प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद      
 
सूर्य— आकाशस्थ ज्योतीपैकीं पृथ्वीला विशेष महत्त्वाची अशी एक ज्योति. इतर तारकांप्रमाणेंच सूर्य ही एक तारकाच आहे; पण ती सर्वांत जवळची व सूर्यमालेची मध्यवर्ती अशी आहे. ''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! कारण पृथ्वीवर सजीव म्हणून जें जें आहे त्यास सूर्याचा आश्रय आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे निरनिराळे ॠतू होतात म्हणून आपला सर्व व्यापार चालतो. आणि हे ॠतू करणारा सूर्यच होय. सूर्य आपल्या विलक्षण प्रभावानें आपल्या भूलोकाला अधांत्रीं आकाशांत ओढून धरून आपल्या भोवतीं फिरण्यास लावितो. वीतभर रुंद दिसणारें एवढेसें बिंब परंतु तें आपल्या या पृथ्वीहून शेंकडोंपट मोठ्या गोलांसहि पृथ्वीच्या हजारों पट अंतरावरून आपल्याभोंवती फिरवितें. रात्रीस सूर्य नसतो, तरी पृथ्वीच्या दुसर्या अंगास त्याचा व्यापार चाललाच असतो. त्याच्यापासून उष्णतेचा वर्षाव सतत सर्व दिशांनी होत असतो. पृथ्वीवरील चराचरवस्तूंचें रक्षण आणि पोषण होण्यास किती उष्णता लागत असेल याची कल्पना करा ! परंतु सूर्यापासून निघणार्या उष्णतेचा दो अब्जांशच मात्र हिस्सा कायतो पृथ्वीस मिळतो. यावरून सूर्यापासून किती उष्णता बाहेर पडते याचें अनुमान होईल. सूर्य इतका मोठा आहे कीं, १३ लक्ष पृथ्व्या एकत्र कराव्या तेव्हां सूर्याएवढा गोळा होईल. म्हणजे दर तासास ३० मैलप्रमाणें रात्रंदिवस चालणार्या आगगाडीला सूर्याभोवतीं एक फेरा करून येण्यास सव्वा नऊ वर्षे पाहिजेत. सूर्याचें प्रकृतिद्रव्य पृथ्वी इतकें दाट नाहीं; सुमारें चवथाई विरल आहे. तरी त्याचें एकंदर द्रव्य मोजलें तर तें पृथ्वीच्या ३। लक्ष पट (वजन) आहे. सूर्याभोंवतीं फिरणार्या सगळ्या ग्रहांचें घटकद्रव्य एकत्र केलें तरी त्याच्या ७५० पट सूर्य आहे. म्हणूनच कोट्यवधि कोसांवरून तो त्यांस आपल्याभोंवतीं प्रदक्षिणा घालण्यास लावितो. पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे ह्याविषयीं १५० वर्षांपूर्वी कोणास कल्पनाहि नव्हती. हें अंतर काढण्यास निरनिराळ्या राष्ट्रांचें लक्षावधि रुपये आणि अनेक ज्योतिष्यांचे प्रयत्न खर्ची पडले आहेत. इसवी सन १७६१ आणि १७६९ या वर्षी झालेल्या अधिक्रमणांवरून सूर्याचें अंतर बरेंच सूक्ष्म समजलें. इसवी सन १८७४ आणि १८८२ च्या अधिक्रमणांनीं तें त्याहून सूक्ष्म ठरलें. पृथ्वी आणि सूर्य यांमधील अंतर ९२३००००० मैल आहे असें नक्की झालें आहे.

सू र्या व री ल डा ग.— नुसत्या डोळ्यांनीं पाहिलें तर सूर्यबिंब सर्व भागीं एकसारखें तेजस्वी दिसतें. परंतु दुर्बिणीतून त्याजवर एक किंवा अनेक काळे ठिपके दिसतात. आणि बाकीचें बिंब एखाद्या स्वच्छ प्रवाही पदार्थांत तांदुळांचे दाणें किंवा बारीक कण तरंगत असल्याप्रमाणें दिसतें. हे कण अस्पष्ट दिसतात; कोठें कोठें तर ते मुळींच दिसत नाहींत. यांनां कण म्हटलें तरी ह्यांचा वास्तविक विस्तार शेंकडों मैल असतो. सर्व डागांची आकृति सारखी नसतें. आणि सूर्य आपल्या आसाभोंवती फिरतो. यामुळें एकच डाग बिंबाच्या निरनिराळ्या भागीं निरनिराळा दिसतो. स्थानांतरामुळें होणार्या फेरफाराशिवाय स्वतः डागाच्या आकारांतहि फरक असतो. काहीं डाग कांहीं दिवस दिसून नाहीसें होतात आणि कांहीं तर कांहीं महिनें दिसत असतात. एखादा डाग इतका मोठा असतो की, तो नुसत्या डोळ्यांनींहि दिसतो. वराहमिहिरानें सूर्याचें वर्णन केलें आहे तें वाचीत असतां त्यास व त्याच्या पूर्वीच्या ज्योतिष्यांस सूर्यावरचे डाग दिसले असावे असें खात्रीनें वाटतें. सूर्यबिंबाचें क्षेत्र किती आहे हें मनांत आणिलें म्हणजे हे डाग लहान दिसले तरी त्यांचें क्षेत्र किती मोठें असतें हें लक्षांत येईल. कांही डागांचें क्षेत्रफळ कोट्यवधी मैल असतें. डागाचा मध्य भाग फार काळा दिसतो. त्याच छाया म्हणतात; आणि भोंवताली काळसर जागा दिसतें, तिला छयाकल्प म्हणतात. सूर्य आपल्या आंसाभोंवतीं फिरतो हें डागांमुळेच समजलें. हा अक्षप्रदक्षिणा काल सूर्यबिंबावर सर्व भागीं एकसारखा नाही. सूर्याच्या विषुववृत्तापेक्षा ध्रुवाकडील प्रदेशास आंसाभोवतीं फिरण्यास जास्त काळ लागतो. सुमारें २५ पासून २६॥ पर्यंत दिवसांत सूर्याची अक्षप्रदक्षिणा होते. सूर्यबिंबाच्या पूर्वप्रांती एखादा डाग दिसूं लागला तर सुमारें बारा तेरा दिवसांत पश्चिमप्रांती दिसतो. आणि पुन्हां १३।१४ दिवसांनीं पूर्वेस दिसूं लागतो. सूर्यावर हे डाग एखाद्या वर्षी फार दिसतात. तर एखाद्या वर्षी थोडेच दिसतात. सूर्याच्या डागांचा हवामानाशीं संबंध जोडण्यांत येतो (विज्ञानेतिहास, पृष्ठ ३६०-६१ पहा). डाग कमी असतात तेव्हां सूर्यकिरणें पिकास अनुकूल असतात, असें हर्शलचें मत होतें, आरोरा म्हणून चमत्कारिक प्रकाश उत्तरध्रुवाकडे दिसतो. तो आणि विद्युच्छक्ति ह्यांचा व डागांचा संबंध आहे असें दिसून आलें आहे. ज्या वर्षी डाग फार दिसतात त्या वर्षी आरोरा हें औत्तरतेज फार दिसतें व विद्युद्यंत्रें आणि लोहचुंबक यांस उपाधी फार होतात.

प्रभा मंडलें.— नुसत्या डोळ्यांनीं किंवा सामान्य दुर्बिणींतून सूर्य हा एक तेजोगोल दिसतो. परंतु खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीं सामान्य दुर्बिणीनें किंवा वर्णलेखक दुर्बिणीनें या तेजोगोलाच्या भोंवतालीं अनेक चमत्कार दिसतात. तेजोगोलाभोंवती प्रथम एक आवरण आहे. हें तेजोमय आहे. ह्याचा पृष्ठभाग उंचसखल दिसतो. तो करवतीच्या दांत्यांसारखा दिसतो. करवतीचें दांते एकसारखे असतात, तितकें नियमित हें आवरण नसतें. तथापि आपण त्यास क्रकचावरण म्हणूं ह्यांत दोन थर आहेत: खालचा सूर्यबिंबापासून सुमारें एकदोन विकला आहे आणि वरचा दहापंधरा विकला आहे. म्हणजे आंतल्याची उंची सुमारें पांचसहाशें मैल आहे, आणि बाहेरच्याची दोन हजारांपासून सात हजारांपर्यंत मैल आहे. या आवरणांतून मधून मधून तांबड्या किंवा गुलाबी रंगाच्या ज्वाला बाहेर येत असतात. ह्या कधीं थोड्या असतात, तर कधीं पुष्कळ असतात. सूर्यावर डाग नसतात तेव्हां ह्या बहुधां मुळींच नसतात. ह्यांस आपण तेजःशृंगें अथवा शृंगे म्हणूं. तेजोगोलापासून हीं कधीं ५०० मैल उंच असतात, तर कधीं ९००००० मैल उंच जातात. क्रकचावरणाभोंवतीं लखलखीत प्रभामंडल असतें. ह्यास किरीट अशा अर्थाचें 'कोरोना' असें यूरोपियन नांव आहे. हें मंडल तेजोगोलाच्या भोंवतीं सर्वत्र असतें. ह्यांस आपण प्रभाकिरीटमंडल अथवा प्रभामंडल म्हणूं. ह्यांत कधीं कधी दोन भाग दिसतात; एक आंतला आणि एक बाहेरचा. आंतला विशेष तेजस्वी असतो. प्रभामंडल कधीं अगदी अरुंद असते; कधीं तें कांहीं कला मात्र रुंद असतें व कधीं तर बिंबाइतकें बाहेर पसरलेलें असतें. सूर्यावर डाग थोडे असतात तेव्हां तें अगदीं लहान असतें व डाग फार असतील तेव्हां फार रुंद असतें. बिंबाचा व्यास सुमारे ८६०००० मैल आहे. प्रभामंडल पाऊण लक्षापासून १५ लक्ष मैलपर्यंत रुंद असतें. म्हणजे तेजोगोलाच्या वर इतकें उंच असतें.

सूर्यांतील द्रव्यें.— सूर्यावर प्रभामंडल आणि तेजःशृंगें कशामुळें उत्पन्न होतात; हें मंडल, ती शृंगें आणि क्रकचावरण यांची शरीरघटना कशी आहे, व या सर्वांच्या अंतर्यामीं असणारा साक्षात सूर्य हा काय पदार्थ आहे आणि त्यावर डाग कां दिसतात, हें समजण्याविषयीं सांप्रतच्या ज्योतिष्यांचे प्रयत्न चालू आहेत. प्रभामंडळ हें सूर्याचें वातावरण नव्हें असें आतां निर्विवाद ठरलें आहे. प्रभामंडलाच्या आंत क्रकचावरण आहे. तें सूर्याचें वातावरण होय. यांत अगदीं वर हायड्रोजन आहे. जों जों आंत जावें तसतसें अनेक धातू बाष्परूपानें आहेत. पायथ्याशीं या आवरणाची घनता फार आहे. व सूर्याच्या तेजोगोलापासून निघणार्या किरणांचें येथें निमीलन होतें; म्हणजे कांहीं किरण तें गिळून टाकतें. हायड्रोजन, सोडियम, लोखंड, मॅग्नेशिया, बेरियम, तांबें, जस्त, क्यालशियम, क्रोमियम, निकेल, टिटानियम, कोबाल्ट, मँगेनीज हीं द्रव्यें क्रकचावरणांत आहेत. सोनेंहि असेल असें संभवतें. शिवाय पृथ्वीवर माहीत नाहींत असेहि कांहीं पदार्थ आहेत. हे सर्व अत्युष्ण बाष्परूप स्थितींत आहेत. यांत धातू मुख्यतः खालच्या थरांत आहेत; आणि वायू मुख्यतः वर आहेत.

सूर्याची उष्णता.— सूर्यपृष्ठावर क्रकचावरणांत निरनिराळें व्यापार किती वेगानें चालले असतात हें वर्णितां येणें कठिण. क्रकचावरण हा एक अग्निसमुद्र म्हटला तर पृथ्वीवरील अत्युष्ण अग्निगृहांपेक्षांहि उष्ण आणि अटलांटिक महासागराच्या रुंदीहून खोल असा तो समुद्र आहे. त्याची गतिही वादळाची गति म्हणावी; तर पृथ्वीवर वादळाचा वारा तासांत फार तर १०० मैल वहातो. साक्षात् तेजोगोलाची उष्णता तर वरच्यापेक्षांहि भयंकर आहे. आपल्यास प्रकाश व उष्णता प्राप्त होते ती सूर्याच्या तेजोगोलापासून होते. दृश्य बिंबाच्या मध्यापासून प्रकाश व उष्णता ह्यांचे अरीभवन फार होतें. मध्यबिंदूपासून उष्णता जितकी निघते; तिच्या निम्मी कडेच्या भागांतून निघते. प्रकाश सुमारें तृतीयांश निघतो, आणि रासायनिक किरण सप्तमांश बाहेर पडतात. सूर्याभोवंतीं जें आवरण आहे त्यांत उष्णता आणि प्रकाश यांचें कांहीं निमीलन होतें असें वर सांगितलेंच आहे. तेजोगोलांतून जितके किरण बाहार पडतात, त्यांतलें सुमारें निम्मे क्रकचावरणांत गुप्त होतात. हें आवरण नसतें तर सूर्य हल्लींच्या सुमारें दुप्पट उष्ण आणि दुप्पट तेजस्वी असता आणि दृष्टीला अधिक स्वच्छ, नीलवर्ण दिसला असता. तरी हल्लीं पृथ्वीला सूर्यापासून एका दिवसांत जी उष्णता मिळते ती इतकी आहे की, पृथ्वीभोंवती बर्फाइतक्या थंड पाण्याचा २६० यार्ड खोल समुद्र असता, तर त्यास त्या उष्णतेनें आधण आलें असतें. आणि ती उष्णता सूर्यांतून निघणार्या एकंदर उष्णतेचा काय तो दोन अब्जांश हिस्सा आहे.

तेजोगोलाची घटना.— ही कशी आहे ह्याविषयीं दोन मतें आहेत : त्याचा वरचा भाग घन असावा आणि प्रकाश व उष्णता त्यापासून येत असावी असा संभव दिसतो. ह्या घन कवचाची जाडी सुमारें तीन चार हजार मैल असावी. हा तेजोगोलाचा बहिर्भाग घन नसेल तर त्याचा पृष्ठभाग सर्वकाळ एकसारखा सपाट दिसणार नाहीं. तो वायुरूपी आहे असें कित्येकांचें मत आहे. परंतु तसा असता तर वेगानें बाहेर पडणार्या शृंगाबरोबर त्यांत कल्लोळ उसळून त्याची सपाटी मोडती. परंतु ती कधीं मोडत नाहीं. हें कवच पृथ्वीच्या पृष्ठभागासारखें घन असेल असें नाहीं. त्याच्या आंत पदार्थ अत्युष्ण वायुरूप स्थितींत आहेत, त्यांवर द्रव्याचे घन परमाणू तरंगत असतील, आणि अशा परमाणूंचें हें कवच बनलें असेल म्हणून त्याची सपाटी मोडत नाहीं असें साधारण मत आहे. तेजोगोलाचा हा जो वरचा थर त्याच्या आंत सर्व द्रव्यें वाय्वावस्थेंत आहेत. ह्या आंतल्या भागीं दाब इतका आहे कीं, त्याची घनता प्रवाही पदार्थाइतकी आहे. तरी तेथें उष्णता अतिशय असल्यामुळें त्यांतली सर्व द्रव्यें रसायनसंयोग न पावतां वायूरूप स्थितींत आहेत. तेजोगोलाच्या उष्णतेची गणना करणें कठिण आहे. ती सुमारें दोन कोटी अंश असावी.

सूर्याची दैनिक गति, वार्षिक गति, ॠतुमान, पृथ्वीचें सूर्याभोंवतीं परिभ्रमण यासंबंधीं माहिती 'ज्योतिःशास्त्र' या लेखांत दिली आहे. सूर्यग्रहण कसें लागतें, त्याचे काल, गणित ही माहिती 'ग्रहणें' या लेखांत आढळेल. शिवाय, ॠतु, अयनचलन, संपातबिंदु, सूर्यमाला, वगैरे लेख पहा.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .