प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   

सीतापूर, जिल्हा.— संयुक्त प्रांतांत, लखनौ विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ २२५० चौरस मैल. या जिल्ह्यांत पुष्कळ नद्या असून त्या सामान्यपणें उत्तरेकडून दक्षिणेकडे, परंतु किंचित पूर्वेच्या बाजूला वहात जातात. पश्चिम व पूर्व सरहद्दीवरून अनुक्रमें वहाणार्या गोमती व गोध्रा या नद्यांतून होड्या चालतात. या जिल्ह्यांत जंगल मुळींच नाहीं; तरी सर्व भागांत झाडे, झुडुपें पुष्कळ आहेत. त्यांत आंबा, व फणस, ही फळझाडें आणि शिसू व तूण ही इमारतींच्या लांकडांची झाडें मुख्य आहेत पूर्वेकडील मलेरिया हवेचा भाग सोडला तर बाकीच्या जिल्ह्यांतील हवा थंड, आरोग्यकारक आहे. वार्षिक पाऊस सरासरी ३८ इंच पडतो.

इतिहास:— सीतापूरचा इतिहास फारच थोडा अवगत आहे. येथील रजपूत सत्तेचा उदय दक्षिण अयोध्या प्रांतांतील रजपुतांच्या उदयानंतर झाला अशी दंतकथा आहे. मूळच्या पासी लोकांनां घालवून देऊन रजपुतांनीं या जिल्ह्यांत वसाहत केली. दिल्ली येथील आरंभीच्या मुसुलमान राजांच्या अमदानींत येथें नावाला मात्र बहरैचच्या सुभेदाराचा अंमल होता. पंधराव्या शतकांत ह्या जिल्ह्याचा जौनपूरच्या राज्यांत समावेश झाला. १५२७ सालाच्या सुमारास हुमायूननें, त्या वेळचें मुख्य गांव खैराबाद आपल्या राज्यास जोडिलें होतें. परंतु अकबर गादीवर बसेपर्यंत, आसपासच्या भागांतून अफगाण लोकांचें उच्चाटण झालें नव्हतें. अकबराच्या वेळीं अयोध्येच्या सुभ्यापैकीं खैराबाद, बहरैच, अयोध्या व लखनौ या चार सुभ्यांत हल्लींच्या जिल्ह्याचा समावेश झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या वर्षांत, नासिरउद्दीन हैदरचा मंत्री हकीम महदी अलीखान याच्या ताब्यांत हा जिल्हा होता. १८५७ सालीं, येथील सैन्यानें बंड उभारून कामगारांनां ठार केले; परंतु १८५८ सालांत एप्रिलच्या १३ तारखेला सर होप ग्रांट यानें बंडवाल्यांचा परागव केला व लवकरच सर्वत्र शांतता स्थापित झाली.

लोकसंख्या:— सीतापूर जिल्ह्यांत ९ गांवें व २३०२ खेडी आहेत. एकंदर लोकसंख्या (१९२१) ११७५४७३; पैकीं सुमारें शें. ८५ हिंदु व शें. १५ मुसुलमान आहेत. येथें मुख्यतः पूर्व हिंदीची अवधी नांवाची पोटभाषा चालते. शें. ७५ लोक शेतीवर पोट भरतात.

शेतकी, व्यापार व दळणवळण:- जमीन निसर्गतः सुपीक असूनहि येथील शेती दक्षिण अयोध्येच्या मानानें फार मागासलेली आहे. जमीनधार्याच्या पद्धती अयोध्येप्रमाणेंच आहेत. गहूं हें मुख्य पीक असून त्याच्या खालोखाल कडधान्यें तांदूळ, हरभरा, कोडोन, बाजरी, बार्ली, व मका वगैरे पिकें होतात. कित्येक ठिकाणीं कापड विणलें जातें; व चिटें तयार होतात. या जिल्ह्यांत लांकडी कातकाम सुंदर होतें, व बिस्वान येथें थोडीं बहुत मातीची भांडीं तयार केली जातात. धान्य गूळ व अफू हे निर्गत जिन्नस व कापड, सूत, धातूचें काम व मीठ हे मुख्य आयात जिन्नस होत. आगगाडी सुरू झाल्यापासून निर्गत व्यापार वाढत आहे. सीतापूर हें व्यापाराचें मुख्य ठिकाण असून निमखार व खैराबाद येथें जत्रा भरत असतात. लखनौ-बरेली मीटरगेज स्टेट रेल्वे जिल्ह्याच्या मध्यभागांतून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते; व बाराबंकीमधील गढवालपासून सीतापूरपर्यंत बंगाल व नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेची एक शाखा गेलेली आहे. या जिल्ह्यांत, सीतापूर, बिस्वात, सिधौली, व मिश्रिख अशा चार तहशिली असून प्रत्येकीवर तहशिलदार आहेत. जिल्ह्याचा मुख्य अधिकारी सीतापूर येथें राहतो. सीतापूर व खैराबाद येथें म्युनिसिपालिट्या आहेत. इतर ठिकाणच्या स्थानिक कामांची व्यवस्था जिल्हा व तालुका बोर्डाकडे असतें. जिल्ह्यांत शिक्षण फार मागसलेलें आहे. लोकसंख्येपैकीं फक्त शें. २.५ लोकांना लिहितां वाचतां येतें.

तहशील.— सीतापूर जिल्ह्याची मुख्य तहशील. हींत सीतापूर, लाहरपूर, हरगाम, पीरनगर, खैराबाद व रामकोट ह्या परगण्यांचा समावेश होतो. क्षेत्रफळ ५७० चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) ३११२६४. शहरें सितापूर—(तहसिलीचे व जिल्ह्यांचें मुख्य ठिकाण), खैराबाद व लाहलपूर व खेडी ६०८.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .