प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
          
सोलापूर, जिल्हा.— मुंबई इलाखा, मध्यभाग. या जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस निजामचें राज्य; दक्षिणेस भीमा नदी व पलीकडे विजापूर जिल्हा; पश्चिमेस पुणें जिल्हा आहे. क्षेत्रफळ ४५२१ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ७४२०१० आहे. ह्या जिल्ह्याचा मुलूख बहुतेक सर्व सपाट आहे. टेंकड्या फारच कमी आहेत. जमीन काळी असून सुपीक आहे. ह्या जिल्ह्यांत मोठी नदी भीमा ही आहे व ती वायव्येकडून ईशान्येकडे वहाते. याशिवाय नीरा, माण, सीना, भोगावती या नद्या आहेत. पण उन्हाळ्यांत पाण्याची फार टंचाई पडते व पाऊसहि थोडा पडतो. म्हणून सरकारनें सोलापूर, अष्टी, कोरेगांव व आणखी दोन चार ठिकाणीं तलाव बांधून पाण्याची सोय केली आहे. ह्या जिल्ह्याची हवा एकंदरीत आरोग्यकारक असते. साधारण उष्णमान ७० ते ८० पर्यंत असतें.

शेतकी व उद्योगधंदे:- ज्वारी, बाजरी, गहू, हरभरे, तुर, करडी व जवस हे मुख्य पिकाचे जिन्नस आहेत. यांशिवाय मका, भुईमूग, ऊंस, तांदूळ, तंबाखू व मिरची हे जिन्नसहि पिकतात. पाऊस कमी पडत असल्यानें बागाईत अगदीं कमी होतें. सोलापूर येथें कापड विणण्याच्या गिरण्या बर्याच आहेत. या गिरण्यांतून काम करणारा बराच मोठा वर्ग आहे, पण शेती करणारे लोकच जास्त आहेत. करकंब, बेगमपूर, वळसंग येथें सूत रंगविण्याचे मोठमोठे कारखाने आहेत.

इतिहास:- सोलापूरच्या प्राचीन इतिहासासंबंधानें फार थोडी माहिती उपलब्ध आहे. पंढरपूर हें धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आल्यापासून तेथील इतिहास उपलब्ध आहे. ख्रिस्ती शकाच्या सुरवातीस आंध्रभृत्यांच्या ताब्यांत सोलापूर होतें. ५५० ते ११८४ पर्यंत चालुक्यांचा अंमल त्या प्रांतावर होता. ११८४ ते १३०० पर्यंत म्हणजे मुसुलमानांचा दक्षिणेंत शिरकाव होईतों देवगिरीच्या यादवांच्या ताब्यांत तो प्रांत होता. तत्कालीन हेमाडपंती धर्तीवर बांधलेलीं सुमारें १० देवळें सोलापुरांत आहेत व त्यावेळचे नऊ शिलालेखहि उपलब्ध आहेत. १४ व्या शतकाच्या मध्यांत बहामनी राज्याची स्थापना झाली तेव्हां त्या राज्यांत सोलापूर मोडत होतें. पुढें या बहामनी राज्याचें तुकडे पडले. त्यांत गुलबर्ग्याच्या राजाच्या अंमलाखालीं सोलापूर आलें. दिल्लीहून शाहु सुटून आल्यानंतर थोडक्याच दिवसांत सोलापूर मराठ्यांच्या ताब्यांत आलें. १७७४ मध्यें पंढरपुरास रघुनाथराव पेशवे आणि त्रिंबकराव मामा यांच्यात लढाई होऊन मामाचा पराभव झाला. सोलापूर जिल्ह्याचा मराठेशाहीच्या इतिहासांतील निकटचा व महत्त्वाचा संबंध म्हटला म्हणजे गंगाधर शास्त्र्याच्या खुनाबद्दल होय. त्याचा पंढरपुरास खून करण्यांत आला. अष्ट्याच्या लढाईनंतर सन १८१८ त हा प्रांत एक लहानसें युद्ध होऊन इंग्रजांकडे आला.

तालुका.— सोलापूर जिल्ह्यांतील एक तालुका. उत्तरेस निजामचें राज्य : दक्षिणेस भीमानदी; पूर्वेस अक्कलकोट संस्थान; व पश्चिमेस पंढरपूर आहे. क्षेत्रफळ ८४७ चौरस मैल. उन्हाळ्यांत हवा बरीच उष्ण असते, पाऊस अगदीं थोडा पडतो. भीमा व सीना या नद्या या भागांतून वहातात. लोकसंख्या (१९२१) २३४४६१.

शहर.— सोलापूर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. सोलापूर याचा अर्थ सोळा गांवें असा होतो. हें उत्तर अक्षांश १७ ४०' व पूर्व रेखांश ७५ ४६' यांवर वसलेलें आहे. लोकसंख्या (१९२१) ११९५८१. शहर समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंच असून सीना नदीच्या आदिला फांट्यावर वसलें आहे. येथें एक जुनाट किल्ला आहे. शहराभोंवती २॥ मैल लांबीचा कोट आहे. वस्ती जसजशी वाढत चालली तसतशी म्युनिसिपालिटीनें कांहीं ठिकाणची भिंत पाडली. स्टेशनपासून कसब्यापर्यंत नवी वस्ती आहे. सोलापूर शहरांत इतर ठिकाणांप्रमाणें वारांच्या नांवांवरून व स्थानिक महत्त्वावरून पडलेल्या सुमारें १३ पेठा आहेत. येथें मुख्य व्यापार कापसाचा आहे. येथें गिरण्याहि बर्याच आहेत. येथें होणारें बरेचसें कापड विजापूर, बार्शी, व मोंगलाईकडे जातें. १८५३ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. तिनें स. १८७९-८१ या अवधींत २। लक्ष रू. खर्चून एकरूक तलावाचें पाणी गांवास पुरविण्याची व्यवस्था केली आहे. सिद्धेश्वर तलावांतील सिद्धेश्वराचें देऊळच फक्त प्रेक्षणीय व जुनें आहे. शिवाय दत्तात्रेय, पांडुरंग, मल्लिकार्जुन इत्यादि दुसरीं देवळेहि आहेत. येथें एक सरकारी व खासगी हायस्कूल असून म्यु. च्या बर्याच प्राथमिक शाळा आहेत.

इतिहास:— १४३६ त बहामनी राजाचा भाऊ महंमद यानें स्वतंत्र होण्याच्या इच्छेनें सोलापूर शहर बळकाविलें. १५११ त तें विजापूरकरांकडे आलें. स. १५५१ त निजामनें तें घेऊन त्याचा पक्का बंदोबस्त केला. स. १६६८ त औरंगझेबाबरोबर झालेल्या तहांत तें औरंगझेबाकडे गेलें. स. १७२३ नंतर मराठ्यांकडे तें आलें व स. १८१८ ते पेशव्यांबरोबर झालेल्या युद्धांत ता. १४ में रोजी ४ दिवसांच्या वेढ्यानंतर तें जनरल मनरी याच्या स्वाधीन झालें.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .