प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   
 
सुदान— आफ्रिका, साहारा व मिसर देश यांच्या दक्षिण दिशेकडे केपव्हर्डपासून मासबापर्यंत पसरलेला एक प्रदेश. ग्रेटब्रिटनचे लोक या विस्तृत प्रदेशाच्या फक्त पूर्व भागातच हें नांव योजितात. वास्तविक या नांवांत भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील निग्रो आफ्रिकेचा समावेश होतो. एके काळीं प्रचलित असलेलीं निग्रिशिआ व निग्रोलँड हीं नांवेंहि याच प्रदेशाला योजीत असत. सुदानमध्यें पुष्कळ राज्यें असून ती सर्व सध्यां यूरोपीयन राष्ट्रांच्या हुकमतीखालीं आहेत.

सुदोनची एकंदर लांबी ४००० मैल असून, क्षेत्रफळ २०००००० चौरस मैलांच्या वर आहे. हा प्रदेश साधारण उंच आहे. येथील हवा उष्ण असून नद्यांच्या खोर्यांतून ती फारच रोगट असते. येथील रहिवाशी खुद्द निग्रोवंशांतील असून त्यांची मूळची संस्कृति पौरस्त्य आहे . ९ व्या शतकाच्या सुमारास अरबी वर्चस्व व मुसुलमानी पारमार्थसाधन यांचा येथें प्रवेश झाला व ११व्या शतकाच्या अखेरीस त्यांचा सर्व देशभर प्रसार झाला. न्यूबियांत तद्देशीय ख्रिस्ती राज्यें असल्यामुळें महंमदी धर्माचा प्रसार पूर्व सुदानमध्यें कित्येक शतकांपर्यंत होऊं शकला नाहीं. १९व्या षतकाच्या अखेरीअखेरीस यूरोपीय राष्ट्रें सुदानमध्यें 'कर्तुमकर्तु होऊन बसलीं.

सुदान देशाचे राजकीय दृष्ट्या चार विभाग करतां येतात. पहिल्या भागांत वांटु, फ्युटा जेलन, मॅसिना, मोसी ह्या तद्देशीय राज्यांचा व नायगरच्या वळणांतील सर्व राष्ट्रजातींचा समावेश होतो. १९व्या शतकाच्या अखेरीस हीं सर्व राज्यें फ्रान्सच्या सत्तेखालीं आलीं व या भागास फ्रेंच सुदान हें नांव प्राप्त झालें. १९०० मध्यें हें नांव गाळण्यांत येऊन फ्रेंच सुदानच्या बर्याचशा भागास आतां 'अपरसेनिगाल' व 'नायगर कॉलनी' अशीं नांवें मिळाली आहेत. दुसरा बहुतेक सर्व भाग उत्तर नायगेरियाच्या ब्रिटिशसंरक्षित संस्थानांत मोडतो. या भागांत सोकोटोचें सुलतानी राज्य व त्यावर अवलंबून असलेल्या कॅनो, बिडा, झेरीआ येथील अमीरशाही यांचा समावेश होतो. बागिरमी येथील सुलतान राज्यें आणि कानेम व वाडाइ यांचा मिळून तिसरा भाग झालेला आहे. या भागाचा फ्रेंच कांगोमध्यें समावेश होतो. चवथ्या भागांत १९ व्या शतकांत ईजिप्शियन लोकांनीं जिंकलेलीं, पण सध्यां ईजिप्त व ग्रेटब्रिटन यांच्या संयुक्त अंमलाखालीं असलेलीं राज्ये आहेत. या सर्व राज्यांनां 'आंग्लोईजिप्शियन सुदान' असें समुच्चयवाचक नांव आहे.

आंग्लो ईजिप्शियन सुदान.— १८८१ ते ८४ च्या पूर्वी म्हणजे माहदी महंमद अहमद याच्या बंडाच्या पूर्वी हा प्रदेश ईजिप्शियन सुदान म्हणून ओळखला जाई. १८९६-९८ पासून येथें ग्रेटब्रिटन व ईजिप्त यांची संयुक्त सत्ता स्थापन करण्यांत आली. या प्रदेशाच्या उत्तरेस ईजिप्त; पूर्वेस तांबडा समुद्र, इरिद्रिया व अबिसीनिया; दक्षिणेस युगांडाचें संरक्षित संस्थान व बेल्जिअन कांगो; आणि पश्चिमेस फ्रेंच कांगो हे देश आहेत. याची दक्षिणोत्तर लांबी १२०० मैल व पूर्वपश्चिम रुंदी सुमारें १००० मैल आहे. क्षेत्रफळ १०१४४०० चौरस मैल आहे.

सुदान देश दक्षिणोत्तर नाईल नदीनें व्यापिलेला आहे. येथें तांबड्या समुद्राशीं समांतर असलेली गिरिराजी म्हणजे सुदानमधील अत्यंत उंच भाग होय सुदानमध्यें चांगलीं बंदरें अशीं फारच थोडीं त्यांत 'पोर्ट सुदान' व सुआकिन' हीं मुख्य होत. येथील हवा अति उष्ण असते. मध्यभागांत तर उन्हाळा कडाक्याचा असतो. हिवाळ्यांत देखील दिवसा उष्णमान बरेंच जास्त असतें. असें जरी आहे तरी हवा आरोग्यकारक आहे. एप्रिल ते सप्टेंबर पाऊस फार पडतो.

१९२३ सालीं येथील लोकसंख्या सुमारें ६० लाख होती. आंग्लो-ईजिप्शियन सुदानच्या उत्तर भागांत हॅमिटिक आणि सेमिटिक या राष्ट्रजाती राहतात. अबाबदा, बिशरिन, हाडेंडोआ, जाप्रालिन वगैरे इतर बर्याच मिश्र जाती आहेत. सुदानी राष्ट्रजाती ह्या साधारणतः आळशी आहेत. घरगुती गुलामगिरी अजून प्रचारांत आहे. अरबी भाषा बोलणार्या लोकांत शिक्षणाची आवड दिसून येते. डाँगोलीज लोक हे फार दक्ष व्यापारी आहेत.

प्रांत विभाग.— डारफुर हें तद्देशीर अंमलाखालीं आहे. बाकीच्या सुदानचे प्रांत पाडलेले असून त्या प्रांतांचे पुनः पोटविभाग केलेले आहेत त्यांनां मामुरिआ असें म्हणतात.

शेती व इतर उद्योगधंदे.— डुरा हें धान्य मुख्यतः उत्पन्न करण्यांत येतें. कारण हें सुदानी लोकांचें मुख्य खाद्य आहे. गहूं व जव यांची देखील बर्याच मोठ्या प्रमाणांत लागवड होते. नाईल नदीच्या खोर्यांत खजुराची उत्पत्ति होते. भुइमूग व तीळहि होतात. येथें कापूसहि पिकतो. जेझिरा पाटबंधार्याच्या योजनेमुळें एक लाख एकर जमीन कापसाच्या लागवडीखालीं येईल. उंट, घोडे व गुरें यांचे कळप म्हणजेच अरबांची संपत्ति होय. हे लोक शहामृगहि पाळतात. कारण त्यांच्या पिसांनां चांगली किंमत येते. गुरें, मेंढ्या, व बकरीं यांचे कळप निग्रो जातीहि पाळितात.

खनिज संपत्ति.— गावैत (तांबडा समुद्रप्रांत) येथें एक चांगली सोन्याची खाण आहे. सन १९०९ मध्यें ४५०० औंस सोनें खाणींतून निघालें. कोरडोफान येथें अल्प प्रमाणांत सुवर्णरजःकण सांपडतात. डारफुर येथें अशुद्ध लोखंड सांपडतें. कित्येक भागांत तांबेंहि सांपडतें.

व्यापार.— डिंक, हस्तिदंत, शहामृगाचीं पिसें, खजूर आणि रबर हे निर्गत व्यापाराचे मुख्य जिन्नस होत. जगांत डिंकाचा मुख्य पुरवठा सुदान देशांतून होतो. १९२३ सालीं २२४२५ टन डिंक बाहेर रवाना झाला. कापसाचें सामान, कणीक, तांदूळ, साखर, इमारती लांकूड, तंबाखू, लोखंड, यंत्रसामुग्री इत्यादि वस्तू आयात व्यापाराच्या होत. वाडी हाल्फा ते खार्टुमपर्यंत एक रेल्वे आहे; तिचे फांटे पोर्ट सुदान, करीमा (डोंगोला प्रांत), सेन्नार, व एल ओबीद या ठिकाणीं गेले आहेत. कसाला ते थामिआमपर्यंत २१७ मैल लांबीचा एक रेल्वे फांटा आहे. एकंदर आगगाडी १८०० मैल लांबीची आहे. नाईल नदीच्या नावा जाण्यासारख्या सर्व प्रवाहांतून सरकारी आगबोटी जातात.

शासन व्यवस्था.— ब्रिटिश व ईजिप्शियन सरकार यांच्या दरम्यान झालेल्या १९ जान्युआरी १८९९ मधील करारमदारांप्रमाणें येथील राज्यव्यवस्था चालते. ईजिप्तनें ग्रेटब्रिटनच्या संमतीनें नियुक्त केलेला गव्हर्नर जनरल सर्व राज्यकारभार पहातो. १९१० मध्यें गव्हर्नर जनरलला सल्ला देण्याकरितां म्हणून ४ अधिकारी सभासद व दोन ते चार बिन अधिकारी पण सरकारनियुक्त सभासद यांचें मिळून एक कौन्सिल निर्माण करण्यांत आलें. प्रत्येक प्रांतावर गव्हर्नर असून तो खार्टुम येथील मध्यवर्ती सरकारास जबाबदार असतो. गव्हर्नरजनरल व इतर वरिष्ठ खात्यांच्या अंमलदारीच्या जागा या फक्त यूरोपियनांनींच व्यापलेल्या आहेत. दुय्यम अधिकाराच्या जागा तेवढ्या ईजिप्शियन लोकांनां दिलेल्या आहेत.

न्याय.— सुदानी कायदे हे कांहीं अंशीं हिंदुस्थानांतील कायद्यांवर व कांहीं अंशीं इंग्रजी कायद्यांवर बनविलेले आहेत. खार्टुम येथें एक हायकोर्ट आहे. त्याचें काम इकडील हायकोर्टाप्रमाणेंच बहुतेक असते.

शिक्षण.— लोकशिक्षणाचें एक वेगळें खातें असून त्याची सर्व प्रकारच्या शाळांवर देखरेख असते. प्राथमिक देशी शिक्षणाच्या शाळा (कुत्ताब) ९६ आहेत; त्यांत अरबी भाषेचें शिक्षण देण्यांत येतें. मुख्य मुख्य शहरांतूनहि ९ प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत; तेथें इंग्रजी व अरबी भाषा आणि गणितादि विषय शिकविले जातात. या शाळेंतील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी गॉर्डन कॉलेजांतील दुय्यम शिक्षणाच्या शाळेंत जातात. कांहीं मुलींच्याहि शाळा आहेत. दोन सरकारी औद्यागिक शाळा खार्टुम व ओमडुर्मन येथें आहेत. खार्टुम येथें 'गॉर्डन कॉलेज' नांवाचें एक महाविद्यालय असून त्यालाच जोडून एक दुय्यम शिक्षणाची शाळा आहे. या महाविद्यालयाला जोडून शास्त्रीय शोधाकरितां म्हणून शास्त्रप्रयोगालयेहि आहेत.

देशाच्या संरक्षणाचें कार्य आतांपर्यंत ईजिप्शियन सैन्याच्या शिरावर होतें. पण १९२४ सालीं ईजिप्शियन सैन्य कमी करून 'सुदान डिफेन्स फोर्स' नांवाचें दळ तयार करण्यांत आलें. हें दळ गव्हर्नरजनरला पूर्ण राजनिष्ठ असेंच असतें.

इतिहास.— ईजिप्तनें सुदान देश जिंकीपर्यंतचा सुदानच्या दक्षिण भागाचा इतिहास संगतवार लिहून ठेवलेला नाहीं. उत्तर भागांत म्हणजे इथिओपिया अथवा न्यूबिया यावर ईजिप्त देशानें आपलें वर्चस्व ओलांड साम्राज्याच्या वेळींच बसविलें होतें. कांहीं कालानंतर मोंगली राज्यें उदयास आलीं. न्यूबियन लोकांनीं ६ व्या शतकापर्यंत ख्रिस्ती धर्म स्वीकारला नव्हता. अरबांनीं ७ व्या शतकांत उत्तर आफ्रिकेवर स्वारी करून सर्वत्र इस्लामी धर्म पसरविला. परंतु न्यूबिया त्यांच्या तावडींतून सुटला होता. कालगतीनें न्यूबियाचें राज्य नष्ट होऊन तेथें डांगोला व आलोआ हीं ख्रिस्ती राज्यें उदयास आलीं. ती १४ व्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वांत होतीं. पुढें अरबांनीं सेन्नर प्रांतावर चाल केली. त्यांनीं तेथील निग्रोशीं मिश्रविवाह करून तेथील लोकांनां इस्लामी धर्माची दीक्षा दिली. १७व्या शतकाच्या सुमारास या वायग्या इस्लामांचें 'फुंज' नांवाचें बलवान राज्य नाईलवर उदयास आलें. फुंजाचा पहिला राजा अमर डंकास यानें १४८४ ते १५९६ पर्यंत राज्य केलें. १५९६ त गादीवर आलेल्या अलालान राजाच्या कारकीर्दीत सेन्नारची कीर्ति बगदाद-केरोपर्यंत पोहोंचली. १८व्या शतकाच्या आरंभी सेन्नार व अबिसीनिया यांच्यांत युद्ध झालें व अबिसीनिया पराभव पावला. १८ व्या शतकाच्या अखेरीस 'हॉमेला' लोकांनीं फुंजांची सत्ता हिरावून घेतली. मांडलिक राजे सेन्नारच्या मुख्य राजाला जुमानीतनासे झाले. ही अंदाधुंदी ईजिप्तनें सुदान जिंकीपर्यंत चालली.

१८२२ त सुदान ईजिप्तनें जिंकला. ईजिप्तच्या सैनिकांनीं विजयमदानें धुंद होऊन अत्याचार केले असें म्हणतात. ईजिप्त सरकारचा प्रतिनिधि सय्यद यानें १८५७ त येथील गुलामगिरी बंद केल्याचें जाहीर केलें व पुढील सुभेदारानेंहि ती अजीबात बंद करण्याचा सारखा प्रयत्न केला. परंतु त्यांत म्हणण्यासारखे यश आलें नाहीं. १८७५ च्या सुमारास सुएझपासून केप ग्वारडाफुइपर्यंतचा सबंध समुद्रकिनारा ईजिप्तनें काबीज केला व ठिकठिकाणीं आपलीं लष्करीं ठाणीं ठेविली. १८७७ त गार्डन नांवाचा ब्रिटिश मनुष्य सुदानचा गव्हर्नर नेमला गेला. त्यानें डारफूरमधील वंडाचा बीमोड केला व गुलामांच्या व्यापारास आळा घातला. १८८० मध्यें फ्रँक लॅप्टन यास गव्हर्नर नेमण्यांत आलें. व यावेळीं सुदानच्या पुनर्घटनेची योजना जी तयार झाली होती ती अंमलांत आणण्याचा ईजिप्त सरकारचा बेत होता परंतु अचानक महादी प्रकरण उपस्थित होऊन सर्वच बेत जागच्या जागीं राहिले.

महादी प्रकरण:- या चळवळीचा मुख्य उद्देश ईजिप्तची सत्ता उलथून पाडण्याचा होता. कर गोळा करतांना अधिकार्यांनीं केलेले अत्याचार व गुलामांचा क्रयविक्रय करण्यापासून व्यापार्यांस परावृत्त करण्याकरतां योजलेले कडक उपाय हे या बंडास कारणीभूत झाले. महमद अहमद नांवाच्या एका माणसानें महादी म्हणजे इस्लाम धर्माचा मार्गदर्शक असें स्वतःला जाहीर केलें. त्यानें सार्वत्रिक समता, संपत्तीची सम विभागणी इत्यादि तत्त्वांचा पुरस्कार करून लोकांच्या मनांत सरकारविषयीं द्वेषाची भावना उत्पन्न केली. असंतुष्ट लोक त्याच्या भोवतीं भराभर जमूं लागले. व ईजिप्तविरुद्ध युद्ध पुकारण्याइतकें सामर्थ्य त्यांनां आलें. १८८१ त ईजिप्त सैन्य व महादी यांत पहिली चकमक झडली. १८८३ मध्यें महादीनें १०००० ईजिप्शियन सैन्याची कत्तल केली. या योगानें महादीस जोर चढला. व सेन्नारचें स्वामित्व मिळालें. १८८४ मध्यें त्यानीं लॅप्टन गव्हर्नरास देखील कैद केलें.

१८८२ पासून ईजिप्तच्या लष्करावर ब्रिटिशांची हुकमत असे. ब्रिटिश सरकारनें जनरल गॉर्डनला खार्टुम येथें पाठविलें. पण २५ जाने. १८८५ रोजीं बंडवाल्यांनीं खार्टुम काबीज केलें आणि गॉर्डनचा खून पाडला. यावेळीं ब्रिटिशांनीं माघार घेतली. परंतु इतक्यांत १८८५ च्या जूनमध्यें एकाएकी महादीचा अंत झाला. पुढें त्याचा एक हस्तक मुख्य झाला. त्याचें राज्य म्हणजे अनियंत्रित लष्करी सत्ता होय. त्या योगानें सुदानचे शेतकरी व व्यापार या दृष्टीनें अतिशय नुकसान झालें. महादीच्या अनुयायांनीं ईजिप्त देश जिंकण्याचा प्रयत्न केला पण टॉस्की येथील पराभवानें तो सपशेल फसला. त्यांनीं ओमडुर्मन ही आपली राजधानी केली. व यूरोपियनांनां कैदेंत ठेवून त्यांचे फार हाल केले.

पुढें ईजिप्त व ब्रिटिश सरकार याच्या जोड प्रयत्नानें महादीयांचा पूर्ण मोड झाला व सुदानमध्यें ब्रिटिश व ईजिप्त यांची संयुक्त सत्ता प्रस्थापित करण्यांत आली. व तशा अर्थाचा करारनामा १९ जानेवारी १८९९ रोजी झाला. वरिष्ठ सत्ता सुदानच्या गव्हर्नर-जनरलला देण्यांत आली. व सुदानवर विजय मिळविणारा लॉर्ड किचनेर यासच पहिला गव्हर्नर नेमण्यांत आलें. राहिलेले बंडखोरप्रांत व लोक यांनां यानंतर जिंकण्यात आलें. लवकरच शांतता प्रस्थापित झाल्यानें लोकशिक्षणाकडे लक्ष देण्यास सरकारला फुरसत मिळाली. नाईलपासून तांबड्या समुद्रापर्यंत आगगाडी करण्यांत आली व कालवे, पाटबंधारे बांधले.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .