प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
       
सोडा— सोडा म्हणजे ज्यास सोडियम कॅर्बोनेट म्हणतात तो होय. पूर्वी नैसर्गिक स्थितींत सांपडणार्या सोड्याचा उपयोग कांच, साबू वगैरे कामांत होत असे. तो सोडा नद्या, तलाव अथवा समुद्रकिनार्यावर सांपडणार्या खारापासून तयार करण्यांत येत असे. १८ व्या शतकाच्या शेवटीं सोड्याचा खप इतका वाढला कीं, नैसर्गिक मिळणारा सोडा अगदी अपुरा वाटूं लागला. ह्याच सुमारास फ्रान्समध्यें होत असलेल्या राज्यक्रांतीमुळें फ्रान्सचा इतर देशांशीं असलेला व्यापारी संबध जवळजवळ अगदीं नष्ट झाल्यासारखा होता. यामुळें बाहेरून येणारा सोडा अजीबात बंद झाला. व फ्रान्सला सोड्याची टंचाई फारच भासूं लागली. ही अडचण दूर करण्याकरितां फ्रेंचसरकारनें कृत्रिम सोडा तयार करवून देण्याची कृति शोधून काढणार्यास दहा लक्ष फ्रँकांचें बक्षीस कबूल केलें व तें सन १७९१ त लेब्लांक नामक गृहस्थानें पटकाविलें. लेब्लांकनें मिठापासून सोडा तयार करण्याची कृति शोधून काढली. लेब्लांक याला जरी मोठें बक्षिस मिळालें व त्याचा फार गौरव करण्यांत आला तरी फ्रान्सच्या अंतःस्थितीमुळें व पुढें नेपोलियनच्या लढाईमुळें फ्रान्सला त्या शोधाचा उपयोग करतां आला नाहीं. लेब्लांक हा १८०६ त अत्यंत गरीब स्थितींत मेला. लेब्लांकचा शोध इंग्लंडमध्यें जाऊन तेथें त्या शोधाचें चीज करण्यांत आलें. इंग्लंडमध्यें मस्प्रॅट नामक गृहस्थानें आटोकाट मेहनत करून मिठावरील कर वाढविला व सन १८२४ त त्यानें लेब्लांक कृतीनें सोडा तयार करण्याची पहिली गिरणी चालू केली. या रीतीनें इंग्लंडनें रासायनिक औद्योगिक उन्नतीचा पाया घातला. सोड्याचें महत्त्व या क्षेत्रांत किती प्रचंड आहे हें सर्वांस माहीत आहेच. सोड्याबरोबरच इंग्लंडच्या कापूस, गंधकाम्ल यांच्या कारखान्यांचीहि भरभराट होऊं लागाली व सोड्याच्या कारखान्यांत सहज निघणारे हायड्रोक्लोरिक-अम्ल व इतर पदार्थ एकावर एक व मुबलक निघू लागले. कोळशाच्या खाणींच्या आसपास म्हणजे विषेषतः न्यू कॅसल, ग्लासगो, विड्नेस, सेंट हेलेन्स इत्यादि ठिकाणीं सोड्याचें कारखानें भराभर निघाले व इंग्लंडने जवळजवळ ५० वर्षे पावेतों. जगाला सोडा पुरविण्याचा मक्ता आपणाकडे ओढून घेतला.

यानंतर सोड्याच्या आयुष्यांतल्या दुसर्या महत्त्वाच्या युगास एर्न्स्ट सॉलव्हें नांवाच्या गृहस्थानें सॉलव्हे अथवा अमोनिया कृतीचा शोध लाविल्यापासून सुरुवात झाली. सॉलव्हेच्या कृतींत गंधकाम्ल आणि हायड्रोक्लोरिक-अम्ल हीं अजीबात लपून गेलीं व सोड्याची किंमतहि १/३ पर्यंत उतरली. परंतु अशा स्थितींतहि लेब्लांक कृति, तींत उत्पन्न होणारा क्लोरिनवायु आणि इतर द्रव्यांमुळें सॉलव्हें याच्या नवीन कृतीस चांगलीच टक्कर देत होती. परंतु पुढें इलेक्ट्रिसिटीचा प्रसार होऊन क्लोरीन वगैरे द्रव्यें इलेक्ट्रोलिसीस प्रयोगानें स्वस्त निघूं लागल्यामुळें लेब्लांक कृति मागे पडूं लागली व तितक्या प्रमाणांत सॉलव्हे कृति पुढें येऊं लागली. हल्लीं लेब्लांक कृति फक्त इंग्लंडमध्यें कांहीं विशेष प्रचारांस आहे. तरी पण तेथें असलेल्या ४०-५० कारखान्यांतून आज एकच कारखाना (धी युनायटेड अल्कली कंपनी) शिल्लक आहे. हल्लीं सोड्याचा खप इतका प्रचंड वाढला आहे कीं, सोड्याबरोबर होणारे इतर सर्व पदार्थ दुसर्या रीतीनें जास्त स्वस्त तयार होऊं लागले तरी सोड्याचे कारखानें फक्त सोड्याकरितांच सुरू ठेवावे लागतील. दरवर्षास सुमारें २० ते २५ लक्ष टन सोडा तयार केला जातो.

लेब्लांक कृति, मिठापासून सोडियमसल्फेट:- सोडियमसल्फेट हें सोडियम क्लोराईड आणि गंधकाम्ल यांपासून तयार करतात. सोडियम सल्फेटपासून सोडियम कार्बोनेट अथवा सोडा पुढील रीतीनें करतात : सोडियमन सल्फेट १०० भाग, कॅल्शियम कार्बोनेट ९०-१२० भाग आणि दगडी कोळसा ७०-८० भाग पर्यंत एकत्र करून तें मिश्रण साधारण पातळ होईतोपर्यंत तापविण्यांत येतें व या तापविण्याच्या क्रियेंत तें मिश्रण एकसारखें खालीवर करावें लागतें. सन १८६० पासून या प्रयोगांत मोठाल्या, फिरणार्या लोखंडी पिपाच्या आकाराच्या भट्ट्या वापरण्यांत येतात. या कृतींत प्रथम सोडियमसल्फेट आणि कोळसा यांचा एकमेकांवर प्रयोग होऊन सोडियमसल्फेटमधील सर्व प्राणवायु कोळशाबरोबर मिळून त्यांत सोडियमसल्फाईड आणि कर्ब-द्विप्राण अथवा कर्ब-प्राण असे वायू तयार होतात. नंतर सोडियम सल्फाईड आणि कॅल्शियम कार्बोनेट यांची दुबार प्रतिक्रिया होऊन सोडियम कार्बोनेट व कॅल्शियम सल्फाईड अशी द्रव्यें तयार होतात.

सोडा स्वच्छ करणें:— वरील प्रमाणें तयार झालेल्या सोड्यांत कॅल्शियम सल्फाईड, कॅल्शियम ऑक्साईड, सोडा, कोळसा इत्यादि अनेक द्रव्यें एकत्र असल्यामुळें तो पांढरा न दिसतां काबर्या रंगाचा दिसतो. तेव्हा सोडा भिजविण्याचें पाणी साधारणपणें ५० अंशापर्यंत तापविण्यांत येतें. इतर गाळापासून स्वच्छ करण्याकरितां त्यास पाण्यांत विरघळवून व तें मिश्र पाणी गाळून पुन्हां आटवून त्यांतून सोडा काढावा लागतो.

सॉलव्हे अथवा अमोनिया कृति.— ही कृति किंमतीत स्वस्त आणि करण्यांत सोपी अशी आहे. मीठ (सोडियम क्लोराईड) आणि अमोनियम बायकार्बोनेट यांचे रस एकत्र केल्यास दुबार प्रतिक्रिया होऊन त्यांतून सोडियम बायकार्बोनेटचे कण पृथक् होऊन खालीं बसतात आणि अमोनियम क्लोराईड पाण्यांत विद्रुतावस्थेंत राहतें. याच मुख्य प्रयोगावर ही कृति बसविलेली आहे. सोडियम बायकार्बोनेटपासून सोडा तयार करणें अगदीं सोपें आहे. त्यास फक्त अतिशय तापविल्यास त्यांतून कर्बद्विप्राण आणि पाणी निघून जातें व मागें सोडा शिल्लक राहतो. या कृतीनें तयार झालेला सोडा स्वच्छ आणि निर्भेळ असतो. व एकंदरींत ही सॉलव्हेची ओली कृति लेब्कांकच्या कोरड्या कृतीपेक्षां कित्येक बाबतींत किफायतशीर अशी आहे. सोड्याचा प्रयोग कांच आणि साबू तयार करण्याकडे, तसेंच इतर अनेक जातीचे रासायनिक फेरफार करण्याकडे करतात. कापूस, कागद, रंग वगैरे अनेक बाबतींत सोड्याची फार जरूरी असते. [लुंगहांडबुख डर सोडा इंडुस्ट्री; श्राईब-सोडा नाखडेम अमोनियाक फेरफारेन. इ.] (लेखक डॉ. वा. द्वा. कोर्डे).

सोडा वाटर.— पृथ्वीतलावर कित्येक ठिकाणीं कर्बद्विप्राणिल वायूनें युक्त अशा पाण्याचे झरे सांपडतात. कित्येक वेळां या पाण्यांत खारट लवणें विरघळलेलीं सांपडतात. याचा उपयोग फार प्राचीन काळापासून औषधांमध्यें करीत असत परंतु उपरिनिर्दिष्ट वायु त्या पाण्यांत आहे हें पुष्कळ दिवसपर्यंत लोकांस माहीत नव्हतें. ही गोष्ट माहीत झाल्यावर त्याप्रकारचें पाणी कृत्रिम रीत्या लोक करूं लागले. घरगुती कामाकरितां लहान लहान लोखंडी पोकळ गोळ्या विकत मिळतात. या गोळ्यांत कर्बद्विप्राणिल वायु भरलेला असतो. एक बाटली पाण्यानें भरून तींत या गोळ्यांतील वायु सोडतात म्हणजे सोडावाटर बनतें. मोठ्या प्रमाणावर करण्याकरितां वायूत्पादक यंत्र (गॅसोजीन) असते. त्यांत एका बाजूस गंधकाम्ल व सिंध्वर्धकर्बनित यांपासून वायु तयार होत असतो व तो नळीनें पाण्यानें भरलेल्या बाटल्यांतून भरतात व बाटल्या रबराच्या बुचानें बंद करतात किंवा बाटल्यांतून कांचेच्या गोळ्या असतात त्या तोंडाशीं येऊन असतात व बाटली बंद हाते. या पाण्यांत कधीं कधीं लिंबू, आलें, संत्रें यांचे अर्क घालतात म्हणजे त्या पाण्यास विशेष चव येते. हा वायु लोखंडाच्या मोठाल्या नळकांड्यांतून भरून दुसर्या ठिकाणीं पाठवितां येतो व म्हणून यंत्रानें वायु तयार करण्याऐवजीं हीं नळकांडी विकत घेऊनच लोक काम भागवितात. या पाण्याचें विशेष रूढ झालेले नांव ''सोडावाटर'' हें आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .