प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
 
सीएरालिओनी— आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील ब्रिटिश वसाहत आणि संरक्षित संस्थान (प्रोटेक्टोरेट). इंग्लिश वसाहतवाल्यांनीं हा प्रदेश देश्य राजापासून सन १७८८ मध्यें खरेदीनें व कांहीं तसाच मिळविला. या वसाहतीचें क्षेत्रफळ सुमारें चार हजार चौरस मैल असून लोकसंख्या १९२१ सालीं ८५१६३ होती. समुद्रकिनार्यावरील प्रदेश रोगट आहे. त्याला गोर्या लोकांचें थडगें म्हणतात. दरसाल पाऊस १५० ते १८० इंच पडतो. ब्रिटिश वसाहतींतलें मुख्य शहर फ्री टाऊन हें असून त्याची लोकसंख्या १९२१ सालीं ४४१४२ होती. फ्री टाऊन हें पश्चिम आफ्रिकेतील सर्वांत मोठें बंदर आहे, व सेकंडक्लास इंपीरियल कोल स्टेशन (आगबोटींचें कोळसे घेण्याचें ठिकाण) आहे. वसाहत व प्रोटेक्टरेट यांचा राज्यकारभार पाहणारा मुख्य गव्हर्नर असून त्याच्या मदतीला एक एक्झिक्युटिव्ह कौन्सिल व एक लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असतें. कायदेकौन्सिलांत ११ सरकारी सभासद, ३ लोकनियुक्त सभासद आणि कमाल ७ सरकारनियुक्त सभासद असतात. मतदारीचा अधिकार फक्त पुरुषांसच आहे. १९२३ सालीं येथें २२४ प्राथमिक शाळा असून त्यांत १००२० विद्यार्थी होतें. मिशनरी सोसायट्यानीं चालविलेल्या व सरकारची मदत असलेल्या ११८ शाळा आहेत. वसाहतींमध्यें १२ दुय्यम शिक्षणाच्या शाळा आहेत, आणि फोराबे नांवाचें कॉलेज असून तें डरहॅम युनिव्हर्सिटीला जोडलेलें आहे. सरकारचें १९२३ सालचें उत्पन्न ८४५३२० पौंड आणि खर्च ७०६७६१ पौंड होता. आयात व्यापार १९४९८८१ पौंड आणि निर्गत व्यापार १६०७२२५ पौंड इतका झाला. आयात व्यापारांतील मुख्य जिन्नस कापसाचें कापड, कोळसा, दारू, तंबाखू, केरोसिन हे, आणि निर्गत व्यापाराचे मुख्य जिन्नस ताडगोळे, ताडाचें तेल, वगैरे आहेत. १९२३ सालीं ३३८ मैल रेल्वे होती. तारायंत्र व टेलिफोन यांच्या तारा १२०० मैल होत्या.

प्रोटेक्टोरेटचें क्षेत्रफळ २७००० चौरस मैल व लोकसंख्या १९२१ सालीं १४५६१४८ होती. येथें मिशनर्यांच्या व मुसुलमानांच्या शाळा बर्याच आहेत, व एक सरकारी अॅग्रिकल्चरल ट्रेनिंग कॉलेज आहे.

इतिहास.— या वसाहतीस सीएरालिओनीं हें नाव पिड्रोडीसिंट्रा या पोर्तुगीज शोधकांकडून मिळालें. येथें पोर्तुगीजांच्या कांहीं वखारी होत्या. १७व्या शतकाच्या अखेरीस सीएरालीओनीच्या खाडींत असलेल्या बांसी बेटावर ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला. बनाना बेटावरहि ब्रिटिश व्यापारी येऊन राहिले होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या अखेरीस लढाईतून व आरमारांतून मुक्त झालेल्या निग्रोंची एक वसाहत सीएरालिओनी द्वीपकल्पावर १७८७ सालीं स्थापण्यांत आली. १७८८ सालीं टिमनी राष्ट्रजातीचा मुख्य नेंबाना यानें कॅप्टन जॉन टेलर याला आपल्या हद्दींतील कांहीं भाग विकला. एतद्देशीयांनीं येथील लोकांवर हल्ला केल्यामुळें हा भाग वसविण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. १७९१ सालीं अलेक्झांडर फालकन ब्रिज यानें पांगापांग झालेल्या लोकांना एकत्र करून ग्रेनव्हिलस टाऊन येथें नवीन वसाहत केली. तिच्या साहसी प्रवर्तकांनी 'सीएरालिओनी' कंपनीची स्थापना केली. १७९४ सालीं ही वसाहत मूळच्या जागीं नेण्यांत येऊन तिला फ्री टाऊन असें नांव देण्यांत आलें. १८०७ सालीं या कंपनीनें आपले हक्क राणी सरकारकडे सोंपविले. जनरल चार्लस टर्नर यानें १८२५ सालीं 'टर्नरचें द्वीपकल्प' व दुसरीं कांहीं स्थळें ब्रिटिश संरक्षणाखाली घेतलीं. १८१८ सालीं लॉस बेटें ग्रेटब्रिटनला एतद्देशीयांपासून मिळालीं होतीं. ती १९०४ सालीं फ्रान्सच्या स्वाधीन करण्यांत आलीं. १८६६ सालीं सीएरालिओनी, गँबिया, गोल्डकोस्ट व लेगॉस यांचें मिळून एक संयुक्त सरकार बनविण्यांत आलें व फ्री टाऊन ही त्याची राजधानी करण्यांत आली. १८७४ सालीं गोल्डकोस्ट, व लेगॉस व १८८८ सालीं गँबिया, सीएरालीओनीपासून विभक्त करण्यांत आलें.

सोफाज नांवाचे मुसुलमान भाडोत्री सैनिक सीएरालीओनी, फ्रेंचमिनी यांच्या सरहद्दीवर वेळोंवेळीं लूटमार करीत असत. त्याच्या बंदोबस्ताकरितां ब्रिटिश व फ्रेंच यांच्या १८९६ सालीं सरहद्दी आखण्यांत आल्या. ब्रिटिश सत्तेविरुद्ध बाई बुर्हे या टिमनी जातीच्या मुख्यानें व नंतर मेंडी राष्ट्रजातीनें बंड पुकारलें. पण त्यांचाहि ताबडतोब बंदोबस्त करण्यांत आला. या सर्व गडबडीचें कारण 'घरावरील कर' हें होतें. लोकांच्या हक्कांचें रक्षण करण्याचें व एतद्देशीय मुख्यांची सत्ता अबाधित राखण्याचें धोरण ज्यावेळीं सरकारनें स्वीकारलें त्यावेळींच लोकांची मनें स्थिरावलीं.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .