प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
      
सूक्ष्मदर्शक यंत्र— या प्रकारच्या यंत्रांच्या साहाय्यानें सूक्ष्म आणि अति-सूक्ष्म पदार्थ सुलभपणें पाहतां येतात. एखाद्या पदार्थांच्या योगानें जो कोन (डोळ्यांशीं) होतो त्यापेक्षां मोठा कोन करतां आल्यास तो पदार्थ मोठा दिसेल. सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या साहाय्यानें हा कोन मोठा करण्याचा यत्न केलेला असतो. सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या दोन जाती आहेत; एकाचें नांव साधें किंवा एकाकी सूक्ष्मदर्शक यंत्र आणि दुसर्याचें नाव संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्र. एकाकी सूक्ष्मदर्शक यंत्रांत एकच लेन्स वापरलेलें असतें किंवा एका लेन्साच्या इतकाच परिणाम होईल असा एखादा लेन्ससमुच्चय उपयोगांत आणलेला असतो; त्यायोगानें सरळ आणि दिखाऊ प्रतिमा उत्पन्न होऊन ती आपल्या नेत्रांस दिसते. संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्रांत दोन लेन्सें वापरलेली असतात. त्यायोगानें मोठी झालेली अशी प्रतिमा दिसतें.

एकाकी सूक्ष्मदर्शकाची रचना.— ज्या मनुष्याची दृष्टि सामान्यतः असावी तितकी असल्यास त्याला दहा इंच अंतरापासून तों वाटेल त्या लांबीवरील पदार्थ स्पष्ट दिसतो परंतु जवळील पदार्थाच्या अवयवाच्या अंगांचें व उपांगांचेंच नीट निरीक्षण करतां येतें. कारण जवळील पदार्थांचा कोन दूरच्या पदार्थापेक्षां मोठा असतो. कोणताहि पदार्थ दूर अंतरावर गेला असतांना त्याच्या बारीक रूपरेषा दिसेनाशा कां होतात असा प्रश्न उपस्थित होतो. याचें उत्तर असें आहे कीं, त्या पदार्थानें आपल्या नेत्रांशीं १ कलेपेक्षां (एक कला म्हणजे एका अंशाचा साठावा हिस्सा) कमी कोन केला तर त्या पदार्थाच्या रूपरेषा आपणांस दिसत नाहींत. हेंच दुसर्या शब्दांत सांगावयाचें म्हणजे दोन बिंदूंत जें अंतर असेल त्याच्या ३४३८ पट (एका कलेची भुजज्या १/३४३८ आहे) अंतरावरून त्याकडे पाहिलें असातं ते दोन बिंदू एकांत एक मिसळून एकच बिंदु दिसूं लागतो. सामान्य दृष्टीच्या मनुष्यानें दहा इंचांपेक्षां जास्त जवळ एखादा पदार्थ नेल्यास त्याच्या नेत्रांस त्या पदार्थांचें सूक्ष्मपणें निरीक्षण करतां येत नाहीं त्याकरितां त्याला एखादा बहिर्वक्र भिंगाचा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारें लेन्स धरल्यामुळें पदार्थाचें सूक्ष्म अवयव दिसूं लागतात; व जे पदार्थ अत्यंत सूक्ष्म आहेत ते दृग्गोचर होऊं लागतात. ज्या ज्या प्रमाणांत पदार्थांचें पृथुकरण करण्यांत येतें त्या त्या प्रमाणांत प्रकाशाची उणीव भासते. लेन्साच्या दोहोंकडील पृष्ठभागाच्या योगानें प्रकाशाचें परावर्तन होऊन त्या योगानें प्रकाश कमी पडूं लागतो. एका लेन्साच्या योगानें शेंकडा ९ या प्रमाणांत प्रकाश कमी होतो व दोन लेन्सांच्या योगानें शेंकडा १७ या प्रमाणांत प्रकाश कमी होतो. जर लेन्साच्या कांचा पातळ असल्या तर कांचेच्या योगानें प्रकाशाचें अपशोषण होत नाहीं असें म्हणावयास कांहीं प्रत्यवाय नाहीं.

संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्र.— जुन्या पदार्थविज्ञानशास्त्रवेत्त्यांचें असें मत होतें कीं, दुर्बिणीप्रमाणें दोन किंवा अधिक लेन्साचा उपयोग करून उत्तम प्रकारचें सूक्ष्मदर्शक यंत्र तयार करता येणार नाहीं. परंतु आधुनिक शास्त्रवेत्त्यांनीं हें मत चुकीचें आहे असें दाखवून दिलें व त्यांनीं असेंहि दाखवून दिलें कीं, संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें एकाकी सूक्ष्मदर्शक यंत्रापेक्षां जास्त विस्तृत प्रमाणावर पृथुकरण करितां येते.

अतिसूक्ष्मदर्शक यंत्र.— गणिताच्या आधारें आतां असें सिद्ध झालें आहे कीं, प्रकाशाच्या आंदोलनाच्या निम्म्या अंतरावर दोन सूक्ष्म बिंदू असतील तर ते दोन बिंदू सूक्ष्मदर्शक यंत्रांतून दिसूं शकतात. जर ह्या अंतरापेक्षां कमी अंतर असलें तर सूक्ष्मदर्शक यंत्रांतून ते दोन बिंदू निरनिराळे  दिसूं शकत नाहींत. सूक्ष्मदर्शक यंत्राची शक्ति वाढवून देखील हें कार्य सिद्धीला जात नाहीं. अर्थात वरील प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सूक्ष्मदर्शकत्वाची ही एक प्रकारची सीमाच आहे. परंतु कित्येक शास्त्रवेत्त्यांनीं यावर तोड काढली आहे. त्यालाच अतिसूक्ष्मदर्शक यंत्र असें नांव दिलें आहे. या प्रकारचें अतिसूक्ष्मदर्शक तयार करतांना प्रकाशाच्या विकृतीचा फायदा घेतात. हवेंत जे धूळीचे कण तरंगत असतात ते आपणास दिसत नाहींत. परंतु एखाद्या अंधेर्या खोलीत सूर्यप्रकाशाचा कवडासा पाडला तर तेच कण दृग्गोचर होतात. कारण त्या कणांवर प्रकाश पडून त्या योगानें प्रकाशाची विकृति होऊं लागते. या विकृतीच्या योगानें काळ्या पृष्ठभागावर तेजस्वी ठिपके दिसूं लागतात. याप्रमाणेंच अति सूक्ष्मदर्शक यंत्रांत याच गुणधर्माचा उपयोग केलेला असतो. प्रकाशाची विकृति उत्तम प्रकारें व्हावी म्हणून अतिसूक्ष्मदर्शकाच्या पुढील भिंगाचा मध्यभाग घांसून अपारदर्शक केलेला असतो व त्यावर काळें रोंगण चढविलेलें असतें. बाजूच्या वलयाकृति भागांतून कायतें प्रकाशाचें गमन होतें.

दोन डोळ्यांचें सूक्ष्मदर्शक यंत्र.— आतांपर्यंत जी सूक्ष्मदर्शकयंत्रें दिलीं आहेत. त्यांतून फक्त एकाच नेत्रानें अवलोकन करतां येतें; त्यामुळें त्या पदार्थांची जाडी, खोली वगैरे समजत नाहीं. खोली समजावी म्हणून दोन डोळ्यांच्या सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला आहे. एखाद्या त्रिकोणी भिंगाच्या योगानें प्रकाशाचे दोन भाग करुन घेऊन त्या योगानें दोन्ही नेत्रांनीं सूक्ष्म पदार्थाचें अवलोकन करतां येतें. याशिवाय सूक्ष्मदर्शकांत दुसर्या कांहीं सोयी करता येतात.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .