प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद      
 
सूर्यमाला— तेजोमेघापासून सूर्यमाला कशी निर्माण झाली याकरितां विश्वसंस्था (पृ.२४८ ज्ञा. को. वि. २०) व 'नक्षत्रपद्धति व तारकापुंज' (ज्ञा. को. वि. १६) हे लेख पहावेत. सूर्यमालेंत मध्यें सूर्य, नंतर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, प्रजापति व वरुण असे ग्रह एकापुढें एक आहेत. या आठ मोठ्या ग्रहांखेरीज बरेच लहान लहान ग्रहहि सूर्यमालेंत आहेत. धूमकेतूहि सूर्याभोंवतीं फिरतात. आठ मोठ्या ग्रहांपैकीं सहा ग्रहांच्या वेगळ्या माला आहेत, म्हणजे त्याच्या भोवतीं चंद्रासारखे उपग्रह फिरतात. सूर्यमालेंतील घटकांचें थोडक्यांत वर्णन पुढील कोष्टकांत दिलें आहे.

सूर्यकेंद्रीय सिद्धांत ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांत आरिस्टार्कसनें पुढें मांडला होता. पण पुढें तो इ. स. १५ व्या शतकापर्यंत लुप्त झाला (विज्ञानेतिहास, पृ. ३२८ पासून पुढें पहा). आपल्याकडे भास्कराचार्यांनी सिद्धांतशिरोमणीमध्यें ग्रहांच्या कक्षेचा क्रम असा सांगितला आहे; मध्यें पृथ्वी, तिच्या सभोंवतीं चंद्रकक्षा, चंद्रकक्षेच्या पलीकडे बुधकक्षा, बुधकक्षेच्या पलीकडे शुक्रकक्षा; शुक्रकक्षेच्या पलीकडे, सूर्यकक्षा, सूर्यकक्षेच्या पलीकडे भौम म्हणजे मंगळकक्षा, भौमकक्षेच्या पलीकडे गुरुकक्षा, गुरुकक्षेच्या पलीकडे शनिकक्षा आणि शनिकक्षेच्या पलीकडे नक्षत्रकक्षा आहे. याप्रमाणेंच प्राचीन सर्व ग्रंथकारांनीं ग्रहांच्या कक्षांचा क्रम सांगितला आहे. सूर्यमालेंतील युरेनस आणि नेप्च्यून हे दोन ग्रह प्राचीन लोकांस माहीत नव्हते याचें कारण असें आहे कीं, ते दोन्ही ग्रह नुसत्या डोळ्यांनीं आकाशांत पाहूं गेलें असतां दिसत नाहींत; दुर्बिणीच्या सहाय्यानें ते दिसतात.

प्राचीन ग्रहकक्षाभंगीकडे पाहिलें असतां वारक्रमाची एक मौज आपल्या लक्षांत येईल ती अशी:-प्रथम रविवार धरल्यास, रविकक्षेच्या पुढें तीन कक्षा सोडल्या असतां चंद्राची कक्षा येते. म्हणून रविवारापुढें सोमवार येतो. चंद्रकक्षेच्या पुढें तीन कक्षा (बुध, शुक्र आणि रवि यांच्या) सोडल्या असतां मंगळाची कक्षा येते म्हणून मंगळवार झाला. मंगळाच्या कक्षेच्या पुढें तीन कक्षा (गुरु, शनि व चंद्र यांच्या कक्षा) सोडल्या असतां बुधाची कक्षा येते म्हणून बुधवार येतो. याच पद्धतीनें पुढें तीन तीन कक्षा सोडिल्या असतां गुरू, शुक्र आणि शनि हे वार येतात. नवीन मताच्या ग्रहकक्षाभंगीवरून असा वारक्रम कांहीं निघत नाहीं. प्राचीनमतानें ग्रहांच्या कक्षा वर्तुळात्मक आहेत असें मानिलें आहे. नवीन मतें ग्रहांच्या कक्षा दीर्घवर्तुळात्मक आहेत असें सिद्ध केलेलें आहे. दीर्घवर्तुळाचीं दोन केंद्रें असतात, त्यांतील एका केंद्रामध्यें सूर्य असतो. प्राचीन भारतीय ज्योतिर्विदांनीं जरी ग्रहकक्षा वर्तुळात्मक मानिल्या आहेत तथापि ग्रहाचें स्पष्टस्थान आणण्याकरितां जी खटपट केली आहे, तिकडे अवलोकन केलें असतां, असें दिसून येईल की, त्यांनींहि ग्रहकक्षा दीर्घवर्तुळात्मकच सुमारें धरिल्या आहेत. म्हणूनच ग्रहांची स्पष्टस्थानें आणण्याकरितां अर्वाचीन लोकांनीं ज्या रीती ठरविल्या आहेत, त्यांवरून गणित करून ग्रहांची जी स्पष्टस्थिति येते तिच्याशीं अगदीं जवळजवळ जुळेल अशी स्पष्टस्थिति, प्राचीन ग्रंथकारांनीं दिलेल्या रीतीनीं गणित केलें असतां येते. सूर्याचें स्पष्टस्थान तर फारच बरोबर जुळतें. म्हणजे प्राचीन व अर्वाचीन लोकांची मध्यमग्रहस्थिति सारखी असतां पाश्चात्य रीतीनें गणित करून आकाशांत ग्रह अमुक स्थळीं दिसेल असें निघालें तर, प्राचीन गणितानेंहि त्याच स्थळीं आणि कधीं तत्समीप येतो. यूरोपांत कोपर्निकसनें सूर्यसिद्धांताचा पुन्हां पुरस्कार केला. पण त्याला पोप व त्याचे अनुयायी, एवढेंच नव्हे तर लूथर व त्याचे अनुयायी यांनींहि जोराचा विरोध केला. सूर्यमालेंतील ग्रहांच्या कक्षांसंबंधीं केप्लरचे नियम पुढें सर्वमान्य झाले ('ज्योतिःशास्त्र' पहा). न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणनियमांची यांत भर पडून सूर्यमालेची स्थिरता सिद्ध झाली. या न्यूटनच्या नियमासंबंधीं सविस्तर वर्णन 'विज्ञानेतिहास' विभागांत (पृष्ठ ३४७ पासून पुढें) सांपडेल.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .