रस्त्याखालून ठेवलेल्या मोर्यांतून तें खालच्या बाजूस वाहून जातें. असा उलटा स्लोप दिल्यानें रस्त्याच्या बाहेरच्या बाजूवरून पावसाचें पाणी केव्हांहि वाहून जात नाहीं व त्यामुळें भरावाचा बाहेरच्या बाजूचा स्लोप धुवून जात नाहीं.

बा जू च्या भिं ती.- टेंकडीच्या बाजूनें जाणार्या रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेला टेंकडीचा स्लोप फार उभा असेल त्या ठिकाणीं रस्त्याचा भराव जास्ती करावा लागू नये म्हणून रस्त्याच्या बाहेरच्या बाजूच्या लाइनीमध्यें खडकापासून वरपर्यंत मोठमोठ्या साधारण चौरस केलेल्या कोरड्या दगडांचे थरावर थर रचून भिंत बांधून आणतात. अशा भिंतीची रस्त्याच्या सपाटीला दोनपासून अडीच फूटांपर्यंत जाडी ठेवतात. व दर ४ फूट खोलीला एक फूट रुंदी वाढवितात. भरावाची माती वाईट असेल तर ह्या भिंतीची जाडी ३ फूट देखील करतात. अशा भिंतीची भरावाकडची बाजू बहूत करून ओळंब्यांत ठेवतात. अशा भिंतीचे दगड जितके मोठे असतील तितके चांगले. ह्या भिंतीच्या माथ्यावर वरवंडी बांधतात. अशी वरवंडीची जाडी, ती नुसती कोरड्या दगडांची बांधलेली असल्यास दोन फूट ठेवतात व उंचीहि दोन फूटच ठेवतात.

पु स्ती ची भिं त.- ज्या ठिकाणीं रस्ता टेंकडीची बाजू खोदून केला असेल अशा ठिकाणीं खोदलेली बाजू पावसाळ्यांत ढासळून पडूं नये म्हणून पुस्तीची भिंत बांधतात. ह्या भिंतींची माथ्याजवळची जाडी दोनपासून अडीच फूटपर्यंत ठेवतात. व तिची टेंकडीकडची बाजू ओळंब्यांत असते व रस्त्याकडील बाजूला प्रत्येक तीन फूट खोलीस एक फूट रुंदी वाढवितात. ही जमीन टेंकडीची बाजू जर वाईट म्हणजे ढिसूळ मुरमाची असेल तर तिचा धक्का सहन करण्यासाठीं ह्या पुस्तीच्या भिंतींचा माथ्याजवळील भाग ३ फूट जाडीचा करतात. व रस्त्याकड्या बाजूला स्लोप द्यावयाचा तो दोन फुटास एक फूट ह्याप्रमाणें देतात. अशा भिंती कोरड्या दगडांच्या थरावरथर रूचन केलेल्या असतात.व हे थर भिंतीच्या बाहेरील स्लोपाच्या काटकोनांत बांधलेले असतात. अशा रीतीनें त्या भिंती बांधल्याकारणानें त्या ढांसळण्याचा संभव रहात नाहीं. अशा भिंतीच्या मागल्या बाजूला पोकळ जागा राहात असेल तर ती मातीनें भरून न काढतां दगडाच्या चुर्यानें भरून काढावी कारण माती भरल्यास ती पावसाच्या पाण्यानें फुगून कोरड्या भिंतीला बाहेर ढकलण्याचा संभव असतो. खेरीज अशी भिंत बांधली असेल त्या ठिकाणी टेंकडीवरचें पाणी वाहून येऊं नये म्हणून वरून येणारें पाणी अडवून तें टेंकडीच्या बाजूबाजूनें नेऊन टेंकडीवरून पाण्याचा धोत पडत असेल त्यांत नेऊन सोडतात. व अशा धोताचें पाणी रस्त्याखालून वाहून जाण्याकरितां ज्या मोर्या बांधलेल्या असतात. त्यामधून तें वाहून जातें.

र स्त्या च्या मो र्या.- रस्त्याखालून पावसाचें पाणी जाण्यासाठी सुमारें २ शें फुटांवर पाणी कमजास्त येत असेल त्याप्रमाणें लहान किंवा मोठ्या मोर्या बांधाव्या लागतात. अशा मोर्या ज्या ठिकाणी रस्ता खोदून केलेला असेल त्या ठिकाणी बांधाव्या. ज्या ठिकाणी भराव केलेला असतो, अशा ठिकाणी बांधूं नयेत. ह्या मोर्या कमींतकमी दोन फूट रुंद व तीन फूट उंच असाव्यात. व त्यांच्या तळाला स्लोप दर फुटाला निदान दोन इंच असावा. रस्त्याच्या बाजूला करावयाचें गटार वरच्या बाजूला दोन फूट रुंद व खालच्या बाजूला एक फूट रुंदीचें आणि एक फूट खोलीचें करतात. रस्त्याच्या वरच्या बाजूला टेंकडीच्या बाजूबाजूनें जाणारें पाणी अडवून नेण्यासाठीं जें गटार बांधलेलें असतें तें बहुतकरून तीन फूट रुंद व दोन फूट खोल करतात. व अशा गटाराचें पाणी जवळपास धोत वाहात असेल त्यांत नेऊन सोडतात. गाडीच्या चाकाचा वरवंडीला धक्का लागू नये म्हणून वरवंडीच्या आंतल्या बाजूला कांहीं अंतरावर उभे दगड २॥ फूट लांब व आठ इंच समचौरस असे बसविलेले असतात. अशाच प्रकारचे दगह आंतल्या बाजूला (टेंकडीच्या बाजूला) गाड्यांची चाकें त्या बाजूच्या गटारांत जाऊं नयेत म्हणून बसवितात. हे दोन्ही बाजूंचे दगड रात्री दिसावे म्हणून ते चुना फासून पांढरे केलेले असतात.

बो ग दे.-एरवीच्या घाटांतील रस्त्याला साधारण रीतीनें बोंगदे करण्याची जरूर नसते. मात्र खिंडीतून जातांना रस्त्याचा स्लोप फार होऊ नये. म्हणून खिंडीच्या माथ्याला बोगदा पाडून त्यांतून रस्ता नेतात. साधारण रीतीनें बोगदा पाडण्यापेक्षां ६० फूट खोलीपर्यंत मुरमांतून खोदाई करून रस्ता करणेंच स्वस्त पडतें. ह्यापेक्षां जास्ती खोल खोदावें लागत असल्यास बोगदा करणें सोईचें पडतें.

आ श्र य भि त्ती व आ धा र भि त्ती.- आश्रयभित्ती म्हणजे रस्त्यासाठी वगैरे खोदकाम केल्यावर या खोदकामाच्या दोन्हीं बाजू ज्या बहुतेक उभ्या किंवा किंचित ढाळ दिलेल्या असतात. त्या पुढें ढासळूं नयेत म्हणून कोरड्या दगडाच्या भिंती आश्रय देण्यासाठीं किंवा पुष्टि देण्यासाठीं बांधतात त्या होत. आधारभित्ती म्हणजे टेंकडीच्या बाजूनें घाटांतील रस्ता नेत असतांना जेव्हां टेंकडीचा ढाळ फार असल्याकारणानें भराव केला असतां त्याचा ढाळ फार लांबपर्यंत जाईल असा असेल अशा वेळीं भराव कमी करण्यासाठीं भरावांतील माती किंवा मुरुम यांचा भार किंवा धक्का सहन करण्यासाठी बाहेरील बाजूस जी भिंत बांधतात तिला आधारभित्ति म्हणतात. या आधारभित्ती चुन्यांत बसविलेल्या विटांच्या किंवा दगडांच्या बांधलेल्या असतात. यांची माथ्यापाशीं जाडी १॥ पासून २ फूटपर्यंत ठेवतात व तळाशीं जाडी त्या भिंतीची जितकी उंची असेल त्याच्या चतुर्थांशापेक्षां दोन फूट जास्ती ठेवतात. ह्यांच्या मागल्या बाजूची पुरणी दगडाच्या चिपा किंवा रोडे घालून केलेली असते. व वरून जें पाणी त्या भरवांत उतरेल किंवा झिरपेल तें निघून जाण्यासाठीं दर  दहा चौरस फुटास १ याप्रमाणें दोन किंवा ३ इंच रुंदीची व थराच्या जाडीची भोकें या भिंतीत ठेवतात. अशी भोकें ठेविली म्हणजे मागील बाजूस पाणीं सांठून भिंतीला धक्का पोंचविण्याचा संभव रहात नाहीं. पाणी सांठून त्याचा भार भिंतीवर पडण्याचा संभव असल्यास त्या भिंतीची जाडी उंचीच्या निम्म्यानें असली पाहिजे. या भिंतीची दर्शनी बाजू बहुतकरून ओळंब्यांत ठेवतात. किंवा फार झालें तर फुटास १ इंच इतका ढाळ देतात. मागील बाजूला पायर्या पायर्या ठेवून तळापासूनची जाडी कमी कमी करीत माथ्याजवळील जाडी १॥ किंवा २ फूट ठेवतात. ज्याप्रमाणें कंपाऊंडाच्या लांबच लांब भिंती बांधतांना १०-१० फुटावर जाडी खांब बांधून मधली भिंत पातळ करतात त्याचप्रमाणें या आधार भित्तींना पोटांतल्या बाजूला किंवा दर्शनी बाजूला बाहेर निघणारें किंवा पुढें येणारे खांब बांधावयास हरकत नसेल त्यावेळी पुढच्या बाजूला खांब बांधतात. व मधील भिंतीची जाडी कमी करतात. अशा प्रकारचे खांब भिंतीची उंची फार नसेल तर १०-१० फुटांवर, व उंची फार असल्यास २० फुटांवर खांब बांधतात. त्यांची जाडी त्यांच्या एकमेकांपासून नव्या अंतराच्या करतात. १/५ करतात व रुंदी भिंतीच्या माथ्याच्या जाडीएवढी ठेवतात.

स र्व्हे का म.-रस्त्याची सर्व्हे किंवा पाहणी सुरू करण्याच्या अगोदर साखळीची लांबी तपासून पाहावी. व थिओडोलाईट किंवा लेव्हल अथवा प्रिझमॅटिक काँपससारखी जी यंत्रे मापणींत उपयोगांत आणावयाची ती बरोबर अॅडजेस्टमेंटमध्यें म्हणजे ठाकठीक अथवा कार्यक्षम आहेत कीं, नाहींत हें पाहिले पाहिजे. साखळीनें माप घेतांना दर एक मैल संपल्यावर म्हणजे ५२८० फूट झाल्याबरोबर नवें माप सुरू केलें म्हणजे आरंभापासून किती मैलांवर किती फूट आपण आलों हें समजतें. दर मैलांत निदान एक तरी बेंचमार्क ठेवली पाहिजे. आणि तिची जागा आणि लेव्हल ही नकाशांत लिहून ठेवली पाहिजे. नकाशाचीं लेव्हल्स मांडतांना ती ज्या मूळबिंदूपासून गणिलेलीं असतील त्या मूलबिंदूची समुद्रसपाटीपासूनची मध्यम उंची नकाशांत नमूद करून ठेवावी. असें करण्यास सर्व्हेच्या जवळपासची जी जागा ट्रिग्नामेट्रिकल सर्व्हेची जी बेंचमार्क असेल तिच्याशीं चाललेल्या सर्व्हेची लेव्हलस् जोडावीं. ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हेच्या बेंचमार्क्स जागोजाग ठेवलेल्या असतात. त्यांची मध्यसमुद्रसपाटीपासूनची उंची ट्रिग्नोमेट्रिकल् सर्व्हेशीट्सवर आणि त्या सर्व्हेनें बेंचमार्कचें जें पुस्तक छापलें आहे त्यांत नमूद केलेली असतात.

सर्व्हे करतांना सर्व्हे लाईनीच्या जवळ असणारी गांवें, नद्या, तलाव, देवळें किंवा मोठमोठाली झाडें हीं मापणीं करून नवीन तयार होणार्या नकाशांत दाखवावी. जवळपास टेंकड्या असल्यास त्यांचीं शिखरें व पायथ्याचीं टोकें कोठपर्यंत जाऊन पोहोंचतात ते बिंदुदिग्दर्शक कोन (बेअरिंग) दोन बिंदूपासून घेऊन त्यांचा स्थलनिर्देश करतात. तसेंच बांधकामाला लागणारे दगह आणि फोडून खडी करावयाजोगें दगड निघावयाजोग्या खाणी अर्ध्या मैलाच्या आंत असल्यास त्यांचाहि स्थलनिर्देश वरीलप्रमाणेंच करावा. तसेंच चुनखडी आणि मुरुम यांच्या खाणीचें अंतर आणि दिशा ह्याहि नमूद कराव्या. कोणत्या प्रकारच्या जमिनीवरून मापणी होत आहे हें लिहिलेलें असावें.

पु ला ची स र्व्हे.- नद्या किंवा ओढे ओलांडतांना त्यांच्या कांठावरील बिंदूची, तसेंच उतार संपून तळ लागला म्हणजे त्या बिंदूची तसेंच, नदीच्या पात्रांतील खोलांतखोल जो भाग असेल त्याची लेव्हल नमूद करून ठेवावी. अशाच ठिकाणीं पूल बांधण्यासाठीं पाया किती खोल घ्यावा लागेल हें पाहण्याकरतां ट्रायल पिटस् म्हणजे उभे घळ किंवा बोअरिंग घ्यावा. ओढा लहान असेल तर वरच्या व खालच्या बाजूस १००-१०० फूट आणि नदी असेल तर वरच्या व खालच्या बाजूस अर्धा अर्धा मैलपर्यंत सर्व्हे करून जास्तीत जास्ती पुराचें पाणी किती उंचीपर्यंत दोन्ही कांठांला जाऊन लागतें त्या बिंदूचीहि लेव्हलस् घ्यावीं. पूल बांधणें तो नदीच्या प्रवाहाच्या नेहमीं काटकोनांत असावा. पूल बांधण्याची जागा व त्याच्या वरच्या बाजूस अर्धा मैल व खालच्या बाजूस अर्धा मैल. अशा तींन ठिकाणचें नदीचे छेद (क्रॉस सेक्शन) घेऊन व तिन्ही ठिकाणच्या पुराच्या माथ्यापर्यंतच्या रेषेपर्यंत किती चौरस फूट क्षेत्रफळाच्या पाण्याचा प्रवाह वाहात असतो आणि ह्या एक मैल अंतरांत पुराच्या पाण्याला किती फुटांचा स्लोप किंवा उतार आहे. तें काढून त्यावरून दर सेकंदास किती घनफूट पाणी वाहून जाणार याचा अदमास काढतात. नदी फार मोठी असेल तर नदीचे लाँजीटयूडिनल सेक्शन आणि क्रॉस सेक्शन (छेद) पुलाच्या जागेपासून २ मैल वर आणि २ मैल खाली असे घेतात. रस्त्याच्या लाईनीच्या काटकोनांत दर एक बाजूंस १५० ते ३०० फूट पर्यंतचे जे छेद घेतात ते जमीन सपाट असल्यास दूर अंतरावर घेतले तरी हरकत नाहीं. परंतु जमीन एक बाजूस १५ फुटांत १ फूट ह्यापेक्षां जास्ती वळती असल्यास हे छेद शंभर शंभर फूट अंतरावर घ्यावे आणि त्यावरून भराव किती करावा लागेल हें काढावें.

र स्त्या चे न का शें.- रस्त्याचे नकाशे करतांना (१) सूचक किंवा निर्देशक नकाशा (इंडेक्स म्याप) करतात. हा नकाशा ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हेच्या नकाशावरून तयार करतात (हे नकाशे इंचास १ मैल आणि ३ इंचास ४ मैल ह्या प्रमाणांत किंवा स्केलांत काढलेले असतात.) ह्यात रस्त्यापासून ३ मैलांच्या आंत असणारीं गावें दाखवावींत आणि १५ मैलांपर्यंत असणार्या शहरांची दिशा दाखवावी. (२) तपशीलवार नकाशा आणि त्याचाच पथकच्छेद (लाँजीट्यूडीनल सेक्शन) हे नकाशे तयार करतांना कागदावर वरच्या बाजूंस रस्त्याचा नकाशा अथवा चित्रण काढतात. आणि त्याच्या खालच्या बाजूंस त्या त्या भागाचा पथकछेद , वरील नकाशाच्या प्रमाणांत किंवा स्केलांत काढला असेल त्याच प्रमाणांत किंवा स्केलांत काढतात आणि असे कागद एकापुढें एक मांडून सर्व रस्ता दाखवितां येईल असे नकाशे काढतात. हे तपशीलवार नकाशे कधीं कधी रेव्हेन्यूसर्व्हे म्हणजे वैमाषखात्याच्या नकाशावरून शेतांच्या अथवा सर्व्हे नंबरांच्या हद्दी उतरून घेऊन तयार करतात. हे पैमाषखात्याचे नकाशे मैलास ८ इंच म्हणजे १ इंचास ६६० फूट ह्या प्रमाणें काढलेलें असतात. अशा नकाशांवर (चित्रितांवर) रस्त्यावर बांधाच्या लागणार्या मोर्या किंवा पूल नंबरवार दाखवितात. आणि रस्त्याचा प्रत्येक मैल कोणत्या सर्व्हे नंबरांत कोठें पुरा होतो तेंहि दाखवितात.

छेद.- नकाशाच्या खालीं जो पथकच्छेद काढतात त्यांत जमिनीच्या पृष्ठभागाची दर एक १०० फुटांवर किंवा २०० फुटांवर किती उंची आहे हें दाखवितात आणि ह्या भूपृष्ठभागाच्या रेषेच्या वर किंवा खालीं रस्ता बांधावयाची जी पातळी ठरविली असेल तिची रेषा काढतात. ती भूपृष्ठाच्या वर असेल तर भराव घालावयाचा असें समजावयाचें आणि खालीं असेल तर खोदाण करावयाचें असें समजावयाचें. हे भराव किंवा खोदाण प्रत्येक बिंदूपाशीं किती फूट आहे हें नकाशांत आंकड्यांनीं फूट व त्यांचें शतांश ह्या रूपांत दाखवितात. ह्या आंकड्यांवरून भराव किंवा खोदाई किती घनफूट होईल हें ठरवितात.

ह्या पथकच्छेदावरच कधीं पूर येत असल्यास किती फूट उंचीपर्यंत पाणी चढतें हे दाखवितात. तसेंच एखादा रस्ता किंवा रेल्वे किंवा कालवा सर्व्हेलाईनीला कापून आडवा जात असेल तर त्या रस्त्याचें किंवा रेल्वेचें किंवा कालव्याच्या माथ्याचें लेव्हल काय आहे हें त्या त्या ठिकाणीं पथक च्छेदांत दाखवितात.

रस्त्याला १०० फुटांत किती फूट किंवा फुटाचा भाग उतार किंवा चढ दिला आहे हें पथकच्छेंदांत लिहितांत किंवा ज्या बिंदूजवळ एखादी बेंचमार्क (प्रमाण) असेल तर तिचें लेव्हलहि त्याच्या जवळ नमून करून ठेवतात. तसेंच मोर्या, पूल मैलाचें दगड पथकच्छेदावर कोठें येतात तेहि त्यांत दाखवितात. ह्या पथकच्छेदावर आडवे छेद (क्रॉस सेक्शन) कोठें कोठें घेतले आहेत हें प्रत्येक आडव्या छेदांत वेगळा नंबर देऊन त्या नंबराचें आकडें पथकच्छेदांवर योग्य ठिकाणी लिहून ठेवतात. आणि रस्ता मैदानांतून जात असला तर हे आडवे छेद फार अंतरावर असल्यानें असे आडवे छेद पथकच्चेदाच्या खालच्या बाजूसच त्या त्या बिंदूंच्या खालीच काढतात. परंतु जमिनीला जर आडवा घळ किंवा उतार असेल तर हे आडवे छेद जवळ जवळ घ्यावे लागतात आणि अशा वेळीं ते वेगळ्या कागदावर काढल्यावांचून चालत नाहीं आणि म्हणूनच या आडव्या छेदांनां योग्य नंबर देऊन ते सर्व आडवे छेद एकापुढें एक असे वेगळ्याच कागदावर दाखवितात.

रस्त्याचे  नकाशे तयार करतांना साधारणत: इंपीरियस पेपर म्हणजे ३०॥ x २२ इंच कागद घेऊन त्यावर १ ते २ मैल लांबीचा रस्त्याचा भाग स्केल किंवा प्रमाण जसें असेल त्या बेतानें घेतात. एका कागदावर रस्त्याचा जितका भाग दाखविला असेल त्याचा शेवटचा फर्लांग म्हणजे अष्टमांश मैल फिरून नव्या कागदावर दाखवितात. आणि अशा रीतीनें सर्व रस्ता पुरा होईपर्यंत कागद तयार करतात. नकाशांत सर्व्हेची म्हणजे पाहाणीची रेषा तांबड्या रंगानें दाखवितांत. आणि बाकीच्या रेषा इतर रंगांच्या दाखवितात. उदाहरणार्थ: मुरुम किंवा तांबडी जमीन पिवळसर रंगानें आणि खडक निळ्या रंगानें दाखवितात.

नकाशाचें प्लॅन आणि पथकच्छेदाचे साधारणत: भूभाग जे आडवे छेद हे सर्व ६६० फुटांस १ इंच असें लांबीचें प्रमाण घेऊन आणि छेदांत ४० फुटांस १ इंच असें उंचीचें प्रमाण घेऊन साधारणत: काढतात. ह्याच्यापेक्षां जास्ती बारकावा पाहिजे असेल तर लांबीला ३०० फुटांस १ इंच आणि उंचीला २० फुटांस १ इंच हें प्रमाण घेऊन नकाशे काढतात.

न दी चा प थ क च्छे द.- हा पुलांसाठीं घेतला असेल तर ६६० फुटांस १ इंच हें लांबीचें प्रमाण आणि ४० फुटांस १ इंच हें उंचीचें प्रमाण घेऊन पथकच्छेद तयार करतात. परंतु ओढयांचे किंवा नद्यांचे जे आडवे छेद घेतात ते साधारणत: ४० फुटांस १ इंच हें प्रमाण लांबी व उंची ह्या दोहोंनांहि लावून हे छेद काढतात व त्यावरून क्षेत्रफळाचा अदमास समजतो. पथकच्छेदावर उभ्या रेषा काढून त्या प्रत्येकीवर (१) त्या त्या बिंदूची जमीन किती उंचीची आहे ह्याची लेव्हल, (२) त्या त्या बिंदूपाशीं रस्त्याचा माथा किती उंचीवर यावयाचा त्याचें लेव्हल आणि (३) ह्या वरील दोन आंकड्यांची वजाबाकी म्हणजेच खोदाण किंवा भराव किती आहे याचा आंकडा लिहितात.

ओढ्याचे छेद.- ओढ्याचा छेदांत हे आंकडे देण्याची जरूरी नसते. परंतु ओढ्याच्या दोन्ही कांठांवरील बिंदूचें, तसेंच पात्रांतील सगळ्यांत सखल असणार्या बिंदूचें तसेंच पुराची रेषा आणि ज्या ठिकाणीं पुलाचें आबेटमेंट येतील अशा ठिकाणच्या बिंदूचें लेव्हल दिलें असलें म्हणजे पुरें. आडवीं अंतरें आरंभापासून मैल व फूट ह्याप्रमाणें शेवटपर्यंत दाखवावीं.

पथकच्छेदांत फॉर्मेंशन लाईन म्हणजे घटनेची रेषा म्हणजे जितक्या लेव्हलपर्यंत जमिनीवर भराव करावयाचा असेल अथवा खोदाई करावयाची असेल तें लेव्हल दाखविणारी रेषा ही तांबड्या रंगांत दाखवितात. आणि ह्या रेषेला जितका उतार किंवा चढ दिला असेल आणि तो ज्या दोन बिंदूंमध्यें दिला असेल त्या दोन बिंदूंपाशीं उभ्या जाड काळ्या रेषा काढतात. आणि त्यांच्यामध्यें १०० फुटांत १ फूट किंवा २०० फुटांत १ फूट किंवा दुसरा जो कोणता स्लोप म्हणजे उतार दिला असेल तो लिहितात. भराव बहुतकरून पिंवळ्या किंवा हिरव्या रंगानें आणि खोदाई तांबड्या रंगानें दाखवितात. ओढे आणि नद्या ह्यांनां आरंभापासून १, २, ३, ४ असें नंबर देऊन प्लॅनवर आणि पथकच्छेदावरहि दाखवितात. आणि पथकच्छेदावर त्या त्या नाल्यावरून जितक्या कमानीचे पूल बांधावयाचे असतील त्यांचा नंबर आणि आकार हीं नमूद करतात. नकाशाच्या प्रत्येक कागदावर उत्तर दिशा व स्केल हीं दाखविली पाहिजे. तसेंच गांवें, नद्या वगैरेंची नांवे द्यावी. तसेंच नाल्याचें अथवा नद्यांचें पाणी कोणत्या दिशेला वाहातें तें दाखवावें आणि नकाशांत जे रस्ते वगैरे दाखविले असतील ते कोणत्या गांवाला जातात तें लिहावें. ज्या आडव्या छेदावरून भरावाचा अथवा खोदाईचा अंदाज करावयाचा असतो ते सर्व छेद ४० फुटांस १ इंच ह्या प्रमाणांत बहुधां काढतात. आणि त्या छेदावर रस्त्याची रुंदी त्याच्या दोन बाजूंचे स्लोप व दोन्ही बाजूंचीं गटारें दाखवितात. रस्त्यासाठीं करावें लागणारें (१) प्लॅन, (२) पथकच्छेद, (३) आडवे छेद यांच्या नकाशाखेरीज, (४) रस्त्यांवर येणार्या सर्व ओढयांवर किंवा नद्यांवर जे पूल बांधावयाचें असतील त्या सर्वांचे नकाशे नंबरवार काढतात. ज्या लहान मोर्यांचे किंवा पुलांचे सारखेच किंवा साधारणत: एक प्रकारचेच छेद असतात त्या सर्वांचा मिळून एक टाईप प्लॅन म्हणजे नमुन्याचा नकाशा व पुलाचे उभे व आडवे छेद दाखवितात. आणि प्रत्येक पुलाची जीं वेगवेगळीं मापें असतील त्यांची एक नंबरवार याद देतात. हे नकाशें इंचास १० फूट अथवा २० फूट ह्या प्रमाणांत काढतात आणि त्यावर नदीच्या पात्राच्या बरोबर छेद देऊन त्या प्रमाणें त्याचें चित्रण करतात. आणि अशा चित्रावर पुलाच्या आयटमेंट्स (शेवटच्या धरीत्रीभिती) आणि मधलें भरण व त्यामधील गाळे कसकसें येतात ते दाखवितात. आणि त्या नकाशांवरच पुलाचे वेगवेगळाले भाग कसकसा प्रकारचे करावयाचें त्याचे प्लॅन सेक्शन आणि इलेव्हेशन हीं दाखवितात. खेरीज पुलाच्या नकाशावर साधारण पूर कोठपर्यंत चढतात त्याची रेषा दाखवितात. तसेंच पांचपन्नास वर्षांनीं येणारा महापूरहि किती उंचीपर्यंत चढला होता व तो कोणत्या सालीं आला होता हेंहि नमूद करतात. तसेंच दोन्ही थडींची जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि नदीच्या पात्रांतहि जेथें जेथें मच्छ बांधावयाचे असतील त्या त्या ठिकाणीं खडक किती खोलीवर लागतो हें नदीच्या पात्रांत खड्डे करून किंवा बोअरिंग घेऊन नक्की करतात. आणि अशा खड्डयांचे किंवा बोअरिंगाचे छेदहि नदीच्या पात्राच्या आडव्या छेदावर दाखवितात.

पु ला चें प्र मा ण.- पूल केवढा मोठा बांधावा लागेल याचा अंदाज करण्यासाठीं जे नदीचे आडवे तीन छेद घेतात. त्या छेदांचें महापुराच्या माथ्यापर्यंतचे क्षेत्रफळ घेऊन त्या क्षेत्रफळाला त्या ठिकाणच्या क्लिग्नपरीधी म्हणजे बेटेड पेरीमिटर महापुराच्या वेळां कोणत्या तरी एका कांठावर पाणी चढल्याची खूण दाखविली असेल तेथपासून दुसर्या काठांवरच्या तशाच खुणेपर्यंत नदीच्या पात्राची, जमिनीला लागून सांखळीनें मोजलेल्या एकंदर लांबीनें भागिलें असतां हायड्रालिक मीन डेप्थ (पाण्याची मध्यम खोली) येते. अशा प्रकारच्या तिन्ही ठिकाणच्या मध्यम खोलींची सरासरी किती फूट येते तें पुलाच्या नकाशावर नमूद करून ठेवतात. तसेंच पुलाच्या वरच्या छेदापासून पुलाच्या खालच्या छेदापर्यंत महापुराच्या पाण्याला एकंदर किती फूट उतार आहे तें काढून त्याला या दोन छेदांतील अंतरानें (१ मैल, किंवा २ मैल, किंवा ४ मैल जें असेल त्यांनें) तें भागून त्यावरून व पाण्याच्या मध्यम खोलीवरून कटरच्या फार्म्युल्यानें (सूत्रानें) महापुराच्या वेळीं पाण्याचा वेग किती असेल हें काढतात. आणि त्या वेगानें नदीच्या पात्राच्या मध्यम क्षेत्रफळाला गुणिलें असतां दर सेकंदास किती घनफूट पाणी वहात असलें पाहिजे हें निघतें. हा एकंदर उतार किती व त्यावरून वेग किती आला आणि पाणी दर सेकंदास किती घनफूट वाहून गेलें याचे आंकडे त्या पुलाच्या छेदावरच लिहून ठेवतात. नदीच्या पात्रांत पुलाचे मच्छ व कमानी बांधल्यामुळें पूल बांधण्यापूर्वी वहात्या पाण्याचें जेवढें क्षेत्रफळ होतें त्यांतून पूल बांधण्यामुळें क्षेत्रफळ किती कमी झालें हें काढतात. आणि त्यावरून दुसर्या एका ठिकाणीं ग्रथित केलेल्या सूत्राच्या आधारें, पुलाखालून आकुंचित क्षेत्रांतून पूर्वीच्या इतकेंच पाणी घालविण्यासाठीं त्या सर्व पाण्याचा वेग पहिल्यापेक्षां किती वाढला पाहिजे हें काढतात आणि इतका वेग वाढण्यास पाण्याला किती फुटांचा तुंबारा बसला पाहिजे हें गणित करून काढतात. आणि पूल बांधल्यानंतर येणार्या महापुराच्या वेळी पूर्वीपेक्षां तुंबार्याइतकें पाणी जास्ती चढेल असें हिशेबांत धरतात. आणि पुलाच्या नकाशावर पुलाच्या वरच्या बाजूस महापुराचें लेव्हल तितकें उंच दाखवितात. नाल्यावरील पुलांचे नकाशे बहुतकरून १० फुटांस १ इंच या प्रमाणांत काढतात. याच प्रमाणांत (१० फुटांस १ इंच) रस्त्याचे सर्वसाधारण छेद (१) सपाट मैदानांत रस्ता कशा प्रकारचा करावयाचा म्हणजे भराव किती रुंदीचा, त्याला मध्यें चढ किती द्यावयाचा, त्याच्यावर खडी किती रुंदीपर्यंत व तिचा किती जाडीचा थर द्यावयाचा, त्याखालीं डबराचा आणि कपर्यांचा किती इंच जाडीचा थर पाया म्हणून घालावयाचा अथवा फूट १॥ फूट जाडीचा पक्क्या मुरमाचा तर घालावयाचा,तसेंच रस्त्याच्या दोन्ही बाजूंस खडी, मुरुम, रेतीचे कट्टे करण्यासाठीं किती जागा सोडवयाची व दोन्ही बाजूंनां गटारें किती रुंदीची करावयाचीं व रस्त्यासाठीं किती जमीन एकंदर घ्यावयाची वगैरे सर्व गोष्टी या छेदांत दाखवितात. तसेंच (२) रस्ता जेथें खोदाई करून न्यावयाचा असेल तेथें ही रुंदी किती ठेवावयाची, गटारें कशीं करावयाचीं, तसेंच जमिनीला आडवा उतार असेल तर वरच्या बाजूकडून येणारें पाणी खोदाणकामाच्या वरच्या बाजूस गटार खोदून कसें काढून द्यावयाचें खोदाणकामाला दोन्ही बाजूंला स्लोप किती द्यावयाचा हें दाखविणारा छंद तसेच (३) भराव करून त्यावरून रस्ता करणें असेल तर भरावाची रुंदी त्याचे दोन बाजूंचे स्लोप व बाजूचीं गटारें वगैरे दाखविणारा सर्वसाधारण छेदहि देतात. मुंबई इलाख्यांत लोकलबोर्डाचें रस्ते करतांना साधारण प्रकारची शेतजमीन असेल तर ८२॥ फूट रुंदीची (म्हणजे ६६ फुटी पैमाषी खात्यांतील १। सांखळी = ६६ x ५/४ = ८२॥) जमीन घेतात. जमीन जास्ती किंमती    असल्यास रुंदी ८२॥ च्या ऐवजीं ६६ फूट म्हणजे १ सांखळी घेतात. असें केलें म्हणजे दर फर्लांगास १ एकर म्हणजे मैलास ८ एकर इतकी जमीन लागते. जमीन १। सांखळी रुंद घेतल्यास मैली १० एकर होतात.

र स्त्या ला ला ग णा री ख डी.- ही २ इंच व्यासाच्या बांगडीतून जाण्याजोगी खालच्या थरासाठीं व १॥ इंच व्यासाच्या बांगडीतून वरच्या थरासाठीं फोडतात. आणि तिचे वेगवेगळाले थर करतात. हे खडीचे ढीग साधारणत: अर्ध्या अर्ध्या फर्लांगाच्या अंतरावर म्हणजे मैलांत १६ ठिकाणीं साधारणत: करतात. ह्या ढिगांची उंची बहुधां २ फूट ठेवतात आणि ते एका मापाचे केले असतां मोजण्यास सोपें पडतें. हे ढीग करण्यासाठीं ४० x २० फूट जमीन साफ करून ठेवावी म्हणजे तीवर ढीग करणें सोपें पडतें. रस्ता नवा करणें झाल्यास त्यावर नऊ इंच जाडीचा थर घालतात. रस्त्यावर गाडीची वर्दळ कमी असल्यास हा थर ६ इंच घातला तरी चालतो. या ९ किंवा ६ इंचांच्या थरांत खालील अर्धा भाग २ इंची खडीचा आणि वरील अर्धा १॥ इंच खडीचा घालतात. हे ३ किंवा ४ इंच जाडीचे थर पसरून रूळानें ते बरेच दबल्यानंतर वरच्या बाजूचा थर घालून रस्ता चांगला कठिण होईतोंपर्यंत पाऊस पडत नसल्यास पाणी घालून त्यावर ढाळ फिरवितात. अलीकडे पुष्कल माणसें किंवा माल घालून नेणार्या मोटारगाड्या उपयोगांत येऊं लागल्यामुळें रस्त्यांवर पसरलेल्या खडीला मजबूत पायाची जरूर भासूं लागली आहे. अशा जड गाड्या ज्या रस्त्यावरून जावयाच्या असतील तो रस्ता जर मऊ किंवा भुसभुशींत जमिनीतून जांत असला तर खडी पसरण्याच्या अगोदर ९ ते १२ इंच जाडीचा दगडाचा थर वर येणार्या खडीच्या रुंदीपेक्षां १ फूटभर जास्त रुंदीचा घालतात. हा थर घालतांना पहिला खालचा थर ४ इंचांपेक्षां जाड दगडांचा असतो. ह्या दगडांची लांबी व रुंदी त्या दगडांच्या दुपटीपेक्षां जास्ती नसावी. असा थर पसरून व नीट ठोकून बसविल्यावर दुसरा थर तशाच प्रकारच्या दगडांचा घालतात आणि त्यावर खडीचा ३ इंच जाडीचा थर घालून व रूळ फिरवून रस्त्याचा पाया मजबूत करून घेतात. आणि त्यावर ६ इंच जाडीचा खडीचा थर पसरून त्यावर पाणी शिंपडून व वाफेचा रुळ फिरवून रस्ता कठिण व गुळगुळीत करतात. रस्त्यावर खडी पसरायच्या पूर्वी रस्त्यासाठीं जो मातीचा किंवा मुरमाचा भराव केला असेल त्याच्या माथ्याला गोलाई देऊन आणि रूळ फिरवून तो खडी पसरावयाजोगा करून घेतात. ही गोलाई किंवा दोन्ही बाजूंचे स्लोप फुटास अर्ध्यां इंचापेक्षां कमी असूं नयेत रस्ता नव्यानेंच केलेला असेल तर हा मधला उपेट वरील हिशोबापेक्षांहि दोन इंचांनीं जास्तीच ठेवतात. जुन्या रस्त्याला नवी खडी घालणें असेल तेव्हां रस्त्याची खडीं १॥ इंच खोलीपर्यंत टांचून काढून घेऊन ती मधल्या भागावर नवी खडी पसरल्यानंतर रस्त्याच्या राहिलेल्या दोन बाजूंवर पसरण्याकडे उपयोगांत आणतात. नव्या खडीचा थर पसरतेवेळीं मोठे खडे खाली व बारीक वर अशा रीतीनें १॥ ते ३ इंच जाडीचा थर घालतात. पुणें शहरांत ब-यापच्या आसपासच्या भागांत २ ते ३ इंच जाडीचा थर घालतात. पुणें शहरांत क्यांपच्या आसपासच्या रस्त्यावर २ ते ३ इंच जाडीचा खडीचा थर घालून त्यावर १५ टन वजनाचा रूळ फिरविला असतां तो सुमारें ३ वर्षे टिकतो. पुणें जिल्ह्यांतील इतर बाहेरच्या रस्त्यांनां हा खडीचा थर १॥ इंच जाडीचा घातला तरी चालतो. आणि तोहि ३ वर्षेपर्यंत टिकतो. रस्त्यावर फिरविण्याचे रूळ दर फुटास निदान पाऊण टन इतके तरी जड असले पाहिजेत. रस्त्यावर काम चालत असेल त्याच्या दोन्ही बाजूंस लाल कांचेचे कंदील रात्रभर जळत ठेविले पाहिजेत.

आं ख णी.- रस्ता करतेवेळीं तो दंडांवरून (वाटर शेड) नेला असतां मोर्या, नाल्याचे पूल फार कमी लागतात. समोर टेंकडी येत असल्यास तिला वळण घालून जाणें बरें. कारण टेंकडी चढून जाण्यास जितके घोड्याला किंवा बैलाला श्रम पडतात. त्याच्या इतकाच त्रास खाली उतरतांना गाडी घसरून जाऊं नये म्हणून तिला थोपविण्यासाठीं पडल्यामुळें जनावरें थकून जातात. ह्याकारणास्तव १०० फूट उंचीची टेंकडी चढून जाण्यापेक्षां १२०० किंवा १२५० फूट रस्त्याची लांबी वाढली तरीहि श्रम कमीच पडतील. रस्त्याला वळणें द्यावीं लागतात. परंतु त्यांची त्रिज्या १५० फूटांपेक्षां कमी असूं नये. लहान किंवा कमी महत्त्वाच्या रस्त्यावर ही त्रिज्या ५० फुटांपर्यंत कमी केली तरी चालेल. अशा वळणावरून खडी पसरलेल्या भागाची रुंदी बाहेरच्या बाजूस निदान ३ फूट तरी वाढवावी. अलीकडे मोटारी वेगानें जात येत असल्यामुळें घाटांतून जाणार्या मनुष्याला ७०० ते ८०० फूट तरी अंतरापर्यंत पुढील रस्त्याचा भाग दिसणें जरूर असतें. परंतु मोटारीचा वेग कमी केला असतां ३०० ते ४०० फूटपर्यंत तरी रस्ता दिसेल अशी घाटांतून सोय केली पाहिजे. जेव्हां रस्त्यावरील वळणाची त्रिज्या ५० फूट असेल तेव्हां घाटांतील रस्ता जर २० फूट रुंदीचा असला तर तेथे रस्त्याच्या आंतल्या बाजूंपेक्षा बाहेरील बाजू निदान १ फूट तरी उंच ठेविली असतां गाडी उलटण्याची भीति रहाणार नाहीं.

ज मी न.- रस्त्याच्या भरावाची माथ्याजवळील रुंदी साधारणत: २२ फूट ठेवतात. व त्याच्या दोन्ही बाजूंस ११/११ फूट झाडासाठीं आणि त्याच्या बाहेर ११/११ फुटांवर रस्त्याची हद्द, अशी ६६ फूट रुंदी कमींत कमी असली पाहिजे. ह्यापेक्षां जितकी जास्ती असेल तितकी बरी.

च ढ.- ज्या रस्त्यावरून बैलगाड्या जावयाच्या असतील त्या रस्त्याला घाटांवरून जातांना देखील बारा फुटांच्या पेक्षां करडा चढ देऊं नये. आणि असा चढ देखील लागोपाठ पाऊण मैलापेक्षां जास्ती लांबीचा असूं नये. एरव्हीच्या रस्त्यांनां २५ फुटांत १ फूट ह्यापेक्षां जास्ती अवघड चढ असूं नये. क्वचित प्रसंगी २० फुटांत १ फूट चढ असला तरी चालेल. साधारण गाडी रस्त्याला १७ फुटांस १ फूट याच्यापेक्षां अवघड चढ देऊं नये. साधारणत: एकसारखा उतार किंवा चढ २ मैलांपेक्षां जास्ती लांबीपर्यंत येऊ नये. जनावरांनां विसावा देण्यासाठीं अशा ठिकाणीं रस्त्याचा थोडा भाग अगदीं सपाट ठेवावा. किंवा स्लोप बदलून कमी तरी करावा. रस्ता जितका जास्ती गुळगुळीत असेल तितका त्याला स्लोपहि कमी असावा लागतो. नाहीं तर जनावरें पाय घसरून पडतात. उदाहरणार्थ उभ्या विटांचे किंवा ४ इंच रुंदीच्या काळ्या दगडाचे ढोकळे बसविलेला रस्ता असेल तर २० फुटांत १ फूट इतका अवघड स्लोप दिला तरी चालतो. रस्ता लांकडी ठोकळे बसवून केलेला असला तर २५ फुटांस १ फूट आणि आसफाल्टचा किंवा डामरी रस्ता केला असल्यास त्याला ३३ फुटांस १ फूट ह्यापेक्षां अवघड स्लोप देतां उपयोगी नाहीं. मोठमोठ्या पुलांच्या दोन्ही तोंडाला जे उतार द्यावे लागतात तेहि ३३ फुटांस १ फूट ह्यापेक्षां करडे असूं नयेत. जेथें ५० फुटांपेक्षां कमी त्रिज्येचें वळण रस्त्यास दिलें असेल त्या ठिकाणी २० फुटांत १ फूट ह्यापेक्षां जास्ती स्लोप असतां कामा नये.

भ रा व.- रस्ता जेव्हा २० फूट रूंद करणें असेल तेव्हा भरावाची उंची ३ ते ५ फूट असल्यास भरावाच्या माथ्याची रुंदी २२ फूट ठेवतात. भरावाची उंची ५ फुटांपेक्षां जास्ती असल्यास २४ फूट रुंदी आणि उंची जास्तीच असल्यास भरावाच्या माथ्याची रुंदी २८ फूट ठेवतात. भराव करतांना जितकी भरावाच्या माथ्याची रूंदी करावयाची असेल त्याच्यापेक्षां एक फूट जास्ती रुंदी ठेवतात. आणि काम पुरें झाल्यावर एक फूट छिलून काढतात. रुंदी ज्याप्रमाणें जास्ती ठेवतात. त्याचप्रमाणें उंचीहि जमीन चांगली कठिण असल्यास दर फुटास १ इंच ते १॥ इंच, माती साधारण सैल किंवा पोकळ असल्यास दर फूट उंचीस १॥ ते २ इंच आणि काळ्या कपाशीच्या जमीनीतल्या मातीचा भराव करणें असल्यास दर फूट उंचीस २ पासून ३ इंच ह्या प्रमाणांत उंची वाढवितात. भराव पुरा झाल्यानंतर रस्त्याच्या मध्य भागाला दर फुटास अर्धा इंच म्हणजेच २४ फुटांत १ फूट किंवा १२ फुटांत ६ इंच इतका उपेट देऊन त्यावर रुळ फिरवितात. भरावाच्या दोन्ही बाजूस स्लोप द्यावयाचे ते दोन्ही बाजूंस सारखेच देतात. हे स्लोप भराव काळ्या मातीचा असल्यास १ फूट उंचीस २ फूट रुंदी ह्या प्रमाणांत आणि मुरमाचा किंवा इतर मातीचा भराव असल्यास १ फूट उंचीस १॥ फूट रुंदी ह्या प्रमाणानें ठेवतात. भराव केल्यानंतर निदान एक पावसाळा तरी गेल्यावर खडी पसरण्याचें काम करावें.

खो दा ई.- रस्ता खोदाई करून रस्त्याच्या माथ्याची रुंदी इतर ठिकाणीं जितकी असेल तितकी करून खेरीज दोन्ही बाजूंनां १८-१८ इंच गटारासाठीं जागा जास्ती ठेवावी. गटारें नऊ इंच रुंद व दोन इंच खोलीचीं असावीं आणि त्यांच्या बाजूंनां खांडक्यांची रांग बसवावी. खोदाणकाम भुसभुशीत मातीत केलें असल्यास त्याच्या बाजूंनां १॥ फूट रूंदीस १ फूट उंची इतका स्लोप देतात. कठिण मुरुम असेल तर एकास एक आणि खडक असेल तर ४ फूट उंचीस १ फूट रुंदी इतका स्लोप ठेवतात. खोदाई करून केलेल्या रस्त्यावर पावसाचें पाणी साचून राहूं नये म्हणून रस्त्याच्या त्या भागाला ८० फुटांस १ फूट इतका चढ किंवा उतार तरी देतात. असें केल्यानें रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या गटारांचे पाणी झरकन निघून जातें. जेव्हां  रस्त्यावर बाजूंकडून पाणी वाहून येऊन खोदाणामाचा स्लोप धुवून जाण्याची किंवा ढांसळून पडण्याची भीति असेल तेव्हां स्लोपाच्या धारेपासून सुमारें १५ फुटांवर रस्त्याला साधारण समांतर गटार खोदतात. आणि त्याच्या तळाला ४० फुटांस १ फूट स्लोप देऊन पाणी काढून देतात.

र स्त्या चे छे द.- साधारणत: रस्त्याच्या खडी घातलेल्या भागाचीं रुंदी १६ फूट ठेवतात. आणि त्याच्या दोन्ही बाजूंस ३-३ फूट रुंदीच्या पट्टया मुरुम घालून झांकतात. म्हणजे एकंदर रुंदी २२ फूट होते. रस्ता कमी महत्त्वाचा म्हणजे गाड्यांची कमी वरदळ असलेला असला तर त्यावरील खडीची रुंदी १० फुटांपर्यंतहि कमी ठेवतात. उलटपक्षीं शहराजवळील दोन ते पाच मैलपर्यंतच्या टापूंत असणार्या रस्त्यावर गाड्यांची येजा जास्ती असल्यामुळें खडीची रुंदी २० फूटपर्यंत वाढवून दोन्ही बाजूंच्या मुरमाच्या पट्टयाहि ४-४ फूट रुंदीच्या करतात. रस्त्याच्या मधील भागांत उपेट दोन्ही बाजूंकडून सारखाच म्हणजे १० फुटांत ६ इंच इतका देतात.

रस्ता घाटांतून जातांना सुख्या दगडाच्या भिंती बांधून दरडीला आधार द्यावयाचा असेल तेव्हां अशा भिंतीची माथ्याजवळील रुंदी २॥ फूट ठेवून पाठ ओळंब्यांत आणि दर्शनी ४ फूट उंचीस १ फूट इतका ब्याटर किंवा स्लोप देतात. आणि मागली बाजू सुख्या मुरमानें भरून काढतात. आणि भिंतींत हेदर म्हणजे लांब दुमाल्याचे दगड जागजागीं घालतात.

सु क्या द ग डा चे ध क्के.- (रिटेनिंग वाल्स) धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात. त्यांतील थर आठ इंचांपासून वीस इंचांपर्यंत जाडीचे असावे व भिंतीची उंची तीस फूट असली तर तिची माथ्याची जाडी तीन फूट असून मागची बाजू ओळंब्यांत व पुढच्या बाजूस चार फुटांत एक फूट इतका उतार असावा. पाया मुरमाड जमिनींत असेल तर टेंकडीच्या बाहेरील उताराच्या पायथ्याखालील दोन फुटांपासून तीन फूट खोल खणून तो चर जवळपास जे मोठे धोंडे मिळतील त्यांनीं भरून काढावा. घोड्याच्या फटींत लहान लहान चिपा घालून सर्व दगड ठोकून बसवावे. दगडांचा तळ व माथा भिंतीच्या दर्शनी उताराच्या काटकोनांत असावा. थरांतील उभे सांधे एकमेकांवर येऊ नयेत. प्रत्येक थरांत खालच्या आणि वरच्या थरांची सांधमोड चांगली व्हावी. भिंतीचें मागचे व पुढचें दर्शनी काम सारखें असून त्यांच्या पुराणांतील कामाशीं चांगला मिलाफ झाला पाहिजे. प्रत्येक थरांत पांच ते सहा फूट अंतरावर निदान तीन फूट दुमाल्याचें बंद घालावे. हे दर्शनी बाजूपासून भिंतीच्या जाडींत आरपार जावेत. व पुरणींत त्यांची नऊ इंच सांधमोड होईल असे एकमेकांवर ठेपून बसवावें. म्हणजे भिंतीच्या दर्शनी व मागच्या बाजूचा एकजीव होईल. मागच्या बाजूच्या बंदाची उंची पुढच्या बाजूच्या बंदांच्या उंचीबरोबर असावी व रुंदी निदान उंचीइतकी असून दुमाला तीन फुटांहून जितकी जास्त मिळेल तितका असावा. दगड थोडक्या अंतराच्या आंत मिळतील तितके मोठे व टिकाऊ असावेत. त्यांचे तळ व माथे सुतकीनें टापलें पाहिजेत. ते बांधकामांत बसविल्यावर त्यामध्यें जी पोकळ जागा राहील तींत लहान लहान दगड हातोड्यानें ठोकून बसवावे. सवड असेल तर भिंतीच्या मागचा भराव, बांधकामास निरुपयोगी अशा राहिलेल्या दगडांचा व कपर्यांचा असावा. मातीचा भराव करण्याचें टाळावें.

सहा फूट उंचीच्या भिंतींत दगडाचा दुमाला दीड फुटापेक्षां कमी असूं नये. वरील सहा फुटांच्या खालच्या भिंतीच्या भागांत दगडाचा दुमाला दोन फुटांहून कमी नसावा. धक्क्याच्या भिंतीस बाहेरील बाजूस उतार चारांस एक या प्रमाणानें असावा व मागची बाजू लंबरेषेंत असून पायर्या सोडणें झाल्यास सहा इंचांच्या सोडाव्या. पाया घट्ट जमीनींत घालावा. पायांत पहिला थर चापट असतील अशा दगडांचा घालतात व बंद व आडवे दगड एकमेकांशीं ठोकून लागून बसवितात. त्यामध्यें भेगा राहिल्यास काचळा ठोकतात. प्रत्येक थरांत दहा फूट अंतरावर तीन फूट लांब व सहा इंच जाडीचे बंद घालावे. भिंतीची जाडी अधिक असल्यास असले बंद दोन्हीं तोंडांकडून घालून त्यांची बांधकामातील टोकें एकमेकांस लागून सांधमोड होईल असे बसवावे. म्हणजे भिंतीचा पुढील भाग मागील भागाशी चांगला जोडला जाईल. पहिल्या थराचें काम झालें म्हणजे दोन्ही तोंडें बांधण्यास आरंभ करावा. दगड बसवितांना एक बंदाआड एक आडवा या अनुक्रमानें बसवावें. उभ्या सांध्यांची निरनिराळ्या थरांत सांधमोड व्हावी. थर दर्शनी उताराच्या बाजूशीं काटकोनांत असावे. प्रत्येक दगडाची चपटी बाजू तळाशीं येईल अशा बेतानें सर्व दगड एकमेकांशी भिडून बसवावे. घाटांतील रस्त्याच्या बाहेरील बाजूस सुक्या डबराची १॥ फूट रुंदीची आणि २ फूट उंचीची वरवंडी बांधतात.

ना के व मो र्या.- लहान मोर्या बांधतांना सर्व जमिनची खोल काळ्या मातीची असेल तर सर्व बांधकामाला मिळून कांक्रीटचा एकच पाया घेतात. आणि तो ३ ते ६ फूटपर्यंत कांक्रीटनें भरून काढून त्यावर आबटमेंट पियर्स व विंग बॉल्स दगडाच्या बांधून घेतात. आणि वुईंगवॉल्स अथवा पार्श्वभितींची खालच्या बाजूंची टोकें खोलपर्यंत जाणार्या दगडांच्या पडदीनें  (कर्टन वॉल) जोडतात. यांत मुद्दा कसा असतो कीं, मोरींतून जोरानें वाहून येणार्या पाण्याच्या योगानें मोरीच्या खालच्या बाजूस खड्डा पडला ती वुइंग बॉल्सचें आणि मुख्य मोरीच्या पायाचें कांक्रीट उघडें पडूं नये. पायाचें काम चालत असतां पंपानें पाणी खेंचून पायांत कांक्रीट टाकावें लागतें तेव्हा अशा कांक्रीटांतील बाहेरील भागांतील चुना पाण्याच्या प्रवाहानें वाहून जाऊं नये म्हणून कांक्रीटच्या दर्शनी भागाला दगडचुन्याचें तोंड बांधून घेतात.

आधारमित्ती किंवा पार्श्वभित्ती.- या बांधतांना त्यांच्या मागील बाजूस ३ फुटांपर्यंत मुरुम, कपर्या किंवा गोटे भरतात आणि भिंतींतून पाणी बाहेर निघण्यासाठीं गळत्या किंवा भोकें ठेवतात. नाले व मोर्यांवरील छावण्या किंवा कमानीच्या वर १२ इंचांपासून २४ इंच जाडीचें मरमाचें आस्तरण घातलें नाही तर सध्यांच्या काळच्या मोठालीं ओझीं घेऊन जाणार्या मोटारलॉरीच्या दणक्यानें छावण्या भंगण्याचा आणि कमानींनां तडा पडण्याचा संभव फार असतो. मोठाल्या पुलांवर दोन्ही बाजूंच्या वरवंड्यांमधील रुंदी २३ ते २५ फूट ठेवावी. पुलांवरून किंवा मोर्यावरून १६ टन वजनाचा वाफेचा रूळ नेतां यावा इतक्या मजबुतीच्या छावण्या व कमानी बांधल्या पाहिजेत. मोठ्या पुलांवरून दर चौरस फुटास २०० पौंड इतकी रहदारी नेहमीं चालू राहील असें हिशोबांत धरतात.

ध र णा च्या भिं ती व पू ल किं वा मो र्या.-धरण थोड्या लांबीचें व कमी उंचीचें असलें तर त्यावरून जाणार्या रस्त्याची रुंदी १८ फूट ठेवतात. परंतु धरण जर उंच आणि लांब असलें तर ही रुंदी २३ फूट ठेवली तर बरी. अशीं धरणें २ फूट उंचीचीं असली तर त्यांच्या खालून बहुतकरून मोर्या ठेवीत नाहींत. परंतु जर थोडा फार प्रवाह बाराहि मास वहात असेल तर धरणाच्या खालून एखादी मोरी तेवढा प्रवाह वाहून नेण्यापुरती बांधतात. अशीं धरणें जास्ती उंचीचीं बांधून त्यांच्या खालीं मोर्या ठेवतात व अशा रीतीनें पावसाळ्यांतील नेहमीं सर्वसाधारण प्रवाहहि खालच्या मोर्यांतून निघून जावा एवढ्या आकाराच्या मोर्या बांधल्या तर पावसाळ्यांतहि पुराचे दिवस वगळून बाकीचा सर्व काळ या धरणाचा उपयोग करतां येतो. अशा धरणांनां रीईन फोर्स्ड कांक्रीटच्या छावण्या मोर्यांवर घातल्या तर अशा मोर्यांचा गाळा ३ फूट सहज ठेवतां येतो. आणि कमानी बांधण्या तर ५ ते १५ फूटहि गाळा ठेवतात. अशा धरणांच्या दोन्ही बाजूंच्या भिंती नदीच्या दोन्ही थडींच्या कठिण जमिनींत जातील इतक्या लांबीच्या बांधतात. आणि त्यांच्या कमानीं दोन्ही दर्शनी बाजूंस दगडांच्या ठोकळ्यांच्या आणि मधल्या भागास डबराच्या किंवा चुन्याच्या कांक्रीटच्या बांधून कमानींमधील भाग चुन्याडबराचें बांधकाम किंवा कांक्रीट यांनीं बांधून काढतात. अशा कमानीचें पियर्स किंवा मच्छ १० फूटपर्यंत उंचीचे असल्यास २॥ फूट जाडीचे करतात. अशा पुलांनां किंवा धरणांना वरील बाजूंस  ६ इंच जाडीचें कांक्रीट घालून त्यांवर ८ x १२ इंच आकाराची काळी फरशी कर्णरेषेंत (डायागोनल) बसवितात. आणि ती, पूर जितक्या उंचीपर्यंत किंवा निदान दोन्ही बाजूंच्या भिंती पुरानें वाहून न जातील इतक्या खोलीनें खोदाण जेथपर्यंत केलें असेल तेथपर्यंत तरी करतात. अशा फरशांनां दगडांचा आकार जितका लहान असेल तितका चांगला व त्या निदान मधल्या १० फूट रुंदीच्या तरी टाकीनें घडलेल्या असाव्या. व बाकीच्या भागावरील फरशांनांहि बूच असूं नये. अशा धरणांनां जर कठिण जमीनीचा पाया लागत नसेल तर सगळ्या धरणाला तीनपासून चार फूट जाडीचा हॉयड्रालिक लाईमच्या (पाण्यांत कठिण होणार्या) अथवा सिमेंट मिसळलेल्या चुन्याच्या कांक्रीटाच्या तराफा करून त्यांवर मोर्यांच्या भिंती, मच्छ वगैरे बांधतात. आणि मोर्यांतून वाहाणार्या पाण्याच्या जोरानें खड्डे पडून कांक्रीटच्या तराफ्याचा पाया उघडा पडूं नये या करतां अशा मोर्यांच्या खालच्या बाजूला १५ फूट रुंदीची आणि १ फूट जाडीची कांक्रीटची फरशी करून तिला आधार म्हणून खालच्या बाजूला १५ फूट रुंदीची आणि १ फूट जाडीची कांक्रीटची फरशी करून तिला आधार म्हणून खालच्या बाजूस भिंती बांधतात आणि तेथें खड्डा पडूं नये म्हणून डबराचें आस्तरण करतात.

र स्त्या चें का म, ख डी ज मा क र णें.- खडी कठिण व चिवट दगडाची असावी. खालच्या थरासाठी दोन इंच व्यासाच्या बांगडींतून जाण्याजोगी व वरच्या म्हणजे पृष्ठभागाच्या थराकरितां १॥ इंच व्यासाच्या बांगडीतून जाण्याजोगी फोडलेली असावी. प्रत्येक फोडलेला दगड चतुष्कोण असून त्यास कोपरे असावे. खडींतील खडे लांबट अगर चिपासारखे नसावे. २ इंच व्यासाच्या बांगडींतून न जाईल अशी खडी नापसंत समजावी. मुरुम किंवा खडी रस्त्यावर पसरून त्यावर रूळ फिरवून बसविली म्हणजे खड्यामध्यें राहिलेल्या बारीक सांधी बुजविण्याकरितां जो वाळूचा थर पसरतात ती वाळू बारीक, स्वच्छ, दाणेदार व खरकरीत असावी. व तिचा थर अर्धा इंच जाडीपेक्षां जास्त असूं नये. मुरुम चांगला स्वच्छ म्हणजे मातीनें मिश्रित नसावा. मुरुम खडी व वाळू स्वच्छ चाळून त्यांतील माती काढल्याखेरीज त्यांचे ढीग घालूं नयेत. चाळून तयार झाल्यावर रस्त्याच्या बाजूस खुल्या जाग्यावर अथवा भरावाच्या उताराच्या पायथ्याशीं मुद्दाम ठेवलेल्या जागेंत (बर्मवर) सारख्या अंतरावर ढीग घालावे. नवीन रस्त्यावर मुरुम किंवा खडी पसरण्याची असल्यास खडीचे अथवा मुरुमाचे ढीग रस्त्याच्या दोन्ही बाजूंस ओळीनें घालावे. रस्त्याचा मालमसाला पसरण्यापूर्वी बारकाईनें तपासून मोजावा. मोजल्यानंतर त्यावर चुन्याचे पट्टे ओढावे. म्हणजे मोजलेले ढीग कोणते हें कळून येतें. वाळू व मातीसाठीं खोदाई रस्त्याच्या मध्यरेषेपासून ३६ फुटांच्या आंत नसावी. हे खळगे नियमित आकाराचे असावे.

ख डी प स र णें व ब स वि णें.- खडी पसरण्यापूर्वी रस्त्याचा पृष्ठभाग १॥ इंच खोल खणून पोकळ करावा. व खणून काढलेल्या खडीचा रस्त्याच्या कडेच्या बाजूस उपयोग करावा. कडेच्या बाजूमध्यें नव्या खडीपैकीं मोठी तळशीं व बारीक जर पसरावी. खडी पसरतांना तिचा रस्त्याच्या रुंदीस दीर्घवर्तुळ आकार द्याव्या. व रुंदी १६ फूट असेल तर मध्यें २ इंच चढ ठेवावा. नवी खडी किती उंचीची व कशी पसरावी हें बरोबर दाखविण्यासाठीं लांकडाचे नमुने रस्त्यावर नियमित अंतरावर ठेवावे. व त्यामध्यें खडी पसरावी. पसरलेल्या खडीवर पाऊस कमी असल्यास पाणी घालावें. व ती चांगली भिजली म्हणजे रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळशीत व घट्ट होईपर्यंत तीवर रूळ फिरवावा. खडी चांगली जमून बसली म्हणजे मुरुम किंवा वाळूचा मलमा (बाईंडेज) खडीवर टाकून त्यावर पुन्हां रुळ फिरवावा. रस्ता चांगला झाल्यावर आणखी एक वाळूच्या मलम्याचा शेवटचा पातळ थर पसरावा. रुळाचें वजन त्याच्या प्रत्येक फूट लांबीस निदान पाऊण टन असावें. धुमस करून कडी बसविणें झाल्यास धुमस जड असून खूप जोरानें ठोकलें पाहिजे. पाणी घालून खडी चबचबीत भिजविल्यावर १६ मनुष्यांची एक एक रांग, अशा बारा रांगांतील मनुष्यांनी पाणी अगदीं     नाहीसें होऊन खडी चांगली दबेतोंपर्यंत धुमस करावा. खडी पसरतांना रहदारीस हरकत न होईल अशी तजवीज करावी. रात्रीं रस्त्यावर खडीचें ढीग राहूं देऊं नयेत.

ख डी चें मा प.- काळ्या दगडाची खडी २ इंचांच्या बांगडीतून जाईल इतकी बारीक फोडतात. आणि मुरुम व ल्याटराईट (जंबुरी दगड) यांचे खडे ३ इंचापर्यंत ठेवतात. खडीचे सारख्या आकाराचे ढीग करतात. किंवा ५ x ५ फूट x १३ इंचांचे फरे भरून त्यांचें माप उंचींत १२ इंचच धरतात. मुरुम किंवा ल्याराईय यांचे ढीग किंवा फरे १४ इंच उंचीचे मरुन त्यांचें माप मात्र १२ इंच धरतांत.

ख डी व रू न फि र वा व या च्या रु ळा स ला ग णा री श क्ति व ख र्च.- दगडाचें किंवा बिडाचे २ ते ३ टन वजनाचे रुळ असले म्हणजे बैलाच्या जोड्या लावून ते फिरवितात ह्याच्यापेक्षां जड ६ ते ७ टनापर्यंत वजनाचे वाफेचे रूळ साधारण रस्त्यांनां उपयोगी पडतात. पण शहरांतून फिरवा वयासाठी १० ते १५ टन वजनापर्यंतचे वाफेचे रूळ  उपयोगांत आणतात. खडीचा वरचा भाग झिजून गेल्यामुळें नवा थर घालावयाचा तो निदान ३ इंच जाडीचा घालावा. त्यावरून वाफेचा रूळ फिरविला असतां रस्ता चांगला टिकतो. वाफेच्या रुळानें १६ फूट खडी पसरलेला रस्ता निदान १ फर्लांग लांबीचा एका दिवसांत चेपून काढतां येतो अथवा ९ हजार पासून १३ हजार चौरस फूट पर्यंतचा रस्ता दाबून तयार करतां येतो. बैलांनीं चालणारा रूळ ३ फूट रूंदीचा व २ टन वजनाचा जर असेल तर त्यानें ३ इंच जाडीची खडी घातलेला १ मैल लांबीचा रस्ता १८ दिवसांत पुरा केला जातो. सध्यां (१९२५) ८ टन वजनाच्या वाफेचा रूळ १ दिवसभर चालविणें झाल्यास २२॥ रुपये खर्च येतो आणि ६ बैलांच्या जोड्या लावून दगडी किंवा बिडाचा रूळ फिरावल्यास रोज १८ रुपये खर्च येतो. जेव्हां रोलिंगचें काम बैलांकडून केलें जातें तेव्हां लांबचलांब पट्टीवरून रुळ फिरविणें कमी त्रासाचें असतें. कारण पट्टी कमी लांबीची घेतल्यास उलट्या दिशेला जाण्यासाठीं रुळाचा दांडा बदलून बैलांनां उलट्या दिशेनें चालू करण्यात बराच वेळ जातो. परंतु वाफेचा रुळ वापरला असतां त्या रुळाचें तोंड बदलावें लागत नसल्यामुळें तो उलट दिशेलाहि लागलीच चालवितां येतो. यास्तव अर्ध्या फर्लांगापासून १ फर्लांगापर्यतचाच रस्ता रोज दाबून काढणें सोईचें पडतें.

वा फे चे रू ळ चा ल वि ण्या स ख र्च.- हे चालविण्यास स्टीम बॉयलर अॅक्टप्रमाणें लायक इसम नेमला पाहिजे. त्याचा पगार सध्यां (१९२५) ४५ ते ७५ रु. असतो. आणि त्याच्या हाताखालीं १५ ते ३०रु. पर्यंतचा आगवाला द्यावा लागतो. अशा रुळांत वाटेल तर दगडी कोळसा अथवा लांकूडहि जाळतां येतें. जळण कोणत्या प्रकारचें (लांकूड कीं कोळसा) वापरावयाचें आहे तें रूळ विकत घेतांनाच सांगावें लागतें म्हणजे त्याप्रमाणें बॉयलराच्या आगटीची वेगवेगळ्या प्रकारची रचना करतात. ह्या बाष्पजनक यंत्रांत पाणीं गोडे व स्वच्छ असावें लागतें. त्यांत खार किंवा माती असल्यास आंत खरपुड्या बनूं लागतात. रूळ जर १० टनी कांपाऊंड टाईपाचा असला तर तो १० तास चालविण्यास ३०० ग्यालन पाणी लागतें आणि तोच एक सिलेंडरचा असल्यास रोज ४०० ग्यालन पाणी लागतें. आगटी पेटविल्यापासून अर्ध्या ते एक तासांत वाफ तयार होऊन रूळ चालवितां येतो. एकेरी सिलेंडरच्या रुळांत वाफेचा दाब साधारणत: १ चौरस इंचास १४० पौंड इतका, आणि कापाऊंड रुळांत तो दाब १८० पौंडांपर्यंत ठेवून काम करतात.

र स्ता टा च णें.- रस्त्यावर नवी खडी घालतांना रस्ता टांचून व त्यावर खडी घालून पुरा करून घेतांत आणि तोपर्यंत रस्त्यावरून जाणार्या गाड्यांची रहदारी न खोदलेल्या अर्ध्या रस्त्यावरून होऊं देतात. अशा रीतीनें २ पट्टयांनीं रस्ता करतांना रोलिंग म्हणजे खडी दाबणे ती बाजूकडून मध्याकडे अशी दाबीत आणतात. आणि रस्त्याच्या मधल्या २.२॥ फूट रुंदीचा भाग सगळ्याच्या शेवटीं रूळ फिरवून दाबतात. रूळ चालवितांना कोरड्या खडीवरच दोनदां रूळ फिरवितात आणि नंतर खूप पाणी शिंपडून रस्ता कठिण होईतोपर्यत रूळ फिरवितात. रस्ता रूळानें दाबून कठिण झाला आहे कीं नाहीं हें पहाण्यासाठीं ओझें किंवा खडी भरलेली गाडी त्या दाबलेल्या रस्त्याच्या कोणत्याहि भागावरून नेली तरी चाकें त्यावरून गेल्याची निशाणी त्यावर राहातां उपयोगी नाहीं असें झालें म्हणजेच तो रस्ता पुरा झाला असें समजावें. रस्ता असा पुरा दाबल्यानंतरच वरील आस्तरणाचा मुरुम किंवा रेती टाकून रस्ता गुळगुळींत साफ होईपर्यंत रूळ फिरवावा अशा आस्तरासाठीं काळ्या मातीचा अथवा कोणत्याहि चिकण मातीचा उपयोग करू नये.

नवा रस्ता करतांना ३ ते ४ इंच जाडीचा खडीचा थर घालून त्यावर रूळ फिरवून खडी एकमेकांत गुंतून साधारण कठिण झाल्यानंतर दुसरा थर ३ ते ४ इंच जाडीचा घालून त्यावरून रस्ता पक्का कठिण होईपर्यंत रूळ फिरवावा आणि त्यानंतर आस्तरणाचा मुरुम किंवा रेती पसरवावी. वाफेचा रुळ चालत असतां त्याच्या बरोबर पाण्याच्या दोन गाड्या असाव्या. आणि दोन तांबड्या कांचेचे कंदील व खडी पसरलेला भाग दाखविण्यासाठीं २-४ साधे कंदील बसावें. १० टनी कंपाऊंड रोलर रोज १० तास काम करीत असला तर ७ बंगाली मण दगडी कोळसा किंवा १४ ते २१ गण वाळलेलीं लांकडें रोज लागतात. खेरीज पेटवण्यास लांकूड दर आठवड्यास १ ते २ मण लागतें. खेरीज एंजिन आईल, सिलेंडर आईल व एंजिन चालविण्यास लागणारें इतर किरकोळ सामान लागतें. रस्ता मुरमाड जमिनींतून केलेला असेल तेव्हां ३ ते ६ इंच जाडीचा खडीचा थर घातला म्हणजे पुरे, परंतु जेथें भराव घालून त्यावर खडी पसरणें असेल तेथें साधी माती असल्यास ३ ते ४ इंच जाडीचा मुरमाचा थर घालतात आणि काळी माती असल्यास ६ ते ९ इंच जाडीचा थर घालतात आणि त्यावर रूळ फिरवून मग त्यावर खडीचे १, २ थर घालतात.

श ह रां ती ल र स्ते.- शहरांत किंवा शहराच्या आसपास रस्ता करतेवेळीं ६ ते ९ इंच जाडीचें डबर तळाशीं पसरून (हें डबर पसरतांना दगडाचा जास्तीत जास्ती रुंद भाग असेल तो खालीं करून बसवावा) आणि हा डबराचा वरील भाग कपर्या वगैरे भरून सारखा केल्यानंतर त्यावरून ६ इंच जाडीची खडी २ थरांत घालून प्रत्येक थर निरनिराळा रुळ फिरवून दाबून काढतात.

मै ल.- मोठाल्या रस्त्यांवरून, रस्ता जेथून सुरू झाला असेल तेथून तो जिकडे जावयाचा त्या दिशेनें अंतर बरोबर मोजून मैलांचें मोठे दगड आणि मैलांच्या अष्टमांश भागाचे म्हणजे फर्लांगाचे लहान दगड त्यावर आंकडे कोरून रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्त्याच्या धारेपासून ५ ते ८ फूट अंतरावर साधारणत: बसवितात. परंतु ज्या ठिकाणी हवा नेहमीं ओली राहिल्याकारणानें गवत व झाडेझुडपें फार उगवतात अशा ठिकाणीं ते रस्त्याच्या धारेवरच बसवितात. व असें केल्यानें ते गवतांत किंवा झुडपांत झांकून जात नाहींत. दगडांवर आंकडे खोदणें तें V या आकाराची त्रिकोणी खोबण करून खोदावे आणि खोदलेल्या आंकड्यांनां व अक्षरांनां काळा तेलिया रंग देऊन दगडाच्या बाकीच्या भागाला पांढरा रंग द्यावा. हे आंकडे व अक्षरें २॥ इंच उंचीची व अर्धा इंच जाडीचीं असावीं. मैलाच्या दगडावरून पुढें येणार्या मोठ्या गावांचीं नावें व किती मैल अंतरावरावर आहेत त्यांचा आंकडा आणि माथ्यावर ज्या मोठ्या शहरापर्यंत तो रस्ता जाणार असेल तेथपर्यंतचें अंतर व नांव खोदतात. फर्लांगाच्या दगडावर वरील बाजूंस मैलाचा आंकडा व खालील बाजूस १ ते ७ पर्यंत फर्लांगाचे आंकडे गालतात.

गॉ र्ड् स् स्टो न.- रस्त्याच्या दोन्ही बाजूंस गार्ड्स् स्टोन्स अथवा रखवाल दगड बसवितात. ते सुमारें २। फूट लांब असून १२ इंच ते १५ इंचपर्यंत जमिनींत पुरतात. त्यांचा माथा चौरस अथवा वर्तुळपाद रूपाचा असतो व रात्रींच्या वेळीं दगड दिसावा म्हणून त्यास सफेती दिलेली असतें. हे दगड (१) जेथें रस्त्याचा भराव ५ फुटांपेक्षां जास्ती असेल अशा ठिकाणीं, (२) पुलांच्या कठड्यांच्या अथवा वरवंड्याच्या आंतील बाजूंस (३) कोणत्याहि रस्त्यावरील वळणाच्या बाहेरच्या बाजूनें (४) ओढयांतून किंवा नद्यांतून धरण किंवा फरशी बांधून रस्ता केला असेल त्याच्या दोन्ही बाजूंस व (५) पुलांच्या किंवा नाल्यांच्या दोन्ही तोंडास वगैरे ठिकारीं रस्त्याच्या दोनहि बाजूंनां ३ ते ८ फूट अंतरावर बसवितात. फरशीच्या दोन्ही बाजूंस बसवावयाचे दगड फरशीच्या वर निदान १८ इंच उंचीचे तरी ठेवतात.

ह द्दी चे द ग ड.- रस्त्याच्या हद्दीचे दगड प्रत्येक अर्ध्या फर्लांगांत १ म्हणजे मैलांत १६ असे दर एक बाजूस रोवतात. रस्ता गांवांतून किंवा जास्ती किंमतीच्या बागाईत जमिनीतून गेल्यामुळें रस्त्याची जमीन दबविण्याची जेथे लोकांची प्रवृत्ति असेल अशा ठिकाणीं हे हद्दीचे दगड ५० -५० फुटांवरहि रोवतात आणि त्यांनां पांढरा रंग देऊन निशाणी करतात. मोठ्या रस्त्याला ओलांडून जेव्हां गाडी रस्ता जातो तेव्हां अशा गाडीरस्त्याला भर घालून मोठ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस ५-५ फूटपर्यंत त्याच्या इतका सपाटी ठेवून नंतर १५ पुटांस १ फूट इतका स्लोप देऊन ते गाडीरस्त्याला दोन्ही बाजूंस जाऊन मिळतील इतके लांबवितात. आणि ते नेहमी दुरुस्त ठेवतात.

बां ध.- घाटांतील रस्त्यावरून ३ ते ४ इंच जाडीचे मुरप्राचे तिरपे बांध पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरून घालतात. असे करण्याचा हेतु इतकाच की, रस्त्यावरून पावसाचें पाणी जोरांत वाहात जाऊन खडी उघडी पडूं नये असा असतो. ह्या बांधांच्या योगानें वाहून आलेलें पाणी रस्त्याच्या गटारांनां जाऊन मिळतें असें बांध रस्त्याचा स्लोप २० फुटांत १ फूट इतका असेल तर २५-२५ फुटांवर घालतात. स्लोप कमी असल्यास हें बांधांमधील अंतर वाढवितात. हें बांध रस्त्याच्या गटारांपासून ५ फूट पर्यंत घातले तरी चालतात. कारण रस्त्याचा मधील भाग उंच असल्याकारणानें पाणी आपोआपच दोन्ही बाजूंस गटारांकडे वाहात जातें. जेथें बाहेरील बाजूकडून आंतल्या बाजूस स्लोप दिला असेल अशा ठिकाणीहि पावसाचें पाणी वाहून लवकर गटारांत जाऊन पडावें आणि रस्त्यावरून फार लांबपर्यंत पाणी वाहात जाऊन पाण्याचा वेग वाढूं नये एवढाच ह्या बांधांचा उपयोग होतो. हे बांध घालणें ते मे महिन्याच्या अखेरीस घालून आक्टोबर महिन्यांत काढून टाकतात.

डा म री र स्ते.- एरव्हींचा खडीचा रस्ता चांगला जड रुळानें दाबून तयार केल्यानंतर त्याच्यावर पाऊण इंच जाडीचा डामर आणि बारीक खडी घालून त्याचा पाऊण इंच जाडीचा डामर आणि बारीक खडी घालून त्याचा पाऊण इंचांचा थर दिला म्हणजे रस्त्यावरून जाणार्या गाड्यांच्या वर्दळीनें होणारी झीज वांचते. तसेंच एरव्हीच्या रस्त्यावर खडी चुरून जाण्यानें जी धूळ तयार होते व हवेंत पसरून रस्त्यानें जाणार्या व आसपासच्या घरांतून राहणार्या लोकांनां जो त्रास होतो तो वांचतो. हा रस्ता गुळगुळीत असल्याकारणानें वरून जाणार्या वाहनांनां धक्काहि बसत नाहीं. त्यामुळें गाड्या पुष्कळ टिकतात आणि वाहकशक्तीचाहि व्यय कमी होतो. म्हणजेच गाड्या खेंचून जाणार्या जनावरांनांहि कष्ट कमी पहतात. आणि स्वयंप्रेरित गाड्यांतूनहि जास्ती माल किंवा माणसें नेतां येतात. नवा रस्ता केल्यानंतर त्यावर निदान एक पावसाळा गेला म्हणजे तो पक्का होतो आणि म्हणून डामरी रस्ता करणें झाल्यास रस्ता केल्यानंतर मध्यें निदान १ वर्ष तरी गेलें पाहिजे आणि डामरी खडी पसरण्याच्या अगोदर रस्त्यांत खाचखळगे कोठेहि राहतां उपयोगीं नाहींत. तसेंच रस्त्याला मधोमध दिलेला उपेटहि बरोबर असला पाहिजे. ह्या गोष्टी डामरी खडी पसरल्यानंतर करणें अवघड व खर्चाचे असतें आणि म्हणूनच त्या अगोदर करून घेतल्या पाहिजेत. ही डामरी खडी पसरतांना ५० ग्यालन म्हणजे सुमारें ८ घनफूट ज्यांतील पाणी अजीबात काढून टाकलें आहे असें कोल्टार म्हणजे पातळ डामर व त्यांत काळें खडेडामर (पिच्) घालून उकळविता येण्याजोगा बॉयलर ४ चाकी लॉरीवर बसविलेला उपयोगांत आणतात. आणि त्यांत ३०० अंशां (फा. हीट) पर्यंत तें डामर उकळवितात. आणि तसें तें तापलेलें असतांच रस्त्यावर ओततात. ते अशा प्रमाणांत कीं दर १०० चौरस फुटांस ५५ पौंड अथवा ४॥। ग्यालन व्हावें. तें लांब दांड्याच्या खराट्यांनीं सारखें पसरून सुमारें अर्ध्या इंच जाडीच्या खडीच्या चुर्याचा पाऊण ते १ इंच जाडीचा थर त्या डामरावर पसरतात आणि त्यावरून लागलींच जड वाफेचा रुळ, खालीं ओतलेलें पातळ डामर सर्व खडीला लागून वर तरून येईल अशा रीतीनें फिरवून रस्ता साफ करतात. त्यानंतर दर १०० चौरस फुटांस २५ पौंड अथवा २। ग्यालन वर सांगितलेलें उकळलेलें मिश्रण, झाडाला पाणी घालावयाच्या झारीनें तयार केलेल्या रस्त्यावर ओतून त्यावर खडीचा पाव इंची चुरा पसरला असतां हा २/८ इंच जाडीचा थर होतो. त्यावरून फिरून रूळ फिरवून रस्त्याचा पृष्ठभाग सारखा करतात हा थर सारखा झाल्यानंतर निदान ४८ तासपर्यंत तरी त्यावर गाड्यांची रहदारी होऊं देत नाहीतं. पातळ डामरांत काळें खडेडामर घालून उकळण्याचें प्रयोजन असें कीं त्या दोहोंचें मिश्रण थंड झालें कीं लगेच कठिण होतें म्हणजेच त्यांत मागून घातलेल्या खडीच्या चुर्याचें व त्याचें मिळून 'टारकांक्रीट' बनतें. काळें खडेडामर जास्त घातले तर ढिसूळपणा येतो आणि एवढ्यासाठीं २। ते २॥ भाग पातळ डामरांस १ भाग खडेडामर घालावें.

रस्त्यावर रहदारी सुरू झाल्यानंतर जर डांबर येऊ रस्ता चिकट होत असला तर अशा ठिकाणीं  खडीचा बारीक चुरा अथवा रेतीचा पातळ थर द्यावा. अशा रस्त्याला विशेषत: त्यावर जास्ती रहदारी असल्यास एक वर्षानंतर बरीच ठिगळें लावावीं लागतात. आणि मुंबईस वांद्रा-घोडबंदर रस्त्यावर अशा ठिगळांचें प्रमाण एकंदर क्षेत्रफळाच्या सुमारें १/१२   इतकें करावें लागतें असें आढळून आलें आहे. अशीं ठिगळें करतांना जे खड्डे पडले असतील त्यांच्या सर्व धारा चौरशीत कापून घेऊन वर सांगितल्याप्रमारें पाऊण इंची आणि पाव इंची थर वेगवेगळे देऊन वरून हाताने फिरविण्याचा रूळ फिरवून रस्ता साफ करून घेतात. अशा हातरुळानें दाबलेल्या रस्त्याचा पृष्ठभाग जुन्या भागापेक्षा सुमारें पाव ते अर्धा इंच ठेवतात. तो अशासाठीं कीं वरून जाणार्या मालाच्या गाड्यांच्या चाकानीं तो भाग दबून जुन्या रस्त्याच्या पृष्ठभागाइतका व्हावा. अशा कामाला पहिल्यानें थर घालतांनां जितकें डामर लागतें. त्याच्या सुमारें दीडपट डामर लागतें. अशा कामाला दर १०० चौ. फुटांस २७॥ रुपये खर्च येतो. असा रस्ता वर्षास सुमारें पाव इंच जाडी इतका झिजतो आणि म्हणून त्याला तितक्याच जाडीचा थर दरवर्षी द्यावा लागतो. असा थर देतांना ३०० अंशांपर्यंत तापविलेल्या पातळ खडे-डामराच्या मिश्रणाचा दर एक चौरस फुटास ३५ पौंड म्हणजे सुमारें ३ ग्यालन एवढा पातळ थर स्तंभासारखा पसरून लागलींच पाव इंच जाडीच्या दगडाच्या चुर्यात १/४ इंच इतक्या जाडीचा थर पसरून त्यावर लागलींच वाफेचा रूळ फिरवून रस्ता दाबून साफ करून घेतात. अशा कामाला दर १०० चौरस फुटांस ७। रु. खर्च येतो.

को ल्टा र.- अशा कामांत वापरावयोचं कोल्टार अतिशय पातळ व अतिशय तेलकट असतां कामा नये. त्यांच्यात चिकटपणा जास्ती असावा. खडेडामर अगदीं काळें लुकलुकीत व फोडलें असतां कांचेसारखे तुकतुकीत असावे. कोल्टार व खडेडामर उकळल्यानंतर किती असावें ह्याचें जें वजन व प्रमाण वर दिलें आहे त्याच्या सुमारें १। पट हे पदार्थ घेतले म्हणजेच ते उकळतांना वाफ होऊन जाण्यामुळें जितकें कमी होतें तेवढ्याचा समावेश होऊं शकतो.

आ स फा ल्ट चा र स्ता.- वर सांगितलेल्या रीतीपेक्षां जास्ती खर्चाची दुसरी एक रीत आहे. तिच्यांत ३ इंच जाडीचा आसफाल्ट व खडीचा रस्ता करतात. हा रस्ता ५-६ वर्षेपर्यंत टिकतो. या रस्त्यास खडी ३॥ इंच जाडीची पसरून तीवरून वाफेचा जड रूळ फिरवितात. असें ४ वेळां रोलिंग केले. म्हणजे त्यावर १॥ इंची खडीचा १॥ इंचांचा एक थर त्यावर १ इंची खडीचा १॥ इंच जाडीचा दुसरा थर पसरतात आणि बर्म्यूडेश आसफाल्ट ३५० अंशांपर्यंत तापवून दर १०० चौरस फुटांस १५० पौंड इतकें आसफाल्ट खडीवर ओततात. तें ओततांना ३२५ अंशापेक्षा कमी किंवा ४०० अंशांपेक्षां जास्ती तापवूं नये. असें आसफाल्ट ओतल्याबरोबर अर्ध्या इंची खडीचा थर लागलीच पसरून वाफेचा रूळ त्यावरून चालवितात. व त्यावर दर १०० चौरस फुटांस ५० पौंड ह्या प्रमाणांत दुसरा आसफाल्टचा थर देऊन त्यावर पाव इंची दगडाच्या चुर्याचा ३/८ इंच जाडीचा थर पसरल्यावर ८ टन वजनाचा वाफेचा रूळ फिरवून रस्ता साफ गुळगुळीत करून घेतात. जर कोठेंहि सुटें आसफाल्ट दिसून आलें तर त्यावर पाव इंची चुरा किंवा रेती घालून रूळ फिरवून रस्ता साफ करतात. असा रस्ता पुरा झाल्यावर निदाद ३ दिवस तरी त्यावरू गाड्यांची रहदारी होऊं देत नाहींत. अशा रस्त्याला मुंबईं येथें दर १०० चौ. फुटांस ८० रु. खर्च येतो.

ख डी को ल्टा र.- ह्याखेरीज आणखी एक तिसरा प्रकार म्हणजे दगडाची खडीचा कोल्टारमध्यें बुचकळून काढून अशा खडीचा रस्ता तयार करणें होय. अशा कामांत २। इंची, १॥ इंची आणि अर्धा इंची अशा ३ प्रकारच्या डामरविलेल्या खडीचें वेगवेगळे ढीग करून ते निदान ४ महिने तरी टाकून ठेवतात आणि तो वापरते वेळीं जुन्या रस्त्याला तापलेल्या डामराचा थर देऊन त्यावर २। इंची खडीचा ४ इंच जाडीचा थर देतात. व त्यावर वाफेचा रूळ चालवून तो थर दबल्यानंतर १॥ इंची खडीचा थर देतात आणि त्यावरून रूळ फिरवून रस्ता साफ झाल्यावर १॥ इंची खडीत असलेल्या फटी सर्व भरून जाण्यासाठीं अर्ध्या इंच खडीचा थर पसरतात. आणि त्यावरून रुळ फिरवून व धूळ बिलकूल नसलेली रेती पसरून रस्ता साफ करून घेतात. असा रस्ता झाल्यानंतर ५-७ दिवस पर्यंत त्यावरून गाड्या वगैरे जाऊं देत नाहींत. गाड्यांची येजा सुरू झाल्यानंतर सुमारें १५ दिवसांनीं रस्त्यावर पडलेली सर्व प्रकारची घाण धुवून काढून रस्ता वाळल्याबरोबर कोल्टार तापवून दर १०० चौरस फुटांस सुमारें २॥। ग्यालन कोल्टारचा हात देतात असा हात दिला म्हणणे रस्ता पुरा झाला असें समजावयाचं. अशा प्रकारच्या डामरीखडीच्या ५ इंच जाडीच्या थराला १०० चौरस फुटांस ४० रुपये खर्च येतो.

र स्त्या च्या का मा चे द र (शंभर घनफुटास (१९२५).-
काळ्या व तांबड्या मातींत खोदाण १४ आणे
ढिसूळ मुरमांत खोदाण १ रु. ३ आ.
साधारण     ''    '' १रु. १०आ.
कठिण    ''    '' २ रु. ३आ.
नरम खडकांत    ''    '' ४ रु. १४ आ.
कठिण काळ्या दगडांत खोदाण १२रु.
सुरुंगाची खडी ९ रु. १० आ.
गुंड्या गोट्यांची खडी ६ रु. ७ आ.
अर्धा मैल खडी वाहून नेणें व ढीग करणें २ रु. ८ आ.

गा डी च्या वा ह तु की स ख र्च.- साधारण गाडीत ८ हंड्रेडवेट म्हणजे सुमारें ९०० पौंड वजन ७ मैल अंतरावर टाकून पुन्हां रिकामी गाडी त्याच दिवशी परत येऊं शकते. काळा दगड दर घनफुटास १८० पौंड इतका वजनांत भरतो. परंतु त्याचीच फोडून १॥ इंची खडी केली तर तिचे वजन दर घनफुटास ९६ पौंड अथवा १०० घनफुटास ४। टन इतकें भरतें म्हणजेच अखंड दगडाच्या सुमारें निम्यानें भरतें असें समजावें. ल्याटराईट म्हणजे जंबुरी २॥ इंची खडीचें वजन सुमारें दर घनफुटास ७७ पौंड भरतें. मुरुम वाहून नेण्यास वरील दराच्या सुमारें पाऊणपट दर पडतो. मुरुम वाहून नेण्यास वरील दराच्या सुमारें पाऊणपट दर पडतो. मुरुम पसरण्यास १०० घनफुटांस ९ आणे. खडी पसरण्यास १०० घनफुटास १४ आणे; रस्ता टांचणें किंवा उकरणेंस १०० घनफुटास ३ आणे खर्च येतो.

झा डें.- रस्त्याच्या दुतर्फा झाडें लावण्याचीं ती रस्ता ज्या मुलुखांतून जात असेल त्या मुलुखांत होणारीं साधारणत: असावी. अशीं झाडें लावतांना तीं लिंब किंवा आंबा किंवा बाभूळ यापैकीं असल्यास एकमेकांपासून सुमारें ३३ फूट म्हणजेच मैलांत १६० असावीं. लिंब, पिंपळ किंवा वड या जातीचीं झाडें असल्यास ५० ते ६० फूट अंतरावर लावावीं. हीं झाडें लावतांना रस्त्याच्या मध्यरेषेपासून सुमारें २० फूट अंतरावर दोन्ही बाजूंस त्यांची लागण करावी. वड, पिंपरी किंवा नांदरूक हीं झाडें लावणें असल्यास १०-१२ फूट लांबीच्या फांद्या कापून त्यांचा खालील भाग खड्यांत ३ ते ४ फूट माती घालून लावावी. म्हणजे त्यांचा माथा जमिनीवर ६ ते ८ फूट राहिल्यामुळें त्यांनां नवीन फुटणारी पालवी बकरीं खाऊं शकत नाहींत. आणि म्हणूनच त्यांच्या भोंवती कुंपण न घातलें तरी ती वांचतात. गांवाजवळ किंवा जनावरांची चरावयास जाण्याची जागा असल्यसा या झाडांनां थोडे फार जपावें लागतें. झाडें लावतांना ती ओळींनें लावली म्हणजे त्यांनां पाणी घालावयासहि सोपे पडतें. आणि ती बर्याच अंतरापर्यंत एकाच जातीची असलीं म्हणजें दिसावयास चांगली दिसतात. अशीं झाडें लावणें ती पावसाच्या आरंभीं जून महिन्यांत लावलीं म्हणजे त्यावेळी आकाशांत ढग असल्यामुळें उन्हानें करपूनहि जात नाहींत. आणि झाडांच्या आंतील रस त्यावेळी ऊर्ध्वगामी असल्यामुळें पालवीहि लवकर फुटते. या कलमांचा जमिनींत पुरावयाचा भाग कांही ठिकाणीं सोलून आणि खालचें टोंक तिरपे कापून ती लाविलीं असतां त्यांनां मुळ्या लवकरत फुटतात. हीं कलमें किंवा फांद्या तोडल्यापासून २ दिवसांत म्हणजे ४८ तासांच्या आंत लाविल्या पाहिजेत. आणि ज्या ज्या जमीनींत पुरावयाच्या ती माती ओली असली पाहिजे. आणि पहिला पावसाळाभर ती जमीन ओली राहील अशी तजवीज ठेविली पाहिजे. हीं कलमें लावल्यानंतर त्यांनां जेव्हां कोम फुटूं लागतील तेव्हां पहिल्या पावसाळ्यांत खालची पालवी तोडून टाकली म्हणजे तीं झाडें उभी वाढावयास लागतात. अशा नव्या झाडांनां वरचेवर पाणी घालावें लागतें. गांवांतून जाणार्या रस्त्याच्या बाजूस झाडें लाववयाचीं तर त्यांनां जमिनीपासून १०-११ फुटांपर्यंत फांद्या फुटूं देता उपयोगी नाहीं. रस्त्यावरील झाडांना जनावरांपासून फार उपसर्ग पोहोंचतो म्हणून कोणतीहि झाडें लावतांना ती कुंड्यांत तयार करून ती निदान ५ फूट तरी उंच झाल्यावर  रस्त्याच्या बाजूस केलेल्या खड्डयांत नेऊन लावावीं व भोंवतालीं कुंपण करावें. असें करण्यास बहुतेक झाडांनां २ ते ३ वर्षांचा अवधि लागतो. तेथपर्यंत ती कुंपण घातलेल्या कंपाऊंडांतच कुंड्यांत वाढूं द्यावी लागतात आणि अशी रोपें तयार करण्याच्या बागेंतून ती ५ फूट उंचीची झालीं म्हणजेच ती रस्त्याच्या कडेला नेऊन लावतात. अशीं रोपें रस्त्याच्या बाजूस नेऊन लावण्याची वेळ पावसाळा चांगला सुरू झाल्यानंतरचीच होय. झाडें लावण्याचें खड्डे तळाशीं ३ फूट लांब व ३ फूट रुंद ३ व फूट खोल व माथ्याजवळ ४ फूट लांब व ४ फूट रुंद अथवा ४ फूट लांब व ४ फूट रुंद व ४ फूट खोल असावें. आणि हे खड्डे चांगल्या मातीनें भरून काढून त्यांत २ फूट व्यासाचा व ३ फूट खोलीचा भाग मधोमध सोडून त्यांत ओली माती व शेणमुताचें खत घालून त्यांत रोपें लावावींत. खत न मिळाल्यास जमीन तांबड्या मातीची असल्यास काळी माती व काळी माती असल्यास तांबडी माती घालून रोपें लावावीं. झाडांवर कीड पडल्यास पावशेर तंबाखूची वाळलेलीं पानें अर्धा ग्यालन पाण्यांत अर्धा तासपर्यंत उकळावीं आणि त्यांत एक छटाक कठिण साबू विरघळावा आणि वापरते वेळीं त्यांत ३ ग्यालन थंड पाणी घालून अशा पाण्याचा शिडकावा जेथें जेथें कीड पडली असेल अशा ठिकाणीं करावा अथवा अर्धा ग्यालन अधणाच्या पाण्यांत २ छटाक मोरचूद उकळावा आणि वापरते वेळी त्यावर २ ग्यालन म्हणजे २० पौंड थंड पाणी घालून त्याचा शिडकाव करावा. अथवा अर्धा ग्यालन उकळत्या पाण्यांत अदपाव साबण विरघळवून त्यांत १ ग्यालन म्हणजे १० पौंड राकेल ओतावें आणि वापरावयाचें  वेळीं त्याच्या ८ पट थंड पाणी घालून त्याचा शिडकाव करावा. रस्त्याच्या बाजूस लावण्याचीं झाडें साधारणत: पुढील असतात - बाभूळ, लिंब, फणस, उंडी, शिसू, जांभूळ, पिंपरी, पिंपळ, उंबर, नागचाफा, चाफा, खिरणी, अशोक करंज, भेंडी ही साधारणत: ३०-३० फुटांवर लावतात आणि वड, नांदरूक, चिंच, बेहडा, हीं झाडें ४०-४० फुटांवर लावतात. साधारणत: पहिल्या वर्षी अशा झाडांनां ८-८ दिवसांनी व ३ र्या वर्षी १२-१२ दिवसांनीं आणि ४ थ्या वर्षी १५-१५ दिवसांनीं सोलापूरसारख्या उष्ण हवेच्या जिल्ह्यांतून देतात. पाणी १ मैलांवरून आणावें लागत असल्यास १ दिवसांत ५० झाडांनां पाणी घालतां येतें आणि असे १ वेळेला पाणी घालण्यास दर झाडास ८ पै खर्च येतो. याच हिशोबानें २ मैलांवरून पाणी आणल्यास १ आणा ४ पै. आणि ३ मैलांवरून आणल्यास दर झाडास एक वेळ पाणी घालण्यास २ आणे खर्च येतो. व अशाच हिशोबानें झाडांसाठी खड्डे करून त्यांत झाडें लावून ती ४ वर्षे जगविण्यास दर झाडामागें ७। रु. खर्च येतो.

लो ह मा र्ग.

रे ल वे.- लोखंडाचे रुळ सडकेवर समांतर बसवून त्यावरून गाडीच्या चाकाच्या धांवा बरोबर चालतील व घसरून एका बाजूला न जातील अशा प्रकारच्या धांवा चाकांनां बसविणें व प्रत्येक एंजिन किंवा गाडीच्या प्रत्येक डब्याला चार किंवा आठ अशीं चाकें बसवून तो डबा ओढून नेणें ही कल्पना अलीकडची आहे. सडकेचा रस्ता कितीहि चांगला असला तरी त्यावरून एक टन वजनाची गाडी ओढून न्यावयाची असल्यास ४० पौंडांपासून ७० पौंडांपर्यंतचा जोर गाडी ओढावयास लागतो. पण रुळावरून १ टन वजनाची गाडी ओढावयास फक्त ७ पासून १० पौंडांचा जोर पुरा होतो. यास्तव लोहमार्गावरून म्हणजे रुळावरुन जाणार्या गाड्यातून माणसें व माल नेणें किती तरी स्वस्त पडतें हें सहज लक्षांत येईल. खेरीज अशा रुळांवरून जाणार्या गाड्या वाफेच्या शक्तीनें व कधींकधीं पेट्रोलच्या साहाय्यानें किंवा विद्युतप्रवाहानें चालणार्या एंजिननें म्हणजे वाहकयंत्रानें चालविल्या जात असल्याकारणानें अशा गाड्या फार वेगानें जाऊं शकतात व यामुळें प्रवासाला वेळहि फार कमी लागतो व प्रवास थोडक्या खर्चांत होऊं शकतो. असा लोहमार्ग तयार करतांना खालची सडक इतकी मजबूत करावी लागते कीं, पाहिजे तेवढ्या वजनाची वाहकयंत्रें (एजिनें) व मालानें भरलेले डबे रुळावरून जात असतां ते रूळ ज्या लांकडी किंवा लोखंडी आडवटांवर बसविलेले असतात ती आडवटें खालच्या सडकेंत दबतां उपयोगाची नाहींत. याखेरीज रुळांचें अंतरहि सतत एकसारखेंच राहिले पाहिजे; गाडी वेगानें जात असतांहि तें फैलावता उपयोगी नाहीं. आगगाड्या केव्हां व कशा सुरु झाल्या या माहितीसाठीं ''आगगाड्या'' लेख पहा.

रेल्वेची लाईन बांधतांना खर्च फार येत असल्यामुळें ती लाईन जितकी सरळ म्हणजे आंखूड करतां येईल तितकी चांगली व त्याचप्रमाणें अशा लाइनींत जितकें चढ व उतार कमी असतील तितका नेहमीं गाड्या ओढून नेण्यास लागणारा कोळशाचा खर्च कमी लागतो. एरवींच्या सडकेपेक्षांहि चढावर कोणतेंहि ओझें गुळगुळीत रुळावरून खेचून घेऊन जावयाचें म्हणजे कितीपट तरी जास्ती शक्तीचा म्हणजे अधिक वाफेचा म्हणजेच जास्ती कोळशांचा उपयोग करावा लागतो व म्हणून हा नेहमीं लागणारा खर्च कमी करण्यासाठीं चढ व उतार जितके कमी करवतील तितके करतात व असें करण्यास आणि रस्त्याची रेषा सरळ करण्यामुळें मातीच्या भरवाचा किंवा मातीच्या खोदकामाचा खर्च रेल्वेची सडक बांधतांना जास्ती झाला तरी पुरवतो. उदाहरणार्थ जास्ती चढ असल्यामुळें नेहमीं लागणारा कोळशाचा खर्च जर ५ पट वाढत असेल आणि सडकेला अतिशय थोडा चढ देण्यास जर मातीचा भराव व खोदाई करतांना दुप्पट खर्च येत असला तर नेहमीं लागणारा खर्च कमी करण्यासाठीं हा पहिल्यानें लागणारा जास्ती खर्चहि परवडतो.

च ढ व उ ता र.-साध्या सडकेवर, ती सारख्या लेव्हलमध्यें म्हणजे सपाट असली तर तिच्यावरून गाडी ओडावयास जितकी शक्ति लागते त्याच्या दुप्पट शक्ति त्याच सडकेला जर २५ फुटांत १ फूट इतका चढ असला तर लागते. रेल्वेच्या रुळावरून ते सपाट, म्हणजे गाडी एका लेव्हलमध्यें असल्यास त्यांच्यावरून गाडी ओढून नेण्यास जितकी शक्ति लागते त्याच्या दुप्पट शक्ति त्याच रेल्वेच्या रुळाला जर २२५ फुटांत १ फूट इतका चढ असला तर लागते. आणि रेल्वेच्या रुळांना २७५ फुटांत १ फूट यापेक्षां जास्ती चढ साधारण रीतीनें देत नाहींत. रेल्वे लाइनीवर जेथें जेथें घाट असतील तेथें तेथें वर सांगितल्यापेक्षां जास्ती चढ द्यावा लागतो. उदाहरणार्थ, बोरघाटांत पुण्याहून मुंबईस जातांना लागणार्या रस्त्यास ३७ फुटांस १ फूट इतकाहि चढ दिलेला आहे. परंतु अशा ठिकाणीं घाट चढण्याउतण्यापुरतीच जास्ती शक्तीची जड वाहक यंत्रे वापरतात. वर सांगितलेल्या बोरघाटांत अशा प्रकारचीं वेगळ्या जातीचीं वाहक यंत्रे (एंजिनें) कर्जत आणि लोणावळें यांच्या दरम्यान सुमारें १५ मैल अंतरासाठीं वापरतात. बाकीं इतर ठिकाणीं जेथें साधीं वाहक यंत्रे वापरावयाची असतील तेथें तेथें साधारत: दर मैल स. २० फुटांपेक्षां जास्ती चढ देत नाहींत. रेल्वेचे रूळ एका सपाटींत असले व डब्यांच्या कमानी वगैरे चांगल्या असल्या तर असे डबे ओढून नेण्यास गाडीचा वेग ताशी १० मैल इतका असला तर दर टनास सुमारें ६-६॥ पौंड इतकी शक्ति लागतें. तोच वेग ताशी ३० मैल इतका वाढविल्यास दर टनास १०-१२ पौंड व ताशी ६० मैल इतका वाढविल्यास दर टनास २१ पौंड इतकी शक्ति लागते. मालगाडीचें डबे खेंचून जाण्यास साधारणत: दर टनास ८ पासून १० पौंड इतकी शक्ति लागते. कारण अशा गाड्यांचा वेगहि साधारणत: कमी असतो.

वा ह क यं त्रे (एंजिनें).- वर सांगितलेंच आहे कीं, घाटांतून आगगाडी ओढून नेण्यासाठी वेगळ्या जातीची व जास्ती शक्तीची वाहक यंत्रें वापरतात. ३० फुटांपासून ४० फुटांत १ फूट इतक्या करड्या चढणीवरहि बर्याच मोठ्या आगगाडीचें ओझें ओढून नेण्याइतकीं शक्तिमान् वाहक यंत्रें आतां बनवितां येतात. त्यामुळें पूर्वीची २५० पासून ३०० फुटांत १ फूट ह्यापेक्षां जास्ती चढ साधारणत: न देण्याइतकी जी प्रवृत्ति होती तींत आतां बदल होऊन १०० फुटांत १ फूट इतकाहि चढ दिलेला आतां आढळतो. व अशा चढावरूनहि एरवींच्या जातीचीं यंत्रें वापरतात.

व ळ णें.- रेल्वेची सडक करतांना लाईनीचे रुळ सरळ रेषेंत बसवितात व जेथें दिशा बदलवयाची असेल त्या ठिकाणीं मिळेल तितक्या मोठ्या व्यासाच्या वर्तुलखंडानें या दोन सरळ रेषा जोडतात. ह्या वुर्तळखंडांची रेषा जमीनीवर खुंट्या मारून पक्की करावयाच्या वेळीं अशा खुंट्या १००।१०० फुटांवर मारतात. व अशी १०० फूट लांबीची ज्या जेव्हां ह्या वर्तुळाच्या मध्यबिंदूशीं १ अंशाचा कोन करील एवढी मोठी त्या वर्तुळाची त्रिज्या असते. तेव्हां अशी त्रिज्या ५७३० फुटांची म्हणजे एक मैल व ४५० फूट इतक्या लांबीची होते व अशा वर्तुळ खंडाला १ अंश वळणाचें वर्तुळ खंड असें म्हणतात. जेव्हां वर्तुळाची त्रिज्या त्याच्या निम्यानें असेल म्हणजे सुमारें २९०० फुटांची असेल तेव्हां अंश वर्तुळखंडाला २ अंश वळणाचें वर्तुळखंड म्हणतात. रेल्वेच्या लाईनीला अशीं वळणें जितकी कमी असतील तितकें चांगलें. कारण ज्याप्रमाणें सडकेला चढ असला म्हणे वाहक यंत्राची शक्ति कमी कमी होत जाते त्याचप्रमाणें वळणावरून गाडीं औढून घेऊन जातांना ही त्याची शक्ति कमी होत जाते. कारण लहान त्रिज्येचें जर वळण असेल तर वाहक यंत्रांची ओढण्याची जी दिशा असते त्या दिशेला गाडीच्या मागील डबे ज्या रेषेंत चालत असतात तिच्याशीं बराच मोठा कोन होतो. त्यामुळें रुळांच्या बाजूवर चाकांची जी पाळ असते तिचें जास्ती जास्ती घर्षण होत जातें व ह्यामुळें रुळ झिजतात, चाकांच्या पाळीहि झिजतात व वाहक यंत्राच्या शक्तिचाहि जास्ती व्यय होतो हे वाहक यंत्राच्या शक्तिच्या व्ययाचें प्रमाण पुढील गोष्टींवर अवलंबून असते. ज्या वर्तुळखंडावरून आगगाडी जावयाची असेल त्या वर्तुळाची त्रिज्या जितकी जितकी आंखूड असेल तितका तितका व्यय जास्ती होतो. त्रिज्येच्या मानानें रेल्वे लाइनीचा गाळा जितका जितका जास्ती असेल तितका व्यय जास्ती. अशा वळणावरून गाडी वेगानें जात असतां ती घसरून जाऊं नये म्हणून वळणाच्या बाहेरच्या बाजूचा रूळ आंतल्या बाजूच्या रुळापेक्षां नेहमी उंच ठेवतात. गाडीचा वेग आणि तिची लांबी ही जितकी जास्ती असेल तितका तितका शक्तीचा व्यय जास्ती होतो. त्याचप्रमाणें चाकांचा आकार, त्यांचे एकमेकांपासूनचें अंतर आणि त्यांच्या धांवेचा आकार ह्यामुळेंहि ह्या व्यासाचें प्रमाण कमी जास्ती होतें. हेंच वळण नागमोडी आकाराचें व लहान त्रिज्येचें असेल तर वाहक यंत्राच्या शक्तीचा व्यय फारच होतो. कारण कधीं कधीं वाहक यंत्र ज्या दिशेला जात असते त्याच्या काटकोनांतहि गाडीचें कांही काहीं डबे चालत असतात. असें आढळून आलें आहे कीं, वळणाची त्रिज्या जर सुमारें ६०० फुटांची असेल व गाडीचे वाहक यंत्र जर तासी २० मैल या वेगानें धांवत असेल तर त्याची शक्ति निम्म्यानें कमी होते. म्हणजे सरळ रेषेंत अशा वाहक यंत्राला ६० डबे ओढून नेतां येत असतील तर ६०० फूट त्रिज्येच्या म्हणजे १० अंश वळणाच्या वर्तुळखंडावरून त्याला फक्त ३० डबेच ओढून नेतां येतील म्हणून साधारणत: पाव मैलांपेक्षां कमी त्रिज्येचीं वळणें रेल्वे लाईनीवर घालीत नाहींत.

वा ह यं त्रा चा वे ग.- घाट चढून जात असतां चढाच्या योगानं वाहक यंत्राच्या शक्तीचा जास्ती व्यय होतच असतो. त्यांत फिरून वळणामुळें  होणार्या व्ययाची भर पडली म्हणजे केवढेंहि मोठ्या शक्तीचें वाहक यंत्र असलें तरीहि त्याचा वेग पुष्कळच कमी होतो. मुंबईहून पुण्यास येणार्या मेल गाडीचा वेग साधारणत: दर तासास ४० मैल इतका असतो. परंतु त्याच गाडीला बोरघाटांत जास्ती शक्तिमान् वाहक यंत्रें जोडली तरी कर्जतपासून लोणावळ्यापर्यंतच्या १५ मैल लांबीच्या घाटास सुमारें १ तास लागतो. ह्या घाटांत ३७ फुटांत १ फूट इतका कठिण चढ असल्यामुळें असें घडतें. सदर्न मराठा रेल्वेच्या दिवे घाटांत इतका चढ नाहीं. परंतु तेथील वळणें फार लहान त्रिज्येची असल्याकारणानें तोच परिणाम घडतो व ह्या घाटांतूनहि गाडी जातांना फार सावकाश जाते.

जास्ती वळण असतांनां चाकांचें व रुळांचें जें अतिशय घर्षण होतें तें कमी होण्यासाठीं अलीकडे मजबूत चौकटी तयार करून त्या लहान लहान ४ चाकांवर बसवितात व अशा दोन चौकटी डब्यांच्या पुढच्या व मागच्या तोंडाजवळ बसवितात व ह्या प्रत्येक चौकटींच्या मधोमध बसविलेल्या खुंटावर डब्याची सर्व साटी उजव्या किंवा डाव्या बाजूला सहज वळूं शकेल अशा रीतीनें बसविताते. डबा फार मोठा असला व त्याला एरवींच्या प्रमाणें चाकें बसविलेली असलीं म्हणजे वळणावरून जातांना डब्याच्या चाकांच्या दोन्हीहि जोड्या समांतर जाण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु रुळांच्या वळणामुळें दोन्हीं चाकांच्या घड्या ह्या वर्तुळखंडाच्या त्रिजेच्या रेषेमध्यें चालत असल्या तरच चाक व रुल यांमध्यें फारसें घर्षण होत नाहीं. नाहींतर वळण जसजसें जास्ती बांकदार असेल तसतसें जास्ती घर्षण होत जातें. वर सांगितलेल्या चौकटी बसविलेल्या असल्या म्हणजे गाडी दळणांवरून जातांना प्रत्येक चौकट स्वतंत्रप्रमाणें वळणाच्या बांकाच्या स्पर्शरेषेच्या दिशेनें जाऊं शकते. म्हणजे ह्या बोगीच्या धड्या त्रिज्येच्या रेषेमध्यें चालतात, व त्यामुळें चाकें व रूळ यांच्यामध्यें घर्षण फारच कमी होतें. याप्रमाणें त्या दोन चौकटींतला कोन वळणावरून जातांना नेहमीं बदलत असतो. तरी ह्यांच्यावर बसविलेल्या डब्याचा साटीचा पृष्ठवंश ह्या दोन चौकटीच्या मध्यबिंदूंनां जोडणार्या सरळ रेषेंतच राहतो. व त्यामुळें डब्यांच्या साटीच्या व चाकांच्या घर्षणामुळें होणारें नुकसान टळतें. अशा प्रकारच्या चौकटी वाहकयंत्राच्या पुढच्या तोंडाखाली सुद्धा बसविलेल्या असतात, व जे डबे जास्ती लांबीचें असतात (व निदान माणसांच्या गाड्यांचें डबे तरी असेच करण्याचा प्रघात आहे) अशा प्रत्येक डब्याच्या पुढच्या व मागच्या तोंडाखाली अशा चौकटी बसविलेले डबे उपयोगांत असले म्हणजे वळणाची त्रिज्या जरी २५० फुटांपर्यंतहि कमी असली तरी सुद्धां फारशी अडचण पडत नाहीं व इतके केलेल्या ३। फूट गाळ्याच्या ज्या रेल्वे लाईनी आहेत त्यावर ३२५ फूट त्रिज्येचीं सुद्धा वळणें आहेत. बोरघाटांत तर एके ठिकाणीं ७५ फुटास १ फूट इतका चढ असतांना देखील १००० फूट त्रिज्येचें वळण दिलेलें आहे.

रु ळां चा गा ळा.- रेल्वेचा गाळा म्हणजे दोन रुळांच्या माथ्यांच्या आंतल्या धारामधील अंतर होय, आणि हें अंतर किंवा गाळा जसजसें वाढेल तसतसें डब्यांची रुंदीहि वाढते व रुंदी वाढली म्हणजे वजनहि वाढतें. इंग्लंडांत लहान गाळ्यांच्या रेल्वे बहुतकरून ४ फूट ८॥ इंच गाळ्याच्या असतात. व मोठ्या गाळ्याच्या कांहीं लाईनी तर ७ फूट गाळ्याच्याहि आहेत. आयर्लंडांत ५। फूट गाळ्याच्या व हिंदुस्थानांत ५॥ फूट गाळ्याच्या व याच्यापेक्षांत कमी महत्त्वाच्या रेल्वे लाइनी३। फूट गाळ्याच्या आहेत. मुख्य मुख्य लाइनी जरी याप्रमाणे मोठ्या गाळ्याच्या आहेत तरी लहान लहान शाखा ३। फुटाच्या व कांहीं कांहीं तर २॥ फुटाच्याहि आहेत. उदाहरणार्थ गायकवाडसरकारच्या डभोई रेल्वे वगैरे शाखा २॥ फूट गाळ्याच्या आहेत अशा लहान शाखा कधीं कधीं २ फूट गाळ्याच्याहि करतात. जसजसा व्यापार वाढत जातो व माणसांची व मालाची नेआण वाढते तसतसा आगगाड्यांचा वेगहि वाढवावा लागतो. व गाळा जितका मोठा असेल तितका वेगहि वाढवितां येतो. लहान गाळ्यावर वळणें वगैरे फार असतांना वेग फार वाढविला तर गाडी उलथून पडण्याचा संभव असतो. गाळा जितका जितका वाढवावा तितकें डब्याचें वजनहि वाढत जातें व जसजसा वेग वाढवावा तसतशीं वाहकयंत्रेहि जास्ती शक्तिमान् म्हणजे अर्थात जास्ती वजनाची वापरावीं लागतात व असें झालें म्हणजे रुळांची जाडी किंवा मजबुती हीं वाढवावीं लागतात. रेल्वेलाईन जर २॥ फूट गाळ्यांची असेल व तीवरून जाणार्या गाड्यांचे डबे व वाहक यंत्रें हलकीं व कमी वेगानें जाणारी असतील तर अशा रेल्वेचे रुळ जर फुटास १० पौड किंवा दर यार्डास ३० पौंड इतकें हलके असले तरी सुद्धा चालतात. पण ५॥ फूट गाळ्याची लाईन असेल तर तिला दर फुटास २२ पासून २८ पौंड वजन भरणारे जाडी रुळ वापरावें लागतात व ज्या ठिकाणी फार वजनाची वाहक यंत्रें मोठ्या वेगानें धांवत असतील अशा मुख्य मुख्य लाईनींनां जास्ती मजबूत म्हणजे जास्ती वजनाचे पोलादी रुळ वापरतात.

रेल्वे लाईन लहान गाळ्याची असली म्हणजे ती तयार करावयास खर्च कमी लागतो. कारण वरून जाणार्या गाड्यानें डबे लहान व हलक्या वजनाचे असल्यामुळें रुळ हलके घातलें म्हणजे काम भागतें. व ह्याच कारणामुळें रुळाखालचे लांकडी किंवा लोखंडी स्लीपर म्हणजे सलीपाट नांवांची अडवटेंहि हलकीं पुरतात व डब्यांचेहि वजन गाळा लहान असल्यामुळें कमी करता येतें व त्यामुळें मोठ्या गाळ्याचे लोखंडी पूल बांधण्यासहि खर्च कमी लागतो. खेरीज मोहतोड व इतर दुरुस्तीचाहि खर्च कमी येतो.

रेल्वे लाईन तयार करावयाच्या वेळीं ज्याप्रमाणें रस्त्याची मध्यरेषा १०० फुटांवर जमिनींत खुंट्या मारून आंखतात व जेथें जेथें वळणें असतील त्या त्या ठिकाणीं ५०-५० फुटावर खुंट्या मारून आंखून ठेवतात. त्याचप्रमाणें ह्या खुंट्यांच्या निशाण्या बुजून जाऊं नयेत म्हणून विटांचे लहान लहान खुंट बांधून त्यांच्या मधोमध खुंट्या बसवितात व बरोबर मध्यरेषा कोठून जाते तें दाखविण्यासाठीं अशा खुंट्यांच्या माथ्यावर बारीक बारीक खिळे मारतात. व हे खिळ्यांचे माथे जोडणारी जी सरळ रेषा तीच रेल्वे लाइनीची मध्यरेषा होय. असे खुंट जमीनीच्या पृष्ठभागावर ४-६ इंचच असल्याकारणानें सांपडावयास अडचण पडूं नये म्हणून सुमारें दर पाव मैलावरचा खुंट मोठा बांधतात आणि अशा खुंटाचें अंतर भोंवतालच्या ३ किंवा ४ विवक्षित खुणांपासून किती अंतरावर आहे हें लिहून ठेवतात. असें केलें म्हणजे वाटेल त्यावेळी त्या खुंटांची रेषा ते गवतांत दबून गेले असले किंवा कोणी काढून टाकले असले तरी नक्की करतां येते. अशी खबरदारी प्रत्येक सरळ रेषेच्या दोन्हीं टोंकाजवळ बसवावयाच्या मोठ्या खुंटाविषयी तर घेतलीच पाहिजे. असे खुंट सांपडले म्हणजे मधली रेषा सरळ असल्याकारणानें तिच्या वर बसविलेल्या खुणा सहज सांपडतात. अशी मध्यरेषा आंखल्यावर जितक्या रुंदीची खोदाई किंवा भराव करावयाचा असेल त्याच्या दोन्ही बाजूंच्या रेषा आंखतात. व त्यानंतर खोदाईचा माथा किंवा भरावाचा तळ जमीनीला कोठें जाऊन मिळेल याचे बिंदू नक्की करून त्यांच्यावर खुंट्या मारतात.

उ ता र.- रेल्वे लाईनीनां फारसा उतार किंवा चढ देतां येत नाहीं, यामुळें खोदाणकाम साध्या सडकेच्या कामापेक्षां पुष्कळ खोलीचें व भरावकाम पुष्कळ उंचीचें करावें लागतें. व असें मातीकाम पाणी सांठण्याच्या योगानें घसरून पडूं नये म्हणून व पावसाचें पाणी कोठेंहि सांठून न राहील अशी तजवीज करावी लागतें. जेथें जेथें खोदकाम असेल तेथें वरच्या बाजूलाच एक गटार खोदून तें दगडानें बांधलेल्या मोरींत सोडून देतात आणि लायनीच्या दोन्ही बाजूलाहि पाणी सांठून राहूं नये म्हणून दोन्ही बाजूच्या तळाजवळ गटारें खोदून ज्या बाजूला उतार असेल तिकडेच पाणी काढून देतात. याखेरीज जेथें माती किंवा मुरुम भिजल्याच्या योगानें तो ढांसळून पडण्याचा संभव असेल अशा ठिकाणी सुक्या दगडाच्या अथवा पक्क्या बांधकामाच्या आधारभित्तीहि बांधतात. भरावाच्या तळाजवळ पाणीं साठू नये म्हणून ज्या बाजूला उतार असेल त्या बाजूला गटार करून पाणी काढून देतात. भरावकाम करतांना तो रेतीचा किंवा गोट्याच्या करणें असेल तर दर एक फूट उंचीस १ इंच उंची जास्ती ठेवतात. म्हणजे भरावाचीं उंची दबून तयार झाल्यावर १२ फूट व्हावी अशी योजना असेल तर भराव करतांना ती १३ फूट ठेवावी लागते. भराव मातीचा असल्यास १२ फुटांच्या ऐवजीं १३ फूट व रेताळ मातीचा असल्यास १३॥ फूट करावा लागतो. अशा रीतीनें खोदकाम करावयाचें किंवा भरावकाम करावयाचें तें ज्या लेव्हलवर रूळ बसवावयाचें असतील त्या लेव्हलच्या खाली भरावकामाचा माथा किंवा खोदकामाचा तळ ठेवतात. व अशा रीतीनें पुर्या केलेल्या सडकेच्या मध्यापेक्षां दोन्ही बाजू थोड्या नीच ठेवतात. हेतु हा कीं, पावसाचें जें पाणी पडेल तें त्यांत न जिरतां दोन्ही बाजूला निघून जावें. अशा तयार केलेल्या सडकेवर खडीचा थर पसरतात. ज्या ठिकाणी फोडलेल्या दगडाची खडी मिळत नसेल त्या ठिकाणीं अशा कामाला गोटेहि वापरतात. हा खडीचा थर म्हणजे वर घालावयाच्या सालेपाटचा (स्लीपर्सचा) पाया होय. ह्याकरतां ही खडी जाड फोडलेली असते. ह्या थरामुळें कठिण व एका लेव्हलमध्यें असलेला पाया त्यावर ठेवलेल्या सलेपाटांनां मिळतो, व खडीचे वेगवेगळे तुकडे असल्यानें त्यावर ठेवलेल्या सलेपाटवरून गाड्या जात असतां धक्क्यामुळें सरकून जात नाहीं. व ह्या खडीच्या थरांत वेगवेगळ्या खड्यांमध्यें ज्या चिरा किंवा सपाटी असतात. त्यांतून पावसाचें पाणी दोन्ही बाजूंला निघून जातें आणि खालच्या भरावांतील भुरून सैल होत नाहीं. व हें खडीचें झांकण असल्यामुळें त्यास दुसरी कोणत्याहि प्रकारची इजा होऊं शकत नाहीं. याखेरीज ह्या खडीच्या थराच्या योगानें रुळावरून सलेपाटावर येणारा आगगाडीचा भार भरावाच्या विस्तृत पृष्ठभागावर पसरला जातो. व याखेरीज त्यास एक प्रकारचा लवचीकपणाहि येतो. ज्या ठिकाणी खालचा भराव भुसभुशीत मातीचा केलेला असतो. त्याठिकाणी गाडीच्या भारानें खडी दबून मातींत घुसूं नये म्हणून मुद्दाम जाड फोडलेली खडी भरावावर पसरतात. आणि त्यावर त्याच्यापेक्षां बारीक फोडलेली खडी पसरून अशा खडींत सलेपाट बसवितात. आणि तशाच प्रकारची बारीक खडी वर टाकून तिच्यांत सलेपा गढून जातील इतका जाड थर ठोकून बसवितात. ही सर्व खडी मुरमासारखी उन्हानें किंवा पावसानें कळपे निघून पीठ होऊन जाण्यासारखी नसावी. ज्या ठिकाणी कोणत्याहि प्रकारचा दगड मिळत नाहीं त्या ठिकाणीं चुनखडी किंवा खंगरी विटांचें तुकडे वापरतात. जेथें रहदारी जास्ती असते अशा मोठ्या गाळ्याच्या भारी रेल्वेलाईनींवर सलेपाटांच्या खालीं १। पासून १॥ फूट जाडीचाहि खडीचा थर घालतात. परंतु लहान गाळ्याच्या हलक्या लाईनीवर हा थर ८ पासून ९ इंच जाडीचा घातला तरी देखील चालते. ३। फूट गाळ्याच्या ज्या लाइनी जेथें बांधल्या आहेत. त्यांवर एकेरी लाइनीला सलेपाटाच्या खालील खडीचा थर निदान ६ इंच जाडीचा व माथ्याजवळ जास्तीतजास्ती रुंदी ७ फूट व तळाजवळ १० फूट केलेली आहे. ही सलेपाटच्या खालीं द्यावयाची खडी मोठ्या गाळ्याच्या लाइनीला दर मैलाला सुमारें १॥ लाख घनफूट इतकी घालावी लागते. ५॥ फूट गाळ्याच्या मोठ्या लाइनीला रुळांच्या दोन्ही बाजूला निदान ४।४ फूटपर्यंत खडी पसरलेली असते. म्हणजे एकेरी लाइनीला सुमारें १४ फूट रुंदीची खडी पसरावी लागते. आणि दुहेरी लाइनीला सुमारें २६ फूट रुंदी करावी लागते, कारण दोन लाइनींच्यामध्यें निदान ६ फूट तरी अंतर ठेवतात. ही वर जी खडीची माथ्याजवळील रुंदी सांगितली आहे. तिच्यापेक्षां निदान ५ फूट तरी जास्ती भरावाच्या माथ्याची रुंदी ठेवतात म्हणजे एकेरी लाईन असेल तर भरावाची माथ्याजवळील रुंदी १९ फूट व लाईन दुहेरी असेल तर ३१ फूट ठेवता. ३। फूट गाळ्याच्या सरकारी रेल्वेवर एकेरी लाईन असते तेव्हां भरावाची माथ्याजवळील रुंदी सुमारें १२ फूट व खोदकामांत तळाची रुंदी १४ फूट ठेवलेली असते.

र स्त्या चें खो द का म.- रेल्वेच्या रस्त्यांनां जास्ती चढ किंवा उतार देतां येत नाही. यामुळें खडकांतूनहि खोदकाम कधीं कधीं फार खोलीचें करावे लागतें. व जसजशी जास्ती खोली वाढेल तसतसा अशा खोदकामाचा खर्चहि जास्त वाढतो. या कारणामुळें कधी कधीं अशी स्थिति येते कीं इतक्या जास्ती खोलीच्या खडकांतून खोदकाम करण्यापेक्षां बोगदे पाडून त्यांतून गाडीचा रस्ता नेणें जास्ती स्वस्त पडतें. साधारणरीतीनें ६० फूट खोलीच्या खडकांतील खोदकाम व त्या खडकांतून बोगदा पाडून रस्ता करण्याचें काम या दोहोंनाहि सारखाच खर्च येतो. यापेक्षां खोली कमी असेल तर खोदकाम स्वस्त पडतें व जास्तीं असेल तर बोगदा पाडणें स्वस्त पडतें.

बो ग दा. - बोगदा पाडावयाचा असल्यास तो पाडतांना त्यांतून जाणारी लाईन सरळ येईल अशी सडकेची मांडणी करावी. म्हणजे गाडी आंत जात असतां ती चालविणाराला लाइनीवर कांहीं अडचण आहे कीं काय हें स्पष्ट दिसूं शकते. बोगदा कठिण व मजबूत अशा खडकांतून पाडलेला असेल तर त्याला आंतल्यां बाजूनें नवीन भिंती किंवा कमानी करण्याची जरुरी पडत नाहीं. कारण अशा खडकांतून दगड ढांसळून पडण्याची भीति नसते. साधारण रीतीनें बोगद्याची आंतील बाजू लंबवर्तुळाकृति किंवा घोड्याच्या नालाच्या आकाराची करतात. ज्या ठिकाणी खडक कममजबूत असेल त्या ठिकाणीं आंतल्या बाजूनें दगडाचें किंवा सिमेंटचें दर्शनी बांधकाम करून घेतात. असें दोन्ही बाजूंचें बांधकाम व वरील कमान मिळून दिसण्यांत अर्धलंबवर्तुळाकृति दिसते. बोगद्यांच्या अशा बांधकामाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीच्या मधील अंतर एकेरी लाईन मोठ्या गाळ्याची असेल तर १५-१६ फूट आणि लाईन दुहेरी असेल तर २४ पासून ३० फूट आणि बोगद्याच्या आंतील अर्धलंबवर्तुळाच्या उच्चतम बिंदूची उंची लाइन एकेरी असेल तर २० फूट व दुहेरी असेल तर २४ फूट ठेवतात. हे बोगदे मोठ्या लांबीचे असल्यास ते करीत असतांना आंत काम करणार्या माणसांनां स्वच्छ हवा मिळावी, व श्वासोच्छ्वासानें दूषित हवा निघून जावी म्हणून डोंगराच्या वरील पृष्ठभागापासून उभे नळ कुव्यासारखे ६ पासून ९ फूट व्यासाचे आणि एकमेकांपासून २०० पासून ९०० फूट अंतरावर पाडतात. हे नळ काम चालत असतांना ज्याप्रमाणें उपयोगी पडतात, त्याचप्रमाणें काम तयार झाल्यावरहि नेहमीं हवा व उजेड आंत येण्याला त्यांचा फार उपयोगी होतो. जी. आय्. पी. रेल्वे लाइनीवर १५ मैल लांबीच्या बोरघाटांत २५ बोगदे पाडलेले आहेत. व त्यांची सर्वांची मिळून एकंदर लांबी सुमारें २ मैल आहे. व या दोन मैलांपैकीं सुमारें पाव मैल लांबीच्या बोगद्यांनां आंतील बाजूस दगडाचें बांधकाम केलेलें आहे. ईस्ट इंडियन रेल्वे लाइनीवर फक्त एकच बोगदा ९०० फूट लांबीचा पाडलेला आहे. आणि त्यांत खडक मजबूत नसल्याकारणानें आंतील बाजूनें विटांचें बांधकाम करून घेतलेलें आहे व रुळापासून विटांच्या कमानीच्या आंतल्या बाजूपर्यंतची त्याची उंची २३ फूट आणि दोन्ही बाजूंच्या भिंतीमधील अंतर २६ फूट ठेवेलें आहे. बोगद्याचीं लांबी ३ मैलांपेक्षं कमी असेल तर तो तयार झाल्यावर कृत्रिम वाताकर्षक व वातोद्गमक यंत्रें बसविण्याची जरुरी पडत नाहीं. कारण जेव्हां जेव्हां गाडी वेगानें बोगद्यांतून जाते तेव्हां तेव्हां ती बोगद्यांतील हवा जोरानें पुढें रेटीत जाते व त्यामुळें नवी शुद्ध हवा गाडीच्या मागोमाग बोगद्याच्या तोंडांतूनच धांवत येते. व अशा रीतीनें दर एक गाडी आंतून जाण्याच्या योगानें आतील हवा बदलत राहतें.

ले व्ह ल क्रा सिं ग.- जेव्हां एखादी रेल्वे लाइन करावयाची असते आणि ती नेतांना नदी, किंवा कालवा अथवा सडकेचा रस्ता, किंवा दुसरी रेल्वे लाईन आडवी येते तेव्हां नदी किंवा कालवा यांवरूनच पूल बांधून रेल्वेची लाईन नेतात. परंतु सडकेचा रस्ता किंवा जुनी रेल्वे लाइन व नवी लाईन न्यावयाची रेल्वे लाईन यांच्या लेव्हलमध्यें जेव्हां फारशी तफावत नसेल तेव्हां नव्या रेल्वे लाइनीचा ढाळ किंवा चढ थोडा फार कमी जास्ती करून दोन्ही रेल्वे लाइनीचे रूळ एका लेव्हलमध्यें येतील अशी व्यवस्था करतात. तसेंच सडकेचा रस्ता ओलांडतांनाहि दोहोंच्या लेव्हलमध्यें जो थोडा फरक असेल तितका फरक रस्त्याच्या सडकेचा ढाळ किंवा चढ थोडा कमी जास्ती करून दोन्ही एका सेव्हलमध्यें करून घेतात. यास समभूम्योल्लंघन (लेव्हल क्रॉसिंग) असें म्हणतात. अशा जागीं सडकेचा रस्ता वाटेल तेव्हां बंद करण्यासाठीं फाटकें, किंवा झापे केलेले असतात. व हे झापे अगोदर थोडा वेळ बंद करण्यासाठीं व गावी गेल्याबरोबर उघडण्यासाठीं झापेवाले नोकर ठेविलेला असतो. हें काम त्यानें बरोबर केलें तर अशा ठिकाणीं होणारें अपघात टळतात. म्हणजे ज्या शहरांतून आगगाड्यांची रहदारी सारखी चालू असते त्याचप्रमाणें सडकांवरूनहि माणसांची व गाड्यांची रहदारी फार असते अशा सडका व रेल्वेलाइन हीं दोन्ही एका लेव्हलमध्यें न ठेवणें चांगलें. जेथें रेल्वे लाईन जमिनींत खोदकाम करून नेलेली असेल अशा वेळीं फार थोड्या खर्चानें पूल बांधून त्यावरून सडक नेतां येते. अशा प्रकारच्या पुलांनां 'उपरिष्ठालू' म्हणतात. व पाच प्रकारचे पूल बहुतेक असतात. जेव्हां रेल्वे लाइन भराव करून त्यावरून नेलेली असते तेव्हां अशा रेल्वे लाइनीच्या खालून सडक नेतात व अशा पुलांनां 'अध:स्थालू' म्हणावें. शहरापासून दूर अंतरावरा समभूम्योल्लंघनें घालण्यास फारशी हरकत नाहीं; कारण अशा रस्त्यांवर रहदारीहि फार नसते त्यामुळें रेल्वेचे झापे बंद असल्याकारणानें गाड्यांची किंवा जनावरांचीं फार खोटी होत नाहीं. जेव्हां रेल्वेलाईन आणि तिला ओलांडून जाणारा रस्ता हे साधारण एक लेव्हलमध्येंच असतात. (आणि अशीं ठिकाणें प्रत्येक लाइनीवर पुष्कळच असतात) तेव्हां मुद्दाम पूल बांधणें आणि त्यावरून रस्ता नेणें हें फार खर्चाचें असतें. सबब रस्त्यानें जाणार्या येणार्या लोकांची थोडीफार खोटी झाली तरी समभूम्योल्लंघनेंच करण्याचा साधारण प्रघात आहे. मात्र अशा ठिकाणीं झापे इतक्या मोठ्या रुंदीचे करतात कीं, ते गाडी यावयाच्या वेळेस बंद केले असतां दोन्ही बाजूंच्या सडका बंद होतात. व गाडी गेल्यावर ते उघडलें म्हणजे रेल्वेलाईनीच्या दोन्ही बाजू आपल्या आपणच बंद होतात. झापे असे असले म्हणजे रस्त्यावरून जाणार्या जनावरांनां कोणत्याहि बाजूनें रेल्वे लाईनीवर जातां येत नाहीं. ज्याठिकाणीं 'उपरिष्ठालू' म्हणजे रेल्वे लाइनीवरून जाणारें पूल बांधावे लागतात त्याठिकाणीं लाइनीच्या प्रत्येक रुळापासून निदान पुलाचा खालचा भाग १५ फूट तरी उंचीवर ठेवतात, व पुलाखालील रेल्वेच्या रस्त्याची रूदी निदान फूटभर तरी ठेवतात. 'अध:स्थालू' म्हणजे रेल्वे लाइनीच्या खालून जाणार्या रस्त्यासाठी  जो पूल बांधतात, त्या पुलाची सडकेच्या पृष्ठभागापासून सुमारें १२ फूट तरी उंची ठेवतात म्हणजे खालून गवतानें उंच भरलेले गाडे किंवा हत्ती हे सहज जाऊं शकतात. अशा पुलाची रुंदी कमींतकमी १६ फूट तरी असलीच पाहिजे. तेथें रेल्वेलाइनीच्यामुळें रस्त्याचा चढ किंवा उतार कमी किंवा जास्ती करून रस्ता रेल्वेलाइनीवरून किंवा रेल्वेलाइनीखालून किंवा समभूमीवरून नेण्याकरिता रस्त्याचा ढाळ बदलतात तेव्हां तो ढाळ ३० फुटांत १ फूट यापेक्षां जास्ती करीत नाहींत. नाहीं तर जाणार्या येणार्या गाड्यांनां रेल्वेलाईन ओलांडून जातांना फार त्रास पडतो.

कुं प णें.- रेल्वे लाइनीवरून जाण्यार्या येणार्या गाड्यांनां कोणत्याहि वेळीं कोणत्याहि प्रकारच्या अडथळा होऊं नये, म्हणून माणसें किंवा जनावरें यांनीं रेल्वे लाईन कोणत्याहि ठिकाणीं ओलांडून जाऊं नये म्हणून बहुतेक सर्व लाईनींनां दोन्ही बाजूंनी तारेचीं कुंपणें केलेलीं असतात. कांहीं ठिकाणीं रेल्वे लाइनीच्या दोन्हीं बाजूंना काटेरी झाडाचीहि कुंपणें केलेली आढळतात. व घाटांतून जातांना म्हणजे ज्या ठिकाणचा रस्ता खडक फोडून केलेला असतो किंवा दगड स्वस्त किंवा मुबलक मिळतात. अशा ठिकाणीं सुख्या दगडांच्या भिंतीहि बांधलेल्या असतात. लांकडी खांब व आडवटें जोडून केलेली कुंपणें, लांकडें पावसानें कुजतात यामुळें लवकर निरुपयोगी होतात म्हणून तशा जातींचीं कुंपणें आपल्या इकडे करीत नाहींत. तारेचीं कुंपणें करतांना लांकडी खांब रोवून किंवा लोखंडी T किंवा L आकाराच्या कांबी खांबासारख्या जमिनींत उभ्या रोवून व त्यांनां भोंके पाडून त्यांतून  ४ किंवा ५ तारांच्या ओळी ओवून कुंपण तयार करतात. या तारा बारीक बारीक तारा पिळून त्यांचा दोर बनवून तयार करतात, व अशा दोराचा व्यास पाव इंचापेक्षां थोडासा कमीच असतो. या तारा ओवल्यानंतर त्यांनां पडलेला झोळ काढून टाकण्यासाठी कांहीं कांहीं अंतरावर जाडे खांब बसविलेले असतात व त्यांनां तीर देऊन ते मजबूत केलेले असतात. अशा खांबांतून बोल्ट घालून कोणत्याहि दोन खांबांमधील बोल्ट घालून कोणत्याहि दोन खांबांमधील तारा खेंचून सरळ करतां येतात. व त्या सरळ झाल्या म्हणजे बोल्ट घालून कोणत्याहि दोन खांबांमधील तारा खेंचून सरळ करतां येतात. व त्या सरळ झाल्या म्हणजे बोल्टांच्या चाक्या पिळून घट्ट करतात.

रूळ.-आगगाड्या फार वेगानें जात असल्याकारणानें त्यांचे रूळ दोन चाकामधील जितका गाळा नक्की केलेला असेल तितक्या बरोबर अंतरावर ओळीनें बसवावें लागतात. हें अंतर कमी जास्ती असून चालत नाहीं आणि रेल्वे लाईन सरळ असेल तर दोन्ही रूळ एक लेव्हलमध्यें असावे लागतात. आणि वांक असेल त्या ठिकाणीं आंतल्या रुळापेक्षां बाहेरील रूळ जास्ती उंच ठेवतात. हे रुळ त्यांच्या खालीं असणार्या सलेपाटावर इतके मजबूत बसवावे लागतात कीं, गाडी कितीहि वेगानें जात असली तरी दोन रुळांमधील अंतर जास्ती वाढतां कामा नये. खेरीज सलेपाट बसवावयाचे ते रुळांचे माथे एका सरळ रेषेंत राहतील (ही सरळ रेषा म्हणजे रेल्वेलाइनीला द्यावयाचा चढ किंवा उतार यांची रेषा होय) अशा रीतीनें बसवावें लागतात खेरीज ते असे बसविले पाहिजेत कीं, त्यांची नेहमीं वेतसवृत्ति कायम राहील. आणि त्यांचा माथा जितका जास्ती गुळगुळीत होईल तितका बरा, आणि हे रूळ इतक्या मजबुतीचे  असले पाहिजेत कीं, दोन सलेपाटांच्यामधील जे अंतर असते तेवढ्या गाळ्यामध्यें वरील जाणारी वाहकयंत्रे कितीहि जड व कितीहि वेगानें जात असली तरी त्यांच्या भारानें रुळ दबतां उपयोगी नाहीं. व कोणत्याहि रूळ कोणत्याहि कारणानें काढून टाकण्याची किंवा बदलण्याची जरुरी भासल्यास तो फार श्रम न लागतां काढून टाकतां येण्यासारखा बसविला पाहिजे.

स ले पा ट.- रेल्वेलाइनांचे रुळ बसवितांना खडीमध्यें सलेपाट (स्लीपर) लांकडी किंवा लोखंडी बसवून त्यांवर २० पासून २४ पौंड वजनाची बिडाची पिढी(चेअर्स) बसवितात. आणि ह्या पिढयांवर रूळ ठेवून त्यांचें एकमेकांपासून अंतर कायम ठेवण्यासाठी रुळाच्या बाहेरच्या बाजूनें बाभळीच्या लांकडाच्या किंवा लोखंडी पट्टयांच्या वळवून बनविलेल्या पांचरी ठोकतात. ज्या ठिकाणी चांगले लांकूड मिळत असेल व तें वाळवी लागून कममजबूत होण्याची भीति नसेल अशा ठिकाणी लांकडी सलेपाट वापरतात. हे सलेपाट ५ पासून ७ इंच जाडीचे व ९ पासून १० इंच रुंदीचे आणि सुमारें १० फूट लांबीचे (रुळांचा गाळा ५॥ फुटांचा असेल तर) असतात. जेव्हां गाळा लहान म्हणजे ३। फुटांचा असतो अशा ठिकाणी हे सलेपाट सुमारें ६ फूट लांब, ७ पासून ८ इंच रुंद व ४ इंच जाडीचे आणि दर मैलास सुमारें २००० नग लागतात. हे सलेपाट २ पासून ४ फूट अंतरावर बसविलेले असतात. ज्या ठिकाणीं लाइनीचा गाळा कमी असतो व वाहक यंत्रें हलकीं असतात अशा ठिकाणीं ४ फूट अंतर ठेवलें तरी चालतें. पण गाळा जसजसा मोठा असून व वाहक यंत्रांचें वजन जास्ती वाढत जातें तसतसें रुळहि जास्ती मजबुतीचे आणि सलेपाट जवळजवळ घालावे लागतात. हे सलेपाट खडीमध्यें दबून जाऊन त्यावरहि थोडी खडी येईल अशी त्यांच्याखाली व बाजूस खडी घालतात. ह्या कामांसाठी वापरावयाचें लांकूड घट्ट , जड चिवट आणि ऊन व पाऊस यांनीं न कुजणारे किंवा न फाटणारें असें असावें लागतें. आपल्या इकडे साग, साल किंवा देवदार लांकडाचे सलेपाट केलेले असतात. ह्या सलेपाटांनां उघई किंवा वाळवी बहुतकरून लागत नाहीं. कारण गाड्या वरचेवर जात असल्यामुळें हे सलेपाट दर वेळेला गाडी जातांना हादरतात व त्यामुळें वाळवी लागत नसावी. सिंधमध्यें देवदाराचे सलेपाट वापरलेले आहेत आणि ते मोरचुदाच्या पाण्यांत बुचकळून काढल्यामुळें तें पुष्कळ दिवस टिकतात. मोठ्या गाळ्याच्या रेल्वेला बिडाची पिढी २० पासून १२ पौंड वजनाची बसवून त्यावर रुळ बसवितात. हे रूळ दर फुटांत निदान २२ पौंड वजनांत भरणारे असतात. दोन रुळांचा सांधा करतांना दोन्ही बाजूला २ फूट लांबीची जाड लोखंडी पट्टया बसवून यांतून १ इंच व्यासाचे ४ बोल्ट बसवितात, आणि सलेपाट ३।३ फुटांवर बसवून ज्या ठिकाणी रुळाचा सांधा येईल त्या ठिकाणीं ते २ फूट अंतरावर बसवितात. रेल्वे लाइनीचे रुळ २० किंवा २४ फूट लांबीचे असतात. व हे बहुतकरून दुहेरी माथ्याचे किंवा डमरू सारख्या छेदाचे असतात, व असें करण्याचें कारण रुळाचा वरचा भाग झिजून गेल्यावर वरचा भाग खाली व खालचा भाग वर करतां येतो. हे रूळ फार चांगल्या चिवट लोखंडाचे असावे लागतात व ते आतां बहुतकरून पोलादाचेच करतात. त्यांचा वरील भाग चाकाच्या घर्षणामुळे झिजून जाण्याचा व अतिशय वजन आल्या कारणानें त्यांच्या चिरफळ्या निघून जाण्याचा संभव असतो. जेव्हां गाड्यांची रहदारी फार नसेल तेव्हां दर फुटाला २२ पौंड वजनांत भरणारे रूळ ५॥ फूट गाळ्याच्या रेल्वेनां वापरतात, आणि रहदारी फार असेल तर जास्ती जाडीचे म्हणजे दर फुटास २८ पौंड वजन भरणारे रूळ वापरतात. रूल बसवितांना ते एकमेकांला ठेपून बसवीत नाहींत कारण उन्हानें प्रत्येक रुळाची लांबी वाढते व थंडी पडली म्हणजे ती कमी होते आणि उन्हाळ्यांतील प्रखत उष्णता आणि फार कडाक्याची थंडी यांच्यामध्यें साधारण रीतीनें ८० अंशांचा फरक असतो. आणि इतका फरक पडला असतां २० फूट लांबीच्या रुळाची लांबी सुमारें १/८ इंचानें वाढते म्हणून दोन रुळांमध्यें थंडीच्या दिवसांत येवढे अंतर राहील अशा बेतानें रुळ बसवितात. रुळांचे एकमेकांपासून अंतर कायम ठेवण्याची आवश्यकता असल्यामुळे समभूम्योल्लंघनांत दुहेरी रूळ घालण्याचा रिवाज आहे. यांत मुद्दा असा आहे कीं, मोठ्या भाराच्या बैलगाड्या किंवा ओझ्याच्या गाड्यांच्या चाकांचे अघातामुळें रेल्वे लाईनीचे रूळ सरकून गाळ्यामध्यें जो फरक होण्याचा संभव असतो तसा होऊं नये. आणि लोखंडी धावांच्या धक्क्यामुळें जो कांहीं दुष्परिणाम होतो तो सर्व रूळ तेवढ्यापुरते दुहेरी व्हावेत म्हणून जे रुळाचे तुकडे घातलेले असतात त्यांच्यावरच व्हावा. धोपट जाणार्या रेल्वेलाइनीच्या रुळांना फारसा धक्का लागू नये.

व ळ णें: - रेल्वेलाइनींत जेव्हां वळणें असतात तेव्हा वळणाच्या बाहेरील बाजूचा रुळ आतल्या बाजूच्या रुळापेक्षा उंच ठेवतात.याचें कारण असें आहे कीं, वळणावरून आगगाडी वेगानें जात असतां तिच्यामागें जो मध्यभागी आवेश येतो त्यामुळें ती रुळावरून उसळून जाण्याचा संभव असतो, व असें होऊ नये म्हणून आगगाडीचा वेग जितका जितका जास्ती तितका तितका आंतील रुळापेक्षां बाहेरील रूळ जास्ती उंच ठेवावा लागतो. उदाहरणार्थ, जर आगगाडीचा वेग ताशी ४० मैल धरला तर रेल्वे लाईन ५॥ फूट गाळ्याची असतांना आणि वळणाची त्रिज्या १००० वार (यार्ड) म्हणजे ३००० फूट असली म्हणजे बाहेरचा रूळ आंतल्या रुळापेक्षां सुमारें २ इंच उंच ठेवतात, आणि स्टेशनाच्या जवळ आगगाड्यांचा वेग नेहमीं कमी करावा लागत असल्या कारणानें वळणें लहान त्रिज्येचीं म्हणजे सुमारें ५०० वारांचीहि देतात. आणि अशा ठिकाणीहि गाडीचा वेग ताशी सुमारें २७ मैल धरून बाहेरील रूळ आंतील रुळापेक्षां सुमारें २ इंच उंच ठेवतात. या उंचीबद्दलचा साधारण नियम असा आहे कीं, आगगाडीचा वेग ताशी जितके मैल असेल तितक्याचा वर्ग करून त्याला गाळ्यानें (हा गाळा फुटांत दाखवावा) गुणून या गुणाकाराला सवापट त्रिज्येनें भागावें (ही त्रिज्याहि फुटांतच दाखवावी), आणि जो भागाकार येईल तितकें इंच बाहेरील रुळ आंतल्या रुळापेक्षां उंच ठेवावा या सूत्राप्रमाणें गाळा जर ५॥ फुटाचा असला आणि वळणाची त्रिज्या ३००० फुटांची असली आणि आगगाडीचा वेग जर ताशी ४० मैल असला तर
 ५||X४०X४०/३०००X१| =८८००/३७५०=२ १/३
इंच इतका बाहेरील रूळ आंतील रुळापेक्षां उंच ठेवावा. तसेंच गाडीचा वेग तासी २७ मैल असेल आणि त्रिज्या १५०० फूट असेल तर याच सूत्रानें बाहेरील रूळ आंतील रुळापेक्षां सुमारें २ इंच उंच ठेवावा असेंच सिद्ध होतें. ३। फूट गाळ्याच्या लाइनीवरून त्याचप्रमाणें २ आणि २॥ फूट गाळ्याच्या लाइनीवर दुहेरी माथ्याचे रूळ न वापरतां खालचा भाग जास्ती रुंद व सपाट आणि वरचा माथा गाडीची चाकें जावयाजोगा असा ठेवतात आणि त्याचें वजन दर यार्डाला ३० पासून ४० पौंड पर्यंत असतें. आणि २॥ फूट गाळ्याच्या रेल्वेचे रुळ यापेक्षां कमी वजनाचे असतात.

बि डा चे स ले पा ट - कांहीं कांहीं ठिकाणीं लांकडी सलेपाटाच्या ऐवजीं लांब वर्तुळाकृति घमेल्यासारखी बिडाचीं ओतीव घमेली रूळाखाली खडीमध्यें पालथी बसवितात, आणि गाळा कायम रहावा म्हणून ही घमेली लोखंडाच्या पट्टीने जोडलेली असतात, आणि लांकडी सलेपाटावर रूळ बसविण्यासाठी बिडाचीं पिढीं बसविलेली असतात. त्यांनां जसे दोन बाजूंनां पंजे असतात त्याच आकाराचें पंजे या वर सांगितलेल्या घमेल्यांनां अंगचेच असतात व रूळ बिडावरच टेंकल्याकारणानें जें एक प्रकारचें रस्त्याला काठिण्य येतें तें कमी करून त्यांत थोडीशी वेतसवृत्ति उत्पन्न व्हावी याकरितां लांकडाच्या फळ्यांचें तुकडे घमेल्याचा माथा आणि रूळ यांच्यामध्यें घालतात. पण ही घमेलीं गाडी फार वेगानें जात असतां रुळांच्या तडाख्यानें एखादेवेळीं फुटण्याचा संभव असतो. अलीकडे लोखंडी पत्र्याचे वळविलेले लांकडी सलेपाटासारखे आडवे बसवायचे सलेपाट केलेले व लहान गाळ्याच्या रेल्वेवर वापरलेले आढळतात, आणि कांहीं ठिकाणीं रुळाखाली लांबच लांब ५॥ x ५॥ मापाचे दुहेरी लोहकोण वापरतात. हे लोहकोण २०-२० फूट लांबीचे असतात, आणि ते एकमेकांला आडवे बोल्ट घालून जोडलेले असतात, आणि ते बसवितांना त्यांची सांधमोड करून बसवितात, आणि त्यांच्यावर खालची बाजू सपाट असलेले ३ इंच उंचीचे रूळ बोल्टांनी बसवितात परंतु या दोहोंच्यामध्यें अर्धा इंच जाडीची लांकडाची फळी घालतात. अशा लाइनीचा गाळा कायम रहावा म्हणून हे उभे सलेपाट १०-१० फूट अंतरावर लोहकोणांनीं जोडतात. अशा प्रकारच्या लाइनीमध्यें लांकूड वगैरे कोठेंहि येत नसल्याकारणानें ती पुष्कळ दिवस टिकते. खेरीज रुळांनांहि एकसारखा आधार मिळाल्याकारणानें रुळ व हे उभे सलेपाट या दोहोंची मिळून ११ इंच रुंदीची व ९ इंच जाडीची एकप्रकारची तुळईच बनते, व त्यामुळें रुळांनां फार मजबुती येते. याखेरीज अशा रस्त्याला खर्चहि लांकडी सलेपाटाच्या खर्चाइतकाच येतो, आणि लोहकोणांची उभी बाजू सहा इंचपर्यंत खडीमध्यें गुंतलेली असल्याकारणानें वळणावरूनहि मोठ्या वेगानें गाडी जात असतांना रुळांची हालचाल होत नाहीयं, व खडीच्या थराची जाडीहि सुमारें ९ इंचांनी कमी करतां येते. ज्याठिकाणीं रुंद व सपाट तळ असलेले रुळ वापरतात, अशा ठिकाणी पुष्कळ वेळा रुंळांच्या खालीं बिडाची पिढीं न बसवितां हे रुळच लांकडी सलेपाटावर ठेवतात, आणि माथे एका बाजूलाच वळविलेले असे लांब खिळे ठोकून रूळ बाहेरच्या बाजूला न सरकतील असे बसवितात.

पो ला दी रू ळ.- रुळ फारच चांगले शुद्ध लोखंडाचे केलेले असले तर ते १५ पासून २० वर्षेपर्यंतहि कामाला येतात. परंतु अलीकडे रूळांनां फारसें चांगलें लोखंड वापरीत नाहींत त्यामुळें रहदारी जास्ती असल्यास ३ पासून ८ वर्षेपर्यंतच रुळ टिकतात. पोलाद करण्याची सोपी रीत निघाल्यापासून पोलादी रुळहि आतां स्वस्त मिळतात. म्हणून पोलादी रुळच बहुधां वापरतात, आणि हे रूळ लोखंडीरुळापेक्षां जास्ती दिवस टिकतात.

ड ब ल ला ई न.- ज्या ठिकाणीं रहादारी फार नसेल त्या ठिकाणी एकच रेल्वेलाइन करतात, व असें असलें म्हणजे दोन स्टेशनांच्या मधील अंतर आक्रमण्याला वाहकयंत्राला जितका वेळ लागेल तितका वेळपर्यंत येणारी असो किंवा जाणारी असो त्यापैकीं एक गाडी, दुसरी गाडी निघून जाईपर्यंत थांबवून ठेवावी लागते, आणि म्हणून जेव्हां रहदारी वाढते तेव्हा दुसरा लोहमार्ग घालण्याची अवश्यकता भासूं लागते, आणि अशी दुहेरी लाईन असली म्हणजे त्यापैकीं एक म्हणजे डाव्या बाजूची लाइन जाणार्या गाड्यांसाठी आणि दुसरी येणार्या गाड्यांसाठी ठेवतात. म्हणजे समोरासमोरून येणार्या दोन गाड्यांची टक्कर होण्याचा संभवच रहात नाहीं, व ज्या अशा रीतीने रहदारी वाढण्याचा संभव असेल अशा भागांत जरी पहिल्यानें एकच लाईन बांधली तरी निदान पुलाचे स्तंभ तरी दोन लाइनी करण्या इतक्या लांबीचे बांधून ठेवतात. मुंबईपासून कल्याणसारख्या अतिशय रहदारीच्या प्रांतांत दोन लाइनीचें सुद्धा काम भागत नाहीं. कारण त्यापैकीं दर एक लाइन एका बाजूंनें जाणार्या स्थानिक गाड्यांच्यां ५-५ किंवा १०-१० मिनिटांनी जाणार्या व येणार्या गाड्यामुळें अडून राहते व यामुळे मालगाड्या जाण्यायेण्यास रस्ता मुळींच रहात नाहीं. अशा ठिकाणीं अशी माणसांच्या गाड्या जाण्यास एक व येण्यास एक लाईन राखून ठेवावी लागते, तशाच रीतीनें मालगाड्या जाण्यासाठीं एक व येण्यासाठीं एक अशा दोन लाइनी कराव्या लागतात व म्हणून याठिकाणीं ४ लाइनी केलेल्या आढळतात. यापेक्षां जेथें रहदारी कमी असेल अशा ठिकाणीं जाणार्या माणसांच्या गाड्या व मालगाड्या यांच्यासाठीं एक लाईन व येणार्या गाड्यांसाठीं दुसरी लाईन अशा दोन लाइनी केल्या म्हणजे काम भागतें. अशी दुहेरी लाईन कल्याणपासून पुण्यापर्यंत आणि मुंबईहून अहमदाबादपर्यंत केलेली आहे. याच्यापेक्षांहि रहदारी कमी असली म्हणजे एकाच लाइनीवर काम भागते.

वा ह क यं त्र व ळ वि ण्या चे त रा फे.- कोणत्याहि शेवटल्या रेल्वेच्या स्टेशनावर वाहक यंत्र गेलें म्हणजे तें परत जाणार्या गाडीला जोडावयाच्या पूर्वी त्याचे तोंड बदलावें लागतें व असें करण्यासाठी जो लोखंडी गोल तराफा केलेला असतो त्यावर ते वाहकयंत्र नेऊन उभे करतात आणि या तराफ्याच्या मध्याखाली असणार्या शंकूवर तो तराफा फिरेल अशी व्यवस्था केलेली असते. त्या यंत्राच्या साहाय्यानें तो तराफा शंकूभोंवती अर्धा फिरवितात म्हणजे वाहक यंत्राचें तोड पाहिलें ज्या बाजूस होतें त्याच्या उलट बाजूला होतें. आणि ज्या रुळावर तें वाहकयंत्र उभें असतें ते रुळहि रेल्वे लाइनीच्या सरळ रेषेंत येतात. यामुळें तोंड बदलेलें वाहकयंत्र रेल्वे लाइनीवरून परत जाऊं शकतें व अशा रीतीनें तें जाणार्या गाडीला जोडतां येतें. असे गोल तराफे मोठे असल्यास २१ फूट व्यासाचे आणि लहान असल्यास १२ पासून १५ फूट व्यासाचे असतात आणि वाहकयंत्र व त्यालाच मागील बाजूस जोडलेला जो पाणी व कोळसे सांठविण्याचा डबा असतो त्यासुद्धा राहील येवढा मोठा तराफाहि करतात व अशा तराफ्याचा व्यास ४० फुटांचाहि असतो. हा तराफा जमिनींत ५-६ फूट खोल खड्डा खोदून त्यांत मधोमध कांक्रीटचा पाया घालून त्यावर बिडाची मोठ्या व्यासाची अडणी बसवितात व ह्या अडणीच्या मधोमध बिडाचा अंगचाच शंकू बसविलेला असतो. त्याचप्रमाणें भोंवतालूनहि वाटोळें कांक्रीट घालून त्यावर रणगाड्यांच्या चाकासारखी चाकें फिरतील असा गोल लोखंडी गमनमार्ग बसविलेला असतो आणि वाहक यंत्राचा भार सहन करील इतका मजबूत लोखंडी तराफा करून, त्यावर वाहक यंत्र चालेल असे रूळ बसवितात आणि तो तराफा, मधला शंकू व दोन बाजूंला असणारें रणगाडे यांच्यावर बसता करतात आणि तो सबंधच्या सबंध तराफा मधल्या शंकूच्या भोंवतीं वाटोळा फिरवावयासाठीं तराफा (लिव्हर) आणि दात्यांची चाकें यांची योजना केलेली असते. जर ह्या फिरत्या तराफ्याचा जास्ती लागणारा खर्च वांचवावयाचा असेल आणि जवळ मोकळी जागा असेल तर जमीनीवर दोन लाइनी टाकून त्यांचा मुख्य लाइनीशीं समभुजत्रिकोण होईल अशा रीतीनें रचना करतात. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूनें वाहक यंत्र जाऊन दुसर्या बाजूनें परत मुख्य लाइनीवर तें आलें म्हणजे त्याचें तोंड आपोआपच पहिल्या दिशेच्या उलट होतें.

वर वर्णिलेली वाहक यंत्राचें तोंड उलट दिशेला फिरविण्याची गोल तराफ्याची रचना जशा प्रकारची असते, साधारण तशाच नमुन्याची रचना एका लाइनीवर तिलाच समांतर असणार्या वाटेल त्या लाइनीवर नेण्यासाठीहि रोलरवरून चालणारा चौरस तराफा केलेला असतो. आणि हा तराफा सर्व लाइनीच्या काटकोनांत फिरेल अशी व्यवस्था केलेली असते. याच्या योगानें असें करतां येतें कीं, कोणत्याहि लाइनीवर उभें असणारें एंजिन त्या तराफावर बसविलेल्या रुळांवर ढकलतां येतें. आणि तें एंजिन नेऊन सोडावयाचें असेल त्या लाइनीच्या रुळाच्या सरळ रेषेंत तराफ्यावरचें रूळ येतील अशा बेतानें तो तराफा खुंटवितात आणि मग तराफ्यावरील रेल्वे लाइनीवरून तें एंजिन किंवा वाटेल तो डबा एका लाइनीवरून दुसर्या समांतर लाइनीवर सहज रीतीनें नेतां येतो.

सा इ डिं ग.- ज्या लाइनीवरून गाड्या नेहमीं जावयाच्या किंवा यावयाच्या असतील अशा लाइनीवर वाहनयंत्रें, माणसांचे डबे, किंवा मालाचे डबे, केव्हांहि उभे ठेवून लाइन अडवितां येत नाहीं; म्हणून प्रत्येक स्टेशनावर मुख्य लाइनीच्या बाजूला जास्ती लाइनी घातलेल्या असतात. या लाइनीनां साइडिंग म्हणजे बाजूच्या लाइनी म्हणतात. यांचा उपयोग जेव्हां एक गाडी स्टेशनांत उभी असेल आणि लाईन एकेरीच असेल तेव्हां दुसरी येणारी गाडी अशा दुसर्या लाइनीवर येतात. आणि ह्याखेरीज मालाचे डबे भरण्यास व भरलेले उभे करून ठेवण्यासहि आणखी निराळ्या लाइनीची जरुरी पडते. मोठाल्या स्टेशनांवरून माणसांचे डबेहि राखून ठेवण्याची जरुरी असते, अशा ठिकाणी ते डबे ठेवण्याचीहि व्यनस्था करावी लागते. आणि ज्या मोठ्या स्टेशनांवरून नवीनच गाड्या निघावयाच्या असतात अशा स्टेशनांवर आलेल्या आणि तेथे राहणार्या रिकाम्या गाड्या ठेवण्यासाठी आणि मालाचे वेगवेगळे डबे जोडून मालगाड्या तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जास्ती लाइनीची जरूर असते. आणि म्हणूनच रेल्वे स्टेशनांचें स्टेशनयार्ड म्हणजे स्टेशनाची सगळी हद्द समांतर अशा रेल्वे लाइनीनीं भरलेली आढळते.

प हा डी रे ल्वे.- जेव्हां कोणत्याहि पहाडी रेल्वे लाइनीला फार चढ दिलेला नसेल तेव्हां साध्या परंतु जास्ती जड आणि जास्ती मजबूत अशा एंजिनाकडून गाड्या त्यावरून खेंचून नेण्याची व्यवस्था करतां येते. परंतु जेव्हां चढ फारच असतो तेव्हां दांते असलेल्या मधल्या रुळावरून एंजिनाला बसविलेलीं दात्यांची चाकें त्यांत अडकून एंजिन चालेल असे रुळ असलेली लाईन करावी लागते. येथें डब्यांचा व एंजिनचा भार सहन करण्यासाठीं दुहेरी साधे रुळ असतातच, परंतु गाडी घसरून जाऊं नये म्हणून तिला धरून ठेवण्यासाठींहि दात्यांच्या रुळांची किंवा कधीं कधीं मधल्या रुळाला दोन्ही बाजूंनी दाबून धरणार्या आडव्या चाकांची योजना केलेली असते. याखेरीज एंजिन जमिनीवर पक्कें केलेलें असून त्याच्या योगानें दोरोने गाडी खंचून वर घेऊन जाण्याचाहि एक प्रकार आहे.

सा ध्या रु ळा च्या ला इ नी.- पहिल्या प्रकारच्या म्हणजे साध्या लाइनींनां २५ फुटांत १ फूट यापेक्षां जास्ती चढ साधारणत: देत नाहींत आणि अशा चढावर गाड्या फार झालें तर ताशी ८ मैल जाऊं शकतात. ह्यास एंजिनें फार जाड व शक्तिमान अशीं असावीं लागतात. आणि चाकें व रुळ यांचे फार घर्षण होत असल्याकारणानें अशा लाइनीवरील रुळ फार झिजतात. अशा रेल्वे अमेरिकेंत पुष्कळ आहेत. आपल्या  इकडे नीलगिरी रेल्वे आणि सिमल्यास जाणारी काळका-सिमला रेल्वे, व छोटीशी नेरळ-माथेरान रेल्वे ह्या आहेत. खेरीज जी. आय्. पी. रेल्वे लाइनीवर थळघाट व बोरघाट असे दोन जास्त चढाचे घाट आहेत. ह्या घाटांतले पोलादी रुळहि इतकें लवकर झिंजतात कीं, ते सुमारें ४ वर्षांनी बदलावे लागतात. बोरघाट सुमारें १५ मैल लांबीचा आहे. आणि तेवढ्या अंतरात १८३० फुटाचा चढ आहे. म्हणजे हा चढ साधारणत: ४८ फुटांत १ फूट इतका आहे. ह्या भागांत २ पूल होते त्यांची उंची १६० फूट होती, परंतु अलीकडे हे कंपनीनें भरून काढलेले आहेत. ह्या घाटाचा खंडाळ्यापासून लोणावळ्यापर्यंतचा भाग १८५८ सालीं गाड्या जाण्यायेण्यास सुरू करण्यांत आला. ह्या घाटांत ११ व्या मैलापाशीं रिव्हरसिंग स्टेशन आहे. येथें गाडीच्या जाण्याची दिशा बदलते. म्हणजे कोणत्याहि गाडीचा जो सगळ्यांत पुढे डबा असतो तो सगळ्यांत मागील डबा होतो. थळघाटांतील रिव्हरसिंग स्टेशन हल्लीं काढून टाकलें आहे. आणि बोरघाटांतीलहि काढून टाकण्याचा विचार चालू आहे.

ता रे च्या दो रा चे रू ळ.- दुसरा प्रकार म्हणजे चढावरून आगगाडीचें डबे तारेच्या दोरानें रुळावरून चढावर ओढून न्यावयाचें किंवा हळू हळू खालीं सोडावयाचें हा होय. ह्या प्रकारांत तारेचे दोरे चढाच्या माथ्याजवळ बसविलेल्या मोठ्या रहाटगाडग्याच्या रहाटासारख्या रुंद रहाटाभोंवतीं गुंडाळून खुंटविलेले असतात. आणि हे रहाट बैठ्या एंजिनाच्या शक्तीनें फिरवितात. आणि हे रहाटे फिरावयास लागले म्हणजे दोर त्यांच्या भोंवती वेष्टिला जातो आणि त्या योगानें डबे वर खेंचले जातात. व रहाट उलटा फिरविला असतां ह्याच दोराच्या योगानें डबे वरून खालीं घसरत सोडतात. अर्थात अशा ठिकाणीं डब्यांच्या चाकाला व रहाटालाहि मोठ्या शक्तीची गतिस्तंभक कळ बसविलेली असते. व ह्या कळीच्या साहाय्यानें रहाट आणि कोणत्याहि डबा वाटेल त्या वेळीं एकदम थांबवितां येतो. ज्या रेल्वेवर रहदारी फार असेल अशा रेल्वेवर बैठ्या एंजिनाची व्यवस्था गैरसोईची असते. खेरीज चढ कितीहि अवघड असला तरी कोणतीहि दोन एंजिनें व त्याचें रहाट यांच्या मधील लाईन साधारण सरळ व आंखूड सुमारें अर्धा मैल पर्यंत असावी लागते. अशा प्रकारच्या १२ फुटांत १ फूट इतका अवघड चढ असलेल्या रेल्वे दक्षिणअमेरिकेंत व यूरोपमध्येंहि कांहीं कांहीं ठिकाणीं आहे. व असा कोणत्याहि प्रकारच्या अपघात लांब लाइनीच्या कोणत्याहि भागांत झाला तरी ती सर्व लाईन बंद पडते. परंतु अशा रेल्वेवर तारांवर दोर तुटून मोठा अपघात होण्याचा संभव असतो म्हणून माणसें नेण्याआणण्याच्या कामीं ही योजना धोक्याची असल्यामुळें साधारणत: उपयोगांत आणीत नाहींत. पण मालाची नेआण करण्याकरितां किंवा दगडी कोळसे अथवा कोणतेहि खनिज पदार्थ खाणींतून काढल्यावर ते वाहून नेण्याच्या कामी ह्या पद्धतीचा उपयोग पुष्कळ ठिकाणीं करतात.

ति स रा प्र का र ड बे खें च णें.- तिसरा प्रकार म्हणजे वेगळ्याच प्रकारचीं वाहकयंत्रें बनवून त्यांच्या साहाय्यानें गाडीचे डबे खेंचून घेऊन जाणें ही होय. अशा ठिकाणीं एरवीच्या सारखें डब्यांची व एंजिनचीं चाकें वरून जाण्यासाठीं आणि त्यांचा सर्व भार तोलून धरण्यासाठीं एरवीच्या सारखे दोन साधें रूळ बसविलेले असतातच व खेरीज 'फेल सेंटरेल'च्या सिस्टिममध्यें ह्या दोन रुळांमध्यें तिसरा आणखी एक रुळ त्यांच्यापेक्षां सुमारें १४ इंच उंचीवर मधोमध आडवा बसविलेला असतो आणि ह्या रुळाला लागून आडवीं फिरवणारी चाकें वाहक यंत्रांत बसविलेली असतात आणि हीं आडवीं चाकें वाटेल त्यावेळीं ह्या मधल्या रुळाच्या दोन्ही बाजूंना घट्ट दाबून धरतील अशीं हलविता येतात व अशा रीतीनें वाहक यंत्र चालविणाराला वाटेल तेव्हां ५०।६० टनाचा दाब ह्या मधल्या रुळावर दोन्ही बाजूंनीं घालतां येतो आणि अशा रीतीनें ३०० फुटांच्या आंत कोणतीहि गाडी थांबवितां येते. हा मध्ये बसवावयाचा रूळ एरवीच्या रुळासारखाच २॥ इंच रुंद आणि ५ इंच जाड असा असतो. परंतु तो आडवा बसविलेला असतो. म्हणजे त्याची रुंदी ५ इंच व उंची २॥ इंच होईल अशा रीतीनें बसविलेला असतो. आणि तो ज्या ठिकाणीं चढ ३० फुटांत १ फुटांपेक्षां जास्ती असेल अशा भागांतच फक्त बसविलेला असतो. यापेक्षां चढ कमी असला तर एंजिन आपल्या स्वतःच्या शक्तीनेंच गाडी खेंचून घेऊन जातें. जशीं वाहकयंत्राच्या खालीं आडवीं ४ चाकें मधल्या रुळाला धरून चालण्यासाठीं बसविलेलीं असतात. तशाच प्रकारचीं चाकें डब्यांनांहि बसविलेलीं असतात. परंतु ती घट्ट किंवा सैल करण्याची व्यवस्था मात्र एंजिनच्या चाकापुरतीच असते. डब्याखालच्या आडव्या चाकांचा उपयोग येवढाच कीं, वळणावरून वेगानें जातांना रुळ सोडून डब्याच्या वाहक चाकांनीं जाऊं नये. रेल्वेवर कांहीं ठिकाणीं ११ फुटांत १ फूट इतकांहि अवघड चढ आहे आणि गाळा साडेतीन फुटाचा आहे. व गाडी तासी ६ मैल जाते.

दुसर्या एक प्रकारची रेल्वे स्विझर्लंडमध्यें रिगी नांवाचा ४५०० फूट उंचीचा डोंगर चढून जाण्यासाठीं केलेली आहे. ही रेल्वे लाईन ३। मैल लांबीची असून त्यापैकीं १ मैलभर पर्यंत ४ फुटांत १ फूट इतका अवघड चढ तिला दिलेला आहे. आणि बाकीच्या ठिकाणीं सुमारें ६ फुटांत १ फूट इतका चढ दिला आहे. ह्या लाइनीवर साधे दोन बाजूला दोन रुळ असून मधोमध शिडीसारखे आडवे दांडे असलेले दुहेरी रुळ बसविलेले आहेत. ह्यांत आडवे सलेपाट सुमारें ७॥ फूट लांबीचे २॥ फूट अंतरावर बसविलेले आहेत. आणि ह्या सलेपाटांवर ते एकमेकांनां जोडण्यासाठीं उभ्या लांकडी कड्या बोल्टानें बसविलेल्या आहेत. व हा सर्व तराफा गाडीच्या भारानें खालीं सरकून जाऊं नये म्हणून ५ फूट खोलीच्या बांधकामाच्या पायानें कांहीं काहीं अंतरावर खुंटवून टाकलेला आहे. आणि ह्या लाइनीचा गाळा ४॥ फुटांचा असूनहि तिचे रुळ दर फुटास ११ पौंड वजन भरणारें आहेत. ह्या लाइनीवरून चालणारी वाहक यंत्रें आणि माणसांच्या गाड्या यांच्या चाकांच्या दर एक आंसाला दाते असलेली चाकें बसविलेली असतात. आणि या चाकांचे दांते मधल्या दुहेरी रूळाला आडवे गण बसवून जे दांते केलेले असतात, त्या दात्यांत गुंतून चालतात व यामुळे गाडीची जरी खाली घसरून जाण्याचा कल असतो तरी ह्या चाकांचे दांते मधल्या रूळाच्या दांत्यांत गुंतल्याकारणानें तिला खालीं सरकूं देत नाहींत. पण उलट ही दांत्यांची चाकें एंजिनच्या शक्तीनें जोरानें फिरविलीं जात असल्यामुळें उलटी वर चढतच जातात. डब्याचा व एंजिनाचा भार ह्या चाकांखेरीज दोन बाजूंला जीं साधी चाकें प्रत्येक आंसावर बसविलेलीं असतात त्या चाकांच्या योगानें ज्या साध्या रुळावरून ती चाकें चालतात त्या रुळावर पडतो, दांत्यांच्या चाकांवर पडत नाहीं. दांत्यांच्या चाकांचें काम फक्त गाडीला खालीं घसरूं न देतां वर खेंचून घेऊन जाण्याचें असतें. ह्या रेल्वेला ४ फुटांत १ फूट इतका अवघड चढ असल्यामुळें दर वेळेला एंजिन व माणसांचा एक डबा येवढी मिळूनच एक गाडी बनवितात. ह्याच्या एंजिनचें वजन आंतील पाणी व कोळशासुद्धा सुमारें १२ टन असतें.

वा ह क यं त्रें (लोकोमेटिव्ह).- ह्यांनां ६ पासून ८ मोठीं चाकें असतात. ह्यापैकीं ज्या चाकाच्या जोडीला वाफेच्या शक्तीमुळें प्रत्यक्ष चलन मिळतें तीं जलद जाणार्या गाड्यांचीं चाकें ५ पासून ८ फूट व्यासाचीं असतात. यांनां गाडी चालविणारी किंवा गति देणारीं चाकें म्हणतात. दुसर्या साध्या चाकांच्या दोनतीन जोड्या असतात. त्यांचीं चाकें ३ पासून ४ फूट व्यासाचीं असतात. पुष्कळ डबे जोडलेल्या मालगाडीला खेंचून घेऊन जाण्यासाठीं जास्ती शक्तिमान् एंजिनें लागतात. व अशा एंजिनांनां वाफेच्या शक्तिमुळें प्रत्यक्ष चलन मिळणारी जी मोठी ४-५ फूट व्यासाची चाकजोडी असते तिला लोखंडी कांबींनीं जोडलेल्या अशा दोन किंवा कधीं कधीं तीनहि चाकजोड्या असतात. असें असलें म्हणजे एंजिनाची आठहि चाकें गाडी चालविणारीं किंवा गति देणारीं होतात. त्यामुळें एंजिनचा सर्व भार गाडी खेंचून घेऊन जाण्याकडे उपयोगांत आणतां येतो. जेव्हा जेव्हां जास्ती वजन खेंचून घेऊन जावयाचें असेल तेव्हां तेव्हां एंजिनचें वजन जास्ती जड असावें लागतें. उदाहरणार्थ, घाटांत जी एंजिनें वापरतात त्यांत कोळशाचा व पाण्याचा आणि एंजिनचा सर्व भार, जी एंजिनला गति देणारीं चाकें असतात. त्यांवरच सर्व येईल अशी व्यवस्था केलेली असते. एंजिनची रचना, प्रकार व त्याचें कार्य याविषयीं सविस्तर माहिती 'एंजिन' लेखांत आढळेल.

वे गा चीं एंजिनें.- पूर्वी २० पासून ३० टनांचीं एंजिनें वापरीत असत. पण आतां ती ५०।६० टनांचीं सुद्धा असतात. मालगाड्यांचीं एंजिनें माणसांच्या गाडीच्या एंजिनांपेक्षां जड असतात. पाणी आणि कोळसा सांठविण्याच्या डब्यांचें वजन कोळसा व पाण्यासुद्धा १० पासून १५ टन पर्यंत असतें. माणसांच्या गाडीचीं जीं एंजिनें असतात, त्यांच्या पंचपात्रांचा व्यास १५ पासून १६ इंचपर्यंत असतो व त्यांच्या दट्टयांचें अयन २० पासून २४ इंचपर्यंत असतें आणि गति देणार्या चाकांचा व्यास ५॥ पासून ७ फुटांपर्यंत असतो . हीं व्यासाची चाकें असलेलीं एंजिनें अति वेगानें चालणार्या टपालाच्या गाड्या किंवा निकडीच्या गाड्या (एक्सप्रेस) यांसाठीं वापरतात. अशा मोठ्या एंजिनांची किंमत ३० पासून ४० हजार रुपये असते. ह्या एंजिनांतील आगट्या ३ पासून ४ फूट लांब आणि सुमारें ३॥ फूट रुंद असतात व त्यांनां खालून वारा लागण्यासाठीं गज बसविलेलें असतात. जसजसे एंजिन जोरानें जातें आणि धुराड्याच्या नळांतून जास्ती जास्ती वाफ सुटते तसतशी जास्ती ताजी हवा ह्या नळींतून खेंचली जाते व आगटींतील अग्नि जास्ती प्रदीप्त होय जातो. खेरीज या जाळींतून आगटींतील राखहि पडून जाते. अशा मोठ्या एंजिनांच्या बाष्पजनक पात्रांत १० ते ११ फूट लांबीच्या सुमारें दोन इंच व्यासाच्या १५० ते २२५ पर्यंत पितळी नळ्या बसविलेल्या असतात.

आ ग गा डी ओ ढ ण्या ची श क्ति.- कोणतीहि आगगाडी ओढावयास किती शक्ति लागेल हें पुढें दिलल्या रीतीनें काढतां येतें. समजा कीं,  'श' पौंड इतका निरोध (रेझिस्टन्स) ती गाडी करीत असली आणि 'व'टन हें एंजिन, टेंडर व डबे या सर्वांचें वजन असलें आणि दर तासी 'वे' मैल इतका त्या गाडीचा वेग असला व आगगाडीच्या रस्त्याला चढ 'च' इतका असला तर

श = (व) X (८ + (ब)/१८०+२९८७ च)

इतका असतो आणि जर 'व' (वजन) १०० टन असलें आणि 'वे' (वेग) तासी २० मैल असला आणि 'च' (चढ) हजार फुटांत एक फूट म्हणजे १/१००० असला तर ती आगगाडी ओढण्यास

श = १०० (८ + (२०)/१८०+२९८७X २९८७X१/१०००) १३२० पौं.

इतकी शक्ति लागेल. आणि कोणत्याहि एंजिनाला गाडी ओढावयास किती मेहनत लागते याचें मान काढावयाचें म्हणजे गाडीचा जितक्या पौंडांचा निरोध असेल त्याला, दर मिनिटांत जितकें फूट तें एंजिन चालत असेल तितक्या फुटांनीं गुणावयाचें आणि वरील उदाहरणांत हें मान १३२० पौंड x १७६० फूट (वेग ताशी २० मैलाचा म्हणजे मिनिटांत १/८   मैल = १७६० फूट इतका धरून) = २३२३२०० इतके फूट पौंड आहे. आणि ३३००० फूट पौंड म्हणजे १ हॉर्सपावर किंवा अश्वशक्ति होते. सबब वरील काम करावयास  २३२३२००/३३००० = ७० इतकी निव्वळ अश्वशक्ति लागेल आणि निव्वळ ७० अश्वशक्ति हातीं लागण्यास ८० किंवा ९० अश्वशक्तीचें एंजिन असावयास पाहिजे, व वाफेच्या पंचपात्राचा व्यास 'व्या' इंच इतका असला आणि 'अ' इंच इतकें त्यांतील दट्टयाचें अयन असलें आणि 'चा' इंच इतका गत्युत्पादक म्हणजे मुख्य चाकांचा व्यास असला आणि 'हा' पौंड इतका वाफेचा दाब किंवा जोर दर चौरस इंचास असला तर 'श' पौंड या निरोधाच्या इतकी तरी निदान गाडी खेंचणार्या एंजिनाची शक्ति असली पाहिजे
म्हणून   श= दाX(व्या)Xअ/चा    

हे लागणार्या शक्तीचें समीकरण झालें. यावरून वाफेचा सरासरी दर चौरस इंचावरील दाब जितका जितका जास्ती असेल तितकें तितकें जास्ती ओझें त्या एंजिनाला ओढून नेतां येईल असें झालें. समजा कीं, दट्टयावरा पडणारा सरासरी दाब जर चौरस इंचास ७० पौंड इतका आहे. आणि पंचपात्राचा व्यास १५ इंच आहे व दट्टयाचें अयन किंवा धांव २२ इंच आहे, व मुख्य चाकाचा व्यास ७ फूट आहे, तर अशा एंजिनाची खेंचण्याची शक्ति
७०x१५x१५x२२/७x१२    = ४१२५
पौंड झाली म्हणजे असें एंजिन सपाटीच्या रस्त्यावरून ५५० टन वजनाची गाडी खेचूं शकेल. कारण ओझ्याच्या ३०० व्या भागाइतकी शक्ति रुळावरून गाडी खेंचावयास लागते.

वा फे चा दा ब.- बाष्पजनक यंत्रांतील वाफेचा दाब जितका असतो, त्याच्या विवक्षित प्रमाणांत दट्टयावर पडणारा सरासरी वाफेचा दाब असतो. आणि हा बाष्पजनक यंत्रांतील दाब दर चौरस इंचास ८० पासून १४० पौंड पर्यंत साधारण रीतीनें ठेवतात. कांहीं कांहीं एंजिनांतून हा दाब दर चौरस इंचास २०० पौंडा इतकाहि असतो. परंतु साधारणत: १०० पासून १२० पौंड इतक्या दाबाचीच एंजिनें वापरण्याची प्रवृत्ति असते. त्याचें कारण असें आहे कीं, वाफेचा दाब वाढवून एंजिनची शक्ति कितीहि वाढविली तरी त्या सर्व शक्तीचा गाडी खेंचण्याकडे उपयोग होऊं शकत नाहीं, कारण एंजिन उभें राहिलें असतां एंजिनाचीं मुख्य गत्युत्पादक चाकें रुळाला त्यांच्यावर असलेल्या वजनाच्या विवक्षित प्रमाणांत असणार्या जोरानें चिकटलेली असतात. आणि या जोरापेक्षां कमी शक्ति जर ती चाकें फिरविण्याकडे लावली तर ती चाकें रुळाला धरूनच चालू लागतात. म्हणजे एंजिनाच्या मागें असणारें डबे  पुढें खेचूं लागतात. परंतु उलयपक्षीं मागील डब्याचें ओझें पुष्कळ असलें आणि वाफेचा दाब वाढवून एंजिनाची शक्ति वाढविली तरी असें घडतें कीं, या वाफेच्या दाबामुळें मुख्य चाकें तर फिरूं लागतातच परंतु गाडीचा भार मागें जास्ती असल्यामुळें गाडी मात्र पुढें सरकत नाहीं, फक्त उभीं राहिल्याराहिल्याच मुख्य चाकें फिरतात. कारण मुख्य चाकें जितक्या जोरानें किंवा चिकाटीनें खालच्या रुळांनां बिलगून राहिलेली असतात त्या जोरापेक्षां हा वाफेचा दाब जास्ती असतो.

गा डी ला कि ती  ड बे  जो डा वे.- गाडीला डबे जास्ती असले म्हणजे तिला ओढावयास शक्तीहि जास्ती लागते. आणि एंजिनची गाडी खेंचण्याची शक्ति म्हणजे मुख्य चाकें जितक्या जोरानें रुळास बिलगून राहतात तितकीच होय. या निरोधक शक्तीपेक्षां गाडी ओढावयास कमी शक्ति लागेल इतकेच डबे जोडले तर तितके डबेच हें एंजिन ओढूं शकेल; याच्यापेक्षां जास्ती डबे असले तर तें ओढूं शकणार नाहीं. उदाहरणार्थ, ३० टन वजनाचें एंजिन असलें आणि त्यापैकीं १० टन ओझें त्या एंजिनच्या मुख्य चाकांवर (म्हणजे पंचपात्रांतील दट्टयावर वाफेचा दाब पडल्यामुळें ज्यांनां प्रत्यक्ष गति मिळतें ती चाकें) असलें तर असल्या एंजिनाची हीं मुख्य चाकें ७/१० म्हणजे सुमारें १॥ टन इतक्या जोरानें रुळांनां बिलगून राहतील आणि म्हणून जितके डबे ओढावयास सुमारें १॥ टन इतकी शक्ति लागेल तितकेंच डबे हें एंजिन ओढूं शकेल. कोणताहि डबा रुळावरून ओढावयास त्या डब्याच्या वजनाच्या ३०० व्या भागाइतकी शक्ति लागते. आणि म्हणून असें एंजिन १॥ x   ३०० = ४५० टन इतक्या वजनाची गाडी लेव्हल लाइनीवर (एंजिनसुद्धा) ओढूं शकेल. रुळ कोरडे आणि स्वच्छ असले तर मुख्य चाकावर पडणार्या वजनाच्या एकपंचमांश, व तेच रुळ भिजलेले किंवा तेल वगैरे सांडून सुळसुळीत झालेले असले तर याच वजनाच्या १/१०  इतक्या जोरानें हीं चाकें रुळांनां बिलगून राहतात. आणि म्हणून या वरील दोन्ही (१/२ आणि १/१०) प्रमाणांच्या सरासरी इतके म्हणजे सुमारें १/७ हें प्रमाण वरील उदाहरणांत घेतलें आहे. वर सांगितल्याप्रमाणें १० टनांचा डबा ओढावयास १० / ३०० = १० / ३०    टन म्हणजे सुमारें ७५ पौंड इतका जोर तो डबा ओढावयास लागेल. अशा डब्यांचीं चाकें गतिरोधक कळीनें फिरण्याचीं बंद केली असतां हाच डबा रुळावरून खरडीत खरडीत ओढीत नेण्यास १० / १० पासून १० / ५ म्हणजे एक पासून दोन टनपर्यंत शक्ति लागेल.

घ र्ष ण प्र मा ण.- यावरून असें प्रमाण निघतें कीं एंजिनच्या मुख्य चाकावर जितका भार येत असेल त्याच्या सरासरी ३० पासून ६० पटीपर्यंत म्हणजे ४५ पट भार तें एंजिन ओढूं शकेल. कारण घर्षण (स्लाइडिंग फ्रिक्शन) आणि चक्रगतिघर्षण (रोलिंग फ्रिक्शन) यांचें एकमेकांशीं प्रमाण इतकें असतें. रुळ सुळसुळीत झालेले असले आणि एंजिनचीं चाकें त्यावरून फार सरकून जावयास लागलीं तर रुळावर बारीक रेती टाकावयासाठीं ज्या नळ्या बसविलेल्या असतात. त्यांतून रेती टाकून रुळाचा पृष्ठभाग तेवढ्या पुरता चरचरीत करून घेतां येतो व अशा रीतीनें एंजिनची खेंचावयाची शक्ति १/४५ इतकी ठेवतां येतें. एंजिनच्या प्रत्येक चाकजोडीवर जर १० टन वजन येईल अशी व्यवस्था केलेली असली व एंजिनला गति देण्याचें काम जर एकच चाकजोडी करीत असली तर अशा एंजिनची गाडी खेंचून घेऊन जाण्याची शक्ति १॥ टनाइतकी असतें. आणि म्हणूनच ४५० टनाइतका भार असें एंजिन क्षितिजसमांतर पातळींत म्हणजे लेव्हलमध्यें रस्ता असला तर त्यावरून नेऊं शकतें. अशाच दोन चाकजोड्या एकमेकांत कांबीनें जोडलेल्या असल्या तर तें एंजिन दुप्पट ओझें नेऊं शकतें व ४ जोड्या जोडल्या तर चौपट ओझें नेऊं शकेल.

को ळ सा.- आगगाडीच्या एंजिनांनां त्यांच्या दरएक (वाफेच्या सरासरी दाबावरून काढलेल्या ) अश्वशक्तीला दर तासाला तीन पासून पांच पौंडांपर्यंत कोळसा लागतो. आणि एक पौंड कोळशानें ७ पासून ९ पौंड पाण्याची वाफ बनतें आणि साधारणत: सर्व नळ्यांचा मिळून जलसंल्लग्न असून अग्निसंतप्त असा पृष्ठभाग ८०० पासून २००० चौरस फुटांपर्यंत असतो, आणि हा पृष्ठभाग दर तासाला जितके पौंड कोळसा जळतो त्याच्या निम्म्यापासून १॥ पटीपर्यंत म्हणजे सरासरीनें तितकेंच चौरस फूट असतो. म्हणजे असा पृष्ठभाग १००० चौरस फूट असला तर ताशी १००० पौंड कोळसा लागतो. हा कोळशाचा खप सारख्या प्रमाणांतच असतो असें नाहीं. कारण रस्ता सपाट असला तर गाडी ओढावयास कमी शक्ति लागल्यामुळें कमी वाफ पुरते. परंतु जर चढ चढावयाचा असेल तर तो चढण्यास जास्ती शक्ति लागल्यामुळें दर मिनिटास वाफ जास्ती खपते आणि म्हणून ती दर मिनिटास तितकी तयार होईल अशी व्यवस्था केलेली असते. कारण अशा वेळीं धूम्रवाहक नळांतून जोरानें वाफ सोडतात व आगटींतील अग्नि जास्ती प्रदीप्त करतात व असें कांहीं विवक्षित मर्यादेपर्यंत करतां येतें. घाट चढतांना जशी जास्ती वाफेची जरुरी लागतें त्याच्या उलट घाट उतरतांना नेहमींपेक्षां कमी वाफ लागते व अशा रीतीनें चढतांना जास्ती लागणार्या जळणाचा वचपा कांहीं अंशी उतरतांना निघून येतो. साधारणत: वाफेच्या पंचपात्रांचा व्यास १५ इंच असला आणि दट्टयाचें अयन किंवा धांव २२ इंच असली म्हणजे बाष्पजनक यंत्रांतील आगटीनें तप्त होऊन वाफ करणारा पृष्ठभाग सुमारें ८०० चौरस फूट असतो, व अशा एंजिनाचें वजन सुमारें ३० टन असतें.

चा लू व बं द एं जि नें.- कांहीं मोठमोठाल्या एंजिनांतून आगींनें तप्त होऊन वाफ उत्पन्न करणारा पृष्ठभाग १७०० पासून २ हजार चौरस फूटहि असतो, व अशा एंजिनावर पाणी २।२ हजार ग्यालन, सुमारें १॥ टन कोळसा व १५० पासून २०० घनफूट जळाऊ लांकडें सांठविण्याची सोय असते. व अशा एंजिनाचें वजन ६०।६२ टन असतें परंतु कोणत्याहि मुख्य चाकजोडीवर सुमारें १० टन वजनापेक्षां जास्ती भार येऊं देत नाहींत. एंजिनें कामांत असतां दररोज सरासरीनें १२० मैल म्हणजे वर्षांत सुमारे ३७ हजार मैल गाडी खेंचूं शकतात. परंतु जितकीं एंजिनें एखाद्या लाइनीवर असतात त्यांपैकीं कांहीं दुरस्ती करण्यासाठीं बंद पडलेली असतात व कांडीं जेव्हां काम पडेल तेव्हां उपयोगी पडण्यासाठीं राखून ठेविलेली असतात. ह्यामुळें साधारणत: निम्मीं एंजिनेंच खरोखर कामावर असतात आणि म्हणून एकंदर जितकीं एंजिनें असतील त्यांचें  वार्षिक काम दर एंजिनास १८ हजार पासून २९ हजार मैलांपर्यंतच पडतें.

ड बें.

र च ना.- साधारणत: डब्यांचीं चाकें ३ पासून ३॥ फूट व्यासाचीं असतात आणि रुळांचा जितका गाळा असतो त्याच्यापेक्षां दोन्ही बाजूला २ पासून २॥ फूटपर्यंत जास्ती रुंदीची डब्याची साटी तयार केलेली असते. ह्या साठ्या साधारणत: जितक्या माणसांचे ओझें किंवा मालाचें ओझें प्रत्येक डब्यांत न्यावयाचें असेल त्याच्यापेक्षाहि जास्ती नेण्याइतक्या मजबूत केलेल्या असतात व त्यांना उभे व आडवे बंद देऊन वाटेल तितकें धक्के बसले तरीहि त्या सहसा वांकणार नाहींत इतक्या मजबूत करतात, आणि धक्का बसला असतां डब्यांत बसलेल्या माणसांनां उपद्रव होऊं नये म्हणून माणसांच्या डब्याला उत्तम प्रकारच्या कमानी बसविलेल्या असतात व डबे जोडतांना वगैरे जे धक्के बसतात त्या धक्क्यांचा दुष्परिणाम नाहींसा करण्यासाठी जाड लोखंडी तबकड्या (बफर) बसविलेल्या असतात. त्यांच्या मागील बाजूस अतिशय व मजबूत अशा स्प्रिंग्ज बसविलेल्या असतात. लहान गाळ्याच्या रेल्वे लाइनीवरून गाडीच्या मधोमध एकच बफर बसविलेला असतो. परंतु मोठ्या गाळ्याच्या रेल्वेवर असे बफर किंवा तबकड्या दोन दोन बसविलेल्या असतात.

व र्ग (क्लासेस).- माणसांच्या डब्यांचे बहुतकरून तीन व कधीं कधीं ४ क्लास असतात. वरच्या क्लासाच्या डब्यांतून माणसें थोडीं बसूं देतात, त्यामुळें डब्यांचें जितकें वजन असतें त्यांच्या सुमारें ३ र्या हिश्श्याइतकेंच वजन पहिल्या क्लासांत बसणार्या माणसांचें होऊं शकतें. दुसर्या क्लासांत डब्याच्या वजनाच्या निम्म्याने. आणि तिसर्या क्लासात १/६  इतकें माणसांचें वजन असतें. माणसांच्या गाड्यांनां जशा प्रकारच्या उंची कमानी वापरतात तशाच प्रकारच्या कमानी गार्डाचा किंवा रक्षकाचा डबा, माणसांच्या बरोबर न्यावयाच्या सामानाचा, तसेंच घोडे नेण्याचें डबे, टपालाचा डबा वगैरेंनां वापरतात. कारण हे डबे नेहमीं माणसांच्या गाडीलाच जोडतात. आणि त्यांना जर चांगल्या कमानी घातल्या नाहींत तर हे डबे दुसर्या डब्यांनांहि खिळखिळे करून सोडतील.

मा ला चे ड बे.- मालाचे डबे माणसांच्या गाड्यांनां जोडीत नाहींत म्हणून व खेरीज मालगाड्या फार वेगानें जात नाहींत म्हणून त्यांच्या साठीं खालील कमानीं, आणि डबे एकमेकांना जोडावयाच्या आंकड्यांना बसविलेल्या कमानी वगैरे माणसांच्या डब्यांच्या कमानीइतक्या उंची प्रकारच्या नसतात. अशा चार चाकीं डब्यांचें वजन साधारणत: ८ पासून १० टनपर्यंत असतें. ह्यांतून सुमारें २० टन माल जातो. आपल्या इकडे १५।२० माणसांचें वजन एक टन भर (२२४० पौंड) होतें. आणि म्हणून ६० माणसें डब्यांत बसलेली असली तर त्यांचें सामानासुमानासुद्धां वजन सुमारें ४ टन होईल. ह्यांत डब्यांचें ६ टन वजन मिळविलें म्हणजे १० टन वजन होतें. हें वजन चारचाकी डब्यांचें होय. अलीकडे बारक्या बारक्या आठ चाकांचे बोगी (लांबट डबे) असतात त्यांत माणसेंहि पुष्कळ बसतात व त्यांचें वजन याच्या पेक्षांहि जास्ती म्हणजे ३०।३५ टन असतें आणि मालाचें बोगी (लांबट ८ चाकी डबे) असतात त्यांत ४० टनांपर्यंत माल नेतां येतो.

ब्रे क.- आगगाड्यांचा वेग फार असल्यामुळें त्यांना वाटेल तेव्हां थांबविण्यासाठीं गतिरोधक कळी बसविणें अवश्य नसतें. हें गतिरोधनाचें काम म्हणजे साधारणत: गाडीच्या सर्व चाकांचें फिरणें त्या चाकांवर लांकडाचें किंवा लोखंडाचें वर्तुळखंडाकृति तुकडे जोरानें दाबून करतात. मालगाड्यांच्या डब्यांच्या चाकांनांहि असे तुकडे जोडलेले असतात व त्यांनां जो लोखंडी दांडा जोडलेला असतो. त्या दांड्याच्या योगानें हातानें दाबता येतात. एंजिनें व रक्षकाचा गतिरोधक डबा यांत आडवीं चव्रेच् बसविलेली असतात तीं फिरविली असतां गतिरोधक कळ चाकाच्या परिघांत जाऊन भिडते आणि ती जोरानें दाबली असतां चाकें फिरावयाचीं बंद होतात आणि गाडी थांबते. जेथें वेग फार नसेल अशी ठिकाणीं एंजिनाची चाकें व मागील रक्षकाच्या डब्यांची चाकें फिरावयाचीं बंद केलीं असतां गाडी थांबवितां येते.

व्हॅ क्यु अ म ब्रे क.-माणसांच्या प्रत्येक डब्यांच्या चकांनां गतिरोधक कळी किंवा पट्टया बसवाव्या लागतात. ह्या एकदम लावतां याव्या म्हणून एंजिनापासून गार्डाच्या डब्यापर्यंत सर्व डबे रबराच्या (आंतून तारांनीं मजबूत केलेल्या) नळ्यांनीं जोडलेले असतात, आणि हया लांबचलांब नळींतील हवा वाताकर्षण यंत्राच्या योगानें शोधून घेतां येते व अशा रीतीनें ह्या नळ्यांतील प्रदेश निर्वात झाला म्हणजे बाहेरील हवेच्या दाबानें प्रत्येक डब्याखालच्या कळींतील दट्टे ढकलले गेल्यामुळें सर्व डब्यांच्या चाकांनां गतिरोधक पट्टया एकदम जाऊन जोरानें चिकटतात आणि त्यामुळें सर्व चाकें एकदम बंद होतात. अशा प्रकारच्या गतिरोधक कळींनां निर्वातगतिस्तंभक (व्हॅक्युअम ब्रेक) असें म्हणतात. दुसर्या एक प्रकारच्या गतिस्तंभक कळी असतात त्यांत दाबलेल्या हवेच्या जोरानें दट्टे दाबले जाऊन त्याच्या योगानें गतिरोधनाचें काम होतें. त्यांत  एंजिनच्या शक्तीनेंच हवा दाबून ठेवतात, आणि या दाबलेल्या हवेच्या साठ्यांतून वेळ पडेल तेव्हां सर्व डब्यांनां जोडणार्या नळींत हीं दाबलेली हवा सोडतां येते. आणि ती तशी सोडली म्हणजे गतिस्तंभक कळीचे दट्टे ढकलेले जाऊन त्यामुळें सर्व चाकांची गति कमी होत होत ती चाकें थोड्याच वेळांत अजीबात फिरेनाशीं होतात.

पृष्ठघर्षण.- गाडी जर अतिशय वेगानें जात असली तर तिच्यामध्यें तिच्या वजनाच्या आणि वेगाच्या मानानें जो आवेश आलेला असतो त्या आवेशानुरूप एंजिन व डबे या सर्वांचीं चाकें कळ दाबून बंद केलीं तरी कांहीं अंतरापर्यंत ती खरडत जातात. जर चाकांनां फिरावयाची सूट असती तर जें चक्रगतिघर्षण होऊंनच तीं चाकें बंद पडली असतीं तीच चाकें त्यांचें फिरणें बंद झाल्यामुळें रुळावरून नुसतीं घसरत जातात. म्हणजे चक्रगतिघर्षणाच्या ऐवजीं साधें पृष्ठघर्षण सुरू होतें आणि साधें पृष्ठघर्षण चक्रगतिघर्षणाच्या तीस पासून साठ पटीपर्यंत असतें. यामुळें चक्रगतिघर्षणामुळें जी गाडी ३०० फूट अंतरांत बंद झाली असती तीच गाडी चाकें खिळून टाकल्यामुळें होणार्या पृष्ठघर्षणाच्या योगानें ५ पासून १० फुटांच्या अंतरांतच उभी राहतें.

ग ति नि रो ध सा ध नें.- हें गतिरोधनांचें काम चाकांच्या परिघावर लांकडांचे किंवा लोखंडाचें तुकडे जोरानें दाबून करतात किंवा चाकें आणि रूळ यांच्यामध्यें पाचरी घालून किंवा रुळांनांच लागून घसरत जाणार्या पट्टया खालीं सोडून त्या रुळाला घसरत जातील अशा बसवूनहि करतात. परंतु सर्वसाधारणत: पहिलाच प्रकार सध्यां उपयोगांत आणला जातो. आणि हे सर्व चाकांच्या परिघावर लोखंडाच्या किंवा लांकडांच्या जाड पट्टया एकदम दाबण्याचें काम हवेच्या दाबानें केलें जातें. हें गतिरोधनाचें काम हळूहळू केलें तर विशेष बरें. कारण एकाएकी ब्रेक घट्ट दाबल्यानें धक्का बसतो व चाकांना इजा पोंचते. तेंच ब्रेक हळूहळू दाबले असतां गतिरोधनाचें काम जास्ती चांगलें होतें व डब्यांनां धक्का पोंचत नाहीं.

ब्रे क ला व ल्या नं त र कि ती वे ळा नें गा डी थां बे ल.- ब्रेक म्हणजे गतिस्तंभक कळ दाबल्यानंतर किती अंतरावर गाडी थांबेल हें पुढील सुत्रानें काढतां येतें. समजा कीं, 'अं' (अंतर) इतके फूट ब्रेक लावल्यावर खरडत जाऊन गाडी उभी राहील असें समजलें आणि 'वे' (वेग) इतके मैल दर ताशी त्यावेळीं गाडीचा वेग असला आणि 'व' (वजन) टन इतकें सगळ्या गाडीचें वजन असलें आणि 'च'(चढ) फुटांत एक फूट इतका गाडीच्या रुळांनां चढ किंवा उतार असला आणि ज्या डब्यांनां गतिरोधक कळ बसविलेली आहे, अशा डब्यांचें वजन जर 'वा' इतके टन असलें तर
अं= (वे)Xव/३०{(व-वा)/२८०+वा/७+व/च

समजा कीं, 'वे' ताशी २० मैल आहे आणि 'व' १२५ टन आहे आणि 'वा' ४० टन आहे आणि 'च' ५०० आहे आणि गाडी ह्या ५०० फुटांत १ फूट अशा स्लोपावरून चढून येत असतां ती थांबवावयाची आहे तर ती किती फूट अंतरांत थांबवितां येईल हें वाढावयाचें आहे. हें आंकडे वर दिलेल्या सूत्रांत मांडले असतां अंतर निघेल.

अं = २०X२०X१२५/३०{(१२५-४०/२८०+४०/७+१२५/५००}= २५००/३X६.२६=१३३

फूट इतक्या अंतरांपर्यंत गाडी खरडत जाऊन उभी राहील. हीच गाडी ह्या ५०० फुटांत एक फूट येवढ्या स्लोपावरून खालीं उतरत येत असली तर वरील उदाहरणांत १२५/५०० हा आंकडा घनरूपाच्या ऐवजी ॠणरुपी होईल आणि तो तसा केला असतां अंतर १३३ फुटांच्या ऐवजीं १४५ फूट येईल याचा अर्थ असा कीं, ब्रेक दाबिलें असतां ही गाडी १४५ फुटांपर्यंत घसरत जाऊन उभी राहील.

च क्र घ र्ष णा चें प्र मा ण.- वरील सूत्रांत २८० म्हणून जो आंकडा दिला आहे. तो चक्रगतिघर्षणाचें प्रमाण होय. हें १/२८० चें प्रमाण रुळ जर साफ आणि कोरडे असतील तर १/१२४ इतकेंहि वाढते. आणि रुळ फारच सुळसुळीत असल्यास १/३०० इतकेंहि होतें.  म्हणजे स्थूलमानानें हें प्रमाण दर टनास ८ पासून १० पौंड इतकें असतें. यावरून एखादा डबा जर १० टन वजनाचा असला तर तो लेव्हलरुळावरून ओढावयास ८० पासून १०० पौंडाचां जोर लागेल असें समजावयाचें. त्याचप्रमाणें वरील सूत्रांत जो ७ हा भाजक दिला आहे तें पृष्ठघर्षणाचें प्रमाण होय असें समजावयाचें. हें पृष्ठघर्षण (स्लाइडिंग फ्रिक्शन) वजनाच्या १/४ पासून १/७ इतकें म्हणजे दर टनास ५६० पौंड पासून ३२० पौंडांपर्यंत असतें. याचा अर्थ असा कीं जर वर सांगितलेल्या १० टनांच्या डब्याची गतिरोधक कळ दाबून त्याचीं चारी चाके फिरतील अशीं खिळून टाकलीं तर तो डबा रुळांवरून खरडीत घेऊन जावयास ५६०० पौंडांपासून ३२०० पौंड म्हणजे २॥ टनापासून १॥ टनाइतका जोर लागेल.

स्टे श नें (विराम स्थळें)

स्टेशनें म्हणजे गाडी थांबवून उतारुंनां त्यांच्या इष्ट स्थळीं जाण्यासाठीं गाडींतून उतरण्याच्या व नवीन जाणार्या लोकांकरितां गाडींत चढण्याच्या जागा होत. मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतून ही चढण्याउतरण्याची स्टेशनें मैल-अर्धामैल अंतरावर सुद्धा असतात. परंतु इतरत्र ही स्टेशनें ५ पासून १० मैल अंतरावर असतात आणि अशा प्रत्येक स्टेशनाला माल चढविण्याउतरविण्यासाठीं वेगळ्या पार्श्वतती (साइडिंगज) घालून डबे ठेवण्याची व्यवस्था केलेली असते.

स्टे श नां चे प्र का र.- मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतून माणसें उरतण्याचीं जरी पुष्कळ स्टेशनें असली तरी मालाचें स्टेशन एखाददुसरेंच असतें. एखाद्या वेळेस दोन स्टेशनांत अंतर पुष्कळ असल्यास आणि मधल्या गावांनां जाण्यासाठीं उतारुंची सोय करण्यासाठीं मध्येंच गाडी उभी करण्याच्या ध्वजविरामस्थल (फ्लॅग स्टेशन) नांवाच्या जागा कांहीं काहीं ठिकाणीं केलेल्या असतात. या ठिकाणीं उतारुंनां उतरण्यासाठीं ओटे (प्लॅटफार्म) केलेले  नसतात, परंतु उतारूंची येजा वाढली तर कांहीं वर्षांनीं तेथेंच कायमचें स्टेशन बांधतात.

स्टे श ना ला ला ग णा री जा गा.- जास्ती महत्त्वाच्या म्हणजे पहिल्या वर्गाच्या स्टेशनांनां सुमारें ८ एकर जागा लागते, आणि कमी महत्त्वाच्या म्हणजे लहान स्टेशनांनां याच्या निम्यानें (सुमारें ४ एकर) जागा पुरतें. इतकी जमीन रेल्वे लाइनीला लागणार्या जागेखेरीज लागते. लाइनीच्या शेवटच्या स्टेशनाला ४ पासून ६ एकर आणि मालाची चढउतार करण्यासाठीं लागणार्या स्टेशनाकरितां २५ पासून ५० एकरपर्यंत जागा लागते. याखेरीज डबे व इंजिनें दुरुस्त करण्याचें कारखानें व जास्ती डबे व इंजिनें राखून ठेवण्यासाठीं १० पासून १२ एकर जागा लागते. ही सर्व स्टेशनास लागणारी जमीन पहिल्यानेंच घेऊन ठेवतात आणि इमारती मात्र जसजशा लागतील तसतशा बांधतात. मोठ्या रेल्वेच्या महत्त्वाच्या शेवटल्या स्टेशनावर निदान ४० माणसें सतत काम करावयास लागतात, आणि अशाच प्रकारच्या मालाच्या स्टेशनावी १४० पर्यंतहि माणसें ठेवतात. लाइनीवरील मोठमोठ्या स्टेशनावरून निदान १० माणसें तरी ठेवतात. आणि कमी महत्त्वाच्या स्टेशनांवर निदान ४ माणसें तरी कायम असावीं लागतात.

स्टे श नां ती ल रे ल्वे लाईन.- साधारण रीतीनें स्टेशनांतील रेल्वेलाईन एका लेव्हलमध्येंच ठेवतात, आणि स्टेशनांतून दोन्ही बाजूंला जाणार्या गाड्यांनां निघतांना उतार मिळेल आणि आत येतांना थोडासा चढ असेल अशीं व्यवस्था करतात. याच्या योगानें आंत येणार्या गाड्यांचा वेग चढाच्या योगानें आपोआपच कमी होत जातो आणि बाहेर जाणार्या गाड्यांचा वेग उतारांच्या योगानें वाढतो असें व्हावयास स्टेशनमधील रेल्वेलाईन भोंवतालच्या प्रदेशांपेक्षां थोडीशी उंच असावयास पाहिजे. म्हणजे स्टेशन उंचट जमीनीवर असलें पाहिजे. अशा प्रकारची उंचट जमीन सांपडत नसेल तर स्टेशनांतील रेल्वेलाईन दोन्ही बाजूंनीं येणार्या रेल्वेलाईनीच्या निदान लेव्हलमध्यें तरी असली पाहिजे. दोन्ही बाजूकडून स्टेशनांत येतांना निदान उतार तरी उपयोगी नाहीं.

सो यी.- कोणत्याहि स्टेशनाला आंत येण्याला चांगला केलेला रस्ता असावा, व त्यांत उतारुंनां आरामस्थानें (वेटिंगरूम्स) असली पाहिजेत. त्याचप्रमाणें विरामस्थानाविपतीचें ऑफीस (स्टेशनमास्टर्स ऑफिस), तिकिट ऑफिस, माणसांबरोबर जाणार्या सामानाचें वजन करण्याकरतां लगेज ऑफिस आणि बंगी ऑफिस (पार्सल ऑफिस) तार ऑफिस ही अवश्य असावीं लागतात, आणि शेवटच्या स्टेशनावर हरवलेलें किंवा डब्यांत विसरून राहिलेंलें सामान, त्याचप्रमाणें उतारुंनीं सांभाळून ठेवण्यासाठीं दिलेलें सामान ठेवण्याचेंहि ऑफिस असतें. तसेंच प्रत्येक स्टेशनाला माणसें गाडीतून उतरण्यासाठी बांधलेले उंच ओटे आणि माल व घोडे, गाड्या किंवा इतर जनावरें उतरण्यासाठीं धक्के बांधलेले असतात. याखेरीज मालानें भरून आलेले, त्याचप्रमाणें त्या स्टेशनावरून माल चढविण्यासाठीं आणलेलें रिकामे डबे वगैरे ठेवण्यासाठीं पार्श्वतती म्हणजे साइर्डिंग्ज असतातच. तसेंच शेवटच्या स्टेशनांतून राखून ठेवलेलीं एंजिनें व डबे ठेवण्यासाठीं लाइनी, एंजिनाचें तोंड वळविण्यासाठीं बिडाचें फिरणारे तराफे, पाण्याच्या टाक्या, यार्या, एंजिनांत पाणी भरवण्यासाठीं पाण्याचें नळ व सोंडीं व कांहीं काहीं ठिकाणीं जेवणाचे किंवा फराळाचे पदार्थ मिळण्याच्या जागा (रिफ्रेशमेंटरूम्स) तसेंच लोकांनां प्यावयास पाणी मिळावें म्हणून नळ, दिवाबत्तीची व्यवस्था, त्याचप्रमाणें प्रत्येक स्टेशनावर, स्टेशनमास्तर, तारमास्तर, हमाल, बावटेवाले व पोलिसशिपाई किंवा रखवालदार यांची राहण्याची व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणें शेवटल्या स्टेशनावर आणि ज्या ठिकाणीं एंजिनें आणि गार्ड बदलतात अशा स्टेशनांवरून एंजिनें चालविणारें व गार्ड यांची राहण्याचीहि व्यवस्था केलेली असते.

प्लॅ ट फॉ र्म.- माणसें उतरावयाचें ओटे (प्लॅटफार्म) निदान १५ ते २० फूट रुंदीचे आणि एक दोन फूट उंचीचे असावे व त्यांच्यावर कांही आच्छादन केलेलें असावें. थोरल्या लाइनी वरून माणसें उतरण्याचें ओटे (फ्लॅटफॉर्म) दोनपासून अडीच फूट उंचीचे असतात आणि धाकट्या म्हणजे ३। फुटांच्या लाइनीवरून १ पासून २ फूट उंचीचे असतात. जेव्हां ह्या ओट्यांच्या एकाच बाजूला रेल्वे लाईन असेल तेव्हा त्यांची रुंदी निदान २० फूट तरी असावी, आणि लाइनी दोन्ही बाजूंला असतील तेव्हां त्यांची रुंदी ३० पासून ४० फूटपर्यंत असावी. साधारण रीतीनें निदान ४०-४० मैलांच्या अंतरावर तरी एंजिनच्या पाण्याची टाकी भरण्याची व्यवस्था करावी लागते. म्हणजे एखाद्या अंतरांत कोठेंना कोठें तरी पाण्याची टाकी उभारून ती पंपानें किंवा मोटेनें भरण्याचीं व्यवस्था केली पाहिजे.

च ढ उ ता रा च्या फ ळ्या.- रेल्वेलाइनीवरून जातांना लाइनीला चढ किंवा उतार किती आहे हें दाखविण्यासाठीं आंकडे कोरलेल्या लांकडी फळ्या किंवा लोखंडी पत्रे किंवा दगडी फरशा जेथें जेथें चढ किंवा उतार बदलतो अशा ठिकाणीं बसविलेल्या असतात. चढ आहे कीं, उतार आहे हें दाखविण्यासाठीं ह्या फळ्या किंवा पत्रें अथवा फरशा यांचे माथे चढते किंवा उतरते बसवितात. ते पाहिल्याबरोबर चढ आहे किंवा उतार आहे हें ताबडतोब समजतें. आणि त्यांच्यावर जो आंकडा कोरलेला असतो त्यावरून किती फुटांत १ फूट चढ किंवा उतार आहे. हें समजतें. उदाहरणार्थ, हा आंकडा तीनशें असला तर तीनशें फुटांत एक फूय चढ किंवा उतार आहे असें समजावें. हाच आंकडा बोरघाटांतल्याप्रमाणें ३७ असला तर ३७ फुटांत १ फूट इतका चढ किंवा उतार आहे असें समजावें. ह्या आंकड्यांचा उपयोग एंजिन चालविणारास फार होतो. कारण हा आंकडा तीनशें असतांना जर गाडीं चढून जात असेल तर त्यावेळीं जितकी वाफ एंजिन चालविण्यासाठीं तो सोडीत असेल त्यापेक्षां पुष्कळच जास्ती वाफ त्यानें घाट चढत असतांना ५० किंवा ३७ आंकडा पाहिला तर सोडली पाहिजे.

आ ग गा डी व र चे नो क र.- रेल्वेकंपनीचें मुख्य बोर्ड जरी विलायतेस असलें तरी त्यांचा येथें प्रतिनिधि असतो, त्याला एजंट म्हणतात. आणि तो येथील मुख्य अधिकारी असल्याकारणानें किती गाड्या कोणकोणत्या वेळी निघावयाच्या आणि प्रत्येक प्रकारच्या मालावर आणि माणसांच्या वर्गावर किती भाडें आकारावयाचें हें तो सरकारच्या रेल्वेच्या कन्सल्टिंग एंजिनिअरच्या सल्ल्यानें ठरवितो. ह्या एजंटच्या हाताखाली मालाची व माणसांची ने आण करण्याचा व्यवहार पहाणारा एक मुख्य अधिकारी असतो, त्याला जनरल ट्रॅफिक मॅनेजर म्हणतात. हा अधिकारी सर्व लाइनीची व्यवस्था पहात असतो. ह्याच्या हाताखालीं ट्रॅफिक सुपरिटेंडेन्ट असतात, व त्यांच्याकडे जे जे विभाग वाटूंन दिलेले असतात, त्या विभागांतील माणसांची व मालाची ने आण व तिकिटांचे होणारें उत्पन्न व चालू खर्च ह्या विषयींची जबाबदारी त्यांजवर असते, आणि लाइनीवर जी एंजिनें चालत असतात त्यांच्या संबंधाची सर्व व्यवस्था पाहणारा जो अधिकारी असतो त्याला लोकोमोटिव्ह सुपरिटेंडेंन्ट असें म्हणतात. साधारणत: प्रत्येक एंजिनवर एक एंजिन ड्रायव्हर म्हणजे एंजिन चालविणारा व आगटीवाला असे दोन इसम असावे लागतात. असे दोघे असले म्हणजे त्या त्या एंजिनाचा काय दोष, किंवा खोडी असतील व त्यांचा परिहार कसा करावयाचा हें एकदां माहीत झालें म्हणजें काम उत्तम रीतीनें चालते. प्रत्येक गाडीला तिच्या मागील बाजूच्या शेवटच्या डब्यांत एक संरक्षक (गार्ड) असतो आणि त्याच्या आज्ञेप्रमाणेंच गाडी चालवावयाची कीं, उभी करावयाची ही कामें एंजिन चालविणारा करतो. परंतु स्टेशनांत असतांना ह्या संरक्षकास स्टेशन मास्तरची म्हणजे विरामस्थानाधिपतीची आज्ञा मानावी लागते. लाइन पुरी तयार झाल्यावर तिच्या बारीक सारीक दुरुस्त्या करण्यासाठीं दर एक विभागाला रेसिडेंट एंजिनिअर असतो आणि त्याच्या हाताखाली लाइनीची तपासणी करणारे 'परमनंट वे इन्स्पेक्टर्स' असतात व दररोज रुळ बरोबर आहेत कीं नाहींत म्हणजे सलेपाट वगैरे खालीं दबले आहेत की नाहींत म्हणजे सलेपाट वगैरे खालीं दबले आहेत कीं काय हें आणि रुळांचा गाळा बरोबर आहे कीं नाहीं हें तपासतात.

डें ज र सि ग्न ल.- आगगाड्या फार वेगानें जात असल्याकारणानें एंजिन चालविणाराला लाइनीवर कांही अडथळा आहे कीं, काय किंवा अपघात होण्याचा संभव आहे कीं काय हें दूर अंतरावर असतानांच समजणें अवश्य असतें, कारण गतिरोधक कळी दाबल्यावरहि गाडी थोडीफार पुढें जातेच. ज्या वेळी आगगाड्यांचा वेग १० पासून २० मैलांपर्यंतच असेल त्या वेळेपेक्षां आगगाड्यांचा वेग ताशी ६० मैलांपेक्षां सुद्धां जास्ती देत असल्यामुळें आणि कांहीं गाड्या तर ८० पासून ९० मैलांपर्यंतहि न थांबतां नेत असल्यामुळें व अशा गाड्यांसाठी रेल्वेची लाईन नेहमीं मोकळी ठेवणें शक्य नसल्यामुळें ती लाईन जेव्हां जेव्हां व जेथें जेथें अडली असेल तेव्हां तेव्हां त्या त्या ठिकाणच्या दोन्हीं बाजूंकडून येणार्या गाड्यांसाठीं रस्ता आडवल्याबद्दलचें भयसूचक चिन्ह (डेंजर सिमल) म्हणजे लाल बावटा किंवा लाल फळी किंवा लाल कंदील त्या जागेपासून दूर अंतरावरून दोन्ही बाजूंनीं दिसेल असे दाखवितात. लाइनीवर कोणत्याहि प्रकारची अडचण नाही असें समजून आल्याखेरीज गाडी पुढें चालवीत नाहींत. आणि पुढें कोणतीहि आडकाठी नाही हें गाडी चालविणाराला फक्त सिग्नलवरूनच कळून येतें. जेव्हां भयसूचक म्हणजे तांबडें सिग्नल दिसत असेल त्यावेळीं एंजिन चालविणारांनी गाडी उभी केली पाहिजे. आणि जेव्हा सावधानपणानें जाण्याबद्दल हिरव्या रंगाच्या सिग्नलनें इषारा मिळतो. तेव्हां गाडीचा वेग कमी करून खबरदारीनें जावे असा नियम आहे. जेव्हां कोणत्याहि प्रकारचा अडथळा लाइनीवर नसेल तेव्हा निर्धोकपणानें जाण्याची इषारत म्हणून पांढर्या रंगाचा बावटा किंवा कंदील दाखवितात.

सि ग्न ल च्या खु णा.- ज्याप्रमाणें साध्या रस्त्यावरून जातांना जाणारानें गाडी डाव्या बाजूनें हाकावी असा नियम आहे, तसाच नियम रेल्वे संबंधानेंहि आहे. म्हणजे जाणार्या गाड्या नेहमीं आपल्या डाव्या बाजूनेंच जातात व म्हणून सिग्नलाच्या खांबाच्या एका बाजूची फळी पडलेली असेल ती ज्या दिशेनें येतांना डाव्या बाजूस पडलेली दिसेल त्या बाजूच्या गाडीसाठीं तें सिग्नल दिलेलें आहे असें समजावयाचें. तशीच फळी पहिल्याच्या उलट बाजूची पडलेली असेल तर ती उलट दिशेनें म्हणजे समोरून येणार्या गाडीला सिग्नल दिला आहे असें दर्शवितें. हे हात किंवा फळ्या सिग्नलच्या खांबाशीं काटकोनांत उभ्या असतात तेव्हां तें सिग्नल भयसूचक आणि जेव्हां ही फळी अर्धी पडलेली म्हणजे ४५ अंशाचा कोन होईल अशी वांकलेली असते तेव्हां ती सावधपणें येण्याबद्दलची सूचना असें समजतात. जेव्हां फळी पुरी पडलेली असेल तेव्हा निर्धास्तपणें जाण्यास हरकत नाहीं असें समजावें. हे हात वरखालीं करण्याची जी कळ केलेली असते. तिलाच रात्रीच्या उपयोगासाठीं वेगवेगळ्या रंगाचें कांचेचे तुकडे बसविलेले असतात. ते अशा रीतीनें की  हात जेव्हा आडवा म्हणजे काटकोनांत असेल त्यावेळीं त्या सिग्नलच्या खांबावर जो दिवा लावलेला असतो त्याच्या तोंडासमोर तांबडी कांच येते, व त्यामुळें तो लाल दिसतो आणि जेव्हां हात किंवा फळी अर्धी पडलेली असेल त्यावेळेस दिव्यासमोर हिरवी कांच येते, व त्यामुळें तो दिवा हिरवा दिसतो. हा हात पुरता पडलेला असेल त्यावेळी निर्भयतादर्शक पांढरा दिवा दिसतो.

इं ट र लॉ किं ग.- ह्या हात वरखालीं करावयाच्या सिग्नलांच्या कळींचा आणि रुळांचे सांधे बदलणार्या तराफांचा संबंध जोडलेला असतो आणि त्यामुळें रुळांचें सांधे बिनचूक रीतीनें बदलल्याशिवाय सिग्नल देतां येतच नाहीं. असें केल्यानें अपघात होण्याचा बिलकुल संभव रहात नाहीं. कोणत्याहि गाडीला सिग्नल द्यावयाचें म्हणजे जी लाईन निर्भय आहे ह्याचें तें सूचक असेल त्या लाइनीचाच सांधा सिग्नल देतांना आपोआप उघडला जातो आणि दुसर्या लाइनीचा बंद होतो. खेरीज अलीकडे 'इंटर लॉकिंग' म्हणजे यांत्रिक रीतीनें अडणा घालण्याची पद्धत निघाल्यापासून ज्या लाइनीवर एखादी गाडी चालत असेल त्याच लाइनीवर दुसर्या कोणत्याहि गाडीला जाण्याकरितां परवानगोरुप सिग्नल देतांच येत नाहीं. मुख्य लाइनीच्या सिग्नलाचे हात वरखालीं करावयाच्या तराफा स्टेशनांत सिग्नल केबिनमध्यें बसविलेल्या असतात. व ह्या तराफा किंवा दांडे फिरविले म्हणजे अर्ध्या मैलांपेक्षां जास्ती अंतरावर असणारी सिग्नलें देता येतात, व रुळांचे सांधेहि बदलता येतात. ह्या तराफा किंवा दांड्यापासून सिग्नलांपर्यंत तारेचे दोर फिरक्यावरून बसवून नेलेले असतात, आणि दांडा फिरविला म्हणजे हे दोर खेंचले जातात आणि अशा रीतीनें सिग्नल पाडतां येतें. कांहीं कांहीं ठिकाणीं फिरक्यांवरून लांबचलांब नळ्या किंवा गज बसविलेले असतात आणि दांडे फिरविले असतां रुळांचे सांधे बदलतां येतात, व सिग्नलहि देतां येतें हे सिग्नलांचे खांब बसवितांना ते जितक्या लांबून एंजिन चालविणाराला दिसतील तितके चांगले व खेरीज सिग्नल देणारालाहि दांडे फिरवितांनां सिग्नल दिसेल अशा ठिकाणीं बसवितांता व ते साधारण रीतीनें इतकें उंच ठेवतात कीं पहावयाच्या सिग्नलच्या मागच्या बाजूला आकाश दिसावें. सिग्नलच्या मागल्या बाजूस तें पहात असतांना जर दुसरे पदार्थ दिसले तर सिग्नल पडलें आहे कीं उभें आहे हें बरोबर समजत नाहीं.

आ वा जी सि ग्न लें.- ज्या वेळेला धुकें वगैरे पडलें असेल आणि सिग्नलें दिसत नसतील अशा वेळीं आवाज किंवा बार करणारी सिग्नलें वापरतात, आणि ही सिग्नलें रुळांवर ठेविलीं असतां जेव्हां त्यांच्यावरून कोणतीहि गाडी जाते तेव्हां त्यांत ते ज्वालाग्राही पदार्थ असतात त्यांचा एकदम भडका होऊन आवाज होतो आणि एंजिन चालविणाराला पुढें कांहीं तरी भय आहे अशी सूचना मिळते. जेव्हां कोणत्याहि कारणामुळें गाडी दोन स्टेशनांमध्यें एंजिन नादुरुस्त झाल्यामुळें किंवा इतर कोणत्याहि कारणामुळें उभी करावी लागते. त्यावेळीं त्या गाडीच्या संरक्षणासाठीं म्हणून गाडीच्या मागच्या बाजूला पुष्कळ अंतरापर्यंत अशीं सिग्नलें किंवा फटाकें रुळावरून पेरून ठेवतात. हे फटाके साधारणत: गाडीपासून दर ३०० वारावर १ ह्याप्रमाणें बाराशें बारापर्यंत म्हणजे सुमारें २/३ मैलपर्यंत रुळांवरून ठेवीत जातात. आणि इतक्या अंतरावर दोन्ही बाजूंच्या रुळावर १।१ असे फटाके ठेवतात. हें काम गाडीचा संरक्षक गार्ड किंवा त्याच्या हाताखालील ब्रेकवाला यांचें आहे. जेव्हां खांबांवर बसविलेल्या सिग्नलांत कांहीं बिघाड झालेला असेल म्हणजे पाडलेलें सिग्नल उभें करतां येत नसेल किंवा अशाच प्रकारच्या अन्य प्रसंगी सिग्नलवाला किंवा सांधेवाला यांनीहि अशाच प्रकारच्या सिग्नलांचा उपयोग करावा असे हुकूम दिलेले असतात. हेतु हा कीं, कोणत्याहि एंजिनाची त्याच्या अगोदर म्हणजे पुढें जाणार्या गाडीची व याची टक्कर होऊं नये. असें करण्याचा हेतू असा असतो कीं, कोणत्याहि बाजूनें जर चुकून गाडी आली तर त्या गाडीच्या एंजिन चालविणाराला पुढें लाइनीवर कांहीं अडथळा आहे असें समजून यावें आणि त्यानें गाडी उभी करावी.

वा फे ची शि टी.- ह्या वरील सिग्नलांखेरीज एंजिन चालविणारा वाफेची शिटी वाजवून संरक्षकला इषारत किंवा सिग्नल देण्याचाहि एक प्रकार आहे. कांहीं एंजिनांवरून एक गंभीर आवाज करणारी आणि दुसरी कर्कश आवाज करणारी अशा दोन प्रकारच्या शिट्या असतात. ह्यापैकीं भयाची इशारत देणें असेल तेव्हा गंभीर आवाजाची शिटी देतात आणि ही वाजली म्हणजे संरक्षकानें गतिरोधक कळी (ब्रेकस) लावल्या पाहिजेत. जेव्हां एकच प्रकारची शिटी असेल तेव्हा पुष्कळ वेळपर्यंत ती सारखी वाजविली म्हणजे गाडी येत आहे किंवा सर्व यथास्थित आहे असें समजावें आणि भयाची सूचना म्हणजे ब्रेक दाबण्याची इषारत देणें असेल तेव्हा ३ वेळ लागोपाठ शिटी देतात. जेव्हा एखाद्या जंक्शनांतून जावयाचें असेल तेव्हां किंवा सिग्नलवाल्याला गाडी येत आहे. याची इषारत देण्यासाठीं, तसेचं बोगद्यांत शिरतांनाहि शिटी मारतात कीं, ती ऐकून आंत कोणी माणसें काम करीत असलीं तर त्यांनीं लाइनीवरून दूर व्हावें, तसेंच जेव्हां धुकें असेल तेव्हां गाडी येत आहे असें सुचविण्यासाठीं वरचेवर शिटी मारीत रहातात.

सांधें.- सिग्नवाल्यानें सिग्नल देतांना चूक केली असतां गाड्यांची टक्कर होण्याचा संभव असतो, आणि म्हणून सिग्नलें आणि सांधे हीं दोन्ही सिग्नलवाल्याच्या कोठडी (केबिना)मधील दांड्याशीं जोडलेलीं असतात. यांपैकीं सिग्नलें तारेच्या दोरानें व सांधे हे लोखंडी गजांच्या योगानें जोडलेले असतात, आणि सांधे अशा रीतीनें एकमेकांशीं जोडलेले असतात कीं, एक सांधा फिरविला आणि त्याबरोबर सिग्नल दिलें की, दुसराहि सांधा त्याला अनुरूप अशा रीतीनें फिरावा यामुळें असें घडतें कीं, कोणत्याहि गाडीला सर्व ठीक (ऑल राइट) असें सिग्नल दिललें असलें तर त्या लाईनीवरचें दोन्ही सांधे एकदम उघडून गाडी त्या लाइनीवरून सुरळीत जाऊं शकते. एक सांधा उघडलेला व दुसरा खिळलेला किंवा बंद केलेला राहण्याच्या योगानें होणारे अपघात या रीतीनें टळतात. सांधेवाल्यानें सिग्नल बदलले असतां सांधेहि आपोआप बदलतात, व त्यामुळें या दोहोंचा सदासर्वदा मेळ राहतो. साधारणत: कोणतीहि गाडी कोणत्याहि स्टेशनावरून निघाली कीं, पुढच्या स्टेशनावर जाऊन पोंचेतोंपर्यंत तिच्या मागाहून कोणतीहि गाडी सोडीत नाहींत. आणि हा नियम अक्षरश: पाळला तर एकामागून एक जाणार्या गाड्यांची टक्कर कधींहि होत नाहीं.

पू ल.

कोणत्याहि ठिकाणी पूल बांधावयाचा म्हणजे कोणत्याहि जलप्रवाहाच्या एका कांठावरून दुसर्या कांठावर जाण्याचा मार्ग तयार करणें होय. हा बांधतांना त्याची जागा मुक्रर करणें हें पहिलें काम होय. ही जागा कायम करतेवेळीं प्रथम त्या ठिकाणीं पाया चांगला लागतो कीं, नाहीं हें पहावें लागतें. पाया चांगला लागत असल्यास ज्या सडकेवर तो पूल बांधणे आहे तिला दोन्ही कांठांवर थोडीफार वळणें देऊन नदीच्या ओघाच्या काटकोनांत तो बांधल्यानें त्याची लांबी कमी होऊन खालून पाणी जाण्याला कोणत्याहि प्रकारचा अडथळा होत नाहीं. पुलाखालून पाणी जाण्याला पुरेसा मार्ग राहील इतक्या कमानीं बांधाव्या लागतात. या कमानीं किती व काय मापाच्या गाळ्याच्या बांधावयाच्या हें ठरवावयास मोठ्या पुराच्या वेळीं एका सेकंदाला सहापासून दहा फुटांपर्यंत म्हणजे तासाला चार पासून सात मैल या वेगानें पाणी धांवत असल्यास किती चौरस फुटांचा मार्ग त्या पुलाच्या खालून ठेवला पाहिजे हें नक्की करावें लागतें. उदाहरणार्थ, एखादी नदी २५ मैल अंतरावरून येत आहे व त्या नदीच्या दोन्ही कांठांवरील सरासरी दोन मैल रुंदीच्या प्रदेशावरचें पाणी ओढ्यानाल्यातून त्या नदींत येत आहे, तर पुराच्या वेळी २५ x ४ = १०० चौरस मैलांवरचें पाणी त्या पुलाखालून जाईल. पाऊस पडण्यासंबंधानें असें आढळून आलें कीं, १५ मिनिटांत एक इंचपर्यंत देखील कधीं कधीं पाऊस पडतो. पण एका दिवसांत २०/२२ इंचांपेक्षां जास्त पाऊस पडत नाहीं. असा विलक्षण जोराचा पाऊस वीस पंचवीस वर्षांनी एखादेवेळीच पडतो. आणि तोहि लहानशा टापूंत फारच थोडा वेळ पडतो. ह्याकरितां एक चौरस मैलापेक्षां कमी प्रदेशावरून पाणी येत असलें तर दर तासास सव्वा इंचापेक्षां जास्त पाणी वाहून जाईल असें हिशोबांत धरतात. दहा चौरस मैलांवरील पाणी येत असल्यास दर तासाला सुमारें अर्धा इंच, आणि शंभर चौरस मैलांवरील पाणी येत असल्यास एक तृतीयांश इंच पाणी वाहून जाईल असा हिशेब समजतात. एक इंच पाऊस पडला असें म्हणतात त्याचा अर्थ असा आहे कीं, पाऊस पडत असतां उभ्या सरळ कांठाचें पंचपात्र ठेविलें तर त्यांत एक इंच जाडीचा पाण्याचा थर होईल. अशा रीतीनें दर सेकंदास किती घनफूट पाणी पुलाखालून जाईल हें काढतां येतें. उदाहरणार्थं, १०० चौरस मैलांवरील पाणी पुलाखालून जात असल्यास दर सेकंदाला
१०० X ५२८० X ५२८०X१/३X१/१२X१/६०X१/६०=२१५१०
घनफूट पाणी जाईल. कारण दर तासाला १/३ इंच इतकें पाणी वाढून जातें असें वर सांगितलेंच आहे व पुलाखालून महापुरांत दर सेकंदाला ८ फूट पाणी धांवेल असें समजल्यास २१५१०/ ८ = २६८९ इतक्या चौरस फुटांचा मार्ग पुलाच्या खालीं पाहिजे. आणि पुराच्या वेळीं नदीच्या तळापासून बावीस फूट उंचीपर्यंत चढून पाणी वाहात असलें व पुलाची दरएक कमान तीस तीस फूट रुंदीनें असली तर अशा पुलाला २६८९/३०x२२ = ४ कमानी लागतील. पुलाचें गाळे काढण्याची ही वरील रीत ओढे नाले, लहान नद्या ह्यांवरील मोर्यांनां व पुलांनां लावतां येतें. परंतु मोठ्या नद्यांवर पूल बांधावयाचें असल्यास पाणी जावयास किती वाट ठेवावयचीं हें ठरविण्यास दुसर्या रीतीचा उपयोग करतात. ती रीत पुढीलप्रमाणें:ज्या ठिकाणीं पूल बांधावयाचा असेल त्या जागेच्या प्रवाहाच्या काटकोनांत घेतलेला एक छेद व पुलाच्या वरच्या बाजूस एक मैलावर व खालच्या बाजूस एक मैलांवर पुराच्या वेळीं जितकें पाणी चढेल तेथपर्यंतचा दुसरा असे छेद घेणें व ह्या दोन मैलांत पाण्याच्या सपाटीत किती फुटांचा फरक पडतो तें पाणसळीच्या दुर्बिणक्षनें लेव्हल मापून काढावयाचें, व तितका ढाळ दोन मैलांत (१०५६० फुटांत) आहे, असें धरून गणित करावयाचें. हें गणित करतेवेळीं वर सांगितलेल्या तीन छेदांचें (सेक्शन्सचें) वेगवेगळे क्षेत्रफळ घेऊन त्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्लिन्नपरिघानें (वेटपेरिमीटर) भागावयाचें म्हणजे वाहत्या पाण्याची सरासरी खोली (हायड्रॉलिक मेन डेफ्थ) येतें. ह्या सरासरी खोलीला वर लिहिलेल्या ढाळानें गुणावें व त्या गुणाकाराचें वर्गमूळ काढून त्या वर्गमूळाला नियतगुणकानें गुणिलें म्हणजे प्रवाहाचा वेग दर सेकंदाला अमुक फूट असा येतो. या वेगास वर सांगितलेल्या तिन्ही छेदांच्या क्षेत्रफळाच्या सरासरीनें गुणिलें म्हणजे दर सेकंदाला किती घनफूट पाणी वाहून जातें हें निघतें. वर गणितानें आलेला वेग बरोबर आहे कीं, नाहीं हें वेगमापन यंत्राच्या साहाय्यानें पहातां येतें. ह्या छेदांत व हा पुराच्या वेळचा पाण्याचा पृष्ठभाग आहे.

अशाच रीतीनें एक मैल वर व एक मैल खाली असे जे छेद घेतले असतील त्यांचे क्षेत्रफळ, क्लिन्नपरिघ व चलज्वलाची सरासरी खोली काढतां येते. व ह्या तिन्ही ठिकाणच्या क्षेत्रफळांची सरासरी १६०० चौरस फूट आली व चलज्जलाची सरासरी खोली सुमारें ९ फूट आली व ह्या दोन मैलांत पुराच्या वेळच्या पाण्याच्या पृष्ठभागाला ९० फुटांचा ढाळ असला तर ह्या पुराच्या पाण्याचा वेग दर सेकंदास ७.८५फूट इतका होईल. तो असा:-समजा कीं, पाण्याचा वेग दर सेकंदाला किती फूट आहे हें काढावयाचें आहे व पुराच्या वेळचा नदीच्या पाण्याचा पात्राचा छेद 'क्षे' चौरस फुटांत दिला आहे व क्लिन्नपरिघ 'प' अमुक फूट दिला आहे आणि दोन मैलांत 'ढा' ढाळ हाहि फुटांतच दिला आहे. मग क्ष/प = चलज्जलसरासरी खोली 'खो' हाहि फुटांतच निघेल. यावरून क्षे / प = खो व नियत गुणक जो पात्राच्या गुळगुळीतपणावर व सारखेपणावर आणि पाण्याच्या कमजास्त खोलीवर अवलंबून असतो तो 'गु' यानें दर्शविला तर वेग = गु x ض खो + ढा / २०५६० आणि जर नदींत थोडे फार गोटे किंवा लव्हाळें असेल तर नियतगुणक हा कटरच्या पद्धतीनें ८५ होईल. कारण 'खो' हा वरील उदाहरणांत ९ फूट घेतला आहे आणि 'ढ' दोन मैलांत १० फूट घेतला आहे म्हणून वे = ८५ x ض९ x १० / १०५६० = ७.८५  फूट. दर सेकंदास ह्या वेगानें वरील घेतलेल्या उदाहरणांतील नदीचें पाणी पुराच्या वेळीं वाहील.

ना ले व पू ल.- पुलाखालून साधारणत: पाणी किती जाईल ह्याचा हिशेब करतांना जेवढ्या क्षेत्रफळावरून पावसाचें पाणी वाहून येऊन पुलाखालून जाईल तें क्षेत्रफळ पहाणीं करून काढतात आणि त्यावरून मोठ्या पुराच्या वेळीं दर सेकंदास किती घनफूट पाणी वाहील ह्याचा अंदाज काढतात, आणि हा अंदाज नदीकांठच्या लोकांनीं दाखविलेल्या महापुराच्या खुणांवरून आणि अशा महापुराच्या वेळीं दोन मैलांत पुराच्या पाण्याला किती उतार होता ह्यावरून वेगवेगळ्या रीतीनें करतां येतो आणि त्या दोन अंदाजांत कितपत मेळ असतो हें पाहातात. नुसत्या क्षेत्रफळावरून किती पाणी वाहील ह्याचा अंदाज करतांना क्षेत्र जितकें लहान असेल तितकें पाणी दर चौकस मैलावरून जास्ती वाहून जाईल असें घेतात. क्षेत्र फार लहान म्हणजे १ चौरस मैलांच्या आंत असल्यास १ तासांत २ इंच पाऊस पडून तितकेंहि पाणी वाहून जाईल म्हणजे १ चौरस मैलावरून १२८० घनफूट पाणी दर सेकंदास वाहून जाईल असें हिशेबांत घेतात. ह्यालाच १ तासास २ इंच जाडीचें पाणी वाहून गेलें म्हणावयाचें. तेंच क्षेत्र २० चौरस मैलांचें असल्यास ही पाण्याची जाडी म्हणजे वाहून जाणें दर तासास १.१७ इंच होतें. म्हणजेच एवढ्या क्षेत्रावरून दर सेकंदास १५१२० घनफूट पाणी वाहून जाईल हेंच क्षेत्र जर १०० चौरस मैलांचें असेल तर दर तासांत पाऊण इंच व क्षेत्र २०० चौरस मैलांचें असल्यास दर तासास अर्धा इंच पाणी वाहून जाईल म्हणजेच दर सेकंदास ६४५३० घनफूट पाणी वाहील असें ठरतें. हेंच क्षेत्रफळ १६०० चौरस मैल असल्यास दर तासास पाव इंच पाणी वाहून जाईल असें घेतात म्हणजेच दर सेकंदास २५६००० घनफूट पाणी वाहून जाईल.

नाल्यावरील पूल बांधतांना त्यांतून वरच्या हिशोबानें आलेलें पाणी दर सेकंदास सुमारें १० फूट इतक्या वेगानें वाहून जाईल एवढा मोठा गाळा ठेवावा आणि पाण्याच्या वेगानें मुख्य भिंतीचा व पार्श्वभिंत्तीचा पाया उघडा पडूं नये म्हणून पुलाखालीं फरशी करावी व त्याच्याहि खालच्या बाजूस दगडाचें पिचांग करावें. ह्यांत गाळ्याचें क्षेत्रफळ काढतांना त्यांची उंची खालील फरशीपासून तों कपानीच्या टाचेपर्यंत द्यावीत व कमानीचा वर्तुळखंड अजीबात सोडून द्यावा. असें रस्त्यावरील पुलांच्या बाबतींत करतात परंतु कालव्यासाठीं जे पूल करतात तेथें हे वर्तुळखंड हिशेबांत घेतले तरी चालतें. वर दर तासांत २ इंच पाणी वाहून जातें असें लिहिलें तें १०९ ते ७०० एकरावरून येत असेल तर समजावयाचें. १०० एकरांच्या आंत २॥ इंच पाणी दर तासास वाहून जाईल असें हिशेबांत धरतात.

पार्श्वभिंतीची जाडी माथ्याजवळ १। फुट ते १॥ फूट ठेवून खालीं पायांतील कांक्रीटला मिळतोपर्यंत आंतील बाजूस ४ फूट उंचीस १ फूट रुंदी इतका स्लोप येईल अशा बेताच्या पायर्या किंवा ऑफसेट सोडून रुंदी वाढवितात आणि भिंतींच्या बाहेरील बाजू ओळंब्यांत ठेवतात. ही जाडी व स्लोप ही भिंतीच्या रेषेच्या काटकोनांत मोजावयाची.

पार्श्वभिंती किंवा वुईंगवॉल्स बांधतांना आवटमेंटशीं त्यांचा १३५ अंशांचा कोन करून त्या साधारणत: बांधतात. मोर्या २-३ फूट गाळ्याच्याच असल्या तर त्यांच्या मुख्य भिंतीच्या जाडी सुमारें २ फूट ठेवतात. व त्यांच्यावर छावण्या पसरतात ह्याच्यापेक्षां गाळा मोठा म्हणजे सुमारें ५ फुटांचा असल्यास मुख्य भिंतीची जाडी ३ फूट ठेवून व मच्छाची जाडी २ फूट ठेवून त्यावर १ फूट जाडीची कमान बांधतात. गाळा १० फुटांचा असल्यास भिंती माथ्यापाशीं ३॥ फूट व तळांशी ४ फूट ठेवून कमानीची जाडी १। फूट ठेवतात व मच्छाची जाडी २॥ फूट ठेवतात. मोठ्या पुलांच्या पार्श्वभित्तीनां माथ्याजवळ जाडी १॥ फूट ठेवून भिंतीच्या रेषेच्या काटकोनांत बाहेरील बाजूंस फुटांस १ इंच इतका स्लोप देऊन आंतील बाजूंस फुटांस २ इंच इतका स्लोप देतात. पायर्या किंवा आफसेट सोडून तळापर्यंत रुंदी वाढवितात.

गाळा १५ फुटी असल्यास आवटमेंट्स माथ्यापाशीं ४। फूट रुंद होऊन मागील बाजूस एक फूटास १ इंच इतका स्लोप देतात आणि कमानी १५ इंच जाडीच्या करतात. गाळा २० फुटांचा असल्यास भिंतींची जाडी ५ फूट ठेवून कमानीं १॥ फूट जाडीच्या ठेवतात. व गाळा ३० फुटांचा असल्यास भिंतींची जाडी ६ फूट ठेवून कमानीची जाडी १ फूट ९ इंच  व मच्छांची जाची ४ फूट ठेवतात. असे पूल कधीं कधीं दगडाच्या किंवा विटांच्या आपटमेंट्स बांधून त्यांवर गर्डर घालून त्या गर्डरावर ३ इंच जाडीच्या सागवानी फळ्या घालून व लांकडी कठडा करून तयार करतात. अशा पुलाचा गाळा ५ फुटांचा असल्यास व रस्त्याची रुंदी १८ फूट असल्यास ३। x ५॥ इंच ह्या मानाचे ६ गर्डर घालून त्यावर ९ x ३ इंचांच्या फळ्या घालतात. तोच गाळा १० फुटांचा असल्यास १२ फूट लांबीची व ५॥ x ९। इंच ह्या मापाची ६ तुळवंटें घालून त्यांवर ९ x ३ इंच मापाच्या फळ्या घालतात आणि गाळा २० फुटांचा असल्यास २३॥ फूट लांबीचीं आणि ९॥ x १५॥ इंच ह्या मापाची सागवानीं ६ तुळवंटे घालून त्यांवर १० x ३ मापाच्या फळ्या घालतात आणि कठडा करण्यास ४ x ५ इंचांचे तळ गट घालून ४ x ४ चें माथ्यावरील अडवट व ४ x ३ इंचांचे मधील अडवट आणि खांब ४ x ४ चे व खांबांचे ती ३ x ४ चें करतात. जेथें भार जास्ती येणार असेल तेंथें प्लेटगर्डर वापरतात. अशा प्लेटगर्डरांचें गाळ्याच्या एकदशांश ते एकपंधरांश इतकी त्यांची जाडी किंवा उंची ठेवतात, आणि त्यांची वरील किंवा दाबांत असलेली प्लेटची रुंदी गाळ्याच्या एकतिसांश ते एकचाळीसांश इतकी ठेवतात. म्हणजे गाळा जर चाळीस फुटांचा असेल तर एक फूट ते सव्वाफूट रुंदीची प्लेट त्यांच्या वरील बाजूंस वापरतात, आणि गर्डरांचीं उंची सुमारें ३। फूट ठेवतात.

अशा गर्डरांत वापरावयाच्या प्लेटी पाव इंचापेक्षां कमी जाडीच्या नसाव्या. असे गर्डर भिंतीवर किंवा पुलांच्या मच्छावर ९ इंच ते १२ इंच जाडीच्या दगडावर ठेवतात. आणि त्यांच्यावर भार सारखा यावा म्हणून त्या दगडांनां वरचा भाग माठून व त्यावर शिशाचा पत्रा ठेवून त्यावर गर्डरांचीं टोकें टेकतात. जेव्हां गाळा ५० फुटांपेक्षांहि जास्ती असेल तेव्हां गर्डरांची टोकें बिडाच्या बैठकींवर बसवितात, आणि त्यांचें एक टोक उष्णतेनें प्रसरण पावून सरकण्यासाठीं त्यांच्या बिडाच्या बैठकीखाली बिडाचें रोलर बसवितात. व अशा रीतीनें त्यांचें प्रसरण व आंकुचन होण्यानें जी हालचाल होते तिला वाव ठेवतात. असे प्लेट गर्डर करतांना त्यांना त्यांच्या गाळ्याच्या १ ¸ ४८० उपेट देतात. हेतू असा कीं, त्याच्यावर भार आला म्हणजे तो तितका दबल्यावर लेव्हलमध्यें राहतो. उपेट न दिल्यास तितका तो दबलेला दिसेल. रस्ता जेव्हां कमी महत्त्वाचा असेल तेव्हां नद्यांनां  व ओढयांनां पूल न बांधतां ओढ्याच्या किंवा नद्यांच्या पात्रातच फरशी करतात. अशी फरशी करतांना रस्त्याच्या मध्यरेषेच्या वरच्या बाजूस ९ फूट अंतरावर ३ फूट खोलीची व १॥ फूट रुंदीची कांक्रीटची अथवा दगड चुन्याची भिंत बांधून व तीच भिंत कांठापर्यंत नेऊन पुराचें पाणी चढत असेल तितक्या उंचीपर्यंत निदान २ फूट खोल व १॥ फूट रुंद अशी कांक्रीटची अथवा दगडचुन्याची करतात. आणि तिच्यापासून १७ फुटांवर म्हणजे रस्त्याच्या मध्यरेषेपासून सुमारें १० फुटांवर ८ फूट खोलीचा व ३ फूट रुंदीचा चर खणून तो तळापासून ५ फूट उंची पर्यंत कांक्रीटनें भरून काढतात आणि त्यावर ३ फूट उंचीची आणि २ फूट जाडीची दगडचुन्याची अगर विटचुन्याची भिंत बांधून घेतात व ओढ्याच्या पात्रांतून बाहेर  निघाल्यानंतर ह्या भिंतीची जाडी व खोली १॥ x २ फुटांची ठेवून नदीच्या दोन्ही दरडी कापून व ३० फुटांत १ फूट इतका स्लोप देऊन जे रस्त्याचें दोन्हीं बाजूचे उतार बांधलेले असतील त्या उतारांवर पुराचें पाणी जितकें उंच चढत असेल तेथपर्यंत ह्या १॥ x २ फूट मापाच्या दगडचुन्याच्या अगर वीटचुन्याच्या भिंती नेऊन पोंचवितात. आणि नदीच्या पात्रांत किंवा ओढ्याच्या पात्रांत ह्या दोन भिंतीमधील वाळू व गोटे सर्व काढून टाकून त्यांत दोन फूट जाडीचा मोठ्या गोट्यांचा किंवा फुटलेल्या विटांचा थर करून त्यावर १ फूट जाडीचा खडीचा थर करून वरून रुळ फिरवून रस्ता तयार करून घेतात. फरशीच्या खालच्या बाजूस खड्डा पडूं नये म्हणून ५।१० फूट रुंदीचें डबराचें पिचिंग करून घेतात. नदीच्या पात्रांतून रस्ता बाहेर पडला म्हणजे दोन्ही बाजूंच्या १॥ x २ फूट भागाच्या भिंतीच्या मधला १८ फूट रुंदीचा भाग उकरून काढून तळाशीं १। फूट मोठे गोटे किंवा विटांचे रोडे घालून त्यांवर  ९ इंच खडी घालून रस्ता तयार करतात.

पु ला च्या पा यां ती ल पा णी खें च ण्या चे पं प.- जेव्हां पुलाच्या पायांत पाणी लागतें तेव्हां तें काढण्यास कोणत्या तरी उच्छोषक पंपांची अथवा जलोच्चालक यंत्राचीं जरूर पडते. जेथें २० फुटांपेक्षां जास्ती उंचीपर्यंत पाणी उचलावें लागत नाहीं अशा ठिकाणी हातपंपचा आणि २५ फुटापर्यंत केंद्रत्यागी. (सेंट्रीफ्यूगल) बंबाचा उपयोग करतात. ह्या पंपानीं पाणी खेचतांना उच्छोषण नलिकेच्या खालच्या तोंडाला जाळी बसवितात. ती अशासाठीं कीं, उच्छोषणनलीकेंत (सेक्शन पाईप) पानें, काड्या किंवा बारीक खडे किंवा रेती खेंचली जाऊं नये. ही उच्छोषणनलिका जितकी आंखूड करवेल तितकी करावी. तिच्यांत बांक बहुधां नसावे, व ती पंपापासून, ज्यांतून पाणी खेंचावयाचें त्या चराच्या अथवा खड्डयाच्या तळापासून सुमारें २ फूट उंचीवर राहील अशा बेतानें थोडा उतरतां ढाळ देऊन बसवावी. आणि ह्या नलिकेंत पाण्याची गति  दर सेकंदास २ फुटांपेक्षां जास्ती नसावी, आणि त्या नळीच्या खालच्या टोंकांशीं बसविलेल्या जाळीच्या भोकांचे एकंदर क्षेत्रफळ नळीच्या वर्तुळशाच्या क्षेत्रफळाच्या निदान दुप्पट तरी असलें पाहिजे. आणि अशा जाळीच्या वरच्या बाजूस फूटव्हॉल्व्ह बसविला पाहिजे. सेंट्रीफ्यूगल (केंद्रोत्सारी) पंप वापरणें असेल तर तशा ६ इंच पंपाला ६ हॉर्सपावर शक्ति लागते, आणि तेवढ्यानें दर मिनिटास ७०० ग्यालन पाणी काढतां येतें. आणि ७ इंची पंपास ८ हॉर्स पॉवरनें ९०० ग्यालन पाणी निघतें व ८ इंची पंपास १० हॉर्स पावरचे एंजिन लागतें, आणि त्यानें दर मिनिटांस ११०० ग्यालन पाणी खेचतां येतें. पलसामेटर नांवाच्या उच्चांलक पंचानें वाटेल तेवढें पाणी नुसत्या वाफेच्या दाबानें काढतां येतें. आणि असा पंप कोणत्याहि अडचणीच्या ठिकाणीं नुसत्या सांखळीच्या आधारावर लोंबत सोडतात. आणि त्याला जमिनीवर ठेवलेल्या बॉयलरमधून वाफेची नळी घालून त्या पंपांत वाफ सोडतां येते. म्हणून पायाच्या कामीं हा पंप फार उपयोगी पडतो. ज्या ठिकाणीं पाणी फार उंचीपर्यंत चढवावयाचें नसेल आणि पाण्याचा प्रवाहहि मोठा असेल अशा ठिकाणी सेंट्रीफ्यूगल पंप मोठा सोईचा असतो. नदी मोठी असून जीतून पाणी झिरपत आहे, अशा रेतीच्या पायांतून पाणी खेंचून काढून पाया भरणें फार खर्चाचें असतें. आणि हा खर्च एकंदर खर्चाच्या एकदशांश ते एकपंचमांश पर्यंतहि येतो. आणि एवढ्या खर्चांत ६ ते २४ फूटपर्यंत खोलीचा पाया घालतां येतो. लहान पूल किंवा नाले बांधतांना पायातून पाणी काढून टाकण्याचा खर्च कामाच्या एकंदर खर्चाच्या एकशतांश ते एकषोडशांश येतो. आणि तेवढयांत २॥ ते १४ फूट खोलीपर्यंत पाया घालतां येतो.

पु लां चे प्र का र.-पुलांचे अनेक प्रकार असतात. जसें कायमचे म्हणजे दगडाचे, लोखंडाचे किंवा विटांचे व दुसरे जुजवी कामापुरते लांकडांचे अथवा दोरांचे, व कांहीं ठिकाणीं होड्यांवरून लांकडाचे तराफे बांधून त्यावरून गाड्या वगैरे जाण्याची सोय केलेली असते ते. लहान लहान नाल्यावरून लांकडी पूल कधीं कधीं कायमचे बांधलेले असतात. पण वस्तुतः त्यांनां कायमचे म्हणतां येत नाहीं. कारण त्यांचीं लांकडें सडल्यानें किंवा कुजल्यानें ते पूल २५।३० वर्षांनीं नवीन बांधावे लागतात. कोणत्याहि पूल बांधावयाचा म्हणजे पुढील तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. (१) पूल बांधावयाची जागा मुक्रर करणें. (२) त्याला पाणी जाण्याला वाव किती ठेवावयाचा म्हणजे कोणत्या गाळ्याच्या किती उंचीच्या व किती कमानी करावयाच्या. (३) तो कोणत्या प्रकारचा म्हणजे कमानीचा किंवा लोखंडी कैच्यांचा व कोणत्या प्रकारच्या स्तंभांचा व बांधणीचा. आतां तो कोठें बांधावयाचा हें ठरवितांना ज्या रस्त्यावर तो बांधावयाचा असेल तो रस्ता फारसा बदलावा लागतां कामा नये. खेरीज त्या जागीं स्तंभाचा पाया घालावयास खडक किंवा अशाच प्रकारची मजबूत जमीन पाहिजे. पूल बांधतांना पुलाची लांबी फार वाढूं नये किंवा फार मोठा भराव करावयास लांगू नये अशा प्रकारच्या दोन्ही बाजूच्या दरडी उंच व नदीच्या पायाची रुंदी कमी अशी जागा असावी. नाहीं तर खर्च फार वाढतो. ज्या ठिकाणीं पूल बांधावयाचा त्या ठिकाणीं स्तंभाच्या व अंतिम धरित्रीभित्तींच्या पायासाठा खडक थोडक्याच खोलीवर लागत असल्यास पुष्कळ खर्च वांचतो, पण जर नदीच्या पात्रांत पुष्कळ खोलीपर्यंत रेतीच असेल तर, आणि नदीच्या प्रवाहाचा वेग फार असेल तर पाया तीस तीस, चाळीस चाळीस फूट व कधीं कधीं महानद्या ज्या ठिकाणीं समुद्रास मिळतात, अशा ठिकाणी ७०।८० फूट खोलपर्यंत पाया न्यावा लागतो.

ज्या ठिकाणीं महापुराच्या वेळीं पाणी कित्येक मैलपर्यंत फैलावतें अशा ठिकाणीं पूल बांधणें झाल्यास अशा महापुराच्या वेळीं दर सेकंदाला किती फूट पाणी वाहात असेल याचा अजमास काढावा लागतो, व इतकें पाणी त्याचा वेग फार न वाढतां पुलाखालून जाईल इतक्या जास्ती कमानी ठेवाव्या लागतात. नाहींतर पाण्यास जाण्याला पुरता वाव न मिळाल्याकारणानें वेग अतिशय वाहून स्तंभांच्या पायाला नुकसान लागण्याचा संभव असतो. कारण असें आढळून आलें आहे कीं, महानद्यांतून २५ फूट खोलीला सुद्धा विटांचे अथवा कौलांचे  तुकडे पात्रांतील रेतींत सांपडतात. यावरून असें सिद्ध होतें कीं, महापुरांत २५ फूट खोलीपर्यंतची रेती हलत व पुढें ढकलली जात असली पाहिजे. ज्या ठिकाणीं नदीचें पात्र अतिशय रुंद व सपाट असतें त्या ठिकाणीं महापुराच्या वेळीं दोन्ही काठावर लांबपर्यंत पाणी पसरतें. अशा ठिकाणी पूल, नदीचा जेथें खोल भाग आहे त्या ठिकाणीं बांधावा लागतो व दोन्ही बाजूंना मातीचा भराव घालून रस्ता करावा लागतो. अर्थांत ह्या भरावाचा माथा महापुरांतील पाण्याच्या पृष्ठभागापेक्षां निदान ६ ते १० फूट उंच असावा लागतो. ह्या दोन्ही बाजूंच्या भरावास धक्का लागू नये म्हणून नदीचा प्रवाह पुलाच्या कमानीतूनच सरळ निघून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करावी लागते. ही व्यवस्था म्हटली म्हणजे नदीचा ओघ पुलाच्या काटकोनांतच सरळ रेषेंत वाहील अशा रीतीनें निदान अर्ध्या मैलापर्यंत तरी लांकडांचे दुहेरी सोट ठोकून ते एकमेकांनां लांकडाच्या वाशांनीं जोडून व त्यांमधील जागा भरून काढून केलेले नियंत्रक बांध करावे लागतात. हे बांध दोन्ही काठांशी १५ ते ३० अंशांचा कोन करून नदी वाहते. त्या दिशेला करतात. म्हणजे त्यांच्यायोगोनं ह्या नियंत्रक बांधाच्या वरच्या व खालच्या बाजूला तिप्पट व पांचपट अंतरापर्यंत रेती व गाळ बसून कांठांकडील भाग उंच व मजबूत होतो, व नदीच्या मध्याकडचा भाग खोल होऊन पाणी पुलाच्या काटकोनांत वाहूं लागतें.

अशा प्रकारच्या पात्रांत सर्वत्र रेती असणार्या मोठ्या नद्यांवर लोखंडी किंवा पोलादी कैच्यांचेच पूल बांधतात. कारण अशा कैच्यांचा गाळा शंभर फूट (साबरमती), १८० फूट (नर्मदा), ३५० फूट (सिंधू) किंवा यापेक्षांहि वाटेल तेवढा मोठा करतां येतो. गाळे मोठाले असले म्हणजे स्तंभ थोडे लागतात, व अशा नद्यांच्या पात्रांतून स्तंभ करणें व त्यांचा पाया ३० पासून ८० फूट खोलीपर्यंत नेणें हे फार खर्चाचें काम असतें. म्हणून असे स्तंभ जितकें कमी उभारावे लागतील तितके चांगले. लहान नद्यांवरून पूल बांधावयाचे असले म्हणजे मात्र दगडांचे किवा विटांचें स्तंभ व कमानी करता येतात. कारण अशा ठिकाणीं फार खोल न जातां पाया कठिण किंवा मजबूत लागतो व कामहि एक किंवा दोन वर्षांत (पावसाळ्याखेरीजच्या महिन्यांत) होऊ शकतें. मोठ्या नदीच्या बाबतींत मात्र असें होऊं शकत नाहीं. कारण कमानीच्या पुलाला स्तंभ जास्ती लागतात व त्यामुळें पात्रांतील पाणी वाहण्याची जागा कमी होते पाया बांधण्यास खर्च जास्त लागतो, व कमानी बांधण्याच्या वेळीं त्यांनां आधार म्हणून तो लांकडीचा सांगाडा तयार करावा लागतो, तोहि पावसाळ्यांत काढतां येत नाहीं. म्हणून मोठ्या नदीवर कमानीचे पूल बांधणें अशक्य असतें.

पा णी जा ण्या स वा व ठे व ण्या ची प द्ध ति.- आतां पाणी जाण्याला वाव किती ठेवावयाचा हें ठरविण्यास पुलाच्या जागीं महापुराच्या वेळीं दर सेकंदाला किती घनफूट पाणी वाहील हें कांढलें पाहिजे. ज्या ठिकाणी नदीचे दोन्ही कांठ उंच असतात, व त्या कांठांवर पाणी कधीहि चढत नाहीं तेथें नदीच्या पात्राचा या काठांपासून त्या काठापर्यंत छेद द्याव व त्यावर पुराचें पाणी किती उंचीपर्यं चढतें, ह्याबद्दल पुरी खात्री करून घेऊन ती रेषा त्या छेदावर दाखवावी. अर्थात दोन्ही बाजूंच्या पुरांत चढलेल्या पाण्याचे बिंदू एका लेव्हलमध्ये असले पाहिजेत. ह्या रेषेच्या खालच्या नदीच्या पात्राचा भाग म्हणजेच पुराच्या वेळच्या वाहत्या पाण्याचा छेद होय. तो छेद किती चौरस फूट आहे हे मापून काढतां येते, व पुराच्या वेळीं पाणी काय वेगानें धांवेल ह्याचा अंदाज काढावयास पुलाच्या वरच्या बाजूस एक मैल व पुलाच्या खालच्या बाजूस एक मैल असेच छेद घेऊन महापुराच्या वेळी पाणी किती उंच चढतें हे त्या छेदावर दाखवावयाचे आणि हे तिन्ही छेद लेव्हल घेऊन एकमेकांस जोडावयाचे म्हणजे ह्या दोन मैलांत पुराच्या पाण्याचें लेव्हल किती कमी झालें हें कळेंल, व त्यावरून दोन मैलांत अमूक फूट पुराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचा ढाळ आहे हें समजेल. ह्या ढाळावरून व वाहात्या पाण्याच्या सरासरी खोलीवरून पुराचें पाणी किती वेगानें धांवेल हें काढतां येतें. पूल बांधला म्हणजे नदीच्या पात्राचा बराच भाग पुलाचे स्तंभ व बाजूच्या भिंती यांनी व्यापिला जातो, व त्यामुळें पूल बांधावयाच्या अगोदरच्यापेक्षां पूल बांधल्यानंतर पाणी जाण्याचा मार्ग कांहीं प्रमाणानें कमी होतो, व ह्यांच्या व्यस्त प्रमाणांत पुराच्या पाण्याचा वेग वाढतो. ह्याकरितां गाळे इतके जास्ती ठेवावे लागतात कीं, हा वाढलेला वेग दर सेकंदाला पांच किंवा सहा फुटांपेक्षां जास्त होऊं नये.

यांपेक्षां जास्ती वेग झाल्यास स्तंभांच्या पायांनां नुकसान लागण्याचा संभव असतो. स्तंभांचा पाया जर खडकावर घातलेला असेल किंवा ४० फूट खोलीपर्यंत नेलेला असेल तर मात्र पांच सहा फुटांपेक्षां जास्ती वेग झाला तरी चालेल. रेतीमध्यें पाया इतका खोल घेण्याचें कारण असें आहे कीं, पाणी फार वेगानें वाहात असलें व मध्ये कांहीं अडथळा झाल्यामुळें पाण्याचें भोंवरे बनत असले म्हणजे २५ फूट खोलीपर्यंतहि रेती, हलते व पुढें सरकूं लागते असें आढळून आलें आहे. नदीच्या पात्रांतील रेती किंवा माती हलवावयाचें किंवा वाहून जाण्याचें कारण नदीच्या तळाजवळ असलेला पाण्याचा वेग होय. हा वेग नेहमं पृष्ठावरील पाण्याच्या वेगापेक्षां कमी असतो. पृष्ठभागाचा पाण्याचा वेग जर चार फूट असेल तर तळच्या पाण्याचा वेग ३ फूट असतो; पृष्ठभागाच्या पाण्याचा वेग ८ फूट असला तर तळाच्या पाण्याचा वेग ६॥ फूट असतो. हा तळचा वेग सेकंदास ३ इंचाचा असेल तर गाळ किंवा माती वाहूं लागते. वेग १ फुटाचा असल्यास सरासरी हरभर्यायेवढे वाळूचें खडे वाहूं लागतात, ३ फुटांचा असल्यास मोठमोठाले गोटे वाहूं लागतात, ६ फुटांचा असल्यास थराथराचा खडक झिजूं लागतो व हाच वेग दर सेकंदास १० फुटांचा असल्यास कठिण खडकहि झिजावयास लागतो. पूल बांधल्यामुळें पाणी चढेल किंवा फुगेल हें पुढील सूत्रानें काढतां येतें. समजा कीं, 'उं' फूट इतकें पाणी चढलें आणि 'क्षे' चौरस फूट इतकें पूल बांधावयाच्या पूर्वीचें पुराच्या वेळच्या पाण्याच्या छेदाचें क्षेत्रफळ आहे. व 'पू' चौरस फूट इतकी पूल बांधल्यानंतरची पाण्याला जाण्याला वाट आहे. हे क्षेत्रफळ काढतांना पूर्वीचें जें पाण्यानें लेव्हल होतें तेंच धरावयाचें, फुगलेल्या पाण्याचें मात्र धरावयाचें नाहीं व एक सेकंदाला 'ग' फूट इतका पूल बांधावयाच्या पूर्वीच्या पाण्याचा वेग असला तर
उ={(ग)२/५८.६+.०५} {(क्षे/पु)-१} हें सूत्र

पाणी किती फुगेल तें दाखवील. उदाहरणार्थ समजा कीं, नदीची रुंदी पूल बांधावयाच्या पूर्वी ९०० फूट व सरासरी खोली ८ फूट आहे, व पूल बांधल्यानंतर पाणी जाण्याचा मार्ग २२५ फूट असला व दोनहि वेळां खोली सारखीच घेतली व पूल बांधाण्याच्या पूर्वीचा पुराचा वेग दर सेकंदास ३॥ फूट असला तर पूल बांधल्यावर पुलाच्या वरच्या बाजूला पाणी सुमारें ३.९ फूट फुगेल अथवा चढेल कारण

{३.५X३५/५८.६+०.५} {(९००X८/२२५X८)-१}= ३.८८५          
    
फूट होते. या फुगलेल्या पाण्याच्या पृष्ठापर्यंत कमानींतून वाहाणार्या पाण्याची उंची धरून कमानीच्या एकंदर लांबीला या उंचीनें गुणिलें म्हणजे पुलाखालून वाहणार्या पाण्याचे क्षेत्रफळ झालें व पुराच्या वेळी दर सेकंदाला अमुक घनफूट पाणी वाहतें असें काढून त्या संख्येला या क्षेत्रफळानें भागिलें म्हणजे पुलाखालून जाणार्या पाण्याचा वेग निघतो. हा वेग सेकंदाला ५/६ फुटांपेक्षां जास्ती होत असला तर पुलाच गाळे किंवा त्यांची संख्या वाढवावी लागतें. अशा रीतीनें पुलाचे गाळे ठरल्यानंतर पूल बांधण्याच्या योगानें फुगणार्या पाण्याच्या लेव्हलपेक्षां निदान एक फूट तरी उंचीपर्यंत स्तंभ बांधून नंतर कमानी कराव्या. नदीच्या दरडी उंच असल्यास कमानी जास्त उंचीवरून सुरू करावयास मिळाल्या तर जास्तच चांगलें लहान पूल व नाले यांतून पाणी जाण्याला वाव किती ठेविली पाहिजे ते ठरविण्यास किती एकरांवरून किंवा किती चौरस मैलांवरून पाणी येतें हें पहावें व नंतर डिकेनच्या सूत्राप्रमाणें सेकंदास किती घनफूट पाणी त्या ठिकाणाहून जाईल हें काढावें आणि इतकें पाणी सेकंदास ५ फूटांच्या वेगानें जाण्यांला किती चौरस फुटांचा मार्ग लागेल हें काढावें व पुराच्या वेळची खोली किती फूट असतें हें पाहून किती फुटांचें किती गाळे लागतील हें काढावें. डिकेनचें सूत्र:-'म' चौरस मैल एवढ्या क्षेत्रावरून जर पाणी वाहून येत असेल आणि 'घ' घनफूट एका सेकंदास पुराच्या वेळीं वाहून जात असेल तर घ =८२५x४ضम३ समजा 'म' हा ४० एकर आहे. तर 'घ' हा दर सेकंदास १०३ घनफूट होईल. म्हणजे ४० एकरावरून २॥ इंच पाऊस पडला असतां व तितकेंहि पाणी वाहून गेलें असतां जितकें घनफूट पाणी येईल तितकेंच झालें. 'म' जर एक चौरस मैल असेल तर ८२५ घनफूट म्हणजे सुमारें १। इंच पावसाइतकें. 'म' १६ चौरस मैल असल्यास 'घ' ६६०० घनफूट म्हणजे – इंच पावसाइतकें व 'म' १०० चौरस मैल असल्यास 'घ' हा २६४०० घनफूट होईल. म्हणजे सुमारें १/३ इंच पावसाइतकें.

पू ल बां ध ण्या चा प्र का र.- आतां पूल कशा प्रकारच्या बांधावयाचा हें, कोणत्या प्रकारचें सामान म्हणजे दगड, विटा, चुना वगैरे मिळतात व किती पैसा खर्च करावयाचा नदीचा तळ कोणत्या प्रकारचा आहे यांवर अवलंबून राहतें. ज्या वेळेला रेतींत पाया खोदावयाचा असतो त्या वेळीं पायाचें खोदाण करीत असतांना बाजूची रेती ढासळूं नये म्हणून फळ्यांची भिंती चोहोंकडून करतात. ह्या भिंतीच्या फळ्या किंवा बहालें अडीच इंचापासून १० इंच जाडीची व जितकीं जास्ती रुंदीची मिळतील तितक्या रुंदीची असतात व त्यांची खालचीं टोकें कुर्हाडीसारखी घडून निमुळतीं करतात, व ती पुष्कळ खोलीपर्यंत ठोकावयाची असल्यास त्यांच्या निमुळकत्या भागापुरतें लोखंडी पत्रे जडतात व तीं एकमेकापासून सुटून जाऊं नयेत किंवा त्यांच्यामध्यें सांध किंवा फट पडूं नये म्हणून प्रत्येक फळीच्या एका बाजूला तिकोनी खोबण व दुसरी बाजू खोबणींत बरोबर बसेल अशी घडतात.

ज्या नद्यांतूंन फार खोलीपर्यंत रेतीच असते अशा पात्रांत बिडाचे + या आकृतीचे सोट किंवा पोकळ चौरस किंवा वाटोळे नळ लांकडी खुटांप्रमाणेंच ठोकतात. हे बिडाचे सोट किंवा नळ किंवा नळ ठोकतांना ते घणाच्या आघातानें फुटूं नयेत म्हणून फार खबरदारी घ्यावी लागते, व ह्याकरतां ते ठोकतांना त्याच्या माथ्यावर लांकडी ठोकळे तर ठेवतातच परंतु शिवाय त्यावर घड पडावयाचा तोहि चार किंवा पांच फूट उंचीपेक्षां जास्ती उंचीवरून टाकींत नाहींत. हे बिडाचे नळ किंवा सोट खार्या पाण्यांत वापरतां येत नाहींत कारण क्षाराच्या योगानें त्यांचा पृष्ठभाग चाकूनें कापतां येईल इतका मऊ होतो. कधीं कधीं आगगाडीचे रूळ एकमेकाला जोडून त्यांचे चौरस किंवा पैलूदार सोट तयार करून जमिनींत एकमेकांपासून ४-५ फूट अंतरावर ठोकतात. व त्यांच्यावर पुलांचे रुळ एकमेकांस जोडून स्तंभ करून दहा बारा फूट गाळ्यापर्यंतचे, बैलगाड्या जावयाजोगे पूल बनवितात.

याखेरीज दुसर्या प्रकारचेहि लोखंडी सोट कधीं कधीं वापरतात. अशा सोटांना खालच्या बाजूला त्या सोटांच्या व्यासापेक्षांहि मोठ्या व्यासाचा स्क्रू बसविलेला असतो. व हे सोट उजवीकडून डावीकडे फिरविल्यानें स्क्रू व त्याच्याबरोबर सोय जमिनींत उतरतो व अशा रीतीनें कठिण मीन लागेतोपर्यंत असे स्क्रू बसवून सोट जमिनीत उतरवितां येतात हा स्क्रू बहुतकरून बिडाचाच बनविलेला असतो. व सोट फिरवून तो स्क्रू जमिनीत बसवावयाचा असल्याकारणानें सोट लांकडाचा किंवा बिडाचा, पोकळ नळासारखा असल्यास वाटोळाच असावा लागतो, व तळाच्या स्व्रूचा म्हणजे मळसूत्राचा बहुतकरून एकच आटा असतो. ह्या आट्याच्या योगानेंच सोट खालीं खालीं उतरत जातो. ह्या स्क्रूच्या आट्याचा व्यास, मधल्या सोटाचा जितका व्यास असेल त्याच्या दुप्पटीपासून आठपटीपर्यंत असतो, व एक आट्यापासून दुसर्या आट्यापर्यंतचें अंतर त्याच्या निमपट किंवा पावपट असतें. बी. बी.सी.आय्. रेल्वेच्या जुन्या पुलांचे सोट अशा रीतीनें बसविलें होते. त्यांच्या तळचा स्क्रू साडेचार फूट व्यासाचा असे. व ते फिरविण्याला त्या सोटाच्या माथ्याला चाळीस चाळीस फूट लांबीचे, चार दिशेला चार दांडे जोडून व त्या प्रत्येक दांड्याला आठ आठ बैल लावून ते सोट फिरवीत असत. व अशा रीतीनें गुजरात सारख्या खडक नसलेल्या जमिनीत २० पासून ४५ फूट खोलीपर्यंत असे स्क्रू व सोट उतरविलेले आहेत. व त्यांवर लोखंडी नळाचे स्तंभ उभे करून त्यावरून रेल्वेचे पूल केले आहेत. पुलांचे पाये जेव्हां फार खोल न्यावे लागतात त्यावेळीं मोठ्या व्यासाचे म्हणजे ५ पासून १५ फूट पर्यंत व्यासाचे बिडाचे नळ तीसपासून ८० फूटपर्यंतहि खोल उतरवितात, व ते पुलाच्या कैच्या बसावयाच्या सपाटीपर्यंत चढवीत नेल्यावर कांक्रीटनें भरून काढतात. भडोचजवळी नर्मदेच्या पुलाच्या जमिनींत उतरविलेले पायाचे बिडाचे नळ किंवा पंचपात्र १४ फूट व्यासाचे आहेत. व ते ७० फूट जमिनींत उतरविलेले आहेत व त्यांचा जमिनीवरचा कैचीपर्यंतचा भाग १० फूट व्यासाचा आहे. एकमेकांस लोखंडी जहालांनी जोडलेले दोन नळ मिळून पुलाचा एक एक स्तंभ (पियर) होतो व स्तंभापासून स्तंभापर्यंतचें अंतर म्हणजे पुलाच्या कैच्यांचा गाळा १८० फुटांचा आहे,असे एकंदर २५ गाळें आहेत अमदाबाद येथील साबरमतीच्या पुलाची बिडाची पंचपात्रें ६ फूट व्यासाचीं आहेत. ती ३५ फूट खोलीपर्यंत वाळूंत उतरवून खाली माण माती लागेतोंपर्यंत नेलेलीं आहेत व सिमेंट कांक्रीटनें भरून वाळवंटाच्या सपाटीपर्यंत आल्यानंतर त्या नळाचा व्यास ५ फूट करून कैच्याच्या तळापर्यंत चढवीत नेलेले आहेत. ह्या पुलाचा प्रत्येक गाळा १० फुटांचा आहे, व असे १४ गाळे आहेत. नर्मदेच्या पुला्च्या स्तंभाची पंचपात्रें सहा सहा तुकड्यांनी बनविलेली आहेत. प्रत्येक तुकड्याच्या चारी कडांनां पाळ असते, त्या पाळींतून बोल्ट घालून ती जवळच्या तुकड्याच्या पाळीला पक्की करतात. व अशा रीतीनें त्यांनी पंचपात्रें बनवितात. एक पंचपात्र दुसर्या पंचपात्रावर ठेवून जोडण्यासाठींहि तशाच प्रकारच्या पाळींतून बोल्ट घालतात, व अशा रीतीनें वाटेल तितक्या उंचीचें पंचपात्र तयार करतां येतें. या पंचपात्रांची जाडी एक इंचापासून दीड इंचापर्यंत असते व त्यांना बाहेरच्या बाजूला सांधा नसल्याकारणानें ती खालीं उतरविण्याला अडचण पडत नाहीं. ह्या पंचपात्रांची खालची धार विंधण्यासारखी निमुळती केलेली असते व त्यामुळें त्यांच्या माथ्यावर पुष्कळ भार घातला व आंतील रेती व माती काढून घेतली म्हणजे ती खाली उतरत जातात. अशा प्रकारची पंतपात्रें उतरविण्याचें दोन प्रकार आहेत; पैकीं पहिल्या प्रकारांत पंचपात्रांचे सर्व सांधे, त्यांत हवा न जाईल असे करतात. असे सांधे करण्यासाठीं त्या सांध्यामध्ये रबराची रुंद पट्टी बसवितात व नंतर पंचपात्राचे वेगवेगळे भाग सांधणारे बोल्ट घट्ट करतात अथवा ते सांधे लोखंड जोडावयाच्या लुकणानें भरून काढतात, व नंतर सांध्याचें बोल्ट घट्ट करतात. हें लुकण म्हणजे १००० भाग लोहपिष्ट, १० भाग नवसागर विरून जाईल इतकें पाणी घालून या सर्व वस्तूंचे मिश्रण करून त्याचा गोळा बनवितात व नंतर त्याचा उपयोग सांधे भरण्याकडे करतात. असे सर्व सांधे पक्के केल्यानंतर त्या पंचपात्राला अशाच रीतीनें हवा न जाण्याजोगें झांकण बसवितात व नंतर त्या पंचपात्रांतील हवा वाताकर्षक यंत्राच्या योगानें बाहेर काढतात व अशा रीतीनें पंचपात्रांतील आंतला सर्व भाग निर्वात झाला म्हणजे बाहेरील हवेच्या दाबानें तें पंचपात्र तळच्या मातींत किंवा रेतींत घुसत जातें. पंचपात्र जर पूर्ण निर्वात झालें तर बाहेरच्या हवेचा दाब पंचपात्राच्या पृष्ठभागावर दर चौरस इंचावर सुमारें १५ पौंड म्हणजे दर चौरस फुटास सुमारें एक टन पडत असल्यामुळें त्या दाबानेंच तें मातींत उतरतें. हें पंचपात्र जर १० फूट व्यासाचें असेल तर त्यावर हवेचा दाब सुमारें ७५ टन असतो, व त्याच्या आंतली पोकळ निर्वात केली तर त्यावर ७५ टनांचे ओझें ठेवल्याप्रमाणें कार्य घडतें व अशा रीतीनें त्या पंचपात्रावर बाहेरून जास्त ओझें न घालताहि इष्टकार्य सांधतें. ज्या जमिनींत झाडाच्या मुळ्या लांकडाचें तुकडे किंवा मोठालें दगड वगैरे पंचपात्राला हवेच्या भारानें खाली जमिनींत उतरण्याला अडथळा करणारें पदार्थ सांपडत नसतील अशा ठिकाणीं ही रीत उपयोगांत आणतां येते व ज्या ठिकाणीं असें पदार्थ आढळतात व जे आंत मनुष्य गेल्यावाचून तोडून किंवा फोडून काढतां येत नाहींत अशा ठिकाणी पंचपात्रें निर्वात करून उतरविण्याची रीत लागू करतां येत नाहीं; अशा ठिकाणीं दाबलेल्या हवेच्या साहाय्यानेंच काम करावें लागतें. दाबलेल्या हवेच्या साहाय्यानें काम करतांनाहि वरच्या रीतीप्रमाणेंच सर्व पंचपात्र व त्याचें झांकण आंतील दाबलेली हवा बाहेर न येईल इतके एकजीव करावे लागतात. व त्या पंचपात्रांत उतरावयासाठीं हवेचा दाब कमीजास्ती करावयास यावयाजोगें एक पंचपात्र त्या पायाच्या पंचपात्रावर बसवितात, व नंतर हवा दाबण्याच्या यंत्रानें त्या पंचपात्रांतील हवा दाबतात व अशा रीतीनें दर चौरस इंचाला १५ पौंडाइतका बाहेरील हवेपेक्षां पंचपात्रांतील हवेचा दाब जास्त असेल तर ३४ फूट खोलीपर्यंतचें पाणी आंतील हवेच्या दाबानें बाहेर फेंकलें जाईल. असें करण्यासाठीं त्या पंचपात्रांत एक नळ बसवितात. त्या नळाचें एक तोंड पंचपात्राच्या तळाजवळ व दुसरें पंचपात्रातून बाहेर काढून जमिनीवर तें पाणी पडेल अशा रीतीनें बसविलेलें असतें. ह्या नळांतून पंचपात्रांतील ३०।३२ फूट खोलीपर्यंतचें राड पाणी हवेच्या दाबानें जोरानें फेकलें जातें, ह्यापेक्षा जास्त खोलीपर्यंतचें पाणी काढून टाकणें असेल तर हवेचा दाब वाढविला पाहिजे. ८०।९० फूट खोलीपर्यंत पंचपात्र उतरविणें असेल तर दर चौरस इंचास ४५ पौंड दाब पुरा होतो. अशा प्रकारच्या दाबलेल्या हवेच्या पंचपात्रांत मनुष्यांनां सोडून त्यांच्याकडून पंचपात्रांत उकरण्याचें किंवा त्या पंचपात्रास खालीं सरकण्यास अडचण करणारें लांकडाचे तुकडे कापून काढावयाचें किंवा मोठे दगड लागले असल्यास फोडून काढावयाचें काम करतां येतें. अशा दाबांत दोन तीन तासांपेक्षां जास्ती काम करतां येत नाहीं. यामुळें अशा कामाला म्हणजे पंचपात्र उतरविण्याला फार वेळ लागतो व खर्चहि फार येतो. अशा दाबलेल्या हवेच्या पंचपात्रांत उतरावयाच्या वेळीं वरच्या पंचपात्रांतील हवा जी मानुष्य उतरण्याच्या वेळेस मोकळ्या हवेच्या दाबाइतकी असते ती मनुष्य तिच्यांत उतरल्याबरोबर वरील