प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
 
सुपारी— हिंदु लोकांत कोणतेंहि धर्मकृत्य करतेवेळीं सुपारी अवश्य पाहिजे. गणपतिपूजनाच्या वेळीं गणपतीची स्थापना सुपारी ठेवून करतात. यावरून सुपारी फार प्राचीन काळापासून हिंदु लोकांस माहीत आहे असें दिसतें. पूगीफल-पूगफल (सुपारी) या शब्दापासून पोफळ हा शब्द आला आहे. पोफळ हा शब्द आतां झाडालाहि लावतात. सुपारी अगर पोफळ (अनेकवचन-पोफळें) हा शब्द फळाला लावतात. सुपारी हा शब्द कानडी सोप्पु-पान, अरिक-झाड या शब्दापासून आला असावा. सुपारीची लागवड चीन, मलाया, ब्रह्मदेश, बंगाल, सिलोन, मलबार म्हैसूर याठिकाणीं फार आहे. मुंबई इलाख्यांत याची लागवड गोंवा, कारवार, रत्नागिरी, कुलाबा, ठाणा या जिल्ह्यांत आहे. विशेषतः कारवार जिल्ह्यांतील शिरसी, सिद्दापूर येथील सुपारी फार प्रसिद्ध आहे. कुलाबा जिल्ह्यांतील श्रीवर्धन येथील सुपारीचा रोठा फार नामांकित आहे.

सुपारीला उष्ण व दमट हवा लागते. शिवाय समुद्रकिनार्यापासून फार लांब अंतरावर ती होत नाहीं. डोंगरी बागाइती जमीनींत हिची लागवड करतात व तिच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत.

कारवार जिल्ह्यांतील लागवड.— डोंगरी बागाइती सुपारीची लागवड दोन डोंगरांच्या खोर्यांत करतात. सिरसी, सिद्दापूरकडील डोंगरांच्यामध्यें ज्या बागा आहेत त्यांची जमीन फारशी खोल असते असें नाहीं. जमीन खोल नसली तर झाडांच्या मुळ्या खोल जात नाहींत, म्हणून पोफळी कदाचित वार्यानें पडण्याचा संभव असतो. परंतु या बागा खोर्यांत असल्यामुळें त्यांनां वार्यापासून फारशी भीति नसते. जमीन डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळें पाण्याचा निचरा उत्तम होण्यासाठीं मधून मधून चर खणावे लागतात व माती धुपून जाऊं नये म्हणून मातीवर पानांचें वगैरे आच्छादन घालतात. जवळ जंगल पुष्कळ असल्यामुळें त्या पासून सावली मिळते व खतासाठीं पाला व फांद्या मिळतात. शिवाय चार वर्षांनीं एकदा माती घालावी लागते. तीहि आयती जवळच मिळते. जी जमीन पिवळट, तांबडी व खोल असून चिकण नसते अशा जमीनीला कागदाळ असें म्हणतात. हिच्यांत पाणी धरून ठेवण्याची शक्ती चांगली असते. ही पावसामुळें किंवा पाण्यानें फारशी वाहून जात नाहीं म्हणून अशी जमीन सुपारीला उत्तम समजली जाते. ही न मिळेल तर तांबडी जमीन घेतात. तांबड्या जमीनीला धरणाचें पाणी नेहमीं विशेषतः फूल येण्याच्या वेळीं न मिळेल तर फुलें व कोंवळ्या सुपार्या गळून पडतात. पण कागदाळ जमिनीची तशी स्थिति नाहीं. जमीन जरी कशीहि असली तरी सुपारीचें उत्पन्न खत किती व कोणतें देतात यावर अवलंबून असतें. विहिरीचें पाणी देण्याचें कारण केव्हांच पडत नाहीं. कारण पाटातून पाणी नेहमीं वहात असल्यामुळें जमीन सदोदित ओली रहाते. ज्या ठिकाणीं पाणी मिळत नसेल त्या ठिकाणीं लहान लहान हौद बांधून त्यांत झर्यांचें पाणी घेतात. आणि तें लागेल तेव्हां बागेला देतात. विशेषतः तें मार्च-एप्रिल महिन्यांत आठ दिवसांनी एकदां देतात. रोपासाठीं सुपार्या चांगल्या झाडांच्या म्हणजे ज्यांनां निदान दोन शिंपुटें (घड) येतात व सुपार्याहि मोठ्या असतात अशा तीस वर्षांच्या पोफळीच्या घेतात. सुपार्या चांगल्या पिकून त्या गळूं लागल्या म्हणजे शिंपूट झाडावरून अलगद उतरतात, खालीं टाकून देत नाहींत. सुपार्या देठांसह काढून वरची सालें काढल्याशिवाय वाफ्यांत उभ्या लावतात. वाफे चांगले खणून त्यांत पाल्याचें व शेणाचें खत गुंठ्याला अर्धी गाडी याप्रमाणें घालतात. अर्ध्या गुंठ्यांत आठशें रोपे तयार होतात; व तेवढी एक एकराला पुरे होतात. बाग पूर्वीची असल्यास रोपे विकण्यासाठीं किंवा मेलेल्या झाडांच्या जागीं लावण्यासाठीं त्यांचा उपयोग होतो. दोन महिन्यांनीं रोपे रुजल्यावर वरचें केळीचें आच्छादन काढून टाकतात. रोपे सहा इंच वाढल्यावर ते पाण्याच्या कडेला दोन दोन फुटांवर लावतात. रोपे लावतेवेळीं खड्डयांत केळीची रोपटें बारीक कापून खतासाठीं घालतात. रोपे दोन वर्षांचें झाल्यानंतर ते कायम जागीं लावतात.

सुपारीच्या बागांतून निरनिराळ्या प्रकारचीं झाडें लावतात. उदाहरणार्थ केळीं, मिर्यांचे वेल, नागवेल (पानवेल), वेलदोडे, अननस इत्यादि. सुपारीच्या जमिनीची मशागत साधारणपणे खालीलप्रमाणें होते:—

वर्ष     १ लें    आगतेनिगते करणें; पाट दुरुस्त करणें.
वर्ष     २ रें     खत देणें;     ''    ''    ''
वर्ष     ३ रें     फक्त पाय दुरुस्त करणें
वर्ष     ४ थें     खत देणे    ''    ''    ''
वर्ष     ५ वें     आगतेनिगते करणें    ''    ''    ''

सुपारीचें उत्पन्न आगतेनिते करणें व खत देणें यांवर अवलंबून असतें. कारण जमीन मुळांत बरीच निकस असल्यामुळें व विशेषतः चुना, फास्फोरिक अॅसिड व पोटॅश हीं द्रव्यें फारच कमी असल्यामुळें बाहेरच्या खताची व मातीची अत्यंत जरुरी असते. पोफळी लावल्यानंतर  पांचव्या वर्षापासून फळ येऊं लागतें व त्याचें भरपूर पीक दहाव्या वर्षांपासून मिळूं लागतें. एका एकरामध्यें सुपारें ८०० पोकळी लागतात व त्यांपैकीं फक्त निम्याच भर पीक देणार्या असतात. दर झाडास बहुधां दोन शिंपुटें किंवा ३०० सुपार्या येतात. सुपारी पिकण्याचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत असतो.

कारवारकडे सुपारीचे रोठे बहुधां करीत नाहींत. सुपारी पिकण्यापूर्वीच झाडावरून उतरतात. उतरल्याबरोबर सुपार्या सोलून त्या पाण्यांत शिजवितात. सुपारीचा डोळा बाहेर आल्याबरोबर ती तयार झाली असें समजतात. नंतर ती तीनचार दिवस उन्हात वाळवितात. रोज संध्याकाळीं सुपार्या गोळा करून त्यावर झांकण घालून ठेवतात, नाहींतर त्यांवर दंव पडून त्या काळ्या पडतात. सुपार्या उकळल्यावर जें पाणी राहील त्याच पाण्यांत आणखी सुपार्या घालून त्या शिजवितात व पाणी कमी पडल्यास आणखी घालतात. याप्रमाणें बर्याच वेळां सुपार्या उकळल्यावर पाणी लाल होऊन जातें. फार जून झालेल्या अगर कोंवळ्या सुपार्यांनां रंग चांगला चढत नाहीं यासाठीं त्यांनां वरील पाण्याचें एक पूट देतात. केव्हां केव्हां पाण्याला रंग येण्यासाठीं चुना व ऐनाच्या सालीची राख टाकतात. सुपारीचा भाव १५/१६ रुपये मण (२९ पौंड) असतो. कोंकणपट्टींत मुंबईपासून कारवारपर्यंत समुद्रालगत सुपारीची लागवड फार होत आहे. या सर्व टांपूंत श्रीवर्धन येथील सुपारी फार प्रसिद्ध आहे या सर्व ठिकाणची जमीन पुळणवट आहे. याच टापूच्या पूर्वेच्या बाजूला डोंगरी बागाइती जमिनींत कांहीं ठिकाणीं पाण्याची सोय असल्यास सुपारीची लागवड होतें. परंतु तेथील पीक तितकें चांगलें होत नाहीं. सुपारीची झाडें (पोकळी) जशीं समुद्रसपाटीला चांगली होतात तशी ती डोंगरावर होत नाहींत.

कोंकणांत श्रीवर्धनी रोठा व इतर ठिकाणची सुपारी यांमध्यें थोडा फरक आहे. श्रीवर्धनच्या सुपारींत पांढरा गर जास्त असतो यामुळें सुपारी चांगली साफ फुटते. व रोठा वजनदार व मोठा असतो. यामुळें श्रीवर्धनी सुपारीला भाव नेहमीं चांगला येतो. सुपारीच्या ठळक अशा जाती फारच थोड्या आहेत; तुरट आणि मोहाची अशा दोन जाती कोंकणांत समजल्या जातात. या ओळखण्याची खूण म्हटली म्हणजे मोहाची सुपारी गोड असून मुळींच तुरट नसते. ती खाल्ली असतां तोंडांत मुळींच चोथा रहात नाहीं, सर्व विरघळून जाते. ती खातांना तुरट सुपारीप्रमाणें लागत नाहीं.

पावसाळ्यांत सुपार्यांवर एक प्रकारचा बुरा येऊन त्या गळून पडूं लागतात. या रोगाला कारवार जिल्ह्यांत ''कोळे रोग'' असें म्हणतात व रत्नागिरी जिल्ह्यांत गळ असें म्हणतात. सिरसी सिद्दापूरकडे लोक पावसाळ्यांत शिंपुटावर ''कोट्टे'' म्हणजे विर्यांची झांकणें बांधतात पण यापासून व्हावा तसा उपयोग होत नाहीं. रोग हटविण्याला उत्तम उपाय म्हणजे बोर्डोमिश्रण मारणें हा होय. हें मिश्रण पावसाळ्यांत मारावें लागत असल्यामुळें ते सुपार्यावर चिकटून रहाण्यासाठीं त्यांत राळ व सोडा घालावा. दोन पौंड राळ व एक पौंड सोडा एक ग्यालन पाण्यांत तो स्वच्छ होईपर्यंत उकळावा (याला बहुधां एक तास लागतो). पांच पौंड मोरचूत व पांच पौंड कळीचा चुना ही बारा बारा ग्यालन पाण्यांत विरवून एकत्र केल्यावर त्यांत राळेचें मिश्रण टाकावें. या मिश्रणानें म्हैसूर संस्थानांत, कारवार जिल्ह्यांत व दापोली तालुक्यांत रोग बराच हटला आहे.

जाती, (१) पांढर्या सुपारीच्या जाती:— गोवी; मंगळुरी; रूपसई; कलकत्ता; असिग्री; शिरसी; श्रीवर्धनी. (२) लाल सुपारीच्या जाती:— मलबारी; कुमठा; मुरारकडी; गोंवा; वसई; सेपळी; मालवणी; वेंगुर्ला; कलकत्ता.

कात.— सुपारी शिजवून अर्क काढतात त्यालाच सुपारीचा कात म्हणतात, पिकलेल्या सुपार्या मातीच्या रांजणांत किंवा कल्हईच्या भांड्यांत पुष्कळ तास पाणी घालून शिजवितात. नंतर हें आधणाचें पाणी दुसर्या एका कल्हईच्या भांड्यांत ओतून आळूं देतात ती आळल्यावर त्याच्या वड्या कापतात तोच सुपारीचा कात होय. कातडें रंगविण्यांत सुपारीच्या काताचा उपयोग होतो असें म्हणतात. जुन्या जखमा भरून यावयास सुपारीच्या कोंवळ्या फळांचा फार उपयोग आहे.

व्यापार— हिंदुस्थानांत होणार्या सुपारीखेरीज सिलोन, स्टेटसेटलमेंट, सुमात्रा, व चीन या देशांतील सुपारी इकडे येऊन खपते. सुपारीचा खप आपल्या देशांत पार असल्यामुळें ह्या मालाचा व्यापारहि फार मोठ्या प्रमाणावर चालतो. आपल्या देशांत सुपारीची पैदास होत असून सुद्धां सुमारें ८० लाख रुपयांची सुपारी बाहेर देशांतून आपलेकडे येतें. ह्यावरून सुपारीची लागवड देशांत वाढविण्यास किती वाव आहे हें समजून येईल.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .