प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
          
सोनार— सोनार हें नांव धंदेवाचक असल्यामुळें या नांवाखालीं विविध वर्णांचे व धर्मांचे लोक येतात; उदा. यांत दैवज्ञांसारखे ब्राह्मण व लाडसोनारांसारखे क्षत्रिय येतात. कांहीं मुसुलमान, जैन व शीखहि आपल्याला सोनार जातीचे म्हणवितात. एकंदर हिंदुस्थानांत १२॥ लाखांवर सोनार जातीचे लोक आहेत; पैकीं सुमारें १२ लक्ष हिंदु आहेत. ४०००० मुसलमान आहेत, व बाकीचें शीख (२८०००) व जैन (६०) आहेत. सर्वांत जास्त संख्या संयुक्तप्रांतांत सांपडते (२॥ लाख) व त्या खालोखाल बिहार-ओरिसांत (२ लाख) नंतर मुंबई इलाख्यांत (१३/४ लाख), व यापेक्षां कमी पंजाबांत आहेत. मुंबई इलाख्यांत दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण, सोनार यांसारख्या नांवाखालीं सोनारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या सुमारें ९० हजार आहे. गुजराथेंत सोनारांनां सोनी म्हणतात. त्यांची तेथें संख्या सुमारें २० हजार आहे. मुंबई प्रांतांत सोनारांची व्याप्ति दक्षिण, कोंकण व कर्नाटक या सर्व प्रांतभर आहे. कानड्यांत त्यांनां अक्साळी म्हणतात. दुसर्या (सुतार, लोहार वगैरे) कारागिरांप्रमाणें हेहि आपली उत्पत्ति विश्वकर्म्यापासून सांगतात. हे स्वतःला पंचाळ म्हणवितात. यांच्यापैकीं कांहीं सोनार आपणांस ब्राह्मण म्हणवितात. सोनार समाजांत उच्च दर्जाचें म्हणजे दक्षिणेतले कानडे सोनार व विश्वकर्मा मुखोद्भूत पंचाल समजतात. परंतु देवांग व कोंकणी सोनार हेहि आपणाला ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ दर्जाचे समजत असून आपणांस दैवज्ञ सोनार व पांचाल सोनार म्हणवून घेतात. वैश्य सोनारांचा एक चौथा वर्ग उत्पन्न झाला असून वरील जातींत त्याचा समावेश होतो. कांहीं ठिकाणीं अहीर सोनार अशीच आपल्या जातीची श्रेष्ठता प्रस्थापित करतात. पण काहीं ठिकाणचे अहीर सोनार जातीसंबंधीं महत्त्वाकांक्षां दूर ठेवून गोत्र जुमानीत नाहींत किंवा जानवेंहि घालीत नाहींत. लाड सोनार (क्षत्रिय) खालच्या पायरीचे गणण्यांत येतात. अहीर व लाड सोनारांच्या लग्नप्रसंगीं देवक पंचपल्लवीचें असतें ही गोष्ट त्यांच्या ब्राह्मण्याच्या आड येईल. शीलवंत व इतर सोनार हे यांच्याहूनहि खालच्या दर्जाचे आहेत [मुं. से. रि. १९११]

या माहितीवरून असें दिसून येईल कीं ज्याला सोनारकीचा धंदा करण्यापुरतें चातुर्य असतें तो आपला सोनारकीचा धंदा सुरू करतो; मग त्याची जात कोणतीहि असो. या योगानें मूळच्या अस्सल जातींत फार कमीपणा यावयाला लागला. तथापि अस्सल सोनार आचारविचारानें फार शुद्ध रहात असून जवळ जवळ बाह्यदृष्ट्या ब्राह्मणांसारखे दिसतात. यामुळें ब्राह्मणांची व त्यांची स्पर्धा सुरू झाली व पेशव्यांच्या अमदानींत सोनारांनी जानवें घालूं नये व थाटमाटानें लग्नेंहि करूं नयेंत म्हणून निर्बंध घातला होता. त्यावेळेस सोनार वरघोडा पाहणें वाईट समजलें जात असे. सोनारांनीं लग्नांत नवर्यामुलावर अबदागीर धरूं नये अगर पालखींत बसवून त्याची मिरवणूक काढूं नये अशा प्रकारचेंहि निर्बंध होतेसें दिसतें. कानडा जिल्ह्यांत सोनार शब्दाचा तिरस्कार इतका वाढला होता कीं, भोळे आस्तिक लोक रात्री 'सोनार' हीं अक्षरेंहि उच्चारीत नसत, व आपल्या पूजाअर्चेच्या वेळीं सोनारांच्या हत्याराचा 'ट ट' शब्द शक्य तितक्या रीतीनें टाळण्याची सावधगिरी घेत. अद्यापपर्यंत कानड्यांत कोणत्याहि जातीचा हलका देखील मनुष्य सोनाराच्या घरी पाणी पीत नाहीं अगर रात्रीची तेथें विश्रांति घेत नाहीं. सोनारावर एवढी इतराजी असल्याचें कारण बहुधा दुसरें कांहीं एक नसून सोन्यासारख्या मौल्यवान धातूची ते चोरी करतात हें होय. सोनारांचा पिढीजाद धंदा म्हणजे सोन्यारूप्याचें दागिने करणें व जडियेजवाहीर काम करणें हें होय. आतां कांहीं शेतकी तर कांहीं सरकारी नोकरीहि करतात. पूर्वी नाण्यांची पारख करण्याकरितां सोनाराची आवश्यकता असे त्या सोनारांनां पोतदार ही संज्ञा असून बलुतेदारांत त्यांचा समावेश केला जाई. सोनारांत पुढील १३ वर्ग आहेत:— (१) अहीर किंवा खानदेशी, (२) अझर, (३) देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाल सोनार; (४) देशी अथवा मराठे सोनार; (५) कडू, दासीपुत्र अथवा विदुर; (६) कन्नड; (७) कोंकणी अथवा दैवज्ञ;(८) लाड; (९) माळवी; (१०) परदेशी; (११) साड; (१२) शीलवंत; (१३) वैश्य अथवा जैन.

या वर्गांत आपसांत रोटी-बेटीव्यवहार होत नाहींत. रत्नागिरीच्या कोंकणी सोनारांत टांकसाळे व अंगसाळे हे दोन भेद असून अंगसाळ्यांहून टांकसाळे श्रेष्ठ समजले जातात. मराठी राज्यांत टांकसाळ्यांकडे नाणें पाडण्याचें काम असे व अंगसाळ्यांकडे नाण्याची पारख असे.

सोनारांपैकीं जे आपणांस ब्राह्मण म्हणवीत त्यांनीं ब्राह्मणांच्या गोत्रपद्धतीचें अनुकरण केलें. इतर सोनारांच्या जाती त्यांच्या आडनांवांवरून प्रचारांत आल्या. देशी, अहीर, माळवी, लाड, व कडू सोनारांत देवक पंजपल्लवी असून शिवाय सांडस व फुंकणी हेहि जिन्नस असतात. देशी, माळवी, अहीर, लाड व कडू जातींत पुनर्विवाह मान्य आहे. इतर सोनार पुनर्विवाह करीत नाहींत एवढेंच नाहींतर विधवा केशवपन करतात. ब्राह्मणसोनार खेरीजकरून इतर सोनारांत घटस्फोट होतो. लग्न होण्याच्यापूर्वी मुलाची मुंज करून जानवें घालण्याचा परिपाठ आहे व मुलीचें लग्न ती वयांत येण्यापूर्वी उरकून घेतात. दैवज्ञ, कन्नड व वैश्य खेरीज करून इतर सोनार मांस खातात व दारू पितात. कन्नड सोनार दैवज्ञ सोनारांच्या घरीं अन्न घेत नाहींत, फक्त ब्राह्मणांच्या हातचें अन्न खातात. सोनारांचें अन्न मराठे, माळी, कुंभार, न्हावी व धनगर लोक खात नाहींत. कानडा जिल्ह्यांतलें सोनार कोणाच्या हातचे खात नाहींत, तर कोणतीहि हलकी जात सोनाराच्या हातच्या अन्नाला स्पर्श करीत नाहीं. कांहीं ठिकाणीं-विशेषेंकरून मुंबईत-सोनारांचे उपाध्याय सोनार असतात. यांच्यांत पंचायती आहेत. दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण हे लेख पहा. [मुंबई सेन्सस रिपोर्ट, ८ (१९११); रसेल – हिरालाल; मुं. गॅ. १२, इत्यादि.]

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .