प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
    
सूतिकाज्वर— स्त्रिया प्रसूत झाल्यानंतर योनि, गर्भाशय, गुदद्वार यांठिकाणी बारीक सारीक जखमा पडतात. त्यावरून दहा दिवसांतील दुष्ट स्त्राव वहात राहिल्यानें दोषी अथवा सन्निपातज्वर उत्पन्न होतो त्यांस हें नांव आहे.

कारणें.— (१) ज्वर उत्पन्न करणारे विशिष्ट प्रकारचें जंतू जखमेवर वाहिल्यानें ज्वर उत्पन्न होऊन त्यामुळें विषारी द्रव्यें रक्तांत शोषिली जातात. (२) पहिलटकरीण बाळंतीण असतांना जननमार्ग आकुंचित असल्यामुळें जखमांसारखीं कारणें बहुधां उत्पन्न होतात. (३) प्रसुतीनंतर वारेचे तुकडे गर्भाशयांत राहून, ते अति त्वरित कुजणारे असल्यामुळें रक्तांत विषशोषण होऊन ताप येतो. (४) प्रसूतीमध्यें अडचण येऊन वेळ लागला तर अति श्रम व ताण पडल्यामुळें ज्वरप्रवृत्ति होते. (५) शरीरांतील मलोत्सर्जक इंद्रियें जीं मूत्रपिंड, यकृतादि असतात ती बिघडलीं असतां त्यांतच प्रसूति झाली तर ज्वरप्रवृत्ति बहुधा असतें. (६) सुईण, परिचारिका, डॉक्टर हे एका सूतिकाज्वर असलेल्या बाईचें बाळंतपण करून दुसर्या बाईचें बाळंतपण करण्यास गेल्यावर हा  ताप अति सांसर्गिक आहे म्हणून ज्वर येतो. (७) मनास धक्का बसणें, घरांतील व त्या खोलींतील मोर्या घाणीनें तुंबलेल्या असणें वगैरे अन्य कारणेंहि असतात.

लक्षणें — प्रसूतीनंतर पहिल्या पांच दिवसांत ताप येतो व त्यांतल्यात्यांत तिसर्या दिवशीं फार करून येतो. गर्भाशयाच्या ठिकाणीं दुखतें, प्लीहा मोठी होते, मस्तकशूळ फार असतो, रोगी वातानें बडबडतो, चेहरा ज्वरानें त्रासिक दिसतो, तापांत चढउतार झाल्यास घाम येतो, दुग्धोत्पत्ति सुरू असली तर दूध व योनिस्त्राव बंद होतात. व त्याच्या अगोदर स्त्रावास फार दुर्गंधि येते, वांती व त्यांतल्यात्यांत अतिसार हीं लक्षणें फार तीव्र प्रकारच्या ज्वरांत होतात. कोणा रोग्याच्या अंगावर कधीं कधीं पुरळ, लाली वगैरे उठते. तीव्र ज्वरांत ज्याप्रमाणें आगंतुक दुष्परिणाम घडतील त्याप्रमाणें नंतरचीं नवी लक्षणें होतात.

प्रतिबंधक योजना.— बाळंतिणीची प्रकृति गरोदरपणापासून निरोगी राहील अशी व्यवस्था ठेवावी. घरांत पुष्कळ ताजी, स्वच्छ हवा खेळू द्यावी. बाळंतिणीच्या खोलींत घाण क्षणभरहि साचूं देऊं नये. बाळंत होण्यास वेळ लागून बाळंतीण थकली तर सुटका लवकरच करविण्याच्या उपायास त्वरित लागावें. जखमा होतील तेथें टांके डॉक्टराकडून मारून त्या शिवाव्या; गर्भाशयाचें चांगलें आकुंचन होण्यासाठीं अर्गट, कोयनेल, डिजिटालीस यांचें मिश्रण द्यावें. घाणेरडी सुईण, परिचारिका येऊं देऊं नयें. खोलींत गर्दी करू नयें; डॉक्टर, सुईणीनीं बाळंतीण तपासण्याच्या अगोदर जंतुघ्न द्रव्याचा उपयोग करणें हा मुख्य प्रतिबंधक उपाय समजावा.

उपचार.— या रोगास उपचार घरगुती औषधांनीं करण्याचें मनांतहि आणूं नये. व जाणती डॉक्टरीण अगर डॉक्टराकडून उपचार करावेत. रसकापूर या विषारी औषधाचा उपयोग १ : १००० भाग पाणी याच प्रमाणांत दर चार सहा तासांनी योनिमार्ग धुण्याकडे करीत असतात; व गर्भाशयांत वार किंवा मृतगर्भ राहून तो पडल्यावर ज्वर आला असल्यास १:४००० उकळलेलें पाणी या प्रमाणांत वरील औषधानें गर्भाशय रोज एकदा अगर दोनदां धुतात. त्यासाठीं विशिष्ट प्रकारचीं यंत्रसाधनें असतात. कित्येक वेळां गर्भाशयांतील श्लेष्मावर बोथट शस्त्रानें खरबडून घ्यावें लागतें. कोठें जननमार्गांत व्रण, जखमा असल्यास त्यांवर योग्य इलाज करावे लागतात. पथ्यासाठीं दर दोन तासांनीं थोडें थोडें दूध देत जावें. शक्ति कायम राहण्यासाठीं वरचेवर तें पाजावें. ब्रांडी देण्याची जरूर बहुधां असतेच. तीहि दोन चमचे दर दोन तासांनीं दिली पाहिजे. एरवीं अशा भयंकर तापांत रोगी टिकाव धरीत नाही. जरुरीप्रमाणें अंड्याचें पौष्टिक मिश्रण द्यावें. रोग्याची शक्ति कायम राखण्यासाठीं मांसरस देतात. वांती अगर अन्य कारणामुळें पुरेसें दूध पोटांत जात नसल्यास गुदद्वारावाटे पौष्टिक पदार्थ घालून शक्ति टिकविली पाहिजे. जुलाब होत असल्यास ते बंद केले पाहिजेत. दर तीन चार तासांनीं कोयनेल ५ ग्रेन देतात. व हें पुष्कळ कोयनेल अॅसिडांत विरघळवलें नसलें तर त्यापासून रोग्यास इतका त्रास होत नाहीं. तें न मानवल्यास सोडा, स्यालिसिलेट वगैरें दुसरी औषधें देतातं. किंवा ती एकदां, व कोयनेल एकदां याप्रमाणें आलटून पालटून देतात. पोटदुखी असल्यास १५ थेंब टरपेण तेल देतात. अंत्रावरणदाह हा भयंकर दोष उत्पन्न झाल्यास वेदना शमण्यास अफू अगर मार्फिया देतात व त्यावेळीं मोठ्या प्रमाणांत हीं औषधें दिलेलीं चालतात. टोंचून घेण्याचा उपाय चांगला आहे. डोक्यावर बर्फाची पिशवी ज्वरामध्यें एकसारखी ठेवावी. या रोगांत अंत्रावरणदाह, पूयोत्पत्ति, कटिरदाह इत्यादि भानगडीचे दोष उत्पन्न होतात. त्यासाठीं शस्त्रक्रियेचा उपयोग होण्यासारखा असतो.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .