प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
        
सैन्य— युद्धामध्यें ज्या अनेक साधनांनीं लढाई करतात त्या सर्वांचा या शब्दांत अंतर्भाव होतो. हल्लीं पायदळ, घोडदळ, तोफखाना व विमानदळ आणि समुद्रावरील युद्धाकरता आरमार इतके प्रकार सैन्यांत असतात ('युद्ध', 'आरमार', 'तोफखाना', 'दारूगोळा' हे लेख पहा). सैन्य घेऊन युद्धास कसें उभें राहावयाचें व युद्ध करतांना व केल्यानंतर कोणते नियम पाळावयाचे वगैरेसंबंधीं सविस्तर विवेचन 'युद्ध' या लेखांत येऊन गेलेंच आहे. युद्धसाधनांवर स्वतंत्र लेख आहेतच. या लेखांत जगांतील जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांचें आज सैन्यबल काय आहे तें दिलें आहे. गेल्या महायुद्धानंतर 'शस्त्रसंन्यसपरिषदा' वगैरे भरून सैन्य कमी करण्याचे तात्विक प्रयत्न चालू असले तरी आरमार व वैज्ञानिक दळ वाढविण्याचें कामहि अनेक राष्ट्रांत जोरानें चालू आहे.

ग्रेटब्रिटन.— महायुद्धाच्या वेळीं ग्रेटब्रिटनच्या सैन्यांत ५७०४००० लोक होते. तह होऊन सैन्य कमी करण्यांत येऊं लागल्यावर सैन्याची संख्या झपाट्यानें कमी झाली. १९२५ सालीं खड्या सैन्यामध्यें फक्त २१३००० लोक होते. त्यांपैकीं युनायटेड किंगडम, हिंदुस्थानेतर ब्रिटिशसाम्राज्य मिळून १५१००० इतकें होतें आणि हिंदुस्थानांत ६२००० होतें. टेरिटोरियल सैन्याची संख्या १८६००० होती. सक्तीच्या लष्करी नोकरीचा कायदा रद्द करण्यांत आला आणि सैन्यांत भरती खुषीच्या तत्त्वानुसार करण्यांत येऊ लागली. टँक फोर्स कमी करून प्रत्येकीं सुमारें २५ मशीन्स असलेलीं चार बॅटॅलिअनें ठेवण्यांत आलेलीं आहेत. तोफखान्याच्या फक्त १२ बॅटरी आणि ड्रेगन नांवाच्या आठ बॅटरी ठेवण्यांत आलेल्या आहेत. सर्व स्वसत्ताक ब्रिटिश वसाहतींनीं स्वतःचें सैन्य ठेविलें असून त्यामध्यें गेल्या महायुद्धांत प्रत्यक्ष भाग घेतलेले पुष्कळ अधिकारी व सैनिक आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्यें सक्तीच्या लष्करी शिक्षणाचा कायदा लागू आहे आणि कानडा व दक्षिण आफ्रिका येथील सरकारांनां तसा कायदा करण्याचा अधिकार आहे.

युनायटेड स्टेटस्.— महायुद्धाच्या वेळीं सक्तीच्या लष्करी नोकरीचा कायदा पास करून ३७०७००० सैन्य जमविलें. १९२४ सालीं या देशांतील सैन्याची संख्या १३१००० असून त्यांपैकीं ३७००० सैन्य देशाच्या बाहेर होतें. या देशांत नॅशनल गार्ड उर्फ मिलीशिआ पद्धतीचें सैन्य असून शांततेच्या काळांत खुषीच्या पद्धतीनें सैन्यभरती करण्यांत येते.

फ्रान्स.— हल्लीं फ्रान्सचें सैन्य यूरोपांत सर्वांहून अधिक बलिष्ठ आहे. महायुद्धाच्या वेळीं ७९००००० सैन्य जमविण्यांत आलें होतें, पण त्यापैकीं फार मोंठी संख्या कामास आली. १९२६ मध्यें फ्रेंच सैन्य ४२१००० असून शिवाय ३१००० व्हाइट ट्रूप्स आणि ६५५०० कलर्ड ट्रूप्स र्हाइन नदीच्या प्रांतांत ठेवण्यांत आले होते. फ्रेंच तोफखाना अप्रतिम स्वरूपाचा आहे. सर्व यूरोपांत फ्रेंच तोफखाना श्रेष्ठ प्रतीचा आहे. फ्रेंच मैदानी तोफ एका मिनिटांत २० गोळे फेंकू शकते. या तोफेचा व्यास ७५ मिलिमिटर म्हणजे सुमारें ३ इंच आहे. लाइट टँक फोर्सची १८ रेजिमेंटे आहेत आणि हेवी टँक फोर्सचे सहा समूह आहेत. शिवाय ३३००० लोक व १३५१ मशीन्स असलेलें बलिष्ठ विमानदळ आहे. दरसाल ८०० पायलट शिकवून तयार करण्यांत येतात. लढाऊ व टेहळणी करणारी मिळून विमानदळांची २०० स्काड्रन्स आहेत.

जर्मनी.— व्हर्सेल्सच्या तहानें जर्मन सरकारनें फक्त एक लक्ष सैन्य ठेवावें असें ठरलें. सक्तीची लष्करी नोकरी नसावी, विमानदळहि मुळींच नसावें आणि र्हाईन नदीच्या पूर्वेस ३० मैलांच्या अंतरावर ठरविलेल्या सरहद्दीवर कोणत्याहि प्रकारचें किल्लेकोटाचें व तटबंदीचें काम जर्मनीनें करू नये असें ठरलें आहे. विमानदळ नसावें ही अट असली तरी विमानी वाहतुकीला परवानगी असल्यामुळें वाहतुकीची विमानें जरूर त्यावेळी लढाऊ बनवितां येतील अशा प्रकारच्या युक्त्या बनविण्यांत येत आहेत. पुष्कळसें युद्धोपयोगी सामान व दारूगोळा दोस्त राष्ट्रांच्या देखरेखीखालीं नष्ट करण्यांत आला, तथापि ज्यांनीं गेल्या महायुद्धांत प्रत्यक्ष भाग घेतला असे सैनिक व लष्करी अधिकारी मिळून ६०००००० लोक जर्मनींत आहेत. १९२२ च्या हिवाळ्यापासून दोस्त राष्ट्रांच्या कमिशनची देखरेख बंद करण्यांत आली आहे. त्यामुळें आतां जर्मनीच्या लष्करी वाढीवर प्रत्यक्ष नियंत्रण उरलें नाहीं.

इटली.— या देशांत महायुद्धाच्या वेळीं ५६००००० सैन्य होतें, त्याऐवजीं हल्ली ३०८००० आहे. या सैन्यांत भरती १८ महिने सक्तीच्या लष्करी नोकरीच्या कायद्यानें करण्यांत येते. सैन्याचे एकंदर १० कोअर असून विमानदळांत १९२५ सालीं ६५० मशीन्स होतीं; ती संख्या लवकरच ४५०० इतकी करण्यांत येणार आहे. शिवाय लीबिया (ट्रिपोली), इरिट्रिया व इटालियन सोमालीलँडमध्यें थोडथोडें शिबंदी सैन्य ठेवण्यांत आलें आहे.

रशिया.— बोल्शेव्हिक सरकारची रेड आर्मी या सैन्यांत ६००००० लोक असून त्यांत सक्तीच्या लष्करी नोकरीच्या कायद्यानें भरती करण्यांत येते. पण सोव्हिएट सरकारचा कारभार भ्रष्ट स्वरूपाचा असल्यामुळें या सैन्यांत खरें सामर्थ्य नाहीं म्हणतात. १९२० मध्यें पोलंडच्या सैन्यानें-बोल्शेव्हिक सैन्य संख्येनें पुष्कळ अधिक होतें. तरी-त्याचा पूर्ण पराभव केला होता. शिवाय रशियांत रेल्वेची व्यवस्थाहि नीट नाहीं. जर्मन तज्ज्ञांच्या शिक्षणानें मोठें विमानदळ तयार करण्यांत येत आहे. पण त्यांत हल्लीं २०० हून अधिक चांगली मशीन्स नाहींत असें वाटतें.

पोलंड.— पोलंडमध्ये सक्तीची लष्करी नोकरी दोन वर्षे करण्यासंबंधीं कायदा आहे. १९२४ सालीं प्रत्यक्ष सैन्यांत २७५००० लोक होते. ही संख्या युद्धकालीं ९८०००० इतकी करणें शक्य आहे. तथापि राष्ट्रीय जमाखर्चाची स्थिति अडचणीची असल्यामुळें मोठें सैन्य चांगल्या स्थितींत राखणे या देशाला अधिकाधिक जड वाटत आहे. विमानदळांत १२६ मशीन्स असून इटलींत बनविलेली तीस आकाशगामीं (फ्लाइंगबोट्स) जहाजें आहेत.

सर्व्हिया.— सर्व्हिया आणि चेकोस्लोव्हाकिया या दोघांचे मिळून सैन्य १२८००० आहे. सक्तीच्या लष्करी नोकरीचा कायदा आहे. त्यामुळें युद्धकाळीं १०००००० सैन्य उभारणें शक्य आहे.

जपान.— जपानांत सक्तीची लष्करी नोकरी तीन वर्षे करण्याचा कायदा आहे. शांततेच्या काळीं जपानचें सैन्य २५२००० आहे, व त्यांपैकीं २५००० मांचुरिया व कोरिया यांमध्यें आहे. जरुरीच्या वेळीं २०००००० सैन्य जमविण्याची तयारी जपानजवळ आहे. तथापि एवढ्या सैन्याला लागणारा तोफखाना, बंदुका व दारूगोळा पुरविण्याची योग्य व्यवस्था जपानानें केलेली नाहीं. जपानीं बंदुकांचीं भोकें फार बारीक असतात; आणि मैदानी तोफा क्रप तोफांच्यापेक्षां कमी प्रतीच्या असतात. महायुद्धानंतर जपाननें मोठाल्या तोफो ओतल्या आहेत.

याशिवाय रुमानिया देशाचें शांततेच्या वेळचें सैन्य १४६००० आणि युद्धकाली जमवितां येईल असें १००००००; स्वीडनमध्यें ३६००० व ६०००००; बल्गेरियांत २१०००; स्वित्झर्लंडचें युद्धकाळांतलें सैन्य २००००० आणि शांततेच्या काळांतलें खडें सैन्य फारच थोडें; स्पेनमध्यें २६२००० पैकीं मोरोक्कोमध्यें ८५०००; पोर्तुगालमध्यें सुमारें ४०१००; चेकोस्लोव्हाकियामध्यें ९००००, ग्रीसमध्यें ८६००० आणि तुर्कस्तानांत १३००००. याप्रमाणें सैन्यांची संख्या आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .