प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
       
सेनीगाल— पश्चिम आफ्रिकेंतील फ्रान्सच्या मालकीचा देश. या प्रदेशांतील फ्रेंच मुलुखाचे तीन विभाग आहेत. ते सेनीगालची वसाहत व मांडलिक संस्थानें; उत्तर सेनीगाल व नायरची वसाहत; आणि मोरटेनीआचा मुलूख (पश्चिम साहाराचा भाग)

सेनीगाल.— क्षेत्रफळ ७४११२ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) १२२५५२३. उत्तरेकडील किनारा सखल, रुक्ष व निर्जन असून दक्षिण बाजूला दलदलीचा असून वनस्पतींनीं समृद्ध आहे. समुद्रकांठची हवा थंड व आरोग्यकारक आहे. आंतील भागाची हवा फक्त तीन महिनेपर्यंत समशीतोष्ण असते. येथील जंगलांत सिंह, चित्ते, रानमांजर, रानडुक्कर, काळवीट इत्यादि प्राणी सांपडतात. सेनीगालमध्यें मुख्यतः 'मूर' लोक असून ते सेनीगालच्या उजव्या तीरावर राहतात. देशांत ठिकठिकाणीं फ्युला ही राष्ट्रजात आढळते. शुद्ध निग्रो रक्ताच्या अशा फारच थोड्या राष्ट्रजाती आहेत. मँडिगॉस ही जात अप्पर नायगरच्या पाणवठ्यांत राहते. बर्बर, फ्युला व मँडिगॉस, या मुसुलमान जातीं आहेत. बोलाफ्स व सीरर्स या सेंट लुई ते गँबियापर्यंतच्या समुद्रकिनार्यावर राहतात. या सर्व जाती सामान्यतः बहुपत्नीकत्व पाळतात. सेंटलुई, डाकर, गोरी, व रुफिस्क हीं मुख्य शहरें होत.

भुईमुग हा मुख्य व्यापारी जिन्नस आहे. एतद्देशीयांचें ज्वारी हें मुख्य खाद्य आहे. सोनें, लोखंड, तांबें, इत्यादि खनिज सांपडतात. आयात व्यापाराचे मुख्य जिन्नस म्हणजे कापसाचें सामान होय.

उत्तर सेनीगाल व नायगर— ही वसाहत व मांडलिक देश 'मिलटरी टेरीटरी' मिळून क्षेत्रफळ २१०००० चौरस मैल आहे, व लोकसंख्या ३०००००० आहे. नायगरच्या उत्तरेस व पूर्वेस मुख्यतः बर्बर वंशाचे लोक राहतात. नायगरच्या वळणांतील लोक निग्राइड्स आहेत. कायीज, वाफूलाबे, किटा, सिकासो, बामाको, कुलीकोरो, सेगु, बंबारा इत्यादि मुख्य शहरें आहेत. डिंक, रबर, सोनें  कमावलेलें कातडें, शहामृगाची पिसें इत्यादि वस्तू बाहेरदेशी पाठविण्यांत येतात. येथील लोक शेतीच्या कामांत फार हुशार आहेत. ज्वारी, मका, गहूं, नीळ इत्यादींची ते लागवड करतात.

इतिहास व राज्य व्यवस्था.— पश्चिम आफ्रिकेंतील फ्रेंच देशाचा इतिहास व सेनीगालचा इतिहास हे फार संलग्न आहेत. १५ व्या शतकांत सेनीगाल नदीच्या तीरावर पोर्तुगीजांच्या कांहीं वखारी होत्या. पहिली फ्रेंच वखार बहुतेक १६६६ त घातली गेली असावी. १६६४ ते १७५८ च्या दरम्यान सेनीगाल हें सात वेगळाल्या कंपन्यांच्या शासनव्यवस्थेखालून गेलें. १६९७ ते १७२४ पर्यंत सेनीगाल अँड्रेज या फ्रेंच गव्हर्नराच्या शासनसत्तेखालीं होता. १६७७ त फ्रेंचांनां डच लोकांपासून रुफिस्क, जोल, व गोरी हीं ठिकाणें मिळालीं व निम्बेजिनच्या तहानें (१६७८) ती त्यांच्याकडे कायमचींच सोंपविण्यांत आलीं. १७१७ त फ्रेंचांनीं पोरटेंडिक व १७२४ त आरग्युईन हीं बेटें मिळविलीं. १७५८ त ब्रिटिशांनीं गोरी व केपव्हर्ड प्रांत काबीज केला पण १७६३ त तो फ्रेंचांनां परत करण्यांत आला. १७८३ मध्यें संबंध सेनीगाल फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यांत आला. फिरून १८००-१८०९ या वर्षांत ब्रिटिशांनीं ही वसाहत काबीज केली व फिरून पॅरिसच्या तहानें ती फ्रान्सला परत मिळाली. यावेळी फ्रान्सची सत्ता गोरी बेट व सेंटलुई शहर यापलीकडे फारशी नव्हती. जनरल फैदहबीं या फ्रेंच गव्हर्नराच्या लक्षांत ही उणीव येऊन आफ्रिका खंडाच्या पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत पसरलेलें अफाट फ्रेंच साम्राज्य निर्माण करण्याची त्यानें महत्त्वाकांक्षा धरली. या हेतूनें ट्रारझॅस, ब्रेकनास, व ड्वाइश या मूरिश राष्ट्रजातींनां वठणीवर आणून त्यानें त्यांच्या राजांनां सेनीगाल नदीच्या उत्तरतीरापुरता आपला अधिकार मर्यादित करण्यास भाग पाडलें. १८५५ त त्यानें वॅलो देश आपल्या राज्यास जोडून केयीजच्या पलीकडील अंगास मेदाइन किल्ला उभारला. यानंतर फ्रान्सनें सेनिगँबिआ नजीकचा भाग जिंकिला.

१८६३ त नायगर देशाच्या अगदीं अन्तर्भागात घुसण्याकरितां फैदहवीं यानें डॉ. क्विटिन वगैरें लोकांस पाठविलें. या लोकांनीं सेगूपर्यंत जाऊन मध्य नायगर प्रदेशाची साग्र माहिती मिळविली. १८७९ ते १८९० पर्यंत बराच प्रदेश जिंकून घेण्यांत आला. १८९३ मध्यें तिंबक्तू काबीज करण्यांत आलें. याच्या पूर्वीच १८९० त फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांच्यांत करारमदार होऊन नायगरच्या पूर्वेकडील वसाहतीच्या दक्षिणेकडील देश ग्रेटब्रिटनला मिळाला. फिरून १८९८ त करारमदार होऊन ग्रेटब्रिटनला बुसा प्रांत व फ्रान्सला मोसी व नायगरच्या वळणांतील इतर मुलुख मिळाला. सरोवतरालगतचा प्रदेश सन १८९९ मध्यें फ्रान्सनें काबीज केला. सन १९०४ मध्यें फ्रान्स व ग्रेटब्रिटनमध्यें फिरून एकदां तह होऊन फ्रान्सला गँबियावर एक बंदर मिळालें. १९०५-६ मध्यें आईर व बिल्मा हीं मध्य साहारांतील दलदलीचीं स्थळें फ्रान्सनें घेतलीं. उत्तर सेनीगाल देश व नायगरच्या वळणांतील संस्थानें यांचा मिळून एक निराळा शासनप्रांत बनविण्यांत आला, व त्याला 'फ्रेंच सुदान' असें नांव देण्यांत आलें. १९०४ मध्यें ''धी कॉलनी ऑफ सेनीगाल अँड नायगर'' निर्माण करण्यांत आली, व तिजवर एक लेफ्टनेंट गव्हर्नर नेमण्यांत आला. याच वर्षी ट्रारझा व ब्रेक्ना या मूर राष्ट्रजातींच्या अमीरांनी आपला देश फ्रान्सच्या देखरेखीखालीं दिला. या प्रदेशाचा मॉरीटेनीआचा प्रांत बनविण्यांत आला. १९०८-९ मध्यें अँड्रार टेमूरमध्येंहि फ्रेंचांनीं आपलें बस्तान बसविलें. सेनीगाल व 'अप्पर सेनीगाल आणि नायगर' या दोन्ही वसाहतींचा राज्यकारभार फ्रेंच वेस्ट आफ्रिकेचा गव्हर्नर जनरल पाहतो. खुद्द सेनीगालचा कारभार लेफ्टनेंट गव्हर्नर सेक्रेटरी-जनरल व एक प्रीव्ही-कौन्सिल यांच्या मार्फत चालतो. या कौन्सिलांत बडे सरकारी अधिकारी व निमसरकारी पण सरकारनियुक्त लोक सभासद आहेत. या कौन्सिलला बजेटावर मत देण्याचा मात्र अधिकार नाहीं. न्याय व अंमलबजावणीं हीं खाती वेगळालीं आहेत. न्यायाला अनुरूप असलेले एतद्देशीय कायदे व रीतिरिवाज पाळण्यांत येतात. व्यापारी व औद्योगिक शिक्षणाच्या शाळा आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .