प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
 
सीरिया.— आशिया, तुर्कस्तान राष्ट्र. महायुद्धानंतर हा प्रांत फ्रान्सच्या देखरेखेखालीं ठेवण्यांत आला आहे. पुढील माहिती महायुद्धापूर्वीच्या सीरियाची आहे. शेवटीं थोडा अर्वाचीन इतिहास जोडला आहे. लिव्हांटिन आखाताच्या पूर्वेस हमाद अरण्यापर्यंतच्या ३१ व ३८ उत्तर अक्षांशांमधील प्रदेशास सीरिया हें नांव आहे. याच्या उत्तरेस टॉरिक पर्वत असून, त्याची साधारण लांबी ४०० मैल, व रुंदी १५० मैल आहे. हा प्रदेश ज्यावेळीं ग्रीक व रोमन लोकांच्या ताब्यांत होता त्यावेळीं त्यास सीरिया हें नांव पडलें. याच्या मधोमध एक डोंगरांची ओळ असून दक्षिणेस व उत्तरेस हा प्रदेश खालीं उतरत गेलेला आहे. पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भागापेक्षां उंच आहे. बहुतेक नद्या सीरियांतील मध्य डोंगरांत उगम पावून उत्तरेकडे व दक्षिणेकडे वहात जातात. उत्तरेकडील मुख्य नदी नहरअल्असि ही आहे. व दक्षिणेकडील मुख्य नदी जार्डन ही एका सरोवरास मिळते.

येथील हवामान ठिकठिकाणीं निराळें आहे. उंच शिखरांवर कधीं कधीं बर्फ पडतें. आकाश नेहमीं निरभ्र असतें. उन्हाळ्यांत दंव पडतें. एकंदरीत सीरियाची हवा उत्तम आहे. येथें भूमध्यसमुद्राकडील व पश्चिम आशियाकडील अशीं दोन्ही तर्हेचीं झाडें दृष्टीस पडतात. ऑलिव्ह व तुतीचीं झाडें पुष्कळ ठिकाणीं लावण्यांत येतात व दक्षिणेंकडील समुद्रकिनार्यावर तंबाखूचीं लागवड होतें. येथें अस्वल, काळें मांजर, काळवीट, रानटी गाढवें, सीरियन खारी, व चित्ते इत्यादि प्राणी आढळतात.

लोक.— येथील लोकसंख्या सुमारें ३०००००० आहे. पैकीं फोनिशिया, लेबानॉन, दमास्कस, अलप्पो, ओरोंटिसदरी, कॉमाजीन या सुपीक प्रांतांत वस्ती दाट आहे, व बाकीचा भाग ओसाड किंवा जंगलानें आच्छादिलेला आहे, येथील पुष्कळसे लोक सेमेटिक वंशांतले आहेत, व बाकी भरणा अरबी व यूरोपांतील ज्यू लोकांचा आहे. मध्यसीरियांत तर रुआला, वलदअलि, सोकर, अडवान बिश्र इत्यादि अरब टोळ्या; ग्रीक, तुर्क, जर्मन व इतर यूरोपीय लोक यांची खिचडीच झालेली आहे. लोकसंख्येचा मोठा भाग मुसुलमानी धर्माचा आहे. दक्षिण व मध्यसीरियांत लोक अरबी भाषा बोलतात; व सजुरपासून उत्तरेकडे तुर्की भाषाच बोलतात. बरेचसें कुर्द लोक कुर्द भाषाच बोलतात.

आटोमन साम्राज्याचा सीरिया हा एक भाग आहे. अलेप्पो, सीरिया (दमास्कस), लेबनॉन, बेइरूट, झोर, व जेरूसलेम हे सीरियाचे पोटभाग आहेत. पूर्वेकडील कांही भटक्या टोळ्या वाटेल तेव्हां साम्राज्यांतून बाहेर पडतात, त्यांनां स्थायिक स्वरूप देण्याकरितां बशन, अमॉन, व मोवब इत्यादि ठिकाणीं जमीन वगैरे देऊन प्रयत्न चालला आहे. दळणवळणाचे मार्ग अगदीं अपुरे आहेत. बेइरूट, होम्स, हप्ता, अंलेप्पो, दमास्कस इत्यादि ठिकाणीं आतां आगगाडी जाते. जार्डनच्या पूर्वभागांतून सीरियाच्या दक्षिणेकडील मर्यादेंतून पुढें आतां मक्का रेल्वे झाली आहे. जाफा व जेरुसलेम यांनां जोडणारा एक आगगाडीचा रस्ता झाला आहे. व बेइरुट व ट्रीपोली यांनां जोडणारी एक ट्राम्बे आहे. शिवाय अलेप्पोपासून अलेक्झांड्रेटा, तेथून अंटिओ, बेइरूट व होम्सपासून ट्रीपोली इत्यादि गाडीच्या सडका आहेत.

व्यापार— पूर्वी येथून इमारती लांकूड परदेशांत जात असे असें जुन्या शिलालेखांवरून कळतें. हल्लीं त्या ऐवजीं गहूं बाहेर जातो. याशिवाय रेशमाचे कोशे, लोंकर, कातडीं, अंडीं, बदाम-नारिंगादि फळें, कापूस, तंबाखू व दारू हीं बाहेर पाठविण्यांत येतात. याकरितां बेइरूट अलेक्झांड्रेटा ही दोन बंदरें आहेत. रेशीम, कापूस व लोंकर यांचे पूर्वीचे कारखाने यूरोपांतून चांगला माल येऊं लागल्यामुळें आतां बंद पडले आहेत. खनिज द्रव्य फारसें नाहीं. व म्हणून यूरोपियन भांडवलावर येथें कारखाने काढणें शक्य नाहीं. प्रतिवर्षी सुमारें ४० लक्ष पौंडांचा माल आयात होतो व २५ लक्ष पौंडांचा निर्गत होतो.

इ ति हा स.— या देशांचें वैदिक नांव सूर्या असावें. याच्या प्राचीन इतिहासासंबंधीं 'विवेचन असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृति' (पू. ५२-५३) या 'बुद्धपूर्वजग' विभागाच्या प्रकरणांत केलेंच आहे. त्यानंतरची सीरियांतील ग्रीको-रोमन सत्ता व संस्कृति यांची माहिती 'बुद्धोत्तरजग' विभागांत (पृ. ८२-८३) दिली आहे.

६१६ त इराणच्या कारोइस दुरास यानें रोमनांपासून सीरिया जिंकला; पण लवकरच ६२२ त बायझांटिन लोकांच्या हातांत सीरिया गेला; व ६३६ त तो देश मुसुलमानांनीं घेतला. पुढें ७५० त मुसुलमानांच्या अमदानींत बगदाद हें राजधानीचें शहर झालें. त्यावेळीं त्याचे ६ प्रांत पाडण्यांत आले, ते असें:- (१) फिलिस्टिन (पालिस्टैन), (२) उर्डुन (जार्डन), (३) दमास्कस, (४) होम्स, (५) किनेसरीन, व (६) आशियामायनर मधील लष्करी महत्वाचा मुलुख. यावेळीं जरी मुसलमानांच्या आपसांत लढाया चालत तरी देशांत भरभराट होती. सन १२६० त सिरियावर मोंगलांच्या स्वार्या झाल्यां व तेव्हांपासून देशाच्या दुर्दशेस प्रारंभ झाला. पुढें १५१६ त आटोमन लोकांनीं तो देश घेतला.

पूर्वी आशिया व यूरोप यांमधील दळणवळणाचा मार्ग सीरियांतून होता. म्हणून व्यापारी दृष्ट्या या देशास फार महत्त्व होतें. परंतु तांबडा समुद्र व सुएझचा कालवा यांतून जलमार्ग सांपडल्यामुळें वरील खुष्कीच्या मार्गाचें महत्त्व गेलें. आतां ख्रिस्ती लोकांची पवित्र जागा जेरुसलेम शहर, येथें असल्यामुळें व सुएझ कालव्याच्या बाजूस हा प्रांत असल्यामुळें याचें थोडे महत्त्व अजून शिल्लक आहे.

अर्वाचीन.— फ्रान्सच्या मँडेटखालीं असलेल्या आजच्या सीरियाच्या मर्यादा अशा:- पश्चिमेस भूमध्यसमुद्र; दक्षिणेस पॅलेस्टाईन; पूर्वेस मेसापोटेमिया व उत्तरेस तुर्कस्तान. सीरिया व तुर्कस्तान यांच्या सरहद्दी फ्रँको–टर्किश तहानें (ता. २० ऑक्टोबर १९२१) ठरल्या गेल्या आहेत. दमास्कस मुलुख अलेप्पो मुलुख, अलौआईट मुलुख, ग्रेट लेवानॉन मुलुख व जेबेल ड्रुझ मुलुख असें पांच मुलूख, सीरियांत पाडलेले आहेत. फ्रेंच मँडेटखालीं असलेल्या या सीरियाचें क्षेत्रफळ ६०००० चौरस मैल असून लोकसंख्या ३०००००० हून कांहीं कमी आहे. दमास्कस, अलेप्पो, बेइरूट, होम्स, हीं मोठीं शहरें ५०००० पेक्षां जास्त वस्तीचीं आहेत. सीरियांत सुमारें एक लाख ड्रुझ लोक आहेत व त्यांचा देशाला स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुमारें ५०० शाळा फ्रेंच आहेत. ब्रिटिश मिशनर्यांच्याहि काहीं शिक्षणसंस्था आहेत. बेइरूट येथें अमेरिकन विश्वविद्यालय आहे. त्याची स्थापना १८६६ सालीं झाली. देशाचें उत्पन्न १३ कोटी फ्रँकांचें असून खर्चहि तितकाच आहे. बगदाद रेल्वे व हेजाज रेल्वे या प्रदेशांतून जातात व बर्याचशा बंदरांत बाहेरून व्यापारी जहाजें येतात-जातात, त्यामुळें सीरियाचें दळणवळण व व्यापार वाढला आहे. १९२० सालीं दोस्त राष्ट्रांच्या वरिष्ठ सभेनें सीरिया फ्रान्सच्या ताब्यांत दिला  व १९२२ सालीं राष्ट्रसंघानेंहि त्याला मान्यता दिली. पण फ्रेंचांचा सीरियावरील अंमल फार जाचक आहे. याचें प्रत्यंतर १९२५ सालांतल्या आगष्ट महिन्यांत निरपराधी ड्रुझांची जी कत्तल करण्यांत आली तींत पहाण्यास मिळेल. या कत्तलीनंतर ड्रुझ लोक खवळले व त्यांनीं फ्रेंचांनां सळो कां पळो करून सोडिले आहे. [फ्रान्स (फ ५६-५७) पहा.]

सीरियन वाङ्मय.— आज सीरियन भाषा नष्ट झाली आहे. पण ती एकेकाळीं प्रचारांत असून त्या भाषेंत वाङ्मयहि बरेंच झालें होतें. या भाषेंतील सारस्वत विशेषेंकरून दोन शहरांत निर्माण झालें. त्यांपैकीं एक शहर म्हटलें म्हणजें ''एडेसा'' हें होय. व दुसरें ''हर्रान'' हें होय. 'एडेसा' येथें ख्रिस्ती संप्रदायाचें वाङ्मय तयार झालें. आणि 'हर्रान' येथें पैतृक संस्कृतीच्या अभिमान्यांकडून ग्रंथ तयार झाले. आज फक्त ख्रिस्ती सारस्वत मात्र उपलब्ध आहे. तथापि जुन्या परंपरागत धर्माच्या अभिमान्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांतील उतारे इतर ग्रंथांत सांपडत असल्याकारणानें, ख्रिस्ती संप्रदायाच्या गीर्वाणाशिवाय दुसरे कांहीं तरी ग्रंथ असावेत अशी कल्पना होते.

सीरियन ग्रंथ तिसर्या शतकापासून चवदाव्या शतकापर्यंत लिहिले जात असत. आठव्या शतकाच्या प्रारंभीं खलीफ वालिद यानें अरवी भाषा सीरियाच्या राज्यव्यवहारांत सुरू केली. तेव्हांपासून सीरियन भाषेचा संकोच होत जाऊन चवदाव्या शतकांत ती बहुतेक पूर्णपणें नष्ट झाली. डॉ. केतकर यांनां जे कांहीं सीरियन अमेरिकेत भेटले ते अरबी भाषा वापरणारे दिसले, आणि त्यांपैकीं बहुतेक ग्रीक ख्रिस्ती होते. डॉ. केतकर मलबारमध्यें असतांना तेथील ''सीरियन ख्रिस्ती'' समाजांत सीरियन जाणणारा कोणी आहे कीं नाहीं म्हणून शोध केला असतां कोणी जाणता देखील आढळला नाहीं.

सीरियन भाषेंतील बहुतेक ग्रंथ भाषांतरात्मक आहेत. स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे देखील झाले पण ते फारसे आज उपलब्ध नाहींत. सीरियन ग्रंथ बहुतेक धार्मिक अगर धर्म दृष्टीनें लिहिलेले आहेत. ज्या लोकांचें स्वातंत्र्य नष्ट होतें त्या लोकांमध्यें सर्वांगी सारस्वत दृष्टीस पडत नाहीं. सीरियन भाषांतराचें महत्त्व काहींच नाहीं असें नाहीं. कारण सीरियन भाषांतरात्मक ग्रंथांपैकीं कांहीं असे ग्रंथ आहेत कीं, त्यांचे मूळ ग्रंथ नष्ट झाले आहेत. कित्येक ग्रीक ग्रंथांच्या सीरियन भाषांतरावरून त्यांचीं पुढें अरबी भाषेंत रूपांतरें व भाषांतरें झालीं आहेत. आणि अशांपैकीं कांहीं ग्रंथांचीं अरबीमधून यूरोपियन भाषांत भाषांतरें झालीं. एवंच ग्रीस संस्कृति नष्ट होत असतां यूरोपास ती पुन्हां देण्याचें श्रेय सीरियन भाषांतरकारांस मिळालें आहे. अरबी, पल्हवी, आणि ग्रीक या तीन भाषांतून सीरियन ग्रंथकारांनीं ज्ञानधन पैदा केलें आहे आणि त्या भाषांतून अरबींत भाषांतरें झाल्यामुळें अरबी भाषेस श्रीमंत करण्याचें श्रेय अंशरूपानें त्यांच्याकडे आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .