प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद   

सिलोन (सिंहलद्वीप अथवा लंका)— सिंहलद्वीपाचा सामाजिक, राजकीय व वाङ्मयीन इतिहास 'हिंदुस्थान आणि जग' या पहिल्या विभागात चवथ्या प्रकरणांत फारच विस्तारानें दिला आहे. तेथेंच शेवटीं सिंव्हली भाषेचें तौलनिक स्वरूप व मूळ यांविषयी कोष्टकें देऊन माहिती पुरविली आहे. आज सिंहलद्वीपांत भारतीयत्व कितपत टिकून आहे याची कल्पना तो विभाग वाचल्यानें स्पष्ट येईल.

सिलोन हें हिंदी महासागरातील सर्वांत मोठें बेट व ब्रिटिश सरकारच्या बादशाही वसाहतीचें ठिकाण आहे. वायव्येस हें मानारचें आखात व पाल्कची सामुद्रधुनी यामुळें हिंदुस्थानापासून वेगळें झालेलें आहे. याची दक्षिणोत्तर सर्वांत जास्त लांबी २७१॥ मैल व सर्वांत जास्त पूर्वपश्चिम रुंदी १३७॥ मैल आहे व याचें क्षेत्रफळ २५३३२ चौरस मैल आहे. हें बेट रामेश्वर व रामाचा सेतू यांनीं हिंदुस्थानला बहुतेक जोडलेलें आहे. या बेटांतील पर्वत दक्षिण भागांत आहेत. पूर्वी आदामचें शिखर (पहा) सर्वांत उंच समजलें जात होतें. परंतु त्याची उंची फक्त ७३५३ फूट आहे. या ठिकाणीं पूर्वेकडील सर्व भागांतून यात्रेकरूं येतात. येथील सर्वांत उंच पर्वत पेड्रो तालागाला हा ८२९६ फूट उंच आहे. किरिगाल्पोटा व टोटापेला कांडा हे दुसरे मुख्य पर्वत आहेत. सर्वांत मोठी नदी महावेलीगंगा ही असून तिची लांबी २०६ मैल आहे. याशिवाय आणखी १२ नद्या आहेत. त्यापैकीं एकहि ९० मैलांपेक्षां जास्त लांब नाहीं. जायंटस् टँक, मिन्नेरि व कालावेना हीं येथील मुख्य सरोवरें आहेत.

सिलोनची एकंदर लोकसंख्या (१९२१) ४५०४५४९. येथें सुमारें १७ जातीचें लोक आहेत. येथील मूळ रहिवाशांनां वेद्द असें म्हणतात. शेंकडा ७० लोक सिंहली भाषा बोलतात व बाकीचे यूरोपियन खेरीज तामिळ भाषा बोलतात. येथें बौद्ध धर्मीयांची संख्या सर्वांत जास्त (२७६९८०५) आहे. या शिवाय हिंदु (९८२०७३), ख्रिस्ती (४४३४००) व मुसुलमान (३०२५३२) लोकहि येथें आहेत.

प्राचीन सिंहली राजांनीं या देशांत पुष्कळ कालवे केले होते त्यामुळें हें बेट इतर आशियाला धान्य पुरवीत असे परंतु ते कालवे आतां फारसे उपयोगांत येत नाहींत. १६२१२४०० एकर जमीनीपैकीं सुमारें ३० लाख एकर जमीन लागवडींत आहे. सुमारें ७ लाख एकर कुरण आहे. उंचवट्याच्या प्रदेशांत व कांही सखल जमीनीवर यूरोपियन व एतद्देशीय मळेवाले चहा, कोको, दालचिनी, कॉफी व (इंडिया) रबर यांची लागवड करतात. १९२३ सालीं ४ लाख एकरांपेक्षां जास्त जमीन चहाच्या लागवडींत होती व परदेशीं पाठविल्या जाणार्या चहाचा अंदाज १८ कोटी पौंड (वजनी) होता. याशिवाय तांदूळ व तंबाखू ही येथें बर्याच प्रमाणावर होतात. १८७५ पासून एतद्देशीय व यूरोपियन आले नारळाची लागवड बरीच वाढत्या प्रमाणावर करूं लागले आहेत. खोबरें व खोबर्याचें तेल याचा बराच मोठा व्यापार चालतो. मोत्यांचे शिंपलें त्रिकोमालीजवळ सांपडतात. येथील खनिज पदार्थांत शिसपेन्सिलीचा दगड व रत्नें ही मुख्य आहेत.

सन १८८० पासून येथील व्यापाराची जलद भरभराट झालीं. १९२३ मध्यें एकंदर आयात २९२१५९७८४ रुपयांची व निर्गत ३५११९८७४८ रुपयांची झाली. कोको, दालचिनी, सुंभ, नारळ, खोबरें, तेल, चहा, प्लंवेगो शिसपेन्सिलीचा दगड, सुपारी, रबर हे बाहेर जाणारे जिन्नस होत. खाण्याचे व पिण्याचे पदार्थ, कोळसा, मँचेस्टरचा कपडा व मशिनरी इत्यादि येथील आयात व्यापाराचे मुख्य पदार्थ आहेत. सन १९२३ च्या अखेरीस आगगाडीचा रस्ता ७३४ मैल होता. व त्यांत सर्व जगांतील उत्तमापैकीं उत्तम पर्वतावरील आगगाडीचा रस्ता १६० मैल आहे.

येथें मातृभाषेंतील शिक्षण मोफत मिळतें पण इंग्रजी शिक्षणाला फी पडते. १९२१ सालीं युनिव्हर्सिटी कॉलेज उघडण्यांत आलें. धंदे व व्यापारी शिक्षणाच्या शाळाहि बर्याच आहेत. सिलोन ही बादशाही वसाहत आहे, म्हणजे हें बेट ब्रिटिश राजाच्या ताब्यांत असून त्याचा कारभार राजाने नेमिलेला गव्हर्नर पाहतो. गव्हर्नर बहुधा ६ वर्षांकरितां नेमिलेला असतो. त्याला मदत करण्याकरितां एक कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ असतें. कार्यकारी मंडळांत ७ मंत्री असतात व कायदेमंडळांत ४९ सभासद असतात. राज्य कारभाराच्या सोयीकरितां देशाचे ९ प्रांत केले असून प्रत्येकावर एकेक गव्हर्मेंट एजंट असतो. देशांत तीन म्युनिसिपालिट्या, आठ जिल्हा कौन्सिलें व १४ लोकलबोर्डें आहेत.

इ ति हा स.— सिंहलद्वीपाचा सविस्तर इतिहास 'हिंदुस्थान आणि जग' या विभागात (पू. १२७-२८) सविस्तर दिला आहे. सिलोनचा विश्वसनीय असा इतिहास ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकापासून सुरू होतो. त्या शतकांत उत्तर हिंदुस्थानांतील हिंदूंनीं या बेटावर स्वारी करून सिंहली राजघराणें स्थापन केलें. नंतर पुढील काळांत बर्याच घालमेली होऊन दक्षिण हिंदुस्थानांतील तामिळांनीं या बेटाचा उत्तर भाग व्यापिला. १५०५ सालीं पोर्तुगीजांनीं पश्चिम व दक्षिण भागांत वसाहती केल्या; त्या पुढील शतकाच्या मध्यांत डचांनीं हस्तगत केल्या. १७९६ त ब्रिटिश सरकारनें या परकीय वसाहती मद्रास इलाख्याला जोडल्या. पण १८०२ मध्यें हिंदुस्थानापासून सिंहलद्वीप विभक्त करून त्याची बादशाही वसाहत बनविली. १८१५ त आंतल्या भागांत जे कँडीचे राजे राज्य करीत होते, त्यांच्याकडून ग्रेटब्रिटननें राज्य घेऊन संबंध सिंहलद्वीप ब्रिटिश सत्तेखालीं ओढिले. तेव्हांपासून आजतागाईत तें तसेंच आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .