प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
          
सोंडूर— मद्रास सरकारच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीं असलेल्या पांच संस्थानांपैकीं हें एक अतिशय कमी लोकवस्तीचें संस्थान आहे. हें बल्लारी जिल्ह्यानें परिवेष्ठित असून तेथील कलेक्टरच या संस्थानचा पोलिटिकल एजंट होय. संस्थानचें क्षेत्रफळ १६७ चौरस मैल असून त्यांत २० खेडीं आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९२१) ११६८६ आहे. बल्लारी जिल्ह्यापेक्षां येथील हवा थंड असून पाऊसहि जास्त पडतो. पावसाचें सरासरी वार्षिक मान ३० इंच आहे.

इ ति हा स.— मुधोळकर घोरपड्यांची एक शाखा येथें आहे. सांप्रतच्या राजा पूर्वज घोरपडे कुलोत्पन्न सिदोजीराव ह्यानें हें सन १७२८ त जिंकलें. त्याच्या पश्चात त्याचा वडील मुलगा गुत्तीचा मुरारराव हा राजा झाला. सन १७७५-७६ सालीं हें हैदरअल्लीनें जिंकलें व त्या ठिकाणीं हैदर व त्याचा मुलगा टिप्पू ह्यांनीं एक किल्ला बांधिला. टिप्पू व मुरारीरावचें मुलगे ह्यांच्यांत बरीच भांडणें झालीं पण टिप्पूच्या मरणानंतर मुरारीरावचा पणतू शिवराव हा सोंडूर येथें जहागीरदार ह्या नात्यानें राहूं लागला. पुढें सन १८१५ मध्यें बाजीराव (दुसरा) यानें सोंडूर काबीज करण्याचा घाट घातला. पण तो फसला. पेशवाई बुडाल्यावर १८२६ सालीं मद्रास सरकारकडून राजाला नवी सनद मिळून तो सोंडूर येथें सुखानें राहूं लागला. तो सन १८४० त वारला व त्याच्या मागून वेंकटराय (सन १८६१) गादीवर आला. त्याला १८७६ साली राजा हा किताब मिळाला पुढें दोन वर्षांनीं हा वारला व रामचंद्र विठ्ठल नांवाचा त्याचा पुतण्या वारस झाला. सध्याचें राजे व्यंकटराव रावसाहेब भोंसले, हिंदु राव मामळुकदार, सेनापति घोरपडे हे आहेत.

प्राचीन अशीं मुख्य बांधीव कामें म्हटलीं म्हणजे कृष्णनगरचा किल्ला, रामदुर्गचा जुना किल्ला, व सोंडूर शहरापासून ७ मैलांवर असलेलें कार्तिकस्वामीचें मंदिर हीं होत (कार्तिक स्वामी पहा). त्या मंदिरावरील लेखांवरून असें दिसतें कीं हें मंदिर सन ९५० च्या सुमारास बांधलें गेलें असावें. १९२१ सालीं येथील लोकसंख्या ११६८६ भरली. यांत लिंगायत व बेडर लोक आहेत. मराठे १ हजार, शिवाय २००० पेक्षां जास्त मुसुलमान असून हिंदूंपैकीं बहुतेक शेतकाम करणारे व सादर, मादिगा व कुराबा जातीचे, धनगर आहेत. येथें कपाशीच्या जोगी अशी काळी भोर जमीन नाही. येथील मुख्य पिकें म्हणजे चोलम, कोरा व सज्जा ही होत. गळिताचीं धान्यें, विड्याचीं पानें व तंबाखू हींहि होतात. ८७००० एकर जमीन जंगलांनीं व्यापिलेली आहे; त्यांपैकीं ४०००० एकर जमीन १८८२ सालापासून मद्रास सरकारला २५ वर्षांकरितां दिली आहे. त्याचा दरसाल कर १०००० रु. आहे. यात चंदनाची झाडें आहेत. संस्थानांतील खनिज संपत्ति मात्र विशेष लक्ष देण्याजोगी आहे. तींतील हेमेटाइट् (तांबडे चरे असलेली लोखंडाची मौल्यवान धातु) ही हिंदुस्थानांत सर्वांत जास्त मूल्यवान आहे. म्यांगेनीजच्या खाणीहि ३ ठिकाणीं लागल्या आहेत. व्यापाराच्या दृष्टीनें हें संस्थान अगदींच मागसलेलें आहे. येथें फक्त कांबळीं तयार होतात. येथील राज्यकारभार मुख्यतः दिवाणाच्या हातांत असतो व त्यावर बल्लारी जिल्ह्याचा कलेक्टर ह्याची पोलिटिकल एजंट ह्या नात्यानें देखरेख असते. येथील एकंदर उत्पन्न सरासरी लाख सव्वा लाख रुपये आहे. येथें एक दुय्यम शाळा, १२ प्राथमिक शाळा व एक मुलींची शाळा आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .