प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  

सिरोही— राजपुतान्याच्या नैॠत्य भागांतील संस्थान. क्षेत्रफळ १९६४ चौरस मैल. मर्यादा:- उत्तरेस, ईशान्येस व पश्चिमेस जोधपूर; दक्षिणेस पालनपूर, दतिया व ईदर; आणि पूर्वेस उदेपूर. हा प्रदेश डोंगर व खडकांच्या रांगामुळें बराच तुटलेला आहे. दक्षिणेकडे अबूच्या डोंगराचें सर्वांत उंच शिखर ''गुरु'' हें समुद्रसपाटीपासून ५६५० फूट उंच आहे. पूर्वभागाच्या मानानें पश्चिमार्ध खुला व सपाट असून त्यांत वस्ती दाट व लागवड बरीच झालेली आहे. या संस्थानांत पश्चिम बनास ही एकच महत्त्वाची नदी आहे; परंतु तिलाहि सर्व वर्षभर पाणी रहात नाहीं. संस्थानची हवा एकंदरींत कोरडी व आरोग्यकारक आहे. राजपुतान्याच्या उत्तरभागाप्रमाणें येथें उन्हाळा कडक होत नाहीं; परंतु हिवाळा फार थोडे दिवस रहातो. दक्षिण व पूर्व भागांतील जिल्ह्यांत पाऊस बराच पडतो. परंतु संस्थानच्या इतर भागांत केव्हां केव्हां पावसाची कमताई भासते. सिंरोही येथें २१ इंच पाऊस पडतो.

इतिहास.— सिरोहीचे संस्थानिक चव्हाण घराण्यापैकीं देवरा शाखेचे रजपूत असून दहाव्या शतकाच्या अखेर जोधपूर संस्थानांत नाडोल येथें राज्य करणार्या लछमन (लक्ष्मण) राजाचे वंशज आहेत. इ. स. १२०० च्या सुमारास यांनां नाडोलमधून घालवून लाविल्यावर, हे चव्हाण पश्चिमेकडे जाऊन भीनमाळ व सांकेत येथें राहूं लागले. परमार रजपुतांपासून त्यांनीं जालोरचा किल्ला घेतला. कांहीं काळानंतर देवराज नांवाचा पुरुष चव्हाणांचा मुख्य झाला व त्याच्या नांवावरून त्यांना देवरा चव्हाण हें नांव प्राप्त झालें. त्यावेळीं सिरोहींत परमार रजपुतांचें राज्य असून त्यांची राजधानी चंद्रावती येथें होती. परमार व देवरा यांच्या दरम्यान नेहमीं युद्ध होत असे. अखेर देवरांनीं चंद्रावती काबीज केल्यानंतर परमारांनीं अबूच्या पहाडाचा आश्रय केला. तेथें हल्ला करणें सोपें नव्हतें, याकरितां परमारांनीं आपल्या घराण्यांतील १२ मुली देवरा घराण्यांत देऊन त्या घराण्याशीं स्नेह जोडावा अशी सूचना देवरांनी केली. व ती सूचना मान्य करून बहुतेक सर्व परमार अबूच्या वायव्येस वरेली येथें जमले; तेव्हां देवरांनीं विश्वासघातानें त्यांच्यावर हल्ला करून बर्याच लोकांची कत्तल केली व उरलेल्या लोकांचा अबूच्या पहाडापर्यंत पाठलाग केल्यानंतर ती जागा सर केली. ही हकीकत चवदाव्या शतकाच्या आरंभास घडली असें म्हणतात. १४०५ मध्यें रावसोभा यानें जुनें सिरोही गांव वसविलें; परंतु ती जागा आरोग्याच्या दृष्टीनें चांगली नसल्यामुळें, त्याचा मुलगा सप्तमल यानें पश्चिमेस थोड्या अंतरावर १४२५ त हल्लीचें गांव वसविलें. पुढील दोन शतकांत विशेष महत्त्वाची गोष्ट घडून आली नाहीं. अकबर व जहांगीर यांच्या वेळी येथें राव सुर्थान नांवाचा राजा गादीवर होता. मोंगल सैन्यानें त्याचा वारंवार पराभव केला; तरी त्यानें त्यांचें वर्चस्व कबूल केलें नाहीं. अठराव्या शतकांत जोधपूरशीं झालेल्या युद्धामुळें व मीना टोळ्यांच्या सतत हल्ल्यामुळें शिरोहीचें पुष्कळ नुकसान झालें. १९व्या शतकाच्या आरंभीं जोधपूरच्या राजानें संस्थानावर स्वारी केली असतां राजानें इंग्रजाची मदत मागितली. तेव्हांपासून या राज्यात इंग्रजांचा पोलि. एजंट राहूं लागला. बंडाच्या वेळीं येथील राजानें इंग्रजांस चांगली मदत केली. हल्लींचा राजा सरूपरामसिंग ह्याला वंशपरंपरागत महाराजधिराज महाराव अशी पदवी (१८८९) व जी. सी. आय्. ई. आणि कें. सी. एस. आय् हे किताब आहेत. यांच्या कारकीर्दीत संस्थानांत बर्याच सुधारणा झाल्या असून दरबार व ठाकूर यांच्यांतील स्नेहसंबंध वृध्दिंगत झाले आहेत व संस्थानचें उत्पन्न दुप्पट झालें आहे. सिरोहीच्या संस्थानिकाला १५ तोफांची सलामी मिळते.

संस्थानांतील अबू, चंद्रावती, वसंतगड, नांदिया व बास हीं ठिकाणें पुराणवस्तुसंशोधकांच्या दृष्टीनें महत्त्वाचीं आहेत.

लोक.— संस्थानांत लहानमोठीं ४१३ गांवें असून १९२१ मध्यें एकंदर लोकसंख्या १८८६३९ होती. शेंकडा ७२ पेक्षां जास्त हिंदु, शेंकडा ११ वन्य हिंदु, व शेंकडा ११ जैन आहेत. येथें मुख्यतः मारवाडी भाषा चालते. महाजन हे व्यापारी व सावकार असून त्यांची संख्या सर्वांत मोठी आहे. दुसर्या महत्त्वाच्या जाती म्हणजे रजपूत, धेड, रेबाडी व भिल्ल या होत. शेंकडा ६० लोक शेतकीवर पोट भरतात.

शेतकी.— सिरोही संस्थानांतील जमीन एकंदरीत सुपीक आहे. तींत मका, बाजरी, मूग, कुळीथ (खुलात) व तीळ हीं खरिपाचीं पिकें आणि बाजरी, गहूं, हरभरा हीं रब्बीचीं पिकें होतात.

व्यापार व दळणवळण.— संस्थानांतील मुख्य कारखाने म्हणजे राजधानींत असलेले, तलवारी, खंजीर, भाले, चाकू, व धनुष्यें वगैरे जिन्नस तयार करण्याचे होत. इराणी व तुर्की लोकांत ज्याप्रमाणें दमास्कसच्या तरवारी प्रसिद्ध होत्या. त्याप्रमाणें रजपुतांत सिरोहीच्या तरवारी प्रसिद्ध असत. तीळ, मोहरी, कच्ची व कमावलेली कातडी व तूप हे निर्गत जिन्नस आणि धान्य, कापड, मीठ, साखर, धातूचें काम, तंबाखू व अफू हे आयात जिन्नस होत. अबूरोड, पिंदवार, रोहेर हीं व्यापाराचीं मुख्य ठाणीं आहेत. संस्थानच्या पूर्वभागांतून राजपुताना—माळवा रेल्वेचा फांटा गेलेला आहे.

राज्य व्यवस्था.— संस्थानचा राज्यकारभार स्वतः महाराव दिवाण, मुलकी कामगार, न्यायाधीश वगैरे इतर कामागारांच्या मदतीनें चालवितो. संस्थानांत १४ तहशिली असून प्रत्येकीवर तहशिलदार आहेत. न्याय देण्याच्या कामांत ब्रिटिश हद्दींतील कायद्यांचाच बहुधां अवलंब केला जातो. संस्थानचें उत्पन्न सालीना ९। लक्षांचें आहे. राजपुतान्यांतील संस्थानांत साक्षरतेच्या बाबतींत सिरोही संस्थानचा नंबर पहिला असून येथील शेंकडा १२.४ पुरुषांनां व ०.६ स्त्रियांनां लिहितांवाचतां येतें; याचें कारण अबू व अबूरोड येथें यूरोपियन व यूरोपियनांचा बराच भरणा आहे हें होय. शिक्षणाला उत्तेजन देण्याकरितां खुद्द दरबारकडून फारच थोडे प्रयत्न केले जातात.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .