प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
            
सौंदर्यशास्त्र (एस्थेटिक्स)— याला सौंदर्यशास्त्र, सदभिरुचिशास्त्र किंवा ललितकलांविषयीचें तत्त्वज्ञान वगैरे नांवे देतां येतील. या शास्त्राची मजल सौंदर्याचा फक्त मनोमय आस्वाद घेण्यापर्यंत जात असते. या शास्त्राच्या क्षेत्रांत विशेषतः नयनमनोहर देखावे पाहणें व कर्णमनोहर ध्वनी ऐकणें या गोष्टी येतात. शुद्ध सौंदर्यप्रेमाचा हा विषय आहे; यावेळीं मनाची वृत्ति साधारणपणें शांत असतें; यांत प्रबळ मनोविकार जागृत होत नसतात. नितान्त रमणीय स्त्रीसौंदर्याचा किंवा अत्यंत हृदयद्रावक शोकरसाचा देखावा पहात असतांनाहि मनाची फारशी चलबिचल होतां कामा नये, तरच त्या इसमाला खरा सौंदर्यप्रेमी म्हणतां येईल. याचा अर्थ सौंदर्यप्रेमी मनुष्यास सौहृद नको असा नाहीं, उलट त्यास सौहृद मोठें असलें पाहिजे; कां कीं सैहृदाशिवाय अभिज्ञताहि प्राप्त होत नसते. जगांतील सौंदर्यविषक पदार्थ सर्व मनुष्यांपुढें सारख्याच प्रकारचें असल्यामुळें त्यांची सौंदर्याविषयीचीं मतेंहि सारखीं असलीं पाहिजेत, असें सकृद्दर्शनी वाटेल पण प्रत्यक्ष व्यवहारांत असा अनुभव येतो की, 'भिन्नरुचिर्हि लोकः'. सौंदर्याविषयीचें मत बहुतेक माणसागणिक निरनिराळें पडतें. सदाभिरुचीच्या सूक्ष्म मुद्द्यांसंबंधानें तरी निदान प्रथमारंभीं मतभेद व्हावयाचाच, तर्क शास्त्राचीं किंवा नीतिशास्त्रचीं अनुमानें पुष्कळ अंशी नियमबद्ध अतएव मतभेदातीत असतात; अर्थात् त्या मानानें सौंदर्यशास्त्राचा विषय बराच अनिश्चित असतो हें खरें आहे. उदाहरणार्थ 'हा कदली वृक्ष आहे' या विधानाबद्दल मतभेद बहुतेक होत नाही, पण 'हा वृक्ष सुंदर आहे' असें म्हटलें कीं, तेथें मतभेद ठेवलेलाच. वैयक्तिक भावना किंवा पूर्वग्रह यांवर सौंदर्यविषयक मत किंवा आल्हादविषयक परिणाम अवलंबून असतात. एकाकाळीं आफ्रिकन निग्रॉस जितक्या अधिक काळ्या व जितक्या अधिक जाड ओठांच्या अशा स्त्रिया जास्त आवडत पण अमेरिकन निग्रोंस आज काकेशिअन स्वरूपाचीच स्त्री अधिक सुंदर वाटते. 'हें गुलाबाचें फूल सुंदर आहे, त्यामुळें माझ्या मनाला आनंद होतो' हें विधान सुद्धां सामान्यतः खरें मानावयाचें, त्यात तर्कशास्त्रप्रणीत सिद्धांताचें त्रिकालाबाधित्व नाहीं; कारण फूल सुंदर असलें तरी तें आनंददायक होईलच असें नाहीं; फुलांची आनंददायकता मनुष्याच्या तत्कालीन मनःस्थितीवरच अवलंबून असणार, हें उघड आहे. तात्पर्य, बाह्य पदार्थांची योग्यता ठरविण्याचें ज्ञान, त्या ज्ञानाचें भोजन जो मनुष्य त्यावर अवलंबून आहे.

सौंदर्यगुणाच्या शास्त्रीय विवेचनास अगदीं अलीकडे आरंभ झाला असून तें अद्याप बरेंच अपुरें आहे. त्याची वाढहि सावकाशच होणार; कारण त्यांत व्यावहारिक उपयुक्तता आज सामान्यांस किंवा तत्त्वज्ञांस भासून आली नाहीं. मानवी समाजाच्या प्रथमावस्थेंतहि पंचमहाभूतांचें नियमन करण्याची आणि व्यक्तींना कायदे व रुढी पाळावयास लावण्याची आवश्यकता भासते. सौंदर्यजन्य सुखांच्या मीमांसेचा प्रश्न तशा आवश्यकतेचा नाहीं. शिवाय पूर्वी व हल्लीहि सौदर्यविषयक भावनेचा उपभोक्ता वर्ग अल्पच आढळतो. सामान्यतः जनसमाजाला असल्या नाजूक कल्पना अपरिचितच असतात. आणखी असें कीं, या उच्च सौंदर्यप्रेमभावनेचें रुक्ष शास्त्रीय नियमांनी संशोधन करणें. रसिकवर्गांतील पुष्कळांना पसंत नसतें. आणखी सौंदर्यशास्त्र मागसण्याचें कारण असें कीं, हा विषयच मूळात वैयक्तिक अनुभवाच्या भिन्नतेमुळें व त्या भिन्नतेमुळें उत्पन्न होणारें ज्ञान शास्त्रीय नियमांत आणण्यास दिसून येणार्या अडचणींमुळें अवघड आहे. अनेक प्रकारचे रंग व त्यांच्या छटा किंवा अनेक प्रकारचें तालयुक्त सूर यांनी मनावर होणारा नाजूक परिणाम इतका चंचल स्वरुपीं असतो कीं, त्याची शास्त्रीय उपपत्ति लावण्याचें काम अवघड होतें. या सौंदर्यविषयांतील व्यक्तिव्यक्तींचा अनुभव समानसदृश्य असण्याऐवजी अत्यंत भिन्न व अनिश्चित असल्याचें दिसून येतें. एकाच संस्कृतीच्या निरनिराळ्या अवस्थांतल्या, निरनिराळ्या मानववंशांतल्या, निरनिराळ्या राष्ट्रांतल्या; फार काय पण एकाच समाजांतल्या निरनिराळ्या लोकांची सौंदर्यविषयक अभिरुचि इतकी भिन्नभिन्न असल्याचें आढळतें की, या विषयाचें शास्त्रीय विवेचन करून कांहीं सर्वव्यापी नियम ठरविण्याची गोष्ट अशक्यच वाटू लागते. तात्पर्य, सौंदर्यशास्त्राची उपपत्ति इतर आवश्यक शास्त्रांची बरीच प्रगति झाल्यावरच लागणार असें म्हणावें लागतें.

या विषयाचे अगदीं अलीकडील विवेचन पाहिलें तरी तें पूर्ण शास्त्रीय पद्धतीनें झाल्याचें दिसून येत नाहीं. आधी प्रत्यक्ष अनुभवाचें सर्व क्षेत्र विचारांत घेतल्याचें दिसत नाहीं. सर्व विवेचक, कसा तरी एखादा सर्वसामान्य सिद्धांत ठरविण्याच्या घाईंत असल्याचें दिसतात. उदा. एतद्विषयक कांहीं जर्मन लेखकांनीं आपल्या तत्त्वज्ञानांतील प्रथम स्वीकृत सौंदर्यध्येयांचाच आधार घेऊन सौंदर्यगुणाची व्याख्या केली आहे, एवढेंच नव्हे तर त्या ध्येयकल्पनांची सत्य व साधुत्व या गुणांशीं जुळती अशी व्याख्या केली आहे. अर्थात यामुळें त्या व्याख्येंत एकांगीपणा आला आहे. म्हणजे पूर्वग्रहच पुढें मांडला आहे. सौंदर्यशास्त्र हें नीतिशास्त्राप्रमाणेंच नॉर्मेटिव्ह सायन्स आहे, म्हणजे त्यांत साधुत्व या व्यापक गुणाच्या एका अंगाचा विचार करावयाचा आहे.

वरील विवेचन लक्षांत घेऊन आतां आपणास प्रस्तुतच्या सौंदर्यशास्त्रांतील प्रमुख प्रश्नांचा सांगोपांग विचार करावयाचा. प्रथमारंभींच आपणापुढें पूर्वापार चालत आलेला दुर्घट प्रश्न उभा राहतो तो हा कीं, ''सौंदर्य हा इंद्रियगोचर वस्तुमात्रांतील आकार, रंग यांप्रमाणेंच एक स्वतंत्र गुण आहे किंवा काय ?'' व्यावहारिक भाषेवरून पाहतां आपण त्यास तसाच मानतों. सौंदर्यशास्त्राचा इतिहास पाहिला तर तज्ज्ञांनीं याच प्रमेयापासून विवेचनास आरंभ करून या सौंदर्यगुणाच्या स्वरूपाविषयी व एतद्गुणग्राही जी आत्म्याची शक्ति तिच्याविषयीं मोठ्या परिश्रमपूर्वक विचिकित्सा केल्याचें दिसतें. परंतु वस्तुस्थितीचें जरा सूक्ष्म अवलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, वरील मूळ प्रमेयच मोठें आक्षेपार्ह आहे. सौंदर्य हें इतर कांहीं असो; पण निदान त्यास आकार, रूप यांप्रमाणें वस्तूंचा अंगभूत एक गुण असें खास म्हणतां येत नाहीं. गुलाबाच्या फुलाचा रंग हा त्याचा जडात्मक धर्म आहे, तसा सौंदर्य नाहीं. तसेंच 'फुलाचा रंग सुंदर आहे' याचा अर्थ, भडकपणाप्रमाणें रंगाचा सुंदरपणा हाहि एक नमुना आहे, असाहि नाहीं. यावरून हें स्पष्ट होतें कीं, सौंदर्य हा पदार्थांतील जडात्मक गुणसमुच्चयापेक्षां अगदीं निराळा असा गुण आहे.

पुष्कळ वेळां आपण सौंदर्य हा गुण जड वस्तूला एकंदरीनें लावीत असतों; आणि वस्तु सुंदर आहे असें ठरविल्यावर सुंदर याची जास्त फोड करीत बसत नाहीं. तथापि सुंदर हा शब्द आपण वस्तूंतील स्वरूपाला किंवा गुणाला उद्देशून योजीत असतो; उदा. पर्वताचा किंवा भांड्याचा आकार सुंदर आहे, असें आपण म्हणतों. कधीं पदार्थांतील एका गुणाला व कधीं दुसर्या गुणाला उद्देशून आपण सुंदर शब्द वापरतों, यावरूनच तत्त्ववेत्त्यापैकीं 'फॉर्मालिस्ट्स' सौंदर्य हें जडाकारमय (फार्मल) आहे असें म्हणतात, तर 'आयडियालिस्ट्स' अथवा 'एक्सप्रेशनॅलिस्ट' कल्पनामय (आयडियल कन्टेन्ट) आहे असें म्हणतात. परंतु अखिल सौंदर्यविषयव्यापी असें एक तत्त्व ठरविण्याचें हें सर्व प्रयत्न अपुरे व असमाधानकारक होत.

वस्तुमात्राचा आकार व आयडियल कन्टेन्ट हें प्रत्येक सौंदर्यसुखप्राप्तीचें मोठें साधन आहे, व त्यांपैकीं एक अत्युच्च दर्जाचे असल्यास त्यास दुसर्याच्या भरीची आवश्यकता रहात नाहीं. दोन इमारती, किंवा दोन मानवी चेहरे, किंवा दोन गीतें ज्या, त्यांत पहिल्या किंवा दुसर्या प्रकारचें सौंदर्यसाधन सर्वस्वी चित्तवेधक असूं शकेल. इतकेंच नव्हें तर सौंदर्य हें वरील दोन साधनांवरच अवलंबून नसून रंग वगैरे अनेक गोष्टी सौंदर्यजनक असतात. सुंदर वस्तूंतील भागांचें पृथक्करण केल्यास सौंदर्यगुणाचे निदान तीन प्रकार तरी दिसतात : (१) इंद्रियगत सौंदर्य, (२) आकारसौंदर्य, (३) अर्थ किंवा उठाव (एक्सप्रेशन) यांतील सौंदर्य. या तीन प्रकारांनां व्यापणारें असें एक तत्त्व असेल, असें शक्य दिसत नाहीं. सर्वांचा अंतर्भाव होईल असा एक संपूर्णता (पर्फेक्शन) हा शब्द आहे, पण त्याचाहि अर्थ सौंदर्य शब्दाप्रमाणें अस्पष्ट आहे. सुंदर शब्दाशीं समानार्थी असे मोहक (ग्रेसफुल), सुबक (प्रेटी) वगैरे शब्द आहेत त्यांतील सूक्ष्म अर्थभेद ठरविणेंहि फार कठिण आहे. उदा. एखादा चेहरा, किंवा फूल सुंदर आहे कीं सुबक आहे हें ठरविण्यास मोठ्या तज्ज्ञास विचार पडेल. सुंदर ह्या शब्दांत बाकी सर्व अंशार्थदर्शी शब्दांचा (मॉडिफिकेशन्स) समावेश होतो असें म्हटल्यास सुंदर शब्दाचा अर्थ फार व्यापक करावा लागेल; पण तसें करणें योग्य नाहीं.

वरील विवेचनावरून एवढें स्पष्ट होतें कीं, सौंदर्य हा वस्तुगत धर्म नाहीं. तेव्हां आतां दुसरा मार्ग असा कीं, सुंदर म्हणून ज्यांनां आपण म्हणतों त्या वस्तूंच्या योगानें आपल्या मनावर काय परिणाम होतो तें पहावयाचें. कँटनें हीच पद्धति स्वीकारली होती. सौंदर्य म्हटलें म्हणजे पदार्थांत असले गुणधर्म असावेत कीं त्यांच्या संयोगानें आपणांला आनंद व्हावा, सौंदर्यसुखानुभव आपणांस लाभावा. सौंदर्योत्पादक गुण असें यांनांच आपण म्हणूं; आणि असल्या सर्व गुणांच्या समुच्चयाला सौंदर्य असें नांव देऊं. पण व्यावहारिक उपयोगाकरितां एक किंवा अधिक गुणांच्या उत्कर्षानें पूर्ण समाधान मनाला होत असल्यास तेवढ्या गुणांलाहि सुंदर म्हणण्यास हरकत नाहीं.

सौंदर्यगुणी पदार्थांकडे या नव्या दृष्टीनें पाहूं लागलों म्हणजे आपणांस त्यांच्या परिणामांकडेच विवेचनाचा मुख्य रोंख वळविला पाहिजे. त्यांतहि विशेषतः सौंदर्यांतील सुखदतेच्या अंगांचें शास्त्रीय दृष्ट्या पूर्ण संशोधन केलें पाहिजे. त्याकरितां सुखानुभवाविषयीचें सर्व नियम लक्षांत घेतले पाहिजेत. उदा. संवेदनाजन्य सुखांच्या निरनिराळ्या प्रकारांसंबंधाची उपपत्ति, पदार्थांतील, चित्तवेधकतेच्या कारणांची मीमांसा आणि पदार्थांतील मनाला त्रास न होतांहि मन आकर्षण करून घेणारा गुण हीं सर्व विचारांत घेतलीं पाहिजेत. तथापि यावरून सौंदर्यशास्त्र हें सामान्य सुखाशास्त्राचाच (सायन्स ऑफ प्लेझर) एक भाग आहे असें मानण्याचें कारण नाहीं

सौंदर्यसुखभोग हे इतर माणसांच्या समवेतहि घेतां येण्यासारखे आहेत; एवढेंच नव्हे तर सहानुभौतिक अनुनादानें ते वाढत जातात. कँट तर यापुढें जाऊन असें प्रतिपादन करतो कीं, एखाद्या ओसाड बेटावरील माणूस आपलें घर सुशोभित करणार नाहीं किंवा स्वतःहि अलंकृत होणार नाहीं.

सौंदर्यसुखाचीं मुख्य दोन इंद्रियें म्हणजे दृष्टि आणि श्रुति इतर इंद्रियांपासून सौंदर्यानुभव मिळत नाहीं असें नाहीं, पण अनेक दृष्टींनीं विचार करतां हींच दोन इंद्रियें या कामीं विशेषाधिकारयुक्त आहेत असें दिसून येईल. सौंदर्यशास्त्राचा अभ्यास अनेक अंगांनीं करतां येईल. सृष्टीनें जागजागीं सौंदर्य साठविलेलें आहे; शिवाय मानवनिर्मित कृतींतहि सौंदर्य भरलेलें दिसेल. कलासौंदर्य हें निसर्ग सौंदर्यानुकारी असून अगदीं संकुचित आहे असें मोठमोठे कलाभिज्ञहि कबूल करतात. कलावस्तूंतील सौंदर्यघटना देशकालपरत्वें बदलत जाते, पण सौंदर्यभाव कायम असतोच. सौंदर्यरुचीप्रमाणें कलेमध्यें क्रांति होत जाते हें कलाविकासाच्या इतिहासावरून दिसून येईल. तेव्हां सौंदर्यरसिकांनीं वरील सर्व गोष्टी ध्यानांत घेतल्या पाहिजेत. सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ करतांना ज्या मुख्य दोन गोष्टी केल्या पाहिजेत त्या म्हणजें; (१) अगदीं जुने व साधे असे सौंदर्यानुभवाचे प्रकार शोधणें, व (२) सौंदर्य पाहण्याच्या व उपभोगण्याच्या कामांत तरबेज असलेल्या माणसांचे अगदीं संपूर्ण व जास्त गुंतागुंतीचे अनुभव तपासणें. पहिल्या गोष्टीकरितां लहान मुलांच्या व हयात असणार्या अगदीं कनिष्ठ मानववंशांतील लोकांच्या आवडीकडे लक्ष पुरवावें लागेल. पक्षी व इतर प्राणी यांचा मूळचा कल कोणीकडे असतो याचा अभ्यास डार्विनसारख्या कांहीं संशोधकांनीं केलेला आहे. हें त्याचें संशोधन रुचिविकासाचा सिद्धांत तयार करण्याला उपयोगी असलें तरी मनुष्यप्राण्यांतील सौंदर्याभिरुचि ठरविण्यास त्याचा फारसा उपयोग होणार नाहीं. या कामीं अनेक निरनिराळ्या व्यक्तींच्या सौंदर्यभिरुची पाहाण्याचें प्रयोग केले पाहिजेत. सौंदर्यानुभवाचे मानसशास्त्रज्ञ तीन वर्ग पाडतात; (अ) इंद्रियग्राह्य, (आ) विषयग्राह्य किंवा आकृतिग्राह्य, व (इ) कल्पनाग्राह्य.

(अ) सौंदर्याच्या या क्षेत्रात मानसशास्त्रज्ञांनां शारीरविज्ञानाची बरीच मदत होत असली तरी इंद्रियग्राह्य अनुभवाच्या अतिशय नाजुक व सूक्ष्म भागांचा विचार करतांना शारीरिक स्थितीचें ज्ञान फारसें उपयोगी पडत नाहीं; उदा. रंगांच्या मिश्रणापासून उद्भवणारे सूक्ष्म परिणाम. मानसशास्त्र्यांनीं नुकतेच दृष्टि आणि श्रुति यांच्या संवेदनांची सौंदर्यशास्त्रदृष्ट्या कोणतीं वैशिष्टयें आहेत यांचा फार काळजीपूर्वक शोध लाविला आहे. या शोधांमुळें सौंदर्यानुभवी इंद्रियांची विलक्षण सूक्ष्मता व तज्जन्य सुखांतील विविधता व चिरकालीनत्व आपल्या नजरेस येतें. तथापि सौंदर्यसुखांत इंद्रियसाधनांचा कितपत हात असतो यासंबंधीं विशेष शोध होणें जरूर आहे; कारण सौंदर्यानुभवाचा मक्ता केवळ बुद्धीलाच देण्याकडे बहुतेक शास्त्रज्ञांचा कल दिसून येतो.

(आ) सौंदर्यानुभवाच्या विषयग्राह्य किंवा आकृतिग्राह्य अंगांविषयीं शास्त्रीय विचार करतांना अनेक प्रश्न उद्भवतात. केवळ संकुचित स्वरुपांत म्हणजे स्थल व काल या संबंधांतच सुखकर आकृतीचें आपल्याला होणारें ज्ञान हल्लीं जास्त वाढलें आहे. सारखेपणाचें महत्त्व, कांहीं विशिष्ट जुळणीत प्रमाणशीरपणाचा अर्थ व सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या तिची योग्यता, लय-साम्याचे प्रकार यांसारख्या कांहीं गोष्टीवर सामान्य व विशेष ग्रंथरचना झालेली दिसून येते. अनुभव व अर्थज्ञान यांच्या अनुरोधानें आकृतिस्वरूपाची योग्यता किती कमी जास्त होते हें ठरविणें अत्यावश्य आहे. दुसरा एक निश्चित करण्याजोगा प्रश्न म्हणजे संयोगतत्त्वांनीं उद्भुत होणार्या भावनांचा सुखैकगुणावर एकंदरीत काय परिणाम होतो. एखादें विशिष्ट रंगमिश्रण जें सुखकर होतें त्याला बहुधां कारण मिश्रणांतील मूलतत्त्वांपासून उत्पन्न होणार्या छटांचा झालेला एक मेळ होय.

(इ) जेव्हां आपण एखाद्या सौंदर्यविषयाचें ध्यान करतों तेव्हां कल्पनेच्या खेळामुळें आपल्या सुखांत जी कांहीं भर पडते ती सर्व या कल्पनाग्राहीवर्गांत समाविष्ट होते. त्या सौंदर्यवस्तूशीं निकट संबद्ध असे खरेखुरे अनुभव पुन्हां मनांत आणणें यासारखी गोष्ट या वर्गांत प्रथम येऊं शकेल, अशीं मानसदृश्यें आपल्या नेहमींच्या सहवासांतल्या गोष्टींशीं जुळतीं असली तर इष्ट विषयाची योग्यता सौंदर्यदृष्ट्या जास्त वाढते. अशा सूचित मानसदृश्यांमुळें आपलें सौंदर्यसुख बरेंच वाढत असतें. सामान्यतः जरी मूर्त विषयाचीच मानसिक चित्रें पुढें उभी राहातात तरी अगदीं अमूर्त अशा स्वरूपाच्या कल्पनाहि वावरतांनां आढळतात. तथापि त्या कांहीं मूर्त स्वरूप धारण करीत असलेल्या आपणांला दिसतील.

सौंदर्यविचारांतील कल्पनाग्राही अंग निश्चित करतांना सौंदर्यभावाचेंहि विशिष्ट गुणधर्म ठरविण्याचें काम मानसशास्त्रज्ञांनां करावें लागतें. खालीं येऊन आदळणार्या एखाद्या लाटेला बसलेली मुरड, किंवा एखादी निवडक शिल्पकलावस्तु यांसारखें सुंदर विषय पाहतांना आपली वृत्ति जी बनते ती विकारी नसते असें कोण म्हणेल ? या वृत्तीच्या अनुषंगानें शारीरिक हालचाली (उदा. जलद श्वासोच्छ्वासाची क्रिया) कोणत्या होतात त्या स्पष्ट करण्यासंबंधीं होम (लॉर्ड केम्स) सारख्या संशोधकांनीं चांगले शहाणपणाचें प्रयत्न केलेले दिसतात. याप्रमाणें सौंदर्यशास्त्राचें अनेक अंगांनीं पृथक्करण करण्यांत येत असतें कारण आपणांला सौंदर्यसुख जें प्राप्त होतें तें अनेक कारणांमुळें होय. शिवाय प्रत्येक सुंदर वस्तु इतर सुंदर वस्तूपेक्षां निराळी असूनहि तिच्यांत कांहीं विशिष्ट सौंदर्यलक्षण सांपडतें. वस्तूकडे पाहणारांच्या भावनांवरहि सौंदर्यगुण अवलंबून राहतो.

सौंदर्यापासून मिळणारें सुख आपल्या बौद्धिक किंवा व्यावहारिक आवडीहून निराळें असलें तरी त्या गोष्टींचा या सौंदर्यसुखावर अंतर्बाह्य परिणाम घडत असतो हें खास. सौंदर्यसुखांत अंतर्भूत असलेली मानसिक क्रिया बहुवंशीं बौद्धिक असते. वस्तुजातींमधील अगदीं महत्त्वाचे असें गुणधर्म ओळखून जी आपण जातिसौंदर्याची प्रशंसा करतों तीमध्येंहि आपली दृष्टि विशेषतः शास्त्रीय मद्द्यावर असते असें म्हणावयास हरकत नाहीं. तसेंच शास्त्रीय ज्ञानाच्या योगानें सौंदर्यविचाराला मदत होते. हीच गोष्ट सौंदर्य. शास्त्राच्या व्यावहारिक हिताशीं असलेल्या संबंधांतहि लागूं पहते. ''सापेक्ष सौंदर्य'' या नांवानें सौंदर्याच्या महत्त्वाचा एक विशिष्ट प्रकार ओळखिला जातो. एखाद्या वस्तूचा विशिष्ट गोष्टीकरितां चांगला उपयोग होतो म्हणून ती आपणाला सुंदर भासते; उदा. पाणी किंवा एखादें पेय घेण्यास विशेष सोयीस्कर म्हणून पेल्यापासून आपणाला कांहीं सुख लाभतें व तो सुंदर भासतो. म्हणजे या ठिकाणीं सौंदर्याचें उपयुक्ततेशीं नातें दिसून येतें. डार्विन व त्याचे अनुयायी जीविशास्त्राच्या चष्म्यांतून सौंदर्याकडे पाहतात. कांहीं शास्त्रज्ञ सौंदर्यानुभवाकडे सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीनें पहातात. सौंदर्य व कला यांच्या प्रगतीचा समाजावर बराच परिणाम होतो. कारण त्यामुळें आपल्या भावना नवीन नवीन स्वरूपांत प्रकट करण्यास मदत होऊन आपल्या सहानुभूतीचें क्षेत्रहि विस्तृत होत जातें. तसेंच सौंदर्यशास्त्र व आचारनीतिशास्त्र यांचाहि उगम एकाच ठिकाणाहून-आपला सहानुभौतिक स्वभाव व मानवी हितावर दृष्टि यांतून-होतो. आतां शेवटीं सामान्य सौंदर्यशास्त्राचा ललितकालाशीं काय संबध येतो तें पाहिलें पाहिजे. कलेचा उद्देश व तिचे विविध प्रकार याचें स्वतंत्र विस्तृत विवेचन 'कला' या लेखांत केलेंच आहे. कलेचा अभ्यास करतांना कांहीं जे गहन प्रश्न उद्भवतात ते सौंदर्यसिद्धांताच्या अनुरोधानेंच सोडवावे लागतात. उदा. कलेंतील दुःखकर व कुरूप विषयांचे धर्म; निसर्गाचें कुशलतेनें केलेलें अनुकरण आणि नैसर्गिक सत्य म्हणजे काय ? कलेंतील जादूचा प्रकार, इत्यादि. त्याचप्रमाणें कलेचें नैतिक व बोधदायी कार्य काय याचाहि उलगडा सौंदर्यशास्त्राच्या मदतीनें होईल. यांखेरीज कलेसंबंधीं अगदीं जास्त विशिष्ट प्रश्न (उदा. शोकजनक विषयाचा घडून येणारा परिणाम, संगीतबोधाचे गुणधर्म, इ.) देखील सामान्य सौंदर्यशास्त्रांतील सिद्धांताच्या द्वारें चांगले सोडविता येतात असा अनुभव आहे. तेव्हां कलेच्या अभ्यासांत जसजशी प्रगति होत जाईल तसतसें सौंदर्यशास्त्राचें महत्त्व वाढत जाणार आहे हें खास.

सौंदर्यशास्त्रांतील उपपत्तीचा इतिहास. (१) ग्रीकांचे विचार:— प्राचीन ग्रीस देशांत सौंदर्यशास्त्रावरील आद्य लेखक होऊन गेले; तथापि त्यांच्या लेखांत ग्रीक लोकांतील उच्च सौंदर्याभिरुचीला व जोमदार तात्त्विक विचारक्षमतेला साजेल असें गुणाधिक्यहि नाहीं व संख्याधिक्यहि नाहीं. या विषयावरील ज्याच्या मतांविषयीं आपणांस आज विश्वसनीय माहिती उपलब्ध आहे असा पहिला तत्त्ववेत्ता पुरुष सॉक्रेटीस हा होय. त्याच्याविषयी झेनोफननें जी माहिती लिहून ठेविली आहे. तीवरून सॉक्रेटीस सौंदर्य व साधुत्व यांची समव्याप्ति समजत असे व दोन्हीचाहि अंतर्भाव तो उपयुक्तता या गुणांत करीत असे असें दिसतें. कोणताहि सुंदर पदार्थ म्हटला म्हणजे त्यापासून मनुष्याच्या गरजा भागणें किंवा संरक्षण होणें, यासारखें विवेकबुद्धीला पटेल असें कार्य होत असतें. सुंदर पदार्थाच्या योगानें तत्क्षणीं जें दर्शनसुख व चिंतनसुख अनुभवावयास मिळतें त्याला सॉक्रेटीसनें फारसें महत्त्व दिल्याचें दिसत नाहीं; उलटपक्षीं मानवी जीविताला लागणार्या आवश्यक गोष्टी ज्या त्यापासून साधतात त्यावरच त्यानें सर्व भर दिलेला आहे. सॉक्रेटिसाच्या विवेचनांतील महत्त्वाचा व खरा उपयुक्त मुद्दा म्हणजे सौंदर्याची पदार्थसापेक्षता; म्हणजे सौंदर्याला स्वयंसिद्ध व पदार्थाव्यतिरिक्त अस्तित्व नाहीं व त्याचा संवेदनाग्राही मनाशीं निकट संबंध आहे असें त्याचें मत होतें; प्लेटोचें मत त्याच्या विरुद्ध होतें.

प्लेटोच्या संवादावरून त्याचीं सौंदर्यशास्त्राविषयीं मतें समजणें हें त्याचीं नीतिविषयक मतें समजण्याइतकेंच कठिण आहे. त्या ग्रंथांत सौंदर्याच्या अनेक व्याख्या देऊन त्या अपुर्या म्हणून अग्राह्य ठरविल्या आहेत. परंतु एकंदर विवेचनावरून प्लेटोचा कल सौंदर्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असें मानण्याकडे होता हें स्पष्ट दिसतें. सौंदर्याची सत्य व साधुत्व यांशीं एकरूपता आहे असें मानण्याची प्लेटोची प्रवृत्ति दिसते. त्याच्या मतें वस्तूंतील सौंदर्योत्पादक गोष्टी म्हणजे निरनिराळ्या भागांची प्रमाणबद्धता, सुसंगतता किंवा एक रूपता ह्या होत. एकरूपतेच्या दृष्टीनें सरळ रेषेंत व शुद्ध एकजात रंगांत दिसणार्या सौंदर्याचीहि प्लेटोनें महति गायिली आहे. तसेंच प्रमाणबद्धतेंतील सौंदर्याचा नमुना म्हणजे सुंदर शरीर व सुंदर (सुगुणी) मन यांचा मिलाफ होय. शिवाय कलांच्या संबंधानेंहि त्याच्या मनांत फारसा आदर नव्हता. कलेला तो नक्कल करण्यांतील हातचलाखी इतकेंच मानीत असे; व त्यामुळें त्यानें आपल्या आयडियल रिपब्लिकच्या योजनेंत कवि व काव्यकला यांवर कडक नियंत्रण (सेन्सरशिप) असावें, व काव्यकलेचा नैतिक व राजकीय शिक्षण देण्यापुरताच उपयोग करावा असें सुचविलें आहे.

वरील दोघांहि तत्त्ववेत्त्यापेक्षां आरिस्टॉटलनें सौंदर्यविषयाचा फार काळजीपूर्वक खोल विचार केलेला असून सौंदर्य व कला याविषयींच्या तत्त्वांचें चांगलें शास्त्रीय पृथक्करण केलें आहे. काव्य व अलंकारशास्त्र या विषयांवरील पुस्तकांत तत्संबंधीं विचार त्यानें मुख्यत्वेंकरून  ग्रथित केले असून त्याच्या इतर लेखांतहि या विषयांवरील सूचना आढळतात. साधुत्व व सौंदर्य यांत त्यानें प्रथमच असा फरक दाखविला आहे कीं, साधुत्व नेहमीं कृतींत दिसावयाचें असतें. पण सौंदर्य अचल अशा वस्तूंतहि असूं शकतें. कांहीं वेळां चांगलें (गुड) म्हणजेच सुंदर असें असूं शकेल असें तो म्हणतो. त्यानें आपल्या पॉलिटिक्स या पुस्तकात सौंदर्याची योग्यता उपयुक्त व आवश्यक वस्तूंपेक्षां श्रेष्ठ ठरविली आहे. सौंदर्यगुणांतील आणखी एक अंगहि त्यानें निश्चित केलें आहे तें, सौंदर्यजन्य सुखांतील स्वार्थी इच्छेचा अभाव हे होय. सौंदर्यांतील सर्वसामान्य अंगे म्हणजे सुव्यवस्था, सारखेपणा व नियमितपणा हीं होत असें त्यानें आपल्या मेटाफिजिक्सच्या पुस्तकांत लिहिलें आहे. सौंदर्यांतील आणखी एक अंग म्हणजे आकार; तो फार मोठा किंवा फार लहानहि असतां कामा नये. कुलांच्या बाबतींतहि आरिस्टॉटलचें मत प्लेटोपेक्षां फार सुधारलेलें दिसतें. कलांपैकीं ललितकलांचा उद्देश तात्कालिक सुखप्राप्ति हा असून उपयुक्तता हा इतर कलांचें ध्येय असतें, असें तो स्पष्ट म्हणतो. कला म्हणजे केवळ हातचलाखी (ट्रिक), असा प्लेटोप्रमाणें त्यांचा उपहास न करतां त्यांची योग्यता त्यानें बरीच मोठी ठरविली आहे ललितकलावन्तांनां ज्ञान व शोधकबुद्धि फार लागते हें तो कबूल करतो इतकेंच नव्हे तर आपल्या काव्यशास्त्र (पोएटिक्स) नामक ग्रंथांत त्यानें काव्याचा दर्जा तत्त्वज्ञानापेक्षांहि उच्च लाविला आहे. तथापि ललितकलांचें पूर्ण वर्गीकरण आरिस्टॉटलनें केल्याचें आढळत नाहीं; आणि शोकपर्यावसायी नाटकांचा (ट्रॅजिडी) मनोविकार सात्त्विक बनविण्याकडे उपयोग होतो हें जे त्याचें सुप्रसिद्ध मत तेंच इतर ललितकलांच्या बाबतींतहि त्याला मान्य होतें कीं नाहीं याबद्दल शंका आहे.

ग्रीक पंडितांचे सौंदर्यविषयक मत काय होतें तें पाहिल्यानंतर जर्मन पंडीतांचें या बाबतींत काय मत आहे तें आपण अवलोकूं. बॉमगार्टनच्या मतें सौंदर्य म्हणजे वैषयिक ज्ञानाचें ध्येय होय. कँटच्या मतें गुण, परिणाम, उपयुक्तता व निःस्वार्थ या चोहोंनां आनंद देणारें तें सौंदर्य होय. शेलिंग म्हणतो कीं, सौंदर्य म्हणजे अनंताचें सान्तामध्यें दर्शन होय. बहुत्वांत एकत्व असणें हें सौंदर्याचें लक्षण होय असें हेगेल म्हणतो. हेगेलच्या मतें सौंदर्य हें इंद्रियगोचर आहे तर कँटच्या मतें सौंदर्य हें मनोगोचर आहे. शोपेनहॉरच्या मतें इच्छाशक्तीचा वस्तुरूपानें पडलेला प्रकाश म्हणजे सौंदर्य होय.

फ्रेंच पंडितांमध्येंहि अनेकांनीं सौंदर्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. डिडेरो म्हणतो कीं, वस्तूच्या निरनिराळ्या अवयवांत सूत्रबद्धता असणें याचें नांव सौंदर्य. पेरे बफियरचें मत असें आहे कीं, प्रत्येक जातीच्या सुंदर वस्तूचा एकेक आदर्श असतो. व ज्या मानानें त्या वस्तूचें आदर्शाशीं सादृश्य असेल त्या मानानें ती वस्तू सुंदर होय. व्हिक्टर कझिनचें मत असें कीं, सुंदर वस्तू व सुखदायक अगर उपयुक्त वस्तु या कांहीं एक नव्हेत. सूत्रबद्धता हें सौंदर्याचें मुख्य व सार्वत्रिक लक्षण नाहीं. एकदा व विचित्रता हीं दोन्ही सौंदर्याचीं साधनें आहेत. भौतिक, नैतिक व मानसिक असें तिन्हीं प्रकारचें सौंदर्य असतें. भौतिक सौंदर्य हें भावमूलक असतें व, मानसिक सौंदर्य हें आदर्श सौंदर्य होय. लेव्हेकचें म्हणणें असें कीं, सौंदर्य हा अदृश्य चैतन्याचा प्रकाश होय. प्राणिसृष्टींत सौंदर्य हें मुख्यतः वस्तूचें परिमाण, वैचित्र्य, वर्ण, कोमलत्व इत्यादि अनेक गोष्टींवर अवलंबून असतें; जड सृष्टीचें सौंदर्य हें अचेतन शक्तीचा प्रकाश असतें.

इंग्लिश पंडितांत कांहीच्या मतें सौंदर्याला बाह्य अस्तित्व आहे तर कांहींच्या मतें तें तसें नाहीं. लॉर्ड शॅफ्टसबरीचें मत असें कीं जड वस्तूला स्वतःचें असें सौंदर्य नाहीं. सौंदर्य ज्ञानासाठी आपल्याला स्वतंत्र ज्ञानेंद्रिय असतें. सौंदर्याचे त्यानें जडसृष्टिसौंदर्य, जीवसृष्टिसौंदर्य व भगवत्सौंदर्य असे तीन भाग केले आहेत. हचिसनचें मत, सौंदर्याला बाह्य अस्तित्व असतें असें आहे. वैचित्र्यांत एकत्व असणें हें त्याच्या मतें सौंदर्याचें मूळ आहे. सौंदर्य हें सापेक्ष व निरपेक्ष असें दोन्ही प्रकारचें असतें. हॅमिल्टन म्हणतो की, एकत्वाच्या व बहुत्वाच्या संयोगांत सौंदर्य आहे. रस्किनच्या मतें सौंदर्य म्हणजे भगवंताच्या स्वरूपाची अभिव्यक्ति होय. त्यानें या सौंदर्याचे सादृश्यज्ञापक आणि जीवनशक्तिज्ञापक असे दोन भाग पाडून प्रत्येक भागांत कोणते गुण आढळतात त्याचें विवेचन केलें आहे. होगार्थनें वस्तूच्या प्रत्येक अंगाची उद्देशसाधनाच्या कामीं उपयुक्तता, वैचित्र्य, साधेपणा, सप्रमाणत्व, काठिण्य, व विशालत्व असे सहा गुण असणार्या वस्तूला सुंदर वस्तु म्हणावें असें प्रतिपादन केलें आहे. प्रो. बेनच्या मतें सौंदर्य हें गुण समुच्चयावर अवलंबून असतें.

[संदर्भग्रंथ:- हर्बर्ट स्पेन्सर-प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी; बेन-एमोशन्स अँड विल; सली-ह्यूमन माईंड; मार्शल-पेन, प्लेझर अँड अॅस्थेटिक्स-अॅस्थेटिक प्रिन्सिपल्स; बोसान्क्वेट-हिस्ट्री ऑफ अॅसथेटिक्स; नाईट-फिजिऑलॉजी ऑफ दि ब्युटिफुल.]

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .