प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
    
सुरत, जिल्हा.— मुंबई इलाख्याच्या उत्तर विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ १६५३ चौरस मैल. जिल्ह्याचा वायव्य भाग व आग्नेय भाग यांच्यामध्यें बडोदें संस्थानची रुंद पट्टी आहे. या जिल्ह्याचा पृष्ठभाग समुद्रसपाटीच्या वर १५० फुटांपेक्षां जास्त उंचीवर नाहीं. कीम व तापी याखेरीज जिल्ह्यांत दुसर्या मोठ्या नद्या नाहींत; परंतु दक्षिणेकडे खोल व होड्या चालण्याजोग्या खाड्या असून जिल्ह्यांतील माल बाहेर पाठविण्याकरितां व किनार्यानें जाणार्या लहान लहान होड्यांनां आश्रय घेण्याकरितां त्यांचा फार उपयोग होतो. सीन, तेन, व कनई या मुख्य खाड्या होत. या जिल्ह्यांतील बहुतेक जमीन काळी व नद्यांच्या खळमळीनें झालेली आहे. सर्व जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणांत खजुराचीं झाडें आढळतात; व गावांत आंबा, चिंच, वड, लिंबडो पिंपळ वगैरे फळें व छाया देणारी झाडें सामान्यपणें दृष्टीस पडतात. सुरतेच्या आंब्यांचा स्वाद व गोडी हीं मुंबईच्या हापूस किंवा पायरीच्या आंब्यासारखीं असतात. सुरतच्या जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, तरस, हरिण, काळवीट वगैरे रानटी श्वापदें आहेत. समुद्रापासून अंतर कमजास्त असेल त्याप्रमाणें हवामान भिन्न भिन्न आहे. कांहीं ठिकाणीं उष्णमान एप्रिलमध्यें १०९० पर्यंत चढतें. सुरत शहरांत मध्यम उष्णमान ८२० असतें. आंतील भागापेक्षां किनार्याला पाऊस थोडा कमी पडतो. वार्षिक सरासरी पावसाचें मान (चोरासी येथें ३५ इंचांपासून तो पार्डी येथें ७२ इंचांपर्यंत) निरनिराळ्या ठिकाणीं भिन्न भिन्न असतें.

इतिहास:- हिंदुस्थानांतील ज्या भागांशीं यूरोपियन लोकांचा संबंध पहिल्यानें आला त्यांपैकीं सुरत हा एक होय. टॉलेमी ( इ. स. १५०) या ग्रीक भूगोलज्ञानें, पुलिपुल (म्हणजे कदाचित् सुरत शहरांतील फुलपाद हा पवित्र भाग असावा) या व्यापारी ठाण्याविषयी लिहिलेलें आहे. तेराव्या शतकांत, कुतुबुद्दिनानें अनहिलबाडचा रजपूत राजा भीमदेव याचा पराभव करून रांदेड व सुरत गावापर्यंत चाल केली असें मुसुलमान इतिहासकार लिहितात. तरी हें गांव बरेंच अर्वाचीन असावें असें दिसतें. १३४७ त, महंमद बिन तुघलखाच्या कारकीर्दीमध्यें गुजराथेंत बंड झालें असतां राजाच्या सैन्यानें सुरत शहर लुटून नेलें. भिल्लांपासून संरक्षण करण्याकरितां फेरोझ तुघलखानें येथें १३७३ त किल्ला बांधला. अर्वाचीन सुरत शहर, गोपी नांवाच्या हिंदु व्यापार्यानें १६ व्या शतकाच्या प्रारंभी वसवून त्यांत पुष्कळ सुधारणा केल्या अशी दंतकथा आहे. १५१२-१५३० व १५३१ या सालीं पोर्तुगीज लोकांनीं हें शहर जाळल्यामुळें सुमारें १५५६ पर्यंत अहमदाबादच्या राजांनीं येथील किल्ला चांगला मजबूत केला. १५७३ त, अकबरानें मिर्झा लोकांपासून तें काबीज केलें; व तेव्हांपासून सुरत शहर व जिल्हा १६० वर्षेपर्यंत मोंगलांच्या ताब्यांत होता. १५७३ नंतर, सुरत लगतच्या समुद्रांत पोर्तुगीज लोकांचें वर्चस्व पूर्णपणें स्थापन होऊन त्यांनां कोणी प्रतिस्पर्धी उरला नव्हता. पण १६१२ त गुजराथच्या सुभेदारानें इंग्रज व्यापार्यांशीं तह करून त्यांनां सुरत, खंबायत, गोध्रा व अहमदाबाद येथें व्यापार करण्याची परवानगी दिली. पुढें त्यांनीं पोर्तुगीज लोकांचा पराभव करून, बादशहाकडून लवकरच फरमान मिळविलें व हिंदुस्थानांत पहिली वखार स्थापन केली. डच लोकांनींहि सुरतमध्यें वसाहत करून, तेथें वखार घालण्याची परवानगी मिळविली.

औरंगजेबाच्या कारकीर्दीत या जिल्ह्यावर मराठ्यांचे वारंवार हल्ले होत होते. इ. स. १७०७ मध्यें औरंगझेब मरण पावल्यावर दिल्ली बादशहाची सत्ता कमी होत जाऊन, शहराच्या तटबंदीपर्यंत मराठ्यांनीं आपली सत्ता स्थापन केली. १७३३ सालीं सुरतचा मोंगल सुभेदार तेघ बख्तखान स्वतंत्र झाला. याच्या मृत्यूनंतर सुरतेंत बेबंदशाही माजली, इंग्रजांचें वर्चस्व स्थापन झालें. पुढें ४१ वर्षे म्हणजे इ. स. १८०० त येथील नवाब जरी नांवाला स्वतंत्र होते तरी बहुतेक कारभार इंग्रजच चालवीत असत. १७९९ त येथील शेवटला नामधारी नवाब मरण पावल्यानंतर सुरत व रांदेड हीं ठिकाणें इंग्रजांच्या पूर्णपणे ताब्यांत आलीं. नव्या नवाबाला फक्त नवाब ही पदवी आणि कांहीं पेन्शन देण्यांत आलें. जिल्ह्यांतील कांहीं भाग वसई (१८०२) व पुणें (१८१७) येथील तहांत मिळाला, व १८३९ त मांडवी संस्थान इंग्रजांनीं खालसा केलें व याप्रमाणें हल्लीचा जिल्हा तयार झाला.

लोकसंख्या:- या जिल्ह्यांत ८ मोठीं व ७७० लहान गावें असून एकंदर लोकसंख्या (१९२१) ६७४३५१ आहे. लोकसंख्येच्या बाबतींत मुंबई इलाख्याच्या २४ जिल्ह्यांमध्यें सुरत जिल्ह्याचा नंबर दुसरा लागतो. या जिल्ह्यांत सामान्यतः गुजराथी भाषा बोलतात. लोकसंख्येपैकीं शेंकडा ६० लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर होतो, आणि फक्त शें. ३५ लोक उद्योगधंद्यावर पोट भरतात.

शेती व व्यापार:— काळी, हलकी व भेसर असे येथील जमीनीचे तीन प्रकार आहेत. जिल्ह्यांत बहुतेक सर्व भागांत रयतवारी पद्धत चालू आहे. तांदूळ व ज्वारी हीं मुख्य पिकें असून गहूं, बाजरी, तूर, वाल, कापूस वगैरेंची लागवडहि होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागांत एरंडीची लागवड बरीच होते. बलसाड तालुक्यांतील पॅटिरी जातीचे बकरे प्रसिद्ध आहेत. पूर्वी सुरतची किनखाब प्रसिद्ध असे; व सुरतेस जाडें भरडें रंगीत, सुती कापड आणि भडोच येथें मलमल होत असे. आफ्रिकेंतून गेंड्याचें कातडें आणून सुरत येथें त्याच्या सुंदर ढाली तयार केल्या जात. एके काळीं,  येथें जहाजें बांधण्याचें काम पारशी लोक करीत असत. हल्लीं सुती व रेशमी कापड विणणें हाच जिल्ह्यांतील मुख्य उद्योग-धंदा आहे. सुरत शहरीं गिरण्या आहेत. रेशमी किनखाबीचें व कशिद्याचें काम अद्यापहि या शहरीं होत असतें. या जिल्ह्यांत एक मिठागर आहे. जिल्ह्याचा व्यापार सुरत आणि बलसाड हीं शहरें आणि बिलिमोरा बंदर (बडोदें संस्थान) येथें केंद्रीभूत झालेला आहे. धान्य, कापूस, मोडाचीं फुलें, इमारती लाकूड व बांबू हे मुख्य निर्गत जिन्नस असून तंबाखू, सरकी, लोखंड, नारळ व विलायती कापड हे मुख्य आयात जिन्नस आहेत. बांबे-बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे, या जिल्ह्यांतून समुद्रकिनार्याशीं समांतर होत गेली आहे. जी. आय्. पी. रेल्वेची ताप्ती व्हॅली रेल्वे जळगांव (खानदेश जिल्हा) स्टेशनपासून सुरतपर्यंत जाते. जिल्ह्यांत ८ तालुके आहेत. कलेक्टर हा साचीन संस्थानचा पोलिटिकल एजंट असतो. बांसडा, धरमपूर, डांग ह्या संस्थानांवरहि त्याचीच देखरेख असते. या जिल्ह्यांत गुन्हे फारसे घडत नाहींत. सुरत, रांदेड, बलसाड, मांडवी येथील म्युनिसिपालिट्यांखेरीज इतर ठिकाणच्या स्थानिक कारभार जिल्हाबोर्डे व ८ तालुका बोर्डे यांच्याकडे आहे. लोकसंख्येपैकीं शें. १३.३ लोक साक्षर आहेत, या बाबतींत मुंबई इलाख्याच्या २४ जिल्ह्यांत सुरत जिल्ह्याचा नंबर दुसरा लागतो.

श ह र.— सुरत जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें तापी नदीच्या दक्षिण तीरावर असून समुद्रापासून जलमार्गानें १४ मैल व खुष्कीच्या मार्गानें १० मैल आहे. एके काळीं हें हिंदुस्थानांतील व्यापाराचें मुख्य ठिकाण असून येथें हल्लीं बराच व्यापार चालतो. सुरत हें बी. बी. अँड सी. आय्. रेल्वेचें स्टेशन असून मुंबईहून १६७ मैल दूर आहे. अठराव्या शतकांत सुरत हें लोकसंख्येच्या दृष्टीनें बर्याच मोठ्या शहरांत मोडत असे. १७९७ च्या सुमारास या शहराची लोकवस्ती ८ लक्ष असावी असा अंदाज आहे. १८४७ त सुरतची स्थिति अत्यंत खालावलेली असून त्या वेळची लोकसंख्या केवळ ८०००० होती; परंतु त्यानंतर ती वाढत जाऊन १९२१ त ११७४३४ झाली. येथील सर्व जातींचे व धर्माचे लोक अतिशय शोकी व डामडौल आहेत. तापी नदी समुद्राकडे जाण्याकरितां एकदम पश्चिमेस जेथें वळते त्या वळणावर सुरत शहर वसलेलें आहे. ज्याच्या प्रत्येक कोपर्याला वाटोळे बुरूज आहेत असा किल्ला नदी समोर असून नदींतून पाहिला असतां त्याचा देखावा फार सुंदर दिसतो. गुजराथच्या राजाच्या पदरी असलेल्या खुदावंतखान नांवाच्या शिपायानें हा किल्ला १५४०त बांधिला. तेव्हांपासून १८६२ पर्यंत मोंगल व ब्रिटिश यांच्या अमदानींत तो लष्करी कामाकरितां उपयोगांत आणिला जात असें. परंतु त्यानंतर येथील सैन्य हलविलें जाऊन किल्ल्याच्या इमारतींत सार्वजनिक कचेर्या ठेवण्यांत आल्या आहेत. किल्ल्याच्या सभोंवतीं नदी काठाला ११/४ मैलपर्यंत सुरत शहर वर्तुळाकृति पसरलेलें आहे. दक्षिणेकडे सार्वजनिक बागेंतील उंच उंच झाडांच्या योगानें पाठीमागे असलेली घरें दृष्टीआड होतात. नदीच्या दुसर्या तीरावर रांदेड हें प्राचीन गांव आहे. हें गांव हल्लीं सुरतच्या उपांतभागांत मोडतें. शहरांतील वस्ती एकंदरींत बरीच दाट आहे, व रस्ते अरुंद परंतु स्वच्छ असून त्यांच्या बाजूला सुंदर घरांच्या रांगा आहेत.

इतिहास.— निरनिराळ्या राजांच्या अमलाखालील इतिहास जिल्ह्याच्या वर्णनांत दिला आहे. मोंगलकालीन सुरत शहरांत लोकवस्ती बरीच असून संपत्तीहि पुष्कळ होती व घरें सुंदर असून व्यापार बराच मोठा होता असें जुने प्रवासी वर्णन करतात. इंग्रज व डच यांच्या वसाहतींपासून औरंगझेब गादीवर बसेपर्यंतचा काळ तर फारच भरभराटीचा गेला. संपत्तीबरोबर शहराच्या शोभिवंतपणांतहि भर पडली. हिंवाळ्यांत, कामाच्या हंगामाच्या वेळीं बाहेरून बरेच लोक गांवांत आल्यामुळे सर्वांनां रहावयास पुरेशी जागा मिळणें कठिण पडत असे. सुरत आणि गोवळकोंडें, आग्रा, दिल्ली व लाहोर यांच्या दरम्यान उंटांचे तांडे जात येत असत. कोंकण व मलबार किनार्यावरून जहाजें येत, यूरोपियन व्यापाराखेरीज अरबस्थान, इराणचें आखात, सीलोन व सुमात्रा येथूनहि व्यापारी येत असत. सुती व रेशमी कापड मुख्यतः बाहेर पाठविलें जाई. यूरोपियन लोक आपल्या सर्व मालाची चढउतार सुरत येथें न करतां फक्त कांहीं माल उतरून येथून नीळ व दुसरे जिन्नस बरोबर घेऊन जात व निळीखेरीज सर्व माल सुमात्रा, जावा, वगैरे बेटांत उतरून तेथून मसाल्याचे जिन्नस यूरोपांत नेत. डच लोकांची हिंदुस्थानांतील मुख्य वखार सुरत येथें होती, व फ्रेंचांनींहि तेथें रहाण्यास सुरवात केली होती. खंबायतच्या आखातांत सांचलेला गाळ, उत्तरगुजराथेंतील अस्वस्थता, व मस्कतच्या अरबांनीं दीवचा केलेला नाश, या कारणांमुळें सर्व प्रांतांचा व्यापार सुरत शहरीं एकवटला होता. शिवाय तें ''मक्केचें द्वार'' असल्यामुळें त्याचें महत्त्व बरेंच वाढलें होतें. मराठ्यांच्या उत्कर्षाबरोबर येथील भरभराटीला कांहीं काळपर्यंत आळा बसला. सुरतवर मराठ्यांचा पहिला हल्ला १६६४ त झाला. त्यावेळीं शिवाजीनें तीन दिवसपर्यंत शहर लुटून सुमारें १ कोट रुपये नेले. मराठ्यांशीं गोडीगुलाबीनें राहून यूरोपियन लोक आपलें नुकसान होऊं देत नसत. १६६९ त शिवाजीनें सुरतवर दुसरी स्वारी केली व पुन्हां शहर लुटलें. यानंतर पुढें कित्येक वर्षेपर्यंत सुरतेवर मराठ्यांची स्वारी बहुतेक दरवर्षी होत असे. तथापि सतराव्या शतकाच्या अखेरच्या धामधुमीच्या काळांत सुरत शहराची भरभराट परमावधीस पोंचली होती. शहरची लोकसंख्या २००००० असून जगांतील सर्व व्यापारी राष्ट्रें येथें व्यापार करीत होतीं. हिंदी महासागरांतून जाणारें कोणतेंहि व्यापारी जहाज सुरतेस माल विकत घेतल्याशिवाय, विकल्याशिवाय अथवा भरल्याशिवाय सहसा जात नसे. परंतु औरंगझेबाच्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षांत, अंशतः मुंबईचें महत्त्व वाढूं लागल्यामुळें व अंशतः खुद्द सुरतेस अव्यवस्था माजल्यामुळें या शहराचें महत्त्व इंग्लिशांच्या दृष्टीनें बरेंच कमी झालें होते. म्हणून १६८७ त त्यांनीं आपलें व्यापारी ठाणें मुंबईस नेलें.

पुढें १८३७ त या शहरावर लागोपाठ कोसळलेल्या आग व पूर या दोन संकटांमुळें शहराचा बराच भाग नाश पावून बहुतेक सर्व रहिवासी दरिद्री बनले. १८३८ त शहरांत फक्त १/३ किंवा १/४ लोक शिल्लक उरले होते. तथापि १८४० पासून शहराची स्थिति हळु हळु सुधारूं लागून हल्ली भाव उतरल्यामुळें मालमत्तेची किंमत कमी झाली असली तरी उत्तम रस्ते, सार्वजनिक इमारती वगैरेंच्या योगानें व्यवस्थिपणा व भरभराट यांचीं चिन्हें दिसूं लागलीं आहेत.

१८३७ च्या आगीनंतर पुन्हां बांधलेलीं गोसावी महाराज व हनुमान यांचीं देवालयें, गोपी तळ्याच्या कांठीं नच सय्यद साहेबांची मशीद, सय्यद एद्रू मशीद व मिर्झा सामी मशीद; पारशांचीं दोन अग्निमंदिरें व इंग्रज आणि पोर्तुगीज यांची ख्रिस्ती देवालयें हीं या शहरांतील त्या त्या धर्माची देवालंयें होत. सुरतेच्या व्यापारी संस्था बर्याच सुधारलेल्या आहेत; त्यांपैकीं महाजन ही संस्था प्रमुख आहे. नगरशेटाची गादी वंशपरंपरागत एका श्रावक किंवा जैन घराण्यांत चालते. प्रत्येक धंदेवाल्या लोकांची एक पंचायत असून व्यापारांतील लहान लहान भांडणांचा निकाल सरपंचाच्या संमतीनें लाविला जातो. सुरत येथें हातानें सूत काढण्याचा व कापड विणण्याचा धंदा बराच चालतो. कापड विणण्याच्या तीन गिरण्याहि आहेत येथील निर्गत व्यापार फार मोठा आहे. तो जमिनीवरून विशेषतः समुद्रमार्गानें चालतो. सुरतची म्युनिसिपालिटी १८५२ त स्थापन झाली. म्युनिसिपालिटीनें नदीचे पूर व आग यांपासून शहराचें संरक्षण करण्याकरितां कामें केलेलीं असून बाजारपेठा, रस्ते वगैरे कामेंहि केली आहेत. शहरांत एक कॉलेज व कांहीं हायस्कुलें आहेत. शिवाय बरेच छापखाने असून त्यांतून नियतकालिकें चांगलीं निघतात. म्युनिसिपल बागेंतील अजबखान्यांत सुरतेच्या रेशमी कापडाचें व कशिद्याचे व जंगलांतील पदार्थांचें नमुने ठेवलेले आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .